Maharashtra News LIVE Update | कल्याणच्या झुंजारराव मार्केटमध्ये नाल्याच्या बाजूला असलेली पाच दुकाने खचली
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
कल्याणच्या झुंजारराव मार्केटमध्ये नाल्याच्या बाजूला असलेली पाच दुकाने खचली
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार
झुंजारराव मार्केटमधील घटना
नाल्याच्या बाजूला असलेली पाच दुकाने खचली
दुकानं सुरू असताना घडला प्रकार
संध्याकाळच्या वेळेस दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती
जीवित हानीत टळली, व्यापाऱ्यांचे नुकसान
-
अमेरिकन पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
अमेरिकन पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना २०२१ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी या दोन्ही पत्रकारांना नोबेल पारितोषिक दिले जात असल्याचे नोबेल समितीकडून स्पष्ट.
-
-
गुजरातच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू, कोरोनाच्या संकटामुळे सरकारचा निर्णय
गुजरात राज्यातील शहरांत नाईट कर्फ्यू लागू
कोरोनाच्या संकटामुळे सरकारचा निर्णय
अहमदाबाद, बडोदा, सुरतमध्ये नाईट कर्फ्यू
राजकोट, गांधीनगर, भावनगरमध्ये कर्फ्यू लागू
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर ट्रेंड
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर ट्रेंड – #ISupportAjitdada या ट्रेंडअंतर्गत सोशल मिडीयावर पोस्ट.. – खासदार सुप्रिया सुळेंचाही ट्रेंडमध्ये सहभाग.. – व्हाटसअप स्टेटस ठेवत ट्रेंडमध्ये घेतला सहभाग.. – सोशल मिडीयातून नेटकऱ्यांचा अजितदादांना पाठींबा; तर भाजपवर संताप
-
अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 12 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ईडीने जारी केलेले समन्स रद्द करण्यासाठी देशमुखांनी याचिका दाखल केली आहे.
-
-
मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा अधिसभा तहकूब, युवा सेनेच्या आंदोलनामुळे पंधरा मिनिटे अधिसभा तहकूब
मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा अधिसभा तहकूब
युवा सेनेच्या आंदोलनामुळे पंधरा मिनिटे अधिसभा तहकूब
युवा सेना अधिसभा सदस्यांनी केलं ठिय्या आंदोलन
अधिसभा सदस्यांनी निषेध नोंदवण्यासाठी डोक्यावर काळी टोपी आणि दंडावर लावल्या होत्या काळ्या फिती
मुंबई विद्यापीठात मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी जागेचा प्रस्ताव राज्यपाल आणि कुलगुरूंनी फेटाळला होता.
आज अधिसभा बैठकीत त्याचे पडसाद उमटले
युवा सेनेने याबाबत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करत असता विद्यापीठाकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे सिनेट सदस्यांनी मुंबई सिनेट बैठकी मध्ये व्हील मध्ये उतरुन तीव्र विरोध केला.
त्यामुळे अधिसभा पंधरा मिनिटे तहकूब करावी लागली
त्यानंतर सूत्रं हलली आणि कुलगुरूंनी राजभवनाशी संपर्क साधल्याची माहिती
त्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयास परवानगी दिली असून सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल, असे युवा सेना अधिसभा सदस्यांना बैठकीत सांगितले.
त्यानंतर युवा सेनेनं आपलं आंदोलन मागे घेतले
-
भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार, दोन्ही विरोधी पक्षनेते कार्यक्रमाला जाणार नाहीत
भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार दोन्ही विरोधी पक्षनेते कार्यक्रमाला जाणार नाहीत दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना सरकारकडून निमंत्रणच नाही उद्याच विमानतळाचं उदघाटन, त्याआधी नाराजीनाट्य
-
आनंदराव अडसुळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाही, सुनावणी 26 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. अडसुळांच्या याचिकेवरील सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली आहे. कोर्टाने 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची अडसुळांची याचिका होती. पण कोर्टाने याचिकेवरील सुनावणी 26 ऑ
-
कल्याण डोंबिवलीसह मीरा भाईंदरमध्ये पुन्हा पाऊस
कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर परिसरात आज संध्याकाळी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय
-
अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपशी संबंध जोडणे हास्यास्पद : चंद्रकांत पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडणे हास्यास्पद आहे. लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे मोठाच विनोद आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
-
शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, राजकारणात काहीही होऊ शकतं : रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या भाषणातील मुद्दे :
राजकारणात काहीही होवू शकतं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तसं शिवसेना पुन्हा भाजपा सोबत येईल शिवसेनेला आपलं नुकसान करायचं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही अनेकदा मी भूमिका मांडलीय अडीच-अडीच वर्षाच्या मुद्यावर एकत्र येवू शकतात शिवसैनिकांचीही हिच इच्छा आहे शिवसैनिकांनी आता दबाव आणावा बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी अजूनही विचार करावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे शिर्डीत वक्तव्य
महाराष्ट्रातही आजवर अनेक घटना घडल्या आहेत लखमीपुरचा विषय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली जातेय लखमीपुरच्या घटनेचं आम्हाला दुखः आहे दोषींवर कारवाई झाली पाहीजे हिच आमची मागणी लखमीपुरच्या घटनेवरून मोदींना बदनाम करण्याचा डाव आम्ही हा डाव उघळून लावू रामदास आठवले यांचा इशारा लखमीपुरच्या घटनेला जालीयनवाला बागेशी तुलना करणं चुकीचं शरद पवारांबद्दल आम्हाला आदरच महाराष्ट्र बंद मागे घ्यावा रामदास आठवले यांचे आवाहन
तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत मोदी सरकार कुणावरही अन्याय न करणारं ज्या ठिकाणी अनियमीतता आहे तीथे ईडीची चौकशी होते मुद्दाम कुणाला त्रास देण्याची भूमिका नाही ज्यांना धंदा पाणी करायचाय त्यांनी आपला हिशोब चोख ठेवला पाहीजे अजित पवार यांच्या चौकशीवर रामदास आठवले यांचे वक्तव्य
-
नाशिकमध्ये दिवसभरात 78 नवे कोरानाबाधित, दोघांचा मृत्यू
नाशिक :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 132
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 78
नाशिक मनपा- 31 नाशिक ग्रामीण- 44 मालेगाव मनपा- 01 जिल्हा बाह्य- 02
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8646
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 02 नाशिक मनपा- 02 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 00 जिल्हा बाह्य- 00
-
समशेरपूरच्या आयान मल्टीट्रेड एल एल पी कारख्यान्यावर आयकर विभागाची धाड
समशेरपुरच्या आयान मल्टीट्रेड एल एल पी कारख्यान्यावर आयकर विभागाची 36 तासापासून चौकशी सुरूच….
चौकशीत काय तथ्य समोर आले अद्याप गुलदस्त्यात …..
कारखाना व्यवस्थापनाचे ही मौन…
कारवाईत अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती….
बारा ते पंधरा लोकांचे पथक असल्याची सूत्रांची माहिती…
उद्या देखील कारवाई सुरू राहणार अशी शक्यता….
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या ‘मराठी कट्टा’ संकल्पनेचा शुभारंभ
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या ‘मराठी कट्टा’ संकल्पनेचा शुभारंभ
गिरवावातून होणार सुरुवात
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ
मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्याची पक्षाची व्युहरचना
-
एअर इंडियाची मालकी अखेर टाटाकडे, केंद्र सरकारची माहिती
गेल्या काही दिवसांपासून भारत सरकारच्या एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु होती. केंद्र सरकारनं आज पत्रकार परिषद घेत एअर इंडियाची बोली टाटा सन्सनं जिंकल्याची माहिती दिली. त्यामुळं एअर इंडियावर पुन्हा एकदा टाटा ग्रुपची मोहोर उमटली आहे. 1932 मध्ये एअर इंडियाची स्थापना टाटा ग्रुपनं केली होती. स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये एअर इंडियाचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं. महाराजा अखेर परतला, सर्वात मोठी बोली अखेर टाटा ने जिंकली. 68 वर्षांनी मालकी टाटा कडे देण्यात आली आहे. 1932 ला JRD टाटा यांनी कंपनी सुरू केली होती. 1946 नाव बदललं गेलं आणि एअर इंडिया झालं होतं. 18 हजार कोटींची बोली टाटानं लावली. येत्या डिसेंबर पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती फार बिकट होती: नारायण राणे
मंत्री झाल्यानंतर प्रथमचं भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत आहे. पहिल्या पत्रकार परिषदेचा विषय महत्त्वाचा आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे. 1990 साली सिंधुदुर्गमधून मालवण कणकवलीतून आमदार झालो. पहिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम केलं पाहिजे म्हणून काम केलं पाहिजे ही भूमिका होती. सिंधुदुर्ग जन्म जिल्हा असल्यानं आमदार झाल्यानं आनंद झाला. विकास कसा करावा, काय झालं नाही याची माहिती मी घेतली. फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात पिण्याचं पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, दयनीय अवस्था होती. शाळा होती , विद्यार्थी होती. शिक्षक नव्हते, अशी स्थिती होती. भात सोडली तर इतर पीक नव्हती.
-
दादरा नगर हवेलीमध्ये 30 ऑक्टोबर रोजी होणार पोट निवडणूक, सेनेचीही उडी
केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हवेली मध्ये 30 ऑक्टोबर रोजी होणार पोट निवडणूक ,
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे शेवटचा दिवस
दिवंगत खा.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी मुलगा अभिनव डेलकर, शिवसेना आ. श्रीनिवास वणगा व स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत केला होता प्रवेश .
दादर नगर हवेली येथे मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल… असे कालच केले होते दिवंगत खा.डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यानी वक्तव्य.
-
उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात बंद कमरा चर्चा, साताऱ्याच्या राजकारणात खळबळ
सातारा: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात बंद कमरा चर्चा….
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोघात चर्चा…
साताऱ्याच्या राजकारणात खळबळ
सातारा शासकीय विश्राम गृहात चर्चा….
-
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल: धनंजय मुंडे
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल
झालेल्या नुकसानीचे रूप दररोज बदलत आहे
गेल्या 10 दिवसात पावसाने रोज नुकसान होत असून रूप बदलतंय
एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित नाही
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली जाईल
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात
पुणे :
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात,
– बैठकीला खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि जिल्हाधिकारी उपस्थित
– कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर अजितदादा बैठकीला पोहचलेत
-
समशेरपूर येथील आयान मल्ट्रीट्रेंड एल. एल. पी. कारखान्यावर आयकर विभागाची कारवाई अजून सुरुच
नंदुरबार –
समशेरपूर येथील आयान मल्ट्रीट्रेंड एल. एल. पी. कारखान्यावर आयकर विभागाची कारवाई अजून सुरुच
सायंकाळपर्यंत माहिती समोर येणार
विवीध ठिकाणची आयकर विभागाची पथके चौकशी कारवाई सहभागी
ही चौकशी किती दिवस चालणार हे अनिश्चित
-
मुंबई विमानतळावर आज सकाळी प्रवाश्यांची मोठी गर्दी, अनेक फ्लाईट्स उशिराने
मुंबई विमानतळावर आज सकाळी प्रवाश्यांची मोठी गर्दी, अनेक फ्लाईट्स उशिराने
या गर्दीमुळे काही प्रवाशांच्या फ्लाईट्स मिस झाल्याची माहिती
प्रवाश्यांना झालेल्या त्रास आणि गैरसोयीबाबत विमानतळ प्रशासनाकडून खेद व्यक्त
-
पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार?
पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महापालिका निवडणूक आघाडी संदर्भात पार पडली बेठक,
शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीवर सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती,
शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागांची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती,
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महापालिका निवडणूक लढणार याची चर्चा सकारात्मक,
पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अखेर ठरलं सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
-
नागपुरात होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा
नागपूर –
नागपुरात होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करत होणार दसरा मेळावा
200 लोकांच्या उपस्थिती होणार मेळावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने दसरा मेळाव्याला मोठं महत्व आहे
सर संघ चालक मोहन भागवत करतात मार्गदर्शन
मागील वर्षी ऑनलाइन पद्धतीने झाला होता दसरा मेळावा
-
परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईच दर्शन
कोल्हापूर
परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईच दर्शन
सपत्नीक घेतल अंबाबाईच दर्शन
मंत्री परब यांचा खाजगी दौरा
माध्यमांशी बोलायला दिला नकार
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुसरी बहीण नीता पाटील यांच्याही निवासस्थानी आयकरची कारवाई आजही सुरू
– उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुसरी बहीण नीता पाटील यांच्याही निवासस्थानी आयकरची कारवाई आजही सुरू,
– पुण्यातील मोदी बागेत नीता पाटील यांचे निवासस्थान,
– काल सकाळपासून आयकरचे अधिकारी नीता पाटील यांच्या घरी ठाण मांडून आहेत,
– कारवाईचे कारण अद्याप अस्पष्ट
-
अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील मुक्ता पब्लिकेशन हाऊस तसेच फार्महाऊसवर आजही आयकर विभाग पुन्हा छापा
– अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील मुक्ता पब्लिकेशन हाऊस तसेच फार्महाऊसवर आजही आयकर विभाग पुन्हा छापा
– आयकर विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी काल केली होती कागदपत्रांची तपासणी
– पुईखडी येथील विजया पाटील यांच्या घरातील कागदपत्रांची अधिकाऱयांनी तपासणी केली
– अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांवरही आयकर विभागाकडून आज छापेमारीला सुरुवात
– आयटीच्या सुत्रांची माहीती
-
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकरी महिलेची आत्महत्या
औरंगाबाद –
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकरी महिलेची आत्महत्या..
पती ,मुलांवर कर्जाचा डोंगर. मुलीच्या लग्नाची चिंता आणि अतिवृष्टीने केलेल्या नुकसानीच्या तणावात आत्महत्या..
ताराबाई कल्याण शेळके असे गंगापुर तालुक्यातील शेतकरी महिलेचे नाव..
विहिरीत उडी घेत संपवले जीवन,अतिवृष्टीमुळे आणखी एक बळी..
सगळ्यांचे कल्याण होवो म्हणत लेकरांचे आयुष्य चांगलं करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या वाटे मात्र आत्महत्या..
-
नाशिक जिल्हा नियोजन समितीची आज बैठक
नाशिक –
जिल्हा नियोजन समितीची आज बैठक..
बैठकीला पालकमंत्री छगन भुजबळ राहणार उपस्थित..
भुजबलांसोबत आमदार सुहास कांदे देखील बैठकीला राहणार उपस्थित..
भुजबळ कांदे वादाच्या पार्शवभूमीवर आजच्या बैठकीकडे लक्ष..
-
औरंगाबादेत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा झाले स्वस्त
औरंगाबाद –
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा झाले स्वस्त
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 30 रुपयांवरून आले 10 रुपयांवर
कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी वाढवले होते प्लॅटफॉर्म तिकीट
तब्बल दीड वर्ष प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर होता 30 रुपये
कोरोना संकट ओसरताच प्लॅटफॉर्म तिकीट दर केला 10 रुपये
-
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे ?
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे ?
बँकेच्या मतदार यादीत नाव समाविष्ट न केल्याने काही विकास संस्थांची उच्च न्यायालयात धाव
गगनबावडा पन्हाळा हातकणंगले तालुक्यातील विकास संस्थांचा समावेश
विकास संस्थांच्या याचिकेवर आज होणार सुनावणी
न्यायालयीन प्रक्रियेमूळे जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता
-
औरंगाबाद जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांची वाढ
तर एका कोरोना रुग्णाचा झाला मृत्यू
सध्या रुग्णालयात 160 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत 3 हजार 582 कोरोना रुग्णांचा मृत्यू
तर कोरोना बाधितांचा आकडा पोचला 1 लाख 48 हजार 820 वर
-
स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात लसीकरणाला गती देणार
नागपूर –
स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात लसीकरणाला गती देणार
जिल्ह्यात 8 ते 14ऑक्टोबर ‘कवचकुंडल’ लसीकरण मोहिम
जी ओ-एनजीओ प्लॅटफार्मद्वारे ग्रामस्तरावर लसीकरणास चालना
शासनाच्या हाताला बळ देण्यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने तालुका व ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण करा
व लसीकरणाचे उद्दिष्टय पूर्ण करण्यास गती द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली,
जिल्ह्यात पहिल्या डोसचे 74 टक्के लसीकरण झाले आहे.
परंतु त्यामानाने दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी आहे.
त्यासाठी स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने जनजागृती करुन लसीकरणाच्या मोहिमेस गती दिली जाणार
-
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 559 कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 559 कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान..
आधीच्या आकड्यांत 202 कोटींनी नुकसान वाढले असून पंचनामे सुरूच..
महापुराने 559 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती..
4 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान,1860 घरांचे नुकसान,740 किलोमीटर चा रस्ता झाला खराब..
औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस पडत असून आणखी नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता..
-
प्रदेश काँग्रेसची फेररचना, नागपुरातील चार जणांची लागली वर्णी
नागपूर –
प्रदेश काँग्रेसची फेररचना, नागपुरातील चार जणांची लागली वर्णी
नागपुरातील अतुल कोटेचा , मुजीब पठाण , महासचिव पदी
तर संजय दुबे आणि तानाजी वणवे यांची सरचिटणीस पदी लागली वर्णी
संजय दुबे आणि तानाजी वणवे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खास समर्थक
तानाजी वणवे हे महापालिकेत विरोध पक्ष नेता म्हणून सांभाळत आहे जबाबदारी
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस ची जोरदार तयारी
-
सणासुदीच्या तोंडावर पुणेकरांना घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा पुन्हा एकदा झटका
पुणे :
सणासुदीच्या तोंडावर पुणेकरांना, घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा पुन्हा एकदा झटका
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात काल प्रति सिलिंडर २५ रुपयांची वाढ
यामुळे पुणे शहरातील गॅस सिलिंडरसाठी आता प्रति सिलिंडर ८८८ रुपये मोजावे लागणार
गेल्या चार महिन्यातील ही चौथी दरवाढ
गेल्या तीन महिन्यात सतत होणाऱ्या दरवाढीने सुमारे १०० रुपयांनी महागला
-
10 दिवसाच्या वाघाच्या बछड्याला निष्ठुरपणे ठार मारणाऱ्या दोघांना केली वन विभागाने अटक
नागपूर –
10 दिवसाच्या वाघाच्या बछड्याला निष्ठुरपणे ठार मारणाऱ्या दोघांना केली वन विभागाने अटक
बुट्टीबोरी वनविभाग पथकाने केली कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यातील चीचबोडी जंगलात घडली होती घटना
लोमेश दाबले, कालिदास रायपूर असे आरोपीचे नाव
गेल्या महिना भर पासून पथक करत आहे तपास
आत पर्यंत वाघाचे अवयव तस्करी प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली
-
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील जवळपास ३ हजार गाड्या भंगारात निघणार
पुणे
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील जवळपास ३ हजार गाड्या भंगारात निघणार
केंद्र सरकारच्या नवीन स्क्रॅप पॉलिसीनुसार 8 लाख किलोमीटर प्रवास झालेल्या गाड्या भंगारात निघणार
यामध्ये पुणे विभागातील 16 गाड्यांचा समावेश
-
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत
रत्नागिरी –
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी निम्मे कोकण झालं होतं अंधारमय
दक्षिण रत्नागिरीतील वीजपुरवठा मध्यरात्रीनंतर सुरळीत
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा पहाटे नंतर सुरळीत
मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात मुळे विद्युत पुरवठा झाला होता खंडित
दक्षिण रत्नागिरीच्या पट्ट्यात वीज झाली होती गायब
सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील वीज गायब
दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत चालू झाल्याचा महावितरणचा दावा
-
3 च्या प्रभाग नुसार नागपूर महापालिका निवडणूक होणार असल्याने प्रशासन लागलं कामाला
नागपूर –
3 च्या प्रभाग नुसार महापालिका निवडणूक होणार असल्याने प्रशासन लागलं कामाला
महिना भरात केली जाणार प्रभाग पुनर्रचना
प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी समिती झाली गठीत
प्रत्येक प्रभागात 50 हजार च्या जवळ मतदार असणार
-
मुंबई पुणे सोलापूर हैदराबाद हाच बुलेट ट्रेनचा अंतिम मार्ग
सोलापूर –
मुंबई पुणे सोलापूर हैदराबाद हाच बुलेट ट्रेनचा अंतिम मार्ग
मार्गात कोणताही बदल नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिली आहे मंजुरी
मुंबई पुणे सोलापूर मार्गे कर्नाटकातून आंध्र प्रदेशातील हैदराबाद पर्यंत जोडण्यात येणार आहे मार्ग
या मार्गाचा सामाजिक सर्वे देखील झाला आहे
काम अंतिम टप्प्यात आले असतानाच हा मार्ग मराठवाड्यातून घेऊन जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून मार्ग मराठवाड्यातून घेऊन जाण्याची केली होती विनंती
मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना लिहिलेले पत्र झाले होते व्हायरल
मात्र मार्गात कोणताही बदल नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
-
मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले आजारी असल्याने अद्यापही तपास पूर्ण नाही
सोलापूर –
मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले आजारी असल्याने अद्यापही तपास पूर्ण नाही
सामाजिक आणि महिलाविषयक गुन्हे दाखल असल्याने मनोहर मामा भोसले होता पोलिसांच्या ताब्यात
मनोहर भोसले आजारी पडल्याने दवाखान्यात दाखल केल्याने गुन्ह्याचा तपास अद्यापही पूर्ण झाला नाही
दाखल गुन्ह्याचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही
तपास पूर्ण व्हावा यासाठी तपास अधिकारी सूर्यकांत कोकणे यांनी बार्शी न्यायालयात दाखल केला रिविजन अर्ज
वाढीव पोलीस कोठडीसाठी दाखल केला रिविजन अर्ज
-
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्रात बार्शी तालुका आघाडीवर
सोलापूर –
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्रात बार्शी तालुका आघाडीवर
बार्शी तालुक्यातील 98 टक्के नागरिकांनी घेतला डोस
तालुक्यातील दोन लाख 88 हजार 463 पात्र लाभार्थ्यांपैकी
एक लाख 98 हजार 394 जणांनी पहिला तर 55 हजार 342 जणांनी दुसरा डोस घेतला
15 ऑक्टोबरपर्यंत तालुका लसीकरण नियुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर
सोलापूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर
सकाळी 11 वाजता घेणार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
शहर आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही राहणार उपस्थित
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सोलापूर दौरा
Published On - Oct 08,2021 6:39 AM