Maharashtra News LIVE Update | कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठी गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली

| Updated on: Nov 06, 2021 | 1:06 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठी गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Nov 2021 10:23 PM (IST)

    कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठी गर्दी, कोरोना नियमांची पायमल्ली

    मुंबई : कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली मोठी गर्दी

    कोरोना नियमांची पायमल्ली, मंत्री स्वतः मास्क न लावता दिसले

    महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई शहराचे पालख मंत्री असलम शेख यांच्या वाढदिवसाची पार्टी आज मालाडमधील मार्वे येथे पार पडली.

    वाढदिवसाच्या पार्टीत प्रचंड गर्दी होती, त्यात ना सोशल डिस्टन्सिंग दिसले ना पार्टीत आलेले लोक कोरोनाचे नियम पाळताना दिसले.

  • 05 Nov 2021 10:15 PM (IST)

    अहमदनगरमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी भर पावसात केलं भाषण

    अहमदनगर : माजी मंत्री राम शिंदे यांनी भर पावसात केलं भाषण

    शिंदे यांच्या पावसातील सभेची जिल्ह्यात जोरदार चर्चा

    खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थित झाली सभा

    शिंदे यांच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनच्या निमित्ताने केले होते सभेचे आयोजन

  • 05 Nov 2021 09:31 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात पत्नीपाठोपाठ पतीचीही गळफास लावून आत्महत्या

    हिंगोली- पत्नीपाठोपाठ पतीचीही गळफास लावून आत्महत्या

    पत्नीने काल तर पतीने आज घेतला गळफास

    काजल, भीमराव घोगरे अस गळफास घेतलेल्या पती/पत्नीचं नाव

    कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील घटना

  • 05 Nov 2021 08:56 PM (IST)

    सिधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात 11 हजार पणत्यांची आकर्षक रोषणाई 

    सिंधुदुर्ग : कुणकेश्वर मंदिरात 11 हजार पणत्यांची आकर्षक रोषणाई

    कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं देवगड येथील कुणकेश्वर मंदिरात आज 11 हजार पणत्यांची आकर्षक आणि डोळे दिपवणारी रोषणाई

    मंदीर परिसरातही आकर्षक रोषणाई

    संपूर्ण कुणकेश्वर मंदिर परिसर दिव्यांनी गेला उजळून

  • 05 Nov 2021 08:07 PM (IST)

    फटाके नेताना तामीळनाडूत भीषण स्फोट, मुलगा, बाप जागीच ठार

    तामीळनाडूत भीषण स्फोट

    दुचाकीवरून फटाके नेताना मुलगा, बाप जागीच ठार

    कोटाकुपममधील स्फोट सीसीटीव्हीमध्ये कैद

    दुचाकी आणि मृतदेहाचे तुकडे

    जवळून जाणाऱ्या दुचाकीचेही नुकसान

    भीषण स्फोटात दोन जण ठार तर तीन जण जखमी

  • 05 Nov 2021 06:36 PM (IST)

    समीर वानखेडे यांना त्यांच्या नातवाईकांचा पाठिंबा, मलिक यांच्याविरोधात तक्रार देणार

    वाशिम : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा गावातील नातेवाईक उद्या सकाळी 10 वाजता वाशिम येथे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा निषेध करणार आहेत. तसेच वानखेडे यांचे नातेवाईक मलिक यांच्याविरोधात वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत.

  • 05 Nov 2021 06:17 PM (IST)

    नागपुरात आज 2 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 2 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    शून्य मृत्यू, तर 4 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 493467

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 483321

    एकूण मृत्यूसंख्या – 10121

  • 05 Nov 2021 06:08 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस

    कोल्हापूर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस

    चंदगड नेसरी भागात मुसळधार पाऊस

    कापणी केलेल्या भाताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता

    अवकाळी पावसामुळे आठवडी बाजारामध्ये तारांबळ

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

  • 05 Nov 2021 06:07 PM (IST)

    कल्याण शीळफाटा येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली

    ठाणे : कल्याण शीळफाटा येथे midc ची  पाईपलाईन फुटली

    पाईपलाईन फुटल्याने झोपडपट्टी भागात पाणी साचले

    काही घरात देखील पाणी गेले

    घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनआणि अग्निशमन दल  पोहोचले

    संबंधित अधिकाऱ्याने लवकरात लवकर भेट देत कारवाई करण्याचे आश्वासन

  • 05 Nov 2021 05:54 PM (IST)

    पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस

    पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरुवात झाली आहे.  कापणीला आलेले भात, वरई, नागली पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात, वरई, नागली कापणी केलेले शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

  • 05 Nov 2021 05:43 PM (IST)

    पुण्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या घटली

    पुणे

    – जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला दिलासा देणारी बातमी,

    – करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या घटली,

    – सध्या ग्रामीण भागात केवळ 34 गावे हॉटस्पॉट आहेत,

    – या गावांमध्ये दहापेक्षा अधिक करोनाचे रुग्ण असल्याने ही हॉटस्पॉट गावे म्हणून गणली जात आहेत.

    – करोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या 465 पर्यंत पोहोचली होती.

  • 05 Nov 2021 05:42 PM (IST)

    नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

    नागपूर

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात आंदोलन

    राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन

    अनिल देशमुख यांच्या समर्थन केलं आंदोलन

    अनिल देशमुख यांना इडी ने अटक केल्याच्या निषेधार्थ करण्यात आलं आंदोलन

    काही काळ कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि घोषणाबाजी केली

  • 05 Nov 2021 05:40 PM (IST)

    शीळफाटा येथे मोठी जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या घरात घुसले पाणी

    ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या शीळफाटा येथे चिंतामणी हॉटेलसमोर एमआयडीसीची मोठी जलवाहिनी फुटल्याने पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई येथील महापे या ठिकाणी या जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा केलं जातं. काही लोक पाण्यामुळे घरात अडकल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.

  • 05 Nov 2021 05:33 PM (IST)

    आंबेगावातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात भरली बैलगाडा शर्यत

    आंबेगाव पुणे

    गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांच्या मतदार संघात पाडव्याला भि..र्रर्रर्र…!

    आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात भरली बैलगाडा शर्यत…!

    बैलगाडा घाटात भंडाराची उधळण करत बैलगाडा मालकांसह तरुणाईची गर्दी…!

    बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाच गृहमंत्र्यांच्या मतदार संघात भरली बैलगाडा शर्यत…

    मंचर आणि घोडेगाव पोलीसांचे मात्र बैलगाडा घाटाकडे दुर्लक्ष….

  • 05 Nov 2021 05:31 PM (IST)

    खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत झुंबड

    – पुणेकरांची खरेदीसाठी तुफान गर्दी,

    – मंडई चौक, लक्ष्मी रोड भागात मोठी गर्दी,

    – तुळशीबाग मार्केटमध्ये महिलांची भाऊबीज सणाच्या खरेदीसाठी गर्दी,

    – गेल्या आठवडाभरापासून शहरातल्या अनेक भागात गर्दी

  • 05 Nov 2021 01:34 PM (IST)

    राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरचा टॅक्स कमी करावा – नवनीत राणा

    राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरचा टॅक्स कमी करावा

    संजय राऊत यांनी राज्य सरकारला याबाबत सांगाव

    खासदार नवनीत राणा यांची मागणी

    एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत मग संजय राऊत गप्प का ?

    खासदार नवनीत राणा यांचा सवाल

    केंद्र सरकारने पाच रुपये कमी केले त्यानंतर राज्य सरकार 12 रुपये कमी का करत नाही

    खासदार नवनीत राणा यांचा सवाल

  • 05 Nov 2021 01:33 PM (IST)

    देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल

    सिंधुदुर्ग –

    देवडगड हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल

    पाच डझनाच्या पेटीला 18 हजारांचा भाव

    मालवण कुंभारमाठ येथील बागायतदार उत्तम फोंडेकर यांच्या बागेतून देवगड हापूसची पहीली पेटी बाजारात

  • 05 Nov 2021 12:18 PM (IST)

    शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्यात नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं

    सीएम ठाकरेंकडून शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करण्यात आली होती.

    शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्यात नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं

    मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची राणेंकडून आठवण

  • 05 Nov 2021 12:10 PM (IST)

    महाराष्ट्रात जे ५६ आमदार आहेत ते मोदींमुळेच आहेत, नारायण राणेंना शिवसेनेला टोला

    आमचे ३०३ पेक्षा जास्त आहे

    एकने तिथे धडक मारणार

    दिल्लीला धडक मारायला आले तर डोकं राहणार नाही

    डोक्याविना संजय राऊत दिसतील

    भाजपवर, मोदींवर टीका सुरु आहे

    महाराष्ट्रात जे ५६ आमदार आहेत ते मोदींमुळेच आहेत

    अन्यथा तुम्ही ८ च्या वर जात नाही

    ही मोदींची मेहरबानी आहे

  • 05 Nov 2021 12:08 PM (IST)

    दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे – नारायण राणे

    बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यापुढे आलो

    गेल्य़ा दोन दिवसांपासून संजय राऊतांचा अग्रलेख वाचला

    देशात विधानसभा, लोकसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक झाली

    यामध्ये दादरा नगर हवेलीची जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली

    शिवसेनेने डंका केला की आम्ही जिंकलो

    महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो

    दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे

    त्या डेलकर निवडून आल्या, त्याबाबात शिवसेना दिल्ली काबिज करणार असं म्हणतंय

    लिखाण करताना व्यक्तीला भान नसेल

    संजय राऊत रात्री जे करता ते दिवसा केल्याने असा परिणाम होतोय का माहित नाही

  • 05 Nov 2021 12:01 PM (IST)

    आळंदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आकर्षक सजावट करण्यात आलीये

    पुणे

    – आळंदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आकर्षक सजावट करण्यात आलीये

    – दिवाळी पाडव्याचं औचित्य साधत आज मंदिरात विविध फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली

    – आज रंगबिरंगी फुलांचा वापर करत मंदिरातील प्रवेशद्वार, गाभारा आणि समाधी स्थळ सजवण्यात आले

  • 05 Nov 2021 09:37 AM (IST)

    बारामतीत राज्यभरातून कार्यकर्ते पवारांणी भेट घण्यासाठी दाखल

    बारामतीत राज्यभरातून कार्यकर्ते पवारांणी भेट घण्यासाठी दाखल

    शरद पवारांना दिवाळीनिमित्त उप महाराष्ट्र केसरी पैलवान तुषार वरखडे देणार चांदीची गदा भेट

    सव्वाचार किलो चांदीची गदा पवारांना भेट दिली जाणार

    भोर मैदानात मिळालेली चांदीची गदा आज भेट म्हणून देण्याचा पैलवानाचा निर्धार

    पवारांना चांदीची गदा देणाऱ्या पैलवानाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी

  • 05 Nov 2021 08:28 AM (IST)

    ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता

    सोलापूर-  ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता

    डाळिंब व द्राक्ष बागायतदार यांची चिंता वाढली

    रब्बीसाठी चांगले वातावरण असल्याचा शेतकऱ्यांचे मत

    जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण

  • 05 Nov 2021 08:28 AM (IST)

    सोलापुरात दिवाळी सुट्टीमुळे लसीकरण मंदावले

    सोलापूर-

    सोलापुरात दिवाळी सुट्टीमुळे लसीकरण मंदावले

    सलग सुट्ट्यांमुळे लसीकरण मंदावले

    दिवाळी उत्सव सुरू झाल्याने सर्वजण घरगुती कामात गुंतले

    तर नोकरदार वर्ग सलग चार सुट्ट्यांमुळे पर्यटनाकडे वळला

    त्यामुळे लसीकरणावर झाला परिणाम

    दररोज पण 20 ते 25 हजार जण घेत होते डोस

    आता ही संख्या आली सहा हजारावर

  • 05 Nov 2021 07:07 AM (IST)

    पुणे-सोलापूर एक्स्प्रेस रोज धावणार

    पुणे

    पुणे सोलापूर एक्स्प्रेस रोज धावणार

    प्रवाशांच्या सोयीसाठी आठवड्यातून पाच दिवस धावणारी पुणे-सोलापूर-पुणे (०११५७/०११५८) ही रेल्वे आता दररोज धावणार

    या एक्स्प्रेससाठी आजपासून बुकिंग करता येणार

    या गाडीचे सर्व डबे आरक्षित केले जाणार आहेत.

    प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासा दरम्यान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक

    नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची रेल्वे विभागाची माहिती

  • 05 Nov 2021 07:06 AM (IST)

    लसीकरण नसेल तर, पगार नाही, प्रवेश नाही, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    नागपूर –

    लसीकरण नसेल तर, पगार नाही, प्रवेश नाही

    नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    सवलत , लाभ, योजना,सहभागासाठी अनिवार्य

    जिल्हाधिकाऱ्यांचे केंद्र, राज्य, निमशासकीय कार्यालयांना निर्देश

    30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के उद्दिष्ठ पूर्ण करा

    कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण आवश्यक

    कर्मचाऱ्यांना डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही

    कॉलेज प्रवेश, परीक्षा, सहभागासाठी अनिवार्यता

    मिशन मोडवर काम करण्याचे यंत्रणेला निर्देश

  • 05 Nov 2021 07:04 AM (IST)

    पुणे शिवसेना पुणे शहराच्या वतीनं स्वर दीपावली या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

    पुणे

    पुणे शिवसेना पुणे शहराच्या वतीनं स्वर दीपावली या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

    सारेगम फेम सुजित सोमण, सायली सांभारे, राधिका अत्रे यांच्या गायनाची सुरेल मैफिल

  • 05 Nov 2021 07:04 AM (IST)

    पवार कुटुंबीयांचा दिवाळी भेट कार्यक्रम

    बारामती :

    – पवार कुटुंबीयांचा दिवाळी भेट कार्यक्रम

    – बारामतीच्या आप्पासाहेब पवार सभागृहात होतोय दिवाळी भेट कार्यक्रम..

    – ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युवा नेते पार्थ पवार राहणार उपस्थित..

    – थोड्याच वेळात होणार कार्यक्रमाला सुरुवात

  • 05 Nov 2021 06:54 AM (IST)

    बारामतीत आज रंगणार पवार कुटुंबाची दिवाळी

    बारामती

    बारामतीत आज रंगणार पवार कुटुंबाची दिवाळी,

    दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवारांना राज्यभरातून कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येणार,

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीही लावणार उपस्थिती,

    मंत्री धनंजय मुंडे 12 वाजता शरद पवारांची घेणार भेट,

    यंदा गोविंदबाग ऐवजी अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडतोय दिवाळी कार्यक्रम

  • 05 Nov 2021 06:54 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या नवा सभागृहात महिला नगरसेविकांची संख्या वाढणार

    पुणे

    पुणे महापालिकेच्या नवा सभागृहात महिला नगरसेविकांची संख्या वाढणार

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के आरक्षणानुसार पुण्यात १७३ पैकी नगरसेविकांसाठी ८७ जागा राखीव

    याशिवाय खुल्या गटातूनही महिला उभ्या राहू शकणार असल्याने नगरसेविकांची संख्या वाढणार

Published On - Nov 05,2021 6:45 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.