Maharashtra News LIVE Update | वाशिममध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांची तोडफोड

| Updated on: Jun 18, 2021 | 11:14 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | वाशिममध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांची तोडफोड
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jun 2021 09:44 PM (IST)

    वाशिममध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांची तोडफोड

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यातील कार्ली येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर जाऊन तोरणाळा इथल्या गावकऱ्यांनी केली तोडफोड

    तोरणाळा परिसरातील वीज पुरवठा खंडित असल्याने संतप्त गावकऱ्यांनी केली तोडफोड

    घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटना स्थळी दाखल

  • 18 Jun 2021 08:07 PM (IST)

    शाब्बास रे वाघांनो; भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीवर आमदार नितेश राणेंकडून कौतुकाची थाप

    शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आज आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन हा बहाद्दर भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

    राम जन्मभूमी ट्रस्ट वर बिनबुडाचे आरोप करून हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चा ने थेट शिवसेना भवन वर धडक देऊन आंदोलन केले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती.

    मागे न हटता भिडणाऱ्या भाजपा युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • 18 Jun 2021 07:03 PM (IST)

    हातनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    जळगाव :

    हातनूर धरणाचे 4 दरवाजे 1 मीटरने उघडले

    तापी नदीकाठच्या गावात गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    धरणातून 5809 क्युसेस पाणी सोडण्यात आले

    विदर्भ आणि मध्यप्रदेश येथे झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणी वाढले

  • 18 Jun 2021 06:58 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात

    पिंपरी चिंचवड

    -शहराच्या विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात

    -सकाळपासून शहरात संततधार सुरू होती, काही काळ ऊनही होते

    -मात्र सायंकाळी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली, शहराच्या जवळपास सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली

  • 18 Jun 2021 06:11 PM (IST)

    सांगलीकरांना काहिसा दिलासा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट

    सांगली :

    सांगलीकरांना काहिसा दिलासा

    सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांनी घसरली,

    23 फुटांवर असणारी पाणी पातळी साडे 20 फुटावर आली

    जिल्ह्यात मात्र अधून मधून पावसाची संथदार सुरूच

  • 18 Jun 2021 05:12 PM (IST)

    पीक कर्ज वाटपात अधिकाऱ्याने हयगय केली तर कारवाई केली जाईल : अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    कोरोना पॉझिटिव्हीटी जास्त आहे त्या जिल्ह्यात दौरे, उपाययोजना सुरु स्टाफ अँबुलन्स, औषधसाठा याबाबत तयारी आढावा ऑक्सिजन बेड उपलब्धता याचा आढावा घेतला लहान मुलांसाठी वेगळे अत्याधुनिक व्हेंटिलेटर लागतात ते उपलब्ध करणे ब्लॅक फंगस डोकेवर काढत आहे, त्याची औषधे उपलब्ध करुन देणे, याबाबत आढावा बैठकीत घेतला कोरोनासाठी अतिरिक्त आमदार निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल कोरोना काळात केंद्रात वीज, पाणी इतर सुविधा देणे सूचना प्रत्येक दवाखान्यात ऑडीटर दिवसभर ठेवला जाणार, प्रत्येक शहर तालुकानिहाय दर ठरविले आहेत, तसे आदेश दिले आहेत उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेज लवकरच सुरू करणार, त्यासाठी जमीन हस्तांतरण करणार, कामाला सुरुवात करणार

    मास्क न वापर, विनाकारण फिरणे, दंड आकाराने याबाबत सूचना दिल्या

    15 जुलैपर्यंत पीककर्ज शून्य टक्के व्याजाने उपलब्ध करून देणार

    सर्व बँकांना उद्धिष्ट दिले आहे ते पूर्ण झाले नाही

    पीक कर्ज वाटपात अधिकऱ्याने हयगय केली तर कारवाई केली जाईल

  • 18 Jun 2021 05:03 PM (IST)

    कोरोनासाठी अतिरिक्त आमदार निधी खर्चाला लवकरच मंजुरी देऊ, अजित पवार

    कोरोना पॉझिटिव्हीटी जास्त आहे त्या जिल्ह्यात दौरे , उपाययोजना ,स्टाफ अंबुलन्स औषध साठा याबाबत तयारी आढावा घेण्यात आला . ऑक्सिजन बेड उपलब्धता याचं प्रमण पाहिलं. लहान मुलांसाठी वेगळे अत्याधुनिक व्हेंटिलेटर लागतात ते उपलब्ध करणे. ब्लॅक फंग्स डोके वर काढत आहे , त्याची औषधें उपलब्ध आढावा बैठकीत घेतोय. निधी बाबत आमदारांनी 4 पैकी 1 कोटी खर्च केले आता अधिक 1 कोटी खर्च करण्याची परवानगी मागितली आहे. मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन कोरोना साठी अतिरिक्त आमदार निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.

  • 18 Jun 2021 04:59 PM (IST)

    आरक्षण न टिकवणे हे महाविकास आघाडी सरकारचं पाप : आशिष शेलार

    आशिष शेलार-

    – विदर्भातील वर्धा, भंडारा, नागपूर या भागात दौरा झाला

    – आगामी निवडणूकांबाबत भाजपच्या विधानसभा सदस्यांशी चर्चा झाली

    – ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आंदोलनाची घोषणा केलीय

    – छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ओबीसींचं नेतृत्त्व आहे असं भासवतात

    – हे तिन्ही नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगळी भूमिका घेतात, आणि बाहेर वेगळी भूमिका घेतात

    – आरक्षण न टिकवणे हे महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे

    – छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी यात हेराफेरी केली

    – छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते हेराफेरी चित्रपटातले कलाकार आहेत

    – आरक्षणाला आव्हान देणारा करणारी पिटीशन दाखल करणारे विकास गवळी माजी काँग्रेस आमदाराचे सुपुत्र आहे

    – पिटीशन दाखल करणाऱ्यांपैकी एक नाना पटोले यांच्या जवळचे आहे

    – फडणवीस सरकारने काढलेला जिआर रद्द का केला? याच उत्तर छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी द्यावं

    – मागासलर्गीय आयोग स्थापन करायला १४ ते १५ का लागले

    – १५ महिन्या न्यायालयात वेळकाढू पणा केलाय

    – देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेला या सरकारने केराची टोपली दाखवली

    – ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्यांचे काँग्रेस शी काय संबंध आहे? हे स्पष्ट करावं

    – हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेला फसवतेय

    – जे फडणवीसांना जमलं ते महाविकास आघाडी सरकारला का जमलं नाही? याचं उत्तर द्यावं

    – बीडला अजीत पवार यांचा दौरा असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठी हल्ला झाला, याचा आम्ही निषेध करतोय

  • 18 Jun 2021 04:57 PM (IST)

    पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं, वाहनांचं नुकसान

    पुणे :

    शहरात सुरु असलेल्या पावसामुळे कात्रज येथील चौगुले इंडस्ट्रीजजवळ एक मोठे झाड कोसळले.

    झाडाखाली बऱ्याच दुचाकींचे नुकसान, सुदैवाने कुणीही जखमी नाही

  • 18 Jun 2021 04:10 PM (IST)

    यवतमाळमध्ये पाच ते सहा जनावरे पाण्यात वाहून गेली

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे नाल्याच्या पुरात 5 ते 6 जनावरे गेली वाहून, 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील नाल्याना पूर पुरात 6 जनावर गेली वाहून, प्रसाशनाकडून कुठलीही कारवाई नाही

  • 18 Jun 2021 03:27 PM (IST)

    जळगाव जिलह्यात पावसाची हजेरी

    जळगाव : शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात जलधारा चांगल्याच बरसल्या. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. जिल्ह्यातील बहुसंख्य भागात  पाऊस झाला. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीला वेग येणार आहे.

  • 18 Jun 2021 03:24 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन, पंकजा मुंडेंची घोषणा

    ओबीसी बैठकीनंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली.

    पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाले?

    मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळात भाजप नेते प्रत्येक भागात जाऊन चर्चा करतील. येत्या 26 जूनला चक्काजाम आंदोलन करु. आम्ही न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत.

  • 18 Jun 2021 03:16 PM (IST)

    ओबीसीच्या समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसंदर्भात 26 जूनला चक्काजाम आंदोलन, पंकजा मुंडे यांचा इशारा

    ओबीसीच्या समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसंदर्भात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. राज्यातलं ओबीसींच राजकारण महाविकास आघाडीनं संपवलं आहे, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.

  • 18 Jun 2021 03:15 PM (IST)

    ठाण्याचा नवा कोपरी ब्रिज वापरण्यापूर्वीच तडे, मनसेचं प्रशासनाविरोधात आंदोलन

    ठाणे : नवीन बांधलेल्या कोपरी ब्रिज वापरण्यापूर्वीच तडे गेल्याचे निदर्शनास आले असताना MMRD प्रशासनाच्या  आणि राज्य सरकारच्या विरोधात मनसेने टाळ, मृदुंग, ढोलकी वाजवत आंदोलन केले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पूलाला तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याचे मनसेने निदर्शनात आणले होते. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदर ठिकाणी मनसेच्यावतीने आंदोलन छेडले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसात आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. जोपर्यंत पुलाच्याबाबत कारवाई होत नाही तो पर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नसल्याचे आंदोकांनी सांगितले आहे. दरम्यन 50 ते 60 मनसे पदाधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

  • 18 Jun 2021 03:01 PM (IST)

    नाशिक महापालिकेच्या महासभेत महापौरांना घेरण्याचा प्रयत्न

    नाशिक – महापालिकेच्या महासभेत महापौरांना घेरण्याचा प्रयत्न

    शहरातील गॅस पाईप लाईन च्या कामाला नगरसेवकांचा विरोध

    अख्ख शहर खड्ड्यात गेलेलं असताना, नगरसेवकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप

    ऑनलाईन सभेत ,खड्ड्या बाबत आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांचा आवाज म्युट केल्याने गोंधळ

    शिवसेना मनसेने भाजपवर केले ठेकेदाराला वाचवत असल्याचे आरोप

  • 18 Jun 2021 02:42 PM (IST)

    सोलापूर महानगर पालिकेचे सभेत मोठा गोंधळ

    सोलापूर –

    सोलापुर – सोलापूर महानगर पालिकेचे सभेत मोठा गोंधळ

    सभेत बोलू न दिलाच्या कारणारून भाजपच्या नगरसेवकाने माईक दिले फेकून

    तर महापौर श्रीकांचना यनम यांनी सुरेश पाटिल यांना केले सभेतून निलंबित

    भाजप नगरसेवक सुरेश  पाटील यांचा भाजपला घरचा आहेर

    सुरेश पाटील यांच्या प्रभागातील नाल्यावर असलेल्या बेकायदेशीर घरांच्या पाडकामावर  प्रश्नावरून पालिकेत राडा

    सुरेश पाटील यांच्या पत्रावरून बेकायदेशीर घरे हटविले जात असल्याचे काँग्रेस, एमआयएम आणि शिवसेनेच्या  नगरसेवकांनी केला होता आरोप

    सभेत बोलू न दिलाच्या कारणारून भाजपच्या नगरसेवकाने माईक दिले फेकून

    तर महापौर श्रीकांचना यनम यांनी सुरेश पाटिल यांना केले सभेतून निलंबित

    भाजप नगरसेवक सुरेश  पाटील यांचा भाजपला घरचा आहेर

    सुरेश पाटील यांच्या प्रभागातील नाल्यावर असलेल्या बेकायदेशीर घरांच्या पाडकामावर  प्रश्नावरून पालिकेत राडा

    सुरेश पाटील यांच्या पत्रावरून बेकायदेशीर घरे हटविले जात असल्याचे काँग्रेस, एमआयएम आणि शिवसेनेच्या  नगरसेवकांनी केला होता आरोप

  • 18 Jun 2021 02:39 PM (IST)

    छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरात नक्षल आणि डीआरजी पोलिसांची चकमक

    छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरात नक्षल आणि डीआरजी पोलिसांची चकमक

    या चकमकीत एक महिला नक्षलवादी जागीच ठार

    नक्षलवाद्यांच्या सभेसाठी काही नक्षलवादी बस्तर भागातील सुकमा जिल्हा अंतर्गत चांदामेटा पायरभट्टा जंगल परिसरात 70 नक्षलवादी जुळले होते

    या सभेची माहिती घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांवर केला हल्ला

    दीड ते दोन तास चालली चकमक

    काही नक्षलवादी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

    घटनास्थळापासून नक्षलवाद्यांचे 01 एके-47 रायफल, 02 पिस्टल, 12 बोर बंदूक, 01 भरमार बंदूक अश अनेक शस्त्र पोलिसांनी केले जप्त

  • 18 Jun 2021 12:58 PM (IST)

    संबंध असल्याच्या संशयावरुन निष्पाप 14 वर्षीय पुतणीची काकाकडून हत्या

    डोंबिवली –

    संबंध असल्याच्या संशयावरुन निष्पाप 14 वर्षीय पुतणीची काकाने केली हत्या

    डोंबिवलीत घडला प्रकार

    पोलिसानी आरोपीला केली अटक

  • 18 Jun 2021 12:52 PM (IST)

    कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहामधून कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरु

    कराड –

    कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहामधून कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरु

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असल्याने 2100 कयुसेक पाणी पायथा गृहामधून सोडण्याचा धरण व्यवस्थापनाचा निर्णय

    105 tmc पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात 35.46 tmc पाणीसाठा शिल्लक आहे

    धरणात पाणी आवक 24275 कयुसेक होत आहे

  • 18 Jun 2021 12:51 PM (IST)

    कोल्हापुरात चालत्या दुचाकीवर झाड कोसळल, अपघातात आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू

    कोल्हापूर :

    जिल्ह्यात पावसाचे दोन बळी

    चालत्या दुचाकीवर झाड कोसळल

    अपघातात आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू

    कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज जवळील घटना

    सतीश शिंदे आणि शांताबाई जाधव या दोघांचा अपघातात मृत्यू

    आजीला गावी सोडायला जाताना दुचाकीवर झाड कोसळलं

    गडहिंग्लज आजरा मार्गावरची दुर्दैवी घटना

  • 18 Jun 2021 11:46 AM (IST)

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, बीडमध्ये मराठा तरुणाचा राडा

    बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे

    बीडमध्ये मराठा तरुणाचा राडा

    अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न

    पोलिसांनी तरुणाला रोखले

    हनुमान फफाळ असं तरुणाचं नाव

  • 18 Jun 2021 09:42 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणक्षेत्रात गेल्या 24 तासात 74 मि.मी. पाऊस

    पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणक्षेत्रातील आजचा पाऊस

    – गेल्या २४ तासात झालेला पाऊस- 74मि.मी.

    – 1 जूनपासून झालेला पाऊस- 243मि.मी.

    – गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस- 183 मि. मी.

    – धरणातील सध्याचा पाणीसाठा- 29.60% टक्के

    – गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 31.84% टक्के

  • 18 Jun 2021 08:56 AM (IST)

    नाशकात मंगल कार्यालये, लॉन्सच्या घरपट्टी माफीसाठी महापालिकेची मेहेरबानी

    नाशिक – मंगल कार्यालये, लॉन्स च्या घरपट्टी माफीसाठी महापालिकेची मेहेरबानी

    शाळा, महाविद्यालयांसह इतर आस्थापनां मात्र ठेंगा

    मंगल कार्यालयांना एक न्याय आणि इतरांना दुसरा का

    विरोधकांचा स्थायी समिती सभापतींना सवाल

    आजच्या महासभेत गोंधळ होण्याची शक्यता

  • 18 Jun 2021 08:52 AM (IST)

    नाशिक महापालिकेत फिक्सपे वर भाजप करणार महाभरती

    नाशिक – महापालिकेत फिक्सपे वर भाजप करणार महाभरती

    भाजप आज महासभेत मांडणार प्रस्ताव

    अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 2000 रिक्त पद

    ठेकेदारीकरणाला ब्रेक आणि भूमिपुत्रांना साद घालण्याचा प्रयत्न

    महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

  • 18 Jun 2021 08:23 AM (IST)

    पुण्यातील नव्यानं महापालिकेत समाविष्ट गावाच्या सांडपाणी प्रकल्पाच्या काढलेल्या निवीदेला सहाव्यांदा मुदतवाढ

    पुण्यातील नव्यानं महापालिकेत समाविष्ट गावाच्या सांडपाणी प्रकल्पाच्या काढलेल्या निवीदेला सहाव्यांदा मुदतवाढ

    महापालिकेला मिळेना कंपन्यांचा प्रतिसाद,

    11 गावांसाठी महापालिकेनं आराखडा तयार करून 392 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निवीदा काढलीये,

    मात्र कंपन्याचं पुढे येत नसल्यानं सहाव्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ पालिकेवर आलीये,

    कंपनीनं निवीदा स्विकारल्यानंतर चार वर्षाचा कालावधी लागणार प्रकल्प पुर्ण होण्यासाठी,

    निविदेला मुहूर्त कधी लागणार, समाविष्ट गावातील नागरिकांचा महापालिकेला सवाल

  • 18 Jun 2021 08:15 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग, शिवसेनेच्या दोन नगरसेविका भाजपमध्ये

    – नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग

    – बुटीबेरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविका भाजपमध्ये

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

    – विकासनिधी मिळत नसल्याने नगरसेवकांची सेनेवर होती नाराजी

    – सेनेचे आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती

    – बुटीबेरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या प्रयत्नामुळे सेनेला सुरुंग

    – काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश

  • 18 Jun 2021 08:12 AM (IST)

    नागपुरात स्टँम्प पेपरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार

    – नागपुरात स्टँम्प पेपरचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार
    – अधिक भावात स्टँम्प पेपर विकणाऱ्या वेंडरवर कडक कारवाई करणार
    – नागपूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ठाकरे यांचा इशारा
    – विक्रेत्यांनी बेव साईटवर वितरण जाहीर करण्याचे निर्देश
     – पोलीस विभागाला गरज पडल्यास धाडी टाकण्याचे आदेश
    – जास्त दराने स्टँम्प पेपर विकण्याबाबत लोकांच्या होत्या अनेक तक्रारी
    – सर्वसामान्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन कारवाईच्या तयारीत
  • 18 Jun 2021 07:55 AM (IST)

    मोठी बातमी, पुढचे तीन ते चार तासात जोरदार पावसाचा इशारा

    मोठी बातमी

    पुढचे तीन तासात ते चार तासात जोरदार पावसाचा इशारा

    सांताक्रुझ, विरार, पालघर, डहाणू, बोरीवली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट, सातारा, पुणे भागात जोरदार पावसाचा इशारा

    हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

  • 18 Jun 2021 07:40 AM (IST)

    हवामान विभाग आता देणार अचूक अंदाज, राज्यात चार ठिकाणी बसवण्यात येणार रडार यंत्रणा

    पुणे

    हवामान विभाग आता देणार अचूक अंदाज,

    राज्यात चार ठिकाणी बसवण्यात येणार रडार यंत्रणा,

    रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळूरु या ठिकाणी हवामान विभागातर्फे तर आय आय टीएम संस्थेतर्फे मुंबई आणि कोकणात चार रडार बसवण्यात येणार

    हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी ही माहिती दिलीये

    मराठवाड्यातही यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती

    पश्चिम किनारपट्टीवर रडार यंत्रणा मजबूत करण्याचा हवामान विभागाचा प्रयत्न

    प्रत्येक रडारची व्यापकता असणार 100 कि.मी

  • 18 Jun 2021 07:32 AM (IST)

    कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागीदार, आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप

    पनवेल

    कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागीदार

    आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने पैसे काढले

    आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारवरही सोडले टिकास्त्र

  • 18 Jun 2021 07:21 AM (IST)

    नागपुरात पाच एटीएम हॅक करुन लाखोंची रोकड लंपास 

    – नागपुरात पाच एटीएम हॅक करुन लाखोंची रोकड लंपास

    – हॅक करण्यासाठी एकाच एटीएमचा २३ वेळा वापर
    – एटीएम हॅक करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय
    – बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय
    – एटीएम हॅक करणाऱ्या चोळीचा शोध सुरु
  • 18 Jun 2021 07:19 AM (IST)

    जळगाव खानदेश आणि विदर्भातील काही भागात दमदार पावसाची हजेरी

    जळगाव खानदेश आणि विदर्भातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील विदर्भ आणि खानदेशाच्या पूर्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे शेतकऱ्यांसह नागरिकांचा काही गावांचा पाण्याचा टंचाईचा प्रश्न मिटला आहे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य दिलासा

  • 18 Jun 2021 07:02 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरच

    सांगली जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरच आहे तर सकाळपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे

    जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 2 बंधारे पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा आणि सांगलीतील सांगलीवाडी येथील बंधारा पाणी खाली गेला आहे

    कृष्णा नदीच्या पाणी ची पातळी ही जवळपास 23 वर गेली आहे सध्या पाऊसा ची संततधार सुरू च आहे

  • 18 Jun 2021 07:01 AM (IST)

    चिपळूण , गुहागर परिसरात रात्रभर पाऊस सुरूच

    चिपळूण — चिपळूण , गुहागर परिसरात रात्रभर पाऊस सुरूच

    सकाळी घेतली पावसाने उघडीप

    रात्रभर सरीवर पाऊस कोसळत होता

    काही भागात रात्रभर विजेचा लपंडाव सुरू

  • 18 Jun 2021 06:54 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

    कोल्हापूर

    जिल्ह्यात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

    पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

    पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांवर

    राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

    जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली

    चंदगड गडहिंग्लज राज्यमार्गावर भडगाव जवळ पाणी

    नदीची इशारा पातळी आहे 39 फुटांवर तर धोका पातळी आहे 43 फुटांवर

  • 18 Jun 2021 06:49 AM (IST)

    कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 11 वाजता 2100 क्युसेक्स पाणी सोडण्याची शक्यता

    कराड

    कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून 11 वाजता 2100 क्युसेक्स पाणी सोडण्याची शक्यता

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा कोयना धरण व्यवस्थापनाचा इशारा..

    कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असल्याने 2100 कयुसेक पाणी पायथा गृहामधून सोडण्याची शक्यता

  • 18 Jun 2021 06:46 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पाऊस

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर सरीवर पाऊस

    पहाटेपासून पावसाची विश्रांती

    कोकणात हवामान खात्याने दिलाय अलर्ट

    रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट

    आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या चा हवामान खात्याचा अंदाज

  • 18 Jun 2021 06:42 AM (IST)

    कराडमध्ये दोन दिवस पडलेल्या संततधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ

    कराड सातारा कराडमध्ये किरकोळ पाऊस ढगाळ वातावरण

    दोन दिवस पडलेल्या संततधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ

    कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली

    कोयना धरणाच्या पायथा वीजग्रहातुन 2100 कयुसेक पाणी सोडण्याची शक्यता

  • 18 Jun 2021 06:41 AM (IST)

    सिंधुदुर्गात पावसाचा वेग मंदावला

    सिंधुदुर्ग – पावसाने घेतली थोडीशी उसंत, कालपासून वेग मंदावलेलाच,  रात्रभर थांबून थांबून सरी कोसळल्या, मात्र पहाटे पासून त्याचा ही वेग मंदावला, रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता जिल्ह्यातील अनेक भागातील वीज मध्यरात्री पासून अद्यापपर्यंत गायब

Published On - Jun 18,2021 6:34 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.