Maharashtra News LIVE Update | मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

| Updated on: Oct 26, 2021 | 3:23 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Oct 2021 07:12 PM (IST)

    मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

    इंदापूर :

    मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका, डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे भलेभले डाव कशे उलथवून लावायचे मला सर्व माहिती आहे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 2021 ‘इंदापूर तालुका निवड चाचणी’चे राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते उद्घाटन इंदापूर तालुक्यातील पडस्थळ या गावी सुरू आहे ‘महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा इंदापूर तालुका निवड चाचणी’

  • 24 Oct 2021 05:36 PM (IST)

    तोंडोळी बलात्कार प्रकरणातील 3 नराधमांना अटक

    औरंगाबाद :

    तोंडोळी बलात्कार प्रकरणातील 3 नराधमांना अटक

    आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केले चक्क ऊसतोडणी कामगारांचे वेषांतर

    नगर जिल्ह्यातील कोपरगावला जाऊन काल मध्यरात्री केली तिसऱ्या आरोपीला अटक

  • 24 Oct 2021 05:35 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 71 नवे कोरोनाबाधित, 103 जणांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात ७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १०३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. -१४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३८०४. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८९३. – एकूण मृत्यू -९०७२. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३८३९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५०६१.

  • 24 Oct 2021 05:20 PM (IST)

    भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करतेय, खरं आता लोकांसमोर येतंय : जयंत पाटील

    जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    हे खूप गंभीर आहे. तिथे खरंच अंमली पदार्थ होते का? अंमली पदार्थ तिथे कसं पोहोचले? कुणी ठेवले होते का? त्यानंतर जो घटनाक्रम आहे, भाजपची माणसं आरोपींना बाहेर आणताना दिसत आहेत. त्यानंतर अशाप्रकारे पैशांची मागणी होत असेल तर या प्रकरणात बरेच लोक असल्याची शक्यता आहे. बंर झालं आता लोकांसमोर खरी वस्तुस्थिती यायला लागली आहे. केंद्र सरकार भाजप एजन्सीचा दरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचं काम सुरुय, असं याच्यातून ऐकल्यावर आणि पाहिल्यावर दिसतंय

  • 24 Oct 2021 04:31 PM (IST)

    ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय : आमदार प्रणिती शिंदे

    सोलापूर :

    आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया :

    ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय

    यांच्या विरोधात बोललं तर उद्या माझ्याही घरी ईडीचे लोक येतील

    ईडीचे लोक कोणाच्याही घरी जातात आणि त्यांना चौकशीसाठी उचलतात

    पंतप्रधान आणि भाजप वाल्यांकडून देशात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं साजीश

    एमआयएम  वंचित पक्ष  दोन्ही पक्ष कोणत्याही कामाचे नाहीत

    दोन्ही पक्षाकडून पेटवण्याचे भांडण लावण्याचे काम

  • 24 Oct 2021 04:21 PM (IST)

    दिवाळीनंतर भाजपमध्ये गेलेले पुण्यातील नगरसेवक परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट

    पुणे :

    दिवाळीनंतर भाजपमध्ये गेलेले पुण्यातील नगरसेवक परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा गौप्यस्फोट

    भाजपात गेलेले नगरसेवकांचा पक्षात भ्रमनिरास झालाय

    लवकरच काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगपात यांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    शरद पवारांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पक्षाच्या बैठकीत प्रवेश करण्याची शक्यता

  • 24 Oct 2021 04:15 PM (IST)

    खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं? पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रक्षा खडसेंना टोला

    जळगाव :

    खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं? पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजप खासदार रक्षा खडसेंना टोला

    जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याच्या मुद्द्यावरून उठलेल्या वादंगावर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला टोला

    एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे

  • 24 Oct 2021 04:10 PM (IST)

    मुंबईत आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, वर्गात सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थी संतप्त

    मुंबईत आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, वर्गात सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थी संतप्त, शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या, पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

  • 24 Oct 2021 02:40 PM (IST)

    नवाब मलिक फक्त मुस्लिम समाजाचे असल्याने त्यांच्यावर घाणेरडे आरोप : संजय राऊत

    संजय राऊत पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार आहे मुंबई महाराष्ट्रात फारच कामाला लागलं आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घरातघरात, बाल्कनीत चरस-गांजाचे पिके काढतात, या राज्याचे लोकं अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरु आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचं वैभव आहे. त्या फिल्म इंडस्ट्रितसुद्धा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सुद्धा सिनेसृष्टी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरुन सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावं, अशाप्रकारचे प्रयत्न काही लोकं करत आहेत. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, कारवाई केली. ते ठीक आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणापासून मग रिया चक्रवर्तीपासून अन्य काही लोकं असतील, सतत असे गुन्हे निर्माण केले की त्यांच्या कारवाईवर संशय यावा. त्याच्यावर कुणी संशय निर्माण केला की मग आरोप करणाऱ्यांवर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, पाकिस्तानचे ब्रँड अम्बेसिडर आहात, असं म्हटलं जातं.

    अरे माझा महाराष्ट्र बदनाम होतोय. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. खरंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभं राहायला पाहिजे होते. कालपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही पुरावे समोर येत आहेत. जे पुरावे किंवा पंच म्हणून पुढे आले ते कोण होते? किती संशयास्पद चारित्र्याचे हे लोकं होते, त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण कशी झाली याचे पुरावे आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलंय की, अंमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतली आहे. ते आता सिद्ध झालं आहे. आज दोन प्रमुख व्हिडीओ समोर आले आहेत. ते बोलके आहेत. लपाछपवी करण्याची गरज नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने करावी. न्यायालयीन चौकशी करावी कारण हे प्रकरण साधं नाही.

    फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी, तर तसं नाही. हे सुद्धा तितकंच गंभीर प्रकरण आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे.

    नवाब मलिक यांनी या प्रकरणाच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. पण एकदा या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो मुखवटा आहे, खरा चेहरा आहे तो समोर आला पाहिजे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी असेल तुम्ही महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काय समजता? आम्ही घाबरत नाही तुम्हाला. तुम्ही आमच्याकडून, आमच्या फिल्म इंडस्ट्रिकडून ज्या खंडण्या उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत हे कोणाच्या सांगण्यावरुन, जी रक्कम काही कोटींमध्ये आहे. पुन्हा तुम्ही या तपास यंत्रणांच्या बाजून उभे राहतात, अधिकाऱ्यांची वकिली करतात, तुम्हाला महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी प्रेम नाही? तुम्हाला राज्याची बदनामी करण्याची जी उर्मी आलीय ते उघडी पडली आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी सुमोटो कारवाई केलीच पाहिजे.

    आमच्या सारखे लोकं यामध्ये भरडले जातो. आम्ही घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्य समोर जावं लागतं. आम्ही सामान्य कुटुंबातील लोकं आहोत. पण ईडीसमोर अत्यंत अपमानास्पद जावं लागतं. असे अनेक लोकांना जावं लागतं.

  • 24 Oct 2021 02:05 PM (IST)

    देशाच्या पंतप्रधानाच्या डोक्यात सत्तेचा मगरुरपणा – प्रणिती शिंदे

    सोलापूर –

    देशाच्या पंतप्रधानाच्या डोक्यात सत्तेचा मगरुरपणा

    सत्ता मिळाली बास झालं असं त्यांना आता कांही फरक पडत नाही

    शेतकऱ्यांच्या अंगावर बुलडोझर फिरवतात

    अन उद्घाघाटनाच्या कार्यक्रमाला जातात

    त्यांना लाज लज्जा वाटत नाही

    सत्ता मिळाली की अधिक आपुलकीने काम करायला पाहिजे मात्र पंतप्रधानच इतके मगृर त्यामुळे इकडचे लोक तसेच

    पंतप्रधान मोदी आणि स्थानिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यावर आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

  • 24 Oct 2021 02:02 PM (IST)

    धाडी टाकायच्या फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायचं असं सध्या सुरू आहे – पृथ्वीराज चव्हाण

    कोल्हापूर

    पृथ्वीराज चव्हाण –

    धाडी टाकायच्या फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायचं असं सध्या सुरू आहे

    पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली तर आम्ही मानलं असतं

    पण सगळं तोडपाणी करण्याकरिता हे सगळं चाललं आहे

    मोदी सरकारला केवळ आपल् यापक्षात घेण्यासाठी नेत्यांना भीती घालायची आहे

  • 24 Oct 2021 01:14 PM (IST)

    तोंडोळी येथील महिला अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात यश

    औरंगाबाद –

    तोंडोळी येथील महिला अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात यश

    गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेषांतर करून अहमदनगर जिल्ह्यात पकडले दुसऱ्या आरोपीला

    लूटमार करून महिलांवर केला अत्याचार आणि लहान मुलांना दिलेले चटके

    आणखी पाच आरोपींचा शोध कायम

    सासरवाडीत लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • 24 Oct 2021 12:37 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड पाठोपाठ शरद पवार पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात

    पिंपरी-चिंचवड पाठोपाठ शरद पवार पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात,

    दिवाळीनंतर आयोजित केली पक्षाची बैठक,

    बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार सूत्रांची माहिती,

    दिवाळीनंतर पवार निवडणूकींसदर्भात करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा,

    शहर कार्यकारीणानं शरद पवारांना मागितला होता वेळ,

    शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती

  • 24 Oct 2021 12:37 PM (IST)

    शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरण

    पुणे

    शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरण

    पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथून एकाला केली अटक

    बनावट धनादेश प्रकरणी केली अटक

    अमर श्रीरंग जाधव (रा. क्षेत्र माहूली,ता. सातारा) असे अटक केलेल्याचे व्यक्तिचे नाव

    न्यायालयाने जाधव याला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा दिला आदेश

  • 24 Oct 2021 12:08 PM (IST)

    आरोग्य परीक्षेत पुन्हा गोंधळ, आझम कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ

    – आरोग्य परीक्षेत पुन्हा गोंधळ

    – आझम कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ

    – परीक्षा हॉल मध्ये विद्यार्थी येऊन बसलेत मात्र पर्यवेक्षक अद्याप आले नाहीत

    – पेपरची वेळ 10 वाजताची होती

    – विद्यार्थी प्रचंड संतप्त

    – न्यासा कंपनीला परीक्षेचे काम दिले आहे

    – विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार

    – शिवाय संबधित कंपनीवर कारवाई करणार

    – परीक्षेच्या वेळेनंतर 1 तासांनी आरोग्य विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहचलेत

    – विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव

    – गोंधळानंतर आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा सुरु

    – १० वाजताची परिक्षाची वेळ असताना ११:३० वाजता पेपर पुन्हा सुरु

    – विद्यार्थींना परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे

    – गोंधळासंदर्भात आमच्या वरिष्ठांना कळवण्यात येणार

    – दीड तासानंतर परीक्षा सुरु

    – आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर भाजप युवा मोर्चा करणार

    – आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळावरून भाजप आक्रमक

    – शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 24 Oct 2021 11:22 AM (IST)

    भारताने नेहमीच जागतिक शांततेसाठी काम केले आहे – पीएम मोदी

    भारताने नेहमीच जागतिक शांततेसाठी काम केले आहे

    हे यूएन पीसकीपिंग फोर्समध्ये आमच्या योगदानामध्ये दिसून येते.

    भारत योग आणि निरोगीपणाच्या पारंपारिक पद्धती अधिक लोकप्रिय करण्यासाठी देखील काम करत आहे.

    पृथ्वीला एक सर्वोत्तम स्थान बनवण्यासाठी भारत महत्वाची भूमिका बजावेल

  • 24 Oct 2021 11:20 AM (IST)

    भारत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती

    पुढील महिन्यात, भारत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होईल

    त्यांच्या आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जसे की :

    स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगणे.

    पर्यावरणाची काळजी घेणे

    अन्यायाविरुद्ध लढा देणे

  • 24 Oct 2021 11:19 AM (IST)

    सर्वांकडून मी लोहपुरुषाला नमन करतो – पीएम मोदी

    येत्या रविवारी 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे ‘मन की बात’ च्या प्रत्येक श्रोत्याच्या वतीने, आणि माझ्या वतीने, मी लोहपुरुषाला सलाम करतो.

    आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण अशा काही उपक्रमांमध्ये सामील झाले पाहिजे जे ऐक्याचा संदेश देतात.

  • 24 Oct 2021 11:17 AM (IST)

    आपल्या लस कार्यक्रमाचे यश भारताची क्षमता दर्शवते, सर्वांच्या प्रयत्नांच्या मंत्राची शक्ती दर्शवते – मोदी

    आपल्या लस कार्यक्रमाचे यश भारताची क्षमता दर्शवते, सर्वांच्या प्रयत्नांच्या मंत्राची शक्ती दर्शवते

    माझ्या देशाच्या, माझ्या देशातील लोकांच्या क्षमतेची मला चांगली जाणीव आहे. मला माहीत होते की आमचे आरोग्य कर्मचारी देशवासीयांना लसीकरण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.

    मी भाग्यवान आहे की मला बागेश्वरला येण्याची संधी मिळाली, ते एक प्रकारे तीर्थक्षेत्र आहे, तेथे प्राचीन मंदिरे वगैरे आहेत. शतकानुशतके लोक कसे काम करत असावेत हे मी खूप प्रभावित झालो.

  • 24 Oct 2021 10:24 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या खरेदी विक्री संघात 41 लाखांचा भ्रष्टाचार

    – राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या खरेदी विक्री संघात 41 लाखांचा भ्रष्टाचार,

    – दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने संघात अपहार केल्याची फिर्याद,

    – लेखा परीक्षक राजेश भुजबळ यांनी यवत पोलिस स्टेशनला दाखल केली फिर्याद,

    – संघाचे २०१९ ते २०२० या काळातील लेखापरीक्षणात अपहार झाल्याचं समोर,

    – दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व

  • 24 Oct 2021 10:24 AM (IST)

    ऑनलाईन सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीला पिंपरी चिंचवड मधल्या भामट्याकडून तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांचा गंडा

    पिंपरी चिंचवड

    -ऑनलाईन सेवा देणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीला पिंपरी चिंचवड मधल्या भामट्याकडून तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांचा गंडा

    वाकड पोलिस ठाण्यात एकून 25 जणा विरोधात गुन्हा दाखल

    -आरोपींनी 4 लाख 98 हजार रुपयांचे अँपल एयरपॉड, 3 लाख 57 हजार 600 रुपयांचे एअरपॉड वायर चार्जर आणि 79 हजार 840 रुपयांचे वन प्लस कंपनीचे ब्लुटूथ हेडसेट मागवले याच वस्तूच्या बनावट वस्तू कंपनीला केल्या परत

    -तब्बल 9 लाख 35 हजार 440 रुपयांना कंपनीला फसवले

  • 24 Oct 2021 09:42 AM (IST)

    डीपीसीवरुन नागपूर जिल्ह्यात शिवसेनेत असंतोष

    – डीपीसीवरुन नागपूर जिल्ह्यात शिवसेनेत असंतोष

    – जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची घोषणा होताच शिवसेनेत असंतोष

    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार तक्रार

    – ग्रामीणच्या समितीत शहरातील सदस्य असल्याने सेना आमदार दुष्यंत चतुर्वेदींवर नाराजी

    – निष्ठावंतांना डावलल्याने शिवसैनीकांनी व्यक्त केली नाराजी

    – डीपीसीच्या सदस्य नियुक्तीवरुन शिवसेनेची काँग्रेसवरंही नाराजी

    – एकनाथ शिंदे यांना नागपुरचे संपर्क मंत्री बनवण्याची मागणी

  • 24 Oct 2021 09:34 AM (IST)

    पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ

    – पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ

    – दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

    – 25 ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 30 रुपये असणार

    – 10 नोव्हेंबर पर्यंत हे नवे दर लागू राहणार

  • 24 Oct 2021 09:33 AM (IST)

    सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीचा पुन्हा एल्गार

    कोल्हापूर

    सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीचा पुन्हा एल्गार

    महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापूर विभागाच्या वतीन 30 ऑक्टोबरया कोल्हापुरातील दसरा चौकात होणार धरणे आंदोलन

    एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांची माहिती

    1993 ला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चंदगड तालुक्यातील नवीन बेळगाव वसवण्याचा काढला तोडगा

    याचा तोडग्याचा पुनर्विचार करण्यासाठी होणार धरणे आंदोलन

    महाराष्ट्रातील आमदार खासदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे

    माजी आमदार दिगंबर पाटील यांच आवाहन

  • 24 Oct 2021 09:32 AM (IST)

    परवाना नसताना बॉयलर पेटविणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला नोटीस

    सोलापूर –

    परवाना नसताना बॉयलर पेटविणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला नोटीस

    प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस

    श्री सिदेश्वर साखर कारखाना व डिसलरी या दोन्ही प्रकल्पाला दिलेल्या परवानगी ची मुदत संपली

    नूतनीकरणासाठी 60 आठ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक असताना साखर कारखान्याने केले नाही अर्ज

  • 24 Oct 2021 09:31 AM (IST)

    इचलकरंजी शहरात हत्येचे सत्र सुरुच, तारदाळ येथे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या

    इचलकरंजी शहरातील हत्येचे सत्र सुरुच, तारदाळ येथे एका युवकाची डोक्यात धारदार शस्त्राने केली हत्या

    शहापूर लगत असणाऱ्या तारदाळ गावातील सांग ले  मळा शेतातील घटना

    एका युवकाची शेतामध्ये डोक्यात धारदार शस्त्राने केली अज्ञातांनी हत्या

    शहरातील शहापुर मध्ये असणाऱ्या प्राइड इंडिया कारखान्या लगत असणाऱ्या शेतामधील घटना

    घटनास्थळी पोलीस दाखल

  • 24 Oct 2021 08:24 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील महापुग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यातील महापुग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

    राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने नुकसान भरपाई दरामध्ये केली वाढ

    फरका सह वाढीव नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार

    बागायती पिकांसाठी आता प्रति गुंठा 150 रूपये, जिराईती साठी 100 तर बहुवार्षिक पिकांसाठी अडीचशे रुपये मिळणार

    नुकसान भरपाईच्या वाढीव फरकाची 18 कोटी 57 लाखांची गरज

    दोन दिवसात रक्कम प्रशासनाकडे वर्ग होणार

  • 24 Oct 2021 08:08 AM (IST)

    पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ

    – पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ,

    – दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय,

    – 25 ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 30 रुपये असणार,

    – 10 नोव्हेंबर पर्यंत हे नवे दर लागू राहणार

  • 24 Oct 2021 08:01 AM (IST)

    सोलापूर पुणे महामार्गावर टेम्पोचा अपघात, टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड

    सोलापूर – अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड

    सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे सकाळच्या सुमारास झाला टेम्पोचा अपघात

    अपघात ग्रस्त टेम्पो मधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

    पुण्यावरून सोलापूरकडे येत होता कोंबड्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने टेम्पो बाळे परिसरातच आहे थांबून

  • 24 Oct 2021 07:23 AM (IST)

    कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या 52 मुलांच्या खात्यात प्रत्येकी 5 लाख रुपयांची मुदत ठेव जमा

    नागपूर –

    कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या 52 मुलांच्या खात्यात प्रत्येकी 5 लाख रुपयांची मुदत ठेव जमा

    पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रमाणपत्र

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम

    एफडी स्वरुपात हा निधी जमा करण्यात आला असून 21 व्या वर्षी तो याना मिळणार

  • 24 Oct 2021 07:22 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ

    अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ

    67 टक्के नागरिकांनी पहिला डोस तर 23 टक्के नागरिकांना घेतले दोन्ही डोस

    तर 33 टक्के लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही.

    त्यामुळे सध्या लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवल्याच दिसतंय

  • 24 Oct 2021 07:22 AM (IST)

    डीपीसीच्या मुद्द्यांवरुन शिवसेनेत नाराजगी

    नागपूर –

    डीपीसीच्या मुद्द्यांवरुन शिवसेनेत नाराजगी

    शिवसेना काँग्रेस वर नाराज असल्याची माहिती

    जिल्हा नियोजन समिती आणि संजय गांधी निराधार योजना समिती वर ठरलेल्या फार्मूल नुसार भागीदारी मिळाली नसल्याने नाराजी

    ही नाराजी पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहचविण्याची तयारी

  • 24 Oct 2021 06:46 AM (IST)

    नागपूर एपीएमसी 40 उमेदवारांचं भाग्य मतपेटीत बंद

    नागपूर –

    नागपूर एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती ) 40 उमेदवारांचं भाग्य मतपेटीत बंद

    आज लागणार यांच्या भाग्याचा निकाल

    79.28 टक्के एवढं झालं मतदान

    आज दुपार पर्यन्त लागणार निकाल

    चुरशी ची झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागलं आहे लक्ष

  • 24 Oct 2021 06:46 AM (IST)

    सहा महिन्यात नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात 300 कोटींची घट

    – सहा महिन्यात नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात 300 कोटींची घट

    – कोरोनाच्या दोन्ही लाटांचा मनपाला फटका

    – पालिकेच्या अपेक्षित उत्पन्नात 28 टक्क्यांची घट झाल्याने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनाची धडपड

  • 24 Oct 2021 06:45 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील 20 हजार विध्यर्थी देणार आज आरोग्य विभागाची परीक्षा

    नागपूर –

    नागपूर जिल्ह्यातील 20 हजार विध्यर्थी देणार आज आरोग्य विभागाची परीक्षा

    52परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा

    याआधी तीन वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती

    दोन सत्रात घेतली जाणार आहे परीक्षा

    पहिल्या सत्रात 3 हजार 358 विद्यार्थी तर दुसऱ्या सत्रात 17 हजार 321 विद्यार्थी देणार परीक्षा

  • 24 Oct 2021 06:45 AM (IST)

    बोगस वेबसाईटवरून तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणूक प्रकरण

    उस्मानाबाद

    बोगस वेबसाईटवरून तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणुक प्रकरण

    4 वेबसाईट चालकांवर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद

    तुळजाभवानी देवीच्या पुजा, अभिषेक करण्याचे अमिश दाखवीत भक्तांची आर्थिक लूट

    www.tuljabhawanipujari.com, www.tuljabhwanimandir.org, www.shrituljabhavani.com, wwww.epuja.co.in या चार वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट केली असल्याचे स्पष्ट

    तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 420 फसवणुक,माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 सी व डी नुसार गुन्हा नोंद

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हा नोंद

  • 24 Oct 2021 06:41 AM (IST)

    नाशकात एका भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत वृद्धाला घातला गंडा

    – नाशकात एका भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत वृद्धाला घातला गंडा

    – मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या नावाखाली केली हातचलाखी

    – ऑनलाइन 1 लाख 51 हजार रुपये केले लंपास

    – आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल

Published On - Oct 24,2021 6:38 AM

Follow us
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.