LIVE | खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या 6 जणांना पकडले

| Updated on: Apr 01, 2021 | 12:17 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या 6 जणांना पकडले
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी (Maharashtra Breaking News)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Mar 2021 11:03 PM (IST)

    खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या 6 जणांना पकडले

    रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर वनविभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडे एक जिवंत दुर्मिळ खवले मांजर सापडले. वनविभागाने एकूण सहा शिकाऱ्यांनाप कडले असून त्यांच्याकडची दोन दुचाकीसुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

  • 31 Mar 2021 08:02 PM (IST)

    शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्याऐवजी सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर उभारा- राजू पाटील

    मुंबई:  शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे, असे म्हणत शिव स्मारक अरबी समुद्रात उभारण्याऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारल्यास पर्यटन स्थळाचा विकास होईल, अशी मागमी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.  तिथीनुसार आज शिवजयंती असल्याने या निमित्ताने आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष्य वेधले आहे.

  • 31 Mar 2021 05:55 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

    बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते.

  • 31 Mar 2021 05:40 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, मोठ्या नेत्यांची उपस्थिती

    मुंबई येथील शिवाजी पार्क येथील महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी  शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

  • 31 Mar 2021 05:29 PM (IST)

    लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

    पुणे : कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याच्या नैराश्यातून एका तरुण अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

  • 31 Mar 2021 05:15 PM (IST)

    भगिरथ भालके, समाधान आवताडे यांचे उमेदवारी अर्ज मंजूर

    पंढरपूर : महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवा समाधान आवताडे हे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या दोन्ही कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाल्याने अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी घेतला होता आक्षेप. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली तशी माहिती दिली आहे.

  • 31 Mar 2021 04:14 PM (IST)

    वंचित बहुजन आघाडीची पंढपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उडी, ‘हा’ उमेदवार मैदानात

    अकोला : वंचित बहुजन आघाडीने पंढपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. वंचितकडून विरप्पा मोटे यांच्या नावाची घोषणा आज  प्रकाश आंबेडकर यांनी केली असून वंचित येथे संपूर्ण ताकदीने निवडणूक लढेल असे सांगण्यात आले आहे.

  • 31 Mar 2021 02:24 PM (IST)

    मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक

    मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक

    जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका

    काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

    उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी केली अविनाश जाधव यांना अटक

    अविनाश जाधव यांना नेवाळी पोलीस ठाण्यातून हिललाईन पोलीस ठाण्यात नेलं

  • 31 Mar 2021 02:23 PM (IST)

    खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी औरंगाबादेत तक्रार दाखल

    औरंगाबाद –

    खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल

    सिटी चौक पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल

    भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केली तक्रार दाखल

    इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

    इम्तियाज जलील यांच्यावर सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर रस्त्यावर उतरण्याचा ईशारा

  • 31 Mar 2021 12:56 PM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या इच्छुकांना माजी खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान

    कोल्हापूर –

    गोकुळ दूध संघाच्या इच्छुकांना माजी खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान

    संचालक व्हायचं असेल तर दहा लिटर दूध न दमता काढून दाखवा

    संचालक पदाच्या अटी साठी अशा प्रकारच्या ही अटीची देखील गरज होती अशी व्यक्त केली अपेक्षा

    जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांचे अर्ज दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टींच आव्हान

    दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली शेट्टीची भेट

    गोकुळ वाचवण्यासाठी स्वाभिमानीन सत्ताधारी गटा सोबत राहण्याची केली विनंती

  • 31 Mar 2021 11:29 AM (IST)

    शरद पवार लवकर बरे व्हावेत म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री सिदेश्वर मंदिरात आरती

    सोलापूर –

    शरद पवार लवकर बरे व्हावेत म्हणून आरती

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री सिदेश्वर मंदिरात आरती

    ग्रामदैवत श्री सिदेश्वर मंदिरात आरती

  • 31 Mar 2021 10:28 AM (IST)

    नागपुरातील दोन हत्या प्रकरणात फरार असलेला कुख्यात गुंड रणजित सफेलकरला अखेर अटक

    नागपूर –

    नागपुरातील दोन हत्या प्रकरणात फरार असलेला कुख्यात गुंड रणजित सफेलकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या कांड प्रकरणात होता सहभाग

    दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरून पोलिसांनी त्याचे 3 वाहन सुद्धा केले होते जप्त

  • 31 Mar 2021 09:46 AM (IST)

    नागपुरातील श्रीकृष्ण नगर येथे आग, डेकोरेशन गोडाऊनला आग

    नागपूर –

    नागपुरातील श्रीकृष्ण नगर येथे आग,

    डेकोरेशन गोडाऊनला आग

    अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी विझविली आग,

    आगीत डेकोरेशन साहित्याचं मोठं नुकसान

  • 31 Mar 2021 09:20 AM (IST)

    सांगली शहरातील राजवाडा परिसरात घुसला बिबट्या

    सांगली –

    सांगली शहरात घुसला बिबट्या

    सांगलीच्या राजवाडा परिसरात बिबट्या

    एका कुत्र्याला टाकले फाडून

    घटनास्थळी पोलीस, महापालिका कर्मचारी, अग्निशमन विभाग आणि नागरिकांची गर्दी..

    नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 31 Mar 2021 09:19 AM (IST)

    औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये हॉटेलवर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये हॉटेलवर गोळीबार

    दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांचा हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

    पडेगावं येथील हॉटेल मनीष इन या हॉटेल वर अज्ञाता कडून दोन राऊंड फायर

    घटना सीसीटीव्हीत कैद

    धमकवण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचा पोलिसांचा संशय

    गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ

  • 31 Mar 2021 09:18 AM (IST)

    नागरिकांच्या सर्वेक्षण तपासणीसाठी आता शिक्षकांची ड्युटी

    सोलापूर –

    नागरिकांच्या सर्वेक्षण तपासणीसाठी आता शिक्षकांची ड्युटी

    285 शिक्षकांची यादी तयार करुन पालिकेने दिले नियुक्तीचे आदेश

    संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश

    संबंधित नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या हजेरी पत्रकावरूनच वेतनाची कारवाई करण्याचे आदेश

    जे शिक्षक कोरणा काळात सेवा बजावणार नाहीत अशा शिक्षकांचे वेतन अदा न करण्याचे आदेश

  • 31 Mar 2021 09:01 AM (IST)

    पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली 

    पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

    25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा

    25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे

    राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचं आयोजन केलं जातं मात्र कोरोनामुळं परीक्षा ढकलली पुढे

    राज्यातील 6 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जही भरलाय

    आता परीक्षा होणार 23 मे ला राज्य परीक्षा परिषदेनं केलं जाहीर

  • 31 Mar 2021 08:40 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज 2 सत्रामध्ये

    सांगली –

    सांगली जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज 2 सत्रामध्ये

    कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पाश्वभूमी वर जिल्हा न्यायालय प्रशासनानं निर्बंध आदेश केला जारी

    वकील पक्षकार साक्षिदार आणि कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे कोर्टा काढून सर्वाना आवाहन

    पाहिले सत्र सकाळी 11 ते 1,30 आणि दुसरे सत्र 2 ते 4,30

  • 31 Mar 2021 08:28 AM (IST)

    सांगली जिल्ह्याचा पारा गेला 40 वर, 4 दिवसात तापमान 41 ते 42 अशांपर्यंत जाण्याची शक्यता

    सांगली –

    सांगली जिल्ह्याचा पारा गेला 40 वर

    उकाड्याने सर्वांच्या अंगाची होत आहे लाहीलाही

    पुढील 4 दिवसात तापमान 41 ते 42 अशांपर्यंत जाण्याची शक्यता

    गेल्या महिन्या भरापासून जिह्यातील तापमानात होत आहे वाढ

    नागरिक लहान मुले वृद्धांना होत आहे खूप त्रास

  • 31 Mar 2021 08:21 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एकाची हत्या

    नागपूर –

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एकाची हत्या

    38 वर्षीय संजय खवास राहणार कावरापेठ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव,

    होळीच्या पाडव्याला मृतक आणि आरोपींमध्ये आपसात वाद झाल्याचीही माहिती..

    उमरेड येथील अक्की बार समोर संजय खवास याची दोन आरोपीनी मिळून केली हत्या

    काल रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आली हत्या, हत्येच कारण अद्याप अस्पष्ट

    हत्येनंतर दोन्ही आरोपीच पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण…

  • 31 Mar 2021 08:02 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा दोन सत्रात होणार

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा दोन सत्रात होणार

    राज्यभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर

    सकाळी साडेदहा ते दीड आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशा दोन सत्रात चालणार काम

    न्यायालयाच्या आवारात प्रवेश करताना आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांची होणार काटेकोर अंमलबजावणी

  • 31 Mar 2021 07:52 AM (IST)

    एनसीबीने बॉलिवूड अभिनेता एजाज खानला अटक केली

    एनसीबीने बॉलिवूड अभिनेता एजाज खानला अटक केली

    शादाब बटाटा टोळीशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अटक

    काल संध्याकाळी एजाजच्या घरावर छापा टाकल्यावर काही गोळ्याही ज्प्त केल्या गेल्या होता

  • 31 Mar 2021 07:36 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

    पिंपरी-चिंचवड

    – शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

    – रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार

    – गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.

    – त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आवाहन

  • 31 Mar 2021 07:25 AM (IST)

    अमरावती महानगरपालिकेच्या कर विभागाने एका दिवसात उच्चांकी 48 लाखांच्या मालमत्ता कराची वसुली

    अमरावती महानगरपालिकेच्या कर विभागाने एका दिवसात उच्चांकी 48 लाखांच्या मालमत्ता कराची वसुली

    31 मार्च हा अंतिम दिनांक आहे

    आतापर्यंत 29 कोटी 38 लाख 27 हजार 985 रुपये एवढी वसुली झाली

    यावर्षी 47 कोटी 81 लाख 66 हजारांचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्यांक आहे

  • 31 Mar 2021 07:00 AM (IST)

    लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन् पबजी गेम खेळण्याचा नाद यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

    पुणे

    लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन् पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

    कोंढाव्यातील ऋषिकेश मारुती उमाप या 29 वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

    या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

  • 31 Mar 2021 06:34 AM (IST)

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडून सायबर हल्ल्याविषयी खुलासा

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडून सायबर हल्ल्याविषयी खुलासा

    खंडणीचा मेल आला आहे पण रकमेचा उल्लेख नसल्याचा खुलासा

    सदरचा सायबर हल्ला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती

    कामकाजावर परिणाम झाला असल्याची महाराष्ट्र औद्योगिक वीकास महामंडळाची माहिती

  • 31 Mar 2021 06:30 AM (IST)

    बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून फरार

    बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून फरार

    महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातुन एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला

    या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता

    शनिवारी त्याला पोलिसांनी आटक केली होती

    मंगळवारी रात्री जेवणाच्या वेळी या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिली

    रज्जाक असे या आरोपीचे नाव आहे

Published On - Mar 31,2021 11:03 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.