LIVE | मुंबईत उद्या कोरोना लसीकरण बंद, सोमवारीदेखील लसीकरण सुरु होण्याची शक्यता कमी

| Updated on: Jan 16, 2021 | 11:09 PM

देशातील तसेच राज्यातील सर्व घडामोडींचे LIVE अपडेट्स. (maharashtra breaking news)

LIVE | मुंबईत उद्या कोरोना लसीकरण बंद, सोमवारीदेखील लसीकरण सुरु होण्याची शक्यता कमी
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jan 2021 09:57 PM (IST)

    मुंबईत उद्या कोरोना लसीकरण बंद, सोमवारीदेखील लसीकरण सुरु होण्याची शक्यता कमी

    मुंबई : मुंबईत उद्या कोरोना लसीकरण बंद, को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे लसीकरण बंद, ऑफलाईन नोंदणीस केंद्राचा नकार, सोमवारीदेखील लसीकरण सुरु होण्याची शक्यता कमी, मुंबई वगळता इतर भागांमध्ये लसीकरण सुरुच राहणार

  • 16 Jan 2021 08:35 PM (IST)

    अमित शाहांनी बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली

    बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली, सीमाप्रश्नी समितीने भेटीची केली होती मागणी, अमित शहा यांची भेट होणार नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीने मागितली होती भेट, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा उद्या बेळगाव दौऱ्यावर, हुतात्मा दिनादिवशी मराठी भाषिकांची भेट नाकारली, महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून मागितली होती भेट


  • 16 Jan 2021 08:33 PM (IST)

    पुढील आदेश येईपर्यंत ठाण्यात शाळा बंदच राहणार

    ठाणे : पुढील आदेश येईपर्यंत, ठाणे शहरात शाळा राहणार बंद, प्रशासनाने पत्र काढून सर्व शाळांना दिले आदेश, मागील आदेशात 16 जानेवारीपर्यंत. शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, आज पुन्हा आदेश काढत पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले

  • 16 Jan 2021 08:07 PM (IST)

    धनंजय मुंडे प्रकरणी तक्रार करणाऱ्या तरुणीवर गंभीर आरोप, गृह विभाग योग्य ती कारवाई करेल : एकनाथ शिंदे

    मुंबई : “धनंजय मुंडे प्रकरणात गृह विभाग योग्य ती कारवाई करेल, चौकशी सुरू आहे. ज्यांनी तक्रार केलीय त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत”, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी उस्मानाबादचा उल्लेख सीएमओच्या ट्विटर अकाउंटवर धाराशिव केल्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. धाराशिव हे उस्मानाबादचे नाव पूर्वीपासूनचे आहे. तेच नाव राहावं, अशी जनतेची मागणी आहे. सरकार लोकांच्या मागणीचा भावनेचा विचार करते. धाराशिव नाव आम्ही पूर्वीपासून घेतो आणि घेत राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचंबरोबर “महाविकास आघाडीचे काम विकासाच्या मुद्यावर चांगले सुरू आहे. आर्थिक मंदी असताना कर्जमाफीसारखे चांगले निर्णय घेतले”, असंदेखील शिंदे म्हणाले.

  • 16 Jan 2021 08:01 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 2910 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर दिवसभरात 3039 रुग्णांची कोरोनावर मात

    मुंबई : राज्यात आज दिवसभरात 2910 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 3039 रुग्णांची कोरोनावर मात, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 127 वर, यापैकी राज्यात सध्या 51 हजार 965 रुग्ण सक्रीय, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.79 टक्क्यांवर

  • 16 Jan 2021 05:56 PM (IST)

    दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात, वर्षा गायकवाडांचं मोठं विधान

    कोल्हापूर : “मागच्या काळात 9 ते 12 वीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी sop तयार केली होती. सुरक्षित वातावरणात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचप्रकारे काळजी घेऊन दुसऱ्या टप्प्यात शाळा सुरू होणार. 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरू होतील. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मधल्या किंवा शेवटच्या काळात घेण्याचा विचार आहे. आगामी काळात याबाबत ठोस निर्णय होईल”, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

    “वाड्या-वस्त्यांवर शाळा पोहचल्या, आता शाळा गुणवत्ता वढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रेझेंटेशन व्हिजन 2025 माध्यमातून मुझ्यामंत्र्यांना दिलंय. मागच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं. भविष्यात त्यांना संकटाला समोर जावं लागू नये, याचा विचार करून शालेय शिक्षण विभाग निर्णय घेईल”, असं त्यांनी सांगितलं.

  • 16 Jan 2021 05:40 PM (IST)

    औरंगाबादेत सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या कार्येकर्ता मेळाव्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा, खासदार सुप्रिया सुळेंसोबत सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, कोरोनाबाबत घालून दिलेले सर्व नियम कार्यकर्त्यांनकडून धाब्यावर, अनेक कार्यकर्ते विना मास्क मेळाव्यात सहभागी, विविध निवेदन देण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

  • 16 Jan 2021 05:34 PM (IST)

    तीन कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, राजू शेट्टींचा इशारा

    “देशात आम्ही दशकांपासून मागणी करत आहोत की हमी भावला कायद्याचं स्वरूप द्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी काळे कायदे आणून आम्हाला कार्पोरेटच्या दावणीला बांधत आहेत. जोपर्यंत तीन कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

  • 16 Jan 2021 05:34 PM (IST)

    धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचा भ्रमनिरास : चंद्रकांत पाटील

    “धनंजय मुंडे यांचा कबुलीजबाब गंभीर आहे. याच कबुलीजबाबावरुन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: आरोप गंभीर असून आरोपांची दखल घेतली जाईल, असं म्हणाले होते. शरद पवार अशा प्रकारच्या प्रकरणात कडक धोरण स्वीकारतात. त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कुणालाच पाठिशी घातलं नाही. मात्र, काल त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

    चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे:

    • नैतिकतेची चाड पवार साहेबांकडून अपेक्षित आहे
    • भारतीय राजकारणात अशा घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवाय
    • राजीनामा दिला नाही म्हणून भाजप महिला मोर्चा सोमवार पासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार
    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देणार
    • सोमवार पासून रस्त्यावर उतरून करणार मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
    • देवेंद्र फडणवीस आणि माझं म्हणणं समान आहे
    • संवेदनशीलतेन मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, किंवा त्यांच्या पक्ष प्रमुखांनी राजीनामा घ्यायला हवाय
  • 16 Jan 2021 05:34 PM (IST)

    पालघर साधू हत्याकांड प्रकरण : 89 लोकांना 15 हजारच्या जात मुचलक्यावर जामीन

    पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात 89 लोकांना 15 हजारच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. ठाणे कोर्टाने जामीनचे आदेश दिले.  काही दिवसांपूर्वी ठाणे कोर्टाने याच प्रकरणातील 47 जणांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात 194 जणांना जामीन मिळाला आहे. साधूंच्या हत्येप्रकरणी एकूण 228 आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. पालघर साधू हत्या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने आपल्या तपासणीत केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 228 जणांना अटक करण्यात आली होती. तर हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी केली गेली.

  • 16 Jan 2021 05:33 PM (IST)

    धक्कादायक! पालघरमध्ये धोकादायक इमारतीत कोरोना लसीकरण मोहिम

    पालघर : सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीचं फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडीटही केलं नसल्याचं उघड झालं आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लस घेणाऱ्या 100 लाभार्त्यांचा जीव धोक्यात

  • 16 Jan 2021 05:33 PM (IST)

    नांदेड : माहुर तालुक्यातील तीन कोंबड्या आणि दोन कावळ्यांचा रिपोर्ट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह

    नांदेड : माहुर तालुक्यातील पापलवाडी येथील तीन कोंबड्या आणि दोन कावळ्यांचा रिपोर्ट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह, प्रशासन गावातील इतर काही कोंबड्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणार

  • 16 Jan 2021 05:30 PM (IST)

    सीरमचे सीईओ आदर पुनवालांनी कोरोना लस घेतली

    पुणे : सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी स्वत: लस टोचली, लसीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.

  • 16 Jan 2021 02:30 PM (IST)

    ‘महिलेविरोधात अनेक तक्रारी, कुणावर अन्याय होता कामा नये’, छगन भुजबळ यांच्याकडून मुंडेंची पाठराखण

    राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. “धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत. फक्त कुणावर अन्याय होता काम नये. त्या महिलेविरुद्ध 4 ते5 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. यावरुन जनतेने समजून घेतलं आहे,” असं अन्न आणि नागरी पुरवढामंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

  • 16 Jan 2021 01:59 PM (IST)

    महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराचा मोदींविरोधात एल्गार, वाराणसीतून संधी देण्याची मागणी

    काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधोत दंड थोपटले आहेत. ते राज्यातील काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार असून आगामी लोकसभा निवडणूक मोदींविरोधात लढायला तयार असल्याचे त्यांनी म्हटलंय. “पक्षाने पक्त आदेश द्यावा मी वाराणसी मतदारसंघातून लढायला तयार आहे. मागच्या निवडणुकीत तयारी करण्यासाठी फक्त 15 दिवस मिळाले. आता तीन वर्षे बाकी आहेत. मी वाराणसीमधून निवडणूक लढण्यास तयार आहे,” असे बाळू धानोरकर म्हणाले.

  • 16 Jan 2021 01:15 PM (IST)

    टीआरपी घोटाळ्यातील बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

    बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते ऑक्सीजन सपोर्टवर असून त्यांच्याव आयसीयू कक्षात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयाद दाखल करण्यात आलं आहे.पार्थो दास यांना टीआरपी घोटाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

  • 16 Jan 2021 12:47 PM (IST)

    अकोल्यात ट्रक-कारचा अपघात, चार जणांचा मृत्यू

    अकोला : पातूर-अकोला रोडवर कापशी चिखलगावजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहेत.

  • 16 Jan 2021 12:42 PM (IST)

    नागपुरात काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी

    नागपूर : केंद्रातील कृषी कायदे मागे घ्याण्याची मागमी घेऊन नागपुरातील राजभवनाला काँग्रेस कार्यकर्ते घेराव घालणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे. राजभवनच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ काँग्रेसचा मोर्चा धडकणार आहे. सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात मुक्कामी आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फे नागपुरात आंदोलन केले जात आहे.

  • 16 Jan 2021 12:36 PM (IST)

    ‘मनिष धुरी दारू पिऊन मला कॉल करायचे’, रेणू शर्मा यांचा धक्कादायक खुलासा

    मुंबई : समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर रेणू शर्मा यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करणारे मनसे नेते यांच्याबाबत रेणू शर्मा यांनी मोठा खुलासा केला आहे. “मी मनिष धुरी यांना माझ्या अल्बमच्या कामासंदर्भात भेटली होती. त्यानंतर ते मला दारु पिऊन कॉल करायचे. ब्लॅकमेल हा शब्द घेवून माझ्यावर आरोप केले जात आहेते. हे सर्व आरोप चुकीचे आहेत,” असं रेणू शर्मा यांनी म्हटलंय. तसेच तक्रार केल्यानंतर धमकीचे अनेक फोन येत असून यंत्रणेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • 16 Jan 2021 12:21 PM (IST)

    धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा पोलीस ठाण्यात दाखल

    सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. त्या यथे एसीपी ज्योत्स्ना रासम यांच्यासमोर आपला जबाब नोंदवत आहेत. दरम्यान रेणू शर्मा यांचा यापूर्वीसुद्धा जाबाब नोंदवला गेला होता. मात्र, जबाब अपूर्ण राहिल्याने आज शर्मा यांना पुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे.

  • 16 Jan 2021 12:12 PM (IST)

    गेले काही महिने लसीबद्दल ऐकत होतो. लस आपल्यासमोर आली : उद्धव ठाकरे

    गेले काही महिने लसीबद्दल ऐकत होतो. लस आपल्यासमोर आली आहे. पंतप्रधानांनी राज्याला दिल्या जाणाऱ्या लसीचा कोटा जाहीर केला आहे. कोरोना योद्धे यांना पहिल्या टप्प्यातील लस दिली जाईल. त्यानंतर कोरोना लस इतरांना लस देण्याबाबत विचार केला जाईल. कोरोना लसीकरणात राजकारण करायचं नाही. सर्वजण देशाचे नागरिक असल्यानं राजकारण येऊ नये.

  • 16 Jan 2021 12:04 PM (IST)

    राज्यस्तरीय कोरोना लसीकरणाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

    राज्यस्तरीय कोरोना लसीकरणाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

  • 16 Jan 2021 12:00 PM (IST)

    कोरोनाचा शेवट करायचाय,सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनाचं पालन करा : मुख्यमंत्री

    कोरोनाचा शेवट करायचा आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही, तो पर्यंत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनाचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

  • 16 Jan 2021 11:56 AM (IST)

    आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौऱ्यावर, निमंत्रण असूनही भाजपचा बहिष्कार

    औरंगाबाद : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. निमंत्रण असूनही भाजप पदाधिकाऱ्यांनी हा बहिष्कार घातला आहे. भाजपचे नमस्ते संभाजीनगरचे बोर्ड हटवल्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी हा बहिष्कार टाकला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • 16 Jan 2021 10:47 AM (IST)

    केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम, कल्याण-डोंबिवलीमध्ये 19 जानेवारीला पाणीपुवठा बंद

    येत्या मंगळवारी 19 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीच्या चारही जलशुद्धीकरण केंद्रात होणार देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • 16 Jan 2021 10:44 AM (IST)

    मालेगाव तालुक्यात वाघिणीचा वावर, नागरिकांत भीती

    वाशिम : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील काशिनाथ बाबा संस्थान परिसरात वाघीण आपल्या तीन पिल्लांसह दिसून आली आहे. गावातील काही नागरिकांनी या वाघिणीला पिल्लासह फिरताना बघितलं आहे. त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. दरम्यान वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभाने आपली टीम येथे पाठवली असून वाघीण आणि तिच्या पिलांचा शोध सुरु आहे.

  • 16 Jan 2021 10:37 AM (IST)

    औरंगाबादेत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या, हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

    औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात ही हत्या झालेली असून हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल (15 जानेवारी) रोजी तिघांनी ही हत्या केली. दरम्यान हल्लेखोरांना अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

  • 16 Jan 2021 10:33 AM (IST)

    मुंबईसह इतरही मनपा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर? बाळासाहेब थोरातांचे संकेत

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कंबर कसली आहे. पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आगामी महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत निर्णय कसा घ्यायचा ते आम्ही आगामी काळात ठरवणार आहोत, असे थोरात म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन सरकारवर टीका केली.

  • 16 Jan 2021 09:42 AM (IST)

    अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं, गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल

    रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेतर्फे अर्णव गोस्वामी आणि बार्क चे सीईओ पार्थो दासगुप्ता यांची व्हॅट्सअ‌ॅप चॅटींग समोर आल्याचं म्हटलंय. गुन्हे शाखेना आपल्या पुरवणी आरोपपत्रात हा खुलासा केला आहे. यावेळी गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यामध्ये संवाद झाला असल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलंय. हे आपोपपत्र 3600 पानांचं आहे.

  • 16 Jan 2021 08:58 AM (IST)

    मालेगाव ‌येथील विवाहित महिलेची मध्यप्रदेशात विक्री, अहमदनगरात खळबळ

    अहमदनगर : मालेगाव ‌येथील विवाहित महिलेची मध्यप्रदेशात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीरामपुर येथील तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी 2 महिलांवर गुन्हा दाखल झाला असून विकलेल्या महिलेला केटरिंगच्या नावाखाली इंदौर नेले होते. नंतर या महिलेला 1 लाख 20 हजारांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला होता 9 डिंसेबरपासून महिला इंदौर येथे अडकल्याची फिर्याद पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.

  • 16 Jan 2021 08:26 AM (IST)

    नाशिकमध्ये खासगी शिकवण्या सुरु, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

    नाशिक : इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या खाजगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी शिकवणी चालक आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सुरक्षा विषयक सर्व नियमांचे पालन करणे शिकवणी चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मागील 10 महिन्यांनापासून दीड हजार खासगी शिकवण्या बंद होत्या. त्यानंतर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • 16 Jan 2021 08:21 AM (IST)

    आदित्य यांच्या दौऱ्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच नाही, कार्यकर्ते नाराज

    औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरे वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. मात्र या सर्व कार्यक्रमांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रणच दिलेलं नाही. उद्घाटनाच्या सर्व कार्यक्रमापासून काँग्रेसला ठेवलं दूर ठेवण्यात आलं आहे. याच कारणामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी नाराज असल्यामुळे येथे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • 16 Jan 2021 07:45 AM (IST)

    भंडारा रुग्णालय दुर्घटना, मृत बालकांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून प्रत्येकी 1 लाखांची मदत

    शिवसेनेकडून भंडारा येथील मृत बालकांच्या पालाकांना मदत मद करण्यात येणार आहे. मृत बालकांच्या कुटुबांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा शिवसेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं ही मदत करण्यात येणार आहे. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदेकडून ही मदत केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रवी वाढई, समाजसेवक किराण पांडव यांच्या हस्ते वाटप.

  • 16 Jan 2021 07:12 AM (IST)

    औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

    औरंगाबाद : शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनरवॉर सुरु झालं आहे. शिवसेनेच्या सुपर संभाजीनगर या कॅम्पेनविरोधात भाजपने नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (16 जानेवारी) औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

  • 16 Jan 2021 06:35 AM (IST)

    LIVE | महापालिकेच्या निर्णयामुळे मुंबईतील शाळांमध्ये नाराजी, 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची मागणी

    मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मुंबई शाळांच्या प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.कमीतकमी इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करायला हवे होते, असा सूर शाळांना आवळला आहे.. कारण मुंबईमधील मुलांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सतत होत आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे बोर्ड परीक्षेचा अभ्यास तसेच पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना फक्त तीन महिने मिळणार आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार, असा सवाल मुंबईतील शाळांकडून विचारला जात आहे.