Maharashtra News LIVE Update | टास्क फोर्सचा निर्णय येईल त्याप्रमाणे निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाईल : छगन भुजबळ
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नागपूरकरांसाठी खुशखबर, यावर्षी पाणी कर वाढणार नाही
नागपूर :
नागपूरकरांसाठी खुशखबर, यावर्षी पाणी कर वाढणार नाही
दरवर्षी 5 टक्केने वाढणारा पाणीकर यावर्षी कोरोनामुळे त्यात सूट देण्यात आली
स्थायी समितीने घेतला निर्णय
कोरोना काळात नागरिकांची बिघडलेली परिस्थिती बघता घेण्यात आला निर्णय
स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांची माहिती
-
ठाणे ते नाशिक महामार्गवर वाहतूक कोंडी
ठाणे ते नाशिक महामार्गवर वाहतूक कोंडी, अवजड वाहने बंद पडत असल्यामुळे गाड्या काढण्यासाठी लागत आहेत. विलंबन तर दुसरीकडे मुंब्रा बायपास पुलाला बगदाड पडल्याने मुंब्रा ते ठाणे जाणारी अवजड वाहने महापे, ऐरोली आनंदनगर जकात नाका मार्गाने वळवण्यात आलेली आहेत. तर लहान वाहनांसाठी फक्त मुंब्रा ते ठाणे बा पास मार्ग सुरु आहे. वाहतूक कोंडीचा फटका ठाणे शहराला देखील बसला आहे. घोडबंदर ठिकाणी जाण्यासाठी देखील वाहनांची रिंग दिसत आहे.
-
-
टास्क फोर्सचा निर्णय येईल त्याप्रमाणे निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाईल : छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : – कोरोनाच्या पार्शवभूमीवर बैठक – दुसऱ्या लाटेतील रुगणांचा आकडा कमी झाला आहे – आज 1030 एवढा आकडा – पॉझिटिव्हीटी रेट आता 2 टक्के – मृत्युदर 2.11 टक्के आहे – म्युकर मायकोसिसचे 58 रुग्ण – 13 लाख 743 हजार लोकांनी पहिला डोस घेतला – 4 लाख 56 हजार लोकांचा दुसरा डोस -18 लाख 30 हजार लोकांनी लस घेतली आहे – वाढ व्हायला पाहिजे – दुसरा डोस 6 टक्के लोकांनी घेतला आहे
– भारत सरकारकडून येतील तेवढी लस आपण देतोय – पाच पट लस आली तर सगळ्यांचं लसीकरण लवकर होईल – निर्बंधांबाबत मंत्रिमंडळासमोर मागणी केली आहे – अमेरिका, ब्रिटनमध्ये संख्या वाढते आहे – केरळमध्ये दोन दिवस पुन्हा लॉकडाऊन – भीती अजिबात संपलेली नाही – एक ऑर्डर काढली की सगळं चालू होईल – पण परिस्थिती अवघड आहे – टास्क फोर्सचा निर्णय येईल त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात निर्णय घेतले जातील – मुख्यमंत्र्यांकडून जे आदेश येतील त्याचं पालन केले जाईल – सध्या जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे
– मुख्यमंत्री केंद्राकडे सांगत आहेत आम्हाला लसींचा कोटा वाढवून द्या – आपण कुठेही कमी पडणार नाही – काही तालुके कोरोना मुक्त झाले आहेत – शिक्षक आणि विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याने 7 शाळा बंद करण्यात आल्या
-
लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांची माहिती
सांगली :
लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज शेतकऱ्यांना देऊ
येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी येतील,
कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम
-
अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, पुढील सुनावणी 3 ऑगस्टला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी 3 ऑगस्टला, ईडीने अटक करु नये यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र अनिल देशमुखांना याबाबत दिलासा नाही
-
-
पूरग्रस्त भागात वीजबिल वसूल करणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा
सांगली :
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा
पुरबाधित भागातील वीजबिल वसुलीला स्थगिती
पूरग्रस्त भागात वीज बिल वसूल करू नका
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आदेश
परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिले भरणेसाठी सवलत दिली जाईल
बिलमाफी मी नाही मंत्रिमंडळ करेल
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सांगलीत माहिती
-
पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर माझीच – गुलाबराव पाटील
जळगाव – पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर माझीच
त्या शिवसेनेत आल्यातर त्यांचा सन्मान होईल
दोन महिन्यांपूर्वी त्या शिवसेनेत येण्याची होती चर्चा – गुलाबराव पाटील पालक मंत्री
-
नारायण राणेंची टीका म्हणजे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही – गुलाबराव पाटील
जळगाव – राज्यावर आलेल्या पूरपरिस्थिती च्या संकटात कुणीही राजकारण करू नये
नारायण राणेंची टीका म्हणजे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची नारायण राणे यांच्या टीका
-
कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-फडणवीस पहाणी करता करता एकमेकांना समोरा समोर भेटले
कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर
भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत
यावेळी कोल्हापुरातील पूरस्थितीची पहाणी करता करता हे आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांना समोरा समोर भेटले
देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांची शाहुपुरीच्या सहाव्या गल्लीत भेट झाली
यावेळी दोघांनीही संवाद साधला
तसेच शाहुपुरीतील नागरिकांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला
-
500 मीटरचा रस्ता ठरतोय नाशिककरांसाठी जीवघेणा, दिवसाला सरासरी 10 ते 12 अपघात
नाशिक –
500 मीटरचा रस्ता ठरतोय नाशिककरांसाठी जीवघेणा
एकाच रस्त्यावर दिवसाला सरासरी 10 ते 12 अपघात
द्वारका सिग्नल ते आडगाव नाका परिसराचा रस्ता बनलाय जीवघेणा..
रस्त्याकडे प्रशासनच अक्षम्य दुर्लक्ष..
-
नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त भागाला मदत
नाशिक –
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त भागाला मदत
4 गाड्या भरून मदत चिपळूण कडे रवाना
छगन भुजबळ यांनी दाखवला गाड्यांना झेंडा
अन्न धान्य आणि मदतीच्या वस्तूंचा समावेश
-
पाऊस पडत नसल्याने गावात निघाली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
जळगाव – पाऊस पडत नसल्याने गावात निघाली प्रतिकात्मक प्रेतयात्रा
जिवंत व्यक्तीची पाऊस पडत नाही म्हणून काढली प्रेत यात्रा
वरुण राजाची कृपा व्हावी म्हणून अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील प्रकार
-
शरद पवार आणि मंत्री नितीन गडकरी यांच्यात बैठक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी बैठक झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच ही बैठक झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती आहे.
-
विरारच्या ICICI बँक दरोडा प्रकरणातील कॅशिअर जखमी महिलेची प्रकृती स्थिर
विरार – विरारच्या ICICI बँक दरोडा प्रकरणातील कॅशिअर जखमी महिलेची प्रकृती स्थिर
श्रद्धा देवरुखकर असे जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर विरार च्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू..
विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांची माहिती
बँकेचा माजी मॅनेजर याने सशस्त्र हल्ला करून , बँकेवर टाकला होता दरोडा..
दरोडेखोरांच्या हल्ल्यात असिस्टंट मॅनेजर योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला होता तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या..
हल्ला करून सोने, रोख रक्कम घेऊन फरार होणारा दरोडेखोर मॅनेजर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात.. अनिल दुबे असे दरोडेखोर मॅनेजर चे नाव आहे..
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर दाखल
कोल्हापूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर
उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर दाखल
पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने उपस्थित
विमानतळावरून मुख्यमंत्री शिरोळ कडे रवाना होणार
-
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
धुळे –
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
30 वर्षीय तरुणाचा वडेल गावाजवळ असलेल्या तलावात खोलवर असलेल्या गाळमध्ये अडकून मृत्यू
रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
-
औरंगाबादेत बाल वयात होणारे बालविवाह रोखण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर आणि मुख्यध्यापकांवर
औरंगाबाद –
बाल वयात होणारे बालविवाह रोखण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर आणि मुख्यध्यापकांवर
अल्पवयीन मुली गळ्यात मंगळसूत्र घालून शाळेत आल्याने जिल्हा परिषद प्रशासन झाले खडबडून झाले
शाळा सुरू झाल्या नंतर अल्पवयीन मुली मंगळसूत्र घालून शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आला होता समोर
लॉकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर
बालविवाह रोखण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जनजागृती करून होणाऱ्या शिक्षेचे गांभीर्य द्यावे पटवून
बालविवाह वाढल्यामुळे शिक्षण विभागाने दिले आदेश
-
आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरण्याची शपथपत्र सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
औरंगाबाद –
आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरण्याची शपथपत्र सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
आरोग्य विभागातील उर्वरित 50 टक्के रिक्त जागा पुढील सहा महिन्यात भरणार असल्यास शपथपत्र सादर करण्याचे खंडपीठाने राज्य सरकारला दिले आदेश
शपथपत्र सादर करण्यासाठी खंडपीठाने दिला चार आठवड्यांचा वेळ
याचिकाकर्त्या बाबत शासनाची नेमके काय धोरण आहे खंडपीठाने केली विचारलं
आरोग्य विभागातील 50 टक्के रिक्त जागा सोबतच इतर जागा 6 महिन्यात भरणारे निवेदन राज्य सरकारने केले सादर
पुढील सुनावणी होणार ऑगस्ट महिन्यात
-
जायकवाडी धरणात 4342 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरु
औरंगाबाद –
जायकवाडी धरणात 4342 क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरु
जायकवाडी धरणात 37 टीएमसी पाणीसाठा
जायकवाडी धरणात या पावसाळ्यात फक्त एक टक्का पाण्याची झाली वाढ
जायकवाडी धरण भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज
जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग केला बंद
-
गंगापूर धरण 79 टक्के भरले, धरणातून 3000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग
नाशिक – गंगापूर धरण 79 टक्के भरले
गंगापूर धरणातून 3000 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच सोडले पाणी
जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी संकट दूर होण्याची शक्यता
-
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर परिसरासह तुळजापूर शहरात सम विषम पार्किंग सुरु होणार
उस्मानाबाद
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर परिसरासह तुळजापूर शहरात सम विषम पार्किंग सुरू होणार
उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या 43 टक्के पाऊस , 74 प्रकल्पात पाणी साठा नाही
-
गोदाघाटावर पाण्याच्या पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी
नाशिक – गोदाघाटावर पाण्याच्या पातळीत वाढ..
दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पुरसदृश्य स्थिती..
पावसाची संततधार सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता ..
गोदा घाटाच्या रहिवाशांचा सतर्कतेचा इशारा..
-
चंद्रपूर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस
– चंद्रपूर पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस
– पोलीस तपासात वन्यप्राण्यांसंदर्भात दिशानिर्देशाचे उल्लंघन
– सहा महिन्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ५४ जणांचा मृत्यूच्या तपासाचं प्रकरण
– वन्यप्राण्यांसंदर्भात दिशानिर्देशानुसार पोलिसांनी पुरावे गोळा केले नाही
– हल्ला करणारा वाघ, बिबट्या की अस्वल हे पोलीस तपासात स्पष्ट नाही
– चंद्रपुर पोलीस अधिक्षकांना तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश
-
औरंगाबादेत गेल्या सहा महिन्यात एसीबीने लाचखोर 90 लोकसेवक पकडले रंगेहात
औरंगाबाद –
मागील 6 महिन्यात लाचलुचपत विभागाच्या जोरदार कारवाया..
एसीबीने लाचखोर 90 लोकसेवक पकडले रंगेहात..
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी लाचखोरीची संख्या झाली दुप्पट..
मराठवाडा विभागातील मोठे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने लाचखोरीची राज्यात चर्चा..
लाचलुचपत विभागाच्या जोरदार कारवाईमुळे लाचखोरांच्या मनात वाढली भीती..
-
पुण्याचा विकासाचं आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे – अजित पवार
अजित पवार
सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला
तर सकाळी सुरवात चांगली होती
कोरोनाच संकट आहे
आम्हीच नियम करायचे, अन मोडायचे कसे
गर्दी नको म्हणून मी सकाळी 6 ला घ्या म्हटलं होतं, पण दीक्षित म्हणाले 7 ला घेऊ
इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको
म्हणून कार्यक्रम लवकर घेतला
आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात,
इथं दिक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता
निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्व द्यायचं असते, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत
त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे
पुणेकरांचे आभार मानतो, ही काम सुरु असताना पुणेकरांनी संयम दाखवला
पुण्याचा विकासाच आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे
ऑक्टोबर 2021 मध्ये निगडी ते दापोडी प्रवास सुरु करु शकतो
-
मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव चांगला आहे – नीलम गोऱ्हे
मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव चांगला आहे
लवकरच पुणेकर मेट्रो मधून प्रवास करु शकणार
शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल
आयटी क्षेत्रातील नागरिकांसाठी मेट्रोचा वापर कसा करता येईल याचा विचार व्हावा
त्यामुळे वाहतुकीवरील मोठा ताण कमी होईल
-
नाशिक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
नाशिक – जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता..
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर आता पालकमंत्री छगन भुजबळांच्या बैठकीकडे लक्ष..
संध्याकाळी 4 वाजता भुजबळ घेणार परिस्थितीचा आढावा..
आढावा घेऊन निर्बंध शिथिलते बाबत निर्णय घेण्याची शक्यता..
दुकाने,हॉटेल्स यांची वेळ वाढण्याची शक्यता..
-
धक्कादायक, दहशतवाद्याप्रमाणेच घातपातासाठी आता नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर
– धक्कादायक, दहशतवाद्याप्रमाणेच घातपातासाठी आता नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर– गडचिरोली आणि गोंदिया च्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर– दंडकारण्य भागातंही ड्रोनचा वापरत करतात नक्षलवादी– पोलीसांवर निगरानी आणि घातपातासाठी नक्षलवादी वापरतात ड्रोन– नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध– नक्षलवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी पोलीसंही आता खरेदी करणार ॲंटीड्रोन– नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती -
साकोलीतील थरारक दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेची चपराक
– साकोलीतील थरारक दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेची चपराक
– अवघ्या 24 तासात 22 लाख रकमेसह आठ आरोपींना अटक.
– भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे सिने स्टाईल ने बावीस लाखाची रोक रक्कम चोरनारां आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात अटक केली आहे. तर या चोरीचा मुख्य सुत्रधार हा चालकच निघाला.
-
अजित पवारांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा झेंडा
अजित पवारांनी रिमोटने केले मेट्रोचे उदघाटन
अजित पवारांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा झेंडा
पुणे मेट्रो धावली
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित
वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची धाव
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी
तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे ३.५ किलोमीटर अंतरात ही चाचणी
मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती.
चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन
-
कोरोनातून बरे झालेल्यांना पाच प्रकारचे त्वचा विकार
– कोरोनातून बरे झालेल्यांना पाच प्रकारचे त्वचा विकार
– नागपूर मेडीकलच्या त्वचारोग विभागाच्या अभ्यासातून समोर
– त्वचेवर पुरळ, खाज सुटणे, अंगावर पित्ताच्या गाठी, नागिण ची समस्या
– कोरोनानंतर केस गळणाऱ्या रुग्णाचंही मोठं प्रमाण
– रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना त्वचारोगाचं जास्त प्रमान
– त्वचारोग दिसताच त्वरीत उपचार करण्याचं डॅाक्टरांचं आवाहन
-
नागपुरात दोन दिवसांत 798 ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
– नागपुरात दोन दिवसांत 798 ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
– 798 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
– नागपूर महानगरपालिकेनं दोन दिवसांत केलं 16021 घरांची पाहणी
– नागपुरात पावसाळी वातावरणामुळे वाढले तापाचे रुग्ण
– खाजगी रुग्णालयात वाढली रुग्णांची गर्दी
– लक्षणे अंगावर न काढण्याचा डॅाक्टरांचं आवाहन
-
मुंबईत सध्या कुठेही पावसाची चिन्ह नाहीत
मुंबईत सध्या कुठेही पावसाची चिन्ह नाहीत
– मुंबई शहर, मुंबई ऊपनगर, पश्चिम ऊपनगर या ठिकाणी पाऊस नाही…
– आकाशात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता…
-
नागपूरकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीस स्थगिती
– नागपूरकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीस स्थगिती
– पाच टक्के पाणीपट्टी वाढीस मनपा आयुक्तांची स्थगिती
– दरवर्षी पाणीपट्टीत होणारी ५ टक्के वाढ यंदा होणार नाही
– कोरोनामुळे नागपूरकर आर्थिक संकटात असल्याने स्थगिती
– नागपूरातील ३ लाख ७२ हजार नळधारकांना मनपाचा दिलासा
-
नवोदित अभिनेत्रीकडे शरीरशुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेने दिला चोप
नवोदित अभिनेत्रीकडे शरीरशुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेने दिला चोप
चित्रपटात लीड रोलच्या बदल्यात कॉम्प्रोमाईज करण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र सैनिकांनी सापळा रचला आणि घोडबंदर रोडवरील फार्म हाऊसवरुन तरुणीची सुटका केली
-
उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवणार पुणे मेट्रोला हिरवा झेंडा
पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवणार पुणे मेट्रोला हिरवा झेंडा
वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर आज होणार पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन
Published On - Jul 30,2021 6:27 AM