Maharashtra News LIVE Update | खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी अहमदनगरमध्ये 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल

| Updated on: Oct 13, 2021 | 12:09 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी अहमदनगरमध्ये 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Oct 2021 11:03 PM (IST)

    खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी अहमदनगरमध्ये 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल

    अहमदनगर : खेळाडू अजिंक्य गायकवाड मृत्यूप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल

    विजेचा शॉक लागून 30 वर्षीय अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला होता

    घरातील केबलमध्ये हा करंट उतरल्याने अजिंक्यला शॉक बसला होता

    महावितरण आणि केबल ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप

    या प्रकरणी टि.व्ही. केबल मालक, महावितरणचे वायरमन, ज्यु. इंजिनिअर, केबल पुरवठादार, टिव्ही केबल पुरवठादार अशा 6 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

  • 12 Oct 2021 08:46 PM (IST)

    महिला सरपंच दोन वर्षांपासून गैरहजर, ग्रामस्थांनी महिला सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसविला

    बीड: महिला सरपंच दोन वर्षांपासून गैरहजर

    संतप्त ग्रामस्थांनी महिला सरपंचाच्या खुर्चीवर कुत्रा बसविला

    अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील घटना

    ग्रामपंचायतमधील कामे दोन वर्षांपासून खोळंबली

    अनेक वेळा विनवणी करून देखील सरपंच येत नसल्याने ग्रामस्थांचा खुर्चीवर कुत्रा बसवून निषेध

  • 12 Oct 2021 07:44 PM (IST)

    पुण्यात धारधार शस्त्राने वार करून अल्पवयीन मुलीचा खून 

    पुणे : बिबवेवाडी येथे अल्पवयीन मुलीचा धारधार शस्त्राने वार करून खून

    तीन संशयित आरोपींनी खून केल्याची माहिती

    एक आरोपी मुलीचा नातेवाईक

    यश लॉन्स येथे कब्बडीचा सराव करायला आलेल्या अल्पवयीन मुलीचा खून

  • 12 Oct 2021 07:41 PM (IST)

    भाजपची बैठक संपली, संघटनात्मक कामाचा आढावा घेतला- आशिष शेलार

    भाजप नेत्यांची बैठक संपली आहे. ही बैठक संपल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यामांशी संवाद साधला. या बैठकीत भाजपच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 12 Oct 2021 07:01 PM (IST)

    राष्ट्रवादीची बैठक संपली, राज्यात निर्बंध आणखी शिथील करावेत- नवाब मलिक

    राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली

    राज्यात निर्बंध आणखी शिथील करावेत

    बैठकीत जिल्हा परिषद, तसेच इतर निवडणुकीवर चर्चा झाल्याची नावब मलिक यांची माहिती

  • 12 Oct 2021 06:58 PM (IST)

    चेंबूरमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली

    मुंबई : चेंबूरमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली

    ऊद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या फोटोसमोरच गरबा सुरू

    – सेनेच्या महिला कार्यकर्त्या गरबा खेळण्यात मग्न

    – ना मास्क, ना शेशल डिस्टंसिंगचे पालन

    – गाण्यावर महिला पदाधिकारी गरबा खेळण्यात मग्न

    पदाधिकाऱ्यांना पडला नियमांचा विसर

  • 12 Oct 2021 06:56 PM (IST)

    अजित पवार यांची मतदानाला अनुपस्थिती, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी करणार होते मतदान 

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मतदानाला अनुपस्थिती

    – सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी करणार होते मतदान

    – शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावल्यानं मतदानाला अनुपस्थिती

  • 12 Oct 2021 05:54 PM (IST)

    मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी मदतीचा निर्णय न झाल्यास आंदोलन, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा इशारा

    उस्मानाबाद – 3 आठवडे उलटून गेले तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने भाजप आक्रमक

    देता की जाता आंदोलनाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा इशारा

    उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय न झाल्यास करणार आक्रमक आंदोलन

    मंत्र्यांना जिल्हा बंदीची घोषणा तर मुख्यमंत्री ठाकरे पाहणीसाठी न आल्याने टीका

    मुख्यमंत्री व मंत्र्यांना खराब सोयाबीन पार्सल ने पाठविणार

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा इशारा

  • 12 Oct 2021 05:01 PM (IST)

    कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व 

    इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकहाती वर्चस्व

    कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली बिनविरोध

    आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 21 अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध

    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या निवडणुकीत इतर पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केले होते आवाहन

  • 12 Oct 2021 04:33 PM (IST)

    कोल इंडियाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभार- नितीन राऊत

    स्वस्त वीज मिळत नसल्याने महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. कोल इंडियाच्या ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्यतेमुळे कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळा लक्षात घेता कोळशाचा पुरेसा साठा करणे अपेक्षित होते. मात्र कोल इंडियाने पावसाळ्यापूर्वी कमी उत्खनन केल्यामुळे कोळशाचा साठा केला नाही. कोळशाचे दर गगनाना भिडल्यामुळे खासगी वीजउत्पादकांनी कोळशाची आयात थांबवली आहे. त्यामुळे वीज उत्पादनासाठी कोळसा उपलब्ध नसल्यामुळे वीजननिर्मिती करणे कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम महानिर्मिती कंपनीवर झाला आहे. कोळशाचा काटकसरीने वापर करुन कोळशाचा काटकसीने करण्याचा प्रयत्न महावितरणकडून सुरु आहे.

  • 12 Oct 2021 04:27 PM (IST)

    राज्याला दररोज 1 हजार मेगावॅट कमी वीजपुरवठा- नितीन राऊत

    वीज टंचाईच्या मुद्द्यावरुन उर्जामंत्री नितीन राऊत माध्यमांशी बोलत आहेत. सध्या विजनिर्मितीसाठी तीस टक्केच गॅसचा पुरवठा मिळत आहे. जीएसडब्ल्यूसोबत महावितरणने 240 मेगावॅट वीज खरेदीचा करार केला आहे, मात्र, त्यांच्याकडून  2  सप्टेंबरपासून विजेचा पुरवठा केला जात नाहीये. सीजीपीएल आणि जीएसडब्ल्यू हे आयात केलेल्या कोळश्यापासून वीजनिर्मिती करतात. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाची किंमत वाढली आहे. त्यामुळे त्यांनी वीजनिर्मिती थांबवली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दोन्ही प्रकल्पामध्ये वीस दिवस पुरेल एवढा कोळसा साठा आहे. मात्र तरीही त्यांनी वीजनिर्मिती थांबवली आहे त्यामुळे राज्याला दररोज १ हजार मेगावॅट कमी वीजपुरवठा मिळत आहे. विजटंचाई वाढली आहे, त्यामुळे महागडी वीज खरेदी करावी लागत आहे.

  • 12 Oct 2021 04:11 PM (IST)

    पंकजा मुंडेंचे बीडमध्ये धरणे आंदोलन, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी

    बीड: अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा

    भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे धरणे आंदोलन

    उद्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर मुंडे यांचे धरणे आंदोलन

    आंदोलनापूर्वी पंकजा अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीला होणार नतमस्तक

    12 वाजता बीडमध्ये होणार आंदोलनाला सुरुवात

  • 12 Oct 2021 04:08 PM (IST)

    राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावे, डिके शिवकुमार यांची मागणी

    बंगळुरू : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावे

    कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार यांची मागणी

    राहुल अध्यक्षपद सांभाळू शकतात – शिवकुमार

    देशातील काँग्रेसची मागणी हीच आहे

    माध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी केलं स्पष्ट

  • 12 Oct 2021 04:01 PM (IST)

    औरंगाबादेत चारचाकी वाहन तलावात कोसळले, चार जणांचा मृत्यू झल्याचा अंदाज

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसरात चारचाकी वाहन कोसळले तलावात

    चारचाकी वाहन तलावात कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

    भरधाव वाहन तलावात कोसळल्यामुळे घडली घटना

    करमाड जवळ असलेल्या जडगाव गावातील सिमेंट बंधाऱ्यातील प्रकार

    तलावात कोसळल्या गाडीचा एका तासापासून शोध सुरू

    गाडीतील सर्वच व्यक्ती मृत पावल्याचा अंदाज

  • 12 Oct 2021 03:16 PM (IST)

    जातीवाद होता अजूनही आहे, जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात : पंकजा मुंडे

    मी आधीच उपाशी आणि त्यात उपास, बहुजनांची अवस्थाच अशी आहे.

    पंकजा मुंडे यांनी पुन्हा व्यक्त केली खंत

    गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा उपयोग नाही

    जातीवाद होता जातीवाद अजूनही आहे, मी गावामध्ये जाते तेंव्हा जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात

    संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का.?

    बहुजन म्हणजे कोण तर जो मोठ्या संख्येने आहे तो बहुजन, ज्याला आरक्षण नाही ज्याला नौकरी नाही तो बहुजन

    ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही

    नरेंद्र मोदी यांनी 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण dil आहे

    हे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचं सुद्धा आरक्षण संपुष्टात आलं आहे.

  • 12 Oct 2021 02:34 PM (IST)

    बदलापूर-वांगणी रस्त्यावरील खरवई गावाजवळ मजीप्राची पाण्याची पाईपलाईन फुटली

    बदलापूर :

    बदलापूर-वांगणी रस्त्यावरील खरवई गावाजवळ मजीप्राची पाण्याची पाईपलाईन फुटली

    पाईपलाईन मधून पाण्याचे उंचच उंच फवारे उडून पाणी आलं रस्त्यावर

    कर्जत-बदलापूर रोडवर लाखो लिटर पाणी गेलं वाया

    थोड्या वेळापूर्वी मजीप्राच्या कर्मचाऱ्यांनी ही पाईप लाईन केली बंद

  • 12 Oct 2021 01:58 PM (IST)

    शेतकरी नेते राजू शेट्टी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत केलं स्वागत

    औरंगाबाद –

    शेतकरी नेते राजू शेट्टी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत केलं स्वागत

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या अपेगावात बैलगाडीत काढली मिरवणूक

    एफआरपी परिषदेसाठी राजू शेट्टी आले होते अपेगावात

    अपेगाव ग्रामस्थांनी राजू शेट्टी यांची बैलगाडीतून काढली गावभर मिरवणूक

    गुलाल उधळून केलं राजू शेट्टी यांचं स्वागत

  • 12 Oct 2021 01:41 PM (IST)

    भटक्या विमुक्तांचे आरक्षण सुरु ठेवण्यासाठी, भाजपचे कल्याणमध्ये आसूड आंदोलन

    भटक्या विमुक्त जाती जमातींच्या कर्मचारी अधिका:यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सरकारने दाखल केलेले सत्य प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घ्यावे. तसेच पूर्वी सुरु असलेले आरक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी नव्यो सत्य प्रतिज्ञा पत्र सादर करावे या मागणीसाठी आज भाजपनेतर्फे आमदार गणपत गायकवाड नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसील कार्यालयासमोर आसूड आंदोलन करण्यात आले. यावेळी कडकलक्ष्मीने आसूड ओढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

  • 12 Oct 2021 01:38 PM (IST)

    लखीमपूर हिंसाचार प्रकरणी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींना भेटणार

    नवी दिल्ली –

    राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार

    लखीमपूर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या भेटणार

    राष्ट्रपती कार्यालयाकडून काँग्रेसच्या शिष्टमंडळासाठी उद्याची वेळ निश्चित

    लखीमपूर बाबतची सर्व माहिती राष्ट्रपतींना दिली जाणारी

    राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस मधील वरिष्ठ नेते शिष्टमंडळात असणार

  • 12 Oct 2021 01:01 PM (IST)

    दहशतवाद्यांसोबतच आता माओवादी NIA च्या रडारवर

    नवी दिल्ली –

    दहशतवाद्यांसोबतच आता माओवादी NIA च्या रडारवर

    तब्बल 20 ठिकाणी NIA चे पुन्हा छापे

    केरळ कर्नाटक व तामिळनाडूमध्ये सर्च ऑपरेशन

    केरळमधील माओवाद्यांकडून वर्धापन दिन साजरा

    16 सप्टेंबर रोजी नीलंबर अभयारण्यात वर्धापन दिन साजरा करून झेंडा फडकवला होता

    झेंडा फडकवून वर्धापन दिन साजरा केल्यामुळे NIA कडून सर्च ऑपरेशन सुरू

  • 12 Oct 2021 01:00 PM (IST)

    इचलकरंजी नवीन युवक संघटना यांनी नगरपालिकेमध्ये आंदोलन केले

    इचलकरंजी नवीन युवक संघटना यांनी नगरपालिकेमध्ये आंदोलन केले

    नगर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना सुविधा  मिळत नाहीत नवीन युवक संघटना यांनी नारळ फोड आंदोलन केले

    नगरपालिकेच्या दरवाज्यात नगराध्यक्षा यांच्या दालना बाहेर व संपूर्ण नगरपालिकेमध्ये केले नारळ फोडो आंदोलन

    संतोष कांदेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी नारळ फोड आंदोलन केले या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होते

  • 12 Oct 2021 12:59 PM (IST)

    युटेक उर्फ श्री गजानन महाराज साखर कारखान्याच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचे आंदोलन

    – युटेक उर्फ श्री गजानन महाराज साखर कारखान्याच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचे आंदोलन,

    – नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांचे पैसे थकवल्याचा कारखान्यावर आरोप,

    – नगर जिल्हयातील शेतकऱ्यांचे युटेकच्या कार्यालयाला ठाळे ठोक ठिय्या आंदोलन,

  • 12 Oct 2021 12:59 PM (IST)

    औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भव्य धरणे आंदोलन सुरू

    औरंगाबाद

    औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भव्य धरणे आंदोलन सुरू

    शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी आंदोलन सुरू

    मनसेच्या धरणे आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित

    औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू

  • 12 Oct 2021 11:38 AM (IST)

    वरुण गांधी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

    नवी दिल्ली –

    वरूण गांधी यांचा भाजपला रामराम?

    वरुण गांधी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

    काही दिवसांपूर्वीच लखिमपुर दुर्घटनेप्रकरणी केलं होतं सरकारविरोधात ट्विट

    भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मधूनही वरूण गांधी यांचे नाव डावलण्यात आलं होतं

    वरूण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती

    वरूण गांधी सध्या भाजपचे खासदार

  • 12 Oct 2021 11:30 AM (IST)

    मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच, नाशिक पोलीस पुमोमिया याला घेणार ताब्यात

    नाशिक – संजय पुमोमिया यांच्या अडचणीत वाढ..

    मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच, नाशिक पोलीस पुमोमिया याला घेणार ताब्यात..

    पुमोमिया विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    बनावट शेतकरी दाखला काढून सिन्नर मध्ये जमिनी घेतल्या विकत..

    पुनोमिया हे परमवीर सिंग यांचे निकटवर्ती..

    खंडणी प्रकरणात संजय पुनोमिया सध्या आहेत मुंबई पोलिसांच्या कस्टडीत

  • 12 Oct 2021 11:17 AM (IST)

    ईडीने जप्त केलेल्या डी.एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

    – ईडीने जप्त केलेल्या डी.एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

    – याप्रकरणी भाग्यश्री कुलकर्णी यांची चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद,

    – बंगल्यामधील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल चोरीला,

    – गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून डी.एस.कुलकर्णी तुरूंगात आहेत.

  • 12 Oct 2021 11:17 AM (IST)

    औरंगाबादेत भाजपच्या ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले

    औरंगाबादेत भाजपच्या ओबीसी मेळाव्याचे बॅनर फाडले..

    सहा ते सात ठिकाणी फाडले ओबीसी मेळाव्याचे बॅनर..

    द्वेष भावनेतून भाजपचे बॅनर फडल्याचा संशय..

    ओबीसी मेळाव्याचे बॅनर फडल्याने भाजपमध्ये संताप..

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होतोय ओबीसींचा मेळावा.

  • 12 Oct 2021 11:16 AM (IST)

    येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार, उदय सामंत यांची माहिती

    रत्नागिरी –

    येत्या दोन दिवसात राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार

    पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरू

    महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कुठलंही परिपत्रक काढलेल नाही

    उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

    उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित दादा यांच्या सूचनेवरून पुण्यातील महाविद्यालय झाली सुरू

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

    महाविद्यालय सुरू करण्याबाबत उद्या कुलगुरुनशी बैठक- उदय सामंत

    कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करणार

    दोन दिवसात तारीख आणि नियमावली दोन्ही गोष्टी जाहीर करणार

  • 12 Oct 2021 11:14 AM (IST)

    सोलापुरातील बार्शीत 40 वर्षीय महिलेचा खून

    सोलापुरातील बार्शीत 40 वर्षीय महिलेचा खून

    तीन दिवसांनी उघडकीस आलेली घटना

    खून करून झुडपात दिले होते टाकून

    रुक्मिणी फावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव

    बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथील घटना

    घरातील मुलगा गायब झाल्याने मुलानेच खून केल्याचा प्राथमिक अंदाज

    तीन दिवसापासून आहे घराला कुलूप

  • 12 Oct 2021 09:52 AM (IST)

    पुण्यातीर येरवडा, धानोरी ,कळस, लक्ष्मीनगर पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

    टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दणका इम्पॅक्ट

    पुण्यातीर येरवडा, धानोरी ,कळस, लक्ष्मीनगर पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश,

    शनिवारी रात्री झालेल्या पावसानं धानोरी भागात अनेक घरात आणि दूकानांमध्ये शिरलं होतं पाणी,

    टीव्ही 9 मराठीनं दाखवली होती परिस्थिती

    तातडीने पंचनामे करून मनपाला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेत,

    धानोरी ,येरवडा भागात तब्बल 50 कोटी रुपयांची स्ट्रोम वॉटर ड्रेनेजची काम करण्यासाठी पालिका आयुक्तांनी आदेश दिलेत,

    या भागात पावसानं पाणी साचणार यासाठी तातडीने काम करा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

  • 12 Oct 2021 09:29 AM (IST)

    सोलापूरच्या ग्रामीण भागात तीन तासांचे भारनियमन

    सोलापूर – ग्रामीण भागात तीन तासांचे भारनियमन

    जिल्ह्यातील बहुतांशी गावात सकाळी सहा ते नऊ या वेळेत भारनियमन सुरू

    कोळशाच्या टंचाईमुळे विविध औष्णिक केंद्रातील औष्णिक केंद्रातील 13 संच सद्यस्थितीत बंद

    त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प

    भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्तीचे प्रयत्न सुरू

    मात्र  सकाळच्या सत्रात विजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने भारनियमन सुरू

  • 12 Oct 2021 09:28 AM (IST)

    जामखेड येथील खर्डा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच भगव्या ध्वजाची तयारी पूर्ण

    अहमदनगर

    जामखेड येथील खर्डा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच भगव्या ध्वजाची तयारी पूर्ण

    दसऱ्याच्या मुहूर्तावर भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना

    आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून उभारला जाणार ध्वज

    युवा पिढीला काय विचार द्यायचा याची देखील तयारी सुरू आहे

    या ध्वजाच्या विचारला राज्यातील आतापर्यंत 60 हजार लॉक ऑनलाइन तर 30 हजार ऑनलाइन जोडली गेली

    तर दरोरोज 6 हजार लोक जोडली जाताय, तर यातील त्यागाचा एकतेचा संदेश महत्वाचा

    या कार्यक्रमासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित

  • 12 Oct 2021 09:27 AM (IST)

    मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा जागीच मृत्यू, सोलापुरातील घटना

    सोलापूर –

    मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा जागीच मृत्यू

    अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील घटना

    माळकर रामचंद्र पवार असे मृत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव

    पवार यांच्या शेतात सोयाबीनची मळणी यंत्रावर सुरू होती रास

    मशीनवर हाताने सोयाबीन दाबत असताना मशीनने ओढून घेतल्याने खांद्यापासून वरचा शरीराचा भाग झाला चेंदामेंदा

    भास्कर पवार यांचा जागेवरच मृत्यू

  • 12 Oct 2021 09:27 AM (IST)

    परमबीर सिंग यांची नाशिक जिल्ह्यात बेनामी मालमत्ता?

    नाशिक –

    परमबीर सिंग यांची नाशिक जिल्ह्यात बेनामी मालमत्ता?

    मुंबई-समृद्धी महामार्गालगत नाशिक बेनामी मालमत्ता?

    परमबीर सिंग यांच्याशी संबंधित एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या संजय पुनुमियानं नाशिक जिल्ह्यात खरेदी केलीय शेत जमीन

    शेतकरी असल्याचं भासवून पुनुमियानं सिन्नरमध्ये खरेदी केली शेतजमीन

    संजय पुनिमिया विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    या जमीन व्यवहारात परमबीर सिंग भागीदार असल्याची चर्चा

  • 12 Oct 2021 09:26 AM (IST)

    क्रूज ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना एनसीबीने आज चौकशीसाठी 11 वाजता बोलावले

    क्रूज ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना एनसीबीने आज चौकशीसाठी 11 वाजता बोलावले

    – एनसीबीने इम्तियाजला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी शनिवारी NCB ने खत्रीची 8 तास चौकशी केली होती….

    – तर दुसरीकडे NCB ने क्रूझवर पार्टी आयोजित केलेल्या 2 आयोजकांना बोलावलंय… – – हे दोन्ही आयोजक दिल्लीचे रहिवासी आहेत… त्यांचीही चौकशी केली जाणार आहे…

  • 12 Oct 2021 09:06 AM (IST)

    जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    जळगाव

    जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    २१ नोंव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू

    पहिल्याच दिवशी १२७ उमेदवारी अर्जाची विक्री

    बँकेचे संचालक, आमदार चिमणराव पाटील यांनी दोन अर्ज

  • 12 Oct 2021 09:02 AM (IST)

    सोलापुरात 24 तासांत कोरोनामूळे 4 जणांचा मृत्यू

    सोलापुरात 24 तासांत कोरोनामूळे 4 जणांचा मृत्यू

    तर 54 जणांचा अहवाल पॉजिटीव्ह

    ग्रामीण मद्धे 51 रुग्ण तर शहरात कोरोनाचे 3 रुग्ण

  • 12 Oct 2021 08:58 AM (IST)

    यंदाच्या गाळप हंगामासाठी 7 साखर कारखान्यांना परवानगी

    सोलापूर – यंदाच्या गाळप हंगामासाठी 7 साखर कारखान्यांना परवानगी

    जिल्ह्यातील 33  साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी साखर आयुक्तांकडे दिला होता प्रस्ताव

    बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नसल्यामुळे गाळपासाठी परवानगी नाकारली

    येत्या 15 ऑक्टोंबर पासून ऊस गाळपाला होणार सुरुवात

  • 12 Oct 2021 08:58 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील 12 बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

    जळगाव जिल्ह्यातील 12 बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

    १६ डिसेंबर पासून निवडणुकांना प्रारंभ, नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीला सुरवात

    १७ जानेवारी २०२२ ला मतदान होणार

    जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांची माहिती

    जिल्हा बँक पाठोपाठ होणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका

  • 12 Oct 2021 08:58 AM (IST)

    पुण्यातील महाविद्यालये आजपासुन सुरू

    – पुण्यातील महाविद्यालय आजपासुन सुरू,

    – तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालय सुरू होणार,

    – लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास परवानगी,

    – एव्हीआयवरून लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 12 Oct 2021 08:57 AM (IST)

    नागपूर जिल्हापरिषद मध्ये काँग्रेसचा गट नेता कोण ?

    नागपूर जिल्हापरिषद मध्ये काँग्रेसचा गट नेता कोण ?

    काँग्रेस मधील अंतर्गत कलह मुळे चर्चा सुरू

    जेष्ठ सदस्य ला संधी की नवीन ला संधी मिळणार

    58 पैकी काँग्रेस चे 32 सदस्य आहेत त्यामुळे वाढली चुरस

    कोण होणार गट नेता याकडे लागले सगळ्याच लक्ष

  • 12 Oct 2021 08:27 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड  शहरातून  जाणारा  नाशिक  रोडवरील  मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी  कंपनीने आता  पूर्णपणे बंद  केलाय

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी-चिंचवड  शहरातून  जाणारा  नाशिक  रोडवरील  मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी  कंपनीने आता  पूर्णपणे बंद  केलाय

    -त्यामुळे पिंपरी-चिंचवडकराना मोठा  दिलासा  मिळाला आहे.

    -नाशिक  रोडवरील  मोशी-चांडोली टोल नाक्याचे रस्ता बांधणीचे  पुर्ण पैसे  वसूल  झाल्याने आयआरबीने टोलनाका  बंद  केलाय

    -८ ऑकटोबर २०२१ ला   मोशी-चांडोली टोलनाक्याची  मुदत  पूर्ण  झाली आहे. हा टोलनाका  बंद  झाल्याने  मोशी -चांडोली नाशिक  रोडवरील  वाहतूक कोंडी थोडी फार कमी  झाली आहे

    -त्यामुळे  या हायवे  रोडवरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या  पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान  व्यक्त  केलाय

  • 12 Oct 2021 08:10 AM (IST)

    नागपुरातील आठ जलकुंभातून आज पाणीपुरवठा बंद

    – नागपुरातील आठ जलकुंभातून आज पाणीपुरवठा बंद

    – महापारेषणने काल अकस्मात ९ तास वीजपुरवठा बंद केल्याचा फटका

    – वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम

    – वीज नसल्याने गोधणी पेंच जलशुद्धीकरण केंद्र ९ तास होते बंद

    – पाणीपुरवठा बंद असल्याने लोकांना मनस्ताप

  • 12 Oct 2021 08:09 AM (IST)

    रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकलेल्या शिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंत ठेव परत मिळणार

    पुण्यातील बँकेतील गैरव्यवहार रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकलेल्या शिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंत ठेव परत मिळणार,

    बँकेची केवायसी अर्जाची ठेव विमा महामंडळाकडून ( DICGC )कडून छाननी पुर्ण,

    दिवाळीआधी पात्र ठेवीदारांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव,

    या आधी रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातल्यानं ठेवीदारांना आपले पैसे काढता येत नव्हते,

    शिवाजीराव भोसले बँकेच्या 14 शाखा आहेत आणि 432 कोटींची ठेव आहे..

    याच बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात आमदार अनिल भोसले हे अटकेत आहे

  • 12 Oct 2021 08:06 AM (IST)

    शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेले घोड धरण 100 टक्के भरले

    शिरूर,पुणे

    -शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेले घोड धरण 100 टक्के भरले असुन धरणाच्या 7 दरवाज्यातून 5700 क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेय

    -डिंभे धरणातून 1000 क्युसेस तर घोडनदीच्या परीसरात सलग तीन दिवस पाऊस पडत असल्याने 3000 क्युसेस पाणी घोडनदीत येत असल्याने घोड धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे

    -यावर्षी सुरवातीला शिरुर तालुक्यात पाऊस कमी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

  • 12 Oct 2021 07:28 AM (IST)

    सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक, मतदान प्रक्रियेला सुरुवात

    बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक…

    – निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात..

    – सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रांवर..

    – बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यात ८३ मतदान केंद्र..

    – २५ हजार ५३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

  • 12 Oct 2021 06:51 AM (IST)

    सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा

    निफाड़

    – सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा

    – निफाड तालुक्यातील चांदोरी येथील उदय राजे लॉन्समध्ये सुरू होता अवैध दारूचा कारखाना

    – या कारवाईत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

    – बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स जप्त

    – अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारू रिकाम्या बाटल्या

    – 20 हजार लिटर स्पिरिट

    – दोनशे लीटर चे 90 ते 100 बॅरेल

    – रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते 10 हजार

    – देशी दारू बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या

    – एक मालट्रक

  • 12 Oct 2021 06:49 AM (IST)

    राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरत असल्याचे चित्र

    राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरत असल्याचे दिसून येत आहे

    कारण, काल दिवसभरात आढळलेली नवीन करोनाबाधितांची संख्या ही मार्च नंतर पहिल्यांदाच एवढी कमी आढळून आली आहे

    शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

    याचबरोबर करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील कमीच दिसत असल्याने, निश्चितच ही बाब सर्वांसाठी दिलासादायक म्हणावी लागणार आहे.

  • 12 Oct 2021 06:48 AM (IST)

    रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्या पवन कदम यांच्यावर गुन्हा दाखल

    ठाणे

    ठाणे रिक्षाचालक मारहाण प्रकरण

    टिव्ही 9 च्या बातमीचा दणका

    रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्या पवन कदम यांच्यावर गुन्हा दाखल

    काल महाराष्ट्र बंद च्या दिवशी रिक्षाचालकाला केली होती मारहाण

Published On - Oct 12,2021 6:45 AM

Follow us
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.