Maharashtra News LIVE Update | व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 24 2021 Today Latest Updates OBC Reservation Zilla Parishad Panchayat Samiti by-elections CM Uddhav thackeray Government Monsoon Updates Maharashtra Political Happening
LIVE NEWS & UPDATES
-
व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे 18 वर्षीय युवतीची आत्महत्या
वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नंधाना येथे व्हॉट्सअॅप ग्रुपवर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्याने 18 वर्षीय युवतीची गळफास लावून आत्महत्या. आरोपी मुलांवर गुन्हा दाखल. शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहे
-
गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात 16,500 कोटींची गुंतवणूक, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
-
-
राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा, 14 टक्क्यांनी नफा वाढला
राज्य सहकारी बँकेला 369 कोटींचा निव्वळ नफा
गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 14 टक्क्यांची वाढ
एनपीए प्रमाण 1.2 टक्क्यांवर
लागोपाठ चार वर्षांपासून बँक नफ्यात विद्याधर अनास्कर राज्य सहकारी बँक प्रशासक यांची माहिती
अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्यासाठी पैसे द्यायला तयार
नाबार्डला असा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडून दैण्यात आलाय
-
चिपळूण – मुंबई -गोवा महामार्गावरील वाशिष्टी पूल शुक्रवारी रात्री पाच तास बंद राहणार
चिपळूण – मुंबई -गोवा महामार्गावरील वाशिष्टी पूल शुक्रवारी रात्री पाच तास बंद राहणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडलेल्या वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलावर दुसरा स्लोंब टाकण्यासाठी
25 जून रोजी रात्री 11 ते 4 दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
त्यावेळी वाहतूक पाग-उक्ताड-फरशी तिठा मार्गे वळवण्यात येणार आहे
-
सारथीच्या विभागीय कार्यालयाची खरी गरज मराठवाड्याला: विनायक मेटे
सारथीच्या विभागीय कार्यालयाची खरी गरज मराठवाड्याला आणि औरंगाबादला आहे. पण कार्यालय कोल्हापूरला होत आहे. कोल्हापूरला या कार्यालयाची काहीही गरज नाही, कार्यालय कोल्हापुरात करणे म्हणजे शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देणं आहे. एकाच वेळी सगळीकडे कार्यालये सुरू झाली पाहिजेत ही आमची मागणी आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे म्हणाले.
-
-
मराठा आरक्षण प्रश्नी सुरेश धस आक्रमक,28 जून रोजी बीडमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन
बीड: मराठा आरक्षण प्रश्नी आ. सुरेश धस आक्रमक
28 जून रोजी बीडमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन
सुरेश धस यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा
बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर सोमवारी धडकणार मोर्चा
-
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी पुण्यात चक्का जाम आंदोलन करणार, पंकजा मुंडे यांंचं ट्विट
26 जून रोजी पुणे शहरात शाहू कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कात्रज चौकात सकाळी10 वा.आणि पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चौकात सकाळी 11.30 वा. आम्ही ‘चक्का जाम’ आंदोलनासाठी एकत्र येणार आहोत. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने एकत्र येतील.
२६ जून रोजी पुणे शहरात शाहू कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन कात्रज चौकात सकाळी10 वा.आणि पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चौकात सकाळी 11.30 वा. आम्ही ‘चक्का जाम’ आंदोलनासाठी एकत्र येणार आहोत. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने एकत्र येतील.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 24, 2021
-
महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे महाराष्ट्रात दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार असं गेल्या 60 वर्षात पाहायला मिळालं नाही. या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री नाही नाही. इथं प्रत्येक मंत्री, प्रत्येक राज्यमंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. हे सरकार आहे की सर्कस, असा प्रश्न पडावा अशी अवस्था तयार झालीय. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात, देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात, देशातील कोरोनामुळे मृत्यू पावलेला प्रत्येक तिरसा मृत्यू महाराष्ट्रात किड्यामुंग्यासारखे मुलं मेले. ऑक्सिजन मिळत नाही, ट्रिटमेंट मिळत नाही म्हणून लोक मेले. कसलं, कुठलं हे मॉडेल? हे मॉडेल असेल तर हे मृत्यूचं मॉडेल आहे.
-
बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस,
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने मारली होती दांडी,
तर पाऊस नसल्याने पेरण्या ही खोळंबल्या होत्या,
मात्र आज काहीसा दिलासा मिळाला आहे
-
नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आंदोलन सुरु, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन
नागपूर
– नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आंदोलन सुरु
– ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन
– जिल्हा परिषद पोटणीवडणूक रद्द करण्याची मागणी
– ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याची मागणी
– डॅा. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन
-
वसतिगृह आणि अभ्यासिका सुरु करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा
औरंगाबाद :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा
वसतिगृह, आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेच्या वतीने काढण्यात आला मोर्चा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कुलगुरू कार्यालयापर्यंत जाणार मोर्चा
मोर्च्यात विद्यापीठातील अनेक विद्यार्थी झाले सहभागी
-
Pune Ambil Odha : भाजपने हात झटकू नये : राष्ट्रवादी
मी पुण्याचा माजी महापौर आहे, महापौर जे निर्णय घेतात, ते प्रशासन ऐकतं, त्यामुळे राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपने हात झटकू नये, आम्ही प्रशासन चालवलं आहे, सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही, असा दावा राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला.
-
Pune Ambil Odha : पावसाळ्यात कारवाई करायची नाही हे ठरलं होतं : आमदार मुक्ता टिळक
पावासाळ्यात अशी कारवाई करायची नाही हे बैठकीत ठरलं होतं, पण ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल, जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु, असं भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.
-
Pune Ambil Odha : पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला, घरे पाडण्याची कारवाई, नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतलं
Pune Ambil Odha पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्याचा प्रश्न चिघळला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे. त्यासाठी आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
दि बा पाटील यांचा आज स्मृतीदिन, रामशेठ ठाकूर दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाकडे वळणार
नवी मुंबई : दि बा पाटील यांचा आज स्म्रुतीदिन
राम शेठ ठाकूर दि बा पाटील यांच्या घरी पोहोचले
दि बा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रामशेठ ठाकूर आंदोलनाकडे वळणार
विमानतळाच्या ठिकाणाहून आंदोलनाला करणार सुरुवात
रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी सुद्धा सहभागी होणार
रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसह
-
नागपूर महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी
नागपूर –
नागपूर महापालिकेच्या 268.68 कोटी च्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी
कचरा प्रक्रिया समस्या मार्गी लागणार
कंपोस्ट खत व बायो सीएनजी ची होणार निर्मिती
भारत स्वच्छ अभियान अंतर्गत या प्रकल्पाला डीपीआर अंतर्गत देण्यात आली होती मंजुरी
आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला देण्यात आली मंजुरी
-
पुण्यात बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट, नागरिकांचा विरोध
पुणे
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट
त्यासाठी आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात
आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध
काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा केला प्रयत्न
आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त
-
नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : वसई विरार क्षेत्रातील संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा
वसई:-
– नवीमुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीला वसई विरार क्षेत्रातील संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे..
– वसई विरार संभाजी ब्रिगेड चे महानगरअध्यक्ष शिवश्री प्रदिप मेस्त्री यांच्या उपस्थित एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
– या प्रसंगी संभाजी ब्रिगेड सह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
– लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटील हे बहुजन समाजाचे नेते असुन त्यानी त्याचे संपुर्ण आयुष्य समाजाच्या कामासाठी वेचले आहे.
– नवीमुंबईतील बहुसंख्य शेतकरयाना त्यांच्या शेतजमिनी परत मिळवून दिल्या आहेत. त्याच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता नवी मुंबईतील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दी. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव द्यावे अशी मागणी ही सरकार कडे केली आहे
-
कोल्हापुरातील जातीवाचक वाड्या वस्त्या आणि गावांची नावे बदलली जाणार, जिल्हा प्रशासनाची मोहिम
कोल्हापूर :
जिल्ह्यातील जातीवाचक वाड्या वस्त्या आणि गावांची नावे बदलली जाणार
अशा गावांना दिली जाणार महापुरुषांची नाव
गावांमधील जातीवाचक रस्त्याची नावही बदलणार
जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली मोहीम
शासन स्तरावर ज्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाते अशाच महापुरुषांची नाव दिली जाणार
नाव बदला साठीचा ठराव संमत करून ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकाऱ्यांकडे द्यावा
जिल्हाधिकारी डॉ.दौलत देसाई यांच्या सूचना
-
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीस मुदतवाढ, नेमणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत
औरंगाबाद ब्रेकिंग :-
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीस मुदतवाढ..
नेमणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी शासनाला दोन आठवड्याची अंतिम मुदत वाढ..
शासनाने दोन महिन्यांत विश्वस्त मंडळ नेमण्याची दिली होती हमी..
काही राजकीय व्यक्तींची नावे सोशल मीडियावर विश्वस्त म्हणून निवड झाल्याची होती फिरत..
विश्वस्त मंडळ नेमण्यास संदर्भात बैठक झाली बैठक..
अधिसूचना जाहीर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची केली होती विनंती..
मुदतवाढीची मागणी केल्यानंतर खंडपीठाने राज्य शासनाला दोन आठवड्यांची मुदतवाढ..
पुढील सुनावणी होणार पाच जुलै रोजी..
-
नाशिक गॅस पाईपलाईनच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची चाळणी, नाशिककरांमध्ये संताप
नाशिक – गॅस पाईपलाईनच्या नावाखाली शहरात रस्त्यांची चाळणी
संपूर्ण शहरात चांगले रस्ते खोदून ठेवल्याने नाशिककरांमध्ये संताप
ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचा नगरसेवकांचा आरोप
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऐन पावसात नागरिकांच्या जीवाला धोका
आयुक्त कैलास जाधव यांचे प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा इशारा
-
क्राईम सिटी नागपुरात गुन्हेगारी वाढतीच, शहरात जून महिन्यात खुनाच्या आठ घटना
नागपूर
– नागपूर शहरात जून महिन्यात आतापर्यंत खुनाच्या आठ घटना
– तहसील, एनआयडीसी पोलीस स्टेशन हद्द आणि जरिपटक्यात खुनाच्या घटना
– खुनाचे लाईव्ह व्हिडीओमुळे नागपूरची क्राईम सिटी म्हणून इमेज
– खुनाचे लाईव्ह व्हीडीओ व्हायरल झाल्याने शहरातील गुंतवणूकीवरही पोतो परिणाम
– समाज माध्यमात नागपूरची गुन्हेनगरीची प्रतिमा बदलणं गरजेचं
– नागपुरात २०१८ मध्ये जानेवारी ते जून ६५ खून, २०१९ मध्ये ५३, तर २०२० मध्ये ४५ आणि २०२१ मध्ये ४७ खुनाच्या घटना
-
सोलापूर जिल्ह्यात दीड हजारांपेक्षा जास्त ओबीसी उमेदवारांना फटका
सोलापूर — जिल्ह्यात दीड हजारांपेक्षा जास्त ओबीसी उमेदवारांना फटका
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घेतला आहे निर्णय
त्यामुळे ओबीसी उमेदवारांना राहावे लागणार आहे निवडणूकपासून वंचित
जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शासनाने यावर कोणताही निर्णय न घेतल्यास फक्त एसी एएसटी व सर्वसाधारण यासाठी आरक्षण राहणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिका 30 जिल्हा परिषद 27 पंचायत समिती 36 नगरपालिका 33 तर ग्रामपंचायतीमध्ये 1509 ओबीसीसह एनटी प्रवर्गातील उमेदवारांना आगामी निवडणुकीत पासून वंचित रहावे लागण्याची शक्यता
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार परिणाम
-
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद काँग्रेस कडे जाण्याची शक्यता
शिर्डी देवस्थान समिती राष्ट्रवादीकडे गेल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यासाठी काँग्रेस आग्रही
काँग्रेस कडे अध्यक्षपद गेल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबत ही उत्सुकता
युतीच्या काळात भाजपकडे होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
करवीर निवासिनी अंबाबाई, ज्योतिबा मंदिरासह पाच जिल्ह्यातील 300 हुन अधिक मंदिर येतात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत
-
काँग्रेस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, सोलापूर शहर उत्तर कॉंग्रेसचा झाला ठराव संमत
सोलापूर– स्वबळावर लढण्याचा शहर उत्तर कॉंग्रेसचा झाला ठराव
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची केली आहे घोषणा
त्याला पाठिंबा देणारा ठराव शहर उत्तर कॉंग्रेसच्या बैठकीत झाला संमत
-
नाशिक – पंचवटी एक्स्प्रेस उद्यापासून होणार सुरु, जनशताब्दी एक्स्प्रेसलाही ग्रीन सिग्नल
ब्रेक नाशिक – पंचवटी एक्स्प्रेस उद्यापासून होणार सुरू
जनशताब्दी एक्स्प्रेसला देखील मिळाला ग्रीन सिग्नल
मुंबईला अप डाऊन करणाऱ्या नाशिककरांना मोठा दिलासा
एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर देखील परिणाम
पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोच ची संख्या कमी केल्याचा प्रवासी संघटनांचा दावा
राजधानी, तपोवन,राज्यरणी एक्स्प्रेस देखील सुरू
-
नंदिनी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर थेट कारवाई, महापौर सतीश कुलकर्णी यांचे आदेश
नाशिक – नंदिनी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर थेट कारवाई
महापौर सतीश कुलकर्णी यांच्या आदेशाने औद्योगिक क्षेत्रात खळबळ
अनेक बड्या कंपन्यांमध्ये अद्यापही एसटीपी नसल्याचं उघड
रासायनमिश्रित पाणी सोडल्यास कंपनीचा परवाना रद्द होणार
अनेक नोटिसा देऊन देखील कंपन्यांची मुजोरी होती कायम
-
पुण्याच्या दिवेघाटातील रिक्षा पासिंग होणार बंद, आळंदी रोडमधील आरटीओ कार्यालयातच होणार काम
पुणे
दिवेघाटातील रिक्षा पासिंग होणार बंद
येत्या दोन ते तीन महिन्यांत आळंदी रोड येथील आरटीओ कार्यालयातच रिक्षा पासिंग व अन्य कामे होणार
यामुळे रिक्षाचालकांची गैरसोय होणार दूर
रिक्षा पंचायतने सातत्याने दिवेघाटातील पासिंग बंद होण्यासाठी केला होता पाठपुरावा
आळंदी रोड येथील कार्यालयात ब्रेक टेस्ट ट्रॅक व रोलर ब्रेक टेस्टरचे काम सुरू
येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता
हे पूर्ण काम झाल्यावर रिक्षासह अन्य वाहनांचे पासिंग देखील याच कार्यालयात करण्याचे आरटीओचे नियोजन
-
नागपुरातील मेयो आणि मेडिकल हॅास्पिटलचा फायर ॲाडीट रिपोर्ट सादर करा, उच्च न्यायलयाचे राज्य सरकारला आदेश
– नागपूरातील मेयो आणि मेडीकल हॅास्पीटलचा फायर ॲाडीट रिपोर्ट सादर करा
– ३० जूनपर्यंत दोन्ही सरकारी हॅास्पीटलचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश
– मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश
– दोन्ही रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष
– राज्यभरात रुग्णालयातील आगीमुळे अनेकांनी जीव गमावला
-
राष्ट्रवादी परिवार संवाद संपर्क अभियान, जयंत पाटील तुळजापुरात
उस्मानाबाद –
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद संपर्क अभियान
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार सुरुवात
आज तुळजापूर येथून तुळजाभवानी दर्शन घेऊन मग अभियानाला सुरुवात
पक्ष बांधणी बैठक आणि जलसंपदा विभागाचा आढावा
-
नवी मुंबई विमानतळ नामांतराचा वाद, प्रकल्पग्रस्तांचे सिडको घेराव आंदोलन, पोलिसांचा चोख बंदोबस्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आज प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको कार्यालयाच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त असून कुणीही आत प्रवेश करू नये म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच हलक्या वाहनाच्या वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला आहे. सकाळी 8 ते रात्री 8 असा 12 तास कळंबोली ते बेलापुर आणि वाशी ते बेलापुर रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
Published On - Jun 24,2021 6:43 AM