Maharashtra News Live Update : रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक

| Updated on: Dec 28, 2021 | 8:43 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update : रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 141 वर पोहोचली आहे. ऱविवारी 31 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 61 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपून गेली तरी संप सुरुचं आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज पुन्हा सुरुवात होईल. भाजप आजही विधिमंडळात ठाकरे सरकारविरोधात आक्रमक होताना दिसून येईल. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live ) महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Dec 2021 10:22 PM (IST)

    रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक

    मुंबई :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञातांनी केला हल्ला

    मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथून विवाहाच्या हळदीच्या कार्यक्रमावरून मुक्ताईनगर कडे येत असताना रोहिणी खडसे यांच्या अज्ञात व्यक्तीने वाहनावर केला हल्ला

  • 27 Dec 2021 08:59 PM (IST)

    भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं राज्यपालांना पत्र, मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याची तक्रार

    मुंबई : भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं राज्यपालांना पत्र

    निलंबित असताना आमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे

    मतदान करणे हा आमचा संवैधानिक अधिकार

    याचा दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी परवानगी दिली नसल्याच कळतंय

    यापुर्वी १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडेही पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती

    याचबरोबर अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशीही केली होती विनंती

  • 27 Dec 2021 08:33 PM (IST)

    टास्क फोर्स डॉक्टरांची बैठक सुरू, लसीकरण मोहीम अधिक गतीनं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा

    मुंबई : टास्क फोर्स डॉक्टरांची बैठक सुरू

    कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक

    लसीकरण मोहीम अधिक गतीनं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा

    टास्क फोर्स टीम घेत आहे राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

    यानंतर टास्क फोर्स आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार

  • 27 Dec 2021 08:22 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात बोलत आहे म्हणून मला धमकावणे सुरु- गोपीचंद पडळकर

    मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात बोलत आहे म्हणून मला धमकावणे आणि माझ्या वर हल्ला करणे असे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत- गोपीचंद पडळकर

    यांच्या प्रवृत्ती विरोधात माझा लढा आहे- गोपीचंद पडळकर

    मी पोलीस संरक्षण नाकारले. ज्या वेळेला माझ्यावर हल्ला झाला पोलीस अधिकारी मोबाईल शूटिंग करत होता. मग यांच पोलीस संरक्षण कशाला घेऊ- गोपीचंद पडळकर

    मी कुठल्याही  संरक्षणासाठी मागणी केलेली नाही. माझ्यात यांच्या प्रवृत्ती विरोधात लढण्याची ताकद आहे. त्यामुळे मी यांच्याविरोधात अजून आक्रमक होणार- गोपीचंद पडळकर

  • 27 Dec 2021 07:31 PM (IST)

    31 डिसेंबर रोजी रात्री साईमंदिर राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साई संस्थानचा निर्णय 

    शिर्डी : श्री साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

    31 डिसेंबर रोजी रात्री साईमंदिर राहणार बंद

    जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साई संस्थानचा निर्णय

    दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री उघडे ठेवले जात होते साईमंदिर

    यावर्षी नववर्षाच्या स्वागताला साईदर्शनाला भक्त मुकणार

    मध्यरात्री शिर्डीत दरवर्षी असतात लाखो साईभक्त

    यावर्षी मात्र निर्बंधामुळे साईमंदिर राहणार बंद

    31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता बंद होणार साईमंदिर

    1 जानेवारीला सकाळी सहा वाजता उघडणार मंदिराची कवाडे

    साईमंदिर प्रशासनाच्या निर्णयामुळे भक्तांचा हिरमोड

  • 27 Dec 2021 07:02 PM (IST)

    एसटीची खात्यांतर्गत 681रिक्त पदांसाठीची बढती परीक्षा सुरळीत

    मुंबई : (२७ डिसेंबर) एसटी महामंडळाच्या सुमारे ६८१ रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा कोणतेही विघ्न न येता सुरळीत पार पडली. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्फत सदर परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. तथापि, परीक्षा रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. उलट ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना बढती परीक्षेला बसायचे आहे,त्यांनी रुजू अहवाल सादर करुन परीक्षेस उपस्थित रहावे असे आदेश दिले. रविवारी राज्यभरात तब्बल २८ केंद्रांवर एकाच वेळी हि परीक्षा घेण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठी खात्यांतर्गत बढती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे ६८१ जागांसाठी पदांसाठी ४ हजार कर्मचारी-उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. त्यापैकी परिक्षेला प्रत्यक्ष १४६४ इतके कर्मचारी – उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

  • 27 Dec 2021 05:59 PM (IST)

    अहमदनगरमध्ये नवोदय विद्यालयात आज पुन्हा 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

    अहमदनगर : पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात आज पुन्हा 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

    काल देखील 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले होते

    आता विद्यार्थी पॉझिटिव्हची संख्या 70 वर, तर आणखी आकडा वाढण्याची शक्यता

    सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी

    तर पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांचे ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले

  • 27 Dec 2021 05:36 PM (IST)

    गोव्यात कागदी पोस्टर्सवरून राजकीय वाद, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आक्षेप

    पणजी -गोव्यात कागदी पोस्टर्सवरून राजकीय वाद

    मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कागदी पोस्टर्सवर घेतला आक्षेप

    सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स

    नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

    आप पक्षासह तृणमूल काँग्रेसकडूनही गोव्यात अनेक ठिकाणी कागदी पोस्टर्स

  • 27 Dec 2021 05:34 PM (IST)

    नागपुरात आढळला ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

    नागपूर- नागपुरात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

    – दुबईवरून आलेल्या 29 वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण

    – नागपुरात दुबईवरून आलेल्या प्रवाशांमुळे धोका वाढला

    – आतापर्यंत नागपुरात तिघांना ओमिक्रॉनची लागण

    – एक रुग्ण झाला बरा, दोघांवर उपचार सुरू

    – नागपूरात गेल्या 24 तासांत 13 नव्या कोरोना रुग्णांची भर

  • 27 Dec 2021 04:53 PM (IST)

    ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शन समारोपीय कार्यक्रम सोडून नारायण राणे गोव्याला रवाना

    नागपूर  – ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शन समारोपीय कार्यक्रम सोडून नारायण राणे गोव्याला रवाना

    – ॲग्रोव्हीजचा समारोपीय कार्यक्रमासाठी नारायण राणे आज नागपुरात आले होते

    – आमदार नितेश राणे यांच्या अटकेची चर्चा सुरु असल्याने नारायण राणे कार्यक्रमात सहभागी न होता गोव्याला गेल्याची चर्चा

  • 27 Dec 2021 04:48 PM (IST)

    शिर्डीत रात्री नऊ वाजेनंतर रेस्टॉरंटमधून फक्त पार्सलला परवानगी 

    शिर्डी : शिर्डीत रात्री नऊ वाजेनंतर रेस्टॉरंटमधून फक्त पार्सलला परवानगी

    शिर्डी आरोग्य महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाचा निर्णय

    रात्री नऊ नंतर सर्व आस्थापना राहणार बंद

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    अहमदनगर जिल्ह्यात रात्री नऊ नंतर जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    शिर्डीतील हाॅटेल रॅस्टाॅरंटसह इतर व्यवसाय रात्री नऊ नंतर राहणार बंद

    शिर्डीतील हाॅटेलला केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार

    पाचपेक्षा जास्त लोक सोबत असल्यास होणार कारवाई

    शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची माहीती

  • 27 Dec 2021 04:33 PM (IST)

    नांदेडमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव, दोन जणांना लागण

    नांदेड: दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जण ओमीक्रॉनबाधित.

    हिमायतनगर इथे गत आठवड्यात परतले होते तिघे जण

    तिघांपैकी दोघे ओमीक्रॉन पॉजिटिव्ह आल्याची माहिती

    बाधितांवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

  • 27 Dec 2021 11:45 AM (IST)

    कणकवली पोलीस स्टेशनवर शिवसेनेचा मोर्चा, तणावाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस उप अधीक्षक कार्यालयात बैठक

    कणकवलीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस उप अधीक्षक कार्यालयात बैठक

    राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे बैठकीला उपस्थित

    संभाव्य तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने चर्चा

    आमदार वैभव नाईक अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार

    आमदार नितेश राणे यांच्या म्याव म्याव ला शिवसैनिकांचे प्रत्युत्तर

    बाबा मला वाचव,कॉक कॉक कॉक कॉक अशा घोषणा देत नितेश राणेंची उडवली खिल्ली

  • 27 Dec 2021 11:09 AM (IST)

    नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक सुरू

    नवी दिल्ली निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक सुरू

    केंद्रीय आरोग्य सचिव कार्यालयात दाखल

    राजेश भूषण निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल

    आरोग्य खाते आणि निवडणूक आयोगाची संयुक्त बैठक

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका बाबत होणार महत्त्वाचा निर्णय

  • 27 Dec 2021 10:24 AM (IST)

    Sanjay Raut : भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार, संजय राऊतांचा सवाल

    संजय राऊत

    देणग्या आम्हालाच द्या, इतरांना देऊ नका हा संदेश आहे.

    सामान्य जनतेला आवाहन असलं तरी ते उद्योपतींसाठी आहे.

    प्रधानमंत्र्यांनी देणग्या द्या असं म्हटलं गेल त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, पण मी घेणार नाही

    भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार,

    कायद्यानुसार देणगी मागितली जाऊ शकते मात्र प्रधानमंत्र्यांनी देणगी मागणं हे नैतिकतेला धरुन नाही

    प्रधानमंत्री सहाय्यता निधीला पैसे मागण्याऐवजी पीएम केअरला मागितला आता भाजपसाठी देणगी मागितली आहे.

    आम्हाला पैसे द्या विरोधकांना पैसे देऊ नका हा संदेश आहे, दुसऱ्यांना पैसे दिल्यास आम्ही लक्ष देऊ, असा अप्रत्यक्ष इशारा असल्याचं राऊत म्हणाले.

    तुम्ही भाजपचे सदस्य आहात पण देशाचे प्रधानमंत्री आहात हे पाहयला हवं, असं संजय राऊत म्हणाले

    शातता, अभ्यास सुरु आहे हे नाटक राजभवनात सुरु आहे. त्या नाटकात एकटे राज्यपाल नसून भाजपचे काही लोकही असल्याचं संजय राऊत म्हणाले.

    बारा विधानपरिषद आमदारांविषयी ते अभ्यास करत आहेत. एका वर्षापासून अभ्यास सुरु आहे तो अजून किती वेळ चालणार आहे. राज्यपालांवर कॅबिनेटनं घेतलेले निर्णय बंधनकारक आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबतही इतका अभ्यास करणं बरोबर नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 27 Dec 2021 10:13 AM (IST)

    नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं: नारायण राणे

    ओबीसी आरक्षणासदंर्भात आज निर्णय येईल, त्यापूर्वी मी कोणतंही वक्तव्य करणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचं नारायण राणे म्हणाले. त्या प्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ असं, नारायण राणे म्हणाले. नितेश राणे कुठं गेलेले नाहीत, ते अज्ञातवासात  गेलेले नाहीत, असं नारायण राणे म्हणाले.

    नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचं आहे ते करावं. ज्यांना मारहाण झाल्याचं सांगत आहेत त्यांना नितेश राणे यांच्याकडून कोणतीही मारहाण झाली नाही, असं नारायण राणे म्हणाले.

    सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते विदर्भासाठी करणार असल्याचं नारायण राणे म्हणाले.

  • 27 Dec 2021 10:07 AM (IST)

    पुण्यातील एमआयटी विद्यापीठाच्या कोथरुड कँम्पसमध्ये मँकेनिकल इंजिनिअरिंगच्या 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    पुण्यातील एमआयटी विद्यापीठाच्या कोथरुड कँम्पसमध्ये मँकेनिकल इंजिनिअरिंगच्या 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण,

    विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची वर्कशॉपमध्ये करत होते तयारी,

    एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानंतर 25 जणांची केली आरटीपीसीआर चाचणी,

    त्यापैकी 13 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह,

    विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे यांची माहिती,

    दोन डोस घेतलेल्याच विद्यार्थ्यांना विद्यापीठात दिला जातोय प्रवेश,

    ऑफलाईन वर्ग भरवताना विद्यापीठ प्रशासनाला घ्यावी लागणार अधिकची काळजी,

    लसीचे दोन डोस घेऊनही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा,

    13 जणांपैकी एकालाही ओमिक्रॉनची बाधा नाही !

  • 27 Dec 2021 09:23 AM (IST)

    पुण्यातील एसटी कामगारांचा निर्धार, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम !

    पुण्यातील एसटी कामगारांचा निर्धार,

    विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम !

    स्वारगेट आगारातून शिवशाही, खाजगी,बसेसच्या माध्यमातून वाहतूक सेवा सुरू,

    अनिल परब कामगारांना धमक्या देतायेत आमच्यावर कारवाई सुरूच आहे,

    आम्ही मात्र माघार घेणार नाही कर्मचाऱ्यांची भूमिका

  • 27 Dec 2021 08:35 AM (IST)

    टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात कसून चौकशी

    टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात कसून चौकशी

    राज्य सरकारच्या समितीकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत कसून चौकशी केली जातीये

    सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम समिती करत आहे

    चौकशी अहवाल 15 दिवसात सादर होणार आहे..

  • 27 Dec 2021 08:20 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 2 लाख मुलांना मिळणार लस

    कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 2 लाख मुलांना मिळणार लस

    जिल्हा आरोग्य विभागाने तयार केला अहवाल

    सर्व विद्यार्थी दहावी ते बारावीच्या वर्गातले

    परीक्षा सुरू होण्याआधी लसीकरण पूर्ण करण्याच आव्हान

    लसीकरणासाठी विशेष कॅम्प घेण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी

  • 27 Dec 2021 07:42 AM (IST)

    नाशिक सह धुळे,नंदुरबार मध्ये आयकर विभागाचे छापे; 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त

    नाशिक – नाशिक सह धुळे,नंदुरबार मध्ये आयकर विभागाचे छापे

    छप्यात 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त

    6 कोटींची रोकड तर 5 कोटींचे दागिने देखील जप्त

    उत्तर महाराष्ट्रात 5 दिवस 31 ठिकाणी आयकर विभागाचे छापे

    जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक,सरकारी कंत्राटदार,बिल्डर आयकर च्या रडारवर

    कोट्यवधींचे घबाड मोजण्यासाठी लागले तब्बल 12 तास

    छाप्यात सोन्याचे बिस्किट्स,मौल्यवान हिरे सापडल्याची सूत्रांची माहिती

  • 27 Dec 2021 07:35 AM (IST)

    Salman Khan : पनवेलच्या फार्महाऊसवर नेमकं काय घडलं?, सलमान खान म्हणाला सापानं तीन वेळा दंश केला

    अभिनेता सलमान खाननं पनवेल येथील फार्म हाऊसवर साप कसा चावला यासदंर्भा माहिती दिली आहे. सलमान खान म्हणाला की त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी त्याला काठीच्या सहाय्यानं बाहेर काढतं होतो. त्यावेळी तो माझ्या हातापर्यंत पोहोचला. नेमक्या त्याचवेळी सापानं तीन वेळा दंश केला. तो विषारी साप होता. त्यानंतर मी सहा तास रुग्णालयात होतो, सध्या माझी प्रकृती ठीक असल्याचं सलमान खान म्हणाला.

  • 27 Dec 2021 07:26 AM (IST)

    21 नोव्हेंबर 2021 च्याही टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय

    21 नोव्हेंबर 2021 च्याही टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय,

    2018 व 2020 च्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी तुकाराम सुपे, सुखदेव डेरे अटकेत आहेत !

    या परीक्षेत काही गैरव्यवहार झालाय का ? या संदर्भात पुणे पोलीस करणार तपास ,

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील काही अधिकारी ,कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता,

    संबंधित विनर कंपनीला दिलेल्या कामाच्या संदर्भात कंपनीची काही कागदपत्रे ताब्यात घेऊन केला जाणार तपास !

  • 27 Dec 2021 07:06 AM (IST)

    कोरोना वाढतोय, नागपूरकरांची चिंता वाढली; सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्या 32च्या वर

    – कोरोना वाढतोय, नागपूरकरांची चिंता वाढली

    – नागपूरात सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्या 32च्या वर

    – व्हीएनआयटीच्या चार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    – एक विद्यार्थी पॅाझीटीव्ह आल्यावर 500 विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी

    – लागण झालेले व्हीएनआयटीचे चार विद्यार्थी विलीगीकरणात

    – जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंखा शंभरी पार

    – जिल्ह्यातील कोरोना पॅाझीटीव्हीटी दर एक टक्क्यावर

  • 27 Dec 2021 06:42 AM (IST)

    Chennai Airport : चेन्नई विमानतळावर 42 लाखांच सोनं जप्त

    चेन्नई विमानतळावर 42 लाखांच सोनं जप्त

    944 ग्रॅम सोनं कस्टम अधिकाऱ्यांनी केलं जप्त

    कोलंबो आणि शारजाह मधून आलेल्या प्रवाशांकडून सोनं जप्त

    3 प्रवाशांना कस्टम विभागाने केली अटक

  • 27 Dec 2021 06:42 AM (IST)

    Election Commission : निवडणूक आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक

    निवडणूक आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत होणार निर्णय

    केंद्रीय आरोग्य सचिव बैठकीला उपस्थित राहणार

    ओमीक्रॉंनच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या बैठकीला महत्व

    गर्दी टाळण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या जाणार ?

  • 27 Dec 2021 06:41 AM (IST)

    सुशासित राज्यांची यादी जाहीर,महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

    माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. या सुशासन दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी देशातल्या सुशासित राज्यांची यादी जाहीर केलीय. दरवर्षी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रान कृषी आणि संलग्न क्षेत्र, मानव संसाधन, सार्वजनिक पायाभूत सुविधा, समाज कल्याण आणि विकास या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली असल्याच या अहवालात म्हटल आहे. दरम्यान या यादीत गुजरात पहिल्या तर गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे..

  • 27 Dec 2021 06:19 AM (IST)

    Salman Khan Birthday : सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी

    आज बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवस आहे..27 डिसेंम्बर 1965 रोजी सलमान खान हे जनमले होते..

    सलमान खान यांच्या वय 55 झाले असून रात्री सलमान खान यांच्या चाहत्यांकडून सलमान खान यांच्या घराच्या बाहेर गैलेक्सी, वांद्रे येथे केक कापून बर्थडे साजरा करण्यात आलं..

    रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे तरी सलमान खान यांच्या घरच्या बाहेर फैन्स एकत्र होवून बर्थेडे साजरा केले.

    पोलिसांना माहीत पडतात सलमान खान यांच्या घरच्या बाहेर असलेल्या सर्व चाहत्यांना पोलिसांनी हटवले..

  • 27 Dec 2021 06:14 AM (IST)

    महाराष्ट्रात रविवारी 31 नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद

    महाराष्ट्रात रविवारी 31 नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 22 जणांनी कोरोना लस घेतल्याचं देखील समोर आलं आहे.

Published On - Dec 27,2021 6:12 AM

Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.