Maharashtra News LIVE Update | आज राज्यभरात 93 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज देखील सुरु असून काही कर्मचारी कामावर हजर होत असल्याचं चित्र आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरआयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावतील अशी शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी यांची मन की बात देखीलअसेल.
LIVE NEWS & UPDATES
-
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण : दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
-
आज राज्यभरात 93 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन
आज राज्यभरात 93 संपकरी कर्मचाऱ्यांच निलंबन
आतापर्यंत 6 हजार 497 कर्मचाऱ्यांचं निलंबन
आतापर्यंत एकूण 1525 जणांवर सेवासमाप्ती कारवाई
-
-
प्रवीण दरेकर यांनी घेतली नाशिकमधील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट
नाशिक – प्रवीण दरेकर यांनी घेतली आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट
भेट देऊन दिला कर्मचाऱ्यांना धीर
नाशिकच्या ND पटेल रोड डेपोत बसलेल्या आंदोलकांची घेतली भेट
-
ओमिक्रॉनचा संसर्ग चार पट जास्त : राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत आहेत. आजच्या बैठकीत कोरोनाच्या नव्या रुपावर चर्चा होणार आहे. ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो. लसीकरणाला हा विषाणू एस्केप करतो का ? हे पाहावं लागणार आहे. मी केंद्राला दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची यादी काढली जात आहे. या देशातून येणारे विमान थांबवले पाहिजेत. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतं. या मागणीवर सध्या काही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे म्हणाले.
-
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड-19 च्या नव्या रुपाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक साडे पाच वाजता सुरु होणार आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना video Conferencing साठी झूमद्वारे निमंत्रित करण्यात आलंय.
या बैठकीत निमंत्रित
विभागीय आयुक्त
पोलिस महानिरीक्षक (IG)
पोलिस आयुक्त/ जिल्हा पोलिस अधीक्षक
महानगरपालिका आयुक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सिव्हील सर्जन
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता(Dean)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा टास्क फोर्सचे 2 प्रतिनिधी
बैठक साडेपाच वाजता सुरू होईल
-
-
इंदापुरात पुणे-सोलापूर महामार्गावर बसस्थानकासमोर ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको
इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर बसस्थानकासमोर ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको
ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी व इतर मागण्यासाठी रास्ता रोको
आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
शेकडो आंदोलक रस्त्यावर
-
प्रवीण दरेकर
– त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद मालेगाव,नांदेड अमरावतीत – शांततेत काढलेल्या मोर्चा वर कारवाई – दुसऱ्या बाजूला पुरोगामीत्वचे ढोल बडवायचे – अमरावतीत दलित महिलेवर 2 जणांवर बलात्कार – केवळ ठाकरे सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण गेले
-
प्रवीण दरेकर
– शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण झालेत का ? – दिलेल्या वचनाचा भंग केलात – सवलत तर दूर, असणारी वीज कापण्याचा काम आपण केलंत – संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, अनिल परब यांची चौकशी सुरू – उपमुख्यमंत्री यांच्या जवळच्या नातेवाईकांची।इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू – त्यामुळे विकास कामांकडे लक्ष नाही
-
नाशिक
प्रवीण दरेकर प्रेस
– 5 वर्षांचा फडणवीसांचा विकासाचा कार्यकाळ आपण बघितला – भ्रष्टाचाराचा एकही डाग लावून न घेतलेला सरकार – 2 वर्षांत महाराष्ट्र 20 वर्ष मागे – असणारे प्रकल्प ठप्प झाले – अर्ध्या मंत्रीमंडळावर डाग – गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर.. – ही महाविकास आघाडीची उपलब्धी – कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा – नाशिक गुन्हेगारी नगरी होते का अशी भीती नाशिककरांना – भाजपाचा मंडल अध्यक्ष याची खुलेआम निर्घृण हत्या – राजकीय आशीर्वादाने हत्या केली
– युनियन च्या वर्चस्वावरून वाद झाल्याच स्पष्ट – आरोपी विनोद बर्वे याने लावलेल्या युनियन च्या बॅनर वर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो – काही दिवसांपूर्वी आरोपी विनोद बर्वे याने राष्ट्रवादीत प्रवेश केला – राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण – भुजबळ त्यांना चांगली जवाबदारी देणार अस म्हटले होते – हीच जवाबदारी दसणार होती का -भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली – या प्रकरणात मोक्का फाशी अशी शिक्षा अपेक्षित.. – आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही अशी अमोल ईघे यांच्या बायकोची अपेक्षा – केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवावी – विधानसभेत हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार – या प्रकरणात तथ्य असेल तर पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी माझी मागणी
-
सोलापूर
लग्नासाठी परगावी गेलेल्या पोलिस अधिकाऱयाच्या घरी चोरी
पोलीस निरीक्षक वीरेंद्रसिंह शिरसागर यांच्या घरात चोरी
दोन लाख तीस हजार रुपये , एक तोळे दागिने लंपास
लग्नासाठी परिवारासह परगावी गेल्यानंतर चोरट्यांनी साधला डाव
शिरसागर यांचे नातेवाईक विक्रमसिंह गिड्डे यांनी दिली पोलिसात तक्रार विजापूर नाका पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या घटनेची नोंद
-
नवी दिल्ली
सर्व पक्षाच्या बैठकीला पंतप्रधान अनुउपस्थित
खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला प्रश्न
भाजप कडून मात्र कुठलही स्पष्टीकरण नाही
अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच्या बैठकिला मोदींची अनुपस्थिती
-
पुणे
चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले की सूत्रं अपप्रचार करतात हा प्रश्न विचारल्यावर
चंद्रकांत पाटील म्हणाले की सूत्रं कोणती आहेत माहिती नाही,
कारण चंद्रकांत पाटील काय चीज आहे त्यांना माहिती नाही,
मी घाबरणार नाही,
चंद्रकांत पाटलांचा इशारा,
तर केंद्रीय नेतृत्व नाराज नाही, आम्ही केलेल्या कामावर अमित शहा समाधानी आहेत..
त्यांची आणि माझी बॉडीलँग्वेज तरी बघा,
माझ्यावर अमित शहा नाराज आहेत हे बघायला मी समर्थ आहे..
अमित शहा चंद्रकांत पाटलांवर नाराज आहेत ? दिलं स्पष्टीकरण
-
नाशिक
अमोल इघे हत्या प्रकरण विधानसभेत गाजणार..
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मयत अमोल इघे यांच्या घरी सांत्वनपर भेट
या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असून अधिवेशनात अमोलची हत्या आणि नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत भाजप आवाज उठवणार असल्याची दरेकर यांची माहिती…
याला जबाबदार कोण त्याचा आम्ही पर्दाफाश करणार
युनियनचे रजिस्ट्रेशन नसतांना बोर्ड लावले, अनेक पुढारी गेले
आरोपीवर मोक्का लावा, प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा
कोणी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही
पोलिसांवर राजकीय दबाव
अधिवेशनात अमोलची हत्या आणि वाढलेल्या गुन्हेगारीवर आवाज उठवणार
बोर्डचे उदघाटन कोणी केले ? काही नेत्यांसोबत ज्यांच्यावर संशय आहे ते फोटो कोणाचे ?
देशात महाराष्ट्र गुन्हेगारीबाबत दुसऱ्या नंबरवर
जिथे वाझे आणि गृहमंत्रीच जेलमध्येच असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार…
-
कळवण – अजित पवार बाईट पॉईंट्स
– नविन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतुन विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी – यावर लस अजून उपलब्ध नाही, वेगाने पसरणारा विषाणू आहे
– उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तेव्हा पासून कोणी काहीही बोलू द्या आपण विकासावर बोलू – dpc मध्ये कट लावला नाही, कोरोनाचे संकट असताना शुन्य टक्के व्याज,पिकविमाचे पैसे दिले, एक हजार रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी, हॉस्पिटल साठी पैसे दिले,
– पूर्वी सारखा रस्ता बनविने सस्वस्त नाही,खर्च वाढला आहे
– पेट्रोल, डिझेल, पाठोपाठ CNG चे दर वाढले, रिक्षा चालकांनी भाडे वाढविल,जगायचे कसे हा प्रश्न आहे
– गिरणी कामगारांची स्थिती झाली त्यानुसार आंदोलन करू नका,आम्ही तसे होऊ देणार नाही – पण कर्मचाऱ्यांनी आता विचार करा
-
नवी दिल्ली
खासदार प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद
# राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण, केंद्राने केलेली कामही त्यांनी आपल्या खात्यात मांडली
संद्धीसाधु, सरकार,
मी नवे नाव देतोय, महा विश्वास घातकी आघाडी सरकार आहे
अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले
नाव न घेता जावडेकर यांची अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका
काही मंत्र्यांनी जावयाला कॉक्ट्रक्ट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली
ठाकरे हे अपघातांन झालेले मुख्यमंत्री – जावडेकर
राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाहीय
गृहमंत्री 6 महिने फरार, जेल मध्ये ते गेले, असं कोणतं राज्य आहे ? जावडेकर यांचा सवाल
मुंबई पोलीस आयुक्त गायब होणं, हेही वाईट आहे
-
कळवण – अजित पवार भाषण पॉईंट्स
– यायला मला उशीर झाला त्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो – हेलिकॉप्टर प्रॉब्लम झाला त्यामुळे दोन तास उशीर झाला – कोरोनामुळे आर्थीक परिस्थिती बिघडलेली आहे – व्यासायिकांचे व्यवसाय होत नाही – नैसर्गिक आपत्ती येते,अवकाळी पाऊस,कमी दाबाचा पट्टा तयार होतो तर कधी चक्रीवादळ येते
हे संकट येत असताना st चा संप सुरू झाला मुख्यमंत्री, पवार साहेब, अनिल परब आम्ही एकत्र बसलो पवार साहेबांनी अनुभवा नुसार योग्य पर्याय काढला तुटे पर्यन्त ताणू नका गोर गरिबांची st आहे
मुलाचे शाळा 1 डिसेंम्बर पासून सुरू करत आहोत कर्मचारीनी विचार करावा, तुम्ही ही महराष्ट्रातील आहेत
कोण काय काय बोलतो ही काय महाराष्ट्रची संस्कृती आहे का, कोणी बस फोडतोय असे करू नका – एटी पवार यांच्यांत नम्रता होती अलीकडे पुढारी नमस्कार सुद्धा करत नाही, काय त्यांच्या बापाचे जाते कळत नाही – कोणीही तांबरपत्र घेऊन येत नाही सत्ता येते सत्ता जातेजमिनीवर राहिले पाहिजे – रोज कोण कोण काय बोलतो सरकार जाणार असे म्हटले जाते काही जण देव पाण्यात ठेवून आहे पण सरकार चे काम सुरू आहे लस घ्या एक नवीन विषाणू जगात पसरतो आहे -अधिक वेगाने हा विषाणू पसरतोय – काळजी घ्या मी काल पुण्यात आढावा घेतला, आज मुख्यमंत्री घेत आहेत, राजेश टोपे आढावा घेताय साडेसात हजार कोटी रुपये आरोग्य खात्याला दिले ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणल्या
केंद्राला विनंती करणार आहे
– नवी संकट यवू नये म्हणून खबरदारी घ्या
दुबई तुन दाम्पत्य पुण्यात आले त्यातून चालकाला कोरोना झाला सर्वत्र पसरला हजार मुलांच्या मागे 1 हजार 20 मुली जन्माला येतात हे चांगले झाले – मागे वंशाला दिवा नाही असे डोक्यात घुसले होते मुलीही चांगलं नाव रोशन करतात
– नियमित कर्ज घेणार असाल तर शुन्य टक्के व्याजाने कर्ज देणार
– हिवाळी अधिवेशन कुठे,किती दिवसाचे होणार अजून नक्की नाही, चर्चा होईल
बचतगट च्या महिलांना कमी व्याज दरात कर्ज देण्याचे प्रयत्न अधिवेशनात करणार
कर्ज।फेडणार असाल तर कर्ज मिळणार – अजित पवार, सप्तश्रृंगी गडावर विकासासाठी 22 कोटी 50 लाखाचा आराखडा मंजूर आहे – निधी कमी पडू देणार नाही – इतर जिल्ह्यात रस्त्याच्या कामात जास्त निधी दिला जातो, नाशिकवर अन्याय होतो अशी खंत आमदारांनी व्यक्त केली – नाशिक जिल्ह्यावर अन्याय होवू दिला जाणार नाही – नाशिक जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा आहे काहीही कमी पडू देणार नाही
– पवार साहेबांनी बारामतीमध्ये काम केले आता मी करतोय लोक तुलना करतात
जेव्हा मोठे नेते काम करून गेल्यावर तुलना होत असते
जशी माझी बारामती मध्ये माझी अवस्था तशीच नितीन पवारची कळवण मध्ये अवस्था आहे
-
दोन वर्षात महाराष्ट्रात विकासाचं काम झालं नाही : चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन वर्षात महाराष्ट्रात विकासाचं काम झालं नाही. मुंबई पोलिसांची ख्याती जगभर होती ते कमिशनर फरार झाले होते. ते दोन दिवसांपूर्वी प्रकटले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
-
28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा: नितेश राणे
हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या विचाराशी बेईमानी, शेतकरी,कामगार सगळ्यांशी बेईमानी करून या ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत 13 प्रकरणात या सरकारला सुप्रीम आणि हायकोर्टाने फटकारले आहे.ताशेरे ओढले आहेत.पुरोगामी राज्य आणि उत्तम प्रशासन म्हणून महाराष्ट्राची ओळख होती ती दोन वर्षा अगोदर 28 नोव्हेंबरला पुसली गेली, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
-
महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल : छगन भुजबळ
मुख्यमंत्रीपद येते आणि जाते मात्र लोकांसाठी जो लढेल आणि बोलेल तो व्यक्ती लोकांच्या लक्षात राहतो
आज दोन वर्षांपूर्वी मी मंत्रिपदाची शपथ घेतली अजून काही लोकांना हे पचत नाहीय, बाकीचे म्हणतात फेब्रुवारी मध्ये सरकार जाईल, जून मध्ये जाईल पण मी तुम्हाला सांगतो
महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे काम करेल आणि त्यानंतर पुन्हा निवडून येईल
3 जानेवारी ला सावित्रीबाई फुलेंचा 12 फुटाचा पुतळा मुख्य इमारतीच्या समोर उभा राहील
आज मी भूमिपूजन करणार आहे
-
सगळ्या गोष्टींचे खाजगीकरण झाले तर आरक्षणाचा उपयोग होणारच नाही : भूपेश बघेल
रेल्वे विकताहेत, विमानतळ विकताहेत, सर्वच गोष्टी बनवण्याच्या आधी विकण्याची तयारी सुरु आहे. सगळ्या गोष्टींचे खाजगीकरण झाले तर आरक्षणाचा उपयोग होणारच नाही, असं मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मांडलं आहे.
-
महाराष्ट्राची बदनामी याचं पुत्र प्रेम आणि पब, पार्टी, पेग आणि पेग्वीन यामुळं झाली: आशिष शेलार
काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे
सत्तेचा उपभोग, त्यातून संपत्तीचे निर्माण हेच सुरु होते
हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र पुत्री पुतण्या यांच्या भोवती फिर आहे
महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम आणि पब, पार्टी, पेग आणि पेग्वीन यामुळे झाली
मंदीरासाठी लोक आंदोलन करतात पण सरकारची भुमिका मदीरालय सुरु करायची होती
आमचा विरोध या गोष्टींना नाही तर प्राध्यान्यक्रमाने आहे
सुपुत्रीच्या प्रेमात काही चुक नाही मात्र पुत्रीच्या प्रेमापोटी अनील देशमुखला गृहमंत्री बनवले जाते
आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते
पुतण्या बद्दल काय सांगावे त्यांच्या भितीने त्यांना वरच्या पदावर बसवले जाते
मग एक हजार कोटीच्यावर बेनामी संपत्ती दिसेते
सहकारी असणारा कारखाना शेतकऱ्यांच्या पैशावर उभा होतो. सरकारी योजना मिळतात. त्यानंतर तो कारखाना तोट्यात जातो
जी बँक कारखाना जप्त करते तीच त्याचा लिलाव करते आणि पुतण्या खरेदी करतो
पीएमआरडीएत भूखंडाचे श्रीखंड बघायला मिळते
सरकारची कार्यपद्धती स्पष्ट आहे. अतर्क, असनदशीर आणि अहंकार अशीच आहे.
पेट्रोल डिझेलचा व्हॅट कमी होत नाही आणि दारुवरील कर कमी होतो
-
असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत त्याचे सरकारला काही देणेघेण आहे का?: आशिष शेलार यांचा सवाल
सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे, त्यानिमित्त वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहिरात देवून वातावरण निर्मिती करण्यात आलीय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्येत लवकर बरी व्हावी अशा शुभेच्छा देतो
आमचे महाविकास आघाडीतील पक्षाशी काही वैर नाही
आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे
असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत आहेत त्याचे सरकारला काही देणेघेण आहे का?
या दोन वर्षाचे वर्णन कमी शब्दात ‘पुत्र, पुत्र आणि पुतण्या भोवती दोन वर्ष फिरणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार’
-
मी आजही सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जायचं नाही, माझ्यासाठी सेवा महत्त्वाची : नरेंद्र मोदी
राजेश कुमार प्रजापति यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. राजेश कुमार प्रजापती यांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला. त्या योजनेमुळं लाभ झाल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ नये, अशी माझी भावना आहे. मी सत्तेऐवजी सेवेला महत्त्व देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
नरेंद्र मोदी यांच्याकडून झाशीच्या राणीच्या कार्याचे स्मरण
झाशीच्या राणी या स्वातंत्र्य लढ्यात लढत होत्या. राणी लक्ष्मीबाई ईस्ट इंडिया कंपनीशी कायदेशीर लढाई लढत होत्या त्यांचे वकील जॉन लेग होते. ते ऑस्ट्रेलियाचे होते. झाशीनं आपल्याला राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मेजर ध्यानंचंद यांच्यासारखी महत्त्वाची व्यक्तिमत्व देशाला दिली.
-
नरेंद्र मोदींनी सांगितली ऑस्ट्रेलियातील वृंदावनची गोष्ट
ऑस्ट्रेलियात पर्थ नावाचं शहर आहे. पर्थमध्ये सेक्रेड इंडियन गॅलरी आहे. ती ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगतारिणी यांच्या मालकीची आहे. त्या जगतारिणी यांनी वृंदावन येथे येऊन 13 वर्ष वास्तव्य केलं. वृदांवनशी त्यांचं नातं जुळलं होतं. जगतारिणी यांनी ऑस्ट्रेलियात वृदांवन निर्माण केलं.
-
भारतातील सर्व कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा
नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, हिमाचल प्रदेशमधील कार्यक्रम, राणी दुर्गावतीचं योगदान याचं स्मरण मन की बातच्या माध्यमातून केलं आहे. मन की बातच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतं लेखन, रांगोळी लेखन या सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात यावे. भारतातील सर्व कानाकोपऱ्यात या योजनेला आपण पुढे घेऊन जाईल, अशी आशा आहे.
-
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवामुळे देशासाठी काम करण्याची भावना वाढते: नरेंद्र मोदी
नमस्कार, आज मन की बातच्या माध्यमातून आपण जोडले जात आहोत. दोन दिवसानंतर डिसेंबर महिना येत आहे. डिसेंबर महिन्यात आपल्याला नवीन वर्षाची चाहूल लागते. डिसेंबरमध्ये नौदल दिवस आणि इतर सेना दलांच्या स्थापनांचा दिवस आहे. 16 डिसेंबर हा 1971 च्या युद्धाची आठवण म्हणून साजरा करतो. नमो अॅपच्या माध्यमातून आपण मला अनेक विषय सुचवता. मन की बातचा परिवार वाढत आहे. सीतापूरच्या एका विद्यार्थिनीनं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवामुळं फायदा झाल्याचं लिहिलं. अमृत महोत्सव आपल्याला देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणा देते. आझादी की कहाणी बच्चो की जुबानी या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी नेपाळ, मॉरिशस आणि फिजीचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. देशाची महारत्न कंपनी ओएनजीसी वेगळ्या प्रकारे स्वांतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोव्हेंबर महिन्यातील मन की बात थोड्याच वेळात सुरु होणार आहे. नरेंद्र मोदी मन की बातमधून कोणत्या विषयांवर संवाद साधणार याकडे लक्ष लागलं आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये ऑनलाईन चर्चा होणार
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दहा वाजता आरोग्य खात्याची जालना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोव्हिडं संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार आहे. यावेळी आफ्रिकेत सापडला नवीन व्हेरियंट बद्दल तसेच कोव्हीड संबंधित इतर विषयावर चर्चा होणार आहे.
-
नैसर्गिक संकटाचा सामना समर्थपणे केला: नवाब मलिक
महाराष्ट्रात नवा प्रयोग करुन शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. शिवतीर्थावर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. दोन वर्षात नैसर्गिक आपत्ती, कोरोना स्थिती सरकानं हाताळली आहे. राज्य सरकारनं काटकसरीचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळं आम्ही गाजावाजा केला नाही. उत्तर प्रदेशात काही काम केलं तर मुंबईतील वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध होते. बाते कम काम जादा हे आमच्या सरकारचं धोरण आहे.
मागच्या सरकारनं कर्जमाफीचं काम तीन वर्षात पूर्ण केलं नाही. त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही. आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज घेतलेले शेतकरी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय राहिला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं ते करता आलेलं नाही.
देशात सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात होता. इतर राज्यांसारखी परिस्थिती राज्यात नव्हती. महाराष्ट्र सरकारनं जिल्हा तालुका पातळीवर कोविड सेंटर उभारली. लोकसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली. आपण पाहिलं असेल की सर्वात जास्त रुग्ण आपल्याकडे असताना ऑक्सिजनची कमतरता आपल्याकडे निर्माण झाली नाही. भाजपशासित राज्यांमध्ये आणि दिल्लीसारख्या राज्यात ऑक्सिजन मिळत नाही म्हणून लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांचे कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं अंतिम संस्काराचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. उत्तर प्रदेशात गंगेच्या किनारी प्रेत दफन करावी लागली, असं नवाब मलिक म्हणाले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला, असल्याचं नवाब मलिक म्हणाले. कोविडमुळं ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झालाय त्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शिवभोजन केंद्राद्वारे मोफत जेवण देण्याचा निर्णय राज्य सराकरनं घेतला.
-
शेतात गांजाची लागवड ; पोलीसांनी टाकली धाड
चंद्रपूर : शेतात गांजाची लागवड ; पोलीसांनी टाकली धाड ,
शेतमालकाला अटक ,एकूण 37 झाडे शेतात उभी होती , अंदाजे दोन लाखांचा गांजा ताब्यात
चंद्रपूर राजूरा तालुक्यात येणाऱ्या लाईनगुडा येथिल शेतात गांजाची लागवड केल्याची माहीती पोलीसांना मिळाली.
पोलीसांनी शेतात धाड टाकली असता पुर्णवाढ झालेली 37 झाडे शेतात आढळून आली.पोलीसानी शेतमालक भिमराव मडावी ( वय 68 ) याला ताब्यात घेतले आहे.
अंदाजे दोन लाखांचा गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.
-
पुण्यातील शाळांची वीज जोडणी महावितरणकडून पूर्ववत
पुणे जिल्ह्यातील वीजबिल न भरल्यानं शाळांच वीज कनेक्शन तोडलेल्या शाळांची वीजजोडणी महावितरणनं केली पुर्वरत,
जिल्ह्यातील 600 हून अधिक शाळांची तोडली होती वीज,
2.28 कोटीच्या थकीत बिलापैकी 1.91 कोटी रुपये बिल वितरित करण्यात आलंय ,तर उर्वरित बिल ही भरलं जाणार आहे..
1 डिसेंबरला शाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणनं शाळांची केली वीजजोडणी !
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती…
-
सातारा जिल्ह्यात 21 व्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
सातारा जिल्ह्यात 21 व्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच…
काल एकाच दिवसात 65 कर्मचारी निलंबित…. आत्तापर्यंत एकूण 99 कर्मचारी निलंबित….
काल एकाच दिवसात 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आत्तापर्यंत एकूण 50 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त….
काल दिवसभरात शिवशाहीच्या 18 फेऱ्या
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम….
-
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उभ्या असलेल्या 16000 बसगाड्या निकामी होण्याचा धोका
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उभ्या असलेल्या 16000 बसगाड्या निकामी होण्याचा धोका..
संप सुरू असल्याने 16000 एसटी बस गाड्यांचे इंजन लॉक होण्याची भीती..
संपाचा परिणाम पाहता यांत्रिक कर्मचाऱ्यांनअभावी बॅटऱ्या, ऑईल होत आहे खराब..
सर्व प्रकारात कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड महामंडळाला बसण्याची शक्यता..
एसटी संपामुळे महामंडळाला यांत्रिक नुकसानाचा बसू शकतो मोठा फटका.
-
संसद अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीय बैठक,राष्ट्रवादीकडून शरद पवार तर शिवसेनेकडून विनायक राऊत हजर राहणार
संसद अधिवेशनाच्या आधी सर्वपक्षीय बैठक
राष्ट्रवादीकडून शरद पवार तर शिवसेनेकडून विनायक राऊत हजर राहणार
शिवसेना कृषी विधेयकासोबत लखीमपूरच्या घटनेवर ही आक्रमक, महागाई, जीएसटी थकबाकीचा प्रश्न उपस्थित करणार
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मदतीच्या निकषांमध्ये वाढ करण्याचीही मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदारही त्रिपुरामधील घटनेसंदर्भात आक्रमक होण्याची शक्यता
-
गुहागर-चिपळूण मार्गावरील बस अडवल्या प्रकरणी मनसेच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा
रत्नागिरी – गुहागर-चिपळूण मार्गावरील बस अडवल्या प्रकरणी
मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर सह सहा जणांना गुहागर पोलीसांनी घेतले ताब्यात
संपानंतर गुहागर आगारातून जी पहिली बस सुटली त्या बसला शुंगारतळी येथे मनसे ने अडवली होती
गुहागर -चिपळूण मार्गावरील घटना
-
नागपूर बस स्थानकात आजही शुकशुकाट,संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
नागपूर बस स्थानकात आजही शुकशुकाट
बस बाहेर पडल्या नाही ,
संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
नागपूर विभागात काल 200 कर्मचारी निलंबित ,
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच निलंबन
तर आधी 148 निलंबित करण्यात आले होते
एकूण 348 कर्मचाऱ्यांच आता पर्यंत झालं निलंबन
90 रोजनदारी कर्मचाऱ्यांची सेवा आधीच समाप्त करण्यात आली
-
उद्धव ठाकरेंनी मानले जनतेचे आभार, कितीही संकटं आली तरी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू काम करण्याचा निर्धार
राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार. -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे#२वर्षेमहाविकासाची pic.twitter.com/cODqQfSkTH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 28, 2021
-
नवी दिल्ली उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, आजच्या सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता
नवी दिल्ली
नवी दिल्ली उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन
अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता
अनेक महत्त्वाच्या विषयांवर होणार बैठकीत चर्चा
काँग्रेससह विरोधी पक्षांकडून अधिवेशनासाठी जोरदार तयारी
आज सकाळी 11 वाजता होणार बैठक
-
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वाढल्या
रत्नागिरी – जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वाढीस
मागील चार वर्षांत 47 गुन्हे दाखल तर 82 जण अटक
या वर्षी सर्वाधिक १९ गुन्हे दाखल करुन २९ आरोपींना अटक करण्यात आले
मात्र, या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आवश्यक समाजाने पोलिसांना सहकार्य करावे,
पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग
-
एसटीचे पुणे विभागातील 34 कर्मचारी बडतर्फ
एसटीचे पुणे विभागातील 34 कर्मचारी बडतर्फ
तर 26 कर्मचार्यांना कामावर हजर होण्यासाठी सेवा समाप्त करण्याची नोटीस
पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणनवरे यांची माहिती
-
महामार्गावरील जड व अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद; वारकरी दिंडी अपघातानंतर निर्णय
महामार्गावरील जड व अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद
वारकरी दिंडी अपघातानंतर निर्णय
सोलापूर रोड आणि कामशेत येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील जड व अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद रहाणार
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा पार पडे पर्यंत लागू असणार हा निर्णय
महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधिक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी घेतला निर्णय
जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गासाठी हा निर्णय असणार
-
पीएमपीएल आळंदीला जाण्यासाठी अधिक बसेस सोडणार
कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे होणाऱ्या यात्रेसाठी पीएमपीएमएलकडून 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान 188 जादा बसेस सोडण्यात येणार
तर, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान रात्रीदेखील बसेस धावणार
यामध्ये स्वारगेट ते आळंदी, हडपसर ते आळंदी, पुणे स्टेशन ते आळंदी, म.न.पा. भवन ते आळंदी, निगडी ते आळंदी, पिंपरी ते आळंदी, चिंचवड ते आळंदी, देहूगांव ते आळंदी, भोसरी ते आळंदी, रहाटणी ते आळंदी या मार्गांचा यामध्ये समावेश
-
नागपूरमध्ये काँग्रेस भाजपकडून मतदारांवर कडक नजर
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी घेतली जात आहे काळजी
काँग्रेस भाजप दोन्ही पक्ष मतदारांवर कडक नजर ठेऊन
भाजप ने आपल्या नगर सेवकांना पर्यटनाला पाठविण्याचा निर्णय घेतला
मात्र विमानाची तिकीट मिळत नसल्याने येत आहे अडचणी
पण पर्यटनाला नेण्याची तयारी सुरू, पर्याय शोधला जात आहे
-
आरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आरोग्य विभागाच्या वतीने गट (ड) संवर्गातील पदासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे फिर्याद
त्यावरुन पोलिसांनी 406, 420, 34 सह विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 6, कलम 8 नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
-
नाशिकमध्ये 70 एस.टी कर्मचारी कामावर रुजू
– नाशिक जिल्ह्यात अंशतः बससेवा सुरू – 70 एस.टी कर्मचारी कामावर रुजू – पोलीस बंदोबस्तात 20 बस धावल्या – 2 बसेसवर अज्ञातांकडून झाली होती दगडफेक, पोलीस प्रशासन संरक्षण देण्यास सज्ज
-
नागपूर च्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत 78 वर्षीय महिलेची हत्या
नागपूर च्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत 78 वर्षीय महिलेची हत्या
देवकी बोबडे अस महिलेचं नाव , असून त्या निवृत्त डॉक्टर आहे
अज्ञात आरोपीने त्यांना खुर्ची बांधून गळा चिरून हत्या केली
प्राथमिक दृष्ट्या लुटपाट करण्याचा उद्देश वाटत असला तरी मात्र घरातील साहित्य जस च्या तसं असल्याने
हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही
-
खेड -दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटी बसवर अज्ञाताने केली दगडफेक
रत्नागिरी – खेड -दापोली मार्गावर धावणाऱ्या एसटी बसवर अज्ञाताने केली दगडफेक
दगडफेक…करणारा गेला पळून
कोणतीही हानी नाही
दापोली पोलीस स्थानक येथे अज्ञाताचे विरोधात गुन्हा दाखल
तर दापोली आगारातील अनेक कर्मचारी अद्यापही संपात सहभागी…
-
शेतकरी नेते राकेश टिकैत मुंबईत पोहोचले
शेतकरी नेते राकेश टिकैत पोहोचले मुंबई
आज बारा वाजता आजाद मैदान मध्ये जाणार शेतकरी बरोबर मीटिंग करणार
एसटी आंदोलन आजाद मैदान मध्ये सुरू आहे एसटी कामगारांना भेटणार त्यांच्या व्यथा ऐकून घेणार आणि राज्य सरकारला पत्र लिहिणार
आज जे किसान सहित झालेले आहेत त्यांच्या कलस विसर्जन मुंबईमध्ये करणार
जोपर्यंत एम एस पी लागू होत नाही देतात तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार आहे एम एस पी लागू झाली तर देशात शेतकरी आहे त्यांचे फायदे होणार आहे
-
कडाक्याच्या थंडीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलनं सुरूच
कडाक्याच्या थंडीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलनं सुरूच… महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या दारासमोर सुरू आहे आंदोलन.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अनेक कार्यकर्ते, शेतकरी यांचा महावितरण कार्यालयासमोर मुक्काम.. शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केल्यानं आंदोलन… काल सकाळी दहा वाजल्यपासून सुरू आहे आंदोलन..
-
सोलापूर-पुणे महामार्गावर टँकर व ट्रकचा भीषण अपघात,5 ठार
सोलापूर-पुणे महामार्गावर रात्री उजनी धरणाच्या समोरील भिमानगर येथे टँकर व ट्रकचा भिषण अपघात…. समोरासमोर अपघात होऊन अपघातात पाच जण जागीच ठार, तर सहा जण गंभीर जखमी… भीमा नदी पुलावर इंदापूरच्या बाजूस रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू.. याचाच अंदाज न आल्याने अपघात झाल्याची शक्यता… जखमी वर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू..
Published On - Nov 28,2021 6:19 AM