LIVE | अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासह मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या निवासस्थाना आग

| Updated on: Feb 20, 2021 | 11:11 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स....

LIVE | अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासह मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या निवासस्थाना आग
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाचे अपडेट्स LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2021 10:08 PM (IST)

    अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासह मुख्याधिकारी यांच्या निवासस्थाना आग

    अकोला : अकोटमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासह मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या निवासस्थाना आग लागली, आगीत दस्तावेज जळून खाक, अकोट अग्निशमन दल, तेल्हारा आणि दर्यापूर अग्निशमन दल अकोटकडे रवाना, अकोट शहर पोलीस दाखल,  आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून बाजूलाच सार्वजनिक वाचनालय आणि जीवन प्राधिकरण ऑफिस सुद्धा आहे. घटनास्थळी अंजनगाव येथील अग्निशामन दस दाखल

  • 20 Feb 2021 10:05 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, दिवसभरात 725 रुग्ण

    नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट :

    – नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – नागपूर जिल्ह्यात 24 तासांत सहा रुग्णांचा मृत्यू

    – नागपूर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 5836 वर

  • 20 Feb 2021 09:03 PM (IST)

    अमरावतीत कोरोनाचा स्फोट, दिवसभरात तब्बल 727 रुग्ण, प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित

    अमरावती: जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक उद्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार, अमरावतीत आज तब्बल 727 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह, आज 7 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू, आतापर्यंत जिल्हात 28815 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, आतापर्यंत जिल्हात 25203 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आतापर्यंत 460रुग्णांचा मृत्यू, 3152 रुग्णांवर उपचार सुरू

  • 20 Feb 2021 09:00 PM (IST)

    …तर जळगावमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा बंद करु, मंत्री गुलाबराव पाटलांचे संकेत

    जळगाव : “जळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आधी एकाच दिवशी दोन आकडी संख्येने आढळणारे रुग्ण आता शंभरीच्या पुढे गेले आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा बंद ठेऊ”, असं राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.

  • 20 Feb 2021 08:56 PM (IST)

    विरार : एचडीएल मधील नवनीत कंपनीला भीषण आग

    विरार : विरार पूर्व चंदनसार येथील ‘एचडीआयएल’ मधील नवनीत कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग संध्याकाळी सातच्या सुमारास लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीत नवनीत कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीच्या बुकच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात सुकलेले गवत आणि काही झाडांना आग लागली. ही आग कंपनीत पोहोचली, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेऊ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.

  • 20 Feb 2021 08:51 PM (IST)

    बेळगावातील प्रसिद्ध रेणूका देवी मंदिर भाविकांसाठी बंद

    बेळगाव :  सौंदत्ती येथील रेणूका मंदिर भाविकांसाठी पुन्हा बंद, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पुढील आदेश येईपर्यंत मंदिर राहणार बंद, लॉकडाऊन नंतर महिन्याभरापूर्वीच सुरू झालं होतं मंदिर भाविकांसाठी खुलं, रेणुका देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रातूनही लाखो भाविक जातात

  • 20 Feb 2021 08:45 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू

    वाशिम : जिल्ह्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

    रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोलपंप आणि ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा

    आठवडी बाजार, गुरांचे बाजार करण्यात बंद

    लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक

  • 20 Feb 2021 08:44 PM (IST)

    अमरावतीत कोरोनाचा ब्लास्ट, दिवसभरात 727 कोरोना नवे बाधित

    अमरावती कोरोना फ्लॅश :

    अमरावती जिल्हात कोरोनाचा ब्लास्ट

    अमरावतीत आज तब्बल 727 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

    आज 7 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू

    आतापर्यंत जिल्हात 28815 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

    आतापर्यंत जिल्हात 25203 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    आतापर्यंत 460रुग्णांचा मृत्यू

    3152 रुग्णांवर उपचार सुरू

  • 20 Feb 2021 07:26 PM (IST)

    मुंबई पोलिसांना मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीची कोठडी मिळणार

    मुंबई : मुंबई पोलिसांना मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला मुंबई पोलीस ताब्यात घेणार, गजाली फायरिंग प्रकरणात बेंगळुरू कोर्टाने रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना दिला, मुंबईचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची माहिती. 2016 साली झाले होते गजाली फायरिंग प्रकरण, मुंबई पोलिसांत रवी पुजारीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल

  • 20 Feb 2021 07:20 PM (IST)

    कोरोना काळात परवानगीशिवाय कार्यक्रम घेणं महागात, हॉलच्या मालकाला 50 हजारांचा दंड

    परभणी : कोरोना काळात परवानगीशिवाय कार्यक्रम घेणं पडले महागात, शहरातील गोल्डन फंक्शन हॉलच्या मालकास 50 हजारांचा दंड, परवानगीशिवाय पॉपूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेकडून कार्यक्रमाचे आयोजन, सार्वजनिक स्वरूपात गर्दी जमावणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी असताना कार्यक्रम घेतल्याने प्रशासनाची कारवाई

  • 20 Feb 2021 06:30 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 93 रुग्णांची नोंद

    वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 93 नव्या रुग्णांची नोंद, गेल्या अकरा दिवसात नव्या 396 कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्यात आतापर्यंत 7648 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 386 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 7105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याशिवाय 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • 20 Feb 2021 06:27 PM (IST)

    कर्नाटक सरकारची खबरदारी, थर्मल चेकिंग करुनच राज्यात प्रवेश

    महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून खबरदारी, कोगनोळी टोल नाक्यावरून थर्मल चेकिंग करूनच राज्यात प्रवेश, तपासणीशिवाय राज्यात प्रवेश देऊ नका तहसीलदारांच्या यंत्रणेला सूचना, दुपारपासून आदेशाची अंमलबजावणी सुरु, आरोग्य कर्मचाऱ्यासह पोलिसांकडून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर

  • 20 Feb 2021 05:20 PM (IST)

    सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांची माफी मागावी, साताऱ्यातील पत्रकारांची मागणी

    सातारा जिल्हयातील राष्ट्रवादीच्या “त्या पावसाच्या भर सभेत एक ही मिडिया प्रतिनिधी उपस्थित नव्हता” या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध, सुप्रिया सुळेंनी सातारा येथील प्रसारमाध्यमांची माफी मागावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

  • 20 Feb 2021 05:18 PM (IST)

    आता चर्चा कशाला? इंधन दरवाढीवरुन शरद पवारांची टोलेबाजी

    बारामती : मागच्या सहा वर्षात जे सरकार आहे. त्यांना इंधन दरवाढ रोखण्याबाबत अधिकार होता. पण त्यांना ते सहा वर्षात जमलं नाही. त्यांच्याबद्दल आता चर्चा कशाला..? इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची टोलेबाजी

  • 20 Feb 2021 04:50 PM (IST)

    जळगावात भाजप तालुकाध्यक्षासह 19 जणांवर गुन्हा दाखल

    जळगाव – पाचोरा येथील भाजपच्या तालुकाध्यक्षासह 19 जणांवर गुन्हा दाखल, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, राज्य सरकारने कोरोना वाढ रोखण्यासाठी सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी घातली होती. मात्र तरीही शिवजयंतीची मिरवणूक काढल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Feb 2021 04:06 PM (IST)

    भाजपने इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरावं : संजय राऊत 

    भाजपने इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरावं. मोदी आंदोलनाची थट्टा करत असतील तर रस्त्यावर उतरावं लोकांच्या भावना लक्षात घेऊन उतरले तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ : संजय राऊत

  • 20 Feb 2021 04:03 PM (IST)

    पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु : संजय राऊत

    आम्हाला बहुमताची चिंता नाही. चिंता कोरोनाच्या संसर्गाची आहे. पूजा चव्हाण हा विषय राजकीय नाही, तर सामाजिक आणि भावनिक आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे. पोलीस तपासात दिशा भरकटेल असे वक्तव्य आम्ही करणार नाही. राज्यातील सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. तपास योग्य दिशेने सुरु आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर विश्वास ठेवावा – संजय राऊत

  • 20 Feb 2021 03:59 PM (IST)

    महापालिका निवडणुका एकत्र लढणार : संजय राऊत

    महाराष्ट्रातील सत्तेत पाच वर्षासाठी एकत्र राहिल, स्थानिक स्वराज्य संस्थेतही आम्ही एकत्र राहू, एकत्र निवडणुका लढू. पुणे महापालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त असेल, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे महापालिका निवडणुका एकत्र लढू – संजय राऊत

  • 20 Feb 2021 03:45 PM (IST)

    पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 527 रुग्णांची नोंद

    पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यातील गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत चालली आहे.

    पुणे कोरोना अपडेट 

    तारीख –         रुग्ण        –  मृत्यू 

    17 फेब्रुवारी – 428 रुग्ण – 7 मृत्यू

    18 फेब्रुवारी – 465 रुग्ण – 9 मृत्यू

    19 फेब्रुवारी – 527 रुग्ण – 7 मृत्यू

  • 20 Feb 2021 03:40 PM (IST)

    परभणीत कोरोनाचा धोका वाढला, जिल्ह्यातील शाळा तात्पुरत्या स्वरुपात बंद

    परभणी : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. इयत्ता 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

  • 20 Feb 2021 02:52 PM (IST)

    अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात गावात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

    अहमदनगर : अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील राशीन गावात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इजेंक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. आज पहाटे ही घटना घडली. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी “माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासुन आम्ही व्यथित आहोत” असा उल्लेख केला आहे.

  • 20 Feb 2021 02:48 PM (IST)

    राकेश टिकैत यवतमाळमध्ये गनिमी काव्याने पोहोचणार

    राकेश टिकैत यवतमाळमध्ये गनिमी काव्याने पोहोचणार

    – शेतकरीविरोधी तीन कायदे मागे घेण्यासाठी वर्ध्यातील बजाज चौकात असलेल्या आंदोलनाला दिल्लीच्या शिष्टमंडळाला देणार भेट

    – वर्ध्यातील शेतकऱ्यांना होती  राकेश टिकैत यांची प्रतीक्षा

    – दिल्ली सरकारने टिकेत यांच्या विमानचे तिकीट रद्द केले असले तरीही ते गनिमी काव्याने यवतमाळ येथे पोहचतील

    तब्बल 68 दिवसापासून वर्ध्यात शेतकरी आंदोलन सुरू

    – दिल्लीमधून आलेल्या शिष्टमंडळात संदीप गिड्डे पाटील, अमनदीप सिंह, तेजवीर सिंह, गुरअमनीत सिंह यांचा समावेश

  • 20 Feb 2021 02:04 PM (IST)

    देशात छुप्या पद्धातीने आणीबाणी : संजय राऊत

    इंदिरा गांधी यांच्या काळात उघड पद्धतीने आणीबाणी लागू केली गेली.

    आता छुप्या पद्धतीने आणीबाणी लागू केली आहे.

    उद्धव ठाकरे यांनी कोरोना कसा वाढू शकतो याचा अभ्यास केला होता. ते दुरदृष्टीचे नेते आहेत.

    विरोधकांनी राजकारण केल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

    आता राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. याची जबाबदारी विरोधक घेणार आहेत का?

    अटल बिहारी वाजपेयी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले.

    कलाम हे सर्वमान्य उमेदवार व्हावेत त्यामुळे प्रमोद महाजन, वाजपेयी यांनी प्रयत्न केले.

    मात्र काही लोक या गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यात त्यांच हसं होत आहे.

    शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असले, पण ज्या पद्धतीने टिकैत  राजस्थान, हरियाणा सारख्या राज्यात ज्या पद्धतीने महापंचायत घेत आहेत. त्यावरुन शेतकरी आंदोलन कमी होतंय हे म्हणणं चुकीचं आहे.

    शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोदींना उत्तर देतील

    महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत

    महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करु

    निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करु

    एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल.

    देवेंद्र फडणीवस यांची मुलाखत घेऊ, राजकारणात चर्चा होत असतात. त्यांची मुलाखत नक्कीच घेऊ.

  • 20 Feb 2021 02:02 PM (IST)

    अकोल्यात 173 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू 

    अकोल्यात 173 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 13593 वर

    आज दुपार नंतर उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत 350 जणांचा मृत्यू

    तर 11421 जणांची कोरोनावर मात

    उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 1822

  • 20 Feb 2021 01:58 PM (IST)

    युवासेनेनंतर शिवसेना युवती सेना संघटना मजबुत करण्याचे लक्ष्य, नाशिकमध्ये युवतींच्या मुलाखतीला सुरुवात

    नाशिक : युवासेनेनंतर शिवसेना युवती सेना संघटना करणार मजबुतीकरणाकडे लक्ष्य

    उत्तर महाराष्ट्रात संघटनेच्या स्थापनेला सुरुवात

    येणाऱ्या राज्यतील प्रमुख महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवतींना आकर्षीत करण्याचा प्रयत्न

    नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात युवतींच्या मुलाखतीला सुरुवात

    मुंबईनंतर युवती सेना राज्यभर मजबूत करण्याचा विचार

  • 20 Feb 2021 01:53 PM (IST)

    वनमंत्री संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब पोहरादेवीचे दर्शन घेणार

    वनमंत्री संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यात खळबळ

  • 20 Feb 2021 12:57 PM (IST)

    नाईट कर्फ्यू लागू करण्याचा सरकारचा विचार : विजय वडेट्टीवार

    नाईट कर्फ्यू लागू करण्याचा सरकारचा विचार : विजय वडेट्टीवार

    नागरिक अजूनही विना मास्कचे फिरत आहेत.

    सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

    मात्र असंच सुरु राहिलं तर आगामी काळात कठोर निर्णय घ्यावे लागतील.

  • 20 Feb 2021 12:46 PM (IST)

     मुंबईच्या जूहू चौपाटीवर क्लिन अप मार्शल आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल

    मुंबईच्या जूहू चौपाटीवर क्लिन अप मार्शल आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची

    गेल्या दोन तीन दिवसांपासून मारहाणीचे प्रकार सुरू

    मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पण दंड आकारल्याने बाचाबाची आणि हाणामारीचे प्रकरण

    मारहाणीचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल

    क्लिन अप मार्शल गुंडगिरी करत असल्याचा पर्यटकांचा आरोप

    कायदा हातात घेऊन गुंडागिरी करणाऱ्या या क्लीन-अप मार्शलवर मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी

  • 20 Feb 2021 12:28 PM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पूजाच्या कुटुंबीयांची भेट घेणार

    बीड: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण

    सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई थोड्याच वेळात परळीत पोहचणार

    पूजा चव्हाच्या कुटुंबांची घेणार भेट

    तृप्ती देसाईंच्या भेटीकडे राज्याचे लक्ष

  • 20 Feb 2021 12:04 PM (IST)

    सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात भीषण आग, तीन गाड्या घटनास्थळी दाखल

    पुणे : सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील ब्राईड या फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग लागली असून या आगीमुळे कंपनी परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहे. या मोठ्या प्रमाणावर असलेल्या धुराच्या आगीवर नियंत्रण मिळण्यास अडथळा येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • 20 Feb 2021 11:54 AM (IST)

    पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन हाय अलर्टवर, खासगी रुग्णालयाच्या खाटा ताब्यात घेण्यास घेणार 

    पुणे :  वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन हाय अलर्टवर

    खासगी रुग्णालयाच्या खाटा ताब्यात घेण्यास पालिका करणार सुरुवात

    पालिका आयुक्तांकडून खासगी रुग्णालयांना पत्र देण्यास सुरुवात

    आजघडीला पालिकेकडे अवघ्या 570 खाटा

    बंद केलेली पालिकेची कोव्हीड सेंटर परत करण्याची शक्यता

    वाढत्या रुग्णसंख्येनं मनपा प्रशासनाकडून निर्णय घ्यायला सुरुवात

  • 20 Feb 2021 11:52 AM (IST)

    कल्याण हळदी कुंकू आयोजन प्रकरण, आयोजक भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा

    कल्याण : हळदी कुंकू आयोजन प्रकरण

    आयोजक भाजप नगरसेवक विरोधात गुन्हा दाखल

    बाजारपेठ पोलिसांनी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्याविरोधात केला गुन्हा दाखल

    हळदी कुंकू कार्यक्रमात जमल्या होत्या शेकडो महिला

  • 20 Feb 2021 11:27 AM (IST)

    दोष नसताना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, चौकशा मागे लागल्या : अजित पवार

    बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकेच्या संदर्भात कधी कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही- अजित पवार

    राष्ट्रीयकृत बँकासुद्धा अडचणीत आल्या आहेत.

    – काही लाख कोटी रुपये मोठ्या उद्योगपतींना देण्यात आले. केंद्र सरकारच्या परवानगीने ही सेटलमेंट केली जातेय

    – उपमुख्यमंत्री असताना राज्य बँकेत जाऊ शकत नव्हतो तरीदेखील आमच्या चौकशा लागल्या

    – सीआयडीने चौकशी केली त्यात क्लीन चिट मिळाली

    एसीबीने चौकशी केली त्यात क्लीन चिट मिळाली

    – आमचा दोष नसताना आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला

    – न्यायाधीशांनी चौकशी केली त्यात आज राज्य सहकारी बँक नफेत असल्याचे समोर आले- अजित पवार

  • 20 Feb 2021 11:23 AM (IST)

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध, 4 जागांसाठी मतदान

    अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध

    चार जागांसाठी आज मतदानाला सुरुवात

    माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची प्रतिष्ठा पणाला

    माझी निवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही यावर उद्या बोलेलं – माजी मंत्री शिवाजी कर्डीले

  • 20 Feb 2021 09:51 AM (IST)

    मराठवाड्यात 3780 नागरिक होम क्वॉरन्टाईन, चार महिन्यानंतर पहिल्यांदाच वाढला आकडा

    औरंगाबाद ब्रेकिंग : मराठवाड्यात 3780 नागरिक होम क्वॉरन्टाईन

    चार महिन्यानंतर पहिल्यांदाच वाढला क्वॉरन्टाईन आकडा

    परभणीत सर्वाधिक 3206 नागरिक क्वॉरन्टाईन

    तर हिंगोळीत 310 आणि नांदेड मध्ये 212 नागरिक क्वॉरन्टाईन

    क्वॉरन्टाईन प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाचा ताण वाढला

  • 20 Feb 2021 09:49 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाचे 158 नवे रुग्ण, चार महिन्यातली सर्वाधिक रुग्णवाढ

    औरंगाबादेत कोरोनाच्या 158 नव्या रुग्णांची वाढ

    चार महिन्यातली सर्वाधिक रुग्णवाढ

    158 रुग्णांची वाढ तर चार रुग्णांचा झाला मृत्यू

    सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 701 रुग्णांवर उपचार सुरू

    कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोचली 48 हजर 293 वर

  • 20 Feb 2021 09:47 AM (IST)

    समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा मासेमारीवर परिणाम , 6 कोटींचे नुकसान

    रत्नागिरी : समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा मासेमारीवर परिणाम

    वादळी वाऱ्यामुळे मच्छिमारांच्या नौका बंदरातच उभ्या

    जिल्ह्यातील मच्छिमारांचे 6 कोटींचे नुकसान

    गेल्या तीन दिवसांपासून समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमार हवालदिल

  • 20 Feb 2021 09:45 AM (IST)

    नाशिकमध्ये भाजपाला दणका, विकासाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांकडून ब्रेक

    नाशिक महापालिका आयुक्तांचा भाजपाला दणका

    22 भूखंडाचा बीओटीवर विकासाच्या प्रस्तावाला आयुक्तांकडून ब्रेक

    संबंधित ठराव अशासकीय असल्याने दप्तरी दाखल करण्याचा आयुक्तांचा आदेश

    अंदाजपत्रकात 500 कोटींची तूट असल्याचं सांगत भाजपाने आणला होता प्रस्ताव

  • 20 Feb 2021 09:00 AM (IST)

    रत्नागिरीत चोवीस तासांत कोरोनाचे 19 नवे रुग्ण, मृत्युदर 3.66 टक्क्यांवर

    रत्नागिरी :  चोवीस तासांत कोरोनाचे 19 नवे रुग्ण

    मृतांची संख्या आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी

    जिल्ह्याचा मृत्युदर राज्याच्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये

    कोरोनामुळे मृतांची संख्या  359 वर, तर मृत्युदर  3.66 टक्क्यांवर

  • 20 Feb 2021 08:57 AM (IST)

    मुंबईत 823 नवे कोरोना रुग्ण, चेंबूरमधील चार इमारती सील

    मुंबईत नव्याने 823 कोरोना रुग्ण आढळले, चेंबूरमधील चार इमारती सील

    इथल्या इमारती मनपाने  14 दिवसांसाठी सील

    इथे राहणार्या लोकांना वर्क फ्राॅम होम आणि ऑनलाईन जेवणाची सोय

    चेंबूरमध्ये वारंवार रुग्णसंख्या वाढत असल्याने  परिसरात शुकशुकाट

  • 20 Feb 2021 08:21 AM (IST)

    अवकाळी पावसाचा प्रसिद्ध भिवापुरी मिरचीलाही फटका, एकरी 50 हजारांचं नुकसान

    नागपूर : अवकाळी पावसाचा प्रसिद्ध भिवापुरी मिरचीलाही फटका

    – भिवापुरी मिरचीचं एकरी साधारण  50 हजारांचं नुकसान

    – गारपीटीमुळे नागपूर जिल्ह्यात गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान

    – आमदार राजू पारवे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी

    – नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश

    – शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आमदार पारवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  • 20 Feb 2021 08:19 AM (IST)

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन, कोल्हापुरात मॉर्निंग वॉकचं आयोजन

    कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज सहावा स्मृतिदिन

    स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान करून मॉर्निंग वॉकचं आयोजन

    पानसरे यांच्या घरापासून नियोजित स्मारक जागेपर्यंत निघणार मॉर्निंग वॉक

    थोड्याच वेळात होणार मॉर्निंग वॉकला सुरुवात

  • 20 Feb 2021 08:18 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या 27 दांडी बहाद्दर नगरसेवकांना बजावल्यात नोटिसा

    पुणे महापालिकेच्या 27 दांडी बहाद्दर नगरसेवकांना बजावल्यात नोटिसा

    – ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या 27 नगरसेवकांना भाजपकडून नोटीस बजावण्यात आलीय

    – हे सर्व नगरसेवक भाजपचेच असून गैरहजर राहण्यामागील कारणांचा खुलासा करण्याचे आदेश

    – महापालिकेची खास सभा तसेच पर्यावरणाची तहकूब सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली होती.

    – या सभेला उपस्थित राहावे यासाठी नगरसचिव कार्यालयाच्यावतीने टपालाद्वारे कार्यपत्रिका पाठविण्यात आली होती

    सभागृह नेता, शहराध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांच्याकडे खुलासा देण्याचे आदेश

  • 20 Feb 2021 08:16 AM (IST)

    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर युवक काँग्रेस रस्त्यावर, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचा निषेध

    – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर नागपुरात युवक काँग्रेस रस्त्यावर

    – अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचा निषेध

    – अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    – शेतकऱ्यांच्या हितासाठी, महागाई विरोधात अमिताभ, अक्षयने ट्वीट करण्याची केली मागणी

    – अमिताभ, अक्षयचे चित्रपटन चालू देण्याचा नाना पटोले यांनी दिली होता इशारा

  • 20 Feb 2021 08:14 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 6089 हेक्टरवरील पिकाचे नुकसान

    नाशिक – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 6089 हेक्टरवरील पिकाचे नुकसान

    अवकाळीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना

    सटाण्यात 2733 हेक्टरवरील पिकं आडवी

    तर निफाड , बागलाण , दिंडोरी मध्ये देखील पिकांचं मोठं नुकसान

    नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • 20 Feb 2021 07:41 AM (IST)

    नागपुरात एफडीएची मोठी कारवाई, बीडीपेठ एनएनसी कंपनीवर एफडीएची धाड

    – नागपुरात एफडीएची मोठी कारवाई

    – बीडीपेठ एनएनसी कंपनीवर एफडीएची धाड

    – 41 लाखांची आयुर्वेदिक आणि युनानी औषधी जप्त

    – हैदराबादवरुन औषधी आल्याची माहिती

    – औषधाच्या हैदराबाद कनेक्शनची चौकशी सुरु

  • 20 Feb 2021 07:40 AM (IST)

    नागपूर पाटणसावंगीत मुख्याध्यापिकेसह 16 विद्यार्थ्यांना कोरोना

    नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीत 16 विद्यार्थ्यांना कोरोना

    – आदर्श महाविद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना कोरोना

    – शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही झाली कोरोनाची लागण

    – सुरक्षेच्या कारनास्तव शाळा 10 दिवस बंद

    – कोरोनाबाधीत 1 6 विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम

  • 20 Feb 2021 07:10 AM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णासंख्येत वाढ, उच्चांक गाठलेल्या सप्टेंबर महिन्याकडे वाटचाल

    नागपुरात सलग सातव्या दिवशी कोरोना रुग्णासंख्येत वाढ,

    नागपूरची कोरोना रुग्णासंख्येचा उच्चांक गाठलेल्या सप्टेंबर महिन्याकडे वाटचाल,

    24 तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 754 वर

    तर 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू

    नागपुरात सध्या 5617 ऍक्टिव्ह रुग्ण

    5 रुग्ण आढळल्यास इमारत आणि फ्लॅट सील करणार

    20 रुग्ण आढळल्यास रस्ता आणि परिसर सील करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

  • 20 Feb 2021 07:07 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंधाची होणार कडक अंमलबजावणी

    कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना निर्बंधाची होणार कडक अंमलबजावणी

    जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या सूचना

    सार्वजनिक ठिकाणी मास्क,सॅनिटायझर सक्तीचं,अन्यथा फौजदारी कारवाई होणार

    लग्नसमारंभ, मेळावे बंदिस्त जागेत तसच 50 टक्के उपस्थितीतच करावे लागणार

    अंत्यसंस्कारासाठीही 20 लोकांनाच उपस्थित राहता येणार

  • 20 Feb 2021 06:26 AM (IST)

    LIVE | यवतमाळ शहरातील संचारबंदीसाठीचे कोरोनाचे नियम कडक, जिल्हाधिकारी अ‌ॅक्शन मोडमध्ये

    यवतमाळ शहरातील संचारबंदीसाठीचे कोरोनाचे नियम कडक, जिल्हाधिकारी अ‌ॅक्शन मोडमध्ये

    यवतमाळ शहरात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन केली केली.

    स्थानिक बसस्थानक चौकात थांबत नागरिकांना मास्क लावण्याची केली विनंती .

    विनामास्क फिरणार्‍यांना केला दंड

Published On - Feb 20,2021 10:08 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.