महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
बार्ज p305 दुर्घटना प्रकरण..
आतापर्यंत 61 मृतदेह सापडले, त्यातल्या 43 मृतदेहांची ओळख पटली
आज रात्री 8 वाजेपर्यंतची आकडेवारी
अद्यापही 18 मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सूरु
आतापर्यंत ओळख पटलेल्या मृतदेहापैकी 41 मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आलेत तर ओळख पटलेल्या मृतदेहापैकी दोन मृतदेह सोपवणे बाकी आहेत
पुणे :
आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील निलेश राणेचं ट्टीट
पुणे स्मार्ट सिटीनं केलं होतं रीट्टवीट
स्मार्ट सिटीनं रीट्टीट केल्यावरती शिवसेनेनं घेतला होता आक्षेप
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकार घडल्याची स्मार्ट सिटीची कबूली,
कर्मचाऱ्याला कामावरून केलं कार्यमुक्त तर भविष्यात असा प्रकार घडल्यास कंपनीचं कंत्राटचं रद्द करण्याची स्मार्ट सिटीची तंबी
ज्याची सोसायटीची वॉचमन होण्याची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर वरळीकरांना त्रास तर सहन करावा लागणार, असं निलेश राणेंनी केलं होतं ट्टीट,
अखेर स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्याला कामावर कारवाई, स्मार्ट सिटीनं कारवाईचं शिवसेनेला दिलं पत्र
रायगड :
रायगड समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांत 5 मृतदेह
अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 तर मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक मृतदेह.
मुरुड नवगाव, आवास, दिघोडी येथे सापडले मृतदेह.
तौक्ते चक्रीवादळा दरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या ONGC च्या बाँम्बे हाय मधील बोटीतील मृतदेह असल्याची शक्यता.
आढळून आलेले पाचही मृतदेह पुरुषांचे.
ऊस तोडणी साठी गेलेल्या नऊ मजुरांची जालना पोलिसांनी केली सुटका केलीय. सोलापुर जिल्ह्यातील बाधलेवाडी येथून या मजुरांची सुटका दोन वर्षांनी करण्यात आली आहे. ऊस तोडणीचे काम संपल्यानंतर या बारा मजुरांना एका शेतात दोन वर्षे बंधक करून शेतीचे काम करून घेण्यात येत होते. या मधील त्या ठिकाणी असलेली एक महिला, तिची आई आणि नऊ वर्षाचा मुलगा तेथुन पळुन जालन्यात आले आणि हा सर्व प्रकार जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांना सांगितला नंतर आमदार कैलास गोरंटयाल हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पथक पाठवुन या सर्व मजुरांची सुटका करून जालन्यात घेऊन आले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांनी सोलापुर पोलिसांकडे वर्ग केला आहे
शिर्डी :
शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची जाहीर नाराजी
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण न दिल्याने लोखंडे नाराज
जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांच्या पाहणी दौऱ्यावरुन नाराजीनाट्य
निळवंडे धरणाच्या कालव्याच्या पाहणी दौऱ्यावरुन लोखंडे नाराज
माझ्या लोकसभा मतदारसंघात मंत्र्यांचा पाहणी दौरा असताना निमंत्रण का नाही ?
संबधीत अधिकारी आणि नेत्यांवर गुन्हा दाखल करा
पाहणी दौऱ्यात गर्दी झाल्याने गुन्हा दाखल करावा सर्वांना कायदा सारखाच, लोखंडेंची मागणी
आज दुपारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांनी केला होता दौरा
खा. सदाशिव लोखंडे आक्रमक
रामदेवबाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, आयएमएचीने केली मागणी
रामदेव बाबांनी एलोपॅथची उपचार पद्धतीबाबत अविश्वासहर्ता दर्शवली होती
फॅबीफ्लू,स्टेराईडसह अन्य अॅंटिबॉयोटिक्स फेल ठरल्याचे रामदेव बाबांनी केले होते विधान
याच पार्श्वभुमीवर गुन्हा दाखल करण्याची आयएमएचीने केली मागणी
जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका :
समुद्रातील ओएनजीसीच्या कामात महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण नाही
सदर कंपनीला आठ दिवस अगोदर इशारे देऊनही कर्मचारी बाहेर काढले नाहीत.
याची चौकशी केली जाईल प्रत्येक गोष्ट राज्य सरकारवर टीका करण्यासाठी वापरली जाऊ नये
यामुळे नेमक काय घडलं याचा तपास आता पोलीस अधिकारी करतीलच.
दरम्यान, केंद्र सरकारच्या हातात असलेलं लसीकरणाच नियोजन ढासळलेले असून
ज्यांना पहिली लस दिली त्यांना दुसरी लस देण्याचं नियोजन का नाही ?
लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर केंद्र सरकारच नियोजन असल्यानं जगात लस निर्यात करण्यावर भर दिल्याने
त्याचे आज दुष्परिणाम दिसतायत, अशी टीका जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केलीय
काँग्रेस नेते राहुल गांधी हिंगोलीत येणार,
राजीव सातव यांच्या कुटुंबांची भेट घेणार
25 मे रोजी हिंगोलीत येणार
शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर टिका केल्याने भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडेंवर कारवाई
– बांद्रा सायबर सेल पोलिसांनी सकाळी पुणे येथून घेतलं ताब्यात…
– गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप…
– गावडे यांचा वांद्रे पश्चिम, सायबर शाखेतर्फे जबाब नोंदवण्यात येत आहे..
– त्यांच्याविरोधात भादंवि कलम २९५ अ, ५०० आणि ५०५/२ कलमांतर्गत तसेच आयटी एक्ट ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती
रायगड
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे आज रायगड मध्ये चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाच्या पहाणी दौ-यावर आहे.
अलिबाग मधील नवगाव येथे मच्छीमारां सोबत सवांद साधत नुकसान झालेल्या मच्छीमार बोटीचीं पहाणी केली.
वरसोली येथे रमेश नाईक याच्यां नारळाच्या बागेची पहाणी केली.
त्यानतंर काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधीत केल्या नतंर वावे येथे पुर्णत: पडलेल्या घराची पहाणी केली
यावेळी त्याच्यां सोबत काँग्रेस चे हुसेन दलवाई, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हा महीला अध्यक्ष श्रद्धा ठाकुर , तालुका अध्यक्ष रमेश मगर, जितेद्रं गोधंळी व ईतर कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.
रत्नागिरी- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे चक्रीवादळ नुकसान झालेल्या ठिकाणची करतात पाहणी
रायगड जिल्ह्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पहाणीला सुरुवात
विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले घरी
चक्रीवादळाने नुकसान झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची सुद्धा करणार पाहणी
बीड : पावसाळा तोंडावर आला असताना देखील परळी नगरपालिकेने अद्यापही मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने गटार नाल्यातील सर्वच पाणी रस्त्यावर आल्यानं दुर्गंधी पसरली होती.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून मान्सूनपूर्व काम करण्याची मागणी केली जातेय.
परंतु अद्यापही पालिका प्रशासनाने नालेसफाईचे काम हाती घेतले नाही.
शहरातील तुकाराम नगर, माणिक नगर, गांधी मार्केट रस्ता याठिकाणी गटाराचे पाणी नदीत सोडले जाते.
त्याबरोबरच सफाई कामगार घंटागाडीतील कचरा याठिकाणी टाकत असतात.
त्यामुळे परिसरात सर्वाधिक दुर्गंधी पसरली आहे.
पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच ही काम करून घेणे गरजेचे आहे.
चंद्रपूर:- कोरोना काळात वन्यजीवप्रेमीना शहरालगतच्या रस्त्यांवर भल्या मोठ्या अस्वलीचे दर्शन,
ऐन हंगामात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे बंद,
कोरोना लाट ओसरत असताना जंगलभ्रमंती पुन्हा एकदा झाली सुरू,
शहरालगत जंगल शुष्क होत चालले असताना वन्यजीव हालचालीत वाढ,
मोकळ्या विनावाहतुकीच्या जंगल मार्गावर अस्वलीने केली स्वच्छंदी सैर, वन्यजीवप्रेमी आयेशा शेख यांचा व्हिडिओ झाला वायरल
इचलकरजी
सकल मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश दादा पाटील यांनी केली आंदोलनाची घोषणा
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार यांच्या घरावर गनिमी काव्याने काढणार ढोल बजाव आंदोलन करणार
मराठा आरक्षण रद्द झाल्याबद्दल काढणार मोर्चे आंदोलन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुरेशदादा पाटील यांनी दिला आहे
महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाचा केला विश्वासघात
मराठा समाजातील सर्व संघटना ना घेऊन करणार आंदोलन
जेष्ठ संगीतकार रामलक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन
वयाच्या 79व्या वर्षी अखेरचा श्वास
नागपुरात घेतला अखेरचा श्वास
अंबरनाथ :
अंबरनाथमध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने एक जण गंभीर जखमी
घरावर पत्रे टाकताना झाला अपघात
अंबरनाथ पश्चिमेच्या कैलासनगर परिसरातील घटना
जखमीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं
परिसरातील अनेक घरांमध्ये विद्युत उपकरणांचे नुकसान
अंबरनाथ :
अंबरनाथमध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने एक जण गंभीर जखमी
घरावर पत्रे टाकताना झाला अपघात
अंबरनाथ पश्चिमेच्या कैलासनगर परिसरातील घटना
जखमीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं
परिसरातील अनेक घरांमध्ये विद्युत उपकरणांचे नुकसान
नाशिक – आनंदवल्ली खून प्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
प्रांत,तलाठी,तहसिलदार यांच्यासह 17 अधिकाऱ्यांना नोटीस
मोक्क्यातील गुन्ह्यात प्रथमच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस
पोलिसात दाखल झालेल्या तत्कालिन गुन्ह्यात वारसा हक्क लावण्यात फेरफार झाल्याचा आरोप
पोलीस अधिकारी विरुद्ध महसूल अस नाट्य रंगण्याचं चिन्ह
महसूल अधिकाऱ्यांकडून काय उत्तर येत याकडे लक्ष
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही
स्वदेशी करोवॅक्सिन लस घोतलेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर रोख लागण्याची शक्यता
सीरमच्या कोविशील्ड लशीचा आपत्कालीन यादीत समावेश
नाशिक – शहरातील घरगुती गॅस योजनेच्या 150 किलोमीटर रस्ते खोदाईवर पालिका आयुक्तांची बंदी
नियम धाब्यावर बसवत खोदाई केल्याचा आरोप
शहरातील रस्त्यांची ठेकेदाराकडून चाळणी
शहरातील नागरिकांकडून येत होता तक्रारींचा पाऊस
पावसाळ्यात होणार नाशिककरांचे प्रचंड हाल
ठेकेदारावर कारवाईची मागणी
नाशिक – शहरात आज दिवसभर पाणीपुरवठा नाही
धरण क्षेत्रात महावितरण ला पावसाळा पूर्व काम करायचे असल्याने पाणी पुरवठा बंद
गंगापूर आणि मुकणे धरण क्षेत्रात होणार काम
उद्या देखील कमी दाबाने येणार पाणी
पिंपरी चिंचवड
– कंपनीत पाण्याचे टँकर पुरविण्याच्या कारणावरून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या
– कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करत भर रस्त्यात त्याचा खून केला होता
– ही घटना शुक्रवारी दुपारी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावात घडली.घटनेच्या दिवसापासून आरोपी फरार होते,या गुन्ह्यातील तीन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे
– आकाश उर्फ गण्या रवि घरमाळे, ऋषीकेश उर्फ गोट्या सुनिल भालेराव, अभिषेक बुध्दसेन पांडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत
– या खुनाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती
पुणे
-तळेगांव दाभाडे एमआयडीसी मधील आंबी येथील इंद्रायणी नदी पात्रात पोहत असताना बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू
-अनिमेश व्होटकर असं वीस वर्षीय युवकाचे नाव
-अनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र हे दोघे इंद्रायणी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले असता अनिमेश याने आपण हे नदी पात्र ओलांडून पलीकडे जाऊ असे सांगून पोहण्यास सुरवात केली असता नदी पात्राच्या मध्यभागी गेले असता दम लागल्याने त्यांचा मृत्यू झाला
-शिवदुर्ग व वन्यजीव रक्षक संस्था यांच्या सहकाऱ्यानी इंद्रायणी नदी पत्रात शोध घेत अनिमेश चा मृतदेह पाण्या बाहेर काढला
– ॲानलाईन वर्गातून 50 टक्के विद्यार्थ्यांना काढलं
– नागपुरातील नारायणा शाळेविरोधात पालकांची पोलीस तक्रार
– नारायणा शाळेविरोधात बेलतरोडी पोलीसांत तक्रार
– शुल्क भरले नाही म्हणून ५० टक्के विद्यार्थी ॲानलाईन क्लास बाहेर
– ‘शुल्कासाठी शिक्षण न थांबण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश’
– शाळेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला बगल
औरंगाबाद –
औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून
भर रस्त्यात झाला दगडाने ठेचून खून
बजाजनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर घडली घटना
अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर रात्री 9 वाजता घडली घटना
खून झालेला तरुणही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती
पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांना अंदाज
विशाल फाटे असं खून झालेल्या आरोपींचे नाव
डोंबिवली कल्याण ग्रामीण मधील हेदुसन गावात आग
महावितरणच्या भूमिगत केबलला आग
अचानक आग लागल्याने गावात भीतीचे वातावरण
डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेडची टीम गावात दाखल
आग नियंत्रणात
शॉर्टसर्किटमुळे आग लागली, फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडगे यांची माहिती
मालेगाव –
स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी अडकला सीबीआयच्या जाळ्यात
होम लोन मंजूर करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना मलाई कांचन या अधिकाऱ्याला रंगेहात पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा करण्यात आला दाखल
80 हजार रुपयांची केली होती मागणी त्यापैकी आज 10 हजार घेताना हा अधिकारी अडकला सीबीआयच्या जाळ्यात