महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 12 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening
भिवंडी : भिवंडी शहरात दुपारी सुरू झालेल्या पावसाने अजून उसंत घेतली नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. येथे मध्ये मध्ये पावसाची मोठी सर येत आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी साचत असून रात्री पाऊस सुरूच राहिल्यास सकाळी अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. .
नागपूर : महापालिका करणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू
या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून होणार सुरुवात
मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार
केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीचे वर्ग लवकरच होणार सुरू
नागपूर महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन करणारा महत्वाचा विषय अखेर मार्गी लागला .
नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे.
आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने नागपूर शहरामधील झोपडपट्टी भागामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतआहे
सांगली – मिरजेत ऑइल टँकरची काच फोडली
मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल
सलग तिसऱ्या दिवशी नशेबाजाचा धुमाकूळ
टँकर वाहकाचा चावा घेतला
अहमदनगर : पाथर्डी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना
खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पक्षाने मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले समर्थक मुंबईकडे रवाना
नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मुंबईकडे केले कूच
उद्या मुंबईत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक
भाजपमधून पंकजा मुंडेंवर वेळोवेळी अन्याय होत आहे
हा अन्याय आम्हाला सहन होत नाहीये
ताई जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत राहणार अहोत
काही भाजपतले नेते पंकजा ताईंना संपवायला निघाले मात्र आम्ही ताईंना संपू देणार नाही
भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अमोल गर्जे यांनी व्यक्त केल्या भावना
मुंबई : सुफरान लकडावाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 10 जणांना समन्स बजावले
चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठविले
पाठविलेल्या समन्समधे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक बड्या उद्योजकांची नावे समाविष्ट असल्याची माहिती
नंदुरबार: नवापूर तालुक्यातील बेडकी पाडा येथील आर आर इनफॅक्ट कंपनीच्या बॉयलर मध्ये स्फोट होऊन दोन कामगार गंभीर जखमी
या प्लांटमध्ये जुने टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जाते
जखमी कामगारांना उपचारासाठी गुजरात राज्यातील व्यारा येथील रुग्णालयात करण्यात आले दाखल
बुलडाणा : अखेर त्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल
4 लोकांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
पोलिसांनी केली होती थातूरमातूर कारवाई
प्रकरण मीडियात गाजल्यानंतर कारवाई
मलकापूरच्या स्मशानभूमी मध्ये 9 जुलै च्या रात्री प्रेत जागे करण्याचा प्रकार आला होता समोर
मांत्रिकाच्या साहाय्याने घडला प्रकार
मनमाड : मनमाडला मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेस्टेशनमध्ये पाण्याची गळती
प्रवाशांचे होतायत अतोनात हाल
काही महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्च करून सिमेंटचे पत्रे काढून त्या जागी बसवण्यात आले होते लोखंडी पत्रे
रायगड : मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात
खोपोलीकडून पनवेलकडे जाताना ट्रकचा अवघड वळणावर अपघात
ट्रक चालक गंभीर जखमी, जखमीला खोपोली रुग्णालयात हलविले
नागपूर -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अपघातग्रस्तांना मदत
पारिवारिक कार्यक्रमासाठी नाना पटोले नागपूर वरून रामटेककडे जात असताना एक अपघात झाल्याचं दिसलं
त्यामुळे गाडी थांबवून अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून नेलं रुग्णालयात
गाडीचं टायर फुटल्याने अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती
नाना पटोले यांनी सोशल मीडियावर दिली माहिती
रत्नागिरी – गुहागर -रत्नागिरी मार्ग ठप्प
आबलोली येथील एका पुलावर पाणी आल्याने वाहतूक झाली ठप्प
गेल्या 2 तासापासून वाहतूक ठप्प
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
बीड: भाजपमधील राजीनाम्याचे सत्र सुरूच
20 सरपंचांसह 6 मुख्य पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
सर्व सरपंच, पदाधिकारी वडवणी तालुक्यातील
बीडमधून भाजपला मोठा धक्का
आतापर्यंत 105 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे कागल तालुक्यात पडसाद
एनवेळी अध्यक्षपदाची संधी हुकल्याने युवराज पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक
कार्यकर्त्यांनी कसबा सांगावं इथं केलं रास्ता रोको आंदोलन
कसबा सांगाव हा युवराज पाटील यांचा मतदारसंघ
राष्ट्रवादीचे युवराज पाटील होते अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार
मात्र ऐनवेळी पद काँग्रेसकडे
कोरोना हॉटस्पॉट असलेल्या कसबा सांगावं मध्ये कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा
पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
नाशिक –
शिवसेनेचे जुन्या महापालिकेत आंदोलन
गढूळ पाण्याच्या बाटल्यांवर लावले फडणवीसांचे स्टिकर
गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दिल्या भेट
महापालिकेतील सत्ताधारी भाजप च्या विरोधात केली घोषणाबाजी
नवी मुंबईत दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी
सोसाट्याच्या वारा आणि त्यात पाऊस असे चित्र
दादर परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात
अनेक दिवसानंतर पावसाची मुंबईत पुन्हा हजेरी
– नागपुरातील मृतक मनोज ठवकर यांच्या घरी भेट देणार देवेंद्र फडणवीस
– थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस ठवकर यांच्या वाठोडा येथील घरी येणार
– नागपूरातील मनोज ठवकर यांचा पोलीस मारहाणीत झाला होता मृत्यू
– मृत्यूचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय
– या प्रकरणातील आधीच तीन पोलीसांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय
– या प्रकरणात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलिसांवर केले आरोप
कोल्हापूर –
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी निश्चित
भाजप आणि मित्र पक्षाकडून निवडणूक न लढवण्याचा निर्णय
भाजपच्या निर्णयामुळे महाविकासआघाडी चा मार्ग मोकळा
दुपारी दोन वाजता होणार अधिकृत निवड प्रक्रिया
अध्यक्ष राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने काँग्रेसचे आमदार पी एन पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील गोकुळ निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र
बीड –
177 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मुंबईकडे रवाना
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के राजीनामे घेऊन मुंबईला रवाना
उद्या पंकजा मुंडेंसोबत मुंबईत महत्वाची बैठक
राजीनाम्यावर बैठकीत होणार चर्चा
नाराज पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप सदस्यत्वाचा दिलाय राजीनामा
पंकजा मुंडे काय निर्णय घेतील याकडे राज्याचे लक्ष
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली नावांची घोषणा
इतर पदाधिकाऱ्यांची नावे उद्या जाहीर केली जाणार
राहुल पाटील हे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी होणार आहेत निवड प्रक्रिया
महा विकास आघाडी आणि मित्र पक्षांकडे आहे सर्वाधिक संख्याबळ
भाजप आणि मित्र पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष
संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडी बिनविरोध पार पाडाव्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचा आवाहन
इचलकरंजी –
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मलाबादे चौकात केली निदर्शने
शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी केली निदर्शने
शहरातील व्यापारी संघटनेने आंदोलनाला फिरवली पाठ
स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर
सरकार च्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली
मा. खासदार राजू शेट्टी यांनी शासनाच्या विरोधात दिल्या घोषणा
नेत्यांनी केलेलं शोक आणि आम्ही केलेली लफडी असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी राज्य सरकार वर केला
गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पोटावर का उठलाय असा सवाल केला
सरकारचेकार्यक्रम.पक्षप्रवेश.नेत्यांची लग्न सोहळा चालतो पण दुकान उधडलेला चालत नाही
प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
औरंगाबाद –
शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा औरंगाबाद दौरा
औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या तांड्यावर संजय राठोड यांचं जोरदार स्वागत
सातारा तांड्यावर संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जमली जोरदार गर्दी
सातारा तांड्यावर संजय राठोड यांचं केलं जाणार जंगी स्वागत
– निफाडमध्ये घडली दुर्मिळ घटना
– एकाच वेळी एकाच पिंजर्यात दोन बिबटे जेरबंद
– निफाड़ तालुक्यातील वडाळी नजिक येथील रोहन होळकर यांचा उसाच्या शेतातील घटना
– अजुन बिबटे असल्याने पिंजरे लावत वडाळी गांव बिबटेमुक्त करण्याची वन विभागकडे नागरिकांची मागणी
लोणवळा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवुन आहेत
नाना पटोले यांचा गभींर आरोप
स्वबळाची भाषा केल्यान त्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे
पुणे –
– शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पुण्यात आज शुभारंभ
– शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ
– टिव्हीयुवरून लाईव्ह फ्रेम चेक करा
पुणे
– पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरमध्ये पाबळरोडवर तडीपार गुंडाची हत्या
-राहुल उर्फ पप्पू वाडेकर असं हत्या झालेल्या तडीपार गुंडा चे नाव
-मध्यरात्रीच्या सुमारास तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर यांच्यावर पिस्तुलातून फायरींग करत डोक्यात दगड टाकुन निघृण हत्या
-पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाला असल्याचा खेड पोलिसांचा अंदाज
-राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते मात्र तडीपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात केला होता प्रवेश त्यावेळी झाली हत्या
नाशिक –
महापौरांच्या ‘रामायण’ निवास्थानी थोड्याच वेळात बैठक
शहरातील पाणी परिस्थिती बाबत महत्वपूर्ण बैठक
नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट ?
बैठकीकडे सगळ्यांच लक्ष
वसई’-
– वसईच्या किल्लाबंदर समुद्र किनार्यावर 30 वर्षाच्या विवाहित महिलेचा मृतदेह मिळाला आहे..
– मृतदेह मिळालेली महिला ही बुधवार पासून बेपत्ता होती..
– ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहणारी असून त्यांचे मूळचे गुजरात नावसारी आहे.
– मागच्या 2 महिन्यांपूर्वी महिलेचा विवाह झाला होता. बुधवार सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक ला गेली असता त्यानंतर ती बेपत्ता झाली होती..
– याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 4 दिवसा नंतर मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने तिची हत्या की आत्महत्त्या याचा आता पोलीस तपास करीत आहेत.
नाशिक –
देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद
गेल्या अनेक दिवसांपासून देवळाली कॅम्प, भगूर परिसरात होता बिबट्याचा वावर
सत्यवान कांगने यांच्या शेतात बिबट्या जेरबंद..
उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या..
नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास
बुलडाणा –
जिल्ह्यात 173 कोटींच्या प्रक्रियेत अनियमियतता झाल्याचा आरोप
मृद आणि जलसंधारण विभागातील प्रकार
चौकशी करून कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस चे जितेंद्र जैन यांची मागणी
तर चौकशी न झाल्यास ईडीकडे तक्रार करणार
गेल्या आर्थिक वर्षात काढलेली निविदा शासनाच्या धोरणाशी निगडित नसल्याचा दावा
निविदा या जास्त दराने भरल्या गेल्या आणि मंत्रालयात ही याचे धागेदोरे असल्याचा आरोप ही जैन यांनी केलाय
रत्नागिरी –
राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती
अर्जुना आणि कोदवली नदीला पूर
राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी
जवाहर चौकात तीन फुट पाणी
राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेतील नागरिकांना दिला इशारा
अर्जुन नदीचे पाणी बाजारपेठेत सामानाची हलवाहलव करण्यास व्यापाऱ्यांची सुरुवात
सिंधुदुर्ग –
जिल्ह्याला रात्री पावसाने झोडपले.
आताही जोर वाढलेलाच.
जिल्ह्यात सर्वञ जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस.
अनेक ठीकाणी सकल भागात साचले पाणी.
नद्यांचीही पाणी पातळी वाढली
जिल्ह्याच्या अनेक भागात राञी पासुन विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे.
हवामान विभागाने तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे.
रायगड –
मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस
पावसामुळे रस्त्यांवर साचले पाणी
मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली.
कुंडलिका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ.
मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी.
रात्रभर कोसळत होता पाऊस
पहाटे थांबल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर.
सोलापूर –
शहरात आज कोरोना प्रतिबंधक लस मोहीम ठप्प
लसीचा पुरवठा लसीकरण मोहीम ठप्प
एक दोन दिवसाचा अपवाद सोडला तर वारंवार होत आहे लसीचा तुटवडा
परिणाम म्हणून लसीकरण मोहीम होत आहे ठप्प
– कथीत अमेरिकन लुटेरी दुल्हनने वीज कर्मचाऱ्याला ४० लाखात गंडवले
– एक लाख डॅालरसाठी गमावले ४० लाख
– कथीत अमेरिकन महिलेने नागपूरातील वीज तर्मचाऱ्याला गंडवले
– नागपूरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह १६ जणांवर गुन्हे दाखल
– सुनील देऊळवार या वीज कर्मचाऱ्याची फसवणूक
– मॅट्रीमोनी साईटवर झाली महिलेशी ओळख, नंतर चाटिंग आणि चिटिंग
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेची आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड
अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर
राहुल पाटील हे आमदार पी.एन.पाटील यांचे सुपुत्र
तर उपाध्यक्षपदासाठी जयवंत शिंपी आणि विजय बोरगे यांच्यात चुरस
महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांकडून उमेदवारांची नाव आज सकाळी 11 नंतर जाहीर केली जाणार
पुणे –
– रघुनाथ येंमुल ला अटक
– येंमुल हा मोठा राजकीय गुरू
– चतुःश्रृंगी पोलिसांनी केली अटक
– अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ
– नागपुरात महिन्याला सरासरी आठ हत्या, १८ अत्याचाराच्या घटना
– नागपूरात गेल्या पाच महिन्यात ९९० चोरीच्या घटना
– गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्या गुन्ह्याच्या घटना
– २०२० च्या सरासरी तुलनेत यंदा गुन्हेगारीच्या घटना जास्त
– सायबर गुन्हेगारीनेही वाढवली पोलीसांची चिंता
– माहिती अधिकारात नागपूरातील गुन्हेगाराची धक्कादायक माहिती
नाशिक –
मनसे लागली मनपा निवडणुकांच्या तयारीला
मनसे अध्यक्ष 16,17,18 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर
पुण्यापाठोपाठ राज ठाकरे यांचा नाशिक दौरा..
राज ठाकरे नाशिक दौऱ्यातून फुंकणार महापालिका निवडणुकांचं रणशिंग
मनसे साठी नाशिक हा जुना बालेकिल्ला
नाशिक ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरे सरसावले
तीन दिवसांच्या दौऱ्यात घेणार संघटनात्मक मोठे निर्णय
राज ठाकरे यांचा दौरा असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
नाशिक –
अलायन्स एअर कडून नाशिककरांसाठी चांगली बातमी
नाशिककरांना दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगावसाठी हॉपिंग फ्लाईट्स
ट्रू जेट चे देखील उद्यापासून अहमदाबाद साठी उड्डाण
नाशिककरांचा विमान प्रवास होणार आणखी सुखकर
कोरोना काळात बंद असलेल्या विमानसेवा अंशतः सुरु
रत्नागिरी –
चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पडतोय पाऊस
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता
लावणीच्या कामाला वेग शेतकरी आनंदीत
तर तुरळक भागात साचले पाणी
मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढली
विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
942 क्यूमेसने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू
नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
अकोला –
अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पाणी आल्याने प्रशासनाच्या वतीने अकोला ते अकोट मार्ग बंद करण्यात आला आहे
अकोला –
अकोल्यात विजांच्या कडकटा सह जोरदार पावसाला सुरुवात
सकाळ पासून आहे ढगाळ वातावरण
संध्याकाळी झाला पाऊस
पुन्हा जोरदार पावसाची हजेरी
गेल्या 20 मिनिटा पासून आहे जोरदार पाऊस
मुरूड तालुक्यातील काशीद येथे असलेला जुना पुल आज रात्री ८ वाजता कोसळला या दुर्घटनेत एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन पुलावरून खाली पडली.
यावेळी अलिबाग मांडवी मोहल्ला येथे राहणारा अरमान शेहनवाज सय्यद हा युवक वाहून गेला होता. मात्र त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला व त्याने प्रसंगवधान राखुन अल्टो कारची काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून समयसूचकता दाखवुन जीवदान दिले.
अरमानचे या शौर्याबद्दल त्याचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे.