Maharashtra News LIVE Update | विलीनीकरणाचे काम एक दोन दिवसांचे नाही- अनिल परब
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
अकोल्यात पावसाची हजेरी, सकाळपासून होते ढगाळ वातावरण
अकोला : अकोल्यात पावसाची हजेरी
गेल्या अनेक दिवसांपासून थंडी कमी होऊन तापमानात झाली होती वाढ
आज सकाळपासून होते ढगाळ वातावरण
रात्री आठ पासून रिमझिम सुरू होता पाऊस
साडेआठ पासून जोरदार पावसाला सुरुवात
या पावसाने वातावरणात गारवा
-
उद्या राज्यभरात टीईटी परीक्षेचं आयोजन, एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता
पुणे : उद्या राज्यभरात टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेचं आयोजन
सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता
21 नोव्हेंबरला परीक्षेचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय
आतापर्यंत विविध कारणांमुळे तब्बल तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती
खासगी वाहतूक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परवडणारी नाही
विद्यार्थी परीक्षेला मुकणार याची जबाबदारी कोणाची विद्यार्थ्यांचा सवाल
-
-
मावळ,पुणे
-लोणावळ्यातील विसापूर गडावरून उतरत असताना एका पर्यटकाचा तोल जाऊन तो थेट किल्ल्यावरून खाली दरीत कोसळला
-गड उतरत असताना झाला होता अपघात यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झालेत
-या पर्यटकाच्या मदतीला पाटण गावातील तरुण आले. तरुणांनी दरीत उतरून या जखमी पर्यटकाला दरीतून बाहेर काढून कपड्याची झोळी बनवून या पर्यटकाचे जीव वाचवले आणि त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले
-
संजय राऊत, खासदार शिवसेना
संकल्पनेतून प्रयत्नातून या मैदानाचा सुशोभीकरण सोहळा पार पडत होतो आणि आदेश बांदेकरांना आणि आमदार राऊत यांना सांगितलं इथे बसल्यावर शिवाजी पार्कच्या मैदानात असल्याचा फील येत आहे
दिवसापासून या भागामध्ये अनेक सामाजिक कार्य महानगरपालिकेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत आहेत मगाशी आदेश बांदेकर आपण सिद्धिविनायक ट्रस्टचे प्रमुख आहात अर्थात आदेश बांदेकर शिवसेनेचे सचिव व शिवसैनिक आणि ते त्या पदावर बसलेल्या एक शिवसैनिक म्हणून बसलेले त्याच्यामुळे सामाजिक कार्याची काय प्रेरणा असते ती त्यांच्यात मला नेहमी दिसते त्यांनी मनाशी काही संकल्प सोडले या भागात काही वैद्यकीय काम करण्यासंदर्भात प्रश्न विचारला
काळी मांजर आडवे गेले सगळ्यांना बाळासाहेबांनी शिवसेना पर्यंत आणली आपल्याकडे सोपवली आणि आपण सगळे उद्योग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे घेऊन चाललेला याचं भान ठेवलं पाहिजे
-
मुंबई
उद्या राज्यभरात टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेच आयोजन,
सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता,
21 नोव्हेंबरला परीक्षेचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय,
आतापर्यंत विविध कारणांमुळे तब्बल तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती,
खाजगी वाहतूक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परवडणारी नाही,
विद्यार्थी परीक्षेला मुकणार याची जबाबदारी कोणाची विद्यार्थ्यांचा सवाल….
-
-
पंढरपूर
कार्तिकी यात्रेत मंदिर समितीला 1 कोटी 97 लाखांची देणगी
कोरोनामुळे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर सलग दीड वर्षे होते बंद
यंदाच्या वारीला भाविकांची संख्या कमी असली तरी देवाच्या पेटीत मात्र भाविकांनी भरभरुन अर्पण केले दान
कार्तिकी यात्रा पार पडल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नातही घसघसीत वाढ
दान पेटी, देणगी पावती, भक्त निवास, फोटो विक्रीच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 1 कोटी 97 लाखाचे उत्पन्न मिळाले
-
रोहित पवार बाईट
ऑन एसटी आंदोलन
– लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे
– बहुतांशी मागण्या मान्य केल्या आहेत
सरकार त्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे
कुटुंबातील लोकं आंदोलन करत आहेत त्यांच्याकडे बघून मन सुन्न होत
एसटी सेवा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यांना अनेक दिवसांपासून सेवेला मुकावे लागत आहे
आंदोलनात राजकारण घुसत असेल तर कामगारांनी विचार करावा
कोणतीही गोष्ट जास्त ताणली तर तुटण्याची जास्त शक्यता असते
तुटण्याच्या आधी चर्चेतून मार्ग काढावा
एखादी मागणी तांत्रिक दृष्ट्या अडचणीची असेल तर त्यावर अडून बसू नये त्यामुळे तुटण्याची शक्यता जास्त असते.
एसटी कर्मचारी आणि सरकार चांगला निर्णय लवकर घेतील
ऑन कृषी कायदे
निर्णयाचे स्वागत
उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका आहेत
ही घोषणा केवळ या दोन राज्यांच्या निवडणुकीपुरती नसावी
दीड वर्षांपासून जे शेतकरी आंदोलन करीत आहेत त्यांचं हित या निर्णयामागे असावं
ऑन चंद्रकांत पाटील
कृषी कायद्यावर पुनर्विचार व्हावा अस ते म्हणाले
कायदे मागे घेतल्यावर अनेकांनी प्रधान मात्रांचे स्वागत केलं
शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतल्याचे अमित शहाणी म्हटलं आहे
भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना या कादयच्या बाजूने जण जागृती करण्याची जबाबदारी दिली होती
शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता पक्षाचे हित पाहिले गेले
आता शेतकऱ्यांच्या बाजूने कस बोलायचे असा प्रश्न चंद्रकांत दादांना पडला असेल
चंद्रकांत दादांनी अमित शहांचे ट्विट केलं आहे ते नीट वाचावं..
त्यांनी जर सांगितले असेल हा शेतकरयांच्या हिताचा निर्णय आहे तर तो स्वीकारून राज्यात अशा प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहावं
बारामतीत आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते
-
औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आगारात एसटी संपात पडली फूट
पैठण आगारातून पोलीस बंदोबस्तात पहिली एसटी बस रवाना
पैठण पाचोड या रस्त्यावर धावली पहिली बस
10 दिवसानंतर पैठण आगारातून धावली एसटी बस
पुढे पोलीस गाडी आणि माघे बस गाडी आशा स्थितीत सुटली बस
एक ड्रॉइव्हर आणि एक कंडक्टर कामावर आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सुटली बस
-
सदावर्ते
पोलिसांची कुमक जास्त होती
परब यांना चांगकी संधी आहे 70 वर्षात पवारांना जमलं नाही ते उद्धव आणि परब यांनी करावं
मंत्र्यांनी हे स्वीकारले की मी बैठकीला majority लोकांसाठी आलो
मंत्री म्हणाले माझे चर्चेचे दार उघडे आपण सुचवाव काय केलं जाऊ शकतं
एक मान्य केलं परब यांनी Advocate general यांच्याशी विलिनीकरण वर तातडीने चर्चा करणार असं परब म्हणाले आहेत
इतर राज्यात विलिनीकरण झाले त्यावर माहिती मागवली आहे त्यावर अभ्यास सुरू आहे
Advocate general शी चर्चा करू असं त्यांनी सांगितलंय
*तोपर्यंत कष्टकरी काम करणार नाही आंदोलन सुरू राहील हे स्पष्ट आहे
-
बदलापूर
आज कोरोना रुग्ण संख्या शून्य
बदलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी
आज एक ही कोरोना रुग्ण आढळला नाही
सध्या 26 रुग्णांवर उपचार सुरू
-
अकोला
अकोल्यात आज पासून 2 दिवस रात्री ची संचारबंदी वाढवण्यात आलीय
23 नोव्हेंबर च्या सकाळी 6 वाजेपर्यंत 144 कलम लागू
सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी चे आदेश
शहरात जमावबंदीच्या काळात सार्वजनीक ठिकाणी 4 किंवा चार पेक्षा जास्त व्याक्तीस जमावास प्रतिबंधी राहील
संध्याकाळी 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी चे आदेश
-
विलीनीकरणाचे काम एक दोन दिवसांचे नाही- अनिल परब
मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब माध्यमांशी बोलत आहेत. हायकोर्टाने कमीटी स्थापन केलेली आहे. त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केलेली आहे. हायकोर्टाच्या निर्णयात फेरफार करता येणार नाही. कमिटीचा जो काही अहवाल येईल त्यावर सकारात्मक विचार करेल असे मी सांगितले आहे. त्यावर अॅडव्होकेट जनरल यांना बोलून घण्याची मला विनंती करण्यात आली. मी त्यांना आंदोलन परत घेण्याची मागणी केली. विलीनीकरणाचे काम एक दोन दिवसांत होत नाही. त्याला वेळ लागेल, असे मी सांगितले.
-
भुजबळ बाईट
– संमेलनाचे स्वागत विश्वास पाटील यांच्या भुजबळ बाईट – संमेलनाचे स्वागत विश्वास पाटील यांच्या हस्ते, तर प्रमुख अतिथी उद्धव ठाकरे – शरद पवारांच्या हस्ते समारोप – संमेलन चांगलं करण्याचा प्रयत्न – नाशिककर साथ देतील हा विश्वास – महापालिकेने निधी मंजूर केला आहे – अनेक लोक पुढे येत आहेत – निधीची कमतरता पडणार नाही अशी अपेक्षाहस्ते, तर प्रमुख अतिथी उद्धव ठाकरे – शरद पवारांच्या हस्ते समारोप – संमेलन चांगलं करण्याचा प्रयत्न – नाशिककर साथ देतील हा विश्वास – महापालिकेने निधी मंजूर केला आहे – अनेक लोक पुढे येत आहेत – निधीची कमतरता पडणार नाही अशी अपेक्षा
-
मुंबई
मुंबई सेंट्रल इथली एसटी डेपोतील बैठक संपली
गुणवर्त सदावर्ते यांनी दिली माहीती
एसटीला राज्य सरकारमध्ये विलीनिकरणासंदर्भात तातडीने एडवोकेट जनरलशी चर्चा करणार अनिल परब
हा संप शांततेत पार पडतोय
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये अशी विनंती करण्याच आली
-
निफाड, येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी
नाशिक : निफाड व येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
– उभ्या पिकाच्या नुकसानीच्या भीतीमुळे बळीराजा हवालदिल
-
पुणे कोरोना अपडेट
– दिवसभरात 86 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात 81 रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 – 93 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 505866 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 849 – एकूण मृत्यू -9094 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495923 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4719
-
छगन भुजबळ
– महापौरांनी मुहूर्तमेढ रोवली आहे – आता या कामाला वेग प्राप्त होईल – वर्तमान पत्रात रोज काही तरी छापून येत – चुकत असेल तर कानात सांगा – न छापता सूचना केली तर नक्की सुधारणा करू – संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर – मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो सूत्र हाती देतील – संमेलनाच्या उद्घाटनाला विश्वास पाटील, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार – प्रमुख अतिथी म्हणून जावेद आखतर देखील उपस्थित राहणार – समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी शरद पवार तसेच न्या.नरेंद्र चपळगावर उपस्थित राहतील
-
शेतकरी विजय दिवस
कॉग्रेसच्या वतीने शेतकरी विजय दिवस साजरा… महसुलमंत्री बाळासाहेब थोरात भाषण –
ठराविक लोकांसाठी केंद्राकडुन कायदे तयार करण्याचे काम… पेट्रोल – डिझेलचे दर वाढले… अगोदर टाळ्या – थाळ्या वाजवणारे कुठे गेले… कंगणा राणावत काय बोलते …. स्वातंत्र्याबद्दल बोलण्याची लायकी आहे का ? कंगणाचे बोलणे चुकीचे… वादग्रस्त बोलते अन संरक्षण मिळते , पद्मश्री मिळते. विक्रम गोखले ही बोलतायत त्यांनाही पद्मश्री मिळेल… बोलणे सहज नसते , कोणीतरी यामागे असते… हे आता राज्यघटनेकडे देखील वळतील… देश राज्य घटनेप्रमाणेच चालले पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवावे…. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन राज्यघटना तयार केली… आज स्वातंत्र्यांवर बोलतात उद्या राज्य घटनेवर बोलतील….
-
छगन भुजबळ भाषण ( 94 वे मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष )
– 2 तारखेला कुसुमाग्रज यांच्या बंगल्या पासून साहित्य दिंडी – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली दरबारी सर्व पुरावे सादर केले आहेत – भाषा आई सारखी – आई आपल्याला सांभाळते,आपण आईला सांभाळलं पाहिजे
– संपूर्ण नाशिक ही साहित्य नगरीच आहे – जरा काही चुकलं की जास्त छापून येत – बोलण्यात गोडी असू द्या, शांततेत घ्या अस कार्यकर्त्यांना सांगणं – ‘पाव फिसल जाये तो कोई बात नाही, जुबान फिसलनी नाही चाहीये’ – चार दिवस साहित्यिकांची सेवा करायची आहे
– भुजबळ नॉलेज सीटीचे रूपांतर कुसुमाग्रज नगरीत करण्याचा आजचा कार्यक्रम – नवं कवियत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांचं देखील स्वागत – एक चांगला कार्यक्रम पार पडतो आहे – सुरुवात चांगली झाली की सगळं चांगल होत – जिथे शक्य असेल तिथे हे संमेलन स्वागत गीत दाखवलं जावं
-
शेतकरी विजय दिवस कॉग्रेसच्या वतीने शेतकरी विजय दिवस साजरा… महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती…
-
पुणे
उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठी मालिकेतील पाच कलाकारांचा होणार प्रवेश
पुण्यात सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश,
सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची टीव्ही 9 ला माहिती,
उद्या सकाळी करणार प्रवेश ..
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलाकारांच इनकमिंग वाढलं !
-
नाशिक
साहित्य संमेलनाच्या सुधारित गीताचे उद्घाटन
सुधारित गीतामध्ये आता सावरकरांचा उल्लेख..
पूर्वीच्या गीतात सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसेने केला होता विरोध
नवीन गाण्यात सावरकरांचा उल्लेख
-
साहित्य संमेलनाच्या सुधारित गीताचे उद्घाटन, नवीन गाण्यात सावरकरांचा उल्लेख
नाशिक – साहित्य संमेलनाच्या सुधारित गीताचे उद्घाटन
सुधारित गीतामध्ये आता सावरकरांचा उल्लेख
पूर्वीच्या गीतात सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसेने केला होता विरोध
नवीन गाण्यात सावरकरांचा उल्लेख
-
नाशिक
साहित्य संमेलन मुख्य मंडप भूमिपूजन सोहळ्याचे भूमिपूजन
साहित्य संमेलन स्थळाचे ‘कुसुमाग्रज नगरी’ अस नामकरण
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ,केंद्रिय आरोग्य मंत्री भरती पवार,महापौर सतीश कुलकर्णी उपस्थित
3,4 आणि 5 डिसेंम्बर रोजी नाशिकच्या MET भुजबळ नॉलेज सिटी इथे साहित्य संमेलन
-
बुलडाणा
रासप चे नेते महादेव जानकर यांनी घेतली रविकांत तुपकर यांची भेट,
तुपकरांच्या प्रकृतीची केली विचारपूस,
चळवळीतील नेता असल्याने घेतली भेट
-
सांगली
एस टी कर्मचाऱ्यांच्या संप विरोधी शिवसेना उतरली रस्त्यावर
एसटीच्या पुढे माघे शिवसेनेच्या संरक्षणसाठी सेनेच्या गाड्या
-
सांगली
रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत याना इस्लामपुर पोलिसांनी ताब्यात घेतलं
इस्लामपूर आगारातील एसटी वाहतुक रोखण्यासाठी आगारात जाताना सागर खोतला पोलिसांनी ताब्यात घेतलं
सांगली जिल्हयात अनेक बस डेपो मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बस सेवा आहे सुरु
इस्लामपूर पाठोपाठ आज तासगाव आगारातून काही मार्गावरील बस सेवा सूरु तर इस्लामपूर – ताकारी बसवर रयत क्रांती संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून दगडफेक
-
रासपचे नेते महादेव जानकर यांनी घेतली रविकांत तुपकर यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
बुलडाणा : रासपचे नेते महादेव जानकर यांनी घेतली रविकांत तुपकर यांची भेट
तुपकरांच्या प्रकृतीची केली विचारपूस
चळवळीतील नेता असल्याने घेतली भेट
-
रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांना इस्लामपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं
इस्लामपूर आगारातील एसटी वाहतूक रोखण्यासाठी आगारात जाताना सागर खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
सांगली जिल्हयात अनेक बस डेपोमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बस सेवा आहे सुरु
इस्लामपूर पाठोपाठ आज तासगाव आगारातून काही मार्गावरील बस सेवा सूरु
तर इस्लामपूर – ताकारी बसवर रयत क्रांती संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून दगडफेक
-
भाजप पक्ष जातीयवादी, त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष- दत्तात्रय भरणे
इंदापूर : भाजप पक्ष जातीयवादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे
अशा जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे
मतांसाठी विष पेरून, मन कलुशित करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहेत
अशा पक्षापासून आपण सावध राहिले पाहिजे
आज ज्या काही दंगली सुरू आहेत त्यामागे ही षड्यंत्र आहे
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रथमच भाजप पक्षावर केली जहरी टीका
-
नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा वादात, इम्रान खानला मोठा भाऊ म्हणून संबोधलं
मुंबई : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा वादात
पाकिस्तानमध्ये गेल्यावर इम्रान खानबाबत वक्तव्य
इम्रान खानला मोठा भाऊ म्हणून संबोधलं
सिद्धू यांच्या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता
-
इंदापूर
भाजप पक्ष जातीय वादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लिम बांधवांबद्दल विष आहे… अशा जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे.. मतांसाठी विष पेरूण, मन कलुशित करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केले जात आहेत… अशा पक्षा पासून आपण सावध राहिले पाहिजे.. आज ज्या काही दंगली सुरू आहेत त्यामागे ही षड्यंत्र आहे.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रथमच भाजप पक्षावर केली जहरी टीका…
-
नवी दिल्ली
नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा वादात
पाकिस्तानमध्ये गेल्यावर इम्रान खान बाबत वक्तव्य
इम्रान खानला मोठा भाऊ म्हणून संबोधलं
सिद्धूच्या विधानावर जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता
-
मुंबई
आर्यन खानकडे ड्रग्स सापडलं नाही त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नाही- कोर्ट
-
नवी दिल्ली
नवी दिल्ली शेतकरी संघटनांची सिंधू बॉर्डरवर महत्त्वाची बैठक
बैठकीत वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा
बैठकीत काय निर्णय होणार संपूर्ण देशाचे लक्ष
काल कृषी विधेयक मागे घेतल्यानंतर आज शेतकरी संघटनांची बैठक
आंदोलन मागे कधी घेतलं जाणार ?
गेल्या 4 तासंपासून बैठक
-
अकोला
अकोला जिल्हातल्या पातूर येथील धामणदरी तलावात पोहायला गेलेले दोन युवकांचा बुडून मृत्यू….
संत गाडगे बाबा आपत्कालीन पथका कढून शोधमोहीम सुरू…
-
पुणे
स्वच्छ सर्वेक्षणात पुणे देशात 17 व्या स्थानावरून 5 व्या स्थानी,
देशातील 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर 5 व्या स्थानी आलंय,
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुण्यानं पाचवा क्रमांक पटकावलाय…
-
नाशिक
देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक 17 व्या स्थानी तर राज्यात 4 थ्या क्रमांकावर
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक घसरला .
गेल्यावर्षी नाशिक 11 व्या स्थानावर होते
यंदा सहा अंकाने घरसण
पहिल्या पाच मध्ये येण्याचे नाशिककरांचे स्वप्न भंगले
-
पंकजा मुंडे
माझ्या पित्यावर माझं फार प्रेम होतं माझ्यापेक्षा तुमचं जास्त होतं
माझ्याहि पित्याचा मला अमृतमहोत्सव करायचा होता पण नियतीला ते मान्य नव्हतं
संस्कार देतो तो संत असतो सन्मान देतो तो नेता असतो
आताची परिस्थिती ही रामराज्याची नाही आता फक्त आपले खिसे भरणाऱ्यांची स्थिती आहे.
मला एकाने सांगितलं की पंकजा तू राजकारणात पराक्रम खूप करतेस मात्र परिक्रमा करत नाहीस पण मी सांगितलं हे लोक माझं विश्व आहे मी हीच माझी परिक्रमा आहे
एखादी पदाची संधी नाही मिळाली तर हरकत नाही पण लोकांच्या सेवेची संधी मी कधीच सोडणार नाही
-
जळगाव
जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे जेलभरो आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दिला पाठींबा
एसटीच्या खासगीकरणाला विरोध दर्शवत केली राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही केली राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी
शेतीपंपांचे थकीत वीज बिल माफ करण्याची केली मागणी
आंदोलनानंतर जेलभरो, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
-
नाशिक
– भाजप नगरसेवकाच्या फ्लॉवर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन – भाजप नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या फ्लॉवर पार्कचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन – भाजप नगरसेवक शशिकांत जाधव शिवसेनेच्या वाटेवर? – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील फ्लॉवर पार्कपासून जवळच लग्नसोहळ्याला उपस्थित असतांनाही राऊत यांच्या हस्ते भाजप नगरसेवकाच्या फ्लॉवर पार्कचं उद्घाटन – संजय राऊत यांच्या मागील नाशिक दौऱयावेळी भाजप नगरसेवक सेनेच्या व्यासपीठावर, तर आज भाजप नगरसेवकाच्या फ्लॉवर पार्कचं राऊत यांनी केलं उद्घाटन – संजय राऊत यांनीही केलं भाजप नगरसेवकाच्या फ्लॉवर पार्कचं कौतुक
-
नाशिक
देवेंद्र फडणवीस बाईट
– टीका करणारे टीका करतात काम करणारे काम करतात
– पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता
– लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवलाय
– जे टीका करतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही
– टीकाकारांना जनताच उत्तर देईल
– टिकाकरांची भूमिका दुटप्पी
– एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी
– कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्यसरकारला घ्यायचाय
फडणवीस ऑन संजय राऊत
– आजच्या सामनातील लेखावरून त्यांचा अहंकार झळकतोय – लेख लिहणारेचं अहंकारी
-
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित खट ब परीक्षा 2019 च्या PSI पदाच्या पुणे केंद्रावरील शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलल्या,
प्रशासकीय कारणास्तव शारीरिक चाचणी आणि मुलाखती पुढे ढकलल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण,
22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान होणार होत्या शारीरिक चाचणी आणि मुलाखती,
कोल्हापूर ,पुणे ,नाशिक या केंद्रावर या चाचण्या होणार होत्या
मात्र दोन दिवसापूर्वी कोल्हापूर केंद्राच्या पुढे ढकलण्यात आल्यात,तर आज पुणे केंद्रावरील चाचण्या पुढे ढकलल्याचं आयोगानं केलं स्पष्ट,
शारीरिक चाचणी आणि मुलाखत पुढे ढकलल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम …
-
नवी दिल्ली
स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची बाजी
विटा, लोणावळा, सासवड शहरांचा गौरव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
-
चंद्रकांत पाटील बाईट
ऑन कृषी कायदा – शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे असून देखील मला समजावून सांगता आलं नाही यामुळे मोदींनी दुःख व्यक्त केलं – विरोधकांनी जे होईल त्याच्या विरोधात बोलायचं असत
ऑन संजय राऊत – जे पब्लिकली बोलायचं असत ते दोन माणसांच्या मैत्रीमध्ये नसत – ते डॉक्टर आहेत निम्मे मी त्यांच्याकडेच आता जातो – अलीकडे तुम्ही,नवाब मलिक काहीही बोलता – त्यांनी माझी मानसिकता चेक करावी, मी त्यांचे डोकं चेक करेल -यांची स्मृति कमी आहे – काँग्रेसने एक कायदा तीन वेळेस आणला, तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला
ऑन एसटी आंदोलन – परवा अनिल परब फडणवीसांच्या घरी आले होते – ताकाला जाऊन भांड कशाला लपवा – शरदराव रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा बिनविरोध करावी यासाठी ते आले होते – त्यात देवेंद्र जी यांनी अनिल परब यांना एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं ,तसं कागद पेन घेऊन समजावून सांगितलं हा संप कसा सम्पवता येईल – पॅसेंजर टॅक्स कमी केल्यास सरकारकडून फक्त 100 कोटी घ्यावे लागतील अस त्यांना सांगितलं – उद्धवजी यांच्याशी तुम्ही बोला, आम्ही बोलतो अस देवेंद्र जी यांनी सांगितलं
ऑन कंगना आणि संजय राऊत – मी कंगना चा प्रवक्ता नाही – संजय राऊत दिवसभरात 10 वेळेस बोलतील, मला तेवढा वेळ नाही
ऑन युती चर्चा – आपल्याकडे संस्कृती – मंगल प्रसंगी एकत्र येतात – अगदी 5 भाऊ असले आणि भांडले तरी ते एकत्र येतात
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी काल चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्याला दिली भेट
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी काल चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्याला दिली भेट
काळ्या वाघाचा व्हीडीओ सुप्रिया सुळेंनी केला ट्टीट
राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार विदर्भात दौरा करत असताना सुप्रियाताईंनी दिली व्याघ्र प्रकल्पाला भेट
व्हीडीओ ट्टीटरवर चांगला ट्रेण्ड
-
जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे जेलभरो आंदोलन
जळगाव
जळगावात बहुजन मुक्ती पार्टीचे जेलभरो आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दिला पाठींबा
एसटीच्या खासगीकरणाला विरोध दर्शवत केली राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही केली राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी
शेतीपंपांचे थकीत वीज बिल माफ करण्याची केली मागणी
आंदोलनानंतर जेलभरो, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
-
विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर माहेरच्या मंडळींची सासरच्या मंडळींची बेदम मारहाण
औरंगाबाद –
विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर माहेरच्या मंडळींची सासरच्या मंडळींची बेदम मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात झाली बेदम मारहाण
विजेचा धक्का लागून झाला होता विवाहितेचा मृत्यू
मात्र माहेरच्या मंडळींनी केला घातपताचा आरोप
घातपात आरोप करत केली रुग्णालय आवारातच बेदम मारहाण
बिडकीन परिसरातील विवाहितेचा झाला होता विजेच्या धक्क्याने मृत्यू
-
अकोला जिल्हातल्या पातूर पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल
अकोला
– अकोला जिल्हातल्या पातूर पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल
– प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी केली तक्रार
– चित्रपट अभिनेत्री कंगना रनौवत हिने वादग्रस्त वक्तव्य करून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे….
– त्यामुळे कंगना रनौवत व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी….
– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरोद्दीन यांनी काल शुक्रवारी पातूर पोलीस येथे केली तक्रार दाखल…
– चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य करून स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला आहे….
– त्यामुळे कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे….
महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सैय्यद कमरोद्दीन यांनी पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे….
-
विज्ञान भवनात स्वच्छ अमृत दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यक्रमाला उपस्थित
नवी दिल्ली
विज्ञान भवनात स्वच्छ अमृत दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यक्रमाला उपस्थित
कचरामुक्त शहरांना सन्मानित केले जाणार
स्वच्छ अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकांना पुरस्कार मिळणार
-
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित
बुलडाणा
रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित,
पालकमंत्री शिंगणे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडले आंदोलन,
ज्या मागण्या आहेत त्या संदर्भत बुधवार ला उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक होणार,
तुपकर यांनीही आंदोलन स्थगित केल्याची घोषणा
-
MIM पक्षातून आलेल्या दोन नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
औरंगाबाद –
MIM पक्षातून आलेल्या दोन नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असतानाही सुरू होत्या गुन्हेगारी कारवाया
दोन माजी नगरसेवकामुळे पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठांना कळवला होता अहवाल
गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस मधूनही हाकलपट्टी
सय्यद मतीन यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल
शेख जफर त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाईच्या गुन्ह्यांची नोंद
-
पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना एसटी कामगारांच्या संपाचा मोठा फटका
औरंगाबाद –
पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना एसटी कामगारांच्या संपाचा मोठा फटका
एसटीच्या संपाचा परिणाम पोलीस भरतीवर
पोलीस भरतीसाठी फक्त 45 % उमेदवार उपस्थित
720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांनी केले होते अर्ज
एसटी सुरू नसल्याने परीक्षार्थींना येण्यास मिळाले नाही वाहने
खाजगी वाहन चालकांनी 45 टक्के उमेदवारांकडून जास्तीचे भाडे केले वसूल
-
मराठवाड्यातील ढगाळ वातावरणामुळे शेती संकटात
औरंगाबाद –
मराठवाड्यातील ढगाळ वातावरणामुळे शेती संकटात
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर कीड सदृश आजार पडण्याची भीती
तूर आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता
गेल्या 7 दिवसांपासून मराठवाड्यात आहे ढगाळ वातावरण
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी सापडला चिंतेत
-
संजय राऊत, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आज नाशिकमध्ये
नाशिक –
संजय राऊत, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आज नाशिकमध्ये
आमदार देवयनी फरांदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला लावणार हजेरी
संजय राऊत यांच्या उपस्थितीत निवडक सेना पदाधिकाऱ्यांची बैठक
तर भाजप नेते देखील घेणार शहरातील परिस्थितीचा आढावा
-
मराठवाड्यात अतिवृष्टीच्या भरपाईचे 2551 कोटींचे शेतकऱ्यांना वितरण
औरंगाबाद –
मराठवाड्यात अतिवृष्टीच्या भरपाईचे 2551 कोटींचे शेतकऱ्यांना वितरण..
41 लाख 91 हजार 551 जणांना 2551 कोटी 27 लाखांचे वितरण..
मराठवाड्याला प्राप्त झालेल्या 2821 कोटी निधी मधील 90 % निधीचे वाटप..
सर्वाधिक निधी 95% बीड जिल्ह्याला वाटप..
सोबतच जुलै ची नुकसान भरपाई मिळणार लवकरच..
-
नाशिक महापालिका शहरात उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
नाशिक महापालिका शहरात उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
डीपीआर तयार करण्याचे महापालिका असयुक्तांचे प्रशासनाला आदेश
शहरात उभारणार 20 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स
40 कोटींचा निधी अपेक्षित
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न
-
पुणे महापालिकेत 34 गावांचा समाविष्ट गावांमधील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका अॅक्शन मोडवर
पुणे
पुणे महापालिकेत 34 गावांचा समाविष्ट गावांमधील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका अॅक्शन मोडवर
गावातील व्यावसायिक गाळ्यांना महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या नोटीसा
अतिक्रमात बांधलेले गाळे काढा अन्यथा गाळे ताब्यात घेऊन कारवाई करणार, महापालिकेचा इशारा
समाविष्ट 34 गावांमधील ग्रामपंचायतीच्या मिळकती या आता महापालिकेच्या ताब्यात आल्यात
ग्रामपंचायतीनं वाटप केलेल्या गाळ्यांचीही चौकशी केली जाणार
-
नागपूर विभागातील एसटीच्या 50 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
– नागपूर विभागातील एसटीच्या 50 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
– नोटीस बजावूनंही कामावर रुजू न झाल्याने केली सेवा समाप्त
– 50 कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीने उडाली खळबळ
– बरखास्ती करण्याची सुरुवात रोजंदारी कर्मचाऱ्यांपासुन
– विलीगीकरणाच्या मागणीसाठी सुरु आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप
-
देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील हिरे कुटुंबावर काळाचा घाला
नाशिक –
देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील हिरे कुटुंबावर काळाचा घाला
अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार
देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्यावरील घटना
शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असताना घडला अपघात
दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्या धडकेत ,दुचाकीवरून जाणारे चौघेही ठार
-
नाशिक दरोडेखोरांची वृद्धेला मारहाण करत लूट
नाशिक –
दरोडेखोरांची वृद्धेला मारहाण करत लूट
घरात घुसून केली 8 लाखांची चोरी
नाशिकरोडच्या लिंगायत कॉलनीत घडला प्रकार
वृद्ध महिलेला आणि तिच्या सोबत घरात असलेल्या दोन मुलींना देखील ठेवलं बांधून
सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिकरोड ला घरफोडयांचे सत्र सुरूच
-
राज्यातील फार्मसी, अभियांत्रिकी, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवली
राज्यातील फार्मसी, अभियांत्रिकी, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवली
23 नोव्हेंबर पर्यंत करता येणार प्रवेश अर्ज
अमरावती जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली होती
त्याचा फटका हा विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून प्रवेश अर्जाची मुदत वाढवून देण्यात आलीये
अभियांत्रिकी प्रवेशासाठी 21 नोव्हेंबर, फार्मसी साठी 23 नोव्हेंबर, एमबीएसाठी 22 नोव्हेंबर
राज्य सीईटी सेलने मुदत दिली वाढवून
-
देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील हिरे कुटुंबावर काळाचा घाला
नाशिक –
देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील हिरे कुटुंबावर काळाचा घाला
अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार
देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्यावरील घटना
शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असताना घडला अपघात
दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्या धडकेत ,दुचाकीवरून जाणारे चौघेही ठार
-
सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण
सोलापूर –
सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण
पुढील चार दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज
22 नोव्हेंबरपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट
-
रविकांत तुपकरांची प्रकृती अजूनही खलावतेय
बुलडाणा
स्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस
तुपकरांची प्रकृती अजूनही खलावतेय,
कार्यकर्त्यांची होतेय गर्दी,
तर सोयाबीन कापूस आंदोलन ला हिंसक वळण,
रात्री तहसीलदार यांची गाडी पटवण्याचा प्रयत्न
-
पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब
पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब
ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ
परिणामी पुणे शहरात उकाडा वाढला
शुक्रवारी शहरात २१.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत ७ अंश सेल्सिअसने वाढ
सध्या शहर आणि परिसरात सामान्यतः ढगाळ वातावरण कायम राहणार असून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
-
कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुणेकरांच्या काळजीत पुन्हा वाढ
पुणे :
कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुणेकरांच्या काळजीत पुन्हा वाढ
मागील काही दिवसांपासून शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ
शहरात गेल्या दहा दिवसात १९९ सक्रिय कोरोना रुग्ण वाढले
पुण्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहा दिवसांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी ६४७ इतकी कमी
तीच संख्या शुक्रवारी पुन्हा एकदा ८४६ इतकी झाली
या आकडेवारीवरून फक्त अकरा दिवसात शहरात १९९ सक्रिय कोरोना रुग्ण वाढल्याचे स्पष्ट
-
कोरोना लसीचा डोस न घेणाऱ्या नागरिकांसाठी पुणे महापालिका राबवणार ‘हर घर दस्तक’ मोहीम
पुणे
कोरोना लसीचा डोस न घेणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका राबवणार ‘हर घर दस्तक’ मोहीम
महापालिका टास्क फोर्सच्या मदतीने राबवली जाणार ‘हर घर दस्तक’ मोहीम
या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लस न घेतलेल्या लोकांचं समुपदेशन करून लसीकरण करणार
पुण्यामध्ये 100% लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका राबविणार ‘हर घर दस्तक’ मोहीम
त्यासाठी टास्कफोर्सचा वापर केला जाणार असून क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत झाली
याशिवाय, या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचीही मदत यासाठी घेतली जाणार आहे
Published On - Nov 20,2021 6:40 AM