Maharashtra News LIVE Update | एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्या, राज्य सरकारचे तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना आदेश

| Updated on: Jul 27, 2021 | 10:59 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्या, राज्य सरकारचे तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना आदेश
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jul 2021 07:48 PM (IST)

    एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्या, राज्य सरकारचे तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना आदेश

    राज्यातील सगळ्या तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना राज्य सरकारचे आदेश,

    एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्या,

    स्थानिक स्तरावर सगळी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना,

    सामान्य प्रशासन विभागानं काढले आदेश,

    विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्यात येतायेत अडचणी,

    यासाठी राज्य सरकारने काढले आदेश,

    एस ईबीसीच्या उमेदवारांना आता मिळणार ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ

  • 27 Jul 2021 07:08 PM (IST)

    पूरग्रस्त भागात महावितरणाचं मोठं नुकसान : ऊर्जामंत्री नितीन राऊत

    ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : – पूरग्रस्त भागात अतिशय धक्कादायक परिस्थिती झाली आहे. – महावितरणच मोठं नुकसान झालंय – महाड शहरात 25 फूट पाणी असल्याने या ठिकाणी विजेचे खांब मीटर यांचं मोठं नुकसान आहे – मी यासंदर्भात सर्व आढावा घेऊन पाहणी केलीये – आता आमचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.वीज दुरुस्तीच.. – सावित्री नदीच्या काठी जास्त टॉवर पडलेत, ज्या ठिकाणी जावं लागतं तिथं सावित्री नदीत मगर मोठ्या प्रमाणात आहेत.मात्र कर्मचारी मोठ्या हीमतीने काम करतात – सर्व कर्मचाऱ्यांना माझा सलाम आहे – त्यांच्यामुळे आमची छाती अभिमानाने फुलुन निघाली आहे – प्रथमतः रुग्णालय आणि पिण्याचे पाणी याच ठिकाणची विज अगोदर सुरू केली जाईल – महाड शहरातील वीज सुरू होण्यास तीन चार दिवस लागतील – ग्राहकांना दिलासा देण्यासंदर्भात राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल – सद्या बिल दिली जाणार नाहीत

  • 27 Jul 2021 06:50 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भाजप आमदारांचा रस्त्यावरील खड्ड्यात बसून होम हवन

    कल्याण : 

    मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भाजपा आमदारांचा रस्त्यावरील खड्ड्यात बसून होम हवन

    कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत सुरू केला होम हवन

    आशेळे ते माणेरे गाव रस्त्याची दुरवस्था

    दोन वर्षापासून निधी मंजूर असूनही काम रखडवले असल्याचा भाजप आमदारांचा आरोप

    भाजप आमदाराचा सत्ताधाऱ्यांविरोधात उपहासात्मक आंदोलन

  • 27 Jul 2021 06:02 PM (IST)

    केंद्राकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत जाहीर

    केंद्राकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत जाहीर, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत घोषणा केली, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत जाहीर केली आहे

  • 27 Jul 2021 05:47 PM (IST)

    दादर-भुज सयाजी नगरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, अर्धा तासापासून ट्रेन उभी

    पालघर ब्रेकिंग

    09116, दादर -भुज सयाजी नगरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड,

    पश्चिम रेल्वेचे सफाळे स्थानकावर दादर-भुज सयाजी नगरी एक्स्प्रेस अर्ध्या तासापासून उभी आहे

    एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अर्धा तासा पासून ट्रेन उभी

  • 27 Jul 2021 05:20 PM (IST)

    पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा एक दिवसानी पुढे ढकलली

    पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा एक दिवसानी पुढे ढकलली,

    8 ऑगस्टला होणार होती परीक्षा,

    मात्र 8 ऑगस्टला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांची माहिती,

    आता परीक्षा 9 ऑगस्टला होणार

  • 27 Jul 2021 05:19 PM (IST)

    सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

    पंढरपूर : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

    नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची माहिती

    सोलापूर मधील रुग्णालयात सुरू उपचार सुरू

    नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली

  • 27 Jul 2021 05:04 PM (IST)

    नुकसनाग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक

    नुकसनाग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील बैठक सुरु, बैठकीसाठी मुख्यमंत्रीही दाखल, पवार-वडेट्टीवार बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

  • 27 Jul 2021 04:25 PM (IST)

    जालनामध्ये झिरपी फाट्याजवळ स्कॉर्पिओ शेतात पलटली, पाच तरुण जखमी

    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी फाटा येथे समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने स्कार्पिओ गाडीच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे स्कार्पिओ गाडी रोड सोडून 15 फूट खोल असलेल्या शेतात पलटी झाली. या गाडीत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण होते. ते आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात असतांना हा अपघात झाला. या अपघातात पाच तरुण जखमी झाले आहेत. यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 27 Jul 2021 04:08 PM (IST)

    कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, टी 20 चा दुसरा सामना रद्द

    क्रिकेटर कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, भारत-श्रीलंकेमधला टी 20 चा दुसरा सामना रद्द, दोन्ही टीम आयसोलेशनमध्ये

  • 27 Jul 2021 03:50 PM (IST)

    राज्यातील आठ जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज

    राज्यातील आठ जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज

    पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सरकारचा प्राथमिक अंदाज

    कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीचा समावेश

    -पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश

  • 27 Jul 2021 03:48 PM (IST)

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा तीन दिवसांचा पुणे दौरा

    पुणे : राज ठाकरे यांचा पुणे दौरा

    पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा तीन दिवस पुणे दौरा,

    आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यात होणार दाखल,

    तीन पुण्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा,

    उद्या सकाळी 9 वाजता नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शाखाध्यक्षांच्या घेणार मुलाखती,

    एक दिवसात तीन मतदारसंघाचा आढावा , तीन दिवसांत 9 मतदारसंघ,

    राज ठाकरे नवीन शाखाध्यक्षांच्या करणार नियुक्त्या, स्वतः साधणार संवाद,

    मनसेचं लक्ष्य पुणे महापालिका राज ठाकरेंचा पुण्यात तीन दिवस तळ !

    मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

    शुक्रवारी शेवटचा आढावा घेऊन मुंबईला परतणार .

  • 27 Jul 2021 03:47 PM (IST)

    भिवंडीत दुमजली घराचा काही भाग कोसळला, वृद्ध दाम्पत्य जखमी

    भिवंडी : भिवंडी शहरात बाजारपेठ झेंडा नाका येथील 60 वर्ष जुने दुमजली घराचा काही भाग कोसळला. पहिल्या मजल्यावरील वृद्ध दांपत्य किरकोळ  जखमी

  • 27 Jul 2021 03:45 PM (IST)

    तळागाळात लोकांपर्यंत पोहोचा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

    तळागाळात लोकांपर्यंत पोहोचा

    राज ठाकरे यांचा बैठकीत कार्यकर्त्यांना आदेश

    ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी

    तळागाळात जाऊन पक्षाचे विचार आणि लोकांपर्यंत पोचण्याचे राज ठाकरे यांनी दिले आदेश

  • 27 Jul 2021 03:11 PM (IST)

    संरक्षक भिंत बांधण हा महापुरावरचा उपाय नाही : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    कोकणात ५ ट्रक गरजेच्या वस्तु कोकणात रवाना ९ ट्रक माल पुरग्रस्तांकडे पाठवला जातोय भाजप युवा मोर्चा तर्फे या वस्तु पाठवल्या जात आहेत दौरे करताना त्यांच्या दौर्याचा ताण शासकीय यंत्रणांवर येऊ नये एवढाच पवारांचा मुद्दा आम्ही गेल्यावर यंत्रणा कामी लागते, आम्ही विरोधी पक्षात असल्यान तसंही आमच्या दौऱ्यावर शासकीय यंत्रणा येत नाही. तसा जीआरच राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येण्याचा फारसा संबंध नाही.

    राज्यपालांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सुचनेनुसार प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्यांनी बोलावल होत राज्यपाल हे प्रशासकीय प्रमुख

    संरक्षक भिंत बांधण हा त्यावरचा उपाय नाही पुरपरिस्थितीला नविन आव्हान उभी आहेत राज्य सरकार जिथे प्रयत्न करत आहे त्यात आम्ही त्यांच्यासोबत आपल्याला अलमट्टीचा विसर्ग हा वाढवावा लागेल

  • 27 Jul 2021 02:57 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करत नसले तरी शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर येऊन नतमस्तक

    मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीत कोरोना आणि आपत्कालीन पूर परिस्थितीमुळे त्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत

    पण मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आणि मंदिर आहे

    त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक झालो, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे

  • 27 Jul 2021 02:53 PM (IST)

    औरंगाबादमध्ये 108 चालक-वाहक नियुक्तीच्या प्रतिक्षेत, चालक-वाहकांचे आंदोलन

    औरंगाबाद

    औरंगाबादमध्ये 108 चालक-वाहक नियुक्तीच्या प्रतिक्षेत

    विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर चालक-वाहकांचे आंदोलन

    एस टी महामंडळ दुष्काळी भरती केलेल्या तरुणांचे हाल सुरू आहेत.

    औरंगाबाद विभागातील एस टी महामंडळाच्या दुष्काळी भरतीतीळ 108 चालक-वाहक अद्याप ही नियुक्तीच्या प्रतिक्षेत

    एस टी प्रशासनाने कोरोनाच्या नावा खाली या तरुणांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

    या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी औरंगाबादच्या विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत.

  • 27 Jul 2021 02:50 PM (IST)

    रवि पुजारी गँगचा गुंडाला खंडणीविरोधी पथकाने केली अटक

    रवि पुजारी गँगचा गुंडाला खंडणीविरोधी पथकाने केली अटक

    1 रिवॉल्वर , 1 देशी पिस्तूल आणि 15 काडतुस सोबत आरोपीला केली अटक

    पुण्याच्या एका खुनाच्या गुह्यात होता वांटेड

    काला चौकी वरुन शनिवारी सापला लावून आरोपीला केली अटक

  • 27 Jul 2021 01:21 PM (IST)

    चिपळूणवासियांच्या मदतीला नाशिक मनसे मैदानात

    नाशिक – चिपळूण वासियांच्या मदतीला नाशिक मनसे मैदानात..

    मनसेकडून चिपळूण वासीयांसाठी मोठी मदत पाठवणार..

    अन्नधान्य,गरजेच्या वस्तू,कपडे पाठवणार

    मनसे कार्यालयाला सध्या वॉर रूमचं स्वरूप..

  • 27 Jul 2021 12:40 PM (IST)

    अमरावती शहरात हवाला मार्गातून 3 कोटीच्यावर रुपये जप्त, पोलिसांची चौकशी सुरू

    अमरावती

    अमरावती शहरात हवाला मार्गातून 3 कोटीच्यावर रुपये जप्त

    दोन चारचाकी वाहनातून कोट्यवधी रुपये पकडले

    सहाजण पोलिसांच्या ताब्यात;पोलिसांची चौकशी सुरू

    अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची कारवाई

    गुजरात येथे सर्व रक्कम नेत असल्याची प्राथमिक माहिती

  • 27 Jul 2021 12:02 PM (IST)

    कल्याणच्या गंधारी पुलाची पाहणी बोटीविना रखडली

    कल्याण : गांधारी पूल अपडेट…

    गांधारी पुलाचा पाहणी बोटी विना रखडली…

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळ पासून बोटच मिळेना

  • 27 Jul 2021 11:44 AM (IST)

    चंद्रपुरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश

    चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश

    व्याहाड गावात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट झाला जेरबंद

    जेरबंद झालेली मादी बिबट ही अंदाजे 3 वर्षांची

    या मादीने या भागात 3 लोकांवर हल्ला केल्याचा संशय

    हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले होते.

  • 27 Jul 2021 11:42 AM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर नाशिक भाजपात गट तट कायम

    नाशिक -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर देखील नाशिक भाजपात गट तट कायम

    नाशिक रोड प्रभाग सभापती निवडणूक वेळेस गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता

    गैरहजर असलेले नगरसेवक माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक*

    सानप यांनी मात्र यात संबंध नसल्याचा केला खुलासा

    भाजपाचे दोन नगरसेवक गैरहजर असल्याने शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांची झाली होती निवड

  • 27 Jul 2021 11:39 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरावर दगडफेक, पोलिसात तक्रार

    नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी विक्रम कोठुळे यांच्या घरावर दगडफेक

    कोयत्याचा धाक दाखवत केली दमबाजी

    नाशिकरोड, विहितगाव परिसरात दहशत

    राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार

  • 27 Jul 2021 11:38 AM (IST)

    ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री येणार पुण्यात

    पुणे

    ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री येणार पुण्यात

    राज ठाकरे 2 ऑगस्ट पर्यत असणार पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

  • 27 Jul 2021 09:26 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा रद्द, पुढच्या आठवड्यात दौरा करण्याची शक्यता

    नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा रद्द.

    आजपासून तीन दिवस राज ठाकरे येणार होते नाशिक दौऱ्यावर..

    अमित ठाकरे देखील येणार नसल्याची माहिती

    पुढच्या आठवड्यात दोन्ही नेते नाशिकमध्ये येण्याची शक्यता..

    महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज ठाकरे आजपासून पुन्हा करणार होते नाशिक दौरा

  • 27 Jul 2021 09:09 AM (IST)

    अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर प्रचंड गर्दी

    पुणे

    अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर प्रचंड गर्दी

    मंदिर बंद असल्याने लोक रस्त्यावर थांबून घेत आहेत गणपतीचं दर्शन

    रस्त्यात मध्येच थांबणाऱ्या लोकांमुळे वाहतुकीला अडथळा

  • 27 Jul 2021 08:48 AM (IST)

    पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग होणार अद्ययावत, मुंबई प्रमाणे पुण्यातही वॉर रूम उभी केली जाणार

    पुणे –

    पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग होणार अद्ययावत

    हवामानात होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना येणारे पूर यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय

    मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेत उभारली जाणार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा

    अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाची पाहणी करून घेतली माहिती

    मुंबई प्रमाणे पुण्यातही वॉर रूम उभी केली जाणार

    यासाठी नुकताच सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने दिली मान्यता

    सल्लागाराकडून ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डीपीआर) प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून केले जाणार काम

  • 27 Jul 2021 08:45 AM (IST)

    औरंगाबाद 17 राष्ट्रांच्या 74 विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश

    औरंगाबाद :-

    17 राष्ट्रांच्या 74 विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश..

    यामध्ये 9 मुस्लिम राष्ट्रांतील 59 विद्यार्थ्यांचा समावेश..

    59 विद्यार्थ्यांसह 74 जणांच्या फेलोशिपवर केंद्रातील मोदी सरकार दर वर्षी 34 लाख 96 हजार रुपये करणार खर्च..

    विदेशी विद्यार्थ्यांनमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे अफगाणिस्थानचे..

    20 देशांतील 123 जणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ केला होता प्रवेश अर्ज दाखल..

  • 27 Jul 2021 08:44 AM (IST)

    औरंगाबादेतील घरपोच लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू

    औरंगाबाद  :-

    अपंगत्व,अपघातग्रस्त आणि अंथरुणात खिळलेल्या नागरिकांना दिली जाणार घरपोच कोरोना लस..

    घरपोच लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू..

    जिल्ह्यात अंथरुणाला खिळलेल्या आणि अपंगत्व प्राप्त झालेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू..

    ज्यांना शारीरिक अडचणी असल्याने लसीकरण केंद्रावर जाणे शक्‍य नाही अशांसाठी आरोग्य यंत्रणांकडून नियोजन सुरू..

    सर्वापर्यंत लस पोहोचावी यासाठी आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू..

  • 27 Jul 2021 08:40 AM (IST)

    आज नागपूरमधील सर्वच केंद्रावर कोविशील्डचे लसीकरण होणार

    नागपूर —

    आज नागपूर मधील सर्वच केंद्रावर कोविशील्ड च लसीकरण होणार.

    कॉवक्सिन लसीकरण देखील असणार सुरू.

    अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती.

  • 27 Jul 2021 08:38 AM (IST)

    नाशिक महापालिकेला कोव्हीशिल्डच्या 10,000 लसी प्राप्त

    नाशिक – महापालिकेला कोव्हीशिल्डच्या 10,000 लसी प्राप्त..

    32 केंद्रांवर मिळणार कोव्हीशिल्ड तर 4 केंद्रांवर मिळणार कोव्हक्सीं..

    गेल्या आठवड्यात फक्त दोन दिवसात झाले शहरात लसीकरण..

    शहरातील 32 केंद्रांवर येत्या आठवड्यात होणार लसीकरण..

  • 27 Jul 2021 08:33 AM (IST)

    नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा युवा शक्तीवर भर, 133 जणांची युवा कार्यकारिणी घोषित

    नागपूर –

    नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा युवा शक्तीवर भर

    महिला आघाडीच्या जम्बो कार्यकारिणीच्या घोषने नंतर

    आता 133 जणांची युवा कार्यकारिणी घोषित

    नवीन युवा कार्यकर्त्यांना संधी देऊन भाजप साधत आहे समतोल

    महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू

    महापालिका सत्तेत असलेली भाजप सत्ता कायम ठेवण्यासाठी लागली कामाला

  • 27 Jul 2021 08:27 AM (IST)

    नागपुरात सरकारने घातलेल्या निर्बंधाविरोधात व्यापारी रस्त्यावर, बाईक आणि कार रॅलीद्वारे निषेध

    नागपूर –

    काल जोरदार पदयात्रा करत केलेल्या आंदोलनानंतर आज व्यापारी काढणार बाईक व कार रैली

    नागपुरात सरकारने घातलेल्या निर्बंध विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहे

    आजही मोठ्या प्रमाणात व्यापारी होणार सहभागी

    सरकार जागवा , व्यापार वाचवा आंदोलनाचा दुसरा टप्पा आज

    निर्बंध न हटविल्यास असहकार आंदोलन करण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा

    नागपूर पहिल्या टप्प्यात असताना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध नागपुरात लागू आहे

    व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे लागलं आहे सर्वांच लक्ष

  • 27 Jul 2021 08:24 AM (IST)

    देशभरातील ओबीसी नेत्यांचा आता दिल्लीत एल्गार

    – ओबीसी समाजाचे डिसेंबर महिन्यात दिल्लीत तालकटोरा स्टेडीयमवर संमेलन

    – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारणीत ठराव मंजुर

    – देशभरातील ओबीसी नेत्यांचा आता दिल्लीत एल्गार

    – ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळावं आणि जातीनुसार जनगणनेची मागणी

    – ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांची माहिती

    – राज्यातील दिग्गज ओबीसी नेते राहणार उपस्थित

  • 27 Jul 2021 07:19 AM (IST)

    पैसे असतील तरंच नागपूरच्या मेडीकलमध्ये उपचार, सरकारी अनास्थेचा गरीब रुग्णांना मोठा फटका

    – पैसे असतील तरंच नागपूरच्या मेडीकलमध्ये उपचार

    – मेडीकलमध्ये २५ पेक्षा जास्त औषधांचा तुटवडा

    – सलाईन आणि टाक्यांचा धागाही नाही

    – आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाच मोठ्या सरकारी हॅास्पीटलमधील वास्तव

    – औषधांचा तुटवडा असल्याने गरिब रुग्णांचे मोठे हाल

    – सरकारी अनास्थेचा गरिब रुग्णांना मोठा फटका

  • 27 Jul 2021 07:17 AM (IST)

    निकालाची वाट न पाहता पुढील वर्षाचे वर्ग सुरु करा, नागपूर विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालयांना निर्देश

    निकालाची वाट न पाहता पुढील वर्षाचे वर्ग सुरु करा

    – नागपूर विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालयांना निर्देश

    – नागपूर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयात २ ॲागस्टपासून पदवीचे वर्ग सुरु होणार

    – निकाल लागला नसेल तरी पुढील वर्षात तात्पुरते प्रवेश देऊन वर्ग सुरु करण्याचे निर्देश

    – ॲानलाईन वर्ग सुरु करण्याचे विद्यापीठाचे निर्देश

  • 27 Jul 2021 07:08 AM (IST)

    महाड-पोलादपूरच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेच्या पथकांचे प्रत्यक्ष कार्य सुरु

    महाड-पोलादपूरच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेच्या पथकांचे प्रत्यक्ष कार्य सुरु

    साफसफाई, आरोग्य तपासण्यांचा कामाला वेग ; २५० व्यक्तींची आरोग्य तपासणी

    ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या आरोग्य, घनकचरा आणि पाणी विभागाच्या पथकांमार्फत काम सुरु

  • 27 Jul 2021 07:07 AM (IST)

    विरारमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा 

    विरार मधील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले

    रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा

    वाहन चालकांना, प्रवाशांना यातून मार्ग काढताना खूप मोठी कसरत

    खड्ड्यात पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनधारकाना अपघाताला ही तोंड द्यावे लागत आहे.

Published On - Jul 27,2021 6:33 AM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.