Maharashtra News Live Update : जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? हिंमत असेल तर उत्तर द्या; किरीट सोमय्यांचं अजित पवारांना आव्हान
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आली त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री उशिरा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सारवासारव केली आहे. केंद्रीय ग ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
LIVE NEWS & UPDATES
-
जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? हिंमत असेल तर उत्तर द्या; किरीट सोमय्यांचं अजित पवारांना आव्हान
कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सोमय्या म्हणाले.. अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर उत्तर द्या जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? गुरु कामोनेटीचा गुरू कोण? हे अजित पवारांनी सांगावं आंबालिका साखर कारखान्याच्या हिशेब सुरू झाला आहे, फक्त दिवस मोजा किती दिवस तो त्यांच्या कडे राहील पवार परिवार एवढा पैसा आहे अजित पवारांनी आईच्या नावावर देखील बेनामी पैसा जमा केला आहे, आम्ही रोहित पवारांचा देखील हिशेब देणार, तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही अनिल परब याना चॅलेंज देतो तुमचं रिसॉट पाडावं लागेल हसन मुश्रीफ यांना देखील जेलचा दरवाजा पाहावा लागेल संजय राऊत हे शहाणे ठरले, मात्र संजय राऊत यांना सांगतो चोरीचा माल परत केल्याने चोरी माफ होत नाही
-
औरंगाबादकरांनी पुन्हा लसीकरणाकडे फिरवली पाठ
लसीकरण मोहिम सुरु केल्यानंतर औरंगाबादेत दिवसाला 15 ते 18 हजार लोकांचे लसीकरण व्हायचे, मात्र आता दिवसाला फक्त 4 ते 5 हजार लोकांचे लसीकरण होतं आहे. प्रशासनाने कठोर नियमावली लावली असताना ही नागरिक ऐकायला नाहीत तयार. 500 रुपये दंड भरू पण लस घेणार नाही अशी काही नागरिकांची भूमिका आहे. नागरिकांच्या अशा वागणुकीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
-
-
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी नारायण राणेची जाहीर सभा
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेची जाहीर सभा होणार आहे. या सभेला माजी खासदार निलेश राणे सुद्धा उपस्थित राहणार. शनिवारी कुडाळात झालेल्या शिवसेनेच्या सभेत नारायण राणेवंर जोरदार टीका झाली होती. राणे आज शिवसेनेला काय प्रत्युत्तर देतात आणि कोणावर प्रहार करतात याकडे त्यांच्या पाठिराख्यांचे लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात सभेला सुरूवात होणार
-
बंगळुरूत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : शिवसेनेचं शिष्टमंडळ अमित शाहांना भेटणार
केंद्रीय मंत्री अमित शहांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार तीन जणांचं शिष्टमंडळ भेटणार माजी आमदार जगदीश मुळीकांच्या घरी साडे सात वाजता भेट घेणार कर्नाटकातील बंगळुरूत झालेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार शिवसैनिक विरोध दौऱ्याला करणार होते, मात्र पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीमुळे होणार भेट!
-
पुण्यात आज दिवसभरात 84 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
– दिवसभरात 84 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 64 डिस्चार्ज. – एक मृत्यू – 83 रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508290. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 874. – एकूण मृत्यू -9109. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९८३०७. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 6311.
-
-
बाबासाहेबांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही : शाह
महापालिकेतील स्मारकांच्या लोकार्पणप्रसंगी अमित शाह म्हणाले की, ही स्मारकं येणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा देत राहतील शिवाजी महाराजांच्या प्रयनाते हिंदवी स्वराज्य स्थापन झाले अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी चांगलं प्रशासन कस असते ते दाखवून दिले बाबासाहेबांचे संविधान बनवण्यात महत्वाचे योगदान राहिले आहे. संविधानला संकल्पबद्ध करण्याचे काम बाबसाहेबांनी केलं सर्वाना समान अधिकार देण्याचं काम संविधानाने केलं याच बाबासाहेबांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही, असे म्हणत शाह यांनी काँग्रेसवर टीकादेखील केली.
-
अमित शहा
पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली.
विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला.
पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी दिले.
बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिले.
मुळा मुठा निधी संवर्धनासाठी 110 कोटीचे काम सुरू आहे.
सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत.
पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे.
आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही.
-
अमित शहा
स्वातंत्र्यानंतर संविधान बनिवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान राहिलं आहे.
सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं.
दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं.
संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले.
पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही.
जगभरात आपलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे.
सर्वांना समान अधिकार देणारं संविधान आहे.
बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं.
गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला.
जनतेच्या समोर बाबासाहेबांचं कर्तृत्व येऊ नये म्हणून संविधान दिवस साजरा केला नाही.
संविधान दिवस मोदींनी साजरा करण्यास सुरुवात केली.
जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला.
मोदी भारताच्या संविधानालाही आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत.
-
अमित शाहांच्या हस्ते बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
अमित शाहांच्या हस्ते पुणे महापालिकेतील बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण
-
अमित शहा
पुण्याचे महापौर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो
त्यांनी बाबासाहेब आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज पालिकेत लोकार्पण केलं
येणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा मिळणार
शिवाजी महाराजांच्या प्रयनाते हिंदवी स्वराज्य स्थापन झाले
अष्ट प्रधान मंडळाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी चांगलं प्रशासन कस असते ते दाखवून दिले
स्वराज्य जे आंदोलन शिवाजी महाराज होते तेव्हा पण होते आणि त्यांनतरही
बाबासाहेबांचे संविधान बनवण्यात महत्वाचे योगदान राहिले आहे
संविधानला संकल्पबद्ध करण्याचे काम बाबसाहेबांनी केलं
सर्वाना समान अधिकार देण्याचं काम संविधान केलं
याच बाबासाहेबाना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही
अमित शहांची काँग्रेसवर टीका
मोदी सत्तेत आल्यानंतर संविधान साजरा केला जातो, मात्र काँग्रेस कायम या संविधान दिनावर बहिष्कार टाकत असते
मोदीजी संविधानला आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत
पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने मदत केली
मी आशा करतो पुण्याला लवकरच मेट्रो मिळो
मुळा मुठा नदीच्या सुधारणेसाठी 110 कोटींचे काम सुरू आहे
-
रामदास आठवले
कवितेच्या माध्यमातून आठवलेंची भाषणाला सुरुवात
दलितांचे आरक्षण काढून घेतले जाईल अशा अफवा पसरवल्या जातायत
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र मजबूत करणार आहेत
राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत करण्याचे काम अमित शहा करणार आहेत
-
पुणे
महापौरांच्या हस्ते अमित शहाचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन सम्मान
नीलम गोऱ्हे यांनी अमित शहा यांना प्रबोधनकारांचे पुस्तक देऊन केला सम्मान
-
रोहित पवार 121
कर्जत नगरपंचायत प्रचाराचा आज शेवटचा दिवस
शेवटच्या दिवशी रोहित पवारांचा जोरदार प्रचार
राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निवडून येतील तर 17-0 असा निकाल आपल्याला बघायला मिळेल
भाजपच्या लोकांनी जे काम किरीट सोमय्या यांना दिला आहे ते योग्य पद्धतीने करत आह
ईडीला ज्या बातम्या कळत नाही ते सोमय्या यांना आधी कळतात
ते जसे भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ईडीचे देखील प्रवक्ते आहे
पिक्चर कितीही चांगला असला तरी आइटम सॉन्ग घ्यावाच लागते
सोमय्या राजकारण करत आहे ते सर्वांचं कळत
आज देखील ते आमच्या नेत्यांबद्दल बोलतील मात्र इथले लोक सुज्ञ आहेत ती फक्त एण्टरटेन करतील लोकं टाळ वाजून जातील
लोकं लोकशाही मार्गाने उत्तर देतील
भाजपचे लोक आमच्याकडे येत असते तर हे प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ते राष्ट्रवादी का येत आहे
चंद्रकांत पाटलांनी ट्विट करून विचारलं एक एक सीटवर रोहित पवारांचा लक्ष देताय
तर त्यांचं म्हणणं आहे पैशाच्या जोरावर ते राष्ट्रवादीत घेत आहे मग तुम्ही ईडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे नेते भाजप घेताय काय
चंद्रकांत यांनी ट्विट केलं याचं मला आश्चर्य वाटलं
-
पुणे महापौर मुरलीधर मोहोळ
पुणेकरांकडून मी अमित शहांचे स्वागत करतो
शिवाजी महाराजांच्या या भूमीत शहांचे स्वागत करतो
52 वर्षानंतर गृहमंत्री पालिकेत आलेत
याआधी यशवंतराव चव्हाण महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे लोकापर्णसाठी आले होते
महापालिकेच्या माध्यमातून विकासाचा गाढा पुढे जात आहे
मेट्रो,स्मार्ट सिटीचे अनेक काम सध्या सुरू आहेत
महिन्या दीड महिन्यात 2200 किलोचा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे
-
पुणे
अमित शहांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन
रामदास आठवले, प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, नीलम गोऱ्हे स्टेजवर उपस्थित
-
रत्नागिरी
चिपळूणमधील नागरिक आक्रमक
सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी चिपळूणकरांचे आजपासून भीकमांगो आंदोलन सुरू
वाशिष्ठी नदीतील गाळ उपसण्याची मागणी घेऊन गेली 15 दिवसांपासून चिपळूण करांचे सुरुय साखळी उपोषण
चिपळूणकरांच्या मागणीकडे पुढारी आणि सरकारचं दुर्लक्ष होत असल्यामुळे चिपळूणमधील नागरिक वैतागले
सरकारने लक्ष न घातल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा चिपळूण करांचा इशारा
-
पुणे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची शिवसेना नेते गुलाबराव पाटलांवर टिका,
गुलाबराव पाटलांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जा,
रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना घरचा आहेर,
माझ्या भागातले रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत केली होती टिका
-
पुणे
उद्या हायकोर्टात एसटीसंदर्भात सुनावणी,
सुनावणीची सगळी प्रक्रीया पुर्ण, राज्य सरकारने उद्याच्या सुनावतीला सामोरं जावं
वकिल गुणरत्न सदावर्तेंची मागणी,
गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली बारामती आगारात एसटी कामगारांची भेट,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांवर केली टिका,
शरद पवार स्वयंघोषित शेतकरी कष्टकऱ्यांचे नेते म्हणवतात मात्र प्रत्यक्षात ते नाहीत,
आतापर्यंत 60 जणांनी आत्महत्या केल्या मात्र पवार कुटुंबातील एकही व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही,
महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारला करावंच लागेल गुणरत्न सदावर्तेंची टिका
-
नागपूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कर्नाटकात विडंबना करण्यात आली विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आंदोलन
महाल परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ केलं आंदोलन
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करत केलं आंदोलन
कर्नाटक सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
नारायण राणे
मोदी साहेब म्हणाले आत्मनिर्भर करणार
ते त्यांनी केलं, कोणाकडे पैशासाठी हात पसरले नाहीत
माणसं निपजतात ती सांभाळता आली पाहिजेत
कार्य कार्य आहे ते कधी संपत नाही
-
अकोला
अकोल्यात शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करून केंद्र सरकारचा निषेध
-
पुणे
अब की बार सौ पार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नारा
विरोधकांनी वर्षानुवर्षे बाबासोबांच्या नावाने मत मागितली,
छत्रपतींच्या नावाने मत मागितली मग पालिकेत त्यांचा पुतळा का उभारु शकले नाही
आम्ही चांगले काम करतो हे विरोधकांची पोटदुखी आहे त्यांना ते पाहावत नाही
आम्हाला राजकारण करायचे नाही
आम्ही सर्वांना प्रोटोकॉलप्रमाणे आमंत्रण दिले होते
-
पुणे
– अमित शहांच्या पालिकेतील कार्यक्रमावर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा बहिष्कार,
– विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आयत्या वेळी पासेस देण्यात आल्याचा काँग्रेस /राष्ट्रवादी नगरसेवकांचा आरोप,
– शिवाय त्यांना आयत्यावेळी आरटीपीसीआर करण्याचे आदेश,
– भाजपने पालिकेतील कार्यक्रम पक्षीय केल्याचा आरोप,
– राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि काँग्रेस गटनेते आबा बागुल यांचा आरोप
-
नारायण राणे
देश आत्मनिर्भर होण्यासाठी तुम्ही काम करा मोदी साहेब बोलले
मी म्हणालो यस सर
भारतीय जनतेसाठी मोदी साहेब अठरा अठरा तास काम करतात
सारांश कोणता नेता येवढे काम करतो
महाराष्ट्रात तीन चाकी रिक्षाचं सरकार
वेंगुर्ला मला आवडता तालुका निसर्ग रम्य आहे
सर्वच जण इथे घर बांधण्यासाठी प्रयत्न करतात अधिकारी सुद्धा
माझ्या खात्याकडे 80 टक्के उद्योग आहेत
अकरा कोटी कामगार आहेत
सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी आता सगळे व्यवसाय आणणार
-
नारायण राणे
आम्ही काम आणि कार्याने बोलतो
मी मुंबईतून सिंधुदुर्गात आल्यानंतर पाहिलं भयावह परिस्थिती होती
शिक्षणाच्या बाबतीत ही वाईट अवस्था होती
मी निवडून आल्यानंतर ठरवलं जिल्ह्याचा विकास करणार
आता बघा रस्त्याची दुर्दशा आहे
विमानतळ, चौपदरीकरण रस्ता मी प्रयत्न केला
तुमचा काय संबंध, कधी होता तुम्ही?
आम्ही भूमिपूजन केलं यानी विरोध केला आणि आता विमानतळ पूर्ण झालं तर म्हणतायत आम्हीच केला
शिवसेना आणि विनायक राऊत यांना टोला
-
नारायण राणे
वेंगुर्ल्याच्या लोकाचं अभिनंदन केलं पाहिजे
माझा देश भर दौरा सुरू आहे
मात्र अशी इमारत नाही पाहिली
याचं कौतुक व्हायला पाहिजे
चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे
-
सिंधुदुर्ग
केंद्रीय मंत्री नारायण राणे
सभागृहाची इमारत पाहून वाटलं वेंगुर्ल्यात आहे की अन्य कुठे
नगराध्यक्षांनी वेंगुर्ल्याच्या विकासात भर घातली
त्यांच अभिनंदन करतो
आमचे मित्र दिपक केसरकर ऑन लाईन दिसले आता
पण ते असल्या चांगल्या कार्यक्रमात येत नाहीत
आम्ही विकासाच्या कामात राजकारण पाहत नाही
-
मंत्री रविंद्र चव्हाण
जनतेतून नगराध्यक्ष निवडणूकीचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मात्र महाविकास आघाडी सरकारने पुन्हा तो निर्णय बदलून नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार ने घेतले ते या सरकारने बदलले.
-
नाशिक
– नाशिकच्या शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने स्वतःला पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न – बिशप शरद गायकवाड यांच्या समोर फादर अनंत आपटे यांनी आत्महत्यचा केला प्रयत्न – वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्यचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती – जिल्हा रुग्णलयात फादरवर उपचार सुरू
-
साद लाड 121
– छत्रपतींचा अपमान भाजप कधीच सहन करत नाही करणार नाही, राज्यातील भाजपचे नेतेही याविरोधात बोलत आहे…
– भाजप गप्प हे आरोप खोटे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मुंख्यमंत्री बोम्मई यांनी दिलगिरी व्यक्त केलीये… देवेंद्र फडणवीस यांनीही हे स्पष्ट केलंय…
– एक व्यक्ती बोलतोय म्हणून इथे त्रास कन्नडीगांना देणं हे योग्य नाही, जे घडेल राज्य पाहील
– केंद्रीय गृहमंत्र्यांना अजित पवारांनी केट दिला तेयाबद्दल आम्हाला आनंद आहे, पण तो त्यांचा अधिकारही आहे…
– संजय राठोड किंवा इतर नेते जे आदर करत नाही, याहून शिवसेनेचा नेत्यांची विकृती दिसते, गुलाबजार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा…
-
नागपूर
कळमेश्वर मार्गावर गोरेवाडा वनक्षेत्रात रात्र पाळीतील चौकीदार रवींद्र काळबांडे चौकीत मृतावस्थेत आढळले.
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
गोरेवाडा वनक्षेत्रातील गेट नंबर 4 वरील चौकीमध्ये 40 वर्षीय रवींद्र काळबांडे काल रात्री कर्तव्यावर होते.
थंडीमुळे त्यांनी चौकीच्या आतमध्ये शेकोटी पेटवली होती.
त्या शेकोटी जवळच ते आज सकाळी मृतावस्थेत आढळले आहेत.
चौकीच्या आतील साहित्यही जळालेले आहे.त्यामुळे शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून किंवा भाजून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
उदय सामंत
नगराध्यक्ष नेमके कोणत्या पक्षाचे हेच कळत नाही
ते म्हणतात विकास हाच माझा पक्ष
म्हणून मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो
वेंगुर्ल्याची प्रगती ही अभिमानाची गोष्ट
राणे साहेब आणि मी जास्त वेळ एकत्र बसून नये असं नगराध्यक्षांना वाटलं म्हणून मला पहिलं भाषण करायला सांगितलं
म्हणजे मी पाच मिनिटांत भाषण करुन जावं
हसत हसत वक्तव्य
प्लास्टिकचा वापर डांबर बनवण्यासाठी करून वेंगुर्ल्यात पहिला रस्ता बनवण्याचं काम वेंगुर्ला नगरपरिषदेने केलं
या कार्यक्रमास मी आलो नसतो तर गैरसमज निर्माण केले गेले असते
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहिलो
मी नगराध्यक्षांना शब्द देतो विकासासाठी निधी दिला जाईल डीपीडीसीमधून
-
देवेंद्र फडणवीस
आमच्या सरकार हरवल आहे…शोधून देणाऱ्या आम्ही पुरस्कार देऊ..
सामान्य माणसाच्यी हि सरकार नाही..
मी मुख्यमत्री असतांना बोनस देण्याची सुरुवात केली…सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचे
नाना पटोले संविधान खतरे में है म्हणायचे, पण खरे तर धान पिक घेणारे शेतकरी खतरेमध्येआहे
कोरोनात मदत केली नाही,
मात्र बार मालक शरद पवारांकडे गेले व लायसन्स फीस कमी करवून घेतली,
विदेशी दारू50 टक्के कर माफ….विदेशी दारू स्वस्त झाली…
हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार
5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची विज कापली नाही।
मात्र सरकार रोज विज कापली जात आहे।
एका dp वर 4 शेतकऱ्यांनी विज भरली नाही तरपूर्ण dp काढून नेण्चेया काम केले गेले आहे।
सामन्य माणासाच्या विरोधी सरकार आहे. तुम्हीच लोक खाली आणू शकता.
ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे पाप ह्या सरकारने केले आहे.
-
पुणे
– गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महापालिकेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण,
– त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणार भूमिपूजन,
– कार्यक्रमस्थळी अमित शहा संबोधित करणार आहेत,
-
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहाचे आज उद्घाटन
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होतेय. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे आणि उदय सामंत हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ते नेमक काय बोलणार या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिलय.
-
अमित शाह जबाब दो काँग्रेस राबवणार सोशल मीडियावर मोहीम
अमित शाह जबाब दो काँग्रेस राबवणार सोशल मीडियावर मोहीम
अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सोशल राबणार मोहीम
अमित शाह यांच्या दौऱ्यात भाजप नेत्यांना युगपुरुषांचा विसर काँग्रेस नेते मोहन जोशी यांचा आरोप
अमित शाह यांच्या दौऱ्यात भाजपला एकाही मोठया विकासकामाच उदघाटन करता येऊ नये, हे भाजपच अपशय
-
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रणित युवा सेनेचे नव्या वर्षात राज्यव्यापी अधिवेशन
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रणित युवा सेनेचे नव्या वर्षात राज्यव्यापी अधिवेशन
8 आणि 9 जानेवारीला होणार नाशकात राज्यव्यापी अधिवेशन
राज्यभरातून 2 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार
आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होणार राज्यव्यापी अधिवेशनाचा समारोप
शिवसेना नेते, आमदार-खासदार, मंत्रीही रहाणार अधिवेशनात उपस्थित
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मावळ मधील सुदुंबरे येथील NDRF च्या कॅम्प ला भेट देणार
-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मावळ मधील सुदुंबरे येथील NDRF च्या कॅम्प ला भेट देणार
-हेलिकॉप्टर मधून थेट NDRF च्या कॅम्प मध्ये दाखल होणार आहेत
-NDRF मध्ये नवीन कॅम्पचे उद्घाटन करणार आहेत
-पिंपरी चिंचवड पोलिसांकडून NDRF च्या प्रवेशद्वारा वर कडक बंदोबस्त
-
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसैनिकांना दिली भेटीची वेळ
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसैनिकांना दिली भेटीची वेळ
भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या घरी संध्याकाळी साडेसातवाजता अमित शाह शिवसैनिकांना भेटणार
शहरप्रमुख संजय मोरे यांची माहिती
-
अमित शाह दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचले
अमित शाह दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. आजच्या दिवासाची सुरुवात अमित शाह यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन सुरु केला आहे. -
भाजपला शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचा विसर, राष्ट्रवादीकडून निषेध
– भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नसल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध,
– राष्ट्रवादीकडून बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन,
– भाजपने महामानवांचा अपमान केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप,
-
मनसेचे संदिप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा
मनसेचे संदिप देशपांडे यांचा कन्नड भाषिकांना कन्नड भाषेतून इशारा
छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही, कर्नाटकात सुरू असलेल्या दोन पक्षाच्या वादातून महाराजांचा अपमान
भाजप आणि कांग्रेसच्या अंतर्गत वादातून महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही… मतांसाठी पोळी भाजण्याचं काम सुरू आहे…
बसवराज यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल…
-
गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपचे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन
– गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपचे शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन,
– आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी,
– शहरभर भाजपने लावले शाहांच्या स्वागताचे बॅनर्स,
– आजच्या दौऱ्यात अमित शाह भाजप कार्यकर्त्याना नेमका काय विजयी मंत्र देणार
-
दगडूशेठ गणपतीच्या बाहेर अमित शाह यांच्या स्वागतासाठी बँड पथक
दगडूशेठ गणपतीच्या बाहेर अमित शाह यांच्या स्वागतासाठी बँड पथक
दगडूशेठ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याची सुरवात होणार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने
-
कोकणातील तापमानाचा पारा घसरला
रत्नगिरी- कोकणातील तापमानाचा पारा घसरला
पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर ती धुक्याची दाट चादर
हातखंबा निवळी संगमेश्वर चिपळूण भागातल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुक
धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक संथ गतीने
-
अकरावीच्या रिक्त पदांचा बॅकलॉग वाढतोय
अकरावीच्या रिक्त पदांचा बॅकलॉग वाढतोय
यंदा च्या सत्रात 42 टक्के जागा रिक्त
अनुदानित कॉलेज च्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची भीती निर्माण होणार का ?
गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात अकरावीच्या जागा राहत आहे रिक्त
75 ते 80 टक्के जागा भरण्याची अपेक्षा होती
मात्र जागा रिक्त राहत असल्याने निर्माण होत आहे प्रश्न
कॉलेज ची संख्या वाढली ,की विधर्थ्यांचा कल कमी झाला यावर विचार करण्याची गरज
-
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेचा सवतासुभा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेचा सवतासुभा
शिवसेना स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत
उद्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन केली जाणार पॅनेलची घोषणा
समविचारी स्थानिक आघाड्यांना सोबत घेण्याची तयारी
सत्ताधारी महाविकास आघाडीकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शिवसेनेचा निर्णय
-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपुलाचे काम 1 जानेवारीपासून सुरू होणार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उड्डाणपुलाचे काम 1 जानेवारीपासून सुरू होणार
त्यासाठी पुढील दहा दिवसांत महापालिकेकडून कामात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डीपीनुसार हा रस्ता विद्यापीठ सर्कल ते सेनापती बापट रस्त्याच्या सुरुवातीपर्यंत 45 मीटर रुंद केला जाणार
-
नाशिकमध्ये सुरू झालेली सिटीलिंक स्मार्ट शहर बससेवा तोट्यात
– नाशिकमध्ये सुरू झालेली सिटीलिंक स्मार्ट शहर बससेवा तोट्यात – महापालिकेला मोठा भुर्दंड – 132 दिवसात तब्बल 9 कोटींचा फटका – दररोज 146 स्मार्ट बसेस धावतात,ग्रामीण भागात ही स्मार्ट बस सुरू करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट्स पालिकेच्याच मुळावर आल्याची जोरदार चर्चा..
-
नाशिक शहर पोलिसांनी हिट लिस्ट वरील 5 सराईत गुन्हेगारांना केलं तडीपार
– नाशिक शहर पोलिसांनी हिट लिस्ट वरील 5 सराईत गुन्हेगारांना केलं तडीपार – पंचवटी, भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार – किरण गुंजाळ,रोहित सोळसे,नावेद शेख,नागेश शेलार,जयेश दिवे या सराईत गेन्हेगारांना एक वर्षांसाठी केलं तडीपार – शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख बघता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची कारवाई
-
हिंगोली जिल्ह्यात जमिनीतून गूढ आवाजाच सत्र सुरुच
हिंगोली -जिल्ह्यात जमिनीतून गूढ आवाजाच सत्रच
भूगर्भातून गूढ आवाज येऊन जमीन हादरली सुरू
वसमत, औंढा,कळमनुरी ,हिंगोली तालुक्यातील अनेक गावात जमीन हादरली
1वाजून 40 मिनीटांनी जमीन हदरी नागरिक भयभीत..
Published On - Dec 19,2021 6:10 AM