Maharashtra News LIVE Update | मुंबईत एनबीसी टीमचे दोन ठिकाणी छापे

| Updated on: Jun 20, 2021 | 12:44 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

Maharashtra News LIVE Update | मुंबईत एनबीसी टीमचे दोन ठिकाणी छापे
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jun 2021 10:30 PM (IST)

    मुंबईत एनबीसी टीमचे दोन ठिकाणी छापे

    मुंबईत एनबीसी टीमचे दोन ठिकाणी छापे

    जोगेश्वरी आणि मालाडमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांची कारवाई

    ड्रग्स प्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली

  • 19 Jun 2021 09:30 PM (IST)

    सारथीसाठी बराच वेळ बैठक, बैठकीनंतर संभाजीराजे म्हणतात…..

    संभाजीराजे :

    मुक आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब सरकारने त्याची दखल घेतली सारथीचा मुद्दा मांडला आज सारथीची मिटिंग लावली होती तेरा चौदा मागण्या ठेवल्या पहिली मागणी एक हजार कोटींची आता एकच चांगली बाब ही झाली की स्वायत्ता स्वार्थीला देण्यात आली आहे

    -मुक आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब सरकारने त्याची दखल घेतली -सारथीचा मुद्दा मांडला -आज सारथीची मिटिंग लावली होती -तेरा चौदा मागण्या ठेवल्या पहिली मागणी एक हजार कोटींची -आता एकच चांगली बाब ही झाली की स्वायत्ता स्वार्थीला देण्यात आली आहे

    -सारथीसाठी बैठक पार पडली

    – १००० कोटी मागणी केली

    – सारथीला स्वायत्त देण्यात आली

    – १३ मागण्या मान्य केल्या, ८ विभागीय कार्यलय होणार, पहिले कार्यालय कोल्हापूरला होणार

    – १००० कोटी आणि इतर मागण्यांसाठी २१ दिवस लागणार

    – समाजासाठी काम कऱण्याऱ्या लोकांना सारथीवर घेतो म्हटले आहेत

    – संभाजीराजेंना अजिबात सारथी त इंटरेस्ट नाही, समाजासाठी हवं आहे

    – वसतिगृह सारथीच्या माध्यमातून होणार आहेत, ९ ते १० वसतिगृह होणार, युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे

    – तारदूत प्रकल्प सुरू होणार

    – अजितदादा शाहू महाराज यांना भेटले त्याची मला कल्पना नाही, ते आशीर्वाद घ्यायला गेले असतील

    -सारथी चर्चा सुरुवात चांगली झाली, चर्चा झाली हे महत्वाच

    – सगळे मुद्दे पूर्ण केले आहेत

    – मूक आंदोलन मागे घेतलं नाही, ३० तारखेला ठरेल

    – पीएचडी फेलोशिप चर्चा झाली,काही कायदेशीर बाबी आहेत त्यानुसार जावे लागणार आहे

  • 19 Jun 2021 09:25 PM (IST)

    पुण्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची उद्या आरक्षणाबाबत बैठक

    पुणे : उद्या पुण्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची आरक्षणाबाबत बैठक

    आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या बैठकीचं आयोजन,

    विनायम मेटे उद्या पुण्यात ठरवणार आंदोलनाची दिशा,

    जिल्ह्यातील समन्वयक राहणार उपस्थित,

    सकाळी 11 वाजता होणार बैठक …

  • 19 Jun 2021 07:36 PM (IST)

    शिवसेना महिला पदाधिकारी आणि भाजप नगरसेविकेमध्ये बाचाबाची

    मीरा भाईंदर :

    शिवसेना महिला पदाधिकारी आणि भाजप नगरसेविकेमध्ये बाचाबाची

    भाजप नगरसेविकेची अरेरावी

    भाईंदर पश्चिम येथील भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांनी केली शिवसेना उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांना अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ आणि दमदाटी

    भाईंदरच्या मुर्धे गावातील रेव आगर भागात शुक्रवारी घडली घटना

    तेजस्वी पाटील यांनी पालिकेस पत्र दिल्यावर कीटकनाशके फवारणी पालिकेने केली त्यावरून भाजप नगरसेविका नयना म्हात्रे भडकल्या.

  • 19 Jun 2021 06:14 PM (IST)

    औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक

    औरंगाबाद :

    औरंगाबाद जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक

    औरंगाबाद जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांना अखेर मिळाली शिथिलता

    सोमवार 21 जून पासून नियम होणार शिथिल

    जिम, सलून, मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह,विवाह,कार्यक्रमात 50% क्षमतेच्या उपस्थितीची मुभा

    आता शासकीय कार्यालयात राहणार कर्मचाऱ्यांची 100% उपस्थिती

  • 19 Jun 2021 06:14 PM (IST)

    पिकविमाच्या बीड पॅटर्न विरोधात शेतकरी आक्रमक

    बीड: पिकविमाच्या बीड पॅटर्न विरोधात शेतकरी आक्रमक

    स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन

    गेवराईच्या तलवाडा येथे बोंब मारो आंदोलन सुरू

    आठ दिवसात पिकविमा न दिल्यास पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा सरकारला इशारा

    बोंब मारो आंदोलनात शेकडो शेतकरी उपस्थित

  • 19 Jun 2021 06:06 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

    पुणे : – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन,

    – थोड्याच वेळात अजित पवार कार्यक्रमस्थळी येणार,

    – कार्यालयाच्या उदघाटनासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी,

    – कोरोनाच्या नियमांची पायमल्ली,

    – अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी

  • 19 Jun 2021 06:04 PM (IST)

    केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भाजप खासदार रक्षा खडसेंवर टीका

    जळगाव :

    केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भाजप खासदार रक्षा खडसेंवर टीकास्त्र

    राज्य सरकारच्या प्रयत्नांनी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे झाल्याचा दावा करत गुलाबराव पाटील यांनी मानले राज्य सरकारचे आभार

    -वाटायला लागलं की इथं लग्न आहे, हे लगेच बँड वाजा घेऊन उभे राहतात, असा प्रकार खडसे करतात, चित भी मेरी, पट भी मेरी, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी घेतला समाचार

  • 19 Jun 2021 06:00 PM (IST)

    शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांचा काँग्रेसवर निशाणा, स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा घेतला समाचार

    जळगाव :

    शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांचा काँग्रेसवर निशाणा,

    स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचा घेतला समाचार

    महाविकास आघाडीचे सरकार हे तीन जण मिळून सुरू आहे. हे सरकार पाच वर्षे आपले राज्य चालवणार आहे. ज्यांना आज गुदगुल्या होत असतील, त्यांनी गुदगुल्यांचीच वाट पाहावी, म्हणत मांडले मत

  • 19 Jun 2021 04:22 PM (IST)

    उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

    नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले :

    महिला कार्यकर्त्यांवर लपून हल्ले, या हल्ल्याचा निषेध

    संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही. राऊत यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

    माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं

    शिवसेना वाढीसाठी राऊत यांचं काय योगदान?

    हिंदुत्वार बोलण्याचा शिवसेनेला अधिकार नाही

    उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली

    हिंदुत्वाला तिलांजली देऊन शिवसेना सत्ते

  • 19 Jun 2021 04:21 PM (IST)

    कोल्हापूरच्या हातकणंगले मधील माणगांववाडीत हातभट्टी आड्यावर पोलिसांची मोठी कारवाई

    कोल्हापूर :

    हातकणंगले मधील माणगांववाडीत हातभट्टी आड्यावर पोलिसांची मोठी कारवाई

    साडेचार लाख किमतीची दारू केली नष्ट

    राज्य उत्पादन विभाग आणि पोलिसांची कारवाई

    कारवाईत 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, दोन फरार

  • 19 Jun 2021 03:17 PM (IST)

    चितळे उद्योग समूहाला बदनामीची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी, चौघांना अटक

    पुणे –

    – प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाकडून पुरवल्या जाणाऱ्या दुधात काळा पदार्थ आढळल्याचं सांगून बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार,

    – चितळे बंधूंना धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

    – यामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे,

    – गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी आतापर्यंत एका शिक्षिकेसह चौघांना अटक केली आहे,

    – तुमच्याविरोधात एफडीए आणि पोलिसांकडे तक्रार करते, तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू अशी धमकी मेलच्या माध्यमातून दिली होती.

  • 19 Jun 2021 03:14 PM (IST)

    यवतमाळमध्ये कंत्राटदार काम करत नसल्याने नगरसेवकांनी कचरा उचलला आणि नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर टाकला

    यवतमाळ :

    कचरा कंत्राटदार काम करीत नसल्याने नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा स्वतः ट्रॅक्टरने उचलून नगर परिषदेच्या प्रवेश द्वारावर टाकला.

    यावेळी संतप्त नगरसेवक व कंत्राटदारामध्ये बाचाबाची झाली.

    कचराकोंडीमुळे नागरिक त्रस्त.

  • 19 Jun 2021 03:11 PM (IST)

    गडचिरोलीत खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोदी सरकारविरोधात निषेधाचा कार्यक्रम

    गडचिरोलीत खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सक्रिय झाले काँग्रेस कार्यकर्ते

    तब्बल दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोदी सरकार विरोधी निषेधाचा कार्यक्रम

    तहसील कार्यालयासमोर संकल्प दिनाच्या कार्यक्रमात मोदी हटावची नारेबाजी

    मुख्य गांधी चौकात इंधन दरवाढीविरोधात मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने

    शेतकऱ्यांना बुडवणारा सरकार मोदी सरकार असे नारेबाजी यावेळी करण्यात आली

    खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची देशाला गरज असल्याची भावना

    देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली आहे मोदी सरकार मुळे लाखो रोजगार बेरोजगार झाले आहेत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पनेची योग्य योजना केल्यामुळे

  • 19 Jun 2021 03:10 PM (IST)

    उद्धव साहेब विचारांचे काय सोने देतात यासाठी आम्ही आतुर आहोत : किशोरी पेडणेकर

    महापौर किशोरी पेडणेकर :

    शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा

    साहेब परत या ही भावना आमची आहे.

    सेनेचा आज मुख्यमंत्री आहे.

    आज उद्धव ठाकरे साहेब व्हीसीद्वारे संबोधित करणार आहेत.

    उद्धव साहेब विचारांचे काय सोने देतात यासाठी आम्ही आतुर आहोत

    कांदिवली येथील बोगस लसीकरण प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहत आहोत.

    लस कुठून मिळवली याची माहिती पुढे येईल

    महापालिकेची परवानगी घेत नाहीत तोपर्यंत लस घेऊ नये

  • 19 Jun 2021 12:57 PM (IST)

    सांगलीत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    सांगली –

    सांगलीत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    गेली 4 दिवस झाले सांगलीत सुरू आहे पाऊस

    कृष्णा नदीच्या पाणी ची पातळी 23 फुटावरुन 20 फुटावर आली आहे

    मात्र पावसाचा जोर कायम आहे

    पासवसाची संततधार सुरू च आहे

  • 19 Jun 2021 12:17 PM (IST)

    बाळासाहेबांचे सुपुत्र राज्याची धुरा सांभाळत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे – किशोरी पेडणेकर

    शिवसेनेचा आज वर्धापनदिन सोहळा आहे

    बाळासाहेबांनी रुजवले रोप आता एवढं मोठं झालं आहे

    शिवसेनेला नेहमी संघर्ष सहन सवय आहे

    आम्ही कोणाला ही घाबरत नाही

    बाळासाहेबांचे सुपुत्र राज्याची धुरा सांभाळत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे

    कोणी लोक शड्डू ठोकत असले तरी पुढील सुद्धा महापौर सेनेचाच होणार

  • 19 Jun 2021 09:32 AM (IST)

    अजित पवार आज संध्याकाळी 7 वाजता सारथी संस्थेसंदर्भात घेणार बैठक

    अजित पवार आज संध्याकाळी 7 वाजता सारथी संस्थेसंदर्भात घेणार बैठक,

    सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक अशोक काकडे ,मराठा समाजातील समन्वयक राहणार उपस्थित,

    शासकीय विश्रामगृहात होणार बैठक,

    मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना चर्चेसाठी अजित पवारांच निमंत्रण

  • 19 Jun 2021 09:19 AM (IST)

    आरक्षण हक्क कृती समिती काढणार विविध मागण्यासाठी मोर्चा

    सोलापुर – महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आरक्षण हक्क कृती समिती काढणार विविध मागण्यासाठी मोर्चा

    26 जून रोजी संपूर्ण राज्यातून प्रत्येक  जिल्हाधिकारी कार्यालयावत काढणार आक्रोश मोर्चा

    राज्यातील 80 हून अधिक मागासवर्गीय कर्मचारी संघटना एकत्रित येऊन आरक्षण कृती समिती स्थापन

  • 19 Jun 2021 09:03 AM (IST)

    सांगलीत शिकारी कुत्र्याच्या मदतीने बिबट्याला पळवून लावले, 8 तरुणांवर गुन्हे

    सांगली –

    कुत्र्याच्या मदतीने बिबट्याला पळवून लावले

    कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड येथील 8 तरुणांवर गुन्हे दाखल

    अलकुडच्या 8 तरुणांची चौकशी वन विभागाने केली

    बिबट्या परिसरात दिसले वर शिकारी कुत्र्याच्या मदतीने या 8 तरुणांनी बिबट्याला हुसकावून लावले वन विभागा ने दिली माहिती

  • 19 Jun 2021 09:02 AM (IST)

    वर्धा जिल्ह्याचा पहिल्या फेजमध्ये समावेश

    – वर्धा जिल्ह्याचा पहिल्या फेजमध्ये समावेश

    – कोरोनरुग्णसंख्या कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता

    – सोमवार पासून जिल्ह्यात लागू होणाऱ्या पहिल्या फेजच्या सवलती

    – सर्व अस्थापने राहणार पूर्ववत सुरु

    – लग्नाकरिता मात्र १०० लोकांची परवानगी

    – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे आदेश

  • 19 Jun 2021 09:01 AM (IST)

    सोलापुरात शेळीचोरीसह चोरी, घरफोडी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी केली अटक

    सोलापूर – शेळीचोरीसह चोरी,घरफोडी करणाऱ्या चोरांना  पोलिसांनी केली अटक

    जोडभावी पेठ पोलिसांनी आणले पाच गुन्हे उघडकीस

    दोन जणांना  घेतले पोलिसांनी ताब्यात

    आसिफ शेख आणि अब्बास शेख या दोन जणांना पोलिसांनी घेतली ताब्यात

    शेळगी परिसरातील तीन शेळ्या व एक बोकड रिक्षातून या दोन जणांनी चोरल्याआज दिली होती कबुली

    घरफोड्या आणि चोरी केल्याचीही दिली कबुली

    चोरट्यांकडून शेळ्या ,दागिने ,पैसे मुद्देमाल जप्त

  • 19 Jun 2021 08:56 AM (IST)

    महाडच्या वाघजाई घाटात बिबट्याच्या जोडीचे दर्शन

    रायगड

    महाडच्या वाघजाई घाटात बिबट्याच्या जोडीच दर्शन.

    बिरवाडी मधील कल्पेश सागवेकर या मुलाने केला चित्तथरारक व्हिडीओ शुट.

    महाड चा वाघजाई घाट म्हणजेच याला वरधं घाट ही बोलतात.

    रायगड मधील महाड ते पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग आहे या घाटतुन

  • 19 Jun 2021 07:33 AM (IST)

    बारावीच्या निकालाचा आराखडा ठरवण्यासाठी आज शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    बारावीच्या निकालाचा आराखडा ठरवण्यासाठी आज शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,

    शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे संचालकांसोबत बैठक,

    सीबीएसई बोर्डाच्या निकाल निकषांचा समावेश महाराष्ट्र बोर्डात करता येतो का ? याची आज चाचपणी केली जाणार

    शिक्षणमंत्री घेणार ऑनलाईन बैठक,

    आजच्या बैठकीत फॉर्म्युला ठरण्याची शक्यता

  • 19 Jun 2021 07:33 AM (IST)

    रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड जगबुडी नदी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    रत्नागिरी – रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड जगबुडी नदी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट जवळ

    नारंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनियरिंग जवळ भरल्याने

    खेड -दापोली -मंडणगड पन्हाळजे मार्गावरील वाहतूक ठप्प

  • 19 Jun 2021 06:57 AM (IST)

    चिपळूण, गुहागर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

    चिपळूण – चिपळूण, गुहागर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस

    पहाटे चिपळूणमधील सखल भागात भरले पाणी मात्र आता  पावसाची विश्रांती

    जुना बाजारपूल, नाईक कंपनी मच्छी मार्केट परिसरात भरले पाणी

    चिपळूण शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती

    पावसाचा जोर वाढल्यास चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता

  • 19 Jun 2021 06:30 AM (IST)

    शिवसेना आमदार वैभव नाईकचा भाजपला खिझवण्याचा प्रयत्न?

    सिंधुदुर्ग

    शिवसेना आमदार वैभव नाईकचा भाजपला खिझवण्याचा प्रयत्न ?

    शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

    सर्वसामान्य नागरिकांना १०० रूपयांत २ लीटर पेट्रोल तर भाजपच्या सदस्यत्वाचं ओळखपत्र दाखवणार्याला १ लीटर पेट्रोल मोफत

    वैभव नाईक यांच्या पोस्टरवर भाजपकडून सोशल मिडीयावर टीका

Published On - Jun 19,2021 6:16 AM

Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.