महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 14 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening
सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने केली आत्महत्या
मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी आढळली
मीरा भाईंदर : भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमच्या पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला
यामध्ये कॅमी ब्रिटो वय 39 नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान दाखल
जालना लोकसभेचे खासदार तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर झडती घेतल्या प्रकरणी, जाफ्राबाद ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांसह तीन कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल सह उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे आणि यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मीरा भाईंदर:- भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला…या मध्ये कॅमी ब्रिटो वय 39 नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या जवान दाखल
नवी मुंबई : ऐरोलीमध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलावर केला गोळीबार
माथेफिरू पिता पोलिसांच्या ताब्यात
भगवान पाटील असं निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे नाव
गोळीबारात मुलाला 3 गोळ्या लागल्याने प्रकृती चिंतजनक
एरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरू
माजी शिवसेना नगरसेवक राजू पाटील यांचे ते नातेवाईक आहेत
पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
मंजुषा विधाते असे महिला अधिकाऱ्याचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार आहेत
त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत
पुणे : बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परीक्षा रद्दचं स्पष्टीकरण
23 मे 29 जून दरम्यान होणार होती परीक्षा
मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द झाल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर
बोर्डानं काढलं अधिकृत परीक्षा रद्दचं परिपत्रक
मुंबई : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले याचं स्वागत आहे. पण दोन्ही राजे राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाहीत. मिठाला जागल्या सारखं ते बोलत आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.
घटनेप्रमाणे निर्णय घेतला गेला पाहिजे. पण राज्यपाल निव्वळ राजकारण करत आहेत. राज्यापाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत घटनेची पायमल्ली होत आहे.
राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नये
नागपूर : नागपूर पोलीस दलात नवीन 72 दुचाकी आणि 14 चारचाकी वाहनांचा समावेश
डीपीडिसीच्या निधीतून देण्यात आले पोलिसांना वाहन
चार्ली पोलीस करणार या वाहनांचा वापर
शहरात गस्त घालणे, गुन्हेगारांच्या शोध घेणे, महिला छेडछाड प्रकरणावर आळा घालण्यासाठी वेगळ्या ड्रेसमधील चार्ली पथक
पोलिसांची पेट्रोलिंग वाढण्यासाठी होणार या वाहनांचा मोठा उपयोग
पालकमंत्री नितीन राऊत यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पोलीस दलात दाखल करण्यात आले वाहन
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्त्री जातीचा मृतदेह सापडला
खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल
महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु
अज्ञातांविरोधात खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल
औरंगाबाद विनायक मेटे पत्रकार परिषद मुद्दे
5 तारखेला बीड येथून आंदोलनास सुरुवात करण्यात आलीय
मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असून 26 जून रोजी औरंगाबाद येथे मेळावा घेणार
सोलापूरलादेखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेळावा
36 जिल्हात मेळावे घेणार
विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार
27 जुनला मुंबईला 10 हजार बाईकची रॅली काढण्यात येणार
5 जुलैपर्यंत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर 7 जुलै रोजी होणारे अधिवेशन चालू देणार नाही
राज्यात 36 जिल्हात 36 मेळावे घेणार
मराठा समाजाला पाठिंब्याचे माओवाद्यांनी दिलेले पत्र सरकारला धोक्याची घंटा आहे
माओवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल
माओवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर 63 गतिरोधकांनी पर्यटक त्रस्त
ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांना वेग शिस्तीपेक्षा शिक्षाच अधिक
आसपासच्या पंधरा ग्रामपंचायतीत राहणाऱ्या ग्रामस्थांना भोगावा लागतोय अधिक त्रास
वन्यजीवांना वेगापासून संरक्षण मिळावे यासाठी उभारण्यात आलेले ब्रेकर ठरत आहेत मृत्यूचे कारण
एका विद्यमान सरपंच महिलेचा रुग्णालयात पोहोचताना झाला गर्भपात तर दुसऱ्या एका बालकाला सर्पदंशानंतर उशिरा मिळाले उपचार
गतिरोधकांच्या मोठ्या संख्येमुळे नागरिकात पसरला रोष
अधिकाऱ्यांनी मात्र गर्भपात- सर्पदंश मृत्यूला गतिरोधकांशी जोडणे चुकीचे असल्याचे मांडले मत
पंढरपूर – आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्याबाबतचा एक आदेश निघालेला आहे
मानाच्या दहा पालख्यांना पंढरपूरकडे एसटी बसने प्रस्थान करता येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा ही गतवर्षीप्रमाणे नियम पाळून होणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी शासनाने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशीचा काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या सर्व पालख्या आपापल्या ठिकाणी परत फिरतील.
मुंबई : छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे हे एकत्र आले असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून आता दोन्ही राजांनी मिळून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर दबाव आणावा. त्यांंनी मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी यासाठी दबाव आणावा मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलीये. दोन्ही राजे एकत्र येत दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारला वाकवतील अशी आशा व्यक्त करत आरक्षणाच्या प्रश्नी दबाव आणावा अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलीये.
शहापूर : शहापूर पोलिसांची धाडसी कारवाई
3 दुचाकी चोरांना पकडले
चोरी केलेल्या 10 दुचाकीसह चोरट्यांना अटक
नवी मुंबई : बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळल्यामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मावळ्यांच्या वेशात सिडको भवनवर धडक
सिडको भवनाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी
कंत्राट रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा – नितीन चव्हाण
– सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय
– सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ माजली होती,
– त्याच्या बांद्रातील घराबाहेर चाहत्यांची गर्दी वाढू लागलीये
– त्यांनी मेणबद्दी आणि पुष्पगुच्छ ठेवत त्याला श्रद्धांजली अर्पण केलीये
– सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते भावूक झालेयत
– अनेकांनी बड्या माफीयांवर टिकास्त्र सोडलंय
– सुशांतच्या मृत्यूचं गूढ आजही कामय आहे. सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे
– सुशांतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारणदेखील चांगलंच तापलं होतं.
– आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरु आहे…
दूध दर आणि शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा एकदा एल्गार
17 जूनला राज्यव्यापी आंदोलनाची हाक
किसान सभेच्या बैठकीत आंदोलनावर शिक्कामोर्तब
17 जूनला राज्यातील सर्व तहसील समोर आंदोलन
किसान सभेचे नेते अजित नवले यांची माहिती
अनेक वेळा मागणी करूनही दूध उत्पादकांच्या पदरी निराशाच
नागपूर –
नागपूर जिल्ह्यातील आमगाव देवळी येथिल नाल्यात दोन मुलं बुडाले
काल पासून होते बेपत्ता , पोलीस आणि परिवारातील लोक घेत होते शोध
नाल्याच्या काठावर कपडे मिळाल्याने नाल्यात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले
हिंगणा पोलीस करत आहे चौकशी
मृतक दोघेही बहीण भाऊ आहेत
आरुषी नामदेव राऊत वय १० वर्ष आणि अभिषेक नामदेव राऊत अशी मृतकांचे नाव आहे
मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक दिसतंय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया
सोळा तारखेला होणाऱ्या आंदोलनाबाबत मात्र कोणतीही चर्चा नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या सुविधा देता येतील याबाबत चर्चा झाल्याची शाहू छत्रपतींची माहिती
– राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चेंबूरमध्ये प्रती बाईकस्वार पन्नास रुपयांचं कुपन वाटप…
– पेट्रोल पंपावर कुपन घेण्यासाठी बाईक स्वारांची लांबचा लांब रांग…
– रांगेत ऊभ्या असलेल्या बाईक स्वारांना मनपा निवडणुकांमध्ये मनसेलाच मत द्या असा प्रचार…
– वाढदिवसानिमित्ताने मनसेची मतबांधणी सुरू
इचलकरंजी –
शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली निदर्शने
कोल्हापूरला घेणाऱ्या मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा घेतला होता निर्णय पोलिसांच्या मदतीनं तर आंदोलन मागे
सोळा तारखेच्या आंदोलनाला मोठ्यांचा किनी कोल्हापूरला जाणार
महाराष्ट्र राज्यातील एकाही मंत्र्याला राज्यात फिरून देणार नाही असा दिला इशारा
मुक्ताईनगर –
10 मानाच्या पालखींमध्ये मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताई पालखीचा समावेश असल्यामुळे आज संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मोजक्या वारकरी संप्रदायात प्रस्थान सोहळा सुरु
पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री एकनाथ खडसे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील मोजक्या भाविकांचा
उपस्थितीत सुरु
सर्वच राजकीय पक्षांच्या उपस्थित सोहळा सुरू
सातारा : कृष्णा नदीत उडी मारलेल्या व्यक्तीची मृतदेह सापडला…
तब्बल 36 तासानंतर मृतदेह शोधुन काढण्यात यश….
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास संगममाहुली येथील पुलावरुन मारली होती उडी….
खिदमत ए ख्लक या संस्थेच्या स्वयंसेवकांकडुन मृतदेह शोधुन काढण्यात यश…
अज्ञात मृतदेहाचे ओळख पटवण्याचे काम सुरु…
मनमाड – निर्दयी आई ने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकले
देवळा तालुक्यातील वासोळ येथील घटना
बाळाच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने पायाला झाली गंभीर इजा
बाळावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
सांगली –
राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांच्या गावातच खताची टंचाई.
कडेगांव येथील अंजली अमित पवार या शेतकरी महिलेने थेट राजू शेटटी यांच्याकडे मांडली खत टंचाईची कैफियत.
वर्धा
– रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
– मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता गेला होता धरणावर
– पोहण्याचा मोह न आवरल्याले तो धरणाच्या पाण्यात उतरला
– पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू
– अंकित जितेंद्र टेभूरणे अस 21 वर्षीय मृत युवकाच नाव
पुरंदर : बारामतीच्या पश्चिम भागातील बिबट्या आता पुरंदर तालुक्यात..
– पंधरा दिवसांपूर्वी बारामतीच्या मगरवाडी, वाकी, गडदरवाडी परिसरात होता बिबट्याचा वावर..
– पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील शेतकऱ्यांना झालं बिबट्याचं दर्शन..
– बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण..
बारामती :
बारामतीच्या बसस्थानकाचं रुप पालटणार..
– ५० कोटी रुपये खर्चून नव्या बसस्थानकाची उभारणी..
– नवीन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात..
– बारामती बसस्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर..
– नवीन बसस्थानक पूर्ण होईपर्यंत एसटी कार्यशाळेतून होणार बस वाहतुक…
औरंगाबाद –
टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दणका
वाळू उपसा होत असलेल्या गोदापात्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
गोदावरी पत्रातून मोटारसायकलद्वारे वाळू उपसा होत आल्याची tv9 ने दाखवली होती बातमी
मोटारसायकलचा वापर करत गोदावरी पत्रातून सुरू होता तुफान वाळू उपसा
वाळू उपस्याची बातमी देताच जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर
अवैध वाळू साठे जप्त करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश
घाटकोपरच्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या
परदेशातून आलेल्या या फोन कॉलद्वारे या गुंडाने 50 लाख रुपयांच्या खण्डनीची मागणी केली
व्यापारयाच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्हा नोंदवल्यानंतर आता गुन्हे शाखेच्या अँटी-एक्स्टर्शन सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुंबई –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस आहे
यंदा सुद्धा वाढदिवस साधे पद्धतीने साजरा होणार आहे
राज ठाकरे यांनी मनसैनिकाना आव्हान केल आहे की कोरोना असलेल्या घराबाहेर गर्दी करू नका
दरवर्षी तुमच्या भेटण्यान मला एक ऊर्जा मिळते पण यंदा सुद्धा भेटण्यासारखी परिस्थिती नाही
असं आव्हान राज ठाकरे यांनी केलंय
हिंगोली –
राज्य महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
हिगोली च्या सेनगाव जवळील धक्कादायक घटना
चोघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव ,पळखेडा इथले रहिवाशी
रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे घडली घटना
खड्ड्यात फोर व्हीलर गाडी पडल्याने पाण्यात गुदमरून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
‘आशां’च्या राज्यव्यापी संघटनांच्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आमची सुरक्षा, आमचे कुटुंब, कष्ट आणि मानधन यावर सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही, असं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
काँग्रेसमध्ये तात्कळ संघटनात्मक विवडणुकांची आवश्यक्ता आहे पक्ष पुस्तावलेला नाही. हे दाखवण्यासाठी मध्यवर्ती आणि राज्य पातळीवर व्यापक सुधारणांची गरज आहे – कपिल सब्बिल
जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख मानले जाणारे जिओना चाना यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा (CM Zoramthanga) यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. चाना यांच्या कुटुंबात सध्या त्यांच्या एकूण 38 बायका आणि 89 मुलं आहेत. हे जगातलं सर्वात मोठं कुटुंब मानलं जात होतं, त्यामुळं मिझोरममधील पर्यटकांच्या आकर्षणाचे ते केंद्र होते.
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील दत्तनगर भागातील डोंगराच्या लगत असणा-या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांसह 13 बैलगाडी चालकांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलीसांनी दोन वाहनांसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.