LIVE | आयपीएस जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
आयपीएस जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
आयपीएस जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती
आयपीएस विनीत अग्रवाल एटीएसचे नवे महासंचालक होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती..
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना काही दिवसांपूर्वी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आलीय.
ठाण्याचे नवे सीपी कोण होणार यासंदर्भात अनेक नाव चर्चेत आहेत मात्र सध्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त बनण्याची शक्यता आहे..
-
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार, बाईकस्वार तरुणाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार,
विना मास्क बाईकस्वारला पोलीस अधिकाऱ्याचा थांबवण्याचा प्रयत्न,
बाईकस्वार तरुणाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले
कल्याण बेतुरकर चौकात घडली घटना
या घटनेत पोलीस अधिकारी औदुंबर मस्के गंभीर जखमी
बाजारपेठ पोलिसांनी आरोपी नितीन गायकवाडला घेतले ताब्यात
-
-
राज्य सरकारच्या दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायवर उच्च न्यायालयाची टीका
राज्य सरकारच्या दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायवर उच्च न्यायालयाची टीका, प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रोमोट करू शकतं नाही, आपण शैक्षणिक दृष्टया मुलाचं नुकसान करू शकतं नाही, उच्च न्यायालयाची भूमिका
-
जालना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
जालना :
जालना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी अँटीकरप्शन जाळयात
जालना तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि याच जुन्या गुन्ह्यात मागितली होती लाच
याच प्रकरणात पाच लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती
तडजोडी अंती दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली
पुणे लाचलुचपत विभागाने केली कारवाई
-
राज्य सरकारने चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत द्यावी : रामदास आठवले
रायगड : रामदास आठवले यांची प्रतिक्रिया :
चक्रीवादळाचे गुजरातमध्ये जास्त नुकसान झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथले मुख्यमंत्री होते. पण आता देशाचा पंतप्रधान असल्याने अतर राज्याचां सर्व्हे करुन मदत करण्याणी भूमिक भारत सरकारची आहे. राज्य सरकारने चक्रीवादळातील मृतांच्या 4 लाखा ऐवजी 10 लाखांची मदत द्यावी. तसेच उद्धवस्त झालेल्या घरांचे पुनर्वसन करुन लोकांचे संसार उभे करण्यासाठी, फळ बाग पिकांचे नुकसानीला जास्तीत जास्त भरपाई करीता मुख्यंमंत्री आणि पतंप्रधानानां पत्र लिहीणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
-
-
महाविकास आघाडी मराठवाड्याच्या विकासासाठी बांधील : मंत्री अमित देशमुख
मंत्री अमित देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे : – मराठवाडा वॉटर ग्रिड मराठवाड्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे – महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीपथात हा प्रकल्प नेहमी राहिला आहे – मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा प्रकल्प शासनाच्या विचाराधीनच होता – काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली – या बैठकीला मराठवाड्यातील मंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित होते – यात औरंगाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना पिण्याचे शाश्वत पाणी मिळणार आहे – पहिल्या टप्प्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे – मंत्रीमंडळात याबाबत चर्चा होईल आणि मुख्यमंत्री त्याला अंतिम मंजुरी देतील
– महाराष्ट्र शासनाने वृद्ध कलावंतांचे मानधन वेळेवर वितरित केले आहे – चित्रपट, नाटक, लोककला यावर कोरोनामुळे बंधनं आली – काही लोकांवर उपासमारीची वेळ आली – याबाबत शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या – ज्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावले आहे त्यांना मदत करण्याची. मानसिकता सरकारची अहो – कलाकारांना भरीव मदत करण्याबाबत लवकरच निर्णय होईल – चित्रिकरणाला तात्काळ परवानगी देणे आता शक्य नाही, पुढील काळात याचा विचार होईल – लसीकरण लवकर झाले तर यातून आपण लवकर
– मराठवाड्यातील हे जिल्हे कायम दुष्काळी आहेत – या भागाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी देणे ही भूमिका आमची राहिली – आज हे स्वप्न पूर्ण होतंय त्याचं समाधान आहे
– महाविकास आघाडी मराठवाड्याच्या विकासासाठी बांधील आहे – सुरुवातीच्या काळात सरकार कामाला लागले आणि काही महिन्यातच कोरोनाचे संकट आले – त्यामुळे इतर कामे मागे पडली – योजना गुंडाळणे, ती रद्द करणे अशी चर्चा केव्हाच झाली नाही
– केंद्र सरकारने दिलेले काही व्हेंटीलेटर खराब आहेत असं निर्देशनास आलंय त्याबाबत केंद्र सरकारल कळवलं आहे – माझ्यासमोर जो ढोबळ आकडा आलाय त्यामुळे १५०० ते १८०० व्हेंटीलेटर मिळालेत, त्यातील २०० ते २५० व्हेंटीलेटर खराब असल्याचे समोर आलंय
न्यूकर मायकासिसबाबत – आपण उपचाराचा प्रोटोकॉल तयार केलाय – मात्र यासाठी लागणारे इजेक्शन उपलब्ध नाहीत – या इजेक्शनच्या वितरणाचे अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडे घेतलेत – महाराष्ट्रात ज्या प्रमाणात रुग्ण आहेत त्याप्रमाणात इजेक्शन मिळावे अशी मागणी केली आहे
-
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला, पोलीस भरती बद्दल लवकरच निर्णय घेऊ : दिलीप वळसे पाटील
नागपूर :
दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री) :
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे, तर पोलीस भरती बद्दल आम्ही काम करतोय, लवकरच निर्णय जाहीर करू
मुंबईत पंतप्रधानाबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस कमिश्नर पातळी वरचा विषय, त्याबद्दल मी वाच्यता करणे योग्य होणार नाही
केंद्राने गुजरात ला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही, मात्र त्यासोबत महाराष्ट्राला ही मदत झाली पाहिजे ही अपेक्षा…
मराठा आरक्षणा ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याबद्दल मराठा आरक्षण बद्दल ची उपसमिती ने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अर्थ लावण्यासाठी समिती नेमली असून त्याचा निकाल आल्यावर आम्ही पुढचा योग्य निर्णय घेऊ..
चक्री वादळात एवढ्या मृत्यू दुर्दैवाने झाला, मात्र सर्व ठिकाणी अलर्ट दिलेला होता, नियोजन ही चांगला होता..
बार्ज 305 ची दुर्घटना बद्दल केंद्र सरकार ने चौकशीचे निर्देश दिले आहे.. त्याप्रमाणे जी काही कारवाई आवश्यक असेल ती होईलच… एवढ्या लोकांचा मृत्यू होणे शोभणारी गोष्ट नाही
-
नाशिकमध्ये स्टॅम्प पेपरचा काळाबाजार
– नाशिकमध्ये स्टॅम्प पेपरचा काळाबाजार
– जिल्हाधिकारी कार्यालयातच केला जातोय काळाबाजार
– 100 च्या स्टॅम्प पेपरची 500 रुपयांना होतीये विक्री
– लॉकडाउन काळात स्टॅम्प पेपर विक्री बंद असल्याने जिल्हाधिकारी कार्यलयातील कर्मचारीच करतायत काळाबाजार
-
वादळाच्या नुकसानासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी मदत करायला हवी : दिलीप वळसे पाटील
वादळाच्या नुकसानासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी मदत करायला हवी – दिलीप वळसे पाटील कायदेशीर प्रक्रियेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती आहे – दिलीप वळसे पाटील मराठा आरक्षणाच्या निकालाची समिक्षेसाठी समिती बनवली – दिलीप वळसे पाटील ज्येष्ठ न्यायाधीशांच्या अध्यतेखाली समिती बनवली आहे – दिलीप वळसे पाटील
तौत्की वादळाचा अलर्ट सगळ्यांना दिला होता – दिलीप वळसे पाटील केंद्रानं पी बार्ज 305 दुर्घटने संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत योग्य ती कारवाई होईल – दिलीप वळसे पाटील
-
भाजपा खासदार मनोज कोटक यांचा काँग्रेसवर मोठा आरोप
भाजपा खासदार मनोज कोटक यांचा काँग्रेसवर मोठा आरोप – टूलकिटमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोध करण्याचा संदर्भ होता त्या अंतर्गत काँग्रेस या पद्धतीचा विरोध करीत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई कॉंग्रेसने घाटकोपर भागात बॅनर लावले, मुंबईच्या घाटकोपर भागात हे बॅनर राजवाडी सिग्नल, गरोडिया सिग्नल, विक्रांत सर्कल वर लावण्यात आले आहेत, – कॉंग्रेस द्वारा लावलेल्या या बॅनर विरोधात पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपने तक्रार दाखल केली आहे, – खासदार मनोज कोटक स्वत: पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते, – भाजपचे खासदार मनोज कोटक म्हणाले की, काँग्रेस पंतप्रधानांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असतात की कोरोनाच्या या वातावरणात राजकारण केले जाऊ नये, या प्रकरणात त्यांच्या सरकारमधील असलेले घटक मित्रपक्ष असे वागत आहेत, मोदीजीँना विरोध करता करता काँग्रेस देशाच्या विरुद्ध गेली आहे, मुख्यमंत्री कारवाई करणार का हा सवाल…? – टूलकिटमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोध करण्याचा संदर्भ आहे ज्या अंतर्गत कॉंग्रेस या पद्धतीचा विरोध करीत आहे.
-
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांची मागणी
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांची मागणी तौत्के वादळात 38 जणांचा मृत्यू, याला जबाबदार सर्वांवर कारवाई व्हायला हवी तौत्के वादळाचा इशारा असताना कर्मचाऱ्यांचा जीव वाऱ्यावर सोडण्यात आला मृतांची जबाबदारी स्वीकारून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा
-
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच स्टॅम्प पेपरचा काळाबाजार, 100 च्या स्टॅम्प पेपरची 500 रुपयांना विक्री
नाशिकमध्ये स्टॅम्प पेपरचा काळाबाजार – जिल्हाधिकारी कार्यालयातच केला जातोय काळाबाजार… – 100 च्या स्टॅम्प पेपरची 500 रुपयांना होतीये विक्री – लॉकडाउन काळात स्टॅम्प पेपर विक्री बंद असल्याने जिल्हाधिकारी कार्यलयातील कर्मचारीच करतायत काळाबाजार – स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड…
-
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले निवळी गावात
रत्नागिरी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले निवळी गावात
देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड माजी खासदार नीलेश राणे उपस्थित
रत्नागिरीजवळच्या निवळी गावात संजय केळकर यांच्या नुकसानग्रस्त घराची करतात पाहणी
देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरी जिल्ह्यातील तिसऱ्या ठिकाणाला भेट
ही पाहणी करून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार
-
पुण्यात गिरीश बापटांचं आरटीओ कार्यालयाबाहेर हातात रिकामं ताटं वाटी घेऊन आंदोलन
पुणे –
पुण्यात गिरीश बापटांचं आरटीओ कार्यालयाबाहेर हातात रिकामं ताटं वाटी घेऊन आंदोलन,
रिक्षाचालकांना वेळेवर जाहीर केलेली आर्थिक मदत वेळेवर देण्याची केली मागणी,
1500रुपयांची मदत करूनही ती वेळेवर मिळेना,
आंदोलन केल्यावर कारवाई केली जाते मात्र मी कशाला घाबरणारा नाही,
आमच्या मागे ईडी लावल्यावर काय मिळणार,
आमच्या खिशात चणे फूटाणे मिळतील,
गिरीश बापटांच वक्तव्य
-
नगरच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद
अहमदनगर
नगरच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद
जिल्ह्यातील उपाययोजना बाबद दिली मोदींना माहिती
तर आदर्शगाव हिवरेबाजार कसे कोरोना मुक्त झाले या संदर्भात दिली माहिती
-
औरंगाबादेत पेट्रोल दराने गाठली शंभरी, पेट्रोलचा दर 100 रुपये 43 पैसे प्रति लिटर
औरंगाबाद –
औरंगाबादेत पेट्रोल दराने गाठली शंभरी
औरंगाबादेत पेट्रोलचा दर 100 रुपये 43 पैसे
पेट्रोलचा दर शंभरी पार केल्यामुळे नागरिक हवालदिल
पेट्रोलचा दर शंभरी पार जाऊनही नागरिकांची पंपावर गर्दी
डिझेलचा दर 92 रुपये प्रति लिटर वर
-
दुसऱ्यांदा चक्रीवादळ आलंय, आता सरकारने मदत करावी – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस –
वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे, 600 गावातील लाईट गेली, 60-70 हजार कुटुंबं अंधारात
शेतीचं, फळबागांचं मोठं नुकसान, मच्छिमारांचं नुकसान, बोटी उद्ध्वस्त झाली
मागच्या निसर्ग चक्रीवादळावेळी ज्या घोषणा केल्या, त्यातील काहीच मिळालं नाही…
आमची अपेक्षा आहे, दुसऱ्यांदा चक्रीवादळ आलंय, आता सरकारने मदत करावी
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 17.77 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ १७.७७ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे
हा साठा २७ जुलै २०२१ पर्यंत पुरेल मागील वर्षी याच कालावधीत २१ टक्के एवढा पाणीसाठा होता.
तर त्याआधी म्हणजे २०१९ मध्ये हा पाणी साठा १२ टक्के एवढाच होता.
-
कर्नाळा बॅंक आर्थिक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील यांच्यासह 19 जणांना बजावले आरोपपत्र
पनवेल –
कर्नाळा बॅंक आर्थिक घोटाळा प्रकरण
विवेक पाटील यांच्यासह 19 जणांना बजावले आरोपपत्र
मृत संचालकाच्या वारसांवरही आरोपपत्र
रामशेठ ठाकूर, विद्यमान आमदार बाळाराम पाटील याच्यांसह 14 जणांना क्लीन चिट
ज्यांनी खुलासा करून आपली बाजू मांडली सहकार खात्याने ते मान्य करत चौकशीतून केले मुक्त
संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८नुसार आपली बाजू मांडण्याची दिली होती संधी
संचालकांकडून प्रत्येकी १६ ते २९ कोटींची वसूली रक्कम सहकार विभागाने केली निश्चित
-
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, शहरात 10 रुपयात पीएमपीने कुठेही करता येणार प्रवास
पुणे –
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
पुणेकरांना शहरात 10 रुपयात पीएमपीचा कुठेही करता येणार प्रवास
महापालिकेनं पुण्यदशम ( 50 ) मिडी बस केल्या खरेदी
पुढच्या आठवड्यात पुण्यातील रस्त्यावर धावणार पुण्यदशम बस
महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी केली बसेसची पाहणी
मध्यवस्तीतील झोन 1मध्ये धावणार बस
आणखी 350 मीडी बस महापालिका करणार खरेदी त्यापैकी 50 बस पुढच्या आठवड्यात होणार दाखल
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासनेंची माहिती
-
सोलापुरात 24 ते 31 मेपर्यंत सलग आठ दिवस भुसार व्यवसाय बंद राहणार
सोलापूर – 24 ते 31 मेपर्यंत सलग आठ दिवस भुसार व्यवसाय बंद राहणार
महापालिका प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या कारवाईला कंटाळून मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांचा निर्णय
भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यकारणी मंडळाच्या ऑनलाईन सभेत झाला निर्णय
करुणासारखे असून त्या काळात भुसार व्यापारी सेवा देत आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित नाही
मात्र प्रशासनाला वारंवार सांगितल्यानंतरही कारवाई सुरू असल्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याचा घेतला निर्णय
-
भारतीय तटरक्षक दलाने वेंगुर्ला निवती रॉक दीपगृहावर अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले
भारतीय तटरक्षक दलाने वेंगुर्ला निवती रॉक दीपगृहावर अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले.
या मोहिमेच्या थरारक शौर्याचा व्हिडीओ तटरक्षक दलाने ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.
तौऊते चक्रीवादळात तटरक्षक दलाने खूप महत्त्वाची कामगिरी केलीय.
गोव्यातील चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलावर ही मोहीम फत्ते केली.
बदललेल्या हवामानामुळे खवळलेला समुद्र यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन दीपगृहाचे मोठे नुकसान झाले. निवती रॉकवरील पक्क्या बांधकामालाही समुद्राच्या लाटांनी तडाखा दिला.
#CycloneTauktae #NationFirst @IndiaCoastGuard Chetak launched from Goa successfully rescued 02 DGLL employees stranded at Vengurla Rock Light House in a daring mission today amidst gusting winds and challenging weather conditions @DefenceMinIndia @shipmin_india @SpokespersonMoD pic.twitter.com/jMrFvlIAP2
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 18, 2021
-
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्याव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलची मागणी
पुणे –
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्याव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलची मागणी,
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाला पाठवली निवेदन ,
वर्षभर शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आलंय, मात्र अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत,
त्यामुळे परीक्षा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सेलनं पत्र पाठवून केलीये …
आज हायकोर्टातील दहावीच्या परीक्षा रद्दचा संदर्भातील सुनावणीकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय
-
अलकुंटे चौकातील आणखीन तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
सोलापूर- अलकुंटे चौकातील आणखीन तीस जणांना पोलिसांनी ताब्यात
काँग्रेस नेते करण म्हेत्रे यांचा अंतयात्रेला गर्दी केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
आत्तापर्यंत 98 जणांवर पोलिसांनी केली आहे कारवाई
रविवारी मित्र यांच्या अंत्यसंस्काराला अलकुंटे चौकातील नागरिकांनी केली होती मोठी गर्दी
-
राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 38.43 टक्के पाणीसाठा शिल्लक
पुणे –
– राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 38.43 टक्के पाणीसाठा शिल्लक,
– राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे राज्यातील सर्वच धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे,
– त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही,
– गेल्या वर्षी देखील दुसर्या टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्व धरणे हाऊसफुल्ल झाली होती,
– मात्र फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याचा वापर वाढू लागला आणि ऐन उन्हाळाच्या दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाण्याचा वापर झाल्यामुळे सध्या केवळ 38.43 टक्के पाणीसाठा शिल्लक
– त्यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस लवकर पडला नाही तर जून महिन्यात त्या भागांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता,
– जलसंपदा विभागाचे राज्यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग आहेत.
– या सहा विभागांत एकूण 3 हजार 267 लहान, मध्यम प्रकल्प आणि मोठी धरणे आहेत.
-
पुणे महापालिकेप्रमाणे पुणे पोलिसांचीही मान्सुनपूर्व तयारी
पुणे
महापालिकेप्रमाणे पुणे पोलिसांचीही मान्सुनपूर्व तयारी
गेल्या वर्षी कात्रज आणि सिंहगड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पुणे पोलिसांनी केली मान्सुन पूर्व तयारीला सुरुवात
प्रत्येक पोलीस ठाण्याने त्यांच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ आणि गुन्हे निरीक्षकांचे क्रमांक, पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि ज्यांना पोहता येते असे 5 कर्मचारी तसेच हद्दीतील पोहता येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करावी
शोध आणि बचाव कार्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता ठेवावी,
पूल पाण्याखाली गेल्यास पर्यायी वाहतूक नियोजन तयार ठेवावे
पूर आणि अन्य कारणांमुळे बाधित झालेल्या भागातील स्थावर मालमत्ता आणि मौल्यवान गोष्टींवर देखरेख करावी
नदीपात्रातील झोपडपट्ट्या आणि धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करुन योजना कराव्यात़
बाधित झालेल्या भागामध्ये बघे लोक, वाहनांवर नियंत्रण ठेवणे़
आपत्तीच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे
याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या सूचना
-
तौत्के वादळाच्या तडाख्याने कल्याण तालुक्यात 292 घरांचे नुकसान
तौत्के वादळाचा फटका कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला आहे. या वादळात 292 घरांचे नुकसान झाले असून चार जण किरकोळ जखमी झाले आहे. या घरांच्या नुकसानाची कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आले आहे.
-
बार्जमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पापांच्या मृत्यूला ओनएनजीसी प्रशासन जबाबदार, नवाब मलिक यांची टीका
– मंत्री नवाब मलिक यांची ओएनजीसी कंपनीवर टिका
– बार्जमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पापांच्या मृत्यूला ओनएनजीसी प्रशासन जबाबदार
– केंद्र सरकारने वेळीच त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं असतं तर त्यांचा बळी गेला नसता
– ६० जण जे बेपत्ता आहेत त्याला ओएनजीसीचा हलगर्जीपणा जबाबदार अशी टिका…
-
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डीएपी खताची किंमत निम्म्याने कमी, एक पोतं आता 1200 रुपयांत
मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, डीएपी खतांवर 1200 रुपयांचं अनुदान, डीएपीची एक पोतं आता 2400 ऐवजी 1200 रुपयांना मिळणार, उच्च स्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली आहे.
Published On - May 20,2021 10:10 PM