Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये 87 रुग्ण कोरोनामुक्त, तर 99 जणांना कोरोनाची लागण

| Updated on: Aug 28, 2021 | 3:39 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नाशिकमध्ये 87 रुग्ण कोरोनामुक्त, तर 99 जणांना कोरोनाची लागण
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Aug 2021 10:11 PM (IST)

    सामनाचे संपादक बावळट, संजय राऊतांवर नारायण राणेंची टीका

    मुंबई : सामनाचे संपादक बावळट

    मला सुक्ष्म आणि लघु उद्योग खातं दिल्यावर ते म्हटले की सुक्ष्म आहे

    पण देशातील 80 टक्के उद्योग हे माझ्या खात्यांतर्गत येतात

    ते बावळट आहेत, संजय राऊतांवर नारायण राणेंची टीका

    वैभववाडीत बोलताना केली टीका

  • 27 Aug 2021 08:17 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात मैदानावर आढळली मगर

    चंद्रपूर: जिल्ह्यातील घुग्गुस शहरात मैदानावर आढळली मगर

    मैदानावर संध्याकाळी रपेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना दिसली मगर

    पोळा मैदान भागात शिरली मगर, पोळा मैदान गर्दीचे ठिकाण,

    मैदानावर मगर आढळल्याने नागरिकांत भय

    मगर कुठून आली याचा शोध घेत बंदोबस्ताची मागणी

  • 27 Aug 2021 07:25 PM (IST)

    दहीहंडीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, गणेशोत्सव मंडपातच झाला पाहिजे- अजित पवार 

    अजित पवार – सध्या संसर्ग पाहता आता सुरू असलेले निर्बंध कायम राहतील-अजित पवार

    – दहीहंडीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

    – गणेशोत्सवासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार

    – गणेशोत्सव मंडपातच झाला पाहिजे

  • 27 Aug 2021 07:24 PM (IST)

    नाशिकमध्ये 87 रुग्ण कोरोनामुक्त, तर 99 जणांना कोरोनाची लागण

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 87

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 99

    नाशिक मनपा- 37

    नाशिक ग्रामीण- 54

    मालेगाव मनपा- 02

    जिल्हा बाह्य- 06

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8570

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02

    नाशिक मनपा- 01

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 01

    जिल्हा बाह्य- 00

  • 27 Aug 2021 06:11 PM (IST)

    नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात पोहोचणार

    सिंधुदुर्ग : काही वेळात नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात पोहोचणार

    जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटणमध्ये होणार भव्यदिव्य स्वागत

    कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

    ढोल, दशावतार व लेझीम पथकांचे कार्यक्रम सुरू

    भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते जल्लोषात सहभागी

  • 27 Aug 2021 05:50 PM (IST)

    पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सुरु

    सध्याच्या कोरोना परिस्थितीत बैठकीवर चर्चा

  • 27 Aug 2021 04:19 PM (IST)

    रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील अट्टल चोरट्याला अटक

    नागपूर -रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील अट्टल चोरट्याला लोहमार्ग पोलीसांनी केली अटक

    प्रवाशांच्या हातावर काठीने वार करून मोबाईल खाली पडायचे, त्यांनंतर ते मोबाईल घेऊन आरोपी पळून जात होते

    12 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे

  • 27 Aug 2021 02:36 PM (IST)

    कोकणी माणसाला मदत केली की उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतं – आशिष शेलार

    आशिष शेलार –

    कोकणी माणसाला मदत केली की उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतं

    नारायण राणे मुख्यमंत्री होतानाही उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखलं

    सुरेश प्रभू, रामदास कदम या कोकणी माणसाची काय अवस्था केली हे न बोललेलं बरं

    लोकमान्य टिळकांनी लढा उभा केला ते असंतोषाचे जनक होते

    मात्र उद्धव ठाकरे हे असहिष्णुतेचे जनक आहेत

    गेल्या दोन महिन्यापासून राज्यात असहिष्णुतेचं वातावरण आहे

    आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टिका

  • 27 Aug 2021 02:35 PM (IST)

    औरंगाबादेत शिवशाही बसला भाडे मिळावे यासाठी 2 एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद

    औरंगाबाद –

    शिवशाही बसला भाडे मिळावे यासाठी 2 एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद

    शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बस मधून प्रवासी उतरवल्यावरून बस स्थानकावर गोंधळ..

    शिवशाही बस आणि सामान्य एसटी कर्मचाऱ्यांत वाद..

    कर्मचाऱ्यांच्या भांडणात प्रवाशांचा खोळंबा ,बराच वेळ प्रवाशी होते ताटकळत..

    औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानका वरील प्रकार..

  • 27 Aug 2021 02:06 PM (IST)

    आवाज खणखणीत झाली की खणखणीत वाजवणार, टप्याटप्याने जुनीप्रकरणं बाहेर काढणार; राणेंनी शिवसेनेला ललकारले

  • 27 Aug 2021 11:00 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त

    ईडीने केली जप्त

    5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

    लोणावळा , जळगाव येथील मालमत्ता जप्त

  • 27 Aug 2021 09:45 AM (IST)

    टोमॅटोच्या दरात घसरणीमुळे उत्पादक हैराण, टोमॅटोला मिळतोय मातीमोल दर

    बारामती :

    – टोमॅटोच्या दरात घसरणीमुळे उत्पादक हैराण

    – टोमॅटोला मिळतोय मातीमोल दर

    – उच्च दर्जाच्या टोमॅटोचा प्रति 10 किलोला 25 ते 30 रुपये दर

    – उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

    – दर नसल्याने शेतकऱ्यांनी तोडणी टाकली लांबणीवर

    – अनेक ठिकाणी दर नसल्याने टोमॅटो बागेतच सडू लागला

    – मातीमोल दरामुळे टोमॅटोनं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

  • 27 Aug 2021 09:28 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल केलेल्या 8 हजार 571 संस्था पैकी तब्बल 973 संस्था अपात्र

    कोल्हापूर –

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल केलेल्या 8 हजार 571 संस्था पैकी तब्बल 973 संस्था अपात्र

    अवसायनात काढलेल्या आणि नोंदणी रद्द झाले का संस्थांचा समावेश

    दुपार ठराव दाखल केल्यास संस्थांचाही एक ठराव गृहीत धरून केलेली कच्ची यादी तयार

    3 सप्टेंबर ला होणार प्रारुप यादी प्रसिद्ध

    जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रक्रियेला गती

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष

    निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी यांच्या हालचाली

  • 27 Aug 2021 09:28 AM (IST)

    नागपुरात अजून तीन लाख लोकांनी पहिला डोज घेतलाच नाही

    नागपुरात अजून तीन लाख लोकांनी पहिला डोज घेतलाच नाही

    18 वर्षांवरील नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर

    तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक बाब

    पहिली लस न घेतलेल्या नागरिकांनी लस घेण्याचं महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांचं आवाहन

    गणेशोत्सव, पोळा साधेपणाने साजरा करण्याचं महापालिका आयुक्तांचं आवाहन

  • 27 Aug 2021 09:27 AM (IST)

    मराठा आरक्षण प्रश्नी विनोद पाटील यांचे केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप

    औरंगाबाद –

    मराठा आरक्षण प्रश्नी विनोद पाटील यांचे केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप

    मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार राजकारण करत असल्याचा केला आरोप

    स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारणी एकत्र येतात मात्र मराठा आरक्षणासाठी येत नसल्याचा आरोप

    जाणीवपूर्वक मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ होत असल्याचा केला आरोप

  • 27 Aug 2021 09:27 AM (IST)

    गोकुळ दूध संघाची यावर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने होणार

    कोल्हापूर

    गोकुळ दूध संघाची यावर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने होणार

    24 सप्टेंबरला होणार सर्वसाधारण सभा

    गोकुळमधील सत्तांतरानंतर होणारी पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाणार ऑनलाईन

    ऑनलाईन सभेच्या निर्णयाला विरोधी गटाकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता

    दरवर्षी सत्ताधारी आणि विरोधी गटातील राहण्यामुळे गाजते गोकुळची सर्वसाधारण सभा

  • 27 Aug 2021 09:26 AM (IST)

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देताच काँग्रेसमध्ये चैतन्य

    नागपूर –

    राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देताच काँग्रेसमध्ये चैतन्य

    शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी तातडीने 18 ब्लॉकवर समन्वयकांची नियुक्ती केली

    समन्वयकाने प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्या कार्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले आहे

    आगामी महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे

    राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेचे स्पष्ट आदेश काढले आहे

    त्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे

    सध्याची पोषक परिस्थिती बघता काँग्रेसला महापालिकेत मोठी मुसंडी मारण्याची आशा आहे

    त्यासाठी तयारी सुरु केली आहे, त्यानुसार यंत्रणा सज्ज केली जात आहे

  • 27 Aug 2021 09:25 AM (IST)

    ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आगामी निवडणुका होऊ देणार नाही

    सोलापूर –

    ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय आगामी निवडणुका होऊ देणार नाही

    जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या निवडणुका रद्द कराव्यात

    अन्यथा महाराष्ट्रात कुठेही निवडणूक होऊ देणार नाही

    ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्याची मागणी

    त्यासाठी सोलापुरात होणार 31 तारखेला ओबीसी निर्धार मेळावा

    निर्धार मेळाव्याला नामदार विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित

    ओबीसी निर्धार मेळावा निमंत्रक शरद कोळी  यांची माहिती

  • 27 Aug 2021 09:25 AM (IST)

    बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा, दोन महिन्यांपासून दैनंदिन कामे खोळंबली

    बारामती :

    – बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा

    – दोन महिन्यांपासून दैनंदिन कामे खोळंबली

    – मुख्याधिकाऱ्यांची नेमणुक नसल्याने नियमीत कामांवर झाला परिणाम

    – रस्ते दुरुस्तीसह अनेक विषय प्रलंबित

    – कोव्हिडच्या उपाययोजनांवरही होतोय परिणाम

  • 27 Aug 2021 09:24 AM (IST)

    औरंगाबादच्या वेदांत नगर परिसरात गाड्यांची तोडफोड, विट्स हॉटेलच्या पाठीमाघील परिसरात तोडफोड

    औरंगाबाद –

    औरंगाबादच्या वेदांत नगर परिसरात गाड्यांची तोडफोड

    विट्स हॉटेलच्या पाठीमाघील परिसरात तोडफोड

    10 ते 12 गाड्यांची तोडफोड

    उचभ्रू वस्तीत झाली गाड्यांची तोडफोड

    अज्ञातांनी केली मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड

    तोडफोड प्रकरणाची वेदांत नगर पोलिसांकडून तपासणी सुरू

  • 27 Aug 2021 08:33 AM (IST)

    TV9 Impact | टीव्ही9 च्या बातमीचा दणका, औरंगाबादेतील 3 खंडणीखोरांना अटक

  • 27 Aug 2021 08:32 AM (IST)

    गणेश मूर्तीच्या उंचीवरची बंधनं हटवा, आम्हालाही जगू द्या, नांदेडच्या मूर्तीकारांची शासनाकडे मागणी

  • 27 Aug 2021 08:31 AM (IST)

    तिसऱ्या लाटेआधीच राज्यात 25 दिवसात 4 हजार 500 मुलं कोरोनाबाधित

  • 27 Aug 2021 08:09 AM (IST)

    विदर्भात गेल्या 24 तासांत 26 नवीन कोरोना रुग्णांची भर

    – विदर्भात गेल्या 24 तासांत 26 नवीन कोरोना रुग्णांची भर

    – नागपूर जिल्हयात गेल्या 24 तासांत सहा नव्या कोरोना रुग्णांची भर

    – गेल्या 24 तासांत विदर्भातील गोंदिया, अकोला, वर्धा जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही

    – नागपूर जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्णाचा मृत्यू नाही

    – नागपूर जिल्ह्यात त्यानंतर 13 ते 26 ऑगस्टदरम्यान एकही मृत्यू नाही

  • 27 Aug 2021 08:08 AM (IST)

    सोलापुरात दोन दिवसानंतर आज होणार कोरोना प्रतिबंधक लसीकरण

    सोलापूर –

    दोन दिवसानंतर आज होणार कोरोना प्रतिबंधक लसीकरण

    लसीचा पुरवठा झाला नसल्यामुळे दोन दिवसांपासून ठप्प होते लसीकरण मोहीम

    आरोग्य उपसंचालकामार्फत लसीचा झाला  पुरवठा

    लस उपलब्ध असल्याने आज होणार पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण

  • 27 Aug 2021 08:07 AM (IST)

    ‘सहमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

    नागपूर –

    – ‘सहमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे’

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

    – ‘लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नाही’

    – ‘यवतमाळच्या त्या तरुणाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरता येत नाही’

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं मत

    – यवतमाळ सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने बदलला

    – यवतमाळ येथील २२ वर्षीय आरोपीला दिलासा

    – २००६ मध्ये घाटांजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याबाबात महत्त्वपूर्ण निकाल

  • 27 Aug 2021 08:07 AM (IST)

    नागपूर जिल्हयात 700 मुलं शिक्षणापासून वंचित

    नागपूर

    – आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण?

    – मुलांच्या शिक्षणासाठी भारवाड समाजातील पालकांची भटकंती

    – नागपूर जिल्हयात ७०० मुलं शिक्षणापासून वंचित

    – ‘फटका समाज असल्याने, कुणी शाळेत प्रवेश देईना, कुणी शिक्षण देईना’

    – मुलांच्या शिक्षणासाठी भटक्या समाजातील पालक शिक्षण विभागाच्या कार्यालयात

    – ज्या जिल्ह्यात भटकंती, त्या जिल्ह्यात शाळेत प्रवेश देण्याची मागणी

    – १० वर्षानंतरंही शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा कागदावरंच

  • 27 Aug 2021 07:41 AM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरे आज नाशकात घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

    नाशिक – मनसे नेते अमित ठाकरे आज घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक..

    शहरात एकाच वेळी मनसेच्या तीन ठिकाणी बैठकी..

    अमित ठाकरे,बाळा नांदगावकर,संदीप देशपांडे घेणार तीन ठिकाणी बैठका..

    शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

  • 27 Aug 2021 07:11 AM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल

    नाशिक – मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल..

    आजपासून अमित ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर..

    बाळा नांदगावकर,संदीप देशपांडे,अविनाश अभ्यंकर राहणार उपस्थित..

    सकाळी 11 पासून बैठकांना सुरुवात

  • 27 Aug 2021 07:11 AM (IST)

    नागपुरात कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात राहणे अनिवार्य

    – नागपुरात कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात राहणे अनिवार्य

    – डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता नागपूर मनपा आयुक्तांचा निर्णय

    – रुग्णाला संस्थात्मक विलीगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल होणं गरजेचं

    – आता कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाला गृह विलीगीकरणात राहता येणार नाही

    – मनपा आयुक्तांच्या झोन आयुक्तांना सुचना

  • 27 Aug 2021 07:11 AM (IST)

    नाशकात दीड लाखांच्या श्वानाला लाथ मारली म्हणून एकाला बदडले

    नाशिक –

    दीड लाखांच्या श्वानाला लाथ मारली म्हणून एकाला बदडले..

    पंचवटी परिसरातील घटनेने आश्चर्य..

    श्वान अंगावर भुंकल्याने लाथ मारल्याचा मालकाला आला राग..

    श्वाना ला का मारले अस म्हणत हातातील कड्याने केली मारहाण

    श्वान मालका विरोधात गुन्हा दाखल

  • 27 Aug 2021 07:10 AM (IST)

    करिष्मा प्रकाश विरोधात अनेक महत्वाचे पुरावे मुंबई हायकोर्टात सादर

    करिष्मा प्रकाश विरोधात अनेक महत्वाचे पुरावे कोर्टात सादर

    मुंबई हायकोर्टात पुरावे सादर

    एनसीबीने केले पुरावे सादर

    करिष्मा प्रकाश हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी

    मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी

    करिष्मा प्रकाश हिने मुंबई हायकोर्टात केला आहे अर्ज

    अटकपूर्व जामीन मिळवा म्हणून केला आहे अर्ज

    करिष्मा प्रकाश हीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळला आहे.

    यानंतर करिष्मा हिने केला आहे मुंबई हायकोर्टात अर्ज

    करिष्मा हे सेलिब्रिटी मॅनेजर

    करिष्मा ही अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर होती

    करिष्मा हिच्या घरी सापडले होते मोठ्या प्रमाणात ड्रग्स

    या बाबत एनसीबीने केला आहे गुन्हा दाखल

  • 27 Aug 2021 07:05 AM (IST)

    वाघोली परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पुणे

    वाघोली परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    त्याच्याकडून दोन लाख 63 हजार यांचा 13 किलो 300 ग्रॅम गांजा केला जप्‍त

    नितीन मोहन डूकळे कसे अटक केलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव

    पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने केली कारवाई

  • 27 Aug 2021 07:04 AM (IST)

    नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात महिला डॅाक्टरची छेडखानी

    – नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात महिला डॅाक्टरची छेडखानी

    – ॲाक्सिजन प्लांट उभारणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केली छेडखानी

    – छेडखानी करणारा महिला डॅाक्टरचा पाठलाग करत असल्याची माहिती

    – प्रकरणानंतर निवासी डॅाक्टरांमध्ये संतापाचं वातावरण

  • 27 Aug 2021 07:03 AM (IST)

    औरंगाबादेत उद्योजकाला 60 लाखांची खंडणी मगितल्याचे प्रकरण, अखेर खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

    औरंगाबाद –

    उद्योजकाला 60 लाखांची खंडणी मगितल्याचे प्रकरण

    अखेर खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल

    गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना केली अटक

    औरंगाबाद शहरातील जवाहर नगर पोलिसांनी केली कारवाई

    उद्योजकाच्या खंडणी प्रकरणाला tv9 फोडली होती वाचा

    tv9 बातमी दाखवताच खडबडून जागी झाली पोलीस यंत्रणा

  • 27 Aug 2021 06:46 AM (IST)

    दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील रस्त्यावरील गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी

    दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील रस्त्यावरील गटारांच्या लोखंडी झाकणांची चोरी

    गेल्या पाच दिवसांत 5 झाकणे चोरीला

    केळुसकर मार्गावरील भूमिगत गटारांवरील झाकणे चोरीला गेली

    पार्कातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गटारांवर तात्पुरती सिमेंटची झाकणे बसवली

  • 27 Aug 2021 06:44 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नायराणय राणे यांची जन आशीर्वाद यात्र आजपासून पुन्हा सुरु

    केंद्रीय मंत्री नायराणय राणे यांची जन आशीर्वाद यात्र आजपासून पुन्हा सुरु
    त्यावर एक पोस्टरवर लिहले आहे योद्धा पुन्हा मैदानात
    त्यावर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायरायण राणे यांचा फोटो आहे
  • 27 Aug 2021 06:43 AM (IST)

    जोगेश्वरीमध्ये अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनर

    शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरीमध्ये अनिल परब यांच्या समर्थनार्थ एक बॅनर लावले आहे

    शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग परिसरात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहे

    ज्यावर लिहिलेले आहे “संकटाच्या छाताडावर तांडव करणान्यांनाच शिवसैनिक म्हणतात”

    अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत

Published On - Aug 27,2021 6:37 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.