Live | श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद

| Updated on: Feb 22, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Live | श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Feb 2021 10:19 PM (IST)

    नोरा फतेहीचा सलमान खानसोबत ‘हाय गरमी’ गाण्यावर डान्स

    बिग बॉस सीझन 14 चा आज महाअंतिम सोहळा संपन्न होत आहे. नोरा फतेहीचा सलमान खानसोबत हाय गरमी गाण्यावर डान्स

  • 21 Feb 2021 10:17 PM (IST)

    श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद

    बुलडाणा : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला निर्णय

  • 21 Feb 2021 09:40 PM (IST)

    अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेसला अंधेरी स्थानकात न थांबताच पुढे गेली

    मुंबई : अहमदाबाद- मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकावर न थांबताच पुढे गेली. ही बाब लक्ष्यात आल्यावर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी दादर रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबण्यासाठी तातडीने व्यवस्था केली. ४२ प्रवासी उतरणारे होते. रेल्वेने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • 21 Feb 2021 09:29 PM (IST)

    अकोला जिल्हा कोरोना अपडेट

    अकोला जिल्हा कोरोना अपडेट –

    21 फेब्रुवारी – 288 रुग्ण 20 फेब्रुवारी – 173 रुग्ण 19 फेब्रुवारी – 242 रुग्ण 18 फेब्रुवारी – 235 रुग्ण

  • 21 Feb 2021 09:27 PM (IST)

    भिवंडी कोरोना अपडेट

    भिवंडी कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 07 आज झालेले मृत्यू – 00 आज बरे झालेले – 00

    एकूण रुग्ण – 13999 एकूण मृत्यू – 00482 एकूण बरे झालेले – 13363 एकूण उपचार घेत असलेले – 00054

  • 21 Feb 2021 09:26 PM (IST)

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपूर कोरोना अपडेट –

    तारीख – रुग्ण

    18 फेब्रुवारी – 644 19 फेब्रुवारी – 754 20 फेब्रुवारी – 725 21 फेब्रुवारी – 626

  • 21 Feb 2021 09:26 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 298 कोरोना रुग्णांची वाढ

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट

    कोरोना रुग्ण -298 कोरोनामुक्त -58 मृत्यू -01

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -103198 कोरोनामुक्त -98257 मृत्यू -1830

  • 21 Feb 2021 08:48 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात दिवसभरात 288 नवे रुग्ण

    अकोला जिल्हा कोरोना अपडेट :

    21 फेब्रुवारी – 288 रुग्ण 20 फेब्रुवारी – 173 रुग्ण 19 फेब्रुवारी – 242 रुग्ण 18 फेब्रुवारी – 235 रुग्ण

  • 21 Feb 2021 07:39 PM (IST)

    दारुची दुकानंही बंद करा, ती जीवनावश्यक वस्तू नाही : सुधीर मुनगंटीवार 

    दारुची दुकानंही बंद करा, ती जीवनावश्यक वस्तू नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहेत की नाही. अर्थसंकल्प हा आता मांडू नका. यानंतरच्या अधिवेशनात मांडा : सुधीर मुनगंटीवार

  • 21 Feb 2021 07:29 PM (IST)

    लॉकडाऊन करायचा का? मी पुढचे आठ दिवस पाहणार : उद्धव ठाकरे 

    लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार. ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:28 PM (IST)

    कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील : मुख्यमंत्री

    आता मी जबाबदार अशी नवी मोहीम राबवायची आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नंतर आता मी जबाबदार अशी नवी मोहीम. आता ऑफिसच्या वेळेची पद्धत बदलावी लागेल. वर्क फ्रॉम होम केलं तर गर्दी टळेल. त्याच्याही वेळा टाळा : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:26 PM (IST)

    उद्यापासून मिरवणूक, आंदोलनं, यात्रांवर बंदी, पक्ष वाढवू, पण कोरोना नाही : उद्धव ठाकरे

    सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी. उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी, पक्ष वाढवू, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू. शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश, तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:25 PM (IST)

    उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. अचानक लॉकडाऊन घोषीत करु नका. जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:23 PM (IST)

    पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत : उद्धव ठाकरे

    सध्या राज्यात 53 हजार सक्रिय रुग्ण, अमरावती जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पुन्हा एकदा आपल्याला बंधन पाळावी लागणार आहे. मुंबईमध्ये रुग्ण डबल झालेत, कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडक मारतेय : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:20 PM (IST)

    कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका : उद्धव ठाकरे

    कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:19 PM (IST)

    मुंबईला कोरोनाचा विळखा, दिवसभरात 921 नव्या रुग्णांची नोंद

    मुंबई – 24 तासात नवे रूग्ण – 921 24 तासात मृत्यू – 6 एकूण रूग्ण – 3,19,128 एकूण मृत्यू – 11,446 एकूण डीस्चार्ज – 3,00,959 एक्टीव्ह रूग्ण – 5859 राज्य आरोग्य विभागाची माहिती

  • 21 Feb 2021 07:19 PM (IST)

    राज्यात 24 तासात 6971 रुग्णांची नोंद, आरोग्य विभागाची माहिती

    महाराष्ट्र – राज्यात 24 तासात नवे रूग्ण – 6971 राज्यात 24 तासात मृत्यू – 35 राज्यात 24 तासात डीस्चार्ज – 2417 एकूण रूग्ण – 21,00,884 एकूण मृत्यू – 51788 एकूण डीस्चार्ज – 19,94,947 एक्टीव्ह रूग्ण – 52,956 राज्य आरोग्य विभागाची माहिती

  • 21 Feb 2021 07:17 PM (IST)

    जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार : उद्धव ठाकरे 

    जर नियम मोडलेले दिसले तर हॉलच्या मालकावर गुन्हा दाखल होणार. मास्क नाही वापरला तर दंड आकारला जाणार. आता लॉकडाऊन फक्त कागदावर. अर्थचक्राला गती देत असतानाच कोरोनाचं संकट आलं. लॉकडाऊन करायचा का हाच तर मुख्य विषय. आज 7 हजार नवे रुग्ण सापडलेत. पंधरा दिवसापुर्वी दोन ते अडीच हजार सापडायचे : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:15 PM (IST)

    आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील : उद्धव ठाकरे

    लॉकडाऊनवर मुख्यमंत्र्यांनी भर देणं सध्या तरी टाळलं. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव. जनतेच्या वतीनं तुमच्या मुलाला आशीर्वाद : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:13 PM (IST)

    संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे 

    समजुतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:12 PM (IST)

    हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही : उद्धव ठाकरे 

    मास्क घालायला विसरलो तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करु शकतो. मास्क घालणं अनिवार्य आहे, लस घेतल्यानंतर सुद्धा. कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधनं अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त नाही मोडू शकत : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:09 PM (IST)

    मास्क हीच आपली ढाल – उद्धव ठाकरे 

    मी नेहमी शिवनेरीवर जातो. पण यावेळेस मुख्यमंत्री म्हणून गेलो. मी तिथही सांगितलं, शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल – उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:07 PM (IST)

    शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम : उद्धव ठाकरे 

    आता तुम्ही म्हणाल आमचं लसीकरण कधी तर उपरवाले की मेहरबानी. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील. तोपर्यंत काय काय करायचं. शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:06 PM (IST)

    लसीकरण करुन घ्या, बेधडक करुन घ्या : उद्धव ठाकरे 

    हळूहळू कोरोना हायपाय पसरायला लागला. आता दिलासादायक एवढच की आता वॅक्सिन आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 9 लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली गेली आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का अशी भीती आहे. पण ज्या 9 लाख लोकांना लस दिली त्यांच्यात घातक असे साईड इफेक्ट नाहीत. कोरोना योद्ध्यांना सांगतोय, लसीकरण करुन घ्या, बेधडक करुन घ्या : उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 07:04 PM (IST)

    ते दिवस खूप भयानक होतं : उद्धव ठाकरे 

    कोरोना महाराष्ट्रात येऊन आता वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. ह्या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हा समाधानाचा क्षण. हे असं असायला भाग्य लागतं. ते दिवस खूप भयानक होतं – उद्धव ठाकरे

  • 21 Feb 2021 06:52 PM (IST)

    CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, लॉकडाऊन, निर्बंध याशिवाय विविध विषयांवर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

  • 21 Feb 2021 06:17 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 125 नवे रुग्ण

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 125 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 9 जण झालेत कोरोनामुक्त

    जिल्ह्यात मागील पाच दिवसांत 434 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 7773

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 502

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 7114

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 156

  • 21 Feb 2021 05:42 PM (IST)

    नाशिकमध्ये नाईट कर्फ्य, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

    नाशिकमध्ये उद्यापासून (22 फेब्रुवारी) नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत घोषणा केली आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. लग्न सोहळ्यासाठी परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय लग्नाला गर्दी करु नका, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

  • 21 Feb 2021 05:18 PM (IST)

    अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट होऊ देणार नाही ही भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे का? दरेकरांचा सवाल

    “दोन-चार दिवसांपूर्वी एक मोठं धमकी वजा धाडसी विधान केलं. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट होऊ देणार नाही. धमकी आणि कृतीत फरक असतो. नंतर त्यांनी भूमिका मागे घेतली. आम्ही झेंडे दाखवू, असे ते म्हणाले. आता तेही दाखवतील की नाही ती शंका आहे. खरंतर ही भूमिका महाविकास आघाडी आणि सरकारची आहे का ते मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी जाहीर करावी”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

  • 21 Feb 2021 04:24 PM (IST)

    अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

    अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील पहिला लॉकडाऊन हा अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री यशोमती  ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

  • 21 Feb 2021 03:54 PM (IST)

    मुंबई पोलिसांची डोंगरी परिसरात मोठी कारवाई, 12 कोटींचे ड्रग्ज जप्त

    मुंबई : डोंगरीत मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 12 कोटी 50 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, डोंगरीतल्या एका हायप्रोफाईल इमारतीत ड्रग्सचा मोठा साठा सापडला आहे. डोंगरी पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली आहे. अजूनही छापेमारी सुरू आहे.

    पोलिसांकडून इसाक इकबाल हसन सय्यद (38), अब्दुल वसीम अब्दुल इजाज शेख(31) आणि मुख्य आरोपी दीपक संजीवा बांगेरा याला अटक करण्यात आली आहे. दीपक बंगेरा याच्या डोंगरी परिसरातल्या सन फ्लॉवर अपार्टमेंटमध्ये हा ड्रग्ससाठा मिळून आला आहे.

    पोलिसांनी या इमारतीतून 5 लाखांची रोख रक्कम, दोन वजन काटे आणि ड्रग्स पॅकिंग करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केलं आहे. एनसीबीच्या डोंगरीतल्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांची डोंगरी परिसरात मोठी कारवाई केली आहे.

  • 21 Feb 2021 03:50 PM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

    औरंगाबाद : कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आठ दिवसांपूर्वी घेतली होती कोरोना लस, भास्कर शंकर मेटे असे मृत हवालदाराचे नाव, बेगमपुरा पोलीस ठाण्यात होते कार्यरत, सिटी स्कॅन मध्ये आढळले कोरोनाची लक्षणे, हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद, 13 फेब्रुवारीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 21 Feb 2021 03:25 PM (IST)

    अकोल्यात आज 222 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत

    अकोल्यात आज सकाळच्या अहवालात 222 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 13869 झाला आहे, आज दुपार नंतर उपचारा दरम्यान 1 जणांचा मृत्यू झाला आहे, कोरोनामुळे आतापर्यंत 353 जणांचा मृत्यू , तर 11496 जणांनी कोरोनावर मात केली आहे, उपचार घेत असलेले रुग्ण 2020 आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती

  • 21 Feb 2021 02:32 PM (IST)

    अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर संचारबंदी ची पाहणी करण्याकरता थेट उतरल्या मैदानात

    अमरावती : जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर संचारबंदी ची पाहणी करण्याकरता थेट उतरल्या मैदानात मास्क न घालण्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश एक दिवसाच्या लॉकडाऊनने परिस्थिती आटोक्यात नसल्याने पंधरा दिवसाचा लॉक डाऊन होण्याचे दिले संकेत

  • 21 Feb 2021 02:16 PM (IST)

    जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये

    जळगाव – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना सील करण्याची कारवाई सुरू, शहरातील तीन ते चार मंगल कार्यालये सील करणार असल्याची उपायुक्त संतोष वाहुळे यांची माहिती

  • 21 Feb 2021 02:10 PM (IST)

    जळगाव शहरातील नेहरु चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    जळगाव शहरातील नेहरु चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांसह ग्राहकांमध्ये खळबळ, वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारी बँक सुरू करण्याबाबत निर्णय होणार, बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांची माहिती

  • 21 Feb 2021 02:09 PM (IST)

    शाळा बंद कराव्या, नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी यांचं आयुक्तांना निवेदन

    नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी यांनी आयुक्तांना निवेदन, 5 वी ते 8 पर्यंत सुरू झालेल्या शाळा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बंद करण्यात यावे, शाळा सुरू झाल्या पासून शाळा समोर विध्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी गर्दी वाढत असल्याने व्यक्त केली चिंता, यावर प्रशासन काय निर्णय घेते या कडे लक्ष, सोबतच कोरोना संदर्भात नियम कडक करण्यात यावे या संदर्भात सुद्धा दिल निवेदन

  • 21 Feb 2021 02:08 PM (IST)

    वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयच्या व्यासपिठावर शरद पवार यांचे आगमन

    रायगड – वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयच्या व्यासपिठावर शरद पवार यांचे आगमन, सोबत खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री अदीती तटकरे, मुश्ताक अंतुले आणि इतर मान्यवर, स्वागत समारभं चालू

  • 21 Feb 2021 01:06 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरळीत, शिवडी-वरळी उन्नत कामाचा भूमीपूजन सोहळा

    वरळीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, शिवडी-वरळी उन्नत कामाचा भूमीपूजन सोहळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित

  • 21 Feb 2021 12:49 PM (IST)

    आमदार सरोज आहिरे आणि प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळ्याला अजित पवारांची उपस्थिती

    देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे आणि नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ. प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक येथे पार पडला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या आणि भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या, तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली

  • 21 Feb 2021 12:29 PM (IST)

    बुलडाण्यात कोरोनाचा कहर, आज 301 रुग्ण आढळले

    बुलडाणा – जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर, आज आढळले 301 रुग्ण, आजरोजी जिल्ह्यत 1,369 कोरोना रुग्ण घेताहेत उपचार, तर 187 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 16,146 रुग्ण आढळले आहेत आणि आतापर्यंत 14,590 रुग्णांना उपचार नंतर सुट्टी दिली

  • 21 Feb 2021 12:24 PM (IST)

    अमरावती शहरात 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, मनपा आयुक्तांकडून प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी

    अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरातील 12 कंटेनमेंट झोन घोषित केले आहे, या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे असे आदेश प्रशासनाने दिला आहे, तर या ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले आहे तर या ठिकाणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी कॅटेन्मेंट झोन असलेल्या श्रीकृष्ण पेठ येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला, या 12 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला,अमरावती मनपा हद्दीत सध्या 2783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली

  • 21 Feb 2021 12:21 PM (IST)

    मुख्यमंत्री महाराष्ट्राशी रात्री 7 वाजता बोलणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत, यावेळी ते कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहता त्यावर भाष्य करण्याची शक्यता आहे

  • 21 Feb 2021 12:20 PM (IST)

    इचलकरंजी : शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणार यांवर नगरपालिकेची दंडात्मक कारवाई, नगर पालिका प्रशासनाकडून दुकानदार भाजीमंडई मॉल थेटर या ठिकाणी विना मास्क फिरण्यावर कारवाई, नगर पालिका प्रशासनाकडून लाख रुपयांचा दंड वसूल प्रशासनाकडून सर्वसामान्यांवर कारवाई, नगरपालिके प्रशासना तर्फे दोन दिवसापूर्वी प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात होते, या कार्यक्रमाला खासदार आजी-माजी आमदार नगरसेवक नगरसेविका प्रशासन अधिकारी विना मास्क होते व  सोशल डिस्टंसिंग चा  फ जा उडाला होता, नगरपालिका प्रशासनाकडून या सर्वांवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे

  • 21 Feb 2021 12:14 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अचलपुर परतवाडा सर्वात मोठा हाॅट स्पाॅट

    अमरावती जिल्ह्यातील अचलपुर परतवाडा सर्वात मोठा हाॅट स्पाॅट, 359 रुग्ण घेत आहेत उपचार उपवीभागीय अधीकार्‍यांचि माहिती, अचलपुर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ, आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असुन खबरदारी घेन्याचे प्रशासनाकडून आवाहन

  • 21 Feb 2021 12:12 PM (IST)

    देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांचा विवाह सोहळा, शरद पवार, छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती

    नाशिक – देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांचा विवाह सोहळा, शरद पवार, छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थितीत, लग्न सोहळा निवडक लोकांमध्ये संपन्न, मीडियाला प्रवेश नाही, काहीही न बोलता शरद पवार , भुजबळ रवाना, थोड्याच वेळात अजित पवार लावणार हजेरी

  • 21 Feb 2021 12:11 PM (IST)

    नागपुरात वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता पोलीसअकॅशन मोडमध्ये

    नागपुरात वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता पोलीसअकॅशन मोडमध्ये, वाहतूक पोलिसांनी सुरू केला ड्राइव्ह, बाहेरून येणाऱ्या वाहनांची केली जात आहे चेकिंग, मास्क न घालणारे आणि सोशल डिस्टनसिंग च पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई, चार चाकी आणि दुचाकी वाहनांवर केली जात आहे कारवाई, पोलीस आयुक्तांनी दिली कारवाई चे आदेश

  • 21 Feb 2021 12:11 PM (IST)

    अमरावती शहरात नऊ प्रतिबंधित क्षेत्र

    अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरातील 9 कंटेनमेंट झोन घोषित केले आहे, या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे असे आदेश प्रशासनाने दिला आहे,या नऊ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला

  • 21 Feb 2021 12:09 PM (IST)

    लग्न समारंभ, खासगी, राजकीय कार्यक्रमांना 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

    हॉटस्पॉटमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणार, हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट यांना उद्यापासून निर्बंध लागू होणार, संचारबंदीचे नियम देखील उद्यापासून लागू होणार, टेस्टिंगच प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु, ससूनमध्ये देखील अतिरिक्त मनुष्यबळ, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन तिथेही टेस्टिंग वाढवणार, लग्न समारंभ, खासगी, राजकीय कार्यक्रमांना 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोणताही लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाही, परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरु करणार,संचारबंदी म्हणण्या ऐवजी नियंत्रित संचार हा शब्द वापरणार, असंही आयुक्तांनी सांगितलं

  • 21 Feb 2021 12:07 PM (IST)

    मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’

    कोरोना परिस्थितीचा पूर्ण आढावा बैठकीत घेण्यात आला, जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे प्रमुख, खासदार आमदार उपस्थित होते, पुणे जिल्हा राज्यात 12 व्या क्रमांकावर आहे, नवीन हॉटस्पॉट शोधणे, कॉन्टॅक्ट टेस्टिंगच प्रमाण वाढवणार, फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवणार, लोकसंवादामधून कोरोना विषयक जनजागृती, 28 फेब्रुवारी पर्यत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद, शाळा आणि कॉलेज, खासगी कोचिंग बंद, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका निम्या संख्येत सुरु राहणार, हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट रात्री 11 वाजता बंद होणार, रात्री 11 पासुन सकाळी 6 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी, जनतेचा याला प्रतिसाद मिळेल ही आमची अपेक्षा, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली

  • 21 Feb 2021 11:04 AM (IST)

    पूजा चव्हाण प्रकरणात वडिलांची माघार, आमची कोणावरच तक्रार नाही

    बीड: पूजा चव्हाण प्रकरणात वडिलांची माघार, आमची कोणावरच तक्रार नाही, मला पाच मुली आहेत, आम्हाला जगू द्या, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केली विनंती, तक्रारच नसल्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण थंडावणार

  • 21 Feb 2021 10:21 AM (IST)

    गुहागर तालुक्यातील सुरळ गावात विहिरीत पडला बिबट्या

    रत्नागिरी – गुहागर तालुक्यातील सुरळ गावात विहिरीत पडला बिबट्या, भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने विहिरीत पडला बिबट्या, घटनास्थळी स्थळी वनविभाग दाखल, बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

  • 21 Feb 2021 10:20 AM (IST)

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मंत्री मैदानात

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मंत्री मैदानात, मंत्री अब्दुल सत्तार तर मंत्री संदीपान भुमरे निवडणुकीत उतरणार, 10 मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, रंजकता रंगणार, बिनविरोध निवडून येण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरु, भ्रष्टाचार मुद्दा समोर ठेवून निवडणूक लढण्याची शक्यता

  • 21 Feb 2021 10:19 AM (IST)

    जिल्हा बँक निवडणुकीचा पहिला निलाल जाहीर

    अहमदनगर – जिल्हा बँक निवडणुकीचा पहिला निलाल जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक उदय शेळके यांचा वियज, उदय शेळके यांचा 105 पैकी 99 मतांनी दणदणीत विजय, रामदास भोसले यांचा पराभव, तर भोसले यांनी फक्त 6 मते

  • 21 Feb 2021 10:16 AM (IST)

    लोणावळा पोलिसांचा सलग दुसऱ्या दिवशी विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा

    लोणावळा पोलिसांचा सलग दुसऱ्या दिवशी विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा, दिवसभरात तब्बल 80 जणांवर कारवाई करत 16 हजार रुपये दंड केला वसूल, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना निष्काळजीपणे विना मास्क फिरणाऱ्यावर लोणावळा शहर पोलिसांची ही कारवाई, मावळ तालुक्याचा कोरोना बाधित आकडा पोहचला 8,210 तर 7920 जण कोरोना मुक्त तर आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू

  • 21 Feb 2021 10:16 AM (IST)

    पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थांना कोरोनाची लागण

    सातारा : पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थांना कोरोनाची लागण, सर्व विद्यार्थी रूग्णालयात, सेवागिरी शाळा केली बंद, सर्व विद्यार्थांची पुन्हा तपासणी करणार, एका विद्यार्थामुळे झाली लागण, सर्व विद्यार्थांचे पालक भयभीत, पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील घटना

  • 21 Feb 2021 10:15 AM (IST)

    पुणे पालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची 1 हजार 252 कोटी रुपयांची थकबाकी

    पुणे – पालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची 1 हजार 252 कोटी रुपयांची थकबाकी, वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल करण्यात अपयश, त्यातच महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने अनधिकृत मोबाईल टॉवर शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू, आतपर्यंत असे आणखी 250 टॉवर आढळून आलेत, पालिकेच्या हद्दीत जवळपास 20 कंपन्यांचे एकूण 2 हजार 398 मोबाईल टॉवर, यातील काही मोबाईल कंपन्यांकडून 359 कोटी 60 लाख रुपायांचे उत्पन्न मिळाले तर, 518कोटी 40 लाख रुपयांचा कर थकीत, या थकीत करावर पालिकेने 734 कोटी रुपयांचा लावला शास्तीकर

  • 21 Feb 2021 09:16 AM (IST)

    अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरु

    पुणे – उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरु, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश, देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार,

  • 21 Feb 2021 09:09 AM (IST)

    रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेऊन संगणकात कमी रकमेची नोंद, मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवारवर गुन्हा

    नागपूर : रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेऊन संगणकात कमी रकमेची नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, या घडामोडीमुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे, या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली ते गणेश रामचंद्र चक्करवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे संस्थापक संचालक आहेत.

  • 21 Feb 2021 07:31 AM (IST)

    नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पहाटे सराईत गुन्हेगारांच्या घरावर पोलिसांचे छापे

    नाशकातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या घरावर पोलीस पथकाचे छापे, 6 गुन्हेगारांच्या मूसक्या आवळत, गावठी कट्टयासह 20 प्राणघातक शस्र केली जप्त,  अजूनही अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

  • 21 Feb 2021 07:23 AM (IST)

    नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, काल पाच महिन्यानंतर झाल्या सर्वाधिक 9443 चाचण्या, त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह, पॉझिटीव्ह येण्याचं प्रमाण 7.67 टक्के इतकं, 6 जणांचा मृत्यू , तर 502 जण झाले कोरोनामुक्त, गेल्या काही दिवसात सतत होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ, प्रशासनासाठी बनत आहे चिंतेचा विषय

  • 21 Feb 2021 07:22 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन अलर्टवर

    नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन अलर्टवर,  शहरात सहा ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट पुन्हा सुरू करणार,  दोन कोव्हिड सेंटर सुरू होणार,शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात ही करणार वाढ,  गेल्या 8 दिवसातच शहरात झपाट्याने वाढली रुग्णसंख्या, मनपाने तयार केलेल्या पथकाची मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर शहरात धडक कारवाई, नियम पाळा अन्यथा अजून कडक निर्बंधाना सामोरे जावे लागेल जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा इशारा

  • 21 Feb 2021 07:11 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 252 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह

    नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 252 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू,  यात सर्वाधिक 157 रुग्ण आढळले शहरात,  आतापर्यंत जिल्ह्यात 2085 रुग्णांनी कोरोनामुळे गमावला आपला जीव

  • 21 Feb 2021 06:37 AM (IST)

    साताऱ्यात नवा कोरोना विषाणू, अनेक तालुके कोरोना हॉटस्पॉट, प्रशासन अलर्टवर

    सातारा जिल्हयात नव्या म्युटेशनचा कोरोना आढळल्याने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आलं आहे

  • 21 Feb 2021 06:33 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटीव्ह

    उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटीव्ह, जिल्हाधिकारी यांनी कोरोना लस घेतलेली असतानाही जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटीव्ह, संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी आणि काळजी घेण्याचे आवाहन

  • 21 Feb 2021 06:30 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 725 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ,  नागपूर जिल्ह्यात 24 तासांत सहा रुग्णांचा मृत्यू ,  नागपूर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 5836 वर

Published On - Feb 21,2021 10:54 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.