Maharashtra News LIVE Update | बदलापुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

| Updated on: Sep 18, 2021 | 11:27 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | बदलापुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Sep 2021 08:00 PM (IST)

    बदलापुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

    बदलापूर :

    बदलापुरात भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

    बदलापूर पूर्वेच्या आदर्श कॉलेजसमोर झाला अपघात

    मंदा पडवळ (६०) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव

    रस्त्यावर पार्क केलेली कार आणि मागून येणारा टेम्पो यात अडकल्यानं महिलेचा झाला अपघात

    अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत झाली कैद

  • 18 Sep 2021 05:19 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 175 नवे कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात १७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २५३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. – १७६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९२२८. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७८१. – एकूण मृत्यू -८९९७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८४५०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८९१.

  • 18 Sep 2021 04:06 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे

    -शहरात गणेश विसर्जनासाठी दोन पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, 63 पोलीस निरीक्षक,79 पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, 808 पोलीस कर्मचारी, 126 होमगार्ड तैनात करण्यात येणार

  • 18 Sep 2021 03:18 PM (IST)

    बीडमध्ये पैशांच्या वादातून महिला आणि पुरुषात जुंपली

    बीड: पैशांच्या वादातून महिला आणि पुरुषात जुंपली

    एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

    बीडच्या मित्र नगर भागातील घटना

    महिलेची शिवाजीनगर पोलिसात तक्रार

    पीडित महिला आणि मारहाण करणारा पुरुष एकाच गावातील

  • 18 Sep 2021 03:17 PM (IST)

    अभिनेता सोनू सुदच्या मुंबईतील घरात आजही पाच आयटीचे अधिकारी दाखल

    अभिनेता सोनू सुद याच्या मुंबईतील घरात आजही पाच आयटीचे अधिकारी दाखल – अभिनेता सोनू सूदवर आयकर छाप्याच्या प्रकरणाला वेग – आयकर विभागाने देशभरात सोनू सूदच्या 28 ठिकाणी छापे टाकले – मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुडगाव येथे छापे टाकण्यात आले आहेत – 1.8 कोटी रोख रक्कम आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे. – 11 लॉकर्स अंडर स्कॅनर आहे. अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींचा व्यवहार कराबाबातही चौकशी सुरु

  • 18 Sep 2021 02:42 PM (IST)

    पैशांसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी, बीडमधील धक्कादायक प्रकार

    बीड:

    पैशांसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

    बीडमधील धक्कादायक प्रकार

    भाजीपाला विक्रेती महिलेला अमानुष मारहाण

    पतीने पैशे घेतले म्हणून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

    जाब विचारणाऱ्या महिलेलाच जबर मारहाण

    मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

    शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना

    पोलिसात अद्याप तक्रार नाही

    गमारहाणीची घटना 11 सप्टेंबर रोजीची

  • 18 Sep 2021 12:02 PM (IST)

    नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पार्थिवाला दिला खांदा

    नाशिक –

    – नाशिक पोलीस आयुक्तांच्या माणुसकीच दर्शन…

    – पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पार्थिवाला दिला खांदा…

    – पोलीस कर्मचारी प्रतीक जाधव यांच्या अचानक झालेल्या निधनाने पोलीस आयुक्त भावूक…

  • 18 Sep 2021 12:02 PM (IST)

    करुणा शर्मा यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

    बीड: करुणा शर्मा प्रकरण

    शर्मा यांचा कोठडीतिला मुक्काम वाढला

    जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

    सोमवारी होणार पुढील सुनावणी

  • 18 Sep 2021 12:01 PM (IST)

    चिखली अर्बन बँकेच्या गाडीवर दरोडा,

    औरंगाबाद –

    चिखली अर्बन बँकेच्या गाडीवर दरोडा

    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात घडली घटना

    बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मारहाण करत पळवली इनोव्हा गाडी

    गाडी घेऊन पाळणाऱ्या दरोडेखोरांचाही झाला अपघात

    पळून जाण्याचा प्रयत्नांत दरोडेखोरांची दुचाकीला धडक

    इनोव्हाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू

    अपघातानंतर गाडीसह दरोडेखोर सापडल्या पोलिसांच्या ताब्यात

    चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

    औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्री 1 वाजता घडली घटना

    शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

  • 18 Sep 2021 10:55 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबगाव या गावात शेततळ्यात हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली

    औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबगाव या गावात शेततळ्यात हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली

    प्रभाकर गाडेकर या शेतकऱ्याने शेततळ्यात मत्स्यपालन करण्यासाठी 10 हजार मत्स्यबीज सोडले होते

    मात्र, पाण्यात विषबाधा झाल्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे

    या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

  • 18 Sep 2021 10:51 AM (IST)

    गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा रूटमार्च

    – गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा रूटमार्च – भद्रकाली,जुने नाशिक परिसरात रुटमार्च – पोलीस अधिकारी, कर्मचारी, SRPF जवानांचा रूटमार्चमध्ये सहभाग – गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज

  • 18 Sep 2021 07:41 AM (IST)

    औरंगाबादेत रस्त्याच्या मागणीसाठी पाण्यात गावकऱ्यांचे अर्धनग्न जलआंदोलन

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत रस्त्याच्या मागणीसाठी पाण्यात गावकऱ्यांचे अर्धनग्न जलआंदोलन

    रस्त्याला साचलेल्या पाण्यातच गावकऱ्यांच्या आंदोलन..

    शिऊर ते सावखेड रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन..

    बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर जलआंदोलन मागे घेण्यात आले..

    लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने गावकरी उतरले होते पाण्यात..

  • 18 Sep 2021 07:40 AM (IST)

    खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 26 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

    औरंगाबाद –

    खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 26 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

    महिला पोलीस कर्मचारी सोबत केली होती लॉकडाऊनमध्ये अरेरावी

    लॉकडाऊनमध्ये दुकान उघडण्यासाठी घातली होती कामगार आयुक्तांशी हुज्जत

    सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,अधिकाऱ्याला धमकावणे, आपत्ती व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करण्यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचे 313 पानांचे दोषारोपपत्र दाखल

    तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ गणपत कराड यांनी केले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल..

  • 18 Sep 2021 07:39 AM (IST)

    नाशिक आग्रा महामार्गावर अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू

    नाशिक –

    – नाशिक आग्रा महामार्गावर अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू

    – सोमनाथ जाधव, गोरख जाधव यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झाला मृत्यू

    – वेसण सोडवण्यासाठी वणीला गेले असल्याची प्राथमिक माहिती

  • 18 Sep 2021 07:38 AM (IST)

    मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार

    कोल्हापूर

    मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची शिष्टमंडळाला माहिती

    महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीच झालंय नुकसान

    तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱयांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला मुदतवाढ मिळणार

    तर वाहून गेलेल्या विहिरींची खुदाई रोजगार हमी योजनेतून करण्याच्या हालचाली

  • 18 Sep 2021 07:34 AM (IST)

    हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने लाज देणाऱ्या दोघांना अटक

    पुणे :

    हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने लाज देणाऱ्या दोघांना अटक

    अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार कोलते यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर गुगल पे ने ५० हजार रुपये जमा करून लाच देण्याचा प्रयत्न

    दत्तात्रय हिरामण पिंगळे ( वय ३३, रा.देऊळगावगाडा, ता. दौंड जिल्हा पुणे) आणि अमित नवनाथ कांदे (वय २९, कमलविहार गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, ता.हवेली जिल्हा पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे

    खडक पोलीस करतायेत तपास

  • 18 Sep 2021 07:08 AM (IST)

    पुणे पोलीस दलात रिक्त असलेल्या शिपाईपदासाठी येत्या 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार

    पुणे :

    पुणे पोलीस दलात रिक्त असलेल्या शिपाईपदासाठी येत्या 5 ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार

    भरतीप्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा

    त्यासाठी २२ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळणार

    पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या २१४ जागांसाठी २०१९मध्ये जाहिरात दिली होती.

    या परीक्षेसाठी ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केलेत

    कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली होती

  • 18 Sep 2021 07:06 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा

    – मोरगाव रोड ते निरा रोड रस्त्याचं होणार अजितदादांच्या हस्ते भूमीपूजन

    – थोड्याच वेळात अजित पवार यांचं कार्यक्रमस्थळी होणार आगमन

  • 18 Sep 2021 07:06 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनापेक्षा डेंग्यूची जास्त दहशत

    – नागपूर जिल्ह्यात कोरोनापेक्षा डेंग्यूची जास्त दहशत

    – जिल्ह्यात रोज सरासरी सहा डेंग्यूचे रुग्ण

    – जिल्ह्यात आतापर्यंत १७२४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद

    – डेंग्यूच्या मृत्यूचा आकडा पोहोचला आठ वर

    – शहरात २०१९ नंतर सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद

  • 18 Sep 2021 07:05 AM (IST)

    सणासुदीच्या दिवसांत नागपुरात मिठाईत भेसळ

    – सणासुदीच्या दिवसांत नागपुरात मिठाईत भेसळ

    – नागपूरात ११ मिठाईच्या दुकानांवर एफडीए ची कारवाई

    – कारवाईत २६ हजारांचा दंड एफडीए ने केला वसूल

    – अन्न न औषध प्रशासन मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानं कारवाई

    – आणखी काही मिठाईची दुकानं एफडीए च्या रडारवर

  • 18 Sep 2021 07:03 AM (IST)

    करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    बीड : करुणा शर्मा प्रकरण

    करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

    अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी

    शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत

  • 18 Sep 2021 06:44 AM (IST)

    कामावरुन काढून टाकल्याने चालकाने पेटवली 22 लाखांची कार

    पिंपरी चिंचवड

    – कामावरुन काढून टाकल्याने चालकाने पेटवली 22 लाखांची कार

    -चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी भागत घडलीये

    -विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे

    -आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारचालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी महिलेनं कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली

Published On - Sep 18,2021 6:40 AM

Follow us
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.