Maharashtra News LIVE Update | यूपीतील लखीमपूर हिंसा प्रकरण, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अखेर बेड्या

| Updated on: Oct 09, 2021 | 11:31 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | यूपीतील लखीमपूर हिंसा प्रकरण, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अखेर बेड्या
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Oct 2021 11:12 PM (IST)

    यूपीतील लखीमपूर हिंसा प्रकरण, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

    यूपीतील लखीमपूर हिंसा प्रकरण, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक,  पोलिसांनी आशिष मिश्राला बेड्या ठोकल्या, 12 तासांच्या चौकशीनंतर बेड्या, खून, गुन्हेगारी कट, बेपर्वा ड्रायव्हिंगची कमलाखाली अटक केल्याची सूत्रांची माहिती

  • 09 Oct 2021 10:37 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार तासभर ट्राफिकमध्ये अडकले

    – उपमुख्यमंत्री अजित पवार तासभर ट्राफिकमध्ये अडकले,

    – पुणे विमानतळ ते विश्रांतवाडी प्रचंड वाहतूक कोंडी,

    – राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडली

    – पुण्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी,

    – लोहगाव, भोसले नगर परिसरात वाहतूक कोंडी

    – आमदार सुनील टिंगरेनी रस्त्यावर उतरून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला

  • 09 Oct 2021 10:35 PM (IST)

    जळगाव महापालिकेत भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना धक्का, तीन नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी

    जळगाव –

    जळगाव महापालिकेत भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना धक्का

    तीन नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी

    उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागातील तीन नगरसेवक

    आगामी स्थायी समिती सभापती निवडणूकीच्या आधी खळबळ

  • 09 Oct 2021 10:34 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे अहमदनगरच्या शरतील अनेक भागात झाडे कोसळली

    अहमदनगर :

    मुसळधार पावसामुळे शरतील अनेक भागात झाडे कोसळली

    तर तेलीखुंट येथील जुन्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका घरावर गुलमोहर झाड कोसळले

    या घरात अपंग आणि वयोवृद्ध तसेच लहान मुले असून त्यांना बाहेर काढण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश

    तर घरावरील फांद्या काढण्याचे काम सुरू

    शरतील सिव्हिल हॉस्पिटल जवळ हायवेवर, तारकपूर ते रामवाडी रस्ता तसेच जुने सिव्हिल हॉस्पिटल आवारात तेलीखुंट जवळ तर मनपा कार्यालया जवळील मागच्या बाजूला झाडे कोसळली

  • 09 Oct 2021 09:05 PM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 5000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

    इंदापूर :

    उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 5000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

    आज नऊ वाजेपासून (काही वेळात) भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग उजनी धरणाच्या चार दरवाजातून 5000 क्युसेक्सने पाणी विसर्ग उजनी धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 09 Oct 2021 07:46 PM (IST)

    एनसीबीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाला सोडलं : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. एनसीबीला आपण पाठिंबा दिला पाहिजे. एनसीबीने जे क्लीन होते त्यांना सोडलं होतं.  ज्यांच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत. ड्रग्ज आपल्या मुलांना बिघडवत आहे. ज्या लोकांना सोडण्यात आलं त्यामध्ये एनसीपीच्या एका बड्या नेत्याचा समावेश होता. पण ते क्लीन होते त्यामुळे त्यांना सोडण्यात आलं. नवाब मलिक यांचं दुखणं वेगळं आहे.

    1050 कोटींच्या दलालीचे पुरावे आयटीकडे आहे

    पवार कुटुंबावर छापा टाकलाय असं बोलणं हे चुकीचं आहे. चार-पाच साखर कारखान्यात काही व्यवहार झाले आहेत ज्याची माहिती आयटीला मिळाली आहे. त्याच कारखान्यांच्या मालकांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला जातोय

  • 09 Oct 2021 07:43 PM (IST)

    मुंबई पोलिसांकडून सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स

    मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहेत.

  • 09 Oct 2021 07:40 PM (IST)

    वसई-विरार नालासोपारा परिसरात सायंकाळच्या सुमारास पाऊसाची हजेरी

    वसई विरार :

    वसई-विरार नालासोपारा परिसरात सायंकाळच्या सुमारास पाऊसाने हजेरी लावली आहे .

    दिवसभरतील उकाड्यानंतर सायंकाळच्या वेळेस पडलेल्या पावसाने परिसरात गारवा पसरला

  • 09 Oct 2021 07:24 PM (IST)

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी 19 वी अटक, ड्रग्ज पेडलर शिवराज रामदासला बेड्या

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी 19 वी अटक, एनसीबीने ड्रग्ज पेडलर शिवराज रामदासला अटक केली आहे. अरबाज मर्चंटला शिवराजनेच ड्रग्ज पुरविल्याची माहिती समोर आली आहे.

  • 09 Oct 2021 06:52 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत पुन्हा पाऊस, नागरीक हैराण

    कल्याण डोंबिवलीत आज पुन्हा सध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. पावसामुळे संध्याकाळच्या वेळी कामावरुन घरी येणाऱ्या नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. तसेच संध्याकाळी पाऊस पडल्याने व्यापारी वर्गाचंही नुकसाण होतंय त्यामुळे तेही देखील नाराज आहेत.

  • 09 Oct 2021 06:44 PM (IST)

    परमबीर सिंग यांना मुंबई क्राईम ब्रांचची नोटीस, 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई क्राईम ब्रांचची नोटीस, 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना, गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल प्रकरणी क्राईम ब्रांचची नोटीस

  • 09 Oct 2021 06:33 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात

    पिंपरी चिंचवड -शहराच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात

    -काही दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाची हजेरी

  • 09 Oct 2021 05:25 PM (IST)

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, तब्बल दोन वर्षांनी PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,

    तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीनं ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर,

    2019 सालात पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती…

    कोरोना, मराठा आरक्षण, आणि एमपीएससीच्या दिरंगाईमुळे रखडली होती शारीरिक चाचणी,

    496 पदांसाठी होतीये शारीरिक चाचणी,

    19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या ठिकाणी होणार शारीरिक चाचणी,

    तब्बल दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना आयोगाचा दिलासा

  • 09 Oct 2021 04:23 PM (IST)

    कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट :

    कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे!

    सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

    केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झाले.

    भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचे मनापासून आभार. सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन!

  • 09 Oct 2021 04:15 PM (IST)

    आर्यन खानच्या ड्रायव्हरला एनसीबीचे समन्स

    अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रायव्हरला एनसीबीचे समन्स

    आर्यन खान यानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स

    हा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात असल्याची माहिती

  • 09 Oct 2021 04:05 PM (IST)

    11 ऑक्टोबरला महाराष्ट्रात बंद, शिवसेना नेते संजय राऊत यांची हाक

    महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद:

    संजय राऊत काय म्हणाले?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बालासाहेब थोरात हे चिपी विमानतळाच्या कार्याक्रमात होते. त्यांनी सिंधुदुर्गातून फोन करुन आम्हाला एकत्र पत्रकार परिषद घ्यायला सांगितली. 11 तारखेला महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खासकरुन लखीमपूर येथे जो निर्घृण आणि अमानुष असा प्रकार शेतकऱ्यांबाबत घडला त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे. त्याबंदला महाविकास आघाडीचे तीनही घटकपक्ष सक्रीय पाठींबा देत आहेत.

    शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. देशाची पूर्ण परिस्थिती आपल्या माहिती आहे. प्रश्न अनेक असले, प्रश्न इतके आहेत की प्रत्येक पक्षाला बंद व्हायला हवा. बंद असल्याने लोकांची गैरसोय होईल. लखीमपूर भागात जे घडलं ते सरळसरळ या देशाच्या संविधानाची हत्या आहे. कायद्याची पायमल्ली आहे. जो अन्नदाता शेतकरी त्याला खतम करण्याचं षडयंत्र आहे. या सरकारने मनात आणलं तर राज्या-राज्यात लखीमपूर सारख्या घटना घडू शकतात. केंद्र सरकार आणि संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता आणि निर्घृणता भरलं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावं यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

    महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनीही पुढाघार घ्यावा. शेतकऱ्यांचा समर्थनार्थ जिथे आहोत तिथे पाठींबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेनाही पूर्ण ताकदीने या बंदात उतरले. पण ताकद लावण्याची गरज नाही. लोकं स्वयंस्पूर्तीने बंद पाळतील. कारण लखीमपूरच्या घटनेची जखमी देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात झालं आहे. चार शेतकऱ्यांचा खून करुनसुद्धा केंद्रीय मंत्र्यांचा नेता मोकाट फिरतोय हे जनतेने पाहिलं आहे.

    नवाब मलिक यांचे मुद्दे :

    केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी चढवली त्यात शेतऱकऱ्यांचा‌मृत्यू झाला इतका नरसंहार झाल्यानंतरही गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला पवारसाहेब जसे म्हणाले जालियनवाला बागसारखं हे हत्याकांड आहे भाजप हे शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूट करणारा हा पक्ष शेतकऱ्यांची हत्या करणारा हा पक्ष, त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात बैठक झाली, त्यात ठरलं शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे

    सचिन सावंत यांचे मुद्दे :

    लखीमपूरची घटना ही मानवतेला कलंक लावणारी आहे. ज्या पद्धतीने ज्याने ती हत्या केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. तो प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकीत करणारा आहे.

  • 09 Oct 2021 03:59 PM (IST)

    प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष करावं : आशिष देशमुख

    नागपूर :

    प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष करावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलीय.

    प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी दिसते.

    राहुल गांधी जर अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नसतील, तर प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं,

    तशी मागणी आपण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

  • 09 Oct 2021 03:57 PM (IST)

    पुण्यातील महाविद्यालयं मंगळवारपासून सुरू होणार

    पुणे :

    पुण्यातील महाविद्यालयं मंगळवारपासून सुरू होणार,

    सोमवारपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती,

    मात्र सोमवारी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदच आवाहन केल्यानं मंगळवारपासून महाविद्यालय उघडली जाणार,

    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश

  • 09 Oct 2021 03:42 PM (IST)

    नवाब मलिकांनी आपली मतीही भंगारात विकली, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

    भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिकांवर घणाघात :

    नवाब मलीक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झालीये. भंगाराचा व्यवसाय करता-करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकलीय.

    त्या क्रूजवर तेराशे लोकं प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केलीये. उर्वरीत लोकाना एनसीबीने सोडलेले आहे.

    मुळात तुमचं वसूली सरकार हे वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागतेय.

    तुमच्या स्वताच्या जावायाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता?

    नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे?

    असे तर नाही ना की NCB ने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्ज टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत ? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना ?

  • 09 Oct 2021 03:38 PM (IST)

    नवाब मालिकांवर 100 कोटींचा दावा ठोकणार : भाजप नेते मोहित कंबोज

    भाजप नेते मोहित कंबोज यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत माझ्यावर आरोप केले. एनसीबीच्या कारवाईत भाजपच इन्व्हलमेंट आहे, असा त्यांनी आरोप केलाय. मी सध्या माझा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता नाही. एक वर्षांपासून भाजपात सक्रिय नाही

    वृशब सचदेव माझा मेव्हणा नाही. त्याचा आर्यन खानशी कोणताही संबंध नाही. तो कुठलंही व्यसन करत नाही. त्याबद्दल मला त्याचा गर्व आहे

    नवाब मलिक जावयाच्या गंभीर स्वरूपाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे

    नवाब मलिक हे हवेत बाण मारत आहेत.

    नवाब मलिक अनिल देशमुख बद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत?

    वृशब सचदेवच रक्त चेक करु शकता

    एनसीबीच्या कारवाईला मी पाठिंबा देत आहे

    नवाब मालिकांवर 100 कोटींचा दावा ठोकणार

  • 09 Oct 2021 03:20 PM (IST)

    नवाब मलिकांचे आरोप खोटे : एनसीबी

    एनसीबीच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी केलेले आरोप खोटे आहेत

    भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा

    16 जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर पुराव्याचा आधारे आठ जणांना अटक करण्यात आलं होतं. तर इतरांना सोडण्यात आलं होतं.

    एनसीबीने एकही नियम मोडला नाबी

    गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली

    सर्व ऑपरेशन हे वास्तविक वेळेचे आधारावर असते. त्यामुळे पुरावे गोळा करणं कठीण असतं. एकूण नऊ साक्षीदार या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यामध्ये मनिष भानुशाली आणि के पी गोसावी हे देखील होते. या सर्व साक्षीदारांना दोन तारखेच्या ऑपरेशन आधी एनसीबी ओळखत नव्हती. या ऑपरेशन दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आलं होतं त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूीमीवर त्यांना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं.

    हे जे नाव तुम्ही घेताय, सध्या तपास सुरु आहे आणि असं कुठलंही नाव घेणं योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलंही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतोत, जे पुरावे आहेत त्यावर बोलतोत. बाकी नाही.

  • 09 Oct 2021 02:57 PM (IST)

    काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अहमदनगरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

    अहमदनगर

    काही दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पावसाला सुरवात

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    पावसामुळे सखोल भागात पाणी साचले

    तर उकड्यापासू नागरिकांची सुटका

  • 09 Oct 2021 02:11 PM (IST)

    तुळजाभवानी देवीची रथ अलंकार पूजा

    शारदीय नवरात्र उत्सव निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज रथ अलंकार महापूजा करण्यात आली

    यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्यांचे अलंकार व रथावर बसविण्यात आले

    भगवान सूर्यनारायणांनी देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला

    त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडून त्याचा देखावा केला जातो

    तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवात देवीच्या 5 दिवस विशेष अलंकार पूजा केल्या जातात

    आज पहिला दिवस असून आज रथ अलंकार पूजा केली आहे

  • 09 Oct 2021 02:10 PM (IST)

    नागपूरच्या चितार ओळ परिसरात एका घरी ब्लास्ट झाला

    नागपूरच्या चितार ओळ परिसरात एका घरी ब्लास्ट झाला

    घरातील गॅस सिलेंडर की  नेमक्या कोणत्या वस्तुमुळे ब्लास्ट झाला हे स्पष्ट नाही

    गजानन रामाजी बिंड यांच्या घरी झाला  ब्लास्ट

    3 जण जखमी झाल्याची माहिती

    पहाटे च्या वेळी घडली घटना

    हा ब्लास्ट कशा मुळे झाला याचा तपास  कोतवाली पोलीस करीत आहे

  • 09 Oct 2021 01:37 PM (IST)

    जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीचे प्राप्तीकर कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन

    जळगाव

    – जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीचे प्राप्तीकर कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन

    – आम्ही देखील अजित दादांच्या बहिणी, आमच्यावर देखील छापे टाका

    – महिलांनी आंदोलन करत केली मागणी

  • 09 Oct 2021 01:02 PM (IST)

    अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक केलीये

    अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक केलीये

    या परदेशी नागरिकांकडून 39 लाखांच्या ऍक्टसी नावाच्या एमडीएम च्या गोळ्या सापडल्यात

    अंधेरीतील आंबोली परिसरात ही कारवाई करण्यात आलीये

    वांद्रे युनिटने ही कारवाई केलेली आहे

    अटक करण्यात आलेल्या नायजेरियनवर तुलींज पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे

    ओबामे ऑगस्तीन अस या आरोपीचे नाव आहे

  • 09 Oct 2021 12:33 PM (IST)

    जरंडेश्वर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच

    सातारा :

    जरंडेश्वर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच

    जरंडेश्वर कारखान्यावर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

    आयकर विभागाच्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

    जरंडेश्वर कारखान्यावरील मालमत्तेच्या कागदपत्रांची आयकर विभागाकडून तपासणी

  • 09 Oct 2021 12:21 PM (IST)

    सिंधुदुर्गवासीयांच्या स्वप्न पूर्तीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी कणकवलीत शिवसेनेकडून लाईव्ह प्रक्षेपण

    सिंधुदुर्ग –

    सिंधुदुर्गवासीयांच्या स्वप्न पूर्तीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी कणकवलीत शिवसेनेकडून लाईव्ह प्रक्षेपण

    पटवर्धन चौकात होणार लाईव्ह प्रक्षेपण

    ढोल ताशेसह होणार मोठा जल्लोष

  • 09 Oct 2021 11:54 AM (IST)

    आयकर विभागाच्या कारवाईनंतर बारामतीत राष्ट्रवादीकडून निषेध

    आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येतो आहे

    बारामतीतील भिगवण चौकात हा निषेध नोंदविण्यात येत आहे

    यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये

  • 09 Oct 2021 11:06 AM (IST)

    पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वराला लोकांनी वाचवले

    मनमाड  –

    पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वराला लोकांनी वाचवले

    नांदगाव तालुक्यातील वडाळी- नांदगाव मार्गावर असलेल्या फरशी पुला वरून पुराचे पाणी वाहत असतांना दुचाकी स्वराने पाण्यात जाण्याचे केले धाडस

    पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी सह वाहत जात असतांना नागरिकांनी वाचवले त्याचे जीव

  • 09 Oct 2021 10:52 AM (IST)

    चंद्रपुरात पार्क केलेली कार आगीच्या विळख्यात

    चंद्रपुरात पार्क केलेली कार आगीच्या विळख्यात,

    इग्निस कारने अचानक पेट घेतला,

    स्थानिक ट्रायस्टार हॉटेल चौकात होती कार,

    नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली सूचना,

    चंद्रपूर मनपाच्या अग्निशमन दल पथकाने विझविली आग,

    आगीचे कारण मात्र अज्ञात

  • 09 Oct 2021 10:21 AM (IST)

    इम्तियाज खत्रीच्या घरी आणि ऑफिसमध्ये एनसीबीचा छापा

    – इम्तियाज खत्रीच्या घरी आणि ऑफिसमध्ये एनसीबीचा छापा

    – बॉलिवूडमधील बड्या स्टार्सशी संबंध असल्याचं ऊघड…

    – इम्तियाज हा मुंबईतील एका नामचिन बिल्डरचा मुलगा आहे.

    – त्यांची INK इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे. त्यांची व्हीव्हीआयपी युनिव्हर्सल एंटरटेनमेंट नावाचीही एक कंपनी आहे जी बॉलिवूडमध्ये नवीन प्रतिभांना रोजगार देते.

    – इम्तियाजवर या आधीच सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात औषधांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे… एनसीबी त्या प्रकरणाचाही तपास करू शकते अशी सुत्रांची माहीती आहे…

    – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयच्याही रडारवर आहे इम्तियाज खत्री…

    – सुशांत आणि इम्तियाजचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा इम्तियाज गायब झाला होता, त्यानंतर त्याच्यावर संशय बळावला.

    – सूत्रांच्या माहीतीनुसार सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदीने इम्तियाजवर सुशांत सिंह यालाही ड्रग्ज पुरवल्याचा आरोप केला होता.

    – खत्री नावाची व्यक्ती सुशांतला ड्रग्ज पुरवत असे पण मला त्याचे पूर्ण नाव माहित नाही अशी माहिती श्रूतीने दिली होती… तो खत्री हाच इम्तियाज आहे का?, या दिशेनं आत्ता एनसीबी तपास करणार…

  • 09 Oct 2021 10:20 AM (IST)

    भंडाऱ्यात किटकनाशक फवारणीनंतर शेतकऱ्याच्या मृत्यू

    भंडारा

    – किटकनाशक फवारणीनंतर शेतकऱ्याच्या मृत्यू

    – धानावर लागलेल्या तुडतूडा रोगावर किटक नाशक फवारणी केल्या नंतर त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम झाल्याने एक शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना.

    – भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातिल नेरी गावात घड़ली आहे बाबूराव सेलोकर वय 55 वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

  • 09 Oct 2021 10:19 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस

    पुणे

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस

    काल पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र

    आज पुन्हा राज ठाकरेंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत  बैठक

    महापालिका निवडणुकीची रणनीती आखणार

  • 09 Oct 2021 09:32 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापनदिन, सोमवार पर्यंत 65 केंद्रांवर लसीकरण

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापनदिन असल्याने आजपासून ते सोमवार पर्यंत 65 केंद्रावर सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार

    -त्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे दररोज दोन हजार 500 आणि ‘कोविशिल्ड’ लसीचे 31 हजार 200 असे एकूण 33 हजार 700 डोस उपलब्ध

    -ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तर 50 टक्के डोस किओस्क यंत्राद्वारे व 50 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून दिले जाणार आहेत

  • 09 Oct 2021 09:25 AM (IST)

    चंद्रपुरात पार्क केलेली कार आगीच्या विळख्यात

    चंद्रपुरात पार्क केलेली कार आगीच्या विळख्यात,

    इग्निस कार ने अचानक पेट घेतला,

    स्थानिक ट्रायस्टार हॉटेल चौकात होती कार,

    नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली सूचना,

    चंद्रपूर मनपाच्या अग्निशमन दल पथकाने विझविली आग,

    आगीचे कारण मात्र अज्ञात

  • 09 Oct 2021 08:41 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग, संपूर्ण ट्रक जळून खाक

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग

    ट्रक रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर लागली भीषण आग

    आगीत संपूर्ण ट्रक जाळून झाला खाक

    गंगापूर रोडवरील विराज होटेल जवळील घटना

    आगीत जीवितहानी मात्र टळली

  • 09 Oct 2021 08:41 AM (IST)

    सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक

    अहमदनगर

    सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक

    तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून तपासणी

  • 09 Oct 2021 08:40 AM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    औरंगाबाद –

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क केले माफ

    विद्यापीठाच्या अधिसभेत घेतला शुल्क माफीचा महत्वपूर्ण निर्णय

    तर शुल्कवाढीच्या निर्णयावरही पुनर्विचार करण्याचा घेतला निर्णय

    शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ केल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा झाला फायदा

  • 09 Oct 2021 08:40 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात मिशन “कवच कुंडल” ही विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार

    पालघर

    पालघर जिल्ह्यात मिशन “कवच कुंडल” ही विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार

    कोव्हिड लसीकरणासाठी ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ही मोहिम राबवली जाणार,

    जिल्ह्यात आठवडाभर दररोज अडीचशे पेक्षा अधिक ठिकाणी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे,

    जिल्ह्यातील 25 लाखापेक्षा अधिक लसीकरण लाभार्थ्यां पैकी 61 टक्के नागरिकांना लसीचे पहिली डोज देण्यात आली आहे,

    23 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे,

    जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत तीन ठिकाणी लसीकरण होणार,

    तसेच 12 ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे

    जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे,

    यासाठी मनपाद्वारे ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शहरात लसीकरणासाठी “मिशन कवच कुंडल” विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

  • 09 Oct 2021 08:39 AM (IST)

    लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा एका महिलेवर बलात्कार

    लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा एका महिलेवर बलात्कार

    इगतपुरी कसारा स्थानका दरम्यान घडली घटना

    शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास घडली घटना

    सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले

    20 वर्षीय महिलेवर बलात्कार

    कल्याण जीआरपी ने केला गुन्हा दाखल

    दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    कल्याण जीआरपीची माहिती

  • 09 Oct 2021 08:31 AM (IST)

    येत्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग निश्चित झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये 43 प्रभाग असणार आहेत

    पिंपरी चिंचवड

    – येत्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग निश्चित झाल्याने पिंपरी चिंचवड मध्ये 43 प्रभाग असणार आहेत

    -निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या 128 असल्याने त्यापैकी एक प्रभाग मात्र दोन सदस्यांचा असणार आहे

    -या महिन्या अखेर प्रभाग रचना पूर्ण होणार असून त्यानंतर सोडत होणार आहे

  • 09 Oct 2021 08:30 AM (IST)

    काॅर्डीला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी पुन्हा एक्शन मोडमध्ये

    – काॅर्डीला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी पुन्हा एक्शन मोडमध्ये

    – मुंबईत एनसीबीचे छापे, वांद्रे परिसरात छापेमारीला सुरूवात.

    – चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर एनसीबीचे छापे.

    – अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आले आहे… या नंतर छापेमारीला सुरवात

    – एनसीबीची एक टिम बांद्रे परिसरात

  • 09 Oct 2021 08:30 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांची कारवाई

    पुणे

    – पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांनी कारवाई करत दारू अड्डे उध्वस्त केले आहेत, गोहे बुद्रुक परिसरात ही कारवाई करत 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय

    – शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे वनविभागाच्या जागेचा कार्यक्रमासाठी वापर करणे या बाबत घोडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय

    – या गुन्हेगारांना दारू निर्मितीसाठी कच्चामाल पुरवणारे व्यापारी व दुकानदार यांच्यावर देखील ही कारवाई केली जाणार आहे,या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी ६ आरोपी गुन्हा दाखल केला आहे.

  • 09 Oct 2021 08:28 AM (IST)

    अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत आंदोलन

    बारामती ;

    – अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत आंदोलन

    – बारामतीच्या भिगवण चौकात राष्ट्रवादीकडून होणार आंदोलन

    – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने आणि संस्थांवर आयकर विभागाचे छापे

  • 09 Oct 2021 08:28 AM (IST)

    सोलापुरात शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने लढवली शक्कल

    सोलापूर –

    शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने लढवली शक्कल

    स्मार्ट सिटीचे सीईओ, मनपा आयुक्त आणि महापूर या तिघांच्या नावाने खड्डा फोटो स्पर्धेचे केले आयोजन

    शहरातील एकही रस्ता धड नाही

    याकडे शासन आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही

    19 ऑक्टोंबर रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर

  • 09 Oct 2021 08:27 AM (IST)

    ‘दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह’ बँकेचे चेअरमन, बँकेचे संचालक आणि बँक अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे दाखल

    पिंपरी चिंचवड

    -‘दि सेवा विकास को ऑपरेटिव्ह’ बँकेचे चेअरमन, बँकेचे संचालक आणि बँक अधिकारी यांच्या विरोधात वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे दाखल

    -वाकड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 76 लाखांची तर पिंपरी येथील गुन्ह्यात 28 लाख 50 हजार 902 रुपयांची दि सेवा विकास बँकेने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय

    -मयूर बाळकृष्ण पेटकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय तर दुसरी तक्रार वर्षा जितेंद्र कोकल यांनी पिंपरी पोलिस स्थानकात केलीय

    -मुदत संपूनही ठेवी आणि बचत खात्यातील लाखो रुपये परत दिले जात नसल्याने ही तक्रार दाखल करण्यात आलीय

  • 09 Oct 2021 08:11 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद –

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर

    सायंकाळी चार वाजता येणार अजित पवार एक दिवशीय औरंगाबाद दौऱ्यावर

    विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा

    शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने घेणार अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा

    विभागीय आयुक्त कार्यालयात चालणार तब्बल दीड तास आढावा बैठक

  • 09 Oct 2021 08:10 AM (IST)

    भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या नेहरू मार्केटला भीषण आग

    अहमदनगर

    भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या नेहरू मार्केटला भीषण आग

    पहाटेच्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत 24 पैकी 20 दुकाने आगीत जळून खाक

    या आगीत छोट्या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाल

    घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे तातडीने हजर

    तर फायर ब्रिगेडशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन गाड्या बोलावून घेतल्या, मात्र 24 पैकी 20 दुकाने आगीत जळून खाक

    सध्या आग नियंत्रणात अली असून आग नेमकी कशामुळे लागली याच कारण समजू शकले नाही

  • 09 Oct 2021 08:10 AM (IST)

    विरगाव परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

    औरंगाबाद –

    विरगाव परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

    चिखलात फसलेली वाहने काढण्यासाठी वापरावे लागतात चार चार ट्रॅक्टर

    चिखलाचा भीषण रस्ता पार करण्यासाठी करावी लागते कसरत

    चार ट्रॅक्टर लावून रस्ता काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

    शेतात येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते कसरत

  • 09 Oct 2021 08:09 AM (IST)

    उत्तर सोलापूर तालुका सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात अविश्वास ठराव

    सोलापूर –

    उत्तर सोलापूर तालुका सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात अविश्वास ठराव

    राष्ट्रवादी भाजप सदस्यांनी एकत्रित येऊन अविश्वासाचा ठराव मांडला

    रजनी भडकुंबे या दिलीप माने गटाच्या

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौर्‍यावर असताना माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली होती भेट

    भेट घेऊन दिलीप माने यांनी राष्ट्रवादीत येण्याची दिले होते संकेत

    त्याच वेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी भाजप एकत्र येऊन त्यांच्या गटाचा सभापती च्या विरोधात मांडला अविश्वास ठराव

  • 09 Oct 2021 08:09 AM (IST)

    नाशकात पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे

    नाशिक –

    पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे

    संमेलन आयोजनासाठी, बैठकांना पुन्हा बहर

    19, 20 ,21 नोव्हेंबर या तीन तारखा प्रस्तावित

    येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाण्याचे संकेत

  • 09 Oct 2021 08:08 AM (IST)

    अंगावर वीज पडल्यामुळे 10 ते 12 गाई बैल ठार, औरंगाबाद जिल्ह्यातील ठाकरवाडी गावातील प्रकार

    औरंगाबाद –

    अंगावर वीज पडल्यामुळे 10 ते 12 गाई बैल ठार

    औरंगाबाद जिल्ह्यातील ठाकरवाडी गावातील प्रकार

    शेतात चरत असलेल्या 10 ते 12 गाई बैलांचा मृत्यू

    वीज पडल्यामुळे गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

    वीज पडताच काही क्षणात 10 ते 12 जनावरे झाली गतप्राण

    गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे परिसरात हळहळ

  • 09 Oct 2021 08:08 AM (IST)

    राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसैनिक लागले कामाला

    नाशिक – राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसैनिक लागले कामाला..

    आजपासून प्रत्येक शाखाध्यक्षांच्या घरावर लागणार मनसेचा झेंडा..

    राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष तिथे झेंडा लावण्याचे दिले होते आदेश

    मनसे नेते आणि कार्यकर्ते आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर लागले कामाला

  • 09 Oct 2021 07:56 AM (IST)

    नाशिकमध्ये महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी

    नाशिक –

    नाशिकमध्ये महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी

    राष्ट्रवादी आमदार सरोज आहेर आणि सेनाचे माजी आमदार योगेश घोलप वाद पेटला

    आपल्या कामाचं सरोज आहिरे यांनी श्रेय घेतल्याचा योगेश घोलप यांचा आरोप

    तर,शिवसेना स्टाईल च्या गोष्टी करू नका आणि हिम्मत ही करू नका

    राष्ट्रवादीने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत

    आमदार सरोज अहिरे यांचा पलटवार

    आजी माजी आमदारांमध्ये वाद पेटलेला असताना,दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मात्र प्रकरणावर चूप्पी

    भुजबळ कांदे वादानानंतर, आता घोलप अहिरे वाद चिघळला

  • 09 Oct 2021 07:56 AM (IST)

    तारादूत प्रकल्प रखडला वीस तारखे पासून सारथी समोर तारादूतांचे आंदोलन

    पुणे

    तारादूत प्रकल्प रखडला वीस तारखे पासून सारथी समोर तारादूतांचे आंदोलन

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे दिले होते आदेश

    मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही

    त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपासून सारथीच्या कार्यालयासमोर २५ तारादूत, विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार

    मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांची माहिती

  • 09 Oct 2021 07:48 AM (IST)

    नागपूर शहरात 17 ऑक्टोबर ला होणार झेंडा गीत गायन

    नागपूर शहरात 17 ऑक्टोबर ला होणार झेंडा गीत गायन

    शहरातील 125 चौकात होणार गायन

    नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडा गीताचे रचिता शामलाल गुप्ता यांच्या जयंती निमित्ताने करण्यात येत आहे आयोजन

    महापालिका आणि खादी ग्रामोद्योग आणि खासदार क्रीडा महोत्सव यांच्या संयुक्त विध्यमाणे होणार आयोजन

  • 09 Oct 2021 07:48 AM (IST)

    समशेरपूरच्या आयान मल्टीट्रेड एल एल पी कारख्यान्यावर आयकर विभागाची तिसऱ्या दिवशी पण तपासणी सुरूच

    नंदुरबार –

    समशेरपूरच्या आयान मल्टीट्रेड एल एल पी कारख्यान्यावर आयकर विभागाची तिसऱ्या दिवशी पण तपासणी सुरूच….

    चौकशीत काय तथ्य समोर आले अद्याप गुलदस्त्यात कुठली माहिती करखान्या बाहेर येत नाही आहे ….. तर कारखाना व्यवस्थापनाचे ही मौन…

    कारवाईत अनेक कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती येते आहे….

    बारा ते पंधरा लोकांचे पथक असल्याची सूत्रांची माहिती…

  • 09 Oct 2021 07:47 AM (IST)

    कोव्हिड लसीकरणासाठी 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान शहरात “मिशन कवच कुंडल” 

    नागपूर –

    कोव्हिड लसीकरणासाठी 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान शहरात “मिशन कवच कुंडल”

    कोव्हिडच्या संभाव्य लाटेचा धोका आणि त्याअनुषंगाने नागरिकांची सुरक्षा व्हावी यासाठी लसीकरणासाठी पात्र प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे.

    यासाठी मनपाद्वारे ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शहरात लसीकरणासाठी “मिशन कवच कुंडल” विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

    लसीकरणाच्या विशेष मोहिमेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाचे शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग, महसूल विभाग व अन्य संबंधित विभागांना निर्देशित केले आहे.

    मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

    प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करणार आहे.

    याकरिता आरोग्यसेविका,  अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस हे स्वयंसेवक म्हणून कार्य करणार आहेत.

    नागपूर शहरातील ७५ टक्क्यांच्या वर नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे.

    यापैकी अनेकांनी दुसरा डोज घेतला तर अनेकांचा दुसरा डोज अद्याप बाकी आहे.

    दुसरा डोज बाकी असलेल्यांनी लवकरात लवकर आपले दोन्ही डोज पूर्ण करून घ्यावे.

  • 09 Oct 2021 07:46 AM (IST)

    नागपूरचे कारागृह अधीक्षक अनुप कुंभारे यांची होणार विभागीय चौकशी

    नागपूर –

    नागपूरचे कारागृह अधीक्षक अनुप कुंभारे यांची होणार विभागीय चौकशी

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाने दिले आदेश

    कुंभारे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत पात्र कैद्यांना जाणीव पूर्वक पेरोल नाकारला

    असा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली

    त्यावरून न्यायालयाने नागपूर पोलीस आयुक्तांनी उपयुक्त दर्जाच्या अधिकार्या मार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी

    तसेच कारागृह विभागाने विभागीय चौकशी करावी असे आदेश दिले

  • 09 Oct 2021 07:08 AM (IST)

    संघाचा दसऱ्याच्या दिवशी होणारा शस्त्रपूजन सोहळा मर्यादित स्वरूपात , तर दीक्षाभूमीचा सोहळा रद्द

    नागपूर –

    संघाचा दसऱ्याच्या दिवशी होणारा शस्त्रपूजन सोहळा मर्यादित स्वरूपात , तर दीक्षाभूमीचा सोहळा रद्द

    दसऱ्याच्या दिवशी नागपुरात दोन्ही मुख्य आयोजन असतात

    नागपुरात होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसर्या च्या दिवशी च शस्त्र पूजन होणार

    मात्र ते मर्यादित लोकांच्या उपस्थिती मध्ये होणार

    या कार्यक्रम साठी या वर्षी कुठल्याही मुख्य अतिथी ला निमंत्रण देण्यात आलं नाही

    दर वर्षी देशातील महत्वाचा व्यक्ती असतो मुख्य अतिथी

    तर दीक्षा भूमी वर होणार मुख्य सोहळा रद्द करण्यात आला।

    दोन डोज घेतलेल्या अनुयायांना प्रवेश दिला जाईल , मात्र वृद्ध आणि बालकांना प्रवेश नाही

    शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करत होणार दोन्ही मुख्य कार्यक्रम

  • 09 Oct 2021 07:07 AM (IST)

    बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोयंका, विकास ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे :

    बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोयंका, विकास ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

    जमीन दस्त तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी दिली विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद

    त्यावरुन भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल

    संगमवाडी येथील चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोटया नोंदी

    दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आल

    काही खरेदी खतातील सर्वेक्षण क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठा यांच्या जमिनीची देखील चुकीची नोंद

  • 09 Oct 2021 07:06 AM (IST)

    पुण्यात पत्नीला विमानाचे तिकीट न दिल्याने पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा

    पुणे

    पत्नीला विमानाचे तिकीट न दिल्याने पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा

    अफवा पसरवणाऱ्या संगणक अभियंता ला पोलिसांनी केली अटक

    या अफवेमुळे पुणे विमानतळावर खळबळ उडाली.

    रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तास झाला उशीर

    ॠषीकेश सावंत (वय २८, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव

    शुक्रवारी सकाळी सावंत त्याच्या पत्नीला लोहगाव विमानतळावर सोडण्यासाठी गेला

    त्याची पत्नी १६ ऑक्टोबरला पुण्यात परतणार होती.

    पण धावपट्टीच्या कामामुळे १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळ बंद आहे

    त्यामुळे सावंत लोहगाव विमानतळावर विमान कंपनीच्या कार्यालयात गेला आणि त्याने १५ ऑक्टोबरचे तिकिट अधिकृत करून देण्याची केली मागणी

    विमान कंपनीने नकार दिल्यानंतर सावंत संतापला आणि त्याने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवली.

Published On - Oct 09,2021 6:50 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.