Maharashtra News LIVE Update | कल्याण-आसनगावदरम्यान गॅसचा टँकर रेल्वे रुळावर, दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत

| Updated on: Jul 06, 2021 | 12:22 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi

Maharashtra News LIVE Update | कल्याण-आसनगावदरम्यान गॅसचा टँकर रेल्वे रुळावर, दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 05 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jul 2021 11:08 PM (IST)

    कल्याण-आसनगावदरम्यान गॅसचा टँकर रेल्वे रुळावर, दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत

    – गॅसचा टँकर रेल्वे रुळावर घुसला – कल्याण, आसनगाव आणि आठगाव दरम्यान घडला प्रकार – रेल्वे रुळास समांतर असलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या टँकरचा टायर फुटल्याने घडली घटना. – दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत – कसारा कल्याण दरम्यान वाहतूक विस्कळीत

  • 05 Jul 2021 10:08 PM (IST)

    आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ बारामतीत 29 जुलैला एल्गार महामोर्चा

    – ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ काढणार एल्गार महामोर्चा. – बारामतीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय. – राज्य व केंद्र शासनाने ओबीसी आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याच्या मागणीसाठी होणार महामोर्चा. – मोर्चासाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, एकनाथ खडसे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, संजय राऊत, गोपीचंद पडळकर यांनाही दिलं जाणार निमंत्रण.

  • 05 Jul 2021 08:01 PM (IST)

    राजेश सापते आत्महत्याप्रकरणी गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, चित्रपट महामंडळाची मागणी

    ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजेश सापते यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी. मेघराज राजेभोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांनी शासनाकडे केली आहे.

  • 05 Jul 2021 06:49 PM (IST)

    भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन

    निलंबित करण्यात आलेल्या 12 भाजपा आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेले निवेदन

  • 05 Jul 2021 06:10 PM (IST)

    नागपूर ZP आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार घोषित

    – नागपूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार घोषित केले. – जिल्हापरिषदेच्या 16 जागा आणि पंचायत समितीच्या 31 जागांवरील उमेदवार घोषित – भाजप पोटनिवडणूक स्वबळावर लढणार

  • 05 Jul 2021 05:20 PM (IST)

    मनमाडमध्ये पावसाची हजेरी

    गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मनमाडमध्ये लावली हजेरी सटाणा, मालेगाव तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम सरी

  • 05 Jul 2021 12:06 PM (IST)

    कोरोनाच्या संकटात लोकांना बाहेर पडायला, रस्त्यावर उतरायला लावू नका – छत्रपती संभाजी राजे

    छत्रपती संभाजी राजे –

    – केंद्र सरकारने वटहुकूम काढावा लागेल, घटनादुरुस्ती करावी लागेल, की राज्याचे अधिकार अबांधीत राहील

    – मी चुकत असेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं

    – कोरोनाच्या संकटात लोकांना बाहेर पडायला, रस्त्यावर उतरायला लावू नका

    – राज्य सरकारच्या हातात आहे, ते हे सरकार का करत नाही?

    – सारथी संस्थेला १ हजार कोटींची मागणी

    – अन्नासाहेब महामंडळांची मर्यादा वाढवी

    – २१८५ मुलांच्या नियुक्त्या द्या,

    – विशेष बाब म्हणून म्हणून नियुक्त्या द्या

    – मराठा- कुनबी समाजाचं वसतीगृह करा

    – ओबीसींना शिक्षणात देणाऱ्या सवलती मराठा समाजाला द्या

    – मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या

    – ४२ मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्यासाठी काय केलं. यांना एसटी महामंडळात नोकरी देतो म्हणता. पण एसटी महामंडळ बुडीत गाडी आहे

  • 05 Jul 2021 12:05 PM (IST)

    आम्ही सर्वांनी हाक दिली तर लाखो लोक जमतील – छत्रपती संभाजी राजे

    छत्रपती संभाजी राजे –

    – केंद्र सरकारची भुमिका मी सांगू शकणार नाही

    – सर्व पक्षातील खासदारांनी मिळून पंतप्रधानांची भेट घेऊया. आणि हा प्रश्न सोडवूया.

    – कोरोनामुळे मी काल खामगावातील कार्यकर्त्यांच्या सभेला गेलो नाही

    – आम्ही सर्वांनी हाक दिली तर लाखो लोक जमतील

  • 05 Jul 2021 11:59 AM (IST)

    औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

    रस्त्यावर विद्यार्थ्यांनी मांडला ठिया

    राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

    400 ते 500 विद्यार्थी उतरले रस्त्यावर

    स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी झाले आक्रमक

    पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

  • 05 Jul 2021 11:59 AM (IST)

    पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

    एमपीएससीचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे

    पुण्यात अभाविपंचं आंदोलन सुरु आहे

    पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

    औरंगाबादेतही आंदोलन

    स्वप्निल लोणकरला न्याय देण्याची मागणी

  • 05 Jul 2021 09:46 AM (IST)

    कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणी आणखी एक आरोपी अटक

    पिंपरी-चिंचवड –

    – कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणी आणखी एक आरोपी अटक

    -मिस्त्री नरेश विश्वकर्मा ला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    -काल व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे याला अटक झाली होती तर आज नरेश विश्वकर्मा अटकेत

    -याप्रकरणी आतापर्यंत दोन जण अटकेत

    -उर्वरित तिघांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुंबई पोलिसांची ही मदत घेत आहे

    मुंबई पोलिसांची तीन पथकासह पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं तिघांच्या शोधात

  • 05 Jul 2021 09:02 AM (IST)

    नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

    नवी मुंबई –

    पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

    मनसेच्या विधान भवन धडक आंदोलन पोलिसांनी थांबवले

    मात्र तरीही मनसेच्या नेत्यांची भाषणे होती सुरूच

    पोलिसांनी आंदोलकांना वाशी पो स्टेशन मध्ये नेले

    आंदोलनात 30 ते 40 कार्यकर्ते सहभागी

    स्वप्नील लोनकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईत मनसे आक्रमक

    क्रेनच्या साहाय्याने छ शिवाजी चौकात हार घालण्यात आला

    त्यानंतर स्वप्नील लोणकर ला श्रद्धांजली वाहण्यात आली

    वाशीच्या शिवाजी चौकातून विधान भवनावर पायी चालत निघाले

    मनसेची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

    स्वप्निल लोणकर ला न्याय द्या तसेच एमपीएससी चा कारभार सुधारा मनसेची मागणी

    काल अमित ठाकरे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर नवी मुंबईत मनसेही आक्रमक

  • 05 Jul 2021 09:01 AM (IST)

    मुंबई पोलिसांनी मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदारास केली अटक

    दहिसर गोळीबार प्रकरण

    मुंबई पोलिसांनी मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदारास केली अटक

    दोघांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली

    यापूर्वी 1 जुलै रोजी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती

    या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    लूट करण्याच्या उद्देशाने 30 जून रोजी दागिन्यांच्या दुकानात गोळीबार करण्यात आला होता .. या घटनेत आरोपींनी दुकान मालकाला गोळ्या घालून ठार केले आणि सोन्याची लूटमार करुन पळ काढला.

  • 05 Jul 2021 09:01 AM (IST)

    दहावीच्या मूल्यमापन प्रकियेत शाळा स्तरावर त्रुटी

    पुणे :

    दहावीच्या मूल्यमापन प्रकियेत शाळा स्तरावर त्रुटी

    शाळांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थीनिहाय गुणांची नोंदणी करताना शाळास्तरावर काही त्रुटी

    या त्रुटींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळांना, गुण भरताना अडचणी आलेल्या शाळांनी ५ ते ९ जुलैदरम्यान विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना

    राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली ही माहिती

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर होणार

  • 05 Jul 2021 08:57 AM (IST)

    झाकीर हुसैन दुर्घटनेचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता

    नाशिक –

    झाकीर हुसैन दुर्घटनेचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता

    झाकीर हुसैन दुर्घटनेबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित होणार

    विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित करणार तारांकित प्रश्न

    ऑक्सिजन गळतीमुळे गेले होते अनेकांचे जीव

  • 05 Jul 2021 08:56 AM (IST)

    ऑनलाईन शाळांची वेळ कमी करा, पालक संघटनांची प्रशासनाकडे मागणी

    नाशिक –

    ऑनलाईन शाळांची वेळ कमी करा

    पालक संघटनांची प्रशासनाकडे मागणी

    स्क्रीन टाईम वाढत असल्याने मुलांचं नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार

    ऑनलाईन मुळे खर्च देखील वाढत असल्याने पालकांचं बजेट कोसळलं

    प्रशासनाकडून पालकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

    शाळांशी बोलुन निर्णय घेण्याचं आश्वासन

  • 05 Jul 2021 08:55 AM (IST)

    कुरकुरे खाण्यास देण्याचा बहाणा करुन मजुराने केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला

    पुणे

    कुरकुरे खाण्यास देण्याचा बहाणा करून मजुराने केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला

    लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ आरोपीला ठोकल्या बेड्या

    मन्नूकुमार मनोज सिंग (वय 30, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

    याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली फिर्याद

  • 05 Jul 2021 08:54 AM (IST)

    स्वप्नील लोनकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईत मनसे आक्रमक

    नवी मुंबई –

    स्वप्नील लोनकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईत मनसे आक्रमक

    क्रेनच्या साहाय्याने छ शिवाजी चौकात हार घालण्यात आला

    त्यानंतर स्वप्नील लोणकर ला श्रद्धांजली वाहण्यात आली

    वाशीच्या शिवाजी चौकातून विधान भवनावर पायी चालत निघाले

    पोलिस घटनास्थळी हजर

    मनसेची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

    स्वप्निल लोणकर ला न्याय द्या तसेच एमपीएससी चा कारभार सुधारा मनसेची मागणी

    काल अमित ठाकरे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर नवी मुंबईत मनसेही आक्रमक

  • 05 Jul 2021 07:56 AM (IST)

    कौटुंबिक न्यायालयात ‘चला बोलू या’ या वादपूर्व समुपदेशन केंद्रामार्फत तडजोड करून गेल्या दीड वर्षात 74 दावे काढले निकाली

    पुणे

    कौटुंबिक न्यायालयात ‘चला बोलू या’ या वादपूर्व समुपदेशन केंद्रामार्फत तडजोड करून गेल्या दीड वर्षात ७४ दावे काढले निकाली

    पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या दाव्यांसाठी राबला जातोय ‘चला बोलू या’ उपक्रम

    या केंद्रात २०१८ ते मे २०२१ अखेरपर्यंत ७६७ दावे दाखल झाले असून, १४४ दावे निघाले निकाली

    केंद्रामध्ये मुख्य मध्यस्थी केंद्र समन्वयक, उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत ९ समुपदेशक कार्यरत

    तर समुपदेशन करताना कायदेशीर बाबींमध्ये अडचणी आल्या तर त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ७ वकिलांचे पॅनेल

  • 05 Jul 2021 07:56 AM (IST)

    इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण, इगतपुरीतील बंगले सील केल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ

    नाशिक – इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण

    इगतपुरीतील बंगले सील केल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ

    पोलिसांकडून 3 बांगल्यांवर सील करून कारवाई

    रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी आज पुन्हा न्यायालयात हजर होणार

    मॉडेल हिना पांचाल देखील न्यायालयात होणार हजर

  • 05 Jul 2021 07:55 AM (IST)

    अल्पवयीन प्रेयसिला मारहाण करुन व्हीडीओ केला व्हायरल

    – अल्पवयीन प्रेयसिला मारहाण करुन व्हीडीओ केला व्हायरल

    – आरोपी विरोधात अपहरण आणि बलात्काराचीही तक्रार

    – नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं दोन आरोपींना केली अटक

    – समिर खान सलीम खान, मोहम्मद शाकिन मोहम्मद शिद्दीकी अटकेत

    – आरोपी स्वताला टीकटॅाक स्टार समजत करतात चमकोगीरी

  • 05 Jul 2021 07:49 AM (IST)

    विद्यार्थ्यांना दप्तर नाही, मोबाईल द्या, नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष भाजपची मागणी

    – विद्यार्थ्यांना दप्तर नाही, मोबाईल द्या

    – नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष भाजपची मागणी

    – कोरोनामुळे शाळा बंद असून, ॲानलाईन वर्ग सुरु आहे

    – ॲानलाईन क्लासेससाठी विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याची मागणी

    – नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये ७० हजारच्या वर विद्यार्थी

    – गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी मोबाईल देण्याची मागणी

  • 05 Jul 2021 07:48 AM (IST)

    हातकणंगले तालुक्यातील माणगावमध्ये सुरु होणार टीव्हीवरील शाळा

    कोल्हापूर

    हातकणंगले तालुक्यातील माणगाव मध्ये सुरू होणार टीव्ही वरील शाळा

    विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

    उद्यापासून होणार उपक्रमाला सुरुवात, सरपंच राजू मगदूम यांची माहिती

    पाहिले ते दहावीचे वर्ग होणार सुरू

    गावातील केबल नेटवर्कच्या माध्यमातून होणार प्रत्येक वर्गाचा आणि विषयाचा तास

    सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्लॉटिंग द्वारे वर्ग होणार सुरू

  • 05 Jul 2021 07:23 AM (IST)

    नागपुरात मालकी पट्ट्याचे १४ हजार प्रस्ताव प्रलंबित

    – नागपुरात मालकी पट्ट्याचे १४ हजार प्रस्ताव प्रलंबित

    – सरकारी, नझूल जमिनीवरील हजारो झोपडपट्टीधारक रजिस्ट्रीच्या प्रतिक्षेत

    – जिल्हाधिकारी नझूल कार्यालयाचे काम संथ, हजारो लोकांना फटका

    – नागपूरातील ११२ झोपडपट्ट्या सरकारी मालकीच्या जमिनीवर

    – मालकी पट्यांसाठी दोन वर्षांपूर्वीचं झाला सर्वे

  • 05 Jul 2021 07:11 AM (IST)

    छत्रपती संभाजी राजे यांचा आज नागपूर दौरा

    – छत्रपती संभाजी राजे यांचा आज नागपूर दौरा

    – ११:३० ला जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन

    – महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार जनसंवाद

    – संभाजीराजेंच्या दौऱ्यामुळे सकल मराठा समाजात नवचैतन्य

Published On - Jul 05,2021 6:33 AM

Follow us
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.