Maharashtra News LIVE Update | पुण्यातील कारखान्यात आगीमुळे जीवितहानी, मुख्यमंत्र्यांना अजूनही कळलेलं दिसत नाही : अतुल भातखळकर

| Updated on: Jun 09, 2021 | 4:01 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पुण्यातील कारखान्यात आगीमुळे जीवितहानी, मुख्यमंत्र्यांना अजूनही कळलेलं दिसत नाही : अतुल भातखळकर
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jun 2021 06:44 PM (IST)

    भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?

    मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात झाली आहे. या बैठकीला राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे, पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीसाठी दाखल उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी निवासस्थानी ही बैठक सुरू आहे.

    कोणत्या विषयांवर चर्चा :

    राज्यातल्या राजकीय घडामोडींवर आढावा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर खलबतं

    पक्षवाढीच्या दृष्टिकोनात आढावा

    राज्यातल्या मराठा आरक्षण, कोरोनाच्या परिस्थितीवर पक्षाची भूमिका

    महापालिका निवडणुकीत भाजप पक्षाची स्थिती

  • 07 Jun 2021 10:04 PM (IST)

    पुण्यातील कारखान्यात आगीमुळे जीवितहानी, मुख्यमंत्र्यांना अजूनही कळलेलं दिसत नाही, अतुल भातखळकर यांची टीका


  • 07 Jun 2021 10:02 PM (IST)

    शोकाकुल कामगार कुटुंबीयांचे सांत्वन, त्यांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो : शरद पवार

  • 07 Jun 2021 09:30 PM (IST)

    मुळशी तालुक्यातील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख, शोकसंवेदना कळवल्या

    मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत काही निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवतो. तसेच कारखान्यातील इतर सर्व लोकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

  • 07 Jun 2021 09:28 PM (IST)

    गुलाबराव पाटील सुपारीचोर, निलेश राणेंची घणाघाती टीका

    जळगाव -भाजपचे माजी खासदार निलेश राणेंची शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका

    -म्हणाले, गुलाबराव पाटील सुपारीचोर, ते वाळूचोरी शिवाय दुसरं काही करू शकत नाही. त्यांची अक्कलच तेवढी

    -जळगाव जिल्ह्यात जी वाळूचोरी चालते, त्याचे हफ्ते त्यांच्यापर्यंत जातात. म्हणूनच वाळूचोरी चालते

    व्हिडिओ हॉट लाईनवर आहे लवकर घ्या

  • 07 Jun 2021 05:39 PM (IST)

    तुमसर-भंडारा महामार्गावर झाड कोसळल्याने एका तासापासून वाहतूक ठप्प

    भंडारा : जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर विजेचा कडकडाटासह तब्बल अर्धा तास पावसाने बँटिग केली आहे. या पावसामुळे अनेक झाडे कोलमडून पडलेली आहेत. तर तब्बल एका तासापासून तुमसर-भंडारा महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे गाड्याचा रांगाच रांगा पाहायला मिळात आहेत.  तर आज आलेल्या पावसामुळे शेतकरी सुखवला असून शेती मशागतीला वेग येणार आहे.

  • 07 Jun 2021 05:36 PM (IST)

    देवळी आणि आर्वी तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस

    वर्धा : देवळी आणि आर्वी तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस

    – देवळी तालुक्यातील पुलगाव, दहेगाव, नाचणगाव, कवठा, कुरझडी आणि आर्वी तालुक्याच्या रासुलाबाद, सोरटा, विरुळ परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

    – अर्ध्या तासपासून पावसाची जोरदार बॅटिंग

    – पावसामुळे मार्गक्रमण करणाऱ्यानांही शोधावा लागला जवळपास आसरा

    – जोरदार पावसामुळे उकाडा कमी होऊन नागरिकांना दिलासा

    – मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतीकामांना येणार वेग

  • 07 Jun 2021 05:07 PM (IST)

    नाणार विभागातील 11 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या, उदय सामंत यांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला 

    सांगली – नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ

    नाणारवरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत

    मात्र त्याचा काही परिणाम शिवसेनेवर होणार नाही

    नाणार विभागात ग्रामपंचायती झाल्या त्याठिकाणी 11 च्या 11 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत

    त्यामुळे नाणारमुळे फार काही मोठे परीणाम आणि शिवसेनेला कोणताही राजकीय फटका बसणार नाही

    – उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला

  • 07 Jun 2021 04:51 PM (IST)

    इंदापूर येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

    इंदापूर : पुणे-सोलापूर हायवेवर इंदापूर शहराजवळ बोलेरो व ईट्रिका या  गाड्यांचा अपघात  झाला आहे

    या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे

    मृतांमधील चार लोक पंढरपूरमधील असून एका जणाची अजून ओळख पटलेली नाही

    पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 07 Jun 2021 04:25 PM (IST)

    वृद्ध पत्नीला मारहाण प्रकरण, हिललाईन पोलिसांनी ठोकल्या गजानन बुवा चिकणकर यांना बेड्या

    उल्हासनगर : वृद्ध पत्नीला मारहाण प्रकरण

    हिललाईन पोलिसांनी ठोकल्या गजानन बुवा चिकणकर यांना बेड्या

    पोलिसांनी नुकतंच गजानन बुवा चिकणकर यांना पोलीस ठाण्यात आणलं

    व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी सु मोटोने दाखल केला होता गुन्हा

  • 07 Jun 2021 04:24 PM (IST)

    जालना शहर तसेच परिसरात संततधार पावसाला सुरुवात  

    जालना : शहर परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे

    जालना शहरात सध्या विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे

    या पावसामुळे जालना शहर आणि परिसरात गारवा निर्माण झाला आहे

    तर असाच पाऊस सुरू राहीला तर शेतकऱ्यांचा खरिप हंगाम चांगला राहणार

    सध्या शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत

  • 07 Jun 2021 04:18 PM (IST)

    औरंगाबादेत आज पुन्हा पावसाला सुरुवात, गेल्या 8 दिवसांपासून रोज पाऊस

    औरंगाबाद :औरंगाबादेत आज पुन्हा धुवांधार पावसाला सुरुवात

    गेल्या आठ दिवसांपासून रोज कोसळतोय धुवांधार पाऊस

    औरंगाबाद शहरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरू

    औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी

    जिल्ह्यात कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी सुखावला

  • 07 Jun 2021 04:00 PM (IST)

    मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य आणि केंद्रानं टोलवाटोलवी केल्यामुळेच प्रलंबित, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांची प्रतिक्रिया 

    पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य आणि केंद्रानं टोलवाटोलवी केल्यामुळेच प्रलंबित

    राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेल्या एका पत्रानं आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही

    राज्य सरकारला मराठा समाजाचं पुन्हा सर्वेक्षण करून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल केंद्राला द्यावा लागणार

    पंतप्रधानांच्या भेटीत राज्यानं आणि केंद्रानं ज्याची त्याची भूमिका पार पाडायला हवी

    मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

    नव्यानं प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वेक्षणाची गरज

    मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांची मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीवर प्रतिक्रिया

  • 07 Jun 2021 03:40 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने 

    रायगड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसने केली निदर्शने

    पेण तालुक्यासह खालापूर तालुक्यातील रसायनी-मोहपाडा परिसरात पेट्रोलपंप परिसरात काँग्रेसने केद्रं सरकारच्या विरोधात निदर्शने करीत घोषणा दिल्या.

    यावेळी काही ग्राहकांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात सतांप व्यक्त केला.

  • 07 Jun 2021 03:09 PM (IST)

    कोल्हापूरनंतर सोलापुरात धडकणार मराठा क्रांती मोर्चा

    सोलापूर – कोल्हापूरनंतर सोलापुरात धडकणार मराठा क्रांती मोर्चा

    – 16 जूननंतर कोल्हापूरनंतर महाराष्ट्रात दुसरा मोर्चा सोलापुरात निघणार

    – छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या वेळा घेऊन ठरणार मराठा मोर्चाची तारीख

    – मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मोठा निर्णय

     

  • 07 Jun 2021 01:37 PM (IST)

    आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत चर्चा – विखे पाटील

    भाजपच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात बैठक घेतली

    समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे

    राज्यभरातील समाजबांधवांना बोलावण्यात आले होते

    आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत चर्चा केली

  • 07 Jun 2021 01:35 PM (IST)

    विखे पाटील यांच्या उपस्थितीत नाशकात मराठा नेत्यांची बैठक

    नाशिक – विखे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा नेत्यांची बैठक

    भाजपाचे आमदार आणि नेते बैठकिला उपस्थित

    मराठा आरक्षणाची पुढची दिशा बैठकीत ठरण्याची शक्यता

  • 07 Jun 2021 01:35 PM (IST)

    मुंबईत पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत आंदोलन नाही

    पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत आज महाराष्ट्र काँग्रेसने आंदोलन केले

    पण मुंबईत मात्र पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत आंदोलन नाही

    पेट्रोल डिझेल दरवाढी बाबत महाराष्ट्रात आंदोलन होत असताना राज्याच्या राजधानीत काँग्रेसचे आंदोलन नाही

    त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसमध्ये समनव्य नसल्याचे चित्र

  • 07 Jun 2021 12:30 PM (IST)

    पेट्रोलची शंभरी पार झाल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे सोलापुरात आंदोलन

    सोलापूर –

    पेट्रोलची शंभरी पार झाल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन

    क्रिकेटरच्या वेशात मोदींचा प्रतिकात्मक वेष परिधान करून केला निषेध

    शहरात विविध ठिकाणी सुरू आहे युवक कॉंग्रेसचे पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन

    मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 07 Jun 2021 12:29 PM (IST)

    भुदरगड तालुका पंचायतमधील भाजपच्या एकमवे सदस्या आक्काताई नलावडे यांचा शिवेसेनेत प्रवेश

    कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना आणखी एक धक्का

    भुदरगड तालुका पंचायतमधील भाजपच्या एकमवे सदस्या आक्काताई नलावडे यांचा शिवेसेनेत प्रवेश

    खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश अबिटकर यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन

    चंद्रकांतदादांच गाव असलेलं पंचायत समिती मधील सदस्यच शिवसेनेच्या गळाला लागल्यान चर्चेला उधाण

  • 07 Jun 2021 12:10 PM (IST)

    औरंगाबादेत मुसळधार पावसात तुडुंब भरलेल्या चेंबरमध्ये तरुण पडला

    औरंगाबाद –

    मुसळधार पावसात तुडुंब भरलेल्या चेंबरमध्ये पडला तरुण

    नशीब बलवत्तर म्हणून दुसऱ्या चेंबर मधून बाहेर निघाला तरुण

    20 फुटांचं अंतर आणि तीस सेकंदाच्या थरारांनंतर वाचला तरुणाचा जीव

    औरंगाबाद शहरातल्या जय भवानीनगर परिसरातली घटना

    मोरेश सुळ असं या 18 वर्षीय तरुणाचे नाव

    मुसळधार पावसामुळे रस्त्याला आले होते नदीचे रूप

    वाहत्या पाण्यातून चालताना उघड्या चेंबर मध्ये पडला होता तरुण

    एक चेंबर मध्ये पडून 20 फुटवरील दुसऱ्या चेंबर मधून निघाला

    अवघ्या 25 सेकंदात काळजाचा ठोका चुकवणारी घडली घटना

  • 07 Jun 2021 12:09 PM (IST)

    वसई विरार मध्ये रिमझिम पावसाला सुरुवात

    वसई:- वसई विरार मध्ये रिमझिम पावसाला सुरुवात

    सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे

    रिमझिम।पावसामुळे हावेत पासरलाय गारवा

    वसई च्या 60 फिट रोडवरील 11 वाजताची दृश्य

  • 07 Jun 2021 11:10 AM (IST)

    इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात करण्यात आली निदर्शने

    इचलकरंजी –

    शहरातील शहर काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात करण्यात आली निदर्शने

    केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणा मोदी सरकार चले जाव

    शहरातील पेट्रोल पंप पर्यंत टू व्हीलर ची अंत्ययात्रा काढण्यात आली

    पेट्रोल डिझेल दर कमी करावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शाळेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे

    पेट्रोल डिझेल दर वाढल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाब फूल वाहनधारकांना देऊन केंद्र सरकारचा केला निषेध

  • 07 Jun 2021 11:09 AM (IST)

    सोलापुरात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

    सोलापूर –

    इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

    गाड्या भंगारात विकून आंदोलन

    स्कुटी गाडी भंगारात विकून केले आंदोलन

    दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध

    मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 07 Jun 2021 11:09 AM (IST)

    पुण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आंदोलन

    पुणे –

    – पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आंदोलन,

    – पुण्यात विविध ठिकाणच्या २५ पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करण्यात येणार आहेत,

    – अलका टॉकीज चौकातील पेट्रोल पंपावर माजी आमदार
    मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

  • 07 Jun 2021 10:51 AM (IST)

    भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी दिले नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना डेपुटेशन

    नागपूर –

    भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना डेपुटेशन

    सामान्य गरीब माणसाला राशन कार्ड वरून धान्य मिळत नाही

    जवळ पास नागपुरातील 50 हजार नागरिकांना मिळत नाही धान्य

    ज्या नागतिकानी लॉक डाऊन च्या काळात धान्य उचललं नाही त्यांची नावे बाद करण्यात आली

    या नागरिकांना लवकरात लवकर धान्य वितरण सुरू करण्यात यावे

    सात दिवसात या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात येणार

  • 07 Jun 2021 10:46 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे महावितरणविरोधात शिवसेना आंदोलन करणार

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज 11 वाजता महावितरणच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार आहे

    शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असूनही महावितरण कंपनी विरोधात आंदोलन होणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

    महावितरण कंपनीला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे टाळे ठोकणार आहेत

  • 07 Jun 2021 09:55 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात अनेक भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

    पालघर –

    पालघर जिल्ह्यात अनेक भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

    काही भागात दमदार तर काही भागात पावसाची संततधार सुरु

    सकाळपासून पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका

  • 07 Jun 2021 09:54 AM (IST)

    बुलडाण्यात शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

    बुलडाणा –

    शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

    कुऱ्हाडीने वार करुन केला खून

    खामगावच्या आकोली शिवारतील घटना

    मृतकाचे नाव 70 वर्षीय रमेश तिडके राहणार अटाळी असे आहे

    संशयित आरोपी पंकज तिडके वर हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल

  • 07 Jun 2021 09:49 AM (IST)

    पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

    कोल्हापूर

    पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन

    कोल्हापुरात शेतकरी पेट्रोल पंपावर होणार आंदोलन

    काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील आंदोलनात सहभागी होणार

    थोड्याच वेळात होणार आंदोलनाला सुरुवात

  • 07 Jun 2021 07:14 AM (IST)

    आटपाडीच्या ओढ्यात वाहून गेलेल्या त्या भावंडांचा शोध सुरु

    सांगली –

    आटपाडी तालुक्यातील घानंद येथे ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेले असताना 2 सखे आणि एक चुलत भाऊ अशी 3 भाऊंडे वाहून वाहुन गेली

    रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र अंधार असलेमुळे शोध मोहीम मध्ये अडथळा येत होते

    मात्र सकाळी 6 ला पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आहे

    पोलीस गावातील ग्रामस्थ सांगली आणि भिलवडी येथील रेस्क्यू टीम हे त्या मुलांचा शोध घेत आहेत

  • 07 Jun 2021 06:34 AM (IST)

    मुंबईच्या वांद्रे परिसरातील बेहराम पाडा येथे ४ मजली इमारतीचे स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

    मुंबईच्या वांद्रे परिसरातील बेहराम पाडा येथे रजाक चाळीत रात्री 2 च्या सुमारास 4 मजला इमारतीचे स्लॉबचा काही भाग कोसळला या घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला तसेच पांच व्यक्ती जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं..घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित होते. स्थानिक आमदार जीसान सिद्दीकी सांगितले की पावसामुळे ही घटना घडलेली आहे