Maharashtra News LIVE Update | पुढच्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात जोरदार पावासाचा इशारा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates
LIVE NEWS & UPDATES
-
पुढच्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात जोरदार पावासाचा इशारा
मुंबई : पुढच्या काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात जोरदार पावासाचा इशारा
वादळी वाऱ्यासह पावासाचा दिला इशारा
हवामान खात्यानं वर्तवला अंदाज
Latest satellite image indicating the cloud spread/intensity across Konkan, Madhya Mah and parts of Marathwada at 20.20hrs Nowcast issued by IMD for all these regions for possibility of TS?? associated with lightning &mod to intense rains. Keep watch on IMD updates@RMC_Mumbai pic.twitter.com/KlCpmduY4X
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2021
-
जालना शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात
जालना : शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात
या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला
असे असले तरी शेतकरी मात्र मोठ्या पावसाची वाट बघत आहेत
शहरात गांधी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच इतर भागातही पाऊस झाला
-
-
हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाण यांची भेट, मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा
कराड : हर्षवर्धन पाटील यांनी घेतली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट
मराठा आरक्षणप्रश्नी केली चर्चा
भाजप नेते मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावरील बैठक संपली, मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आला आढावा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावरील बैठक संपली
उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी बैठकीला अपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा समाज आरक्षणावरील मुख्य सचिव तुकाराम कुंटे आणि अजोय मेहता यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आढावा घेण्यात आला
-
सांगली शहरात मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन
सांगली : शहरात मान्सून पूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. त्यामुळे दिवसभर उन्हाने काहिली झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला.
-
-
जालना जिल्हयात ढगाळ वातावरण, पाऊस पडण्याची शक्यता
जालना : जिल्हयात ढगाळ वातावरण
पाऊस पडण्याची शक्यता
-
लोणावळ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु
पुणे -लोणावळ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु
-दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता
आणि सायंकाळच्या सुमारास विजेच्या गडगडाट सहित मेघ दाटून येत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला
-या पाऊसामुळे जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक धीमी
-
कर्जत, खालापूर, खोपोली, सुधागड, पेण परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस
रायगड : कर्जत, खालापूर, खोपोली, सुधागड, पेण परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस
कोकोण किनारपट्टीवर तीन दिवस पाउस पडणार असा ईशारा हवामान खात्याने दिला होता
-
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मिळणार अर्थसहाय्य
आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
• कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मिळणार अर्थसहाय्य
• उद्योग निरीक्षक (गट- क) संवर्गाची नामनिर्देशाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्याचा निर्णय
स्थलांतरीत ऊस तोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना
-
आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये 5 जून रोजी होणाऱ्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा
मुंबई : 5 जून रोजीच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा
आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये होतोय मोर्चा
आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा
बीडच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची माहिती
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली : विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
सकाळी 9:30 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे रवाना होणार
दुपारी 12 वाजता जिल्हा रुग्णालय येथे अगमन
त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढे त्यांच्या सोयीने वाशिमकडे प्रयाण
-
बीडमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी नदीत बुडाल्या
बीड : कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी नदीत बुडाल्या
तिघींचा मृत्यू तर एक मुलगी वाचली
गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील दुर्दैवी घटना
मृतांत आई, मुलगी आणि पूतणीचा समावेश
रंजना गोडबोले 30, शीतल 10 आणि अर्चना 10 यांचा मृतांत समावेश
आरती गोडबोले या मुलीवर उपचार सुरू
पोलीस आणि गावकरी घटनास्थळी दाखल
-
नाशकात डॉक्टर असोसिएशन विरोधात आता जिल्हाधिकारी आक्रमक
नाशिक – डॉक्टर असोसिएशन विरोधात आता जिल्हाधिकारी आक्रमक
डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधला
अशी भूमिका घेणं योग्य नाहीच
प्रत्येक हॉस्पिटल मधल्या 80 टक्के जागा अधिग्रहित केल्या आहेत
हे नियम सर्वांसाठी बंधनकारक आहेत
कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकारी सक्षम आहेत
त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडाव्या, पण आसंवेधानिक भूमिका घेऊ नये
पब्लिक कडून येणार प्रेशर हे डॉक्टरांनी दिलेलं मुख्य कारण
-
कर्जत रेल्वे पोलिसांनी डोगंराळ भागात घाटमाथ्यावर चार किमी पायपिट करुन वाचविले आदिवासी महीलेचा प्राण
रायगड –
कर्जत रेल्वे पोलिसांनी डोगंराळ भागात घाटमाथ्यावर चार किमी पायपिट करुन वाचविले आदिवासी महीलेचा प्राण.
कर्जत ते लाणावळा रेल्वे घाटमार्गात दुर्गम भागात रेल्वे ट्रँकवर बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली होती अदिवासी महीला.
दुपारच्या सुमारास कोणतेही रेल्वे येणारी-जाणारी नसल्याने अखेर वाहन मार्गे ८-९ किमी व चार किमी डोगंराळ भागात पायपिट करुन झोळीत उचलुन आणुन महीलेवर केले उपचार.
रेल्वे प्रशासनाकडुन रेल्वे अधिकारी व पोलीसांचा होणार सत्कार
-
सेवा दिली नाही तर थेट कारवाई करु, नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा डॉक्टर संघटनांना दणका
नाशिक – सेवा दिली नाही तर थेट कारवाई करु
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा डॉक्टर संघटनांना दणका
हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन चा निर्णय चुकीचा
हा एकतर्फी निर्णय
वैद्यकीय सेवा देणं हे त्यांचं कर्तव्य
आज दुपारी चर्चेसाठी डॉक्टरांना बोलावणार आहे
कारवाई केली म्हणून असा दबाव आणण चुकीचं आहे
डॉक्टर असोसिएशन ने निर्णय घेण्यापूर्वी कोणतीही चर्चा केलेली नाही
-
पेट्रोल डिझेल दर वाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे बोरिवलीत विरोध मोर्चा
मुंबई –पेट्रोल डिझेल दर वाढी विरोधात काँग्रेस पक्षातर्फे बोरिवलीत विरोध मोर्चामुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप सह अन्य नेत्यांची हजेरी -
नागपुरात पाचपावली पोलीस स्टेशन समोर माजी महापौर संदिप जोशी यांचे धरणे आंदोलन
नागपूर
– पाचपावली पोलीस स्टेशन समोर माजी महापौर संदिप जोशी यांचे धरणे आंदोलन
– पाचपावली पोलीस स्टेशन गेटवर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी
– दिलीप कडेकर यांच्या मृत्यूप्रकरणात रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
– दिलीप कडेकर यांच्या परिवारातील सदस्यांसह धरणे आंदोलन
– क्रिस्टल हॅास्पीटल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
-
सांगलीत ज्यादा दराने होतेय स्टॅम्प विक्री
सांगलीत ज्यादा दराने होतेय स्टॅम्प विक्री
लोकडाऊन मुळे शहरातील सर्व स्टॅम्प दुकाने बंद आहेत
याच गोष्टी चा गैरफायदा घेऊन काही एजंट जादा दराने करत आहेत विकी
एकीकडे दस्त नोंदणी कार्यलय सुरू तर दुसरी कडे स्टॅम्प विक्री दुकाने बंद हा विरोधाभास
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जे गैरप्रकार थांबवणे साठी
स्टॅम्प विक्री दुकाने सुरू करण्यास परवानगी देयावी अशी नागरिकांतून होत आहे मागणी
-
कोयना धरणात 29.27 टीएमसी पाणी साठा शिल्लक
कराड –
कोयना धरणात 29.27 टीएमसी पाणी साठा शिल्लक
धरणात दीड महिना पुरेल एवढा समाधान कारक पाणीसाठा शिल्लक
1 जून पासून सुरू झाले 2021- 22 चे नवीन तांत्रिक वर्ष
2020 -21 या तांत्रिक वर्षात कोयना धरणातून 3218.26 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली गेली
-
मिरजेत द्राक्ष व्यापाऱ्यला दुबई तील कंपनीचा 2 कोटी 80 लाखांनी गंडा
सांगली –
मिरजेत द्राक्ष व्यापाऱ्यला दुबई तील कंपनीचा 2 कोटी 80 लाखांनी गंडा
पाठवलेल्या द्राक्षे चे पैसे देनेस द टाळाटाळ
महात्मा गांधी पोलीस ठाण्यात फसवणूक ची तक्रार दाखल
जान जबेल अल नजर फुडस्टफ असे दुबई तिला कंपनी चे नाव
तर पांडुरंग जगताप असे द्राक्ष व्यापारी चे नाव
पोलीस अधिक तपास करत आहेत
-
मुंबईत आता रस्त्यावर थुंकल्यास 1200 रुपये दंड, दंड वाढवण्यास आयुक्तांची मंजुरी
मुंबई –
रस्त्यावर थुंकल्यास 1200 रुपये दंड
दंड वाढवण्यास आयुक्तांची मंजुरी
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासारख्या अनेक आजारांना निमंत्रण ठरत असल्याने अशा पिचकारी बहादरांना सध्या 200 रुपये करण्यात येणारा दंड 1200 रुपयांपर्यंत वाढवण्यास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मंजुरी दिली
-
शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
औरंगाबाद –
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी गुन्हा दाखल
इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवर गुन्हा दाखल
अवाजवी दंड ठोठावल्या प्रकरणी इम्तियाज जलील गेले कामगार कार्यालयात
कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांची जलील यांनी काढली होती खरडपट्टी
-
बुलडाणा जिल्ह्यात 54 टक्केच शेतकऱ्यांना मिळणार बियाणे
बुलडाणा
जिल्ह्यात 54 टक्केच शेतकऱ्यांना मिळणार बियाणे
बिजोत्पादनाचे क्षेत्रं 16 टक्क्यांनी घटले, परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
परिणामी शेतकऱ्यांनी महाबीज कार्यालयांमध्ये बियाणे खरेदीसाठी गर्दी केलीय
मागील वर्षी 11 हजार हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविला होता
यामध्ये 5 हजाराच्या वर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, मात्र मागील दोन वर्षे परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले असल्याने बिजोत्पादनास फटका बसला होता
-
सिंदखेडराजा नगर पालिका उपाध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव
बुलडाणा
सिंदखेडराजा नगर पालिका उपाध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या 15 सदस्यांनी नगराध्यक्षाकडे दिला प्रस्ताव
महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला जावा यामुळे घेतला सदस्यांनी निर्णय
पालिकेचे उपनगराध्यक्ष पद हे नंदा मेहेत्रे यांच्याकडे आहे
तर येत्या 10 दिवसांत पालिकेची महत्वपूर्ण सभा होणार, त्यामुळे शहरवासीयांचे सभेकडे लक्ष लागलेय
-
पुणे अतिक्रमण विभागानं अपंग व्यक्तीच्या छोटा हत्ती टेम्पोला लावलेले जॅमर मनसेने हातोड्याने तोडले
पुणे –
हातोडा पँटर्न मनसेचे नगरसेवक वसंत मोरेचा आणखी एक कारनामा
पुणे अतिक्रमण विभागानं अपंग व्यक्तीच्या छोटा हत्ती टेम्पोला लावलेले जँंमर हातोड्याने तोडले
अपंग व्यक्तीचा टेम्पोच्या माध्यामातून करत होता आंबे आणि कलिगंड विकण्याचा व्यवसाय
अनधिकृत पद्धतीनं गाडी लावतं व्यवसाय करत असल्याचा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ठपका
Published On - Jun 02,2021 9:29 PM