Maharashtra News LIVE Update | राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स

| Updated on: Sep 30, 2021 | 11:43 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Sep 2021 09:48 PM (IST)

    राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स

    राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. पण सीबीआयकडून थोड्याच वेळात कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचं, याबाबतची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील या प्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंद केले आहेत. त्याच तपासाचा एक भाग म्हणून आता सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

  • 30 Sep 2021 08:35 PM (IST)

    हे सरकार वेळकाढूपणा करतेय : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    – मी परवापासून दौरा सुरू करतोय – तातडीची मदत करणे गरजेचे आहे – सरकार आपल्या पाठीशी आहे असा दिलासा मिळेल असं सरकारने काही केलं पाहिजे – मागील पुरात सरकारने मदत केली नाही – पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मदत केली पाहिजे – मी यापूर्वी आकड्यासह सांगितले – यूपीए सरकारे १५ वर्षात जेवढे पैसे राज्याला दिले नाही त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकारने आपत्तीत राज्याला दिले

    जलयुक्त शिवारला तज्ज्ञांनी म्हटलंय असं नाही – उच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती त्यात तज्ज्ञ होते – त्या समितीने उच्च न्यायालयास रिपोर्ट दिला, तो उच्च न्यायालयाने स्वीकारला – एकाद दुसरा व्यक्ती काय बोलतोय त्याला महत्त्व नाही – उलट जलयुक्त शिवारमुळे जे नदी नाल्यांचे खोलीकरण केले त्यामुळे शेती, घरात पाणी कमी गेले अन्यथा यापेक्षा जास्त पाणी गेले असते

    – हे सरकार वेळकाढूपणा करते बोटचेपेपणा करतंय

    – सावित्रीबाई फुले नावाबद्दल मला माहिती नाही

  • 30 Sep 2021 07:35 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित, 12 जणांची कोरोनावर मात

    नागपूर :

    नागपुरात आज 15 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    शून्य मृत्यू, तर 12 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 493303

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 483110

    एकूण मृत्यू संख्या – 10120

  • 30 Sep 2021 07:26 PM (IST)

    कोपरगाव शहरातील पुनम थिएटरला आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

    अहमदनगर :

    कोपरगाव शहरातील पुनम थिएटरला लागली आग आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न थिएटर बंद अवस्थेत असल्याने मोठा अनर्थ टळला थिएटरमधील रिकाम्या खुर्च्या, प्लास्टिक आगीत भस्मसात सायंकाळी साडेसहा वाजेच्या‌ सुमारास लागली आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 30 Sep 2021 06:33 PM (IST)

    मी काँग्रेस पक्ष सोडणार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची घोषणा

    मी काँग्रेस पक्षातून बाहेर निघणार आहे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग

  • 30 Sep 2021 06:28 PM (IST)

    चोरट्याला पकडून स्थानिकांकडून बेदम चोप, पालघरच्या नवापूर येथील घटना

    पालघर :

    चोरट्याला पकडून स्थानिकांकडून बेदम चोप

    पालघरच्या नवापूर येथील घटना

    सातपाटी पोलीस घटनास्थळी दाखल

    लाखो रुपये किमतीचे सोन्याचे ऐवज आणि काही रोख रक्कम चोरट्यांकडून हस्तगत

    चोरी करताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले

    चोरट्याला ग्रामस्थांकडून बेदम मारहाण करून केलं पोलिसांच्या स्वाधीन

    चोरट्याला रंगेहाथ पकडून चोपताना व्हिडिओ वायरल

  • 30 Sep 2021 06:27 PM (IST)

    अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी तरुण चढले तहसील कार्यालयाच्या गेटवर

    औरंगाबाद :

    अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी तरुण चढले तहसील कार्यालयाच्या गेटवर

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयातील प्रकार

    तहसील कार्यालयाच्या गेटवर चढून तरुणांचे आंदोलन सुरू

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची तरुणांची मागणी

    पाच तरुणांचं तहसील कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलन सुरू

  • 30 Sep 2021 05:39 PM (IST)

    तृणमूल काँग्रेस गोव्यात स्वबळावर सर्व 40 जागांवर निवडणूक लढवणार, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची माहिती

    तृणमूल काँग्रेस गोव्यात स्वबळावर निवडणूक लढवणार

    सर्व 40 जागांवर उमेदवार देणार.

    स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना प्राधान्य.

    पक्षात नव्याने प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची माहिती.

    पत्रकार परिषदेत दिली माहिती.

    काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबत फालेरो यांचे सावध उत्तर : स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच संधी असेल.

    पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौर्याबाबत घटस्थापनेनंतर निर्णय होणार.

  • 30 Sep 2021 05:38 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 185 नवे कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात १८५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १३८ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. – १८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०१०२६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४८७. – एकूण मृत्यू -९०२९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९०५१०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८४१.

  • 30 Sep 2021 04:56 PM (IST)

    केंद्र सरकारने आपलेपणाची भावना दाखवनू महाराष्ट्राला मदत करावी : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    पावसामुळे सोयाबीन, कापसाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

    त्याबाबतचे पंचनामे चालू आहेत. तसेच त्याबाबतचे रिपोर्ट विभागीय आयुक्त आणि जिल्हादिकाऱ्यांकडून येत आहे.

    शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांसोबत सतत संपर्कात आहोत.

    पीकविम्या संदर्भात कंपन्यांना विमा कंपन्यांना शेतकऱ्याला उभारी देण्याकरता शंभर टक्के मदत करायला सांगितलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून एनडीआरएफचं पॅकेज दिलं जातं. पण आतापर्यंत अपेक्षित असं पॅकेज मिळालेलं नाही.

    केंद्र सरकारने आपलेपणाची भावना दाखवनू मदत केली पाहिजे.

    आम्ही कोकण किनारपट्टीला तीन हजार कोटींचा कार्यक्रम दिला आहे.

  • 30 Sep 2021 04:40 PM (IST)

    आमदार सुहास कांदे यांच्या अडचणी दूर करु, आम्ही त्यांना सहकार्य करु : छगन भुजबळ

    मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतीस मुद्दे :

    – या वर्षी फक्त 10 टक्के पैसे आले असून फक्त कोरोना साठी वापरण्याचे आदेश आहेत – बाकी पैसे आले की अडचणी दूर करू – माझ्याकडे निधी मागण्यासाठी कोणीही आलं तरी,जिल्हाधिकारी यांनी उचित कारवाई करावी असा रिमार्क असतो – आमदार निधी हा आमदाराचा असतो, डीपीडिसी चा निधी हा प्रशासनाचा अधिकार – कमी पैसे मिळाले अस त्यांचं म्हणणं असेल तर निधी आल्यावर उचित कारवाई केली जाईल – लोकप्रतिनिधींची अडचण आम्ही दूर करू – भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करू – मविआ चे आमदार म्हणून कोर्टात जाण उचित नाही – आपले न्यायाधीश मुख्यमंत्री – त्यांना सांगू -मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आपलं कोर्ट आहे – एकमेकांवर आरोप करत योग्य नाही – मला नाही सांगायचं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं – 2015 साली बीजेपी चे सरकार होते – चौकशीत काही सापडलं नाही म्हणून काही झालं नाही – भुजबळ कोणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात – कदाचित येणाऱ्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय होईल – तेव्हा आम्हाला एकत्र लढावं लागेल – या प्रकरणाला माझ्याकडून मी पूर्णविराम देऊ इच्छितो

    – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी मिळून काम करू – मीडिया समोर जाणं दुःखदायक – मी तरी थांबण्याचा निर्णय घेतलाय – मला काही वाटलं तर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल – इतरांची काही अडचण असेल तर मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेल – पवार साहेबांना देखील हे सांगितलं – सगळ्यांना वाटत हे थांबलं पहिजे – भुजबळ विरुद्ध सेना हा संघर्ष नाही

  • 30 Sep 2021 04:15 PM (IST)

    जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर हा विचार हास्यास्पद : चंद्रकांत पाटील

    भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यापत्रकार परिषदेतील मुद्दे :

    जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर हा विचार हास्यास्पद

    मनसे आणि भाजप यांच्यात युती होण्याचा संबंधच नाही

    युती स्थानिक पातळीवरील घटनांवर अवलंबून असते. स्थानिकांना आवश्यकतेनुसार पालघरात युती झाली. त्याचा राजकीय पातळीवर संबंध नाही

    नाशिकमध्ये भाजप-मनसे युतीचा संबंध नाही

    राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाचं गांभीर्य कळालं नाही

    महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 700 कोटी मिळाले

  • 30 Sep 2021 03:17 PM (IST)

    मंत्री छगन भुजबळ यांना निधी वाटपाचा अधिकार नाही, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची प्रतिक्रिया

    शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    मंत्री छगन भुजबळ यांना निधी वाटपाचा अधिकार नाही

    भुजबळांकडून निधी वाटप हा गैरव्यवहार

    भुजबळांनी अधिकार नसताना निधीचे वाटप केले. त्यांनी नगरसेवकांना पैसे दिले नाहीत. त्यांनी कंत्राटदारांना पैसे गिले. त्यांनी 12 पैकी 10 कोटी रुपये कंत्राटदारांना दिले

    आम्ही आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांपुढे मांडलं आहे. मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील. आमचा पक्ष आदेशावर चालतो. आमचे साहेब जे आदेश देतील त्या आम्ही मानू.

    हा महाविकास आघाडीचा वाद नाही. डिटीपीचा वाटपाचा वाद आहे

  • 30 Sep 2021 02:50 PM (IST)

    दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार : मंत्री उदय सामंत

    मंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार

    कॉलेज सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

    सीईटीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत

    कॉलेज सुरु होण्याबाबतचा निर्णय कोरोनाचा विचार करुनच घेणार

    आतातरी ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा विचार आहे

    काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी झालीय त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्याचा विचार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु

  • 30 Sep 2021 01:03 PM (IST)

    आमदार प्रशांत बंब यांनी जलयुक्त शिवार योजनेवरील आरोप फेटाळले

    औरंगाबाद –

    आमदार प्रशांत बंब यांनी जलयुक्त शिवार योजनेवरील आरोप फेटाळले

    जलयुक्त शिवार योजनेचा पूरपरिस्थितीशी काहीही संबंध नाही

    हे जलयुक्तमुळे घडलं असतं तर मराठवाड्यात भात शेती करावी लागली असती

    मराठवड्यातली पूरपरिस्थिती ही बेसुमार वाळू उपसा यामुळे Nनिर्माण झाली आहे.

    जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळात मदत करणारी योजना आहे.

  • 30 Sep 2021 01:03 PM (IST)

    डिघोळ अल्पवईन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेदार्थ परभणीत आक्रोश मोर्चा

    परभणी डिघोळ अल्पवईन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेदार्थ परभणीत आक्रोश मोर्चा

    वसंतराव नाईक यांच्या पूतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा

    मोर्च्यात परभणी जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आंदोलक बसहभागी

    हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे

    सामुहिक अत्याचार प्रकरणातील तीनही नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी

    पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी

    तसेच वीस लाख रुपयाचे अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे

  • 30 Sep 2021 11:25 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे 9 दरवाजे केले पुन्हा बंद

    औरंगाबाद –

    जायकवाडी धरणाचे 9 दरवाजे केले पुन्हा बंद

    आता फक्त 18 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

    79 हजारावरून पाण्याचा विसर्ग 55 हजारावर

    10 ते 27 नंबरचे दरवाजे 4 फुटांनी सुरू

    गोदावरी नदीत अजूनही पूरस्थिती कायम

  • 30 Sep 2021 11:25 AM (IST)

    जायकवाडीच्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यात पूरपरिस्थिती

    बीड: जायकवाडीच्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यात पूरपरिस्थिती

    गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनच्या शनी मंदिराला पाण्याचा वेडा

    गेवराई तालुक्यातील 8 गावांना सतर्कतेचा ईशारा

  • 30 Sep 2021 10:27 AM (IST)

    मुंबईच्या केईएम रुग्णालय, सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    मुंबईच्या केईएम रुग्णालय व सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    हे सर्व २२ विद्यार्थी एमबीबीएसच्या दुस-या वर्षातील आहेत

    विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत

    मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झालीय

    क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता

    कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केले असून होस्टेल शील केले जाण्याची शक्यता

  • 30 Sep 2021 10:04 AM (IST)

    कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलांना एक किंवा दोन्हीही पालकांना गमवलं

    पुणे

    कोरोनामुळे जिल्ह्यात 1 हजार 920 मुलांना एक किंवा दोन्हीही पालकांना गमावलं

    पुणे जिल्हा कोव्हिड टास्क फोर्सच्या नवीन आकडेवरून समोर आली माहिती

    कोरोनामुळे 1 हजार 621 मुलांच्या वडिलांचा तर 237 मुलांच्या आईचा मृत्यू

    जिल्ह्यातील 62 मुलांच्या आई आणि वडिलांचाही मृत्यू

    वयोगटानुसार आकडेवारी पाहिली तर, 11 ते 14 वयोगटात असणाऱ्या 566 मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू

    6 ते 10 वयोगटातील 518 मुलं पोरकी

    15 ते 18 वयोगटातील 493 मुलांनी पालक गमावले

    तर सहा वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या 335 चिमुकल्यांचे छत्र हरवले

    19 ते 23 वयोगटातील 9 तरुणांनी कोरोनाकाळात एक किंवा दोन्हीही पालकांचा मृत्यू

  • 30 Sep 2021 10:03 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार हेक्टर शेती पाण्याखाली

    औरंगाबाद-

    औरंगाबाद जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार हेक्टर शेती पाण्याखाली

    अनेक ठिकाणी शेतीत साचलेय तळ्यासारखे पाणी

    तब्बल 3 लाख 72 हजार हेक्टरवरील पिके पूर्णपणे झाली उध्वस्त

    तर तब्बल 7 हजार हेक्टर शेतजमिनी पुराच्या पाण्यात गेल्या वाहून

    औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अंदाज

    शेतीचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल

  • 30 Sep 2021 10:03 AM (IST)

    रवी राणा यांच्याविरोधातील कारवाईबाबत उच्च न्यायालयाची विचारणा

    – रवी राणा यांच्याविरोधातील कारवाईबाबत उच्च न्यायालयाची विचारणा

    – नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला केली विचारणा

    – निवडणूकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचं प्रकरण

    – उत्तर सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाला दोन आठवड्याची वेळ

    – सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी दाखल केलीय याचिका

    – निवडणुकीत २८ लाखांची खर्चमर्यादा असताना, ४१ लाख खर्च केल्याचा आरोप

  • 30 Sep 2021 10:02 AM (IST)

    जळगावात सहा महिन्यात 9 लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप

    जळगाव –

    सहा महिन्यात 9 लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप

    आता मोजावे लागणार 10 प्रति थाळी, दीडपट इष्टांकही झाला बंद

    जिल्ह्यात एकूण दिल्या जातात 4600 शिवभोजन थाळी प्रतिदिवस

  • 30 Sep 2021 10:02 AM (IST)

    गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा फटका, राज्यात सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन घटणार

    – गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा फटका

    – राज्यात सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन घटणार

    – महाराष्ट्रात सोयाबीनचं ६० टक्के उत्पादन घटणार

    – कापसाच्या पिकालाही मोठा फटका

    – कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांची माहिती

    – आर्थिक संकट आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढवण्याचीही भिती

    – पुढील वर्षी सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा जाणवण्याची भिती

    – सरकारने तात्काळ कर्जवसूली थांबवण्याची मागणी

  • 30 Sep 2021 10:01 AM (IST)

    सार्वजनिक आरोग्य विभागानंतर आता ग्रामविकास विभागाच्या भरती प्रक्रियेतही गोंधळ

    – सार्वजनिक आरोग्य विभागानंतर आता ग्रामविकास विभागाच्या भरती प्रक्रियेतही गोंधळ

    – विशेष म्हणजे जिल्हास्तरावरील आरोग्य सेवकांची भरती करणाऱ्या या परीक्षेचं कंत्राटही न्यासालाच,

    – यामध्ये टेक्निकल एरर दाखवत उमेदवारांना एका पेक्षा अधिकवेळा शुल्क भरावे लागत आहे,

    – अर्जदारांच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार,

    – काही अर्जदारांच्या लॉगीनवर दुसऱ्याच उमेदवाराचा अर्ज दिसत आहे,

    – हेल्पलाइन क्रमांकावरून यासंबंधी माहिती मिळत नाही.

  • 30 Sep 2021 10:01 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

    पुणे –

    – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर,

    – आज संध्याकाळी राज पुण्यात दाखल होणार,

    – उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक,

    – शिवाय शनिवारी शाखाध्यक्षांचा घेणार मेळावा,

    – राज यांच्या पुणे दौऱ्याकडे मनसैनिकांचे लक्ष.

  • 30 Sep 2021 10:00 AM (IST)

    जायकवाडी धरणातून 89 हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

    औरंगाबाद –

    जायकवाडी धरणातून 89 हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग सुरू

    गोदावरी नदीत पूर परिस्थिती

    पैठण शहरातील तीन घाट गेले पाण्याखाली

    तर एकनाथ महाराज पालखी ओट्याला लागले पाणी

    जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कायम राहण्याची शक्यता

  • 30 Sep 2021 09:58 AM (IST)

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    सोलापूर – काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावर गुन्हा दाखल

    सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल

    इंधन व गॅस सिलेंडर सहज जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात झाल्यावर होते आंदोलन

  • 30 Sep 2021 08:17 AM (IST)

    पुण्यात बलात्कार पिडीतेचा पहिल्यांदाच नोंदवला व्हीज्युअली जबाब

    पुणे

    पुण्यात बलात्कार पिडीतेचा पहिल्यांदाच नोंदवला व्हीज्युअली जबाब,

    व्हीज्युअली जबाब नोंदवण्याची देशातील पहिलीच घटना,

    अवघ्या साडेचार वर्षाच्या मुलीवर रिक्षाचालकांन अत्याचार केल्यानं मुलगी अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेली नाहीये,..

    तिला बाहुली देऊन तिच्यासोबत काय घडलं ? याचं व्हीज्युअली रेकॉर्डींग करण्यात आलंय…

    आता हाच पुरावा न्यायालयात सादर केला जाणाराय,

    9 सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानकाच्या पदपथावर राहणाऱ्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता,

    बंडगार्डन पोलीसांनी अनोखा पद्धतीने व्हीज्युअली जबाब नोंदवण्याची पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे

  • 30 Sep 2021 08:16 AM (IST)

    कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

    पुणे –

    – कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला,

    – तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी मारणेवर गुन्हा दाखल,

    – मारणे याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता,

    – मात्र त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांचा विरोध.

  • 30 Sep 2021 08:16 AM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 8 ऑक्टोंबरला सोलापूर दौऱ्यावर

    सोलापूर –

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 8 ऑक्टोंबरला सोलापूरच्या दौऱ्यावर

    महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित

    नगरसेवक व पदाधिकारी यांच्याशी सुद्धा साधणार  संपर्क

  • 30 Sep 2021 08:15 AM (IST)

    पुण्यात आज लस उपलब्ध मात्र केवळ सिंरींज अभावी लसीकरण राहणार बंद

    पुणे –

    पुण्यात आज लस उपलब्ध मात्र केवळ सिंरींज अभावी लसीकरण राहणार बंद,

    पालिकेकडे अवघ्या 600 चं सिरींज उपलब्ध,

    5 ते 6 लाख सिरींजची पालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्टोअर विभागानं केली मागणी,

    पालिकेकडे आज 17 हजार डोस मात्र सिरींज अभावी लसीकरण राहणार बंद,

    लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती मात्र आता लस असून सिरींज नसल्यानं लसीकरण राहणार बंद…

  • 30 Sep 2021 08:15 AM (IST)

    व्हॉट्सअपवरील डीपी चोरुन फसवणूक

    नाशिक – व्हॉट्सअप वरील डीपी चोरून केली फसवणूक

    प्रसिद्ध बिल्डरच्या बाबतीत प्रकार घडल्याने आश्चर्य

    व्हॉट्सअप डीपी चोरून तयार केले फेक अकाउंट

    ओळखीच्या लोकांकडे केली पैशांची मागणी

    सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल

  • 30 Sep 2021 08:14 AM (IST)

    मनोहर मामा भोसलेचे करमाळा येथील बँक खाते पोलिसांकडून सील

    सोलापूर – मनोहर मामा भोसलेचे करमाळा येथील बँक खाते पोलिसांकडून करण्यात आले सील

    पोलिसांना मनोहर भोसले सहकार्य करत नसल्याचा आले समोर

    प्रत्येक प्रश्नाला माझं नशीब एवढंच उत्तर देत असल्याची माहिती

    बलात्कार प्रकरणी करमाळा पोलिसांच्या अटकेत आहे मनोहर मामा भोसले

  • 30 Sep 2021 08:14 AM (IST)

    नागपूर विषारी सुपारी तस्करीचं हब

    – नागपूर विषारी सुपारी तस्करीचं हब

    – एफडीए घेत आहेत विषारी सुपारी व्यावसायिकांचा शोध

    – उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत विषारी सुपारीचा व्यवसाय

    – करचोरीची तपासणी आणि चौकशी होणार

    – विषारी सुपारी व्यावसायिक भुमिगत झाल्याची माहिती

    – पोलीस आणि एफडीए अधिकाऱ्यांच्या आश्रयाने अवैध सुपारीचे कारखाने चालत असल्याचा आरोप

  • 30 Sep 2021 08:13 AM (IST)

    नाशकात घटस्थापनेपासून शहरात धावणार आणखी 44 बसेस

    नाशिक – घटस्थापने पासून शहरात धावणार आणखी 44 बसेस

    आणखी 12 नवीन मार्गांशी शहर जोडले जाणार

    सोमवार पासून सिन्नर,त्रंबकेश्वर ला देखील बसेस

    सद्यस्थितीत 22 मार्गांवर धावत आहेत 81 बसेस

    आतापर्यंत किमान 12 लाख प्रवाशांना सेवा

  • 30 Sep 2021 08:13 AM (IST)

    पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

    पुणे –

    – पुण्यासह राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता,

    – मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता,

    – हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज,

    – गुलाब चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता,

    – मात्र त्याचा धोका राज्य किंवा देशाच्या किनारपट्टीला नसल्याचेही स्पष्ट.

  • 30 Sep 2021 08:12 AM (IST)

    नाशकात दोन दिवसांनंतर पावसाची विश्रांती, जिल्ह्यातील तब्बल 13 धरण भरले काठोकाठ

    नाशिक – दोन दिवसांनंतर पावसाची विश्रांती

    जिल्ह्यातील तब्बल 13 धरण भरले काठोकाठ

    तर 15 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

    पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश..

    लासलगाव,येवला,नांदगाव, मालेगाव मध्ये सर्वाधिक नुकसान

  • 30 Sep 2021 08:12 AM (IST)

    सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले

    सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण

    ग्रामीण भागात केलेल्या 8 हजार 572 चाचण्यांमध्ये 126 रुग्ण आढळले

    सर्वाधिक माळशिरस मध्ये 29 पंढरपूर 25 करमाळा 17 रुग्णांचा समावेश

  • 30 Sep 2021 08:10 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 18 वर्षाखालील मुलांना देवदर्शन नाही

    – नागपूर जिल्ह्यात 18 वर्षाखालील मुलांना देवदर्शन नाही

    – लसीकरण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

    – नागपूर जिल्हाधिकारी विमला आर यांनी जारी केले आदेश

    – सात ॲाक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी सुरु होणार मंदिर

    – धार्मिक स्थळी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग गरजेचं

  • 30 Sep 2021 08:10 AM (IST)

    वारंवार निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे सोलापूरसाठी 5 इंजिन बोटी मंजूर

    सोलापूर –

    वारंवार निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे सोलापूरसाठी 5 इंजिन बोटी मंजूर

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य शासनाकडे केली होती बोटीची मागणी

    आठ दिवसात बोटी सोलापूर जिल्हा प्रशासनाला मिळणार

  • 30 Sep 2021 08:09 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील दीड हजार शिक्षकांना वाटते कोरोना लसीची भिती

    – नागपूर जिल्ह्यातील दीड हजार शिक्षकांना वाटते कोरोना लसीची भिती

    – जिल्ह्यातील दीड हजार शिक्षकांनी घेतली नाही कोरोना लस

    – शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यात धक्कादायक वास्तव उघड

    – ४ ॲाक्टोबरपासून शाळा सुरु होणार, पण काही शिक्षणांनी घेतली नाही लस

    – ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी, आणि शहरातील ८ वी ते १२ च्या शाळा सुरु होणार

    – शिक्षकांनी लस न घेतल्याने पालकांमध्ये नाराजी

  • 30 Sep 2021 07:42 AM (IST)

    नागपुरात 4 ऑक्टोबर पासून प्रत्येक्ष शाळा सुरु करण्याची तयारी सुरु

    नागपूर –

    4 ऑक्टोबर पासून प्रत्येक्ष शाळा सुरू करण्याची तयारी सुरु

    शिक्षण संस्थांनी तयारी सुरू केली

    मात्र अद्याप स्थानिक प्रशासनाचे आदेश पोहचले नसल्याने शाळांचा संभ्रम कायम

    शहरी भागात 8 ते 12 आणि ग्रामीण भागात 5 ते 12 चे वर्ग सुरू करण्याचा शासनाचा निर्णय

    शाळांकडून पालकांचे जाणून घेतले जात आहे विचार

    पालकांचे संमती पत्र आवश्यक

  • 30 Sep 2021 07:41 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या नुकसानभरपाईचे 148 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा

    कोल्हापूर

    जिल्ह्यातील महापुराच्या नुकसानभरपाईचे 148 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा

    जमा झालेला निधी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तहसीलदार कार्यालयांकडे वर्ग

    सोमवारपासून नुकसान भरपाई चे होणार प्रत्यक्ष वाटप

    दोन महिन्यानंतर पुरग्रस्तांना मिळणार काहीसा दिलासा

    करवीर तालुक्यात साठी सर्वाधिक 44 कोटींचा निधी प्राप्त

    जुलै महिन्यात आलेल्या महापुराने कोल्हापूर जिल्ह्यात झालेय मोठ नुकसान

  • 30 Sep 2021 07:40 AM (IST)

    नागपुरातील मेयो आणि मेडीकलमधील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा

    – नागपुरातील मेयो आणि मेडीकलमधील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा

    – डॉक्टरांचे करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन न पाळल्याचा आरोप

    – निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय

    – डॅाक्टरांच्या संपामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याचा धोका

  • 30 Sep 2021 07:40 AM (IST)

    सायबर गुन्ह्यांसाठी पुणेकर सॉफ्ट टार्गेट

    पुणे –

    – सायबर गुन्ह्यांसाठी पुणेकर सॉफ्ट टार्गेट,

    – मागील नऊ महिन्यात विविध सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ५६७२ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे हे केवळ ऑनलाइनद्वारे,

    – त्यापाठोपाठ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटर या समाजमाध्यमांद्वारे नागरिकांची सर्वाधिक आर्थिक फसवणूक,

    – शहरात मागील नऊ महिन्यांत साडेबारा हजारांहून अधिक तक्रारी सायबर पोलिसांकडे नोंद,

    – त्यातून पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजतेने अडकत असल्याचं स्पष्ट.

  • 30 Sep 2021 07:40 AM (IST)

    नागपुरात चाकूचा धाक दाखवत 21 लाख रुपये लूट प्रकरणात काल तीन आरोपीला अटक

    नागपूर –

    चाकूचा धाक दाखवत 21 लाख रुपये लूट प्रकरणात काल तीन आरोपीला अटक

    आता पर्यंत पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात , मुंबईला पाळलेला आरोपी सुद्धा लागला पोलिसांच्या हाती

    21 लाख पैकी एका आरोपी कडून 4 लाख तर दुसऱ्या कडून 6 लाख 32 हजार रुपये पोलिसांनी केले जप्त

    25 सप्टेंबर ला इतवारी परिसरातील चिंतेश्वर मंदिर परिसरात भर दिवसा झाली होती लूट

    अजूनही काही आरोपी आहे पोलिसांच्या रडारवर

  • 30 Sep 2021 07:39 AM (IST)

    कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनही दंड थोपटले

    कोल्हापूर

    कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनही दंड थोपटले

    शिवसेनेचा पहिला महापौर करण्यासाठी सज्ज व्हा

    राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच शिवसैनिकांना आवाहन

    महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडला शिवसैनिकांचा मेळावा

    त्रिसदस्यीय प्रभाग रचना शिवसेनेच्या फायद्याची ठरणार

    त्यामुळे पक्ष म्हणून शिवसेना नवीन रणनीती आखणार असल्याची राजेश क्षीरसागर यांची माहिती

  • 30 Sep 2021 07:39 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे सर्वच 27 दरवाजे उघडले

    जायकवाडी धरणाचे सर्वच 27 दरवाजे उघडले

    18 दरवाजे 4 फुटांनी तर 8 दरवाजे दीड फुटांनी उघडले

    जायकवाडी धरणातून 89 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू

    जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीत पूर परिस्थिती

    सध्या जायकवाडी धरणात 89 हजार क्यूसेक्स ने अवाक सुरू

  • 30 Sep 2021 06:53 AM (IST)

    गुड न्युज, नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत शून्य कोरोना रुग्ण

    – गुड न्युज, नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत शून्य कोरोना रुग्ण

    – तब्बल १६ महिन्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा ‘झिरो’

    – २४ तासांत नागपूर जिल्ह्यात एकंही कोरोना मृत्यू नाही

    – यापूर्वी १६ मे २०२० ला होती झिरो कोरोना रुग्णांची संख्या

    – झिरो कोरोना रुग्णसंख्येमुळे मोठा दिलासा

    – ४३९४ संशयितांच्या चाचण्यांपैकी सर्व निगेटिव्ह

Published On - Sep 30,2021 6:32 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.