LIVE | डोंबिवली शक्ती प्रोसेस कंपनीची आग नियंत्रणात
LIVE NEWS & UPDATES
-
अकलूजच्या धवलसिंह मोहिते पाटलांकडून नरभक्षक बिबट्या ठार
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अकलूजच्या धवलसिन्ह मोहिते पाटील यांनी ठार मारले.
-
काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची गरज सध्या नाही : सुशीलकुमार शिंदे
काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची गरज सध्या नाही, शेतकरी आंदोलन चिघळलं आहे, अशावेळी नेतृत्व बदल चर्चा करणं योग्य नाही, पुढे कधीतरी चर्चा करता येईल, सोनिया गांधी यांनी उद्या बोलवलेल्या बैठकीवर व्यक्त केलं मत
केंद्र सरकारची हुकूमशाही पद्धतीने वाटचाल सुरू होणार असं मी म्हटलं होतं, ती त्यांनी सुरू केल्याचं दिसत आहे, शिंदेंची मोदी सरकारवर टीका, शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं होतं, ते तसं झालं नाही
-
-
मराठवाडा विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, औरंगाबादमध्ये वैद्यकीय प्रवेशात 70:30 कोटा रद्द
औरंगाबादमध्ये वैद्यकीय प्रवेशात 70:30 कोटा रद्द, न्यायालयाचा निर्णयावर शिक्कामोर्तब, 70:30 चा कोटा ‘जैसे थे’ ठेवण्यासाठीच्या याचिका न्यायालयाने रद्द केल्या, मराठवाडा विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
-
अनिल गोटे यांच्या पोस्टरला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारले
अनिल गोटे यांच्या पोस्टरला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारले, दोंडाईचा येथे आज अनिल गोटे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते यांनी निषेध करीत पोस्टरला मारले जोडे
-
हर्षवर्धन जाधवांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत कोणताही निर्णय नाही, उद्या पुन्हा सुनावणी
हर्षवर्धन जाधवांच्या सुनावणीवरती कोणताही निर्णय नाही, जामिनासाठी जाधवांच्या वकिलांनी केला होता अर्ज, सरकारी पक्षाला बाजू मांडण्यासाठी दिली एक दिवसाची मुदत, उद्या जामीन अर्जावर होणार सुनावणी, हर्षवर्धन जाधवांना एक दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या परत जामीन अर्जावर होणार सुनावणी
-
-
रत्नागिरी-दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनारी 6 पर्यटक बुडाले, तीन जण बेपत्ता
रत्नागिरी-दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनारी 6 पर्यटक बुडाले, तीन जण बेपत्ता, तर 3 जणांना वाचविण्यात यश, सर्व राहणार पुणे, स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या काढण्यात यश, दापोली पोलीस घटनास्थळ
-
उस्मानाबादेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यावर संस्था चालक संघटनाचा हल्लाबोल
उस्मानाबादेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यावर संस्था चालक संघटनाचा हल्लाबोल, शिपाई पद रद्द करीत असताना आमदार विक्रम काळे गप्प का होते, काळे आता स्वतःच्या सरकार विरोधात निषेध आणि आंदोलन करायला सांगत आहेत, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, उस्मानाबाद संस्था चालक संघटना अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले आरोप
-
औरंगाबादेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समीर भुजबळांच्या नेतृत्त्वात मोर्चा
औरंगाबादेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समीर भुजबळांच्या नेतृत्त्वात मोर्चा, मराठा आरक्षणाला आमचा विरोध , नाही, पण ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी, त्यामुळे सरकारने याबाबत न्यायालयात आपली भक्कम बाजू मांडावी ही आमची मागणी आहे, त्याशिवाय अनेक मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, अशी माहिती समीर भुजबळ यांनी दिली
-
बाळासाहेबांच्या सामनाचा आन्याय करणाऱ्यांसाठी वापर : गोपीचंद पडळकर
संजय राऊतांनी आतापर्यंत धनगर आरक्षणावर किती लेख लिहिले, भटक्या विमुक्तांसाठी किती लेख लिहिले, एमपीएससी परिक्षा, यावर तुम्ही बोलत नाही, रोज विकृत लिखाण करतात, बाळासाहेबांनी अन्याय होणाऱ्यांवर लिहिण्यासाठी सामना सुरु केला होता, सध्या बाळासाहेबांच्या सामनाचा आन्याय करणाऱ्यांसाठी वापर केला जात आहे, पडळकर भडकले
-
आंदोलन करताना मला संजय राऊतांना विचारायची गरज नाही : पडळकर
झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी, माझ्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष वळण्यासाठी मी तिथे पारंपारिक पेहराव घालून ढोल वाजवला, मागण्यांचे सोळा फलक लावले, असं विधानभवनासमोर आंदोलन केलं, ढोल वाजवल्याने आंदोलन दडपण्याची गरज काय होती, आंदोलन करताना मला संजय राऊतांना विचारायची गरज नाही
-
ग्रामीण भागात सामना पेपर येत नाही, त्यामुळे आम्ही तो वाचत नाही : गोपीचंद पडळकर
ग्रामीण भागात सामना पेपर येत नाही, त्यामुळे आम्ही तो वाचत नाही, तुम्ही दोन दिवसांचं अधिवेशन घेता, पहिल्या दिवशी काम होत नाही, दुसऱ्या दिवशी मुद्यांवर बोलता येत नाही, सरकारवर मोर्चा काढण्यासाठी लाखो लोक आम्ही आणू शकतो, पण एखाद्याला कोरोना झाला ,तर आमच्या लोकांची परिस्थिती नाही दवाकाण्याचा खर्च करण्याची
-
मला जेलमध्ये टाकलं तरी मी घाबरणार नाही : गोपीचंद पडळकर
मला जेलमध्ये टाकलं तरी मी घाबरणार नाही, गोपीचंद पडळकरांचा शिवसेना आणि खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल
-
निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या, काही केलं तरी ते निवडून येणार : शरद पवार
माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला साथ दिली, मला सांगायचे की या ठिकाणहून विरोधी पक्षातील हा उमेदवार आहे काय करायचं, निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या, काही केलं तरी तुम्हीच निवडून येणार
-
नानांचे राहिलेले अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची काळजी आपण घ्यायची : शरद पवार
काही गोष्टि तुमच्या आमच्या हातात नसतात, पंढरपूरच्या विकासासाठी भारतनानांनी मोठी धडपड केली, भारतनाना जरी आपल्यात राहिले नाहीत तरी त्याचे कर्तुत्व आणि त्यांची माणुसकीचि भावना विसरता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले
-
भारत भालकेंचा आपल्याला कधीही विसर पडणार नाही : शरद पवार
LIVETV #पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 @PawarSpeaks pic.twitter.com/Gn9gnBpyPU
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2020
-
माझं लक्ष ‘सत्यमेव जयते’ यावर असतं : संजय राऊत
न्यायालयाचा अपमान का करणार, पण सत्य बोलणं, माझं लक्ष न्यायमूर्तींच्या मागे लिहिलेल्या ‘सत्यमेव जयते’ यावर असतं
-
महाराष्ट्र सरकारला सल्लागाराची गरज नाही, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर
महाराष्ट्र सरकारला सल्लागाराची गरज नाही, कारशेडबाबत विरोधकांनी चिंता करु नये, आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत बीकेसीत कारसोड हलवण्याबाबत त्यावर चाचपणी सुरु आहे,
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंढरपुरात दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंढरपुरात दाखल
शरद पवार हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्ता मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार दीपक आबा साळुंखे, उत्तम जानकर, राजन पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित आहेत. आमदार भारत नाना भालके यांच्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी पवार हे सरकोली इथं दाखल झाले आहेत.
-
वर्धा : मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स कंपनी दरोडा प्रकरण, चार संशयित ताब्यात
मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स कंपनी दरोडा प्रकरण, 12 ते 15 तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. चार जण पोलिसांच्या ताब्यात, ब्रँच मॅनेजर आणि इतर तीन जणांना अटक, 1 पिस्टल, दोन चारचाकी वाहन, काही सोन जप्त केल्याची पोलीस सूत्रांची माहिती, तीन लाखांवर रोकड, अडीच किलो सोन लंपास केल्याची झाली होती तक्रार
-
सोलापुरात भंगारातील गाड्यांच्या लिलावातून एसटी महामंडळाला साडेतीन कोटींचं उत्पन्न
सोलापुरात भंगार 117 एसटी गाड्यांच्या लिलावातून एसटी महामंडळाला साडेतीन कोटी रुपये, 136 भंगार गाड्यांपैकी 117 भंगार गाड्या लिलावास पात्र, सोलापूर विभागाला मिळाले साडेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न
-
पंतप्रधान आज मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील, शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान वेगवेगळ्या राज्यांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न, आज मध्यप्रदेश येथील 23,000 पंचायतीच्या लोकांशी मोदी संवाद साधतील, दुपारी दोन वाजता साधला जाईल संवाद
-
शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव चाळीसगावला पोहचले
शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव चाळीसगावला पोहचले, मूळ गावी चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथे अंत्यसंस्कार, अमित पाटीच्या पार्थिवाला वंदन करण्यासासाठी वाकडी गावात मोठी गर्दी, पोलिसांचा लवाजमा वाकडी गावात दाखल, 9 -30वाजता शासकीय इतमामात होतील अंत्यसंस्कार,
-
शहीद जवान अमित पाटील यांच्यावर सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान अमित पाटील यांच्यावर सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, चाळीसगावमधील वाकडी या त्यांच्या मूळगावी होणार अंत्यसंस्कार, अमित पाटील कर्तव्यावर असताना जम्मू-काश्मीर मध्ये सुरु असलेल्या हिमवृष्टीत दाबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांना वीरमरण आलं, मात्र त्यांच्या जाण्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा
-
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरची उभ्या टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक
विरार- मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची उभा असणाऱ्या टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक, विरार हद्दीत सकवार परिसरात मुंबई लेनवर पहाटे 3 च्या सुमारास घडली घटना, या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, मात्र कंटेनर, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर पलटी झाले असून, टेम्पोतील बिसलरीच्या पाण्याच्या बॉटल रस्त्यावर पडल्या आहेत. टायर फुटल्याने बिसलरी भरुन असणारा टेम्पो मुंबई लेनवर उभा होता, पाठीमागून आलेल्या कंटेनर ने भरागाव वेगात येऊन, टेम्पो आणि समोरील रिक्षाला उडवले, याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू आहे
-
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक परीक्षा शुल्क वाढीला स्थगिती
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक परीक्षा शुल्क वाढीला स्थगिती, 2020 – 2021 या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा शुल्क वाढ नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, विद्यापीठ अधिकार मंडळानेही दिली निर्णयाला मान्यता, निर्णयाचा जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा, परीक्षा शुल्क वाढ नसल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा
-
संभाजी ब्रिगेड संघटना ग्रामपंचायत निवडणूकीच्या मैदानात, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये लढणार
संभाजी ब्रिगेड संघटना ग्रामपंचायत निवडणूकीच्या मैदानात, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये संभाजी ब्रिगेड लढणार, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांची माहिती, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारानं घेतलं होतं चांगल मतदान, संभाजी ब्रिगेडचं कार्यकर्त्यांच राज्यात मोठं जाळं, संभाजी ब्रिगेडचा फायदा कोणाला होणार?, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीत देणार उमेदवार
-
माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार
माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार, हर्षवर्धन जाधव यांना 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करणार, ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरुपन हर्षवर्धन जाधवांना अटक करण्यात आले होते, याबाबत अमन चढ्ढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जाधव आणि ईशा झा यांच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मात्र राजकीय दबावातून अटक केल्याचा हर्षवर्धन जाधवांच्या वकिलांचा आरोप
-
फडणवीस दोन दिवस नागपूर दौऱ्यावर, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भेटीगाठींचं सत्र
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस नागपुरच्या दौऱ्यावर, फडणवीस आज आणि उद्या नागपुरात, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भेटीगाठींचं सत्र, नागपूरसह विदर्भातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार, फडणवीस प्रमुख भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार, विदर्भात संघटन मजबूतीसाठी भाजपचे प्रयत्न
-
औरंगाबादेत ओबीसीचा भव्य मोर्चा, खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत मोर्चा
औरंगाबादेत आज ओबीसीचा भव्य मोर्चा, खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत निघणार ओबीसी मोर्चा, महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून होणार मोर्चाला सुरुवात, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा, ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चाचे आयोजन
-
मुद्रांक शुल्क कमी केल्याने नागपुरात रजिस्ट्री वाढल्या, आठ महिन्यात 38,198 रजिस्ट्री
मुद्रांक शुल्क कमी केल्याने नागपुरात वाढल्या रजिस्ट्री, 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कावर तीन टक्क्यांची सवलत, नागपूर ग्रामीण आणि शहरी भागात वाढल्या रजिस्ट्री, नागपूर जिल्ह्यात आठ महिन्यात 38198 रजिस्ट्री, शासनाला मिळाला 307 कोटी 10 लाखांचा महसूल, मुद्रांक शुल्क सवलतीमुळे डिसेंबरमध्ये वाढल्या रजिस्ट्री
-
पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन कोसळली, 9 महिला गंभीर जखमी
औरंगाबाद जिल्ह्यातील ईसारवाडी फाट्यावर भीषण अपघात, पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन कोसळून झाला अपघात, अपघातात 9 महिला झाल्या गंभीर जखमी, जखमी महिलांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल, 9 महिलांना घेऊन पिकअप व्हॅन निघाली होती औरंगाबादकडे, वेगवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप कोसळली पुलाखाली, 9 गंभीर महिलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू
-
नागपुरातील नारायणा विद्यालयाला शिक्षण विभागाचा दणका, अतिरिक्त शुल्क वसुलीप्रकरणी कारवाई
नागपुरातील नारायणा विद्यालयाला शिक्षण विभागाचा दणका, पालकांकडून अतिरिक्त शुल्क वसुलीप्रकरणी कारवाई, 7.59 कोटी रुपये पालकांना परत देण्याचे शिक्षण विभागाचे आदेश, महिनाभरात पालकांना रक्कम देण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश, तीन वर्षांपासून शाळेकडून सुरु होती अतिरिक्त शुल्क वसूली
-
प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, गंगापूर साखर कारखाना अपहार प्रकरणी 6 जणांचा जामीन फेटाळला
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ, गंगापूर साखर कारखाना अपहार प्रकरणी 6 जणांचा जामीन फेटाळला, 16 आरोपींपैकी 7 जणांनी दाखल केला होता जामीन अर्ज, जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला जामीन अर्ज, गंगापूर कारखाना प्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर आहे गुन्हा दाखल, जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अपहार प्राकारणातील आरोपींना अटक होण्याची शक्यता
-
कुणाल कामराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
कुणाल कामराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, कुणाल कारमा आणि रचिता तनेजाविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार
-
राज्यातील शाळा आज राहणार बंद, शिक्षकेतर संघटनांकडून आंदोलनाची हाक
आज राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहे. शिक्षकेतर संघटनांकडून ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असताना शिपाई पदे रद्द करण्याचा निर्णय सरकराने घेतला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हा नवीन आकृतिबंध शासनाने मागे घ्यावा या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिला आहे. यामुळे आज राज्यभर अनेक शाळा बंद असणार आहेत.
-
लातुरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पतीची गळफास घेत आत्महत्या, औसा तालुक्यातल्या आशिव येथील घटना, अनुराधा पारधे-(वय-40), महादेव पारधे-(वय-45) असं मृत पती-पत्नीची नावे, आरोपी महादेव पारधेने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची गळा चिरुन हत्या केली, नंतर स्वतः गळफास घेतला, 3 मुली 2 मुले अनाथ झाली, भादा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद
-
मुंबई-नाशिक महामार्गावर 3 गाड्यांचा विचित्र अपघात, 10 जण जखमी
मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर जवळ महामंडळची ST, इन्व्ह आणि ट्रक या 3 गाड्यांचा भीषण अपघात, बस मधील 10 प्रवाशी जखमी, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
Published On - Dec 18,2020 6:10 PM