Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 119 नवे कोरोनाबाधित, सात जणांचा मृत्यू
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात दिवसभरात 3 नवे कोरोनाबाधित, एकही मृत्यू नाही
नागपूर :
नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
शून्य मृत्यू
तर 15 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 492933
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482654
एकूण मृत्यू संख्या – 10117
-
पुण्यात दिवसभरात 119 नवे कोरोनाबाधित, सात जणांचा मृत्यू
पुणे : दिवसभरात ११९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २३६ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४. – १९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८९०२१. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०८६. – एकूण मृत्यू -८८१६. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७८११९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६३१३.
-
-
राज्य सरकारने लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
राज्य सरकारने लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती, येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असेल
-
कोल्हापुरात गावाच्या पुनर्वसनासाठी गावकरी आक्रमक, शिये गावाच्या ग्रामस्थांची पंचगंगा नदीत उडी
कोल्हापुरात गावाच्या पुनर्वसनासाठी गावकरी आक्रमक, शिये गावाच्या ग्रामस्थांची पंचगंगा नदीत उडी देऊन सरकारला इशारा, महापुरात मरण्यापेक्षा नदीत जीव देतो, अशी गावकऱ्यांची भूमिका
-
सरकारने सोयी-सुविधा आणि ताकद दिल्याशिवाय गोल्ड मेडल कसं मिळणार? : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे : सोहळ्याचा मुहूर्त कसा शोधला माहिती नाही पण आज क्रांती दिन आपल्या सारख्याच, आदिवासी बांधवांच्या आपल्याकडून अपेक्षा भुजबळ साहेब, सरकारमध्ये आल्यावर हॉकी स्टिक व्यवस्थित वापरावी लागते बऱ्याच दिवसांनी मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलतोय मुख्यमंत्री झाल्यावर पहिले मी इकडेच आलो होतो भूमीपूजनानंतर मनात विचार आला होता की काम वेळेत होईल का जे मला दाखवलं त्यापेक्षा अप्रतिम काम तुम्ही वेळेत पूर्ण केलं आभासी पद्धतीने उद्घाटन करावं असं मनात होतं तुमच्या आग्रहामुळे आलो मला ही क्षणभर हॉकी खेळावं वाटलं. पण आता आपलं वय गेलं अकादमी पुण्याची असो की नाशिकची प्रमुख पाहुणा मात्र मुंबईचा लागतो
महाराष्ट्र पोलिसांचा दर्जा देशात अव्वल निरज ने गोल्ड मिळवल्यानंतर आपल्याला वाटतं महाराष्ट्रातून देखील कोणी तरी गोल्ड आणावं सरकारने सोयी-सुविधा आणि ताकद दिल्याशिवाय गोल्ड कसं मिळणार?
तुम्ही तुमच्या जागेचं सोन केलं आहे.. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी देणं हे आमचं कर्तव्य. नागरिकांना तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये यावं असं वाटत नाही किमान काम करणाऱ्या पोलिसांना तरी इथे यावं अस वाटलं पाहिजे आपण ज्या मागण्या ठेवल्या त्याची पूर्तता करू
-
-
शिरोळ तालुक्यातील गावांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर –
शिरोळ तालुका शिरोळ तालुक्यातील गावांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
जादा नुकसान भरपाई सह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्त एकवटले
शिरोळच्या शिवाजी चौकातून निघणार मोर्चा
मोर्चात पूरग्रस्त नागरिकांचं महिलांचाही सहभाग
-
कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर केंद्र सरकार विरोधात साखळी आंदोलन
– कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर केंद्र सरकार विरोधात साखळी आंदोलन
– केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
– लागू केलेले कृषी कायदे मागे घ्या,शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या,पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती कमी करा यासह अन्य मागण्यांसाठी केलं आंदोलन
-
पुण्यात अंथरुणावर खिळलेल्यांसाठी महापालिका विशेष लसीकरण मोहीम राबवणार
पुणे –
– अंथरुणावर खिळलेल्यांसाठी महापालिका विशेष लसीकरण मोहीम राबवणार,
– घरी जाऊन दिली जाणार कोवॅक्सिग लस,
– अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना मोठा दिलासा,
– महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती.
– सदरची व्यक्ती लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचे प्रमाणपत्र bedriddenvaccination.pune@gmail.com या ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन.
-
पिंपरीच्या कोहिनूर इमारतीत खोदकाम सुरु असताना सापडला बॉम्ब
पिंपरी चिंचवड
-पिंपरीच्या कोहिनूर इमारतीत खोदकाम सुरु असताना सापडला बॉम्ब
-बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल
-नेमका बॉम्ब केंव्हाचा जिवंत आहे की नाही याचा शोध सुरू
-
बांदा दोडामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य, रस्त्यावर भाजपचं ठिय्या आंदोलन
सिंधुदुर्ग –
बांदा दोडामार्ग रस्त्यावर भाजपचं ठिय्या आंदोलन
जिल्हाध्यक्ष राजन तेलीसह कार्यकर्त्यांचा बांदा चौकात गेल्या तासाभरा पासून ठिय्या.
बांदा दोडामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य
गेल्या आठवडय़ात याचं रस्त्यावरून शिवसेना भाजप कार्यकर्त्ये दोडामार्गत आले होते आमनेसामने
तीन वर्ष याचं रस्त्यासाठी भाजप तर्फे करण्यात येतय आंदोलन.
भाजप कडून प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी
पालकमंञी आणि स्थानिक आमदार विरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
गणेश चतुर्थीपुर्वी रस्ता करण्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूचं ठेवणार
राजन तेलींचा इशारा.
-
उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन छगन भुजबळ नाराज
नाशिक –
– उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन छगन भुजबळ नाराज
– नाशिकमध्ये असतांनाही त्यांना गोडसेंकडून निमंत्रण नाही
– आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते त्यांच्या हस्तेही फित कापता आली असती घाई का केली माहित नाही,
– मुळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत सोहळा व्हायला हवा होता असं भुजबळांचं वक्तव्य
– काल शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते उड्डाणपुलाचे करण्यात आले होते उदघाटन
-
देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
दिल्ली –
दिल्लीत भेटीगाठी
देवेद्रं फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला
अमित शाह आणि देवेन्द्र फडणवीस यांची परलीयमेंट येथे बैठक सुरू
मराठा आरक्षण विषय आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा
-
नाशिकच्या सातपूर परिसरातील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयाच्या बाहेर लसीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
– नाशिकच्या सातपूर परिसरातील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयाच्या बाहेर लसीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा – लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे 3 ते 4 वाजेपासूनच लावल्या रांगा – नाशिकमध्ये आशा अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी पहाटे पासूनच नागरिकांच्या लागल्या रांगा – गेल्या 3 दिवसा पासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होते बंद – 3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लस आल्याने लसीकरण करण्यासाठी नागरिकांची झाली मोठी गर्दी
-
अकोले येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
अहमदनगर –
अकोले येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन…
विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक…
संगमनेर अकोले रोडवरील सुगाव फाट्याजवळ केले आंदोलन…
दगडाला दुधाचा अभिषेक करत आंदोलन…
डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन….
-
तिरंगा झेंड्याच्या बरोबरीने कोणताचं इतर ध्वज ठेऊ नये हा साधा नियम पाळावा, असीम सरोदेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
पुणे –
उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मागे ठेवलेल्या तिरंगा झेंड्याच्या बरोबरीने असलेल्या भगव्या झेंडा ठेवल्याप्रकरणी असीम सरोदेंची मुख्यमंत्र्यांना विनंती
तिरंगा झेंड्याच्या बरोबरीने कोणताचं इतर ध्वज ठेऊ नये हा साधा नियम पाळावा केली विनंती,
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती….
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोस्ट पोहोचली..
असीम सरोदेंना ज्येष्ठ मंत्र्यांच फोन, यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घेतील दिली माहिती…
घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीनं राष्ट्रध्वजाचा सन्मान करायला हवा व्यक्त केली अपेक्षा …
याविषयी कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
-
भिवंडी शहरातील सायझिंग व्यवसायिकांनी पुकारला आठवडा भराचा बंद
भिवंडी शहरातील सायझिंग व्यवसायिकांनी पुकारला आठवडा भराचा बंद
सायझिंग बॉयरलमध्ये प्लास्टिक कचरा जाळण्यास विरोध
यंत्रमाग उद्योग प्रमाणे सायझिंग व्यवसायास वीज दरात सवलत मिळावी
दगडी कोळसा चे भाव कमी करावे या प्रमुख मागण्या
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील नावासाठी मशाल मोर्चा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील नावासाठी मशाल मोर्चा
थोड्याच वेळात जासई गावातून होणार सुरवात
ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात हा ‘मशाल मोर्चा काढणार
मशाल मोर्चा हा १० व २४ जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा
-
श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारचे विशेष पूजा भाविकाविनाच
सोलापूर – श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारचे विशेष पूजा भाविकाविनाच
पुजारीच्या उपस्थितीत पूजा
मंदिरात बंद होण्याचे आदेश असल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश नाही
दरवर्षी श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात असते हजारांची गर्दी
-
काल रात्री मुंबई विमानतळावर एनसीबीची मोठी कारवाई, एक कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
काल रात्री मुंबई विमानतळावर एनसीबीची मोठी कारवाई
या कारवाईत एक कोटीहून अधिक किमतीची ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.
या ड्रग्सह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली
परदेशी नागरिकाने सर्व ड्रग गिळली होती, जी त्याच्या शरीरातून काढून टाकण्याच्या प्रक्रियेत आहे.
पोटातून ड्रग बाहेर काढल्यानंतर एकूण ड्रग किती आहेत आणि त्यांची किंमत किती आहे, हे कळेल
एनसीबी मुंबई पुढील कार्रवाई करत आहे
-
नागपुरातील रेस्टॅारंट चालकांना दिलासा, रात्री 10 पर्यंत सुरु राहणार रेस्टॅारंट
– नागपुरातील रेस्टॅारंट चालकांना दिलासा, रात्री 10 पर्यंत सुरु राहणार रेस्टॅारंट
– नागपुरात आजपासून रेस्टॅारंट 10 पर्यंत सुरु राहणार
– कोचिंग क्लासेसला 50 टक्के क्षमतेनं रात्री 8 पर्यंत परवानगी
– नागपूर मनपा आयुक्तांनी रात्री जारी केली नवी नियमावली
– बार, रेस्टॅारंट, फुडकोर्ट 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत उघडी राहू शकतात
-
दोन डोस घेतलेल्या प्रवाशाना 15 ऑगस्ट पासून लोकल सेवा सुरू, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत
नालासोपारा –
दोन डोस घेतलेल्या प्रवाशाना 15 ऑगस्ट पासून लोकल सेवा सुरू करणार या मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.
सर्वसामान्य प्रवाशाना आता बस, खाजगी वाहन, चा प्रवास परवडत नाही त्यामुळे लोकल सेवा सुरू होतेय हा आनंद प्रवाशाना वाटतोय
एकीकडे शासनाने दोन डोस घेतलेल्या प्रवाशाना लोकल सुरू पण डोस सामान्य नागरिकांना मिळतात का?
तासंतास, दिवसेंदिवस रांगेत लावून सुद्धा डोस मिळत नाहीत, त्या नागरिकांनी करावे काय असा प्रश्न सुद्धा आता बस प्रवाशी विचारात आहेत
-
श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ, मात्र सर्व शिवमंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी
नाशिक – श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ
मात्र सर्व शिवमंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी
त्रंबकेश्वर देवस्थानकडून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था
मंदिरात दैनंदिन पूजेसाठी फक्त पूजार्यांनाच पूजा करण्याची परवानगी..
शहरातील मंदिरांना फुलांची सजावट, विद्युत रोषणाई
पण भाविकांसाठी मंदिर बंदच..
-
वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील दोन हजारांवर रेस्टॉरंट बंद
नाशिक – वर्षभरात जिल्ह्यातील दोन हजारांवर रेस्टॉरंट बंद..
हजारो बेरोजगार, कोट्यवधींची उलाढाल ठप्प..
‘आभार’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड..
वेळ वाढवून देण्याची मागणी मान्य न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता
हॉटेल व्यावसायिकांची प्रशासनाकडे मागणी..
-
राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 21 वरुन 45 वर
राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झाली असून ही संख्या आता राज्यात 21 वरून 45 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय, यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितलंय,, राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टा चा व्हेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिलीय.. दरम्यान यामुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय
-
घृष्णेश्वर मंदिर बंद, तरीही भाविक दर्शनासाठी मंदिरात
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिर बंद असले तरी भाविक सकाळपासून दर्शनासाठी येत आहेत. घृष्णेश्वर मंदिर हे देशातील 12 ज्योतिरर्लिंगा पैकी शेवटचे 12 वे ज्योतिरर्लिंग आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिर बंद आहेत. हे ही मंदिर बंद असले तरी भाविक मात्र दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
-
नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल
– नागपूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल
– सात दिवसांत जिल्ह्यात १० च्या आत कोरोना रुग्ण
– जिल्ह्यात शनिवारी शुण्य तर रविवारी पाच नव्या रुग्णांची भर
– रविवारी ५०७० चाचण्यात पाच जणांचे नमुने आले पॅाझीटीव्ह
– जिल्हयात १७४ सक्रिय रुग्ण, त्यापैकी १२८ कोरोना रुग्ण होम आयसोलेशन मध्ये
-
के.के.वाघ उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर खासदार हेमंत गोडसेंविरोधात सर्वपक्षीय नाराजी
नाशिक –
के.के.वाघ उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर खासदार हेमंत गोडसेंविरोधात सर्वपक्षीय नाराजी
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला सेनेच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती..
तर उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना देखील निमंत्रण नाही..
श्रेय लाटण्यासाठी घाई घाईने उद्घाटन केल्याचा गोडसेंवर आरोप..
महापालिका निवडणुकांपूर्वी सेनेत अंतर्गत गटबाजी समोर..
-
दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॅाक्टर्स, नर्सेस बेरोजगार
– दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॅाक्टर्स, नर्सेस बेरोजगार
– मेडिकलने 254 कंत्राटी डॅाक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
– ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ सरकारी धोरणाचा फटका
– कोरोना योद्धा म्हणून सन्मान केलेल्यांनाही दाखवला घरचा रस्ता
– कोरोना रुग्णसंख्या कमी होताच कंत्राटी कर्माचाऱ्यांना काढलं
-
भीमाशंकर येथे सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट
आज पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट
-
आज श्रावणातील पहिला सोमवार परंतु कोरोनामुळे यंदा देखील भाविकांना प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेता येत नाहीये
परळी –
आज पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे
आज श्रावणातील पहिला सोमवार परंतु कोरोनामुळे यंदा देखील भाविकांना प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेता येत नाहीये
पहिल्या सोमवारच्या मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं असतं, मात्र सलग दुसऱ्या वर्षी सगळेच मंदिर बंद आहेत
त्यामुळे आता परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असली तरी भाविकांना केवळ पायरीचे दर्शन घेता येत आहे
केवळ पुजारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकता आणि त्यांच्या कडून पूजा केली जातेय
Published On - Aug 09,2021 6:29 AM