एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) राज्य सरकार आक्रमक भूमिका स्वीकारण्याची शक्यात दिसत आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं म्हणत मेस्मा लावण्याचा इशारा दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) राज्यसभेच्या (Rajya Sabha) बारा खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा शहरात क्रीडा स्पर्धेची प्रेक्षक गॅलरी कोसळली
आमदार चषक कबड्डी स्पर्धेची आज झाली सुरुवात
तुडुंब भरलेल्या लाकडी प्रेक्षक गॅलरीला असह्य झाला भार
पत्त्यासारखी कोसळली गॅलरी, सुमारे 20 प्रेक्षक झाले जखमी
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये हा रुग्ण आला होता. आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. .
कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे आज नाशिक येथे आगमन झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले.
गुजरातच्या जामनगरमधील 74 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्तीनं झिम्बॉम्बे ते दुबई ते अहमदाबाद ते जामनगर असा प्रवास केला होता.
परळीच्या औष्णिक केंद्रामध्ये आता वीज निर्मिती तयार करण्यासाठी इंधन म्हणून बांबूचा वापर होणार आहे. कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती TV9 मराठीला दिलेय, त्यामुळे दगडी कोळशाला आता पर्याय म्हणून बांबूचा वापर केला जाणार आहे त्याचबरोबर बांबू उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे
आम्ही तिसरी लाट अपेक्षित धरुन सूचना दिलेल्या आहेत. ऑक्सिजन, बेड, औषधे यासंबंधी पूर्ण तयारी राहण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही याबाबत सतर्कता घेण्यास सांगितलं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
सध्यातरी लोकलवरील निर्बंधासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दुर्घटनेतील रुग्ण नायर रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर 45 मिनिटं उपचारकरण्यात आले नाहीत. नायर रुग्णालयात मुंबई करांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. नायर रुग्णालयात ड्युटी व्यवस्थित लावली जात नाही. त्याची नोंद ठेवली जात नाहीत. किशोरी पेडणेकर नायर रुग्णालयात 72 तास पोहोचल्या नाहीत. स्थानिक आमदार पोहोचले नाहीत. 72 तासानंतर तुम्ही पोहोचले नाहीत त्यामुळं भाजपचे नगरसेवक पोहोचले. त्या बाळाचा मृत्यू झाला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला.
22 हजार पाचशे कोटी रुपये कोणावर खर्च होतात हे विचारायचं नाही का असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
अनिल परब यांनी मेस्मा कायद्याअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय, पण या कायद्याचा त्यांनी भाजपच्या सरकारमध्येच विरोध केला होता असा दावा नितेश राणेंनी केलाय… अनिल परब यांची भूमिका ही दुटप्पी आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.
कात्रज घाटात कचरा आणून टाकणाऱ्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई,
टेम्पोत कचरा आणून टाकलेल्या व्यापाऱ्याला टाकलेला कचरा परत भरायला लावला टेम्पोत
प्लास्टीक कचरा फेकणाऱ्यांवर आकारण्यात येतोय दंड,
पाच महिन्यात 383 जणांकडून दोन लाख 53 हजाराचा दंड केला वसूल,
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाईला सुरुवात,
कात्रज घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेची मोहीम …
सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं मात्र सरकार पुढं येत नाही. एका उपोषणकर्त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मला वाटत सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याऐवजी त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सामनाचे संपादक आणि सामनाचे नेते आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झाल्या आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
कर्नाटकात ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्यानंतर सर्वजण सतर्क झाले आहेत. मुंबई महापालिका नेहमीचं सतर्क असते. विमानतळ प्राधिकरणाकडून आलेली यादी आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार आहे. ही यादी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाठवली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमकडून ही यादी 24 वॉर्डमधील कक्षांना ही यादी पत्त्यासह कळवली जाणार आहे. वॉर रुममधून सतत 7 दिवस संपर्क ठेवला जाईल. काही जणांना फोनच्या माध्यमातून संपर्क ठेवला जाईल. विलगीकरणाचा नियम प्रवासी पाळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवलं जाईल. प्रत्येक वार्डमध्ये 10 रुग्णवाहिका तैनात ठेवलेल्या आहेत. गरीब माणसाला अडचण आल्यास तो रुग्णालयात तातडीन पोहोचावा यासाठी पथक तैनात ठेवण्यात आलं आहे. जिथ तो प्रवासी राहणार तिथल्या सोसायटीला आम्ही मदतीसाठी सहभागी करुन घेणार आहोत. नागरिकांच्या सहकार्यानं या सर्व गोष्टी होणार आहेत.
एखादा प्रवासी तुमच्या बिल्डींगमध्ये किंवा सोसायटीत आला तर त्याची माहिती द्यावी. मुंबईकरांनी अलर्ट राहून माझ्या शेजारी कोण राहतंय, कोण आलंय याबद्दल माहिती दिली तर आपल्याला काम करणं सोप जाईल, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुळामध्ये संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंटच्या माध्यमातून नागरिकांच्या पर्यंत बातम्या जात आहेत. कोरोना काळात मुंबईकर तावून सुलाखून निघाला आहे. आजच्या घडीला मुंबईत रुग्ण नाही. एखादा रुग्ण निघाला तर आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून आपण आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
तज्ज्ञ लोकांकडून त्या लोकांना लवकर त्याची बाधा होते, असं कळतंय. ज्यांनी कोरोना लसीकरण केलं नसेल तर त्या व्यक्तींना कोरोना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम करावं लागेल. आपण पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे. प्रयत्न केल्यास आपण दुसरा डोस 100 टक्के पूर्ण करु शकतो, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. सध्या आमच्याकडं असणाऱ्या लसींच्या जोरावर प्रयत्न सुरु आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कस्तुरबा रुग्णालयातील टीमचा फोन आलेला होता. पुण्याहून रिपोर्ट आल्यानंतर त्याबद्दल माहिती मिळेल. आपल्याकडे जिनोम सिक्वेन्सिंगची मशीन आहे त्यामध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग आहे का याची मिळते, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
वरळीत लागलेल्या आगीत भाजलेल्या व्यक्तींवर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
– विद्रोही साहित्य संमेलनच्या विचार यात्रेला सुरुवात
– हुतात्मा स्मारक पासून विचार यात्रेला सुरवात
– संविधान सन्मानार्थ होतंय दोन दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनाच आयोजन
– विचार यात्रा संमेलनस्थळी पोहचताच होणार उदघाटन
हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात महामंडळ वाटप होणार
– महामंडळ वाटपाची तयारी पूर्ण झालीय
– महाविकास आघाडीत महामंडळ वाटपावर तीन्ही पक्षात एकमत
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ‘टीव्ही ९ मराठी’ला exclusive
माहिती
– ‘काँग्रेसमध्ये कुणाला मंत्री ठेवायचं की नाही याबाबत हायकमांड निर्णय घेणार’
– मी महाविकास आघाडीत मंत्रीपद मागीतलं नाही
– काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेबदल किंवा मंत्री बदल करण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार
सातारा: म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक…
म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी केला निषेध….
5 डिसेंबर रोजी पार पडणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा रथोत्सव सोहळा ओमिक्रोन व्हायरसचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने केला रद्द….
स्थानिक ग्रामस्थांना घेऊन रथोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाला ग्रामस्थांनी केलीय विनंती..
रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ट्रक अपघात
अपघातात चालक जखमी
या घाटातील अवघड वळणावर वारंवार होतात अपघात
खेडचे पोलीस आणि मदत ग्रुप ग्रुपचे सहकारी मदतीसाठी घटनास्थळी
वाहतूक काही काळ खोळंबली
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसीनुसार जलसंपदा विभागाने रात्री सिद्धेश्वर साखर साखर कारखान्याचा पाणीपुरवठा केला बंद
होटगी तलावातून कारखान्याकडे जाणाऱ्या पाण्याचा मार्ग केला बंद
प्रदूषण नियंत्रण मंडळाने 30 नोव्हेंबर रोजी कारखान्याला बजावलेल्या नोटिशीत 96 तासात कारखाना बंद करण्याचे आदेश
नोटिशीत पाणी आणि वीज तोडण्याची कारवाई पूर्ण करण्याचे ही दिले होते आदेश
ओमिक्रॅानमुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघांचा दिल्लीतील मेळावा रद्द
– १५ डिसेंबर ला दिल्लीतील कॅान्स्टीट्यूशन क्लबला होणारा मेळावा रद्द
– मेळाव्यात देशभरातील मोठे ओबीसी नेते येणार होते
– ओमायक्रॅानमुळे केंद्र सरकाने नविन बंधन लादल्याने मेळावा रद्द
– ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकीत रंगत वाढली
एकाच उमेदवाराने चक्क एकावन्न उमेदवारी अर्ज घेतले विकत
गेल्या तीन दिवसांत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी सात उमेदवारी अर्ज केले
विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येकी चार अर्ज केले दाखल
फुलंब्री तालुक्यात शेतकऱ्यांचा रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न
फुलंब्री तालुका महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न
वीज कट केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर टळला मोठा अनर्थ
महावितरण वीज सुरू करत नसल्यामुळे शेतकरी झाले संतप्त
सोलापूर– महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
तपासणीसाठी पोलीस ,आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाचं संयुक्त पथक
महाराष्ट्रातून कर्नाटकात यायचे असेल तर दोन डोस बंधनकारक,डोस घेतले नसेल तर 72 तासातला rt-pcr निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या टाकळी गावनजदिक सोलापूर जिल्हा प्रशासनाची नाकाबंदी
ओमीक्रोन विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन लिपिकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कनिष्ठ लिपिक तानाजी गोविंदराव दबडे ( वय 50) व प्रथम लिपिक विलास दगड़ू तिकोणे (वय 50) विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात
सुशिक्षित बेरोजगार अभियांत्रिकीसाठीचा शासकीय परवाना मिळावा यासाठी 15 हजारांची लाच घेताना सापळा रचुन दोघांना घेतलं ताब्यात
– परवाना नूतनिकरणासाठी 18 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दुकान निरीक्षकावर गुन्हा दाखल
– संशयित दुकान निरीक्षक अभिमन देवरे यांनी मागितली होती लाच
– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळा
– नागपूर जिल्हा प्रशासनाचे जनतेला आवाहन
– 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्याचं आवाहन
– महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांनी दिक्षाभूमीवर न येता घरी राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन
सोलापूर — सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
पूर्णक्षमतेने अद्यापही बस सेवा सुरू नाही
रोज चार ते पाच गाड्या फक्त मार्गावर
मात्र या बसेसचे ही निर्धारित वेळ नसल्यामुळे प्रवाशांनी त्याच्याकडेही पाठ फिरवली
विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम
– नागपुरात ओमायक्रॅानचा सामना करण्यासाठी मनपाकडून तयारी
– मनपा प्रशासनाकडून 450 खाटा, 1100 ॲाक्सिज सिलिंडर आणि औषध साठा उपलब्ध
– उद्या शारजावरुन येणाऱ्या प्रवाशांना विलीगीकरणात रहावे लागणार
– नागपुरात विदेशातून आलेल्या 101 प्रवाशांच्या झाल्या चाचण्या
– विदेशातून आलेल्या प्रवाशांचं विलीगीकरण
एसटी कर्मचारी अद्याप माघार घ्यायला तयार नसताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे..
“एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे ४१ टक्के वाढ सरकारने दिली.
यामुळे १० वर्षे ते ३० वर्षे सेवा करणार्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ते ५६ हजार रुपये वेतन मिळणार आहे.
तसेच न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा” असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई होईल असा इशारा अनिल परब यांनी दिलाय…
गेल्या महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्या्ंच्या संपावर चर्चा सुरू असून आता राज्य सरकारकडून पगारवाढ आणि वेतनहमीबाबत निर्णय घेण्यात आला आहे…
पवईच्या राजे शिवाजी नगर मध्ये जमिनीच्या वाद असल्याने दोन गटांमध्ये हाणामारी झाली या घटनेत पवई पोलिसांनी दोनी गटावर हाणामारीच्या गुन्हा नोंद करुन पुढील तपास करीत आहेत..हाणामारीच्या व्हिडीओ सोशल मीडियावरही सुद्धा व्हायरल झाली आहे..
पंढरपूर शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसानं सखल भागात पाणी साठलं आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.