Maharashtra News LIVE Update | सलग 9 तासांच्या ईडी चौकशीनंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया….

| Updated on: Jul 08, 2021 | 11:12 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | सलग 9 तासांच्या ईडी चौकशीनंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया....
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 08 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jul 2021 08:33 PM (IST)

    नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले

    नागपूर :

    नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले,

    कळमेश्वर-गोवरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील घटना,

    नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना काढली दुचाकी,

    पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दुचाकीस्वार वाहत गेले असल्याची माहिती

    अण्णाजी निंबाळकर आणि गुड्डू शिंदे असं वाहून गेलेल्या व्यक्तीची नावे,

    शोध मोहिम सुरू

  • 08 Jul 2021 08:21 PM (IST)

    सलग 9 तासांच्या ईडी चौकशीनंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया….

    सलग 9 तासांच्या चौकशीनंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया :

    “चौकशीत सहकार्य केलं. अनेक स्टेटमेंट व्हेरीफाय केले. ईडीला हवे असलेले कागदपत्र दिले आहेत. अजून काही लागणारी कागदपत्रे 10 दिवसांत देणार आहोत. तसंच गरज भासेल तेव्हा उपस्थित राहणार असं खडसेंनी सांगितलं. पैशांच्या व्यवहाराबाबत चौकशी केली. भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी झाली. सविस्तर माहिती दिली आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

  • 08 Jul 2021 07:41 PM (IST)

    हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी 20 हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व अधोरेखीत झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

  • 08 Jul 2021 07:33 PM (IST)

    मनमाड : दडी मारून बसलेल्या पावसाने नांदगाव तालुक्यात अखेर लावली हजेरी

    मनमाड : दडी मारून बसलेल्या पावसाने नांदगाव तालुक्यात अखेर लावली हजेरी

    नांदगावच्या काही भागात झाला जोरदार पाऊस

    पाऊस आल्याने मान टाकत असलेल्या पिकांना मिळणार जीवनदान

    तर बळीराजालाही मिळाला काहीसा दिलासा

  • 08 Jul 2021 03:44 PM (IST)

    एकनाख खडसे आणि आम्ही सगळे भाजपला उत्तर देऊ : छगन भुजबळ

    छगन भुजबळ ऑन खडसे समन्स –

    – हा प्रेशर टॅकटीजचा एक भाग आहे – भाजपमधून बाहेर पडलं तर काय त्रास होतो हे दाखवायचंय – इतर पक्षात असलेल्यांना त्रास देऊन तो आपल्या पक्षात आला की त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात – राजकारणात सध्या असे प्रयोग सुरु आहेत – खडसे आणि आम्ही सगळे जण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ

    छगन भुजबळ ऑन खराब धान्य तक्रार

    – ज्या दुकानातून अशी तक्रार येते ताबडतोड आम्ही त्यावर कारवाई करतो – सगळेच करतात हे जनरल म्हणणे योग्य नाही – आम्ही हे धान्य भारत सरकारच्या गोडाऊनमधुन आणतो

    छगन भुजबळ ऑन भारती पवार

    – कोरोना काळात आरोग्य सारखं महत्वाच खातं त्यांना मिळालंय याचा फायदा नक्कीच होईल

  • 08 Jul 2021 03:42 PM (IST)

    केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या निर्णयाचं स्वागत : बाळासाहेब पाटील

    बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    पीक कर्ज वाटप पूर्ण करावे, उद्दिष्ट पूर्ण करावे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जिल्हा बँक उद्दिष्ट पूर्ण करतात मात्र खाजगी बँक करत नाही, त्यामुळं खाजगी बँकांनी किती कर्ज वाटप केले याचा 2 आठवड्यात आढावा घ्यायला सांगितले आहे. त्यानंतर निश्चित त्यांना कडक सूचना करू. कारवाई करण्याचाही विचार आहे. सरकारी खाती त्या बँकेतून कमी करण्याचाही विचार आहे.

    केंद्र म्हणते सहकारवर आता लक्ष केंद्रित करायचंय, त्यासाठी मंत्रालय निर्माण केलं स्वागतार्ह गोष्ट आहे. राज्याचा देशात 60 टक्के सहकाराचा वाटा आहे.

  • 08 Jul 2021 03:39 PM (IST)

    गावा-गावात शिव संपर्क मोहिम राबवा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश

    शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचण्यासाठी शिव संपर्क मोहीम सुरू करा असा कार्यक्रम दिला आहे

    शिव संपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलै

    माझा गाव करोनामुक्त गाव, आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखान आपल्या गावात राबवावी

    महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनामुक्तीचा कार्यक्रम राबवा

    सत्तेच्या काळात पक्ष बळकट करण्याचा कार्यक्रम राबवा

  • 08 Jul 2021 01:11 PM (IST)

    नागपुरात पावसाचा जोर वाढला

    नागपुरात पावसाचा जोर वाढला

    सकाळ पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे

    मात्र आता पावसाचा चांगलाच जोर वाढला

    अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज सकाळ पासून सुरू आहे पाऊस

    आज मध्यम स्वरूपाचा तर शुक्रवार आणि शनिवार ला मुसळधार पावसाचा नागपूर हवामान विभागाने वर्तविला होता अंदाज

    आज सकाळ पासून मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस शेती साठी उपयुक्त ठरणार

  • 08 Jul 2021 12:21 PM (IST)

    महागाईच्या विरोधात थोड्याच वेळात नागपूरात काँग्रेसची सायकल यात्रा

    – महागाईच्या विरोधात थोड्याच वेळात नागपूरात काँग्रेसची सायकल यात्रा

    – पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाच्या महागाई विरोधात आंदोलन

    – नागपूरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सायकल यात्रेत सहभागी

    – नागपूरातील संविधान चौकातून निघणार सायकल यात्रा

    – काँग्रेसचे मंत्री आणि आमदार सहभागी

  • 08 Jul 2021 12:21 PM (IST)

    कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कालिदास कला मंदिरा बाहेर लावलेले बॅनर काढले

    नाशिक –

    कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कालिदास कला मंदिरा बाहेर लावलेले बॅनर काढले

    बॅनर हटवल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

    अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये वाद

    देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते फलक

  • 08 Jul 2021 12:13 PM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, संपूर्ण प्रकरणारतील मुख्य सुत्रधार शोधा, हायकोर्टाचे आदेश

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

    संपूर्ण प्रकरणारतील मुख्य सुत्रधार शोधा

    हायकोर्टाचे सीबीआयला आदेश

    CBI चा तपास केवळ अनिल देशमुख यांच्यापर्यंतच मर्यादीत ठेवू नका

    या संपुर्ण प्रकरणात जे जे कोणी सहभागी आहेत त्यांचा तपास करा

    वाझेला पुन्हा सेवेत घेणारे कोण ? या समिती सदस्यांचीही चौकशी करा

    FIR मधील ‘अज्ञात’ कोण आहेत त्यांना शोधा

  • 08 Jul 2021 12:11 PM (IST)

    पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन

    नाशिक –

    – पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसच निषेध आंदोलन

    – सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा केला निषेध

    – दिवसागणिक वाढणाऱ्या दरवाढी मुळे सर्व सामान्य माणसाच कंबरड मोडल असताना केंद्र सरकारला काहीच गंभीर्य नाही

    – मात्र आता दिलासा मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा

  • 08 Jul 2021 11:39 AM (IST)

    राणेंच्या राजकारणाची सुरूवातचं ठाकरे कुटुंबियांमुळे, राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया

    सिंधुदुर्ग:-

    राणेंच्या राजकारणाची सुरूवातचं ठाकरे कुटुंबियांमुळे

    राणेंचे कट्टर विरोधक दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया

    राणेंनी शिवसेना व ठाकरेंच्या विरोधात बोलून जे मिळवायचं होत ते आता मिळवलं.

    आता संधी मिळाली आहे देशाचं काम करण्याची तर देशासाठीचं काम करून आपण कार्यक्षम असल्याचं सिद्ध करून दाखवा.

    राणेंच्या मंञीपदामुळे शिवसेनेला फार मोठा फरक काही पडणार नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहीलाय आणि तो कायम राहील

    राणेंचा ठाकरेंसोबत वाद आहे ते ठाकरें विरोधात बोलतात हीच त्यांची उपयुक्तता.

    राणेंच्या राजकारणाची सुरूवातचं ठाकरे कुटुंबियांमुळेच झाली असल्याचं म्हणत दिपक केसरकर यांनी नारायण राणेंना एक प्रकारे डीवचलं आहे.

  • 08 Jul 2021 11:38 AM (IST)

    राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगावमध्ये कडकडीत बंद

    बारामती :

    – राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगावमध्ये कडकडीत बंद

    – रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी जयदीप तावरे यांना दोन दिवसांपूर्वी झालीय अटक

    – नाहक खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

    – रविराज तावरे यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिलेल्या जबाबात घेतले होते जयदीप तावरे यांचं नाव

    – जयदीप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा उत्स्फुर्त बंद

  • 08 Jul 2021 11:37 AM (IST)

    आईचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

    कोल्हापूर :

    आईचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

    जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांचा महत्त्वपूर्ण निकाल

    28 ऑगस्ट 2017 ला सुनील कुचकोरवी याने आईची हत्या

    कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत झाली होती दुर्दैवी घटना

    दारूसाठी पैसे न दिल्याने केला आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून

    आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात आरोपी असताना केली होती अटक

    या खून खटल्याच्या सुनावणी कडे लागलं होतं सर्वांचे लक्ष

  • 08 Jul 2021 11:36 AM (IST)

    ED आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे – बच्चू कडू

    – ED आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे

    – ED च्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न

    – पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचं, आता भाजप ईडी ने सत्तांतर करत आहेत

    – भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का?

    – भाजपचा एकंही नेता भ्रष्टाचारी नाही का? एकाही भाजप नेत्यावर ईडी ची कारवाई का नाही?

    – राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सवाल

    – इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय

    – एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य

    – ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील

  • 08 Jul 2021 11:21 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

    चंद्रपूर :

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

    ब्रम्हपुरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी

    इतर भागात रिमझिम पावसाच्या बरसताहेत सरी

    पावसाच्या आगमनाने कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाला फायदा

    धान पिकाला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा

  • 08 Jul 2021 11:21 AM (IST)

    प्रकाश आंबेडकर तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर

    – प्रकाश आंबेडकर तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर

    – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वता दिली माहीती

    – त्यांच्या आदेशानुसार मा. रेखाताई ठाकूर यांची वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

    – पक्ष चालला पाहीजे यासाठी रेखाताईंकडे पक्षाचा संपुर्ण चार्ज

  • 08 Jul 2021 10:43 AM (IST)

    मोदी यांनी देशाला बरबाद करणार करणारी व्यवस्था आणली – नाना पटोले

    नाना पटोले –

    – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन दिलंय आणि संजय धोत्रें सारख्या चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवले

    – कोरोनाची स्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपयश आलंय, यात मोदींनींच राजीनामा द्यायला हवा होता. पण डॅा. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नव्हता

    – गॅस, पेट्रोल, डिझेल आणि इतर महागाईविरोधात आजपासून काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन. राज्यातही आंदोलनाची आजपासून सुरु

    – मोदी यांनी देशाला बरबाद करणार करणारी व्यवस्था आणली

    – राणे ला मंत्री केलं की कुणालाही केलं… सगळं मंत्रालय पीएमओ मधून चालतंय. नविन मंत्री झाले त्यांना लवकरंच ही बाब कळेल

  • 08 Jul 2021 10:34 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील पाच टोलनाक्याकडे 3.56 कोटींचा मुद्रांकशुल्क थकीत

    सोलापूर –

    जिल्ह्यातील पाच टोलनाक्याकडे 3.56 कोटींचा मुद्रांकशुल्क थकीत

    जिल्ह्यातील 17 टोल नाके चालकाकडे कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क थकीत

    यापैकी पाच टोलनाक्यांनी  करारपत्र केले सादर

    त्यानुसार त्यांना आता किती 3.56 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याबाबत नोटिसा

    उर्वरित 17 टोलनाक्याचे अद्याप करारपत्र अपूर्ण

    शासनाबरोबर करारपत्र करून त्यापुढचा मुद्रांक शुल्क विभागाला भरणे अपेक्षित

    मात्र जिल्ह्यातील एकाही ठेकेदारांनी मुद्रांक शुल्क भरलेला नाही

    रक्कम भरण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने  बजाविले नोटीस

  • 08 Jul 2021 09:26 AM (IST)

    गॅस काळाबाजार प्रकरणी नगरसेवक मनोज शेजवालसह तिघांचा शोध सुरू

    सोलापूर –

    गॅस काळाबाजार प्रकरणी नगरसेवक मनोज शेजवालसह तिघांचा शोध सुरू

    रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे वसाहतीत घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षा वा अन्य वाहनात गॅस भरून देण्याचे व्यवसाय सुरु असल्यामुळे पोलिसांनी केली होती कारवाई

    याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला केली आहे अटक

    या घटनेतील संशयित नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह अन्य तिघांचा शोध सुरू

    नगरसेवक शेजवाल  यांच्या संगनमताने पांढरे बंधू व्यवसाय करत असल्याची पोलिसांची माहिती

  • 08 Jul 2021 08:31 AM (IST)

    नाशिक शहर बस सेवेचा आज लोकार्पण सोहळा

    नाशिक – शहर बस सेवेचा आज लोकार्पण सोहळा..

    देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील,छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर

    कोरोना च्या पार्शवभूमीवर कालिदास क्लामंदिरात होणार लोकार्पण सोहळा

    भाजप कार्यक्रमाच्या निमित्ताने फोडणार प्रचाराचा नारळ

    तर अधिवेषणानंतर पहिल्यांदा आमने सामने येत असल्याने

    भुजबळ ,फडणवीस यांच्या भाषणाकडे राज्यच लक्ष

  • 08 Jul 2021 08:31 AM (IST)

    ॲानलाईन परिक्षेचा असाही फायदा, पदविधरांची संख्या वाढली

    – ॲानलाईन परिक्षेचा असाही फायदा, पदविधरांची संख्या वाढली

    – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तब्बल १२ हजार पदवीधर वाढले

    – यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार

    – अनेक विद्यार्थ्यांनी काही विषयात मिळाले य पैकीच्या पैकी गुण

    – पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा अनुभव नसल्याने अभ्यासक्रमाच्या ५० टक्के प्रश्न होते

    – ॲानलाईन परिक्षेत ५० टक्केच प्रश्न असल्याने निकालात वाढ झाली

  • 08 Jul 2021 08:30 AM (IST)

    नाशकात वाहतूक पोलिसांच्या टोइंग सेवेला पुन्हा सुरुवात

    नाशिक – वाहतूक पोलिसांच्या टोइंग सेवेला पुन्हा सुरुवात

    शहरात अनेकदा बंद पडून देखील टोइंगचा प्रयोग सुरूच

    पहिल्याच दिवशी टोइंग कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद

    पहिल्याच दिवशी 110 वाहनांना टोइंग

    वाहतूक बेटे, पार्किंग नसताना पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा नागरिकांचा रोष

  • 08 Jul 2021 08:30 AM (IST)

    मीरा रोड, भाईंदर, काशीमिरा आणि घोडबंदर परिसरातील सकाळपासून पाऊस

    मीरा-भाईंदर – मीरा रोड, भाईंदर, काशीमिरा आणि घोडबंदर परिसरातील सकाळपासून पाऊस सुरु, तसेच ढगाळ वातातवरण पाहायला मिळत आहे.

  • 08 Jul 2021 08:29 AM (IST)

    महागाईच्या विरोधात आज नागपुरात काँग्रेसची सायकल यात्रा

    – महागाईच्या विरोधात आज नागपूरात काँग्रेसची सायकल यात्रा

    – पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाच्या महागाई विरोधात आंदोलन

    – नागपूरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होणार सायकल यात्रेत सहभागी

    – नागपूरातील संविधान चौकातून ११ वाजता निघणार सायकल यात्रा

    – काँग्रेसचे मंत्री आणि आमदार होणार सहभागी

  • 08 Jul 2021 08:28 AM (IST)

    भयानक चक्रीवादळाने अमरावती जिल्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावाला झोडपले

    अमरावती : रात्रीच्या सुमारास भयानक चक्रीवादळाने अमरावती जिल्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावाला झोडपले यामध्ये गावातील ४१ घरावरील टीनपत्रे उडून घरातील उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे

  • 08 Jul 2021 08:27 AM (IST)

    8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विरारमध्ये पहाटे पासून रिमझिम

    विरार –

    8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विरारमध्ये पहाटे पासून रिमझिम पाऊस सुरू..

    रिमझिम पावसामुळे हावेत पसरला गारवा

    आभाळ पूर्ण भरलेले असून आज दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता

    विरार पूर्व विवा जहांगीड परिसरातील 8 वाजताची दृश्य

  • 08 Jul 2021 08:26 AM (IST)

    रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस

    सांगली –

    मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस

    आधार हॉस्पिटलचा डॉ.योगेश वाठारकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

    दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक

    या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

  • 08 Jul 2021 07:41 AM (IST)

    अजनी वन भागातील वृक्षांच्या कत्तलीच्या मुद्ध्यासाठी महापालिकेचे वृक्ष प्राधिकर

    नागपूर  –

    अजनी वन भागातील वृक्षांच्या कत्तलीच्या मुद्ध्यासाठी महापालिकेचे वृक्ष प्राधिकर आहे

    या प्रकरणाची सुणावणीआधी या प्राधिकरण पुढे व्हावी

    आताच या प्रकरणात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही

    असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाने व्यक्त करत या प्रकरणाची सुनावणी तूर्तास स्थगित केली

    अजनी भागात इंटर मोडलं हब साठी परिसरातील वृक्ष तोड करावी लागणार आहे

    वृक्ष तोडण्याला विरोध होत असून या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती

  • 08 Jul 2021 07:20 AM (IST)

    कुख्यात डॅान अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

    – कुख्यात डॅान अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

    – कुटुंबाला भेटण्यासाठी अरुण गवळी ला हवी संचित रजा

    – फर्रोचा अर्ज कारागृह प्रशासनाने नामंजूर केल्यानंतर गवळीची न्यायालयात धाव

    – फर्लोसाठी अरुण गवळीची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका

    – उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला नोटीस

    – तीन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

    – शिवसेना नगरसेवक कमलाकर सामसांदेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झालीय

    – अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात भोगत आहेत शिक्षा

  • 08 Jul 2021 07:12 AM (IST)

    मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड

    पुणे

    – मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड

    -निकिता घोटकुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता

    -त्या रिक्त पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली येथील सभागृहात संपन्न झाली

    -मावळ पंचायत समितीच्या सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाला असताना,अनुसूचित जातीच्या उमेदवाराला या पदाचा मान मिळाला आहे

  • 08 Jul 2021 07:09 AM (IST)

    नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या

    नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या,

    पांढरबोडी भागातील घटना,

    अवैध दारू विक्रीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती,

    अक्षय जयपुरे असं हत्या झालेल्या गुंडाचे नाव,

    अक्षय वर खुनासह अनेक गुन्हे होते दाखल,

    खुनाच्या घटनेने परिसरात दहशद

  • 08 Jul 2021 07:09 AM (IST)

    नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

    – नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

    – मद्यपी तरुणाची दुचाकी वाहनावर धळकल्याने पोलीसांनी केली मारहाण

    – मनोज ठवकर यांची गाडी पोलीस वाहनावर धडकल्याने केली मारहाण

    – नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

    – रात्री उशीरापर्यंत होता तणाव

    – भवानी हॅास्पिटलमधील मनोज ठवकरला केलं मृत घोषीत

    – भवानी हॅास्पीटल परिसरात नातेवाईकांची घोषणाबाजी

  • 08 Jul 2021 07:06 AM (IST)

    खडकवासला धरणसाखळीत 29.73 टक्के पाणीसाठा

    पुणे

    खडकवासला धरणसाखळीत 29.73 टक्के पाणीसाठा

    मागील 15 दिवसापासून धरण साखळीतील पाऊस गायब

    पावसाआभावी धरणाच्या पाणीसाठ्यात फार मोठी वाढ होऊ शकली नाही

    मंगळवारी दिवसभरात खडकवासला येथे 15 मिलीमीटर पाऊस पडला

    तर उर्वरित पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणात पाऊस झालाच नाही.

    आज अखेर चारही धरणात मिळून एकूण 8.66 टीएमसी म्हणजे 29.73 टक्के पाणीसाठा

  • 08 Jul 2021 07:05 AM (IST)

    माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

    पुणे

    जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

    विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला

    यापूर्वी अटक करण्यात आलेली बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि वकील सुनील अशोक मोरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

    तर, मुलगा मयुरेश याची 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

  • 08 Jul 2021 06:58 AM (IST)

    नागपूर, वर्ध्यासह विदर्भाच्या बऱ्याच भागात रिमझिम पावसाला सुरुवात

    – नागपूर, वर्ध्यासह विदर्भाच्या बऱ्याच भागात रिमझिम पावसाला सुरुवात

    – १२ ते १५ दिवसानंतर रिमझिम पावसाला सुरुवात

    – खरीपातील कापूस आणि सोबायीन पिकांना फायद्याचा पाऊस

    – धानाच्या पऱ्ह्यांनाही होणार फायदा

    – खरीप पिकांच्या वाढीसाठी गरजेचा होता पाऊस

    – पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • 08 Jul 2021 06:57 AM (IST)

    अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या

    अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
    प्रशांत ठाकूर असे पोलीस नाईक याचे नाव
    घरगुती करणातून आत्महत्या केल्याची शक्यता
  • 08 Jul 2021 06:56 AM (IST)

    दिलीपसाहेबांशिवाय चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण, सामनातून आदरांजली

    दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशाह होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे ज्यांनी आज जगाचा निरोप घेतला  ते दिलीप कुमार नव्हतेच, ते युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत!

Published On - Jul 08,2021 6:32 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.