Maharashtra News LIVE Update | नागपुरात 78 वर्षीय महिलेची गळा कापून हत्या

| Updated on: Nov 28, 2021 | 12:12 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नागपुरात 78 वर्षीय महिलेची गळा कापून हत्या
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, डिजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित कारवाई केली जात असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Nov 2021 11:00 PM (IST)

    जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईडीकडून दोन दिवस तपास, पथक औरंगाबादकडे रवाना

    जालना : शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोन दिवसाच्या चौकशीनंतर ईडीचे पथक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहे. काल आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या जालनाच्या कार्यालयात ईडीकडून झाडाझडती सुरू होती.

  • 27 Nov 2021 10:28 PM (IST)

    नागपुरात 78 वर्षीय महिलेची गळा कापून हत्या

    नागपूर : नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत 78 वर्षीय महिलेची हत्या

    देवकी ढोबळे असं महिलेचं नाव

    हाथ बांधून गळा कापला असल्याची प्राथमिक माहिती

    हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही

  • 27 Nov 2021 09:18 PM (IST)

    नागपूर विभागात आज 200 एसटी कर्मचारी निलंबित  

    नागपूर एसटी कर्मचारी संप अपडेट

    नागपूर विभागात आज 200 कर्मचारी निलंबित

    संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच निलंबन

    तर आधी 148 निलंबित करण्यात आले होते

    एकूण 348 कर्मचाऱ्यांचं आतापर्यंत झालं निलंबन

    90 रोजनदारी कर्मचाऱ्यांची सेवा आधीच समाप्त करण्यात आली

    नागपूरमधून आज एकही बस बाहेर पडली नव्हती

    एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही

  • 27 Nov 2021 09:17 PM (IST)

    ठाण्यात माजीवडा येथे मिनी बसने घेतला अचानकपणे पेट 

    ठाणे : माजीवडा येथील फ्लायओव्हर खाली उभी असलेल्या मिनी बसने घेतला अचानकपणे पेट

    बस जागेवर धूळ खात उभी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही

    मोठ्या प्रमाणात बस जळून खाक झाली आहे

    घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

  • 27 Nov 2021 08:21 PM (IST)

    दिवसभरात 3 हजार 10 एसटी कर्मचाऱ्यांच केलं निलंबन

    मुंबई : महामंडळाकडून मोठ्या कारवाईला सुरुवात

    दिवसभरात 3 हजार 10 कर्मचाऱ्यांच केलं निलंबन

    तर 270 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

    आतापर्यंत एकूण 6 हजार 225 जणांवर निलंबनाची कारवाई

  • 27 Nov 2021 07:42 PM (IST)

    औरंगाबादहून जालन्यासाठी सोडलेल्या एसटी बसवर दगडफेक

    औरंगाबाद : औरंगाबादहून जालन्यासाठी सोडलेल्या एसटी बसवर दगडफेक

    औरंगाबाद जिल्ह्यातील सेन्द्राया ठिकाणी फोडली एसटी बस

    वाहक आणि चालकाला फोनवरून शिवीगाळ केल्याची माहिती

    एसटीची तोडफोड करून अज्ञात व्यक्ती झाले फरार

  • 27 Nov 2021 07:36 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे कन्हान नदीत तिघे बुडाले

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे कन्हान नदीत तिघे बुडाले

    प्रशांत पटेल,अभिषेक चव्हाण आणि हरिकृष्ण लांबाचीय असे नदीत बुडालेल्या तिघांचे नाव

    यापैकी प्रशांत पटेल यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश

    नागपूरच्या वाथोडा येथील राहणारे. फिरायला गेले असताना घडली घटना

  • 27 Nov 2021 07:25 PM (IST)

    सांगलीत निलंबित 135 कर्मचारी कामावर परतले, दिसभरात 62 संपकरी निलंबित

    सांगली एसटी संप अपडेट

    दिसभरात 62 संपकरी निलंबित

    आतापर्यंत 346 जणांचे निलंबन

    निलंबित 135 कर्मचारी कामावर परतले

    आज दिवसभरात 300 कर्मचारी कामावर परतले

    जिल्ह्यात 2 हजार संपकरी कर्मचारी कामावर रुजू

    जिल्ह्यात आज 317 बस फेऱ्यांची नोंद

  • 27 Nov 2021 07:18 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 33 बस डेपोतून बाहेर पडल्या, 22 जणांना सेवा समाप्तीची नोटीस

    नाशिक – दिवसभरात 33 बस डेपोतून बाहेर पडल्या

    दिवसभरात 106 कर्मचाऱ्यांवर कारवाई

    4 बसवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

    22 जणांना सेवा समाप्तीची नोटीस

  • 27 Nov 2021 06:54 PM (IST)

    नाहक 35 कष्टकऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं : गुणरत्न सदावर्ते

    अॅड. गुणरत्न सदावर्ते माध्यमांशी बोलत आहेत. सध्या 95 टक्के कर्मचारी दुखवट्यात आहेत. काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. नाहक 35 कष्टकऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं. नंतर कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. दहशत निर्माण करण्यासाठी यंत्रणांचा वापर होत आहे. या बेकायदेशीर अटकेची चौकशी व्हावी. आज उस्मानाबादेत एक घटना घडली. एका वाहकाला जबरदस्तीने कामावर जाण्यास सांगण्यात आलं. त्याला गाडीत बसण्यास सांगण्यात आलं.

  • 27 Nov 2021 06:51 PM (IST)

    मनसे नेते राज ठाकरे 8 डिसेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद : 8 डिसेंबर रोजी मनसे नेते राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद शहरात मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

    तब्बल एक वर्षानंतर राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्व

  • 27 Nov 2021 06:26 PM (IST)

    पुणे

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना विविध मान्यवर वाहणार श्नद्वांजली,

    पुण्यातील स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचात शाहीरा तुला वंदितो कार्यक्रमाचं आयोजन,

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राहणार उपस्थित,

    थोड्या वेळात कार्यक्रमाला होणार सुरुवात,

    चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी उपस्थित

  • 27 Nov 2021 06:25 PM (IST)

    प्रवीण दरेकर यांनी घेतली आंदोलक नंदूरबारमधील एसटी कामगारांची भेट

    नंदुरबार- राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली आंदोलक एसटी कामगारांची भेट

    – नंदुरबार बस स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या कामगारांची जाऊन केली चौकशी

    – भाजपाचा कर्मचारी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना ग्वाही

    – कारवाईचा बडगा उचलणार्‍या डेपो मॅनेजरला फोन करून दिली समज

  • 27 Nov 2021 06:25 PM (IST)

    चंद्रपूर

    बल्लारपूरच्या कारवा जंगलात 5 वर्षीय वाघिणीचा मृत्यू, गस्तीदरम्यान मृतावस्थेत आढळली वाघिण,

    कारवा 1 बिटातील कक्ष क्र. 500 मधील घटना,

    4 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वाघिणीचे सर्व अवयव आहेत सुरक्षित,

    मृत्यूचे कारण मात्र अज्ञात, तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करून वनरोपवाटिकेत शवाला जाळले,

    व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेत केले रवाना,

    वनविभाग करत आहे अधिक तपास

  • 27 Nov 2021 06:25 PM (IST)

    नाशिक

    मालेगावात सुभाष सिनेमा गृहात सलमान चाहत्यांचा फटाके फोडून जल्लोष…

    -अतिशय धक्कादायक गोष्ट समोर…

    -सलमान खानच्या अंतिम च्या शोमध्ये फोडलेत फटाके…

    -सिनेमागृहात घडला प्रकार..

    -मालेगांव छावणी पोलिसांत गुन्हा दाखल…

    -काही वात्रटपणा करणाऱ्या तरुणांनी फोडले फटाके..

    -सुदैवाने जीवितहानी झाली नाही..

    -यापूर्वीही घडलेत असे प्रकार…

  • 27 Nov 2021 06:24 PM (IST)

    जालना 

    औरंगाबादहुन सुटलेली बस काही वेळात पोचणार जालन्यात

    तब्बल 20 दिवसानंतर जालना स्थानकात येणार एसटी बस

    आज सायंकाळी चार वाजता औरंगाबाद स्थानकातून सुटली आहे लालपरी

    लालपरी बस काही वेळात पोचणार जालना स्थानकावर

  • 27 Nov 2021 05:51 PM (IST)

    छगन भुजबळ बाईट

    भिडे वाड्याच्या संदर्भात आज पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि छगन भुजबळ यांची महत्वाची बैठक पार पडली

    आम्ही भिडेवाड्यातील जागेसंदर्भात तीन पर्याय सुचवले आहेत त्यावरती आता पुढच्या बैठकीत निर्णय होईल

    मात्र या ठिकाणी जर मुलींच्या नावाने शाळा सुरू झाली त्यांच्या कार्याची माहिती या ठिकाणी लावली तर सावित्रीबाई फुलेंच स्मृतीस्थळ जिवंत राहील,

    आम्ही परत एकदा बसू आणि निर्णय घेऊ,

    ऑन नारायण राणे

    राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केलंय,

    मी केलेल्या कामावर समाधानी आहे

    नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल

    पुढचा त्याच्या पुढचा मार्च ही जाईल पाच वर्ष होतील महाविकास आघाडी मजबूत

    महाविकास आघाडी पुढे ही मजबूत राहणार

    भिडे वाड्यात सावित्रीबाईंच्या नावाने शाळा सुरू करणार

    छगन भुजबळांची माहिती

  • 27 Nov 2021 05:50 PM (IST)

    नाशिक

    मालेगावात सुभाष सिनेमा गृहात सलमान चाहत्यांचा फटाके फोडून जल्लोष…

    -अतिशय धक्कादायक गोष्ट समोर…

    -सलमान खानच्या अंतिम च्या शोमध्ये फोडलेत फटाके…

    -सिनेमागृहात घडला प्रकार..

    -मालेगांव छावणी पोलिसांत गुन्हा दाखल…

    -काही वात्रटपणा करणाऱ्या तरुणांनी फोडले फटाके..

    -सुदैवाने जीवितहानी झाली नाही..

    -यापूर्वीही घडलेत असे प्रकार…

  • 27 Nov 2021 05:49 PM (IST)

    कल्याण

    अवैध रित्या 71 मुलांना आश्रमात ठेवले प्रकरण..

    आरोपी डॉक्टर केतन सोनीला अटक..

    बाजारपेठ पोलिसांनी अटक करून केले कल्याण कोर्टात हजर..

    डॉक्टरला 30 नोव्हेंम्बर पर्यंत पोलीस कोठडी..

    डॉक्टर केतन सोनी याच्यावर एका मुलाच्या खरेदीचा गुन्हा देखील आहे दाखल…

  • 27 Nov 2021 03:52 PM (IST)

    जळगाव

    जळगाव एसटी कर्मचाऱ्यांना डेपोच्या आगारातून आंदोलन सुरु

    जळगाव जिल्ह्यातील 11 डेपोत 4500 एसटी कर्मचारी आहेत

    कर्मचार्‍यांपैकी  ४५० कर्मचारी सेवेत रुजू

    आतापर्यंत 151 कर्मचारी निलंबीत.

    एसटी बस (लालपरी) 12 तालुक्यातील आगाराच्या बाहेर

  • 27 Nov 2021 03:51 PM (IST)

    पुणे

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली बाबासाहेब पुरंदरेंच्या कुटुंबियांची भेट,

    भेट घेऊन पुरंदरे कुटुंबियांच केलं सांत्वन,

    यावेळी दोन मुलं,सुना नातवंडे उपस्थित होती,..

  • 27 Nov 2021 03:51 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणयाचा प्रयत्न केले

    बाबासाहेब पुरंदरेंनी शिवषृश्टीचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करु

    सर्वच शिवप्रेमींनी त्यासाठी मदत करण्याची गरज

    या सरकारची कामगीरीच काय आहे की मी त्याबद्दल बोलू

    ही समाधानाची गोष्ट आहे की आजही भाजपच राज्यातील नंबर वन पक्ष आहे

    नारायण राणेच याबाबत बोलतील ( मार्चमधे सरकार पडेल)

    नवाब मलिकांच्या विषयावर बोलणे टाळले

  • 27 Nov 2021 03:04 PM (IST)

    वाशिम

    वाशिम जिल्ह्यात रिसोड ,वाशिम, मंगरुळपिर, कारंजा एसटी आगाराच्या कर्मचारी यांचं 21 व्या दिवशीही संप सुरूच…

    रिसोड : 229

    कारंजा : 208

    वाशिम : 300

    मंगरूळपिर : 232

    एकूण कर्मचारी संख्या – 969

    किती कर्मचारी कामावर परतले – 00

    किती कर्मचारी निंलबित – 39

    किती बस बाहेर पडल्या -00

    हिंगोली

    हिंगोली जिल्ह्यात वसमत ,कळमनुरी, हिंगोली एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांचा 28 व्या दिवशी ही संप सुरूच…

    हिंगोली : 312

    वसमत : 314

    कळमनुरी : 184

    एकूण कर्मचारी संख्या – 810

    किती कर्मचारी कामावर परतले – 38

    किती कर्मचारी निंलबित – 30

    किती बस बाहेर पडल्या -00

    नागपूर  एसटी कर्मचारी संप सुरूच

    कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

    आज सुद्धा एकही कर्मचारी रुजू झाला नाही

    एकही बस आगार बाहेर पडली नाही

    भंडारा विभाग

    – जिल्ह्यात १८३५ एसटी कर्मचारी आहेत,

    – आतापर्यंत ९२ कर्मचारी निलंबीत.

    – सकाळ पासुन एकही बस आगार बाहेर पडली नाही.

  • 27 Nov 2021 03:03 PM (IST)

    नंदुरबार

    विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाषण मुद्दे

    – राज्यामध्ये सहकार चळवळ अडचणीत

    – आज उद्या भाजपाचे सरकार येईल त्यावेळी सरकार सहकाराच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं

    – पवार कुटुंबाचे नाव न घेता त्यांनीच सहकार चळवळ अडचणीत आणल्याचा आरोप

    – साखर कारखाने ताब्यात घ्यायची भूक जास्त आहे त्यामुळे ईडी मागे लागते असा टोला पवार कुटूंबियांना लगावला

    – एस टी कामगार देशोधडीला लागला आहे, आंम्ही आंदोलक कर्मचारी मागे ठाम पणे उभे आहोत

  • 27 Nov 2021 03:02 PM (IST)

    नवी दिल्ली

    नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष दखल

    साउथ आफ्रिकेसह इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर असणार करडी नजर

    देशातील राज्य सरकारांनीही याबाबत काळजी घेण्यासाज पंतप्रधान मोदी यांचे आदेश

    कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक

    विमानतळांवर प्रवाशांची योग्य तपासणी करण्याच्या दिल्या सूचना

  • 27 Nov 2021 03:02 PM (IST)

    अहमदनगर

    शेवगाव आगाराच्या आणखी एक एसटी बसेसवर दगडफेक

    शेवगावहून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसेसवर अज्ञात ईसमाकडून दगडफेक

    करंजी घाटात दगडफेक झाल्याचा चालकाचा दावा

    चालकाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी

    माझा बीपी वाढल्याने एक्सीडेंट होण्याची भीती, त्यामुळे मी अहमदनगरहुन पुन्हा शेवगावकडे निघालो

  • 27 Nov 2021 03:01 PM (IST)

    मावळ

    पिकअपने 27 वारकऱ्यांना चिरडले, त्यातील तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

    मयत वारकरी

    1)विमल सुरेश चोरगे वय 50 2)जयश्री आत्माराम पवार वय 54 3)सविता बारकू येरम वय 58

  • 27 Nov 2021 02:57 PM (IST)

    मुंबई

    कोरोना संदर्भात उद्या मुख्यमंत्री बैठक घेणार नव्या विषाणू संदर्भात चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती द. आफ्रिकेवरुन येणाऱ्या विमानंबद्दल केंद्राशी चर्चा करु केंद्र सरकारशी बोलून काही निर्बंध आणावे लागतील

  • 27 Nov 2021 02:49 PM (IST)

    किरीट सोमैया

    माझा स्थगित झालेला अमरावतीचा दौरा 30 नोव्हेंबर रोजी करणार

  • 27 Nov 2021 02:43 PM (IST)

    किरीट सोमैयांची पत्रकार परिषद

    स्वतः केलेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका

    किरीट सोमैयांची भावना गवळींना ईडी समोर येण्याची विनंती

    खोतकरांनी 100 एकर शासकीय जमिन बळकावली

    भाजप नेते किरीट सोमैयांचा आरोप

    जालन्यात शेतकऱ्यांच्या नावाने कारखाना गिळंकृत केला

    शेतकऱ्यांची जमिन खोतकरांनी ताब्यात घेतली

    ईडीने कारवाई सुरु केली आहे

  • 27 Nov 2021 01:22 PM (IST)

    रत्नागिरीत गेल्या 10 तासापासून कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प

    रत्नागिरीत गेल्या 10 तासापासून कुंभार्ली घाटात वाहतूक ठप्प

    अवजड वाहनांच्या लागल्या रांगा

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प

    कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

    रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प

    वाहन चालक यांमधून नाराजी

  • 27 Nov 2021 01:21 PM (IST)

    भुसावळ ते बोदवड पहिल्या बस वर दिपनगर जवळ अज्ञातांनी केली दगडफेक

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आगारातून सुटलेली भुसावळ ते बोदवड पहिल्या बस वर दिपनगर जवळ अज्ञातांनी केली दगडफेक

    संपामुळे भुसावळ आगारातून गेल्या २० दिवसापासून बस सेवा बंद होती

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज अखेरचा अल्टीमेटम दिल्याने भुसावळ आगारातील सहा संपकरी एसटी कर्मचारी कामावर हजर होत भुसावळ आगारातून जळगाव यावल बोदवड मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या

    दरम्यान भुसावळ आगारातून बोदवड कडे निघालेल्या बसवर दिपनगर नजीक अज्ञातांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या

  • 27 Nov 2021 12:20 PM (IST)

    कल्याण बस स्थानाकामधून 5 एसटी बस रवाना

    कल्याण : कल्याण बस स्थानाकामधून 5 एसटी बस रवाना

    कल्याण भिवंडी मार्गावर एसटी सेवा सुरू

    70 कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती

    कल्याण बस डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांची माहिती

  • 27 Nov 2021 11:46 AM (IST)

    नवी दिल्लीत कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटबाबत बैठक सुरु

    नवी दिल्ली

    कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटबाबत बैठक सुरु

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा

    आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निर्बंध लावले जाण्याची शक्यता

    बैठकीला आरोग्य खात्यातील तज्ञ आणि अधिकारी उपस्थित

    दक्षिण आफ्रिकेमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घाला – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी

  • 27 Nov 2021 11:27 AM (IST)

    बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट, तब्बल 24 दिवसानंतर पहिली एसटी प्रवाशासाठी रवाना

    बीड :

    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट

    तब्बल 24 दिवसानंतर पहिली एसटी प्रवाशासाठी रवाना

    गेवराई साठी निघाली बीड आगारातून पहिली एसटी

    दोन वाहक आणि दोन चालक नौकरीवर तैनात

    इतर कर्मचाऱ्यांचे संप सुरूच

  • 27 Nov 2021 11:27 AM (IST)

    गडचिरोली मार्दिनटोला चकमकीच्या विरोधात माओवादी संघटनेने पुकारला आज बंद

    गडचिरोली मार्दिनटोला चकमकीच्या विरोधात माओवादी संघटनेने पुकारला आज बंद

    गडचिरोली जिल्ह्यातील कोठी परिसरात नक्षलवाद्यांनी रस्त्यावर ट्रॅक्टरला केली जाळपोळ

    तिथूनच लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातही मोठ्या संख्येत माओवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ

    छत्तीसगड नारायणपूर जिल्ह्यातील फारसे गाव अंतर्गत कारमरी येथील सरपंच असलेल्या महिलेच्या पतीची हत्या

    हत्या झालेल्या मृतकाचे नाव बिरजूराम सलामे

    प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत असलेल्या जेसीपी ला माओवादयांनी केली जाळपोळ

    मार्दिन टोला चकमकीत माओवाद्यांच्या बडा नेता मिलिंद तेलतुंबडे सह अनेक माओवादी ठार झाले होते

    महाराष्ट्रातील गडचिरोली गोंदिया सह छत्तीसगड मध्यप्रदेश तेलंगाना ओडिसा आंध्र प्रदेश अशा सात राज्यांमध्ये पुकारला बंद

  • 27 Nov 2021 10:45 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील क्रीडा संकुलात कोचला मारहाण

    औरंगाबाद  –

    औरंगाबाद शहरातील क्रीडा संकुलात कोचला केली मारहाण

    प्रशांत साठे या व्यक्तीने केली कोच ला मारहाण

    ज्ञानेश्वर मुरमे नावाच्या कोचला केली मारहाण

    चप्पल फेकत पाठलाग करून केली अपमानास्पद मारहाण

    मारहाण प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

    मारहाण प्रकरणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 27 Nov 2021 10:20 AM (IST)

    गडचिरोलीत ७७६ एस.टी कर्मचारी संपावर

    गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी असे दोन आगार असून ७७६ एस.टी कर्मचारी संपावर आहेत

    त्यात गडचिरोली आगारातून 39 कर्मचारी निलंबित झाले तर

    अहेरी आगारातून १४ कर्मचारी निलंबित झालेले आहेत

    या दोन आगारातुन बसेस सुरु झालेले नाही

    गडचिरोली डिविजन मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आगार येत असुन

    ब्रह्मपुरी आगारातुन २७० कर्मचारी संपावर असुन त्यात ११ कर्मचार-यांना निलंबित केलं आहे

    एकाही कर्मचारी आज रुज झालेला नाही

  • 27 Nov 2021 09:12 AM (IST)

    गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथे 15 घरांना पडले तडे

    रत्नागिरी –

    गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथे 15 घरांना पडले तडे

    घराशेजारील शंभर मीटर अंतरावर एल अँड टी प्रकल्पाच्या लागणार्‍या दगडांसाठी होतय खोदकाम

    या खोदकामासाठी केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटामुळे

    घरांना पडतायत तडे, भिंती अंगावर पडून आमच्या मरणाची वाट प्रशासन पाहताय का?

    नागरिकांचा संतप्त सवाल, काम बंद करण्याची मागणी

  • 27 Nov 2021 09:10 AM (IST)

    रत्नागिरीत एसटीच्या लालपरीला अद्याप ब्रेकच

    रत्नागिरीत एसटीच्या लालपरीला अद्याप ब्रेकच

    जिल्ह्याच्या मुख्य रहटाघर बस स्थानकातून एकही बस धावली नाही

    बस स्थानकावर शुकशुकाट

    एसटीचे चालक आणि वाहक संपावर ठाम

  • 27 Nov 2021 09:09 AM (IST)

    औरंगाबादेत एकही डोस न घेता रिक्षा चालवल्यास रिक्षा होणार जप्त

    औरंगाबाद –

    एकही डोस न घेता रिक्षा चालवल्यास रिक्षा होणार जप्त

    किमान एक तरी लसीचा डोस घ्यावा अन्यथा होणार रिक्षा जप्त आणि दंडात्मक कारवाई

    खाजगी बस चालकांनाही लसीकरणासंबंधी तंबी

    बस मध्ये प्रवास करणाऱ्यांनी एक तरी डोस घेतला असावा तरच मिळणार तिकीट

    लसीकरण यासंबंधी औरंगाबाद मध्ये कठोर नियमावली

  • 27 Nov 2021 09:08 AM (IST)

    लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घसरला

    औरंगाबाद –

    लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घसरला

    ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात ठरले कुचकामी

    ग्रामीण भागातील 46 शाळांत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे केलेले मूल्यमापन

    188 शिक्षकांची मदत घेऊन पाच हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून वस्तुस्थिती घेतली जाणून

    अध्ययन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

  • 27 Nov 2021 09:07 AM (IST)

    वाजतगाजत रामपथ गाडी सोडली जाणार आहे, रामाचा वेष परिधान केलेले कलाकार स्वागत करतील

    पुणे

    वाजतगाजत रामपथ गाडी सोडली जाणार आहे, रामाचा वेष परिधान केलेले कलाकार स्वागत करतील

    रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिरवा झेंडा दाखवतील

  • 27 Nov 2021 07:55 AM (IST)

    सिरम इन्स्टिट्यूटकडून गरीब देशांना आतापर्यंत 100 कोटी लसीचे डोस वितरीत

    पुणे –

    सिरम इन्स्टिट्यूटकडून गरीब देशांना आतापर्यंत 100 कोटी लसीचे डोस वितरीत

    सिरमने विविध सामाजिक संस्थांमार्फत गरीब देशांना लस देण्याचा संकल्प केला होता,

    अखेर एक महिना आधीच लसीचे डोस वितरित केल्याची माहिती आदर पुनावाला यांनी दिलीये,

    2022 च्या तिसऱ्या महिन्यात लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवलं जाण्याची शक्यता आहे..

    मात्र आतापर्यंत सिरमनं 100 कोटी डोस गरिब देशांना वितरीत केलेत…

  • 27 Nov 2021 07:51 AM (IST)

    आज संपूर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद

    नाशिक –

    आज संपूर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद

    गंगापूर,मुकणे धरणाच्या जलवाहिनीचे होणार आज दुरुस्ती काम

    रविवारी सकाळी देखील संपूर्ण शहरात कमी दाबाने येणार पाणी

    शहरात आज ‘पाणीबानी’

  • 27 Nov 2021 07:50 AM (IST)

    पुण्यात गुलाबी थंडीला सुरुवात

    पुणे

    पुण्यात गुलाबी थंडीला सुरुवात,

    कमी झालेल्या थंडीचा पारा हळूहळू वाढायला सुरुवात,

    पुण्यातील उपनगरात पसरली धुक्याची चादर,

    धुक्यात हरवलं पुणे

  • 27 Nov 2021 07:50 AM (IST)

    पुण्यातील स्वारगेट आगारात आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    पुणे

    पुण्यातील स्वारगेट आगारात आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच,

    लाल परी डेपोतचं उभ्या,

    फक्त शिवशाही, शिवनेरी आणि खाजगी गाड्या सुरू

    परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही,

    स्वारगेट आगारात कर्मचारी फिरकले नाहीत…

  • 27 Nov 2021 07:43 AM (IST)

    साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

    नाशिक – साहित्य संमेलनाला मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती

    कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार अशी होती तयारी

    मात्र तब्येतीच्या कारणाने मुख्यमंत्री ऑनलाईन राहणार उपस्थित

    3,4,5 तारखेला नाशिकमध्ये होणार साहित्य संमेलन

    शरद पवार मात्र कार्यक्रमाच्या समारोपाला राहणार उपस्थित

  • 27 Nov 2021 07:27 AM (IST)

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प

    रत्नागिरी – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प

    कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

    रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प

    वाहन चालक यांमधून नाराजीने संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय

  • 27 Nov 2021 07:13 AM (IST)

    नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    रोजनदारी वरील 33 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

    आत नागपूर विभागात रोजनदारी कर्मचारी शिल्लक नाही

    काल दिवसभरात नागपूर विभागातून एकही बस बाहेर पडली नाही

    एकही कर्मचारी सेवेत रुजू झाला नाही

    कर्मचारी विलानीकर्णाच्या मुद्द्यांवर ठाम

    आज काही कर्मचारी निर्णय घेणार का याकडे लागलं आहे लक्ष

  • 27 Nov 2021 07:13 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा 50 लाखाचा टप्पा पार

    नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा 50 लाखाचा टप्पा पार

    हरघर दस्तक या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

    हरघर दस्तक मोहीम अंतर्गत आता पर्यंत 5.35 लाख नागरिकांच लसीकरण

    जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोज घेतलेल्यांची संख्या 50 लाख 2 हजार 568

    यात एक डोज घेणाऱ्यांचं प्रमाण 88 टक्के , तर दुसरा डोज घेणाऱ्यांचं प्रमाण 47. 72 टक्के वर

    शहर आणि ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम

  • 27 Nov 2021 06:39 AM (IST)

    अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 18 तास चौकशी

    जालना –

    अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 18 तास चौकशी

    खोतकर यांच्या बंगल्याची आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ई.डी कडुन केली झाडाझडती

    किरीट सोमय्यां यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्यावर केले होते गैर व्यवहाराचे आरोप

    रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणात ई.डी कडुन होत आहे चौकशी

    आज अर्जुन खोतकर देणार ईडी ने केलेल्या कारवाई प्रसारमाध्यमांना संबंधी माहिती

  • 27 Nov 2021 06:33 AM (IST)

    नागपुरात हवालाच्या घबाडावर पोलिसांची छापे

    नागपुरात हवालाच्या घबाडावर पोलिसांची छापे

    9 ठिकाणी झाडाझडती ,84 लाख जप्त

    अचानक झालेल्या छापेमारी मुळे हवाला व्यवसायिकांमध्ये खडबड

    परिमंडळ तीन चे उपायुक्त गजानन राजमाने यांनी केली सर्जिकल स्ट्राईक

    लकडगंज मधील गणेश चेंबर आणि एका दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये करण्यात आली कारवाई

    पोलिसांसह प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी

    नागपुरात हवाला च काम करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची माहिती

    रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या का कारवाईत मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली

Published On - Nov 27,2021 6:30 AM

Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.