Maharashtra News LIVE Update | येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार- शरद पवार
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
पुणे
अमित शहांचा पुणे दौरा स्थगित
26 नोव्हेंबरला अमित शहा करणार होते पुणे दौरा,
नवीन तारीख लवकरच जाहीर होणार,
पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती,
26 तारखेला अमित शहा करणार होते आगामी पुणे मनपा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ
-
अमरावती
अमरावती संचारबंदी प्रकरण
शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल
आता जीवनावश्यक वस्तू खरेदी व कृषी केंद्र उघडण्यास सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी
पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा नवीन आदेश…
अमरावतीत संचारबंदी शिथिलतेबाबद संभ्रम
आधीच इंटरनेट बंद असल्याने नव्या नियमांची माहिती लोकांन पर्यंत पोहचत नाही
-
-
सोलापूर
सोलापूर शहरात जोरदार पाऊस
सकाळपासून होते ढगाळ वातावरण
शहरातील काही भागातील वीज गायब
-
सांगली
आटपाडी राडा प्रकरण गोपीचंद पडळकर, तानाजी तानाजी पाटील यांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने फेटाळला
कोणत्याही क्षणी होणार अटक
-
पुणे जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं, 21 डिसेंबर रोजी होणार मतदान
पुणे : जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं
पुणे जिल्ह्यातील 503 रिक्त जागांसाठी होतीये पोटनिवडणूक
30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना भरता येणार उमेदवारी अर्ज
21 डिसेंबर रोजी होणार मतदान
जिल्ह्यात निवडणुकीत गावात आचारसंहिता लागू
-
-
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार- शरद पवार
चंद्रपूर : तिकीट वाटप करताना निवडणुकीत सरकार चालविण्यासाठी त्याग करावा लागतो
आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजसकट त्याची किंमत वसूल करू
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार
शरद पवार यांची घोषणा
-
राष्ट्रवादीमुळे हे सत्तेत आहेत, नाहीतर कुठेतरी असते, प्रफुल्ल पटेल यांची नाव न घेता काँग्रेसवर टीका
चंद्रपूर- काही लोक म्हणतात राष्ट्रवादीचं विदर्भातील दुकानं बंद करु
– पण राष्ट्रवादीमुळेच त्यांचं दुकान सुरु आहे
– राष्ट्रवादीमुळे हे सत्तेत आहेत, नाहीतर कुठेतरी असते
– महाराष्ट्रात यांचा पक्ष चौथ्या नंबरवर आहे
– यांचा पक्ष खालून पहिला आहे.
-
अकोल्यात 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदीमध्ये वाढ
अकोल्यात संचारबंदीमध्ये वाढ
काल दुपारी 17 नोव्हेंबरच्या 12 वाजेपासून ते 19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत 144 कलम लागू
सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश
हे सर्व नियम कायम ठेवत 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे
-
एसटी संपाचा आज 12 वा दिवस, एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सह्यांची मोहीम
सांगली : एसटी संपाचा आज 12 वा दिवस
एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांकडून सह्यांची मोहीम
एका दिवसात हजार नागरिकांच्या सह्या
सह्यांच्या माध्यमातून आता जनतेचाही आंदोलनात सहभाग
-
शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला- गोपीचंद पडळकर
विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा पवित्रा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी घेतलाय. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा घात शरद पवार यांनी केला. त्यांचीच संघटना ही मान्यताप्रापत्त आहे. राज्य सरकार जी संघटना मान्यताप्राप्त आहे त्यांच्याशी चर्चा करते. मान्यताप्राप्त संस्थांनी कर्मचाऱ्यांचे मूळ प्रश्न कधी मांडलेच नाही. सरकार आणि मान्यताप्राप्त संघटना यांनी मिळून कर्मचाऱ्यांचा घात केला, अशी टीका पडळकर यांनी केली.
-
नंदुरबार जिल्हा तसेच नवापूर आणि अक्कलकुवा परिसरात पाऊस
नंदुरबार : हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवा परिसरात पाऊस
शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात
अवकाळी पावसामुळे मिरची आणि इतर शेतीमालाचे नुकसान होण्याची शक्यता
-
पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात मुसळधार पाऊस
पालघर : जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात मुसळधार पावसाला सुरुवात
शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला भात, नागली, वरई उडीद ,यांची अचानक आलेल्या पावसाने मोठ नुकसान
-
पुणे शहरात कुठलीही पाणी कपात केली जाणार नाही, महापौर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : अमित शहा यांचा दौरा नियोजित वेळेप्रमाणे होणार
वसंतदादा इन्स्टिट्यूट भेटीबाबत मला माहिती नाही
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
पुण्यातील नव्या मेडिकल कॉलेजसाठी महापौर नवी दिल्लीत दाखल
पुणे शहरात कुठलीही पाणीकपात केली जाणार नाही
महापौर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
-
ओवैसींना आतापर्यंत जाग का आली नाही ? मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन भाजप नेते अनिल बोंडे यांचा सवाल
मुंबई : अनिल बोंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला आहे. आता सगळेच रस्त्यावर उतरण्याची भाषा करतील. कारण अठरा ते वीस टक्केे मतासाठी भांडण सुरु आहे. आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या जातीपातीबाबत आरक्षण दिलं होतं. मुस्लिमांमधील ओबीसींनाही आरक्षण दिलं जातं. मुस्लीम एक धर्म म्हणून आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. तसं संविधानात लिहलेलं नाही. मुस्लीम समाजाला धर्म म्हणून आरक्षण देणं हे घटनाविरोधी आहे. ओवैसी स्वार्थासाठी मागणी करत आहेत. काँग्रेसही मुस्लिमाच्या आरक्षणाबाबत बोलते. मात्र घटनेमध्येच नसल्यामुळे आरक्षण कसे मागितले जाऊ शकते. ओवैसी यांना आतापर्यंत जाग आलेली नाही का. मुस्लीम आरक्षणाची मागणी व्यर्थ आहे.
-
अधिवेशनात आरक्षणाबाबत ठराव आणा, मुस्लीम आरक्षणाचा कायदा करा- असदुद्दीन ओवैसी
पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या मुस्लिमांची संख्या किती आहे ते सांगावे. किती मुस्लिमांना लोण मिळते ते सांगावे, किती मुस्लीम स्लममध्ये राहतात हे सांगावे. हा न्यायाच्या मुद्दा आहे. येत्या अधिवेशनात आरक्षणाबाबत ठराव आणावा. मुस्लीम आरक्षणाचा कायदा करावा, असं ओवैसी म्हणाले.
-
मराठा आरक्षणावर चर्चा, मुस्लीम आरक्षणावर का बोलले जात नाही- असदुद्दीन ओवैसी
औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी माध्यामांशी बोलत आहेत. आता आम्हीसुद्धा रस्त्यावर येऊ. तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता. मुस्लीम आरक्षणावर का बोलत नाहीत. उच्च न्यायालयाने मुस्लीम हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास असल्याचे सांगितले आहे. मुस्लिमांना आरक्षण दिले जाऊ शकते. वाट काची पाहिली जात आहे. संविधान समानतेची गोष्ट करतो. या समानतेनुसार मुस्लिमांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे औवैसी म्हणाले.
-
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही- किरीट सोमय्या
मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही- किरीट सोमय्या
धमकी कोणाला ?- किरीट सोमय्या
सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना ?
फक्त अनिल देशमुख नाही तर जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली
महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच
घोटाळ्यबाजांवर कारवाई होणारच- डॉ. किरीट सोमैया
-
नवाब मलिक यांनी आत्मपरीक्षण करावं, अनिल बोंडे यांचं प्रत्युत्तर
गुजरातमध्ये भाजपचं राज्य आहे तिथं दंगल होतं नाही. अहमदाबादमध्ये गरबा झाला की दंगल व्हायची. तिथं नरेंद्र मोदी यांनी शासन केल्यानंतर तिथं दंगल झाली नाही. देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथांच्या काळात दंगल होतं नाही. काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या काळात दंगल होते. जिथं भाजपची सत्ता असते तिथं दंगल होत नाही. अमरावतीच्या दंगलीत आयबी अयशस्वी ठरली. नवाब मलिक यांनी त्यांचे गृहमंत्री आणि इतर मंत्री कुठं गेले होते यांचं आत्मनिरीक्षण करावं, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. दंगलीच्या घटना घडल्या होत्या त्यावेळा नवाब मलिक झोपले होते का? मालेगावातील त्यांचे नगरसेवक जमाव गोळा करत होता.
योगीजींनी दंगलखोरांचे पोस्टर लावले. मोदींच्या काळात दंगली झाल्या नाहीत. आरोग्य विभाग भरतीतील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एसटीचं प्रश्न यावरुन लक्ष वळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं अनिल बोंडे म्हणाले.
-
गडचिरोलीत शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत
गडचिरोली : जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जिल्ह्यातील वाडसा देसाईगंज येथे स्वागत
जिल्ह्यातील संस्कृती असलेल्या आदिवासी नृत्याने शरद पवारांचे स्वागत करण्यात आले
ढोल ताशे आणि आदिवासी डबरुणी यावेळी मोठ्या जल्लोषात शरद पवारांचे स्वागत
-
औरंगाबादेतील बोगस कोरोना रुग्ण भरती प्रकरण, आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : औरंगाबादेतील बोगस कोरोना रुग्ण भरती प्रकरण
बोगस कोरोना रुग्ण प्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल
औरंगाबादच्या एम सिडको पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल
सिडको पोलिसांकडून 2 जणांना केली अटक तर एक जण ताब्यात
आणखी तीन जणांना या प्रकरणात पोलीस अटक करण्याची शक्यता
दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या जागी भरती केले होते दोन बोगस रुग्ण
प्रत्येकी 10 हजार रुपयांचे आमिष देऊन दाखल केले होते बोगस रुग्ण
बोगस रुग्ण प्रकरणी औरंगाबाद पोलिसांकडून कसून तपास सुरू
-
सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न, त्रिपुराच्या घटनेचे अमरावतीत पडसाद का?- शरद पवार
गडचिरोली – आदीवासी भागात बदल करण्याचा प्रयत्न सुरु आहे
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी संमेलनातील भाषणात आदिवासी शब्दच नव्हता, मोदी यांनी वनवासी म्हटलं होतं.
– पण वनवासी हा शब्द आदिवासी समाजाला मान्य नाही
– जंगलाचं रक्षण करण्याचं काम आदिवासी करतोय
– जल, जमीन, जंगल याचं रक्षण आदिवासी करतो
– सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय
– त्रिपुराच्या घटनेचे अमरावतीत पडसाद का?
– भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची होती
– 122 कोटी जनतेपैकी 60 टक्के लोक शेती करतात. शेतीवरचा भार वाढलाय
– शेतीची जमीन उद्योगाला देण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव येतोय
-
गडचीरोली लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता, लोकसभा निवडणूक लढण्याचे घर्मराव बाबा आत्राम यांचे संकेत
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार घर्मराव बाबा आत्राम यांची मोठी घोषणा
– ही विधनसभा शेवटची असल्याची घर्मराव बाबा आत्राम यांची घोषणा
– भविष्यात दिल्लीत नेण्याची शरद पवार यांच्याकडे आत्राम यांची मागणी
– लोकसभा निवडणूक लढण्याचे घर्मराव बाबा आत्राम यांचे संकेत
– गडचीरोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला, मग धर्मराव बाबा आत्राम कुठुण लोकसभा लढणार?
– गडचीरोली लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता
-
राज्य सरकार आणि महापालिकाविरोधात डोंबुिवलीत भाजपचा जनआक्रोश मोर्चा
डोंबिवली : राज्य सरकार आणि महापालिकाविरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा
भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी
विविध समस्यांबाबत निषेधात्मक पोवाडा गात भाजप कार्यकर्त्यांनी केला निषेध
सरकार विरोधात घोषणाबाजी
-
पवई एल ॲण्ड टी जवळील इंडस्ट्रीयल एरियाला भीषण आग
पवई एल ॲण्ड टी जवळील इंडस्ट्रीयल एरियला भीषण आग लागली असून, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात.
-
अखेर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपञाची पडताळणी सुरू
अखेर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपञाची पडताळणी सुरू
जात पडताळणी समिती करणार सखोल चौकशी
रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली होती वानखेडेंविरोधात रितसर तक्रार
समीर वानखेडे यांच्या वडिलांवर मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा आरोप
आरोप सिद्घ झाल्यास वानखेडेंचं जात प्रमाणपञ होऊ शकतं रद्द?
समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार?
-
पुण्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर
पुण्यात विमानाने प्रवास करण्याऱ्यासाठी खुशखबर
1 डिसेंबरपासून अमृतसर, त्रिवेंद्रम, कोईम्बतूर या शहरासाठी नव्याने विमान प्रवास होणार सुरू
1 डिसेंबरपासून होणार 24 तास टेक ऑफ
विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण
24 तास उड्डाण होणार असल्याने विमानांची संख्या वाढणार
तर एक डिसेंबरपासून विंटर शेड्युल सुरु होणार असल्याने प्रवासी आणि विमानांची संख्या वाढणार
-
समीर वानखेडेंच्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर धर्म मुस्लिम
समीर वानखेडे यांच्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर धर्म मुस्लिम
सेंट पाॅल स्कूल आणि सेंट जोसेफ शाळेचे सर्टिफिकेट हाती
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांना घेतलं ताब्यात
– कापूस आणि सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी नागपूरच्या संविधान चौकात सुरू होतं अन्नत्याग आंदोलन
– जमावबंदी चे आदेश असताना आंदोलन सुरू असल्यानं पोलिसांनी केली कारवाई
– तुपकर आणि कार्यकर्त्यांना बुलढाणा पोलिसांना केलं स्वाधिन
– तुपकर यांचा पोलीस कस्टडीतही अन्नत्याग आंदोलन सुरूच
– शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्धार
-
MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
अमरावती मध्ये संचारबंदी तसेच इंटरनेट सेवा बंद असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही
त्यामुळं अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी MPSC समन्वय समितीनं केली होती
ही मागणी मान्य करत आता 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मिळाली मुदतवाढ
-
खामगाव एसटी आगारातील कर्मचारी विशाल अंबलकर यांची प्राणज्योत मालवली
खामगाव एसटी आगारातील कर्मचारी विशाल अंबलकर यांची प्राणज्योत मालवली
उपचारादरम्यान रात्री 9:00 वाजता सामान्य रूग्णालय अकोला येथे निधन
एस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यथित होऊन काल आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न
आपल्यावर कारवाई होईल अशी होती मनात भीती
जिल्ह्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता
-
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 62 शाळांचं वीज कनेक्शन कायमचं तोडलं
थकीत वीज बिलापोटी महावितरण ची कारवाई
जिल्हा परिषदेच्या शाळांची थकबाकी गेली 60 लाखांवर
86 शाळांच कनेक्शन तात्पुरतं तोडलं
वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक विद्युत उपकरणे वापरताना येणार अडचणी
-
नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या जखमी जवानांवर नागपूर येथे उपचार सुरू
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चकमक झालेल्या नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या जखमी जवानांवर नागपूर येथे उपचार सुरू
सध्या त्या चार जणांची प्रकृती बरी आहे
मर्दिन टोला जंगल परिसरात झाली होता चकमक
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या कमांडरने बजावली होती यशस्वी चकमक
जखमी जवानांना आपले कुटुंबाला व नातेवाईकाला दिला आम्ही सुरक्षित आहोचा मेसेज
-
नाशिकमध्ये दोघा भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
नाशिक – चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना
बकरी चरायला गेलेल्या दोघा भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
ओम तळेकर वय 13 , आणि साहिल तळेकर वय 11 या दोघांचा मृत्यू
चांदवड पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद..
घटनेने संपूर्ण गावावर शोककळा
-
औरंगाबाद जिल्ह्यात 10 दिवसांत एसटीला 5 कोटींचा फटका
वाहक आणि चालकाच्या संपामुळे बसला मोठा फटका
गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
औरंगाबाद जिल्ह्यातील एकही स्थानकातून सुटली नाही एकही बस
एकही बस न सुटल्यामुळे एसटी महामंडळाला 5 कोटींचा फटका
-
रविकांत तुपकरांचे अन्नत्याग सुरूच
नागपूर येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान काल रात्री 10.30 वा. नागपूर पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेऊन आज सकाळी त्यांना बुलडाणा येथील त्यांच्या निवासस्थानी आणून सोडले. रविकांत तुपकरांच्या घरासमोर नागपूर बुलडाणा पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.
-
भाजप माजी आमदार शिरीष चौधरी यांना गळाला लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार चौधरी यांची भेट
पटोले यांच्याशी जुने संबध असल्याने भेट घेतल्याचे चौधरी स्पष्टीकरण
मात्र पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याचा चौधरींचा दावा
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा मात्र संपुर्ण खान्देशात
चौधरी हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय
-
विधान परिषदेसाठी महाविकासआघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील रिंगणात
सतेज पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत दाखल करणार अर्ज
अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेतील महा विकास आघाडीच्या सदस्यांचा होणार मेळावा
-
औरंगाबादेत लसीकरणाचा टक्का वाढायला झाली सुरुवात
औरंगाबादेत तब्बल पाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढले लसीकरण
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे लसीकरणात मोठी वाढ
शहरासह ग्रामीण भागातही सुरू आहे निरंतर लसीकरण प्रक्रिया
नागरिकांची जनजागृती आणि नाकाबंदी यामुळे लसीकरणात मोठी वाढ
लसीकरणाचा टक्का 55 टक्क्यांवरून पोचला 60 टक्क्यांवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनंतर लसीकरणारला मिळाली गती
-
दारु पिताना किरकोळ वाद, दगडाने ठेचून हत्या
नागपूरच्या नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्या…
नंदनवन मधील सेंट जेवियर शाळे जवळची घटना
दोघे जण दारू पित बसले असताना, दोघा मध्ये वाद झाल्याने आरोपीने दगडा ने ठेचून केली हत्या
मृत दिनेश राजापुरे असून वय 40 ,राहणार दर्शन कॉलोनी
आरोपी अतुल हेमराज शिवणकर वय 23 असून ,पोलीसानी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे
काल सायंकाळच्या वेळी घडली घटना
-
पुणे महापालिकेकडून लसीकरणासाठी मोहीम
पुणे : शहरातील ९६ टक्क्यांहून अधिक नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असला, तरी महापालिकेने 12 हजार घरांमध्ये केलेल्या प्राथमिक पाहणीत तीन हजार 729 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. तर, साडेनऊ हजार नागरिकांचा लशीचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही आठ नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे,’ असे महापालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
-
दहा दिवस उलटून देखील एसटी संप मिटत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
नाशिक: दहा दिवस उलटून देखील एसटी संप मिटेना
कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय असंतोष
प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
प्रमुख पदाधिकारी आंदोलनातून बॅक फूट वर गेल्याने कर्मचार्यांमध्ये अस्वस्थता
-
महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळणाऱ्या दुचाकीस्वाराचा तरुणांकडून थरारक पाठलाग
महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळणाऱ्या दुचाकीस्वाराचा तरुणांनी केला थरारक पाठलाग
कोल्हापूरच्या गिरगाव गावातील घटना
गिरगाव पासून आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानापर्यंत पाठलाग करत एकाला पकडलं तर दुसरा साथीदार झाला पसार
चोरी करून जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद
शेतातून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा चोरट्यांनी केला होता प्रयत्न
-
आमच्या पगारात खासदार संजय राऊतांनी घर चालवून दाखवावे, कुर्डूवाडी आगारातील कर्मचाऱ्याचं आव्हान
सोलापूर: आमच्या पगारात खासदार संजय राऊतांनी घर चालवुन दाखवावे
कुर्डूवाडी आगारातील कर्मचाऱ्याचं खासदार संजय राऊत आव्हान
आंदोलन करुन वक्तव्याचा केला निषेध
संजय राऊत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसेल तर आत्महत्या वाढविण्याचे काम करू नये
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी आगारातील तब्बल तीनशे कोटी कर्मचारी संपावर
-
मालेगाव दंगल प्रकरणी आणखी काही जणांना अटक
नाशिक : मालेगाव दंगल प्रकरणी आणखी काही जणांना अटक
आतापर्यंत दंगल प्रकरणी 52 संशयितांना अटक.
आरोपींकडून दंगलीतील नुकसानाची वसुली करण्याचा प्रस्ताव
तर रझा अकादमीच्या आयोजकांवरील कारवाई थांबवा
MIM आमदार मौलाना मुफ्ती यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
-
तीस हजारांची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
पुणे : बक्षीसी रजिस्ट्री करण्यासाठी तीस हजारांची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
लीना संगेवार (दुय्यम निबंधक, सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक ८) असे गुन्हा दाखल झालेल्या दुय्यय निबंधकाचे नाव
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
पुणे वेधशाळेने वर्तवली शक्यता
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर
सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे परिसरात एक-दोन दिवस पावसाचा अंदाज
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतही पाच दिवस पावसाचा अंदाज
नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस होईल. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता
विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
-
दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) 2022 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांना शाळेमार्फत 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 20 ते 28 डिसेंबरदरम्यान अर्ज भरता येईल.
-
नाना पटोले यांचे कार्यालय असलेल्या जागेवर आता राष्ट्रवादीचं कार्यालय
– शरद पवार यांच्या हस्ते नागपुरात राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय सुरु
– नाना पटोले यांचे कार्यालय असलेल्या जागेवर आता राष्ट्रवादीचं कार्यालय
– कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर लागला शरद पवार यांचा फोटो
– बजाजनगरात प्रशांत पवार यांनी सुरु केलं राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय
– नागपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी जोरात तयारी
-
रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, बुलडाण्यात आंदोलनाला आक्रमक वळण
रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेण्याला तीव्र प्रतिसाद उमटायला सुरुवात,
बुलडाण्यात आंदोलनाला आक्रमक वळण,
स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून केला सरकारचा निषेध,
चिखली येथील मेहकर फाट्यावर जाळले टायर,
सोयाबीन कापसासाठी सुरुय स्वाभिमानी चे आंदोलन,
तुपकरांनी आजपासून नागपुरात सुरू केलंय अन्नत्याग आंदोलन..
Published On - Nov 18,2021 6:05 AM