Maharashtra Breaking News LIVE : अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. यात महिला जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी- चिंचवड च्या भोसरी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अपघात घडल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अश्फाक मकानदार यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज या तिघांची पोलीस कोठडी संपत आहे. सुनावणी दरम्यान होणाऱ्या पोलिसांच्या दाव्याकडे असणार लक्ष. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कर्नाटक हायकोर्टाचा मोठा दिलासा
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कर्नाटक हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेल्या निर्णयाला कोर्टाने दिली स्थगिती आहे. येडियुरप्पा यांना पुढील सुनावणी पर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार येडियुरप्पा यांना १७ जून रोजी CID समोर तपासासाठी हजर राहावे लागणार आहे.
-
टीएमसीने पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीसाठी 4 उमेदवारांची यादी जाहीर
10 जुलै रोजी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टीएमसीने चार उमेदवारांची यादी जाहीर केली. रायगंजमधून कृष्णा कल्याणी, रनघट दक्षिणमधून मुकूट मनी अधिकारी, माणिकतलामधून सुप्ती पांडे आणि बागदाहमधून मधुपर्णा ठाकूर यांना तिकीट दिलं आहे.
-
-
उज्जैनमध्ये बुकींवर मोठी कारवाई, 15 कोटी रुपये जप्त
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बुकींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बुकींकडून सुमारे 15 कोटी रुपये जप्त केले आहेत. सट्टेबाजांकडून विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे.
-
दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पुढील पाच दिवस कडक ऊन पडणार आहे. याबाबत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस दिल्ली आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
-
छत्तीसगडचे मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये, डीएम आणि एसपीचं केलं निलंबन
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी बलोदा बाजारचे तत्कालीन जिल्हाधिकारी केएल चौहान आणि एसपी संदानंद कुमार यांना निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे.
-
-
विशाल अग्रवाल , शिवाणी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांना कोर्टात हजर केलं
पुण्यातील कार अपघात प्रकरण. रक्त चाचणी फेरफार प्रकरणात आज विशाल अग्रवाल , शिवाणी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांना कोर्टात हजर केलं. आज पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आल आहे.
-
वन रँक वन पेन्शन मध्ये समानता आणा, माजी सैनिकांची मागणी
वन रँक वन पेन्शन मध्ये समानता आणा अशी मागणी माजी सैनिकांनी केली आहे. वन रँक वन पेन्शन सध्या 2014 पर्यंतच्या पगाराप्रमाणे आहे. तर आता पेन्शन 2019 च्या वेतनश्रेणी प्रमाणे करण्यात यावी अशी इंडियन एक्स सर्व्हिसमेन मुव्हमेंट या संस्थेने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
-
चामुंडा कंपनीच्या गेट समोर मृतदेह ठेऊन गावकऱ्यांचा आक्रोश
नागपूरमधील धामना येथील स्फोट झालेल्या चामुंडा कंपनीच्या गेट समोर मृतदेह ठेऊन गावकऱ्यांचा आक्रोश. जो पर्यंत मदतीचा चेक मिळत नाही तो पर्यंत अंतिम संस्कार नाही. गावकरी संतप्त झालेत.
-
प्रवाशांच्या जीवीताला धोका
सांगली जिल्ह्यात काल गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशाच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनला आहे. दरड कोसळणाऱ्या घटनेकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
-
रवी राणा यांनी बोलावली बैठक
आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलविण्यात आली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत बैठक होईल.
-
देशात घाऊक महागाई वाढली
देशात घाऊक महागाई वाढली आहे. त्याचा परिणाम किरकोळ महागाईवर दिसेल. मे महिन्यात घाऊक महागाईने आतापर्यंतच सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. महागाई गेल्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचली आहे.
-
पक्षात कोणी नाराज नाही – अजित पवार
भुजबळ, प्रफुल पटेल, तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणी नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत. पक्षात कोणी नाराज नसल्याचे अजित पवार म्हणाले. फडणवीस नाशिक मध्ये होते, एकनाथ राव यांना मी सांगितलं होतं की आम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
-
स्फोटाप्रकरणी कारवाई करा- विजय वडेट्टीवार
नागपुरात घडलेली घटना ही अतिशय गंभीर असून या घटनेतील दोषी वर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. गेल्या काही दिवसातील नागपूरमधील सोलर कंपनीत अशा प्रकारची घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे हे तपासण्याची गरज आहे की या ठिकाणी नियमांचे पालन योग्यरीत्या केलं जातं किंवा नाही. जर नियमांची पायमल्ली होत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
-
उमेश पाटील यांचा निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप
खासदार निलेश लंके आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार हे कर्जत जामखेड च्या विधानसभा निवडणुकीत गुंड निलेश धायवळला घेऊन फिरत होते. तर निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्र समोर आली आहे. निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसी मधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
जयशंकर खेमका याला घेतले ताब्यात
चामुंडी एक्सप्लोसिव्ह ब्लास्ट प्रकरणी कंपनीचे मालक जयशंकर खेमका यांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संचालक आणि व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. २८६, ३०४-अ आणि ३३८ मनुष्यवध, मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वाळूज परिसरात दोन दुकाने पेटवून दिल्याची घटना
साजापुर गावातील दोन दुकाने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना. दोन अज्ञात तरुणांनी पेट्रोल टाकून पेटवली दुकाने
-
किरीट सोमय्या यांचे मोठे विधान
घाटकोपर दुर्घटनेला एक महिना झाला. मी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतली. त्यांना आम्ही आग्रह केला की रेल्वे ने सुद्धा निकष तयार केले पाहिजे. उद्या हॉर्डींग पडलं तर रेल्वे रुळावर पडेल, मोठी दुर्घटना होईल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
-
संजय शिरसाट यांची जोरदार टीका
संजय राऊत काहीही बोलतात, आम्हाला गुलाम असे बोलता मग तुम्ही शरद पवार आणि काॅग्रेसची रखेल म्हणुन काम करत आहात का? असे, थेट संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
-
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ओबीसी संघटनेचं आंदोलन
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ओबीसी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. सगेसोयरे रद्द करा या मागणीसाठी हे आंदोलन आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला जातोय.
-
सूर्या प्रकल्पातील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
सूर्या प्रकल्पातील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. 29 मे रोजी खोदकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. जेसीबी ऑपरेटर ढिगाऱ्याखाली अडकला आहे.
-
विधानसभेच्या जागांबद्दल काय म्हणाले हसन मुश्रीफ?
“विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष हा साहजिकच मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळतील. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी निवडून येण्याचे मेरीट लक्षात घेऊन, चर्चा होऊन जागा मिळतील. निवडणुकीच्या पूर्वी अशा चर्चा होत असतात याचा अर्थ आमच्यामध्ये विसंगत आहे असं काही नाही,” असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
-
छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांनी इच्छा व्यक्त केली होती हे खरंय- हसन मुश्रीफ
“छगन भुजबळ नाराज नाहीत. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे. छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तुम्ही राज्यसभेत जाण्याचा आग्रह मागे घ्यावा अशी विनंती केली. त्यामुळे त्यांनी अतिशय आनंदाने सुनेत्रा वहिनी यांचं नाव घेतलं आणि काल ते उपस्थित देखील राहिले. स्वतः अमित शाह साहेबांनी नाशिकमधून ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असं सांगितलं होतं. परंतु नाशिकची जागा शिंदे गटाची विद्यमान खासदारांची जागा होती. त्यांनी ती जागा द्यायला नकार दिल्यामुळे भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही,” असं हसन मुश्रीफ म्हणाले.
-
Maharashtra News | रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणूस्कुरा घाटात दरड कोसळली
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणूस्कुरा घाटात दरड कोसळली… अणूस्कुरा घाटात दरड कोसळल्याने 15 तासांपासून वाहतूक ठप्प… आज दुपारपर्यंत घाट मार्ग मोकळा होण्याची शक्यता… गुरुवार संध्याकाळपासून अणूस्कारा घाटातील वाहतूक बंदच…
-
Maharashtra News | सोलापुरात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन
पैशाची माळ गळ्यात लटकवत, मी भ्रष्टाचारी मला पैशाची भूक अशा आशयाचे पोस्टर लटकवले… स्वतःचे तोंड काळे करून घेत रक्तदान आंदोलन सुरू… सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी माढा तालुक्यातील रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याचा आरोप…
-
Maharashtra News | लोकसभेला 48 पैकी आम्हाला फक्त 2 जागा मिळाल्या – भुजबळ
लोकसभेला 48 पैकी आम्हाला फक्त 2 जागा मिळाल्या… आम्हाला मिळालेल्या 4 जागांपैकी एका जागेवर महादेव जानकार लढले… आमच्या एका जागेवर शिंदे गटातून आलेल्या आढळराव यांना तिकीट देण्यात आलं. आमच्या 2 जागांपैकी एक जागा आम्ही जिंकली, एकावर आम्ही पराभूत झालो… असं देखील भुजबळ म्हणाले.
-
Maharashtra News | सिंधुदुर्गातील वैभववाडीत अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला
सिंधुदुर्गातील वैभववाडीत अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला… अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्लात अनेक जण जखमी… अडीच तसांनंतर पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार झाले…
-
Maharashtra News | उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार ऐलानी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला
उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार ऐलानी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला… मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील शुभ दीप बंगल्यावर आले भेटीला… खासदार विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी काही समस्या सांगण्यासाठी आले असल्याची माहिती…
-
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी घेतला आषाढीवारीचा आढावा
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आषाढीवारीचा आढावा घेत आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासदंर्भात बैठक सुरू असून पालखी मार्गावरील कामांचाही अजित पवार आढावा घेत आहेत. या बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ही उपस्थित आहेत
-
कल्याण – इतिहासकालीन दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळला
कल्याणमधील इतिहासकालीन दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा काही भाग ढासळला. स्वराज्याच्या आरमाराचे केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वतः भेट दिली अशी या किल्लाची ओळख आहे. मात्र तरी पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासन साधी डागडुजी करत नसल्याने भविष्यात किल्ला नाहीसा होणार असल्याची चिंता आहे.
-
जनतेने मोदी, शहांचा अहंकार संपवला – संजय राऊत
जनतेने मोदी, शहांचा अहंकार संपवला. प्रभू श्रीरामाच्या धरतीवर, अयोध्या, नाशिक, रामटेकमध्ये अहंकाराचा पराभव झालाय.
-
10 वर्ष फक्त अहंकार, बदल्याची राजनिती, सत्तेचा गैरवापर – संजय राऊत
10 वर्ष फक्त अहंकार, बदल्याची राजनिती, सत्तेचा गैरवापर झाला. भाजपची मातृसंस्था आरएसएस सर्व पाहत होते , आरएसएसच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यायला हवं होतं असं संजय राऊत म्हणाले.
-
नवी दिल्ली – देशभरातील कांद्याचे दर आता केंद्र सरकार ठरवणार
देशभरातील कांद्याचे दर आता केंद्र सरकार ठरवणार. यापुढे वाणिज्य मंत्रालय कांद्याचे दर ठरवणार. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय. नाफेड आणि एनसीसीएफला यापुढे कांद्याचे दर ठरवण्याचा अधिकार नाही.
-
भुजबळ-अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक
महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक संदर्भात बैठक आज होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होत आहे. बैठकीला महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत.
-
Marathi News : नांदेडच्या मिरचीला देशभरात मागणी
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादची मिरची देशभरात प्रसिध्द आहे. येथील लाल मिरचीला विदेशातही मोठी मागणी आहे. धर्माबादच्या मार्केटयार्डमध्ये वर्षकाठी २०० कोटी रुपयांची उलाढाल ही केवळ लाल मिरची आणि पावडर विकून होते.
-
Marathi News : शाळांना उद्यापासून सुरुवात
राज्यातील शाळा 15 जूनपासुन सुरु होत आहे. यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. यंदा 14 हजार नवीन विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार आहेत. त्यांच्यासह सर्व विद्यार्थी यांना गणवेश व पुस्तके दिली जाणार आहेत.
-
Marathi News : पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रॅव्हल्सला भीषण आग
पिंपरी-चिंचवडमध्ये नाशिक फाटा या ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हल्सचा पुढील भाग जळून खाक झाला आहे.
-
Marathi News : राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी
मनसे नेते राज ठाकरे यांचा 56 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते शिवतीर्थ या निवासस्थानी येत आहे. पालघर येथील मनसैनिकाकडून राज ठाकरे यांना राजमुद्रा आज भेटवस्तू देण्यात येणार आहे. साहेबांनी भावी मुख्यमंत्री बनाव अशी इच्छा मनसैनिकांनी व्यक्त केली आहे.
-
Maharashtra News : नाशिक शहरात पुन्हा डेंग्यूचे संकट
नाशिक शहरात पुन्हा डेंग्यूचे संकट. शहरातील गोविंद नगर परिसरात राहणाऱ्या डेंग्यू बाधिताचा मृत्यू. 50 वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग ‘अॅलर्ट मोड’वर. जूनच्या पहिल्याच आठवड्यात शहरात १७ डेंग्यूबाधितांची भर. संबंधित मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये पाठवले. नाशिकमध्ये ‘स्वाइन फ्लू’पाठोपाठ आता डेंग्यूची ही धडक.
-
Maharashtra News : शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांची रॅगिंग
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विद्यार्थ्यांची रॅगिंग. तीन विद्यार्थ्यांना रॅगिंगमुळे सहा महिन्यांसाठी केले निलंबित. तीन महिन्यांपासून केली जात होती रॅगिंग. विद्यार्थ्यांच्या वडिलांनी कॉलेजमधील अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार उघड . रॅगिंग करणाऱ्यांना वस्तीगृहात कायमस्वरूपी करण्यात आला प्रतिबंध. रॅगिंग करणाऱ्यांना 25 हजार रुपयांचा दंड तर ग्रंथालयात येण्यापासून रोखले
-
Maharashtra News : सगेसोयरेच्या मुद्द्यावर ओबीसी संघटना आक्रमक
सगेसोयरेच्या मुद्द्यावर ओबीसी संघटना आक्रमक. आजपासून ओबीसी संघटना आमरण उपोषण करणार. सगेसोयरे अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार. एका माणसाने महाराष्ट्राला वेठीस धरलं आहे, संघटनेचा आरोप. सगेसोयरेच्या विरोधातील 10 लाख हरकतीवर सरकारने आधी निर्णय घ्यावा. ओबीसी संघटना आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार.
-
Maharashtra News : अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक
अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोड शहर अध्यक्षाची मागणी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून केली मागणी. पक्ष विरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून हक्कलपट्टीची मागणी. भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची मागणी. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड भारतीय जनता पार्टी आक्रमक. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्यामुळे भाजप एक्शन मोडवर.
Published On - Jun 14,2024 8:31 AM