Maharashtra News LIVE Update | पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी, ढगफुटीसदृश पाऊस !
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात हत्यासत्र सुरूच, पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत हत्या
नागपूर : नागपुरात हत्यासत्र सुरूच
पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत झाली हत्या
पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कुंभारपुरा येथे एका युवकाचा खून
मृतक कचरा उचलणारा असून त्याला आरोपीने गट्टूने मारले असल्याची माहिती
हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही
हत्येनंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल, बघणाऱ्यांची मोठी गर्दी
हत्या का झाली, आरोपी कोण, याचा तपास पोलीस करत आहेत
-
शरद पवार, संजय राऊत दिल्लीत दाखल, दोन दिवस मुक्काम
दिल्ली : शरद पवार आणि संजय राऊत आज सायंकाळी दिल्लीत दाखल
दोन्ही नेत्यांचा पुढचे 2 दिवस दिल्लीत मुक्काम असणार आहे.
-
-
पुण्याात रेल्वे स्थानकाच्या परिसरात साचलं पाणी, जोरदार पावसामुळे नागरिकांची धांदल
पुणे : रेल्वेस्टेशन परिसरात साचलं पाणी
सगळीकडे पावसामुळे पाणीच पाणी
शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर पाणीच पाणी
-
पिंपरी चिंचवडच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
पिंपरी चिंचवड-पिंपरी चिंचवडच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
-पिंपरी चिंचवडकरांना उकड्यापासून दिलासा
-अचानक सुरू झालेल्या पाऊसामुळे नागरिकांची धांदल उडाली
-
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरुवात
सोलापूर – शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरुवात
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात
सकाळपासून होता हवेत उकाडा
-
-
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून राजेंद्र कोंढरे यांची हकालपट्टी
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून राजेंद्र कोंढरे यांची हकालपट्टी
संघटनेच्या ध्येय धोरणाविरोधात गैरवर्तन केल्याच्या कारणावरून केली हकालपट्टी
संघटनेचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती
-
नागपुरात अशोका हॉटेलच्या सातव्या मजल्यावर लागली आग
नागपूर -नागपूरच्या आठ रस्ता परिसरात असलेल्या अशोका हॉटेलच्या सातव्या मजल्यावर लागली आग
वरच्या माळ्यावर असलेल्या भट्टीला आग लागल्याची प्राथमिक माहिती
मात्र अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग नियंत्रणात आली
घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी पोहचली
आग विझविण्यात यश, कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत नाही
-
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मराठीतून बोर्ड लावा, पुण्यात मनसेचे आंदोलन
पुणे : महापालिका येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मराठीतून बोर्ड लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे आंदोलन
– बॅंकेत मराठी बोर्ड नसणे योग्य नाही. त्यामुळे हिंदीतील बोर्ड काढून मराठी लावण्याबाबत बॅंक आणि शिवाजीनगर पोलिसांना यावेळी मनसेकडून निवेदन देण्यात आले
– दरम्यान लवकरच हिंदीतील बोर्ड काढून मराठीत लावण्याबाबतचे पत्र बॅंकेने मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.
-
प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याचा निषेध, सांगलीमध्ये काँग्रेसचे निदर्शन
सांगली – प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याचा निषेध
सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने घोषणा बाजी करत तीव्र निषेध आंदोलन
योगी सरकार प्रियंका गांधींना घाबरले – सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील
-
मलबारहिल प्रियदर्शनी पार्कमध्ये समुद्रात दोन चिमुरडे बेपत्ता, शोधकार्य सुरु
मुंबई – समुद्रात पोहणं 8 चिमुरड्यांना पडलं महागात
– मुंबईतील मलबारहिल प्रियदर्शनी पार्क इथे समुद्रात दोन चिमुरडे बेपत्ता
-ंसहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात य़श
– ऊन्हाचा तडाखा बसत असल्याने नागपाड्यात राहणारी ही मुलं समुद्रात पोहणेयासाठी ऊतरली होती
-पण पाण्याचा अंदाज न सापडल्याने दोन चिमुरडे वाहून गेल्याची प्राथमिक माहीती
– फायर ब्रिगेड, मलबारहिल पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
-
संगमनेरमध्ये पोलीस निरीक्षकांची बदली करुन कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची मागणी
अहमदनगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाना छापा प्रकरण
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
पोलीस निरीक्षकांची बदली करत कत्तलखाने जमीनदोस्त करण्याची मागणी
दुपारपासून प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू
मागण्या मान्य न झाल्यास उद्या संगमनेर शहर बंदची हाक
अशी ओळख पुसून टाकण्यासाठी संघटना आक्रमक
-
फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा, पुणे शहर युवासेनेची मागणी
पुणे- फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करा
– शिक्षण विभागाची विशेष हेल्पलाईन सुरू करावी
– पुणे शहर युवासेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
– राज्याचे शैक्षणिक हीत जपण्यासाठी शाळेवर तातडीने कारवाई करण्याची युवा सेनेची निवेदनाद्वारे मागणी.
-
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन
पुणे – लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन
– पुण्यातील कृषी महाविद्यालय परिसरातील वसंतराव नाईकांच्या पुतळ्याजवळ आंदोलन
– यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
डोंबळवाडी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या माणसावार बिबट्याचा हल्ला
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील डोंबळवाडी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेले बबन कुराडे यांच्यावर बिबट्याने केला हल्ला
पायाच्या ठशांववरून तरस असल्याचं वन अधिकाऱ्याचा अंदाज
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले
बिबट्याने या परिसरात दबा धरत अचानक हल्ला केल्यामुळे परिसरात खळबळ
या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
-
कल्याणध्ये मंदिराची दानपेटी हलविल्याच्या संशय, जाब विचारताच मारहाण
कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत धक्कादायक प्रकार
मंदिराची दानपेटी हलविल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीकडून शिवीगाळ
जाब विचारायला गेलेल्या 60 वर्षीय आजीबाईला व्यक्तीकडून सिमेंटच्या पत्र्याने मारहाण
जखमी आजीबाईंचे नाव गीता उतेकर
मारहाण करणाऱ्या सुरज मिरजकर याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मारहाणीचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल
-
हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत
हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पावसला सुरुवात
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत..
-
लखीमपुरा येथे झालेल्या शेतकरी हत्येच्या निषेधार्थ जळगावात मोर्चा
जळगाव – लखीमपुरा येथे झालेल्या शेतकरी हत्येच्या निषेधार्थ जळगावात मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त किसान मोर्चा तर्फे मोर्चाचे आयोजन
बोंबाबोंब आंदोलन करत केला केंद्र सरकारचा निषेध
-
खासदार भावना गवळी ईडीच्या चौकशीला गैरहजर?
खासदार भावना गवळी ईडीच्या चौकशीला गैरहजर?
भावना गवळी यांना आज ईडीच्या चौकशीला हजर राहण्या बाबत समन्स बजावण्यात आलं होतं
आज सकाळी त्यांना चौकशी ला हजर राहायचं होत
मात्र,आता तीन वाजत आले तरी त्या हजर झाल्या नाहीत.
त्या आता येणार नसल्याच समजत
मात्र,त्यांनी अधिकृत पणे येणार नसल्याच कळवलेलं नाही.
कायदेशीर प्रक्रियेत त्यांना वकीला मार्फत,नातेवाईक यांच्या ईडीच्या अधिकाऱ्यांना कळलेलं नाही.
-
असादुद्दीन ओवेसी लखिमपुरला जाणार
उत्तर प्रदेश लखिमपुर दुर्घटना
असादुद्दीन ओवेसी लखिमपुरला जाणार
मोदी सरकारने तिन्ही शेतकरी विधेयक रद्द करावीत
ओवेसी यांची मागणी
शेतकऱ्यांची हत्या हा सर्वात मोठा गुन्हा असादुद्दीन ओवेसी
उद्या ओवेसी हैदराबाद मधून लखीमपुर कडे जाण्याची शक्यता
-
लखिमपुर – मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची मदत
उत्तर प्रदेश
लखिमपुर – चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची मदत
कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाणार
जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांची मदत
हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीशामार्फत घटनेची चौकशी केली जाणार
उत्तर प्रदेश एडीजी प्रशांत कुमार यांची माहिती
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यार्थी-शिक्षकांसोबत संवाद साधत आहे
दीड वर्षांनंतर आज पहिल्यांदा शाळेची घंटा वाजली आहे
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यार्थी-शिक्षकांसोबत संवाद साधत आहे
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद सुरुये
मुख्यमंत्र्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना त्यांच्या शाळेचे दिवस आठवले
आपण एक कुटुंब आहोत
सध्या कठीण काळ सुरुये , तेव्हा विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे
वर्गाची दारं खिडक्या उघडी ठेवा
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्रंबक नगरीत
नाशिक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्रंबक नगरीत
पत्नी,मुलगा आणी सुनेसह करताय धार्मिक विधी
अत्यंत कडेकोट बंदोबस्त
हा गडकरी कुटुंबाचा खाजगी दौरा
कोणालाही प्रवेश नाही
एका स्नेह्याच्या घरी सुरू आहे धार्मिक विधी
आद्य ज्योतिर्लिंग महादेव मंदिर बंद असल्यानं, दर्शनाची शक्यता कमी
-
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः चालवली रुग्णवाहिका
जालना आरोग्य विभागाच्या वतीने आज जालना जिल्हा परिषद मध्ये 21 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर टोपे यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसुन, रुग्णवाहिका काही अंतर चालवत नेली
राजेश टोपे यांनी उपस्थितांना कदाचित हेच दाखवुन दिले असावे की, वेळ पडली तर आरोग्य मंत्री पण रुग्णवाहिका चालवू शकतात
-
12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा, केंद्राकडून कोणताही निर्णय नाही – अजित पवार
अजित पवार
12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा
मात्र अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही
केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार-अजित पवार
मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा
मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही.
-
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
अमरावती :
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
सकाळी 8 वाजल्या पासून या मतदानाला जिल्ह्यात सुरुवात
सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी अटीतटीची निवडणूक होणार आहे
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच वेगळे वेगळे पॅनल असल्याने बच्चू कडू व यशोमती ठाकूर या दोन महाविकास आघाडी मधील मंत्र्याचे भवितव्य पणाला लागले आहे
-
नवरात्र उत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील महाद्वार रोड वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता
कोल्हापूर
नवरात्र उत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील महाद्वार रोड वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता
प्रशासनाच्या संभाव्य निर्णयाला महाद्वार रोडवरील व्यापार्यांचा विरोध
उत्सव काळात रस्ता बंद राहिल्यास व्यापार्यावर मोठा परिणाम होण्याची व्यवसायिकांना भीती
महाद्वार रोड वरील व्यवसायिक निर्णयाचा एकत्रित विरोध करणार
-
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 5000 निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) संपाचा आजचा चौथा दिवस
– मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 5000 निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) संपाचा आजचा चौथा दिवस आहे
– अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने निवासी डाॅक्टर संतप्त
– राज्य सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आजपासून रुग्णालयातील कोविड आणि आयसीयू वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय
– ओपीडी, आणीबाणीसह सर्व सेवा आजपासून बंद राहतील
– काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील असं मार्डकरुन परिपत्रक जारी
-
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु
पुणे
-पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु
-यंदा या भागात पावसाने हुलकावणी दिल्याने लोणी धामणी,शिरदाळे, खडकवाडी,वडगावपीर,मांदळवाडी, पहाडदरा या गावात ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय
-शेतकऱ्यांना सध्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय
-गेली अनेक वर्षापासून हा भाग दुष्काळी असल्याने या भागात तातडीने म्हाळसाकांत पाणीयोजना सुरू करावी यासाठी आठ गावांनी एकत्र येत आढावा बैठक घेतली,लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने तातडीने आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी सरकार ला केली
-
पुणे – शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठरावीक अंतरासाठी प्रवाशांना इलेक्ट्रिक मोटारद्वारे (ई-कॅब) सेवा देण्याचे पीएमपीएलएमचे नियोजन
पुणे
पुणे – शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ठरावीक अंतरासाठी प्रवाशांना इलेक्ट्रिक मोटारद्वारे (ई-कॅब) सेवा देण्याचे पीएमपीएलएमचे नियोजन
त्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० ते २०० मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता
कंपन्यांच्या कॅब आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा पीएमपीचा दावा
सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न
विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असणार
तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त
-
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात आजपासून लॉकडाऊन
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात आजपासून लॉकडाऊन
मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना राहणार बंद
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाची स्थानिक प्रशासनाकडून अंमलबजावणी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा समावेश
संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश
आज 4 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत कडक लॉकडाऊन
-
कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास कर्मचाऱ्यांना सोलापूर पालिका प्रशासनाने दिला अल्टिमेटम
सोलापूर –
कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने दिला अल्टिमेटम
अन्यथा वेतनाला लागणार ब्रेक
पालिका प्रशासन नागरिकांच्या लसीकरणासाठी करत आहे त्यांची जनजागरण
मात्र पालिकेच्या आस्थापनेवरील आणि कर्मचाऱ्यांनी लस् न घेतल्याचं आले समोर
-
पीकविमा कंपन्यांकडून कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
नांदेड :
पीकविमा कंपन्यांकडून कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
शेकडो शेतकऱ्यांनी केल्या आमदारांकडे तक्रारी
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदार चांगलेच भडकले
पीकविमा कंपन्यांचा सोक्षमोक्ष लावण्याचे आमदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन
आमदार माधवराव पाटील यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर झालाय प्रचंड व्हायरल
पीकविमा कंपन्यांच्या या चलाखीमुळे हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांत संताप
-
प्रियांका गांधी नजरकैदेत, लखीमपुरला जात असताना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले
सितापूर – प्रियांका गांधी नजरकैदेत
लखीमपुरला जात असताना उत्तर प्रदेश सरकारने वाटेतच रोखले
अखिलेश यादव आणि इतर नेतेही नजरकैदेत
लखीमपूर मध्ये 144 कलम लागू करण्यात आलंय
संपूर्ण उत्तरप्रदेशात प्रचंड तणाव
पंजाब राज्यातही हाय अलर्ट
-
नागपूर जिल्हापरिषत पोटनिवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
– नागपूर जिल्हापरिषत पोटनिवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
– जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी उद्या मतदान
– जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ७९ उमेदवार रिंगणात
– पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात
– जिल्ह्यात सहा लाख १६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
– उद्या सकाळी ७:३० ते ५:३० पर्यंत मतदान
-
श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांसाठीचा नियम आज मंदिर समिती ठरवणार
सोलापूर – श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भक्तांसाठीचा नियम आज मंदिर समिती ठरवणार
दोन डोस घेतलेलाच मंदिरात प्रवेश देण्याचे शासनाचे निर्देश
मात्र प्रत्येक भाविकाची तपासणी कशी करायची याचा देवस्थान व्यवस्थापनासमोर पेच
7 ऑक्टोंबर पासून सर्व मंदिर करण्यात येणार आहेत खुली
एकाच दिवशी जास्तीत जास्त पाचशे भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा प्रशासनाच्या सूचना
-
उजनी धरण आता 96.37 टक्क्यांवर
सोलापुर – उजनी धरण आता 96.37 टक्क्यांवर
48 तासात धरणात फक्त 1.57 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी
दौंड येथून 4 होणार 411 क्यूसेसने तर बंडगार्डन येथून फक्त 2 हजार 916 क्यूसेसने विसर्ग सुरू
-
सोलापूर जिल्ह्यातील 50 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस
सोलापूर जिल्ह्यातील 50 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाला गेले नऊ महिने
जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी लसीकरणाला झाली होती सुरुवात
ग्रामीण मधील 13 लाख 57 हजार 626 तर शहरातील चार लाख 17 हजार 155 जणांनी घेतला पहिला डोस
एकूण सतरा लाख 74 हजार 781 जाने घेतला पहिला डोस
50% लाभार्थ्यांचे उद्दिष्ट झाले पार
-
पुणे महापालिकेतील एका मुकादमासह झाडुवाल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना लाच रंगेहात पकडले
पुणे
महापालिकेतील एका मुकादमासह झाडुवाल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना लाच रंगेहात पकडले
रवी लोंढे व हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा
दोघांना न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी
-
पुणे जिल्ह्यात आज शाळेची घंटा वाजणार
पुणे
पुणे जिल्ह्यात आज शाळेची घंटा वाजणार
कोरोना नियमांचे पालन करत आठवी ते बारावी पर्यतचे वर्ग होणार सुरु
राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात येणार विद्यार्थ्यांचे स्वागत
-
नागपूर जिल्ह्यात दीड वर्षानंतर आज वाजणार शाळेची पहिली घंटा
– नागपूर जिल्ह्यात दीड वर्षानंतर आज वाजणार शाळेची पहिली घंटा
– नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत ८ ते १२ विच्या २२५ शाळा आज सुरु होणार
– ग्रामीण भागात ५ ते १२ वी च्या ४०१ शाळा सुरु होणार
– नागपूर मनपा आयुक्तांनी शाळांना परवानगी देताना जारी केल्या मार्गदर्शक सुचना
– शाळांसोबत सामाजिक न्याय विभागाते वसतीगृह आज सुरु होणार
– प्रत्येक शाळेला कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य
-
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका, सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ
पुणे
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ
पुण्यात सीएनजी 59 रुपये 50 पैसे
तर पेट्रोल 107 रुपये 95 पैसे लिटर पॉवर पेट्रोल 111 रुपये 63 रुपये अन डिझेल 96 रुपये 50 रुपये लिटर
-
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अखिलेश यादव यांची मागणी
उत्तर प्रदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची मागणी
जखमी शेतकऱ्यांवर तातडीने उपचार व्हावेत यादव यांची उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी
-
पणजी गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी, कसीनो बाहेर पर्यटकांच्या लांबच लांब रांगा
पणजी गोव्यात पर्यटकांची तुफान गर्दी
कसीनो बाहेर पर्यटकांच्या लांबच लांब रांगा
विकेंड मुळे गोव्यात पर्यटकांची मांदियाळी
सगळ्या कशिनो सेंटर बाहेर पर्यटकांची तुफान गर्दी
तब्बल सहा महिन्यानंतर कसीनो सुरू झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी
Published On - Oct 04,2021 6:24 AM