महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 88 वर पोहोचली आहे. तर, 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपली आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळात भाजप ठाकरे सरकार विरोधात आक्रमक होताना दिसून येत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live ) ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. थोड्यावेळामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचं मंचावर आगमन होणार आहे.
ऑगस्टपासून आपल्या रुग्णालयात 268 मुलं अॅडमिट झाली होती. त्यापैकी 34 मुलांचं वजन कमी असणं, इतर कारणांमुळं वाचवता आलं नाही. भांडुपच्या रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला. दोन मुलांची स्थिती चांगली आहे. ज्या डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. 268 पैकी 234 मुलांना वाचवलं. बाळाचं वजन इतर कारणांमुळे देखील त्यांचा मृत्यू झाला.
वेळ पडल्यास कर्नाटक मध्ये जाऊन कर्नाटकचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊ पण सीमावासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री
महाराष्ट्र एकीकरण समिती पवारांच्या भेटीला
सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची घेतली भेट
मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराची दिली माहिती
महाराष्ट्रातील खासदारांचे शिष्टमंडळ अमित शहा यांना भेटणार
शिष्टमंडळ भेटण्यासाठी प्रयत्न करू – शरद पवारांचे एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन
समितीच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे माग घ्यावेत – समिती कडून पवारांना साकडं
यवतमाळ – कर्ज वसुली साठी आलेल्या बँक अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ
ग्रामविकास कार्यकारी सोसायटी चा शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज
शेतकरी महिलेच्या बॅक कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याने शेतकऱ्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास आत्मदहनाचा दिलाय इशारा
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील प्रकार
आगामी विधानसभा निवडणुकांवर ओमिक्रॉंनचे संकट
अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या सल्ल्याने खळबळ
ओमीक्रॉंन वाढत असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूका टाळण्यासाठी सरकारने विचार करावा
निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रॅली साठी गर्दी होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा
इलाहाबाद उच्च न्यायालयाचा सल्ला
ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभुमीवर शिर्डी सज्ज…
गर्दी टाळण्यासाठी संस्थानचे आवाहन….
पायी पदयात्रींनी पालख्या घेऊन येवू नये …
तसेच दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन पास बुक करूनच यावे…
प्रसिद्धि पत्रकाद्वारे साई संस्थानचे भाविकांना आवाहन…
ख्रिसमसच्या सुट्टयांमध्ये साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी….
२५ आणि २६ डिसेंबरला मोठी गर्दी होण्याची शक्यता…
वसई विरार नालासोपाऱ्यात दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात थंडी पडली आहे.
सकाळी घराबाहेर पडलेल्या रिक्षाचालकांना तर चक्क शेकोटी करून, या थंडीचा आनंद घेतला आहे.
2 वर्षा नंतर घराबाहेर पडून थंडीचा आनंद घेता येत असल्याने नागरिकात एक समाधान पसरले आहे.
सहाव्या दिवशी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कामकाज ठप्पच..
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने घेतला आक्रमक पवित्रा..
सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप..
विद्यापीठाचे कामकाज ठप्प असल्याने विद्यार्थ्यांची होत आहेत अतोनात हाल..
संप किती दिवस सुरू राहील हे मात्र अद्यापही अस्पष्ट..
पुणे –
– बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शर्यतींच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात,
– खेड आणि आंबेगाव तालुक्यातून दोन अर्ज प्राप्त,
– जिल्हा प्रशासनाकडून शर्यतींसाठी नियमावली तयार करण्यात येत असून ही नियमावली अंतिम झाल्यानंतर परवानगी देण्यात येणार,
– शर्यतींचे आयोजन करण्यासाठी किमान १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो.
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत उद्या 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.