LIVE | ठाणे शहरात पोलिसांकडून मनाईचे आदेश, 1 मार्चे ते 15 मार्च मोर्चा, आंदोलने करण्यास मनाई
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी (Maharashtra breaking news)
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या विविध आंदोलने सुरू आहेत. येत्या 11 मार्च रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, 12 मार्च शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व ( 3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
ठाणे शहरात पोलिसांकडून मनाईचे आदेश, 1 मार्चे ते 15 मार्च मोर्चा, आंदोलने करण्यास मनाई
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सध्या विविध आंदोलने सुरू आहेत. येत्या 11 मार्च रोजी महाशिवरात्री, छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन, 12 मार्च शब-ए-मेराज असे सण उत्सव संपन्न होणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 37 (1) व ( 3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश देण्यात आले आहेत.
‘या’ गोष्टींना मनाई
१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे
२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे
३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे
४) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी
५) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे
६) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे
७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे इ. कृत्यांनामनाई करण्यात आली आहे.
‘या’ व्यक्तींना मनाई आदेश लागू राहणार नाहीत
जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.
-
दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे, दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे रोजी होणार
-
-
नागपुरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, दिवसभरात 1074 नव्या रुग्णांची नोंद
नागपुरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच, नागपुरात आज 1074 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 882 जणांची कोरोनावर मात, एकूण रुग्ण संख्या 147907 वर, एकूण बरं होणाऱ्यांची संख्या 136140, तर आतापर्यंत 4320 रुग्णांचा मृत्यू
-
पोहरादेवीत आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण, वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 146 नवे रुग्ण
वाशिम : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात कोरोना नवे 146 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात आज 39 जण कोरोनामुक्त, जिल्ह्यात मागील तीन दिवसात 699 कोरोनाबाधित रुग्ण, पोहरादेवी येथील एक जण आज पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8621 पॉझिटिव्ह रुग्ण, आतापर्यंत 7270 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या 1193 रुग्णांवर उपचार सुरु
-
यवतमाळमध्ये शनिवारपासून सोमवारपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी
शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी
यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. या अंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थ हे जिवनाश्यक / अत्यावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने (दुध विक्रेते / डेअरी) आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. सदर संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच्या औषधी दुकानासह), पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील ह्याची नोंद घ्यावी. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.
-
-
पोहरादेवी येथे आणखी एकाला कोरोनाची लागण
वाशिम : पोहरादेवी येथील एक जण आज पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, पोहरादेवी गावात कालच महंत कबिरदास यांच्यासह सह 8 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोहरादेवी इथं 22 फेब्रुवारीपासून एकूण 9 जण कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मानोरा तालुक्यात 18 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच काल एकूण 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यामुळे मानोरा तालुक्यात एकूण दोन दिवसात 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
-
फोटो मॉर्फ करणं चुकीचं : सुधीर मुनगंटीवार
चित्रा वाघ यांचे काही मॉर्फ केलेले फोटो व्हायरल होत आहे. अशाप्रकारचे फोटो मॉर्फ करणं चुकीचं आहे. याबाबत कारवाई झाली पाहिजे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
-
गडचिरोलीत 24 जणांना कोरोनाची लागण, 11 कोरोनामुक्त
गडचिरोली:- आज एका मृत्यूसह 24 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त
गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना रूग्णांत वाढ, आज जिल्हयात 24 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आला, यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 9514 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9322 वर पोहचली. तसेच सद्या 86 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एक मृत 70 वर्षीय महिला इतर जिल्ह्यातील कोरोनामुळे मुत्यु झाला,
-
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज, 55 प्रतिबंधित क्षेत्र घोषित
वसई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज
वसई विरार महापालिका क्षेत्रात 55 प्रतिबंधित क्षेत्र घोषित
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बंद झालेले कोव्हीड रुग्णालय पुन्हा होणार सुरू
वसईच्या वरून इंडस्ट्रीज मधील 1000 आणि विरार पूर्व चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात 150 खाटाचे अत्याधुनिक सुविधायुक्त कोव्हीड रुग्णालय सुरू
कोविड 19 च्या लढाईसाठी 217 डॉक्टर आणि पॅरामेडिकलची टीम, 4 ऑक्सिजन आणि 12 सामान्य रुग्णवाहिका, 43 व्हेंटिलेटर तातडीची सुविधा तयार
वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेखा वाळके यांची माहिती.
-
वर्धा जिल्ह्यात पुन्हा 36 तासांची संचारबंदी, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार
वर्धा : वर्धा जिल्ह्यात पुन्हा ३६ तासांची संचारबंदी
-शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत संचार बंदी
– मागील आठवड्यात सुद्धा होती ३६ तासांची संचारबंदी
– संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापने राहणार बंद
– सकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत दूध विक्रीकरिता राहणार बंद
– संचारबंदीच्या काळात बस वाहतूक सुद्धा राहणार बंद
– जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांचा निर्णय
– जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे आदेश
-
भारत बंदला प्रतिसाद, पुण्यातील भुसार मार्केट यार्डात व्यापार पुर्णपणे बंद
आज देशभरात व्यापारी संघटनांनी भारत व्यापार बंदची हाक दिलेली होती,40 हजार व्यापारी संघटना या आजच्या आंदोलनात सहभागी झाल्यात या आवाहनाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय, पुण्यातील भुसार मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी पुर्णपणे व्यापार बंद ठेवलाय.
-
इगतपुरी जवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट वर कारवाई, रिसॉर्टवर आलेले 30 लोक विना मास्क
नाशिक – इगतपुरी जवळील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट वर कारवाई, रिसॉर्टवर आलेले 30 लोक विना मास्क आढळून आल्यानंतर केली कारवाई, विवाह सोहळ्यानिमित्त आलेल्या लोकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, हॉटेल व्यवस्थापक आणि मालक यांना 30 हजार रुपयांचा दंड
-
नवी मुंबईत मनसे विभाग अध्यक्षाला जुगार वाल्याकडून मारहाण
नवी मुंबई – मनसे विभाग अध्यक्षाला जुगार वाल्याकडून मारहाण ,वाशी मनपा रुग्णायात दाखल, चार जणांपैकी दोघांना गंभीर मारहाण, रस्त्यावर जुगार का खेळतात सांगितल्या वरून 30 ते 40 जनाने केला हल्ला, महापालिका रुग्णालयात उपचारासाठी तरुण दाखल, मारहाणीसाठी लाकडी बांबू, दगड विटा, एपीएमसी माफको परिसरातील घटना
-
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग न्यायालयात, पुणे सीपींना समन्स बजावण्याची शक्यता
पुणे – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग न्यायालयात याचिका दाखल, सामजिक संस्थेने केली याचिका दाखल, आज पुणे CP ना समन्स निघण्याची शक्यता असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा
-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात, कोव्हिड प्रोटोकॅालचं पालन करणं गरजेचं : नितीन राऊत
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात, कोव्हिड प्रोटोकॅालचं पालन करणं गरजेचं, लक्षणं दिसल्यास टेस्ट करणं गरजेचं, जिल्ह्यात तीन पटीपेक्षा जास्त कोरोना चाचण्या केल्या, मुंबईपेक्षा जास्त चाचण्या नागपुरात, सुपर स्प्रेडर असलेल्या हॅाकर्सच्या चाचण्या सुरु केल्या, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना माहिती पोहोचवण्याचा निर्णय – नितीन राऊत
-
नागपुरात कुठलंही लॅाकडाऊन नाही, शनिवार-रविवारी लोकांनी आपली जबाबदारी समजून बाहेर पडू नये – नितीन राऊत
नागपुरात कुठलंही लॅाकडाऊन नाही, शनिवार-रविवारी लोकांनी आपली जबाबदारी समजून बाहेर पडू नये, सात मार्च नंतर क्वॅारंटाईन सेंटरबाबत निर्णय घेणार, शनिवार-रविवारी जिल्ह्यातील मार्केट बंद राहणार -नितीन राऊत
-
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणात मुंबईच्या डबेवाल्यांचा सहभाग
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणात मुंबईच्या डबेवाल्यांचा सहभाग, राम मंदिर निर्माणासाठी केली आर्थिक मदत, RSS चे सह कार्यवाह भैयाजी जोशी यांच्याकडे 25 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द, डबेवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भैय्याजी जोशी यांची घेतली आज भेट
-
अजित पवार यांच्या बारामती हॉस्टेलमध्ये खाजगी बैठका
पुणे – अजित पवार यांच्या बारामती हॉस्टेलमध्ये खाजगी बैठका, दर आठवड्याला होणारी कोरोना आढावा बैठक आज रद्द, सकाळपासून अजित पवारांच्या विविध विषयांवर बैठका सुरू आहेत
-
साहित्य संमेलन ऑनलाईन घ्या, आम आदमी पार्टीची मागणी
नाशिक – साहित्य संमेलन ऑनलाईन घ्या, आम आदमी पार्टीची मागणी, साहित्य संमेलनासाठी गोळा होणारा कोट्यवधींचा निधी समाजासाठी द्या, कोव्हिड काळात समाजाला या निधीची आवश्यकता, साहित्यिकांनी संवेदनशील होऊन संमेलन ऑनलाईन घ्यावं, भरपूर वर्गणी गोळा करून तिचा वारेमाप खर्च करावा अशी साहित्यिकांकडून अपेक्षा नाही, आम आदमी पार्टीच्या मागणीला संमेलन समिती काय उत्तर देते याकडे लक्ष
-
औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी
औरंगाबाद : पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी, प्रियदर्शनी उद्यानात साकरतय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक, स्मारकाच्या कामाला हायकोर्टाने दिली आहे स्थगिती, झाडे तोडण्याच्या कारणावरून दिलीय स्थगिती, स्थगिती दिल्यानंतर सुभाष देसाई यांच्याकडून पाहणी सुरू, स्मारकाबाबत पर्यायी मार्ग काढण्यासाठी चाचपणी सुरू
-
अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटकांनी भरलेली संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती
संशयास्पदरित्या स्फोटक भरून आलेली गाडी ही विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती, तशी तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती मिळते, या वरून आरोपींनी संपूर्ण कट रचूनच हा फक्त इशारा दिला होता
-
राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर – विजय वडेट्टीवार
राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, तामिळनाडूत परिक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना पास केलं, राज्यात याबाबत विचार सुरु, पोहोरादेवीतील गर्दीस जबाबदार असेल्यावर कारवाई होणार, मग ते कोणीही असोत, मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचाही विचार सुरु, मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार, नागपूरबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार, सार्वजनिक कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी, कारवाई होणार
-
‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है’, आणखी काय काय स्फोटकांनी भरलेल्या बॅगमध्ये?
अंबानींच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या गाडीतून जप्त केलेले साहित्य, सुपर पावरडेझर एक्सप्लोजिव 25 एम एम 125 ग्राम, सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डो बाजारगाव नागपूर असे लिहिलेल्या 20 जिलेटीन कांड्या, बनावट नंबर प्लेट, हे सर्व साहित्य मुंबई इंडियन्स असे लिहिलेल्या बॅगमध्ये होत, पोलिसांना मिळालेल्या लेटर मधील मजकूर, डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाणे….संभल जाना…
-
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई, दहा दिवसात 3 कोटी 94 लाखांचा दंड वसूल
विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई, दहा दिवसात 78,669 जणांकडून 3 कोटी 94 लाख 4 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल, चौकात बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे केली कारवाई, सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघे फिरणे, नंबर प्लेट नसणे, यावरती पोलीसांकडून जोरदार कारवाई, वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापरण्याचं आवाहन, मास्कच्या नादात पुणेकर विसरले हेल्मेट !
-
कोकण रेल्वेवरच्या मार्गावर विद्युतीकरणाची यशस्वी चाचणी
रत्नागिरी – कोकण रेल्वेवरच्या मार्गावर विद्युतीकरणाची यशस्वी चाचणी, विद्युतीकरणावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान धावले पहिलं लोको इंजिन, सकाळी नऊ वाजता सुटलेले इंजिन रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती साडेतीन वाजता पोहोचलो, विद्युतीकरणाच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी इतका खर्च अपेक्षित
-
दक्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यावर यावर्षीही राहणार बंदी
कोल्हापूर – दक्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यावर यावर्षीही राहणार बंदी, खेटे आयोजित करू नका,जिल्हाधिकाऱयांचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला पत्र, खेटे बंद असले तरी धार्मिक विधी कमीत कमी पुजाऱ्यांच्या उपास्थितीत सुरूच ठेवण्याच्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना, राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी, चैत्र यात्रे आधीच्या चार रविवारी भाविक जोतिबा डोंगरावर घालतात खेटे, दरवर्षी खेट्यासाठी असते हजारो भाविकांची असते गर्दी
-
रत्नागिरी पोलिसांकडून उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
रत्नागिरी – पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश, ओसवाल नगर येथे भाड्याच्या बंगल्यात सुरू होते सेक्स रॅकेट, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एका पीडित तरूणीची पोलिसांनी केली सुटका, एक महिलसह दोघांना अटक, बंगला आणि गाडी पोलिसांकडून सील
-
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी, पौड रोडवरील अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी आणून महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडलाय, याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे, जावेद शेख, हसीना शेख व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणी प्रकाश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे, पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्याचे मध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत होती.
-
नाशकातील डांगसौंदाणे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद
नाशिक – डांगसौंदाणे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद, वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या, गेल्या अनेक दिवसांपासून गावात बिबट्याची दहशत, मात्र आणखी काही बिबटे परिसरात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती कायम
-
कोल्हापूर-नागपूर रेल्वे 12 मार्च पासून सुरु होणार
कोल्हापूर – कोल्हापूर-नागपूर रेल्वे 12 मार्च पासून सुरु होणार, कोरोनामूळे गेल्या 11 महिन्यापासून बंद होती रेल्वे सेवा, आठवड्यातून दोन वेळा धावणार कोल्हापूर नागपूर रेल्वे, महालक्ष्मी एक्स्प्रेस,कोल्हापूर धनाबाद नंतर आणखी एक लांब पल्याची सेवा सुरू होत असल्यानं प्रवाश्यांतून समाधान
-
राज्य पोलीस दलाने घालून दिला आदर्श, कोरोनात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी
राज्य पोलीस दलाने घालून दिला आदर्श, कोरोनात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी, नागपूर पोलीस दलात आठ वारसांना मिळाली नोकरी, कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या आठ वारसांची पोलीस शिपाई म्हणून नियुक्त, कुणाला तीन महिन्यात, तर कुणाला सहा महिन्यात मिळाली नोकरी, पोलीिसांच्या एकूण ३१ वारसांना पोलीस दलात नोकरी, कोरोनात खचलेल्या पोलीस कुटुंबीयांना पुन्हा मिळाला आधार
-
14 वर्षीय मुलीच्या मृत्युला कारणीभुत ठरल्या प्रकरणी दोन भोंदुबाबांवर जादु टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
साताऱ्यातील दहिवडी येथील शिंदी गावातील धक्कादायक घटना, 14 वर्षीय मुलीच्या मृत्युला कारणीभुत ठरल्या प्रकरणी दोन भोंदुबाबांवर जादु टोणा कायद्यांतर्गत रात्री गुन्हा दाखल, उत्तम अवघडे आणि रामचंद्र अवघडे अशी अटक झालेल्यांची नावे, मुलीला ताप आला असल्याच्या कारणावरुन मुलीच्या आई वडिलांना देवऋषींनी भुतबाधा असल्याचे दिले होते कारण, वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मागील आठवड्यात झाला होता मृत्यू, या प्रकरणात कुटुंबाचे कोणतेही सहकार्य होत नसल्याने अनिसने केला गुन्हा दाखल
-
औरंगाबादेत कोरोनाचा आकडा आणखी वाढला, एका दिवसात 275 जणांना कोरोनाची लागण
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा आकडा आणखी वाढला, एका दिवसात 275 जणांना कोरोनाची लागण, बधितांचा आकडा पोचला 46,793 वर, सध्या रुग्णालयात रुग्णांवर 1,511 उपचार सुरू, तर काल दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू
-
नागपूरकरांची चिंता वाढतेय, 24 तासांत 1116 नवे कोरोना रुग्ण
नागपूरकरांची चिंता वाढतेय, 24 तासांत 1116 नवे कोरोना रुग्ण, 24 तासांत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 1028 झाले कोरोनामुक्त, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच मृत्यूसंख्या 13 वर, जिल्ह्यात 24 तासांत 10611 कोरोना चाचण्या
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दाट लोकवस्ती असलेल्या ‘ब’, ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दाट लोकवस्ती असलेल्या ‘ब’, ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण, 19 भाग कंटेन्मेट झोन घोषित करण्यात आलेत, तर 11 रुग्ण सापडल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी राजपार्क सोसायटी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची माहिती
-
लोकलच्या रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आरपीएफ जवानांना यश
विरार : लोकलच्या रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आरपीएफ जवानांना यश, 24 फेब्रुवारीची विरार रेल्वे स्थानकातील घटना, कामावर जाण्याचे वेळेतच एक 32 वर्षीय व्यक्ती चक्क लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना रेल्वे रुळावर जाऊन झोपला, पण स्थानिक आरपीएफ जवानांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तात्काळ धावत जाऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला बाहेर वाचवून जीवनदान दिले, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
-
अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे समन्स
अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे समन्स, ऋतिक रोशन यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कंगना प्रकरणात समन्स, शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स, ऋतिक रोशन याने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिक याच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच करत आहे तपास
Published On - Feb 26,2021 8:31 PM