Maharashtra News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिरगावातील दर्शक गॅलरीचे लोकार्पण, अजित पवारही उपस्थित
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज रविवार 17 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे. प्रीवी ऑरगॅनिक कंपनीला लागली होती भीषण आग, तब्बल सव्वा दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. पहाटे पावणे चारच्या सुमारास आग लागली होती. आगीत कोणतीही जीवितहानी नाही.
LIVE NEWS & UPDATES
-
स्विमिंग पूलमध्ये बुडून 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू
महादेव संकल्प कॉम्प्लेक्स मधील घटना
तरुणाचे नाव आयुष घोष
-
उल्हासनगरातील घटनेप्रकरणी डॉक्टरसह अन्य दोघांना बेड्या
नर्सच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो असल्याचा संशय
डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाइल चोरला
आक्षेपार्ह फोटो नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडला
-
-
पुण्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना
तीन वर्षाच्या चिमुकलीचा निघृण खून
पित्याने आपटले भिंतीवर डोकं
भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या पित्याला बेड्या
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
हा खूप चांगला स्पॉट तयार करण्यात आला आहे.
सकाळी साडेसहा ते संध्याकाळी अकरापर्यंत हे सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
प्रत्येक चांगल्या कामाला राजकीय विरोध करु नये
सर्व परवागनग्याही घेण्यात आल्या आहेत.
भरती असल्यास समुद्रात उभे असल्यासारखे वाटेल
सनराईज आणि सनसेट दोन्हींचा आनंद घेता येईल
मुंबई महापालिका आणि आदित्य ठाकरेंचा अशा चांगल्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दादारमध्येही असाच स्पॉट तयार करण्यात येणार आहे.
आमचे नवे सहकारी आदित्य ठाकरे चांगली कामं करत आहेत.
लाईट व्यवस्थाही चांगली करण्यात येत आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live
मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीला पोहोचले
अजित पवारही उपस्थित
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्शक गॅलरीचे लोकार्पण
-
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live
मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’च्या उत्तर टोकाला आणि कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे . या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थितीत आहेत.
-
रिफायनरी विरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय
रत्नागिरी- रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात शिवसेनेची डोकेदु:खी वाढली!
रिफायनरी विरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीत आता रिफायनरी विरोधी पॅनल
रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही!
मुंबईत संपन्न झाली गाव, मुंबईच्या नागरिकांची सभा
रिफायनरीवरून कोकणात आता राजकीय पडसाद
-
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ
बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल
मराठा आरक्षणा बाबत अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
कोल्हापुरात महाविकास आघाडीला सहानुभूतीची मतं
येत्या निवडणुकीत आम्ही जागा नक्की जिंकू
आयोध्येचा दौरा कुणी करायला हरकत नाही
कुणीही तिथे जाणं गैर नाही
याचा कुठलाही राजकीय अर्थ घेऊ नका
आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत असतो
संजय राऊत फ्रस्टेटेड व्यक्ती आहेच
दिवसभर ते काहीही बोलत असतात, त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही
-
आता केंद्रात ओबीसी मंत्रालयसाठी मागणी धरून लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे
सरकारला आपण संगठित होण्याची चाहूल लागणार नाही तो पर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही
ओबीसी च्या अनेक मागण्या केंद्र आणि राज्य यांच्या कडे आहेत
मोदीजीनी आता 1950 च्या संविधानात सुधार केला पाहिजे , जनगणना केली जाणार नाही तो पर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही
त्यासाठी आपली सगळ्यांनी मिळून केंद्राला यासाठी विनंती करू
मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या होती पण लागू झाल्या नव्हत्या मोदी जीनी त्या लागू केल्या
फडणवीस सरकारने 36 जीआर मागणी नुसार काढले , ओबीसी मंत्रालय काढलं
आता केंद्रात ओबीसी मंत्रालय साठी मागणी धरून लावली आहे
मी स्वतः सुप्रीम कोर्टात गेलो आहे
आरक्षण 50 टक्के च्या बाहेर जात असल्याचा सांगत गवळी नावाचा व्यक्ती कोर्टात गेला मात्र आम्ही त्यासाठी कोर्टात उभं राहीलो आणि ओबीसी ला 27 टक्के आरक्षन कसं योग्य आहे हे सांगितलं
फडणवीस सरकारने वटहुकूम काढला आणि तो सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं मात्र नंतर सरकार बदललं आणि आम्ही नवीन सरकारला सांगितलं वटहुकूम रद्द होऊ देऊ नका मात्र तो रद्द झाला आणि आरक्षण गेलं
कोर्टाने डेटा तयार करायला सांगितलं… ते सोपं होतं मात्र या सरकारने केलं नाही , भूमिका मांडली नाही
-
जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांची बदनामी – जितेंद्र आव्हाड
-
जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांची बदनामी – जितेंद्र आव्हाड
इतिहासकार नाही मला माहित नाही
अशिक्षित लोकांच्या डोक्यात हे सगळं घातलं जातं
बहुजनांची पोरं अभ्यास करायला लागली
खरा इतिहास त्यांनी बाहेर काढला
विचारांशी वैर असतं
जेम्स लेनच्या पुस्तकातील मजकूर चुकीचा आहे
चुकीचं लिहिलं आहे. ते काढून घ्यावं
जगाच्या पाठीवर जेवढे शूरवीर झाले
जिजामाता याच त्यांच्या गुरू होत्या
ते पान जर काढता आलं तर बरं होईल
जेम्स आताचं कसे पुढे आले
-
जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांची बदनामी – जितेंद्र आव्हाड
-
देशात सगळ्यात जास्त संख्या ओबीसीची आहे – नाना पटोले
देशात सगळ्यात जास्त संख्या ओबीसी ची आहे
माझ्या सारख्या नेता घडविण्याची क्षमता ओबीसी मध्ये आहे
इतर समाजाच मंत्रालय आहे त्याप्रमाणे केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावं म्हणून मी खासदार झालो मात्र ते पूर्ण झालं नाही म्हणून मी खासदारकी सोडली
विधानसभा अध्यक्ष असताना मी पहिल्यांदा ठराव आणला आणि पास करून केंद्र कडे पाठविलं होता
नेते कोणत्याही पक्षाची असू शकतात मात्र समाजासाठी काम आवश्यक आहे
राजकीय आरक्षणाचा जेव्हा सुरू झालं मग आपल्या राज्यात कित्येक वर्षे ओबीसी आयोगाच नव्हतं
या सरकारने आयोग निर्माण केला मात्र त्यात काय घडलं सांगण्याची गरज नाही
सरकार कोणताही असेल तर आपण समाजासाठी लढलो तर कोणीही काही बिघडवू शकत नाही
-
ग्रामीण महाराष्ट्रात यात्रांना सुरुवात लाखो भाविकांची गर्दी
ग्रामीण महाराष्ट्रात यात्रांना सुरुवात लाखो भाविकांची गर्दी
कोरोना निर्बंध हटल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असलेल्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण अशी ओळख असलेल्या आई येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा सुरु झाली असून आज पारंपरिक पद्धतीने पालखी उत्सवाला गर्दी झाली आहे. वाजंत्री ढोल वाजवीत भाविक एकमेकांना हळद लावीत यात सहभागी झाले आहेत दुपारी देवीच्या मंदिर परिसरात चुना वेचगण्याचा कार्यक्रम झाला यासाठी लाखो भाविक हजर झाले आहेत.
-
नगरविकास विभागाने लिहीलेल्या पत्राला आयुक्त दिलीप ढोले यांनी दिलं ऊत्तर
किरीट सोमय्या मेधा सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी टाॅयलेट घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर मिरा भायंदर मनपाचे नगरविकास कक्ष अधिकार्यांना गेलं पत्र…
– नगरविकास विभागाने लिहीलेल्या पत्राला आयुक्त दिलीप ढोले यांनी दिलं ऊत्तर… पाच पानी अहवाल केला सादर…
– मेधा किरीट सोमय्या यांनी केलेल्या गुन्ह्यासंबंधात आयुक्तांकडून नगरविकास खात्याकडून मागवण्यात आली माहीती…
– १६ अशासकिय संस्थांची माहीती, त्यांनी कुठल्या झोनमध्ये शौचालय बांधले , कुठे कुठे बफर झोन होते याची इत्यंभूत माहीती अहवालात नमुद…
– अशासकिय संस्थांची नावे अहवालात ऊघड…
– युवक प्रतिष्ठान यांना दिलेल्या कामाचा तपशीलही नोंद… कीती लाखांची कामे देण्यात आली याचीही नोंद…
-
महाराष्ट्र दिनी संभाजीनगरला जाहीर सभा घेणार
मला फक्त दोन गोष्टींची घोषणा करायची होती. १ मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं मैदान आहे. तिथे जाहीर सभा घेणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ५ जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार आहे
-
माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे
देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे . तयारीत राहा. ३ तारखेला. आता रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. सांगायचं नाही. पण ३ तारखेपर्यंत कळलं नाही समजलं नाही, तर या देशातील कायगदा आणि सुव्यवस्थेपेक्षा यांना याचा धर्म महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांना लाऊडस्पीकर मोठे वाटत असेल तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे. आमची तयारी सुरू आहे. या देशात महाराष्ट्रात दंगली नकोय. हाणामारी नकोय. या देशातील महाराष्ट्रातील शांतता भंग करायची नाही. इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही. पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकवायचं असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील
-
दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या
दोन घोषणा करायच्या आहेत. दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ते बोलले की आम्ही बोलायचं. आम्ही बोलल्यावर ते बोलणार. पुन्हा आम्ही बोलायचं. मला वाटतं जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पीसी देशभरातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की, लोकांना वाटतं की भोंग्याचा धार्मिक विषय आहे. पण मी भाषणात स्पष्ट केलं. हा सामाजिक विषय आहे. त्याकडे त्या अंगाने पाहावं. मला कल्पना नाही कोण व्यक्ती आहे. इथे मुस्लिम पत्रकार आहे. ते नांदगावकरांना भेटले आणि सांगितलं माझं लहान मुल जन्माला आलं, तेव्हा सकाळची बांग आणि अजान दिल्या जायचा, मी स्वत मशिदीत जाऊन त्यांना गोंगाट होतोय तो बंद करा सांगितलं. हा त्रास केवळ हिंदूंना नाही मुस्लिमांनाही होतोय. हा विषय अनेक वर्षापासुन सुरू.पण तसाच आहे. पण पुढे गेला नाही. म्हणून तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल तर आम्ही मशिदी समोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू
-
आमच्य़ा सुध्दा आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील – राज ठाकरे
आगामी महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरेंचा महत्त्वाचा दौरा
देशभरातल्या सगळ्यांना सांगतोय
हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे
इथे एक मुस्लिम पत्रकार आहे
माझं मुल लहान आहे त्यामुळे हा गोंगाट बंद करा
हा अनेक वर्ष तसाच राहिलेला विषय आहे
तुम्ही जर तिथं पाचवेळा भोंग लावणार असाल तर आम्ही सुध्दा लावणार
३ ताऱखेलापर्यंत त्यांना कळालं नाही, या देशातल्या न्याय व्यवस्थेपेक्षा जशास तसं उत्तर देणार
आमला कोणत्याप्रकारची दंगली नको आहे
आमच्य़ा सुध्दा आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील
१ मेला संभाजी नगरमध्ये सभा घेणार
५ जूनला मी माझ्या सहकारर्यासोबत आयोध्येला जाणार आहे
-
हनुमान चाळिसा मुख्यमंत्र्यांनी वाचायला – रवी राणा
हनुमान चाळिसा मुख्यमंत्र्यांनी वाचायला
मुख्यमंत्र्यांच्यावरचं संकट टळण्यासाठी हनुमान चाळिसा वाचावी असं म्हणालो होतो
ते आता दिल्लीतल्या नेत्यांची परवानगी घ्यावी
मला कोणी रोखू शकत नाही
मला विरोध करून तुम्ही हिंदुंना खूष करू शकत नाही
हनुमान चाळीसा वाचायला हवी
संकटमुक्तीसाठी हनुमान चाळिसा म्हणा
माझ्या घरासमोर आलेल्या सगळ्यांनी माझ्यासोबत चला
मी नक्की मातोश्रीवरती जाणार
सगळी संकटं मुख्यमंत्र्यांच्यामुळे येत आहेत
मी हनुमान चाळीसा मातोश्रीवरती येऊन हनुमान चाळीस वाचावी
मी लोकांचं स्वागत करतो
सगळ्यांना मी घेऊन मातोश्रीवरती यायला तयार आहे
सरकार त्यांचं आहे,
-
रवी राणाच्या घरासमोर शिवसेनेचं आंदोलन
राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसाचे प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मातोश्री वर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. आज प्रकरणावरून संतप्त झालं, शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत व त्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार आहे. राणा यांचे मातोश्री वर जाण्याची हिंमत नाही त्यांनी आधी अमरावतीच्या शिवसैनिकांना ऐकून घ्यावे असा इशाराही अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिलेला आहे… याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये रामा यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त
-
राज ठाकरे बाळगंधर्वच्या दिशेने रवाना
आंबा महोत्सवात राज ठाकरेंना आंबा पेटी देण्यात आली
महोत्सवात त्याचा सत्कार करण्यात आला आहे
राज ठाकरे बाळगंधर्वच्या दिशेने रवाना
-
आंबा महोत्सवात आंब्याची माहिती घेत आहेत
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते रक्तदान शिबीर
रक्तदान शिबिराला राज ठाकरेंचा सत्कार
भगवी शाल देऊन राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला आहे
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला थोड्याचं वेळात सुरूवात होणार
मनसेच्या कार्यालयात होणार पत्रकार परिषद होणार
आंबा महोत्सवात आंब्याची माहिती घेत आहेत
आज नेमकं कोणाला टार्गेट करणार
कार्यकर्तांसोबत संवाद साधत आहेत
-
महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले – संजय राऊत
आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर ती कधी तणावाचं वातावरण नव्हतं कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं
या राज्यातील वातावरण तनावाचन करण्याचा षड्यंत्र देखील रचलं होतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे
काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी कमहाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झालेरत आहेत
आहेत या विषयावर ती सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या वरती काही कार्यवाही सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भुंग्याचा राजकारण झालं होतं पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे
ऑन जेम्स लेन पुस्तक
डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाही त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही
बिगर भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत विशेष करून ममता या सर्वांना शरद पवार आणि माननीय मुख्यमंत्री यांनी एकत्र करून मुंबई या संदर्भात एक कॉन्फरन्स घेणार आहोत त्यासंदर्भात तयारी सुरू झालेली आहे
तिथे लंका आहे तिथे जा जरा अभ्यास करा आपल्या शेजारच्या राष्ट्रात काय चाललं आहे श्रीलंकेत याआधी सोन्याच्या विटा होत्या आता त्या ठिकाणी महागाई आणि बेरोजगारी या दोन प्रश्न आहेत आणि आता या देशात देखील असेच प्रश्न आहेत त्यामुळे भाजप स्वतः यात लंकेला आग लावतील
संजय राऊत ऑन किरीट सोमय्या
त्यांनी कुणालाही पत्र लिहून द्या ते विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत एक आरोपी जेव्हा पत्र लिहितो त्यांनी पत्र पाठवत राहावं
त्यांनी साडे तीन कोटी रुपयांचा हिशोब द्यावा आम्ही 100 कोटी चा हिशोब आम्ही देऊ
-
राज ठाकरे या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता
राज ठाकरे या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता
भोग्यांच्या भूमिकेमुळे मनसेवर जी टिका करण्यात येतीये त्याला उत्तर आज राज ठाकरे देण्याची शक्यता आहे
बाबासाहेब पुरंदरेंवर जेम्स लेन या लेखकाच्या पुस्तकावरून जी टिका करण्यात येतीये त्याला उत्तर राज ठाकरे देणार का ?
काल त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी जाऊन मुलगा प्रसाद पुरंदरे यांची भेट घेतली
शरद पवारांनी जे राज ठाकरेंवर आरोप केले त्याला उत्तर देणार का ?
शहरातील मनसेच्या भूमिकेसंदर्भातही राज ठाकरे बोलण्याची शक्यता
-
राज ठाकरे आंबा महोत्सवाला भेट देणार
राज ठाकरे आंबा महोत्सवाला भेट देणार
पुण्यात त्याची थोड्यात वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार
-
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते रक्तदान शिबीर
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते रक्तदान शिबीर
रक्तदान शिबिराला राज ठाकरेंचा सत्कार
भगवी शाल देऊन राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला आहे
राज ठाकरेंची थोड्याचं वेळात पत्रकार परिषद
-
आमदार रवी राणांच्या घरावर धडकणार शिवसैनिक
आमदार रवी राणांच्या घरावर धडकणार शिवसैनिक…..
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला प्रतिउत्तर देण्यासाठी शेकडो शिवसैनिक दाखल..
राजापेठ चौका मधील शिवसेना कार्यालया जवळ शिवसैनिक झाले जमा…
पोलिसांचा बंदोबस्त…
-
कोरोना अद्याप संपलेला नाही – अजित पवार
– कोरोना अद्याप संपलेला नाही.. – काल पुण्यात आमच्या पक्षाचा कार्यक्रम झाला.. त्या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण उपस्थित नव्हत्या.. त्या दिल्लीत असून त्यांना कोरोना झाल्याचे मला मेसेज करुन कळवले आहे.. – हे खासदाराचंच उदाहरण आहे.. – आपल्याला वाटतय कोरोना गेला.. पण असं नाही.. कोरोना जावा असं सगळ्यांनाच वाटतं.. – काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.. त्या पद्धतीने आपण लक्ष दिले पाहिजे.. ऑन सदावर्ते – सगळ्या मिडीयाला सांगतो हा हे म्हणला तो ते म्हणला हे मला विचारु नका.. – मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय हे तुम्ही पाहताय.. – कुणाचं काय आहे यात लक्ष देण्यापेक्षा जो चुकीचं वागेल त्याला कायद्याने शिक्षा होईल.. – जे योग्य पद्धतीने वागतील त्यांना त्यांचं काम करता येईल.. ऑन कोल्हापूर निवडणुक.. – मी कालच सर्वांचं अभिनंदन केलं.. मतदारांचे आभार मानले.. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली.. – आता तिथल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी जाधव ताईंच्या बरोबरीने आम्हाला काम करावे लागेल.. सर्वानी मिळून मिसळून काम केलं.. ऑन भाजप नेते प्रवेश – मला याबद्दल माहिती नाही.. मी एखाद्या गोष्टीची अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मी बोलतो.. नुसतं हे असं म्हणला तो तसं म्हणला याला अर्थ नाही.. ऑन राष्ट्रपती राजवट.. जातीवाद.. – काल हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत घडलेली घटना आपण पाहिली.. – सर्वांनी एकत्र सण साजरे करावेत.. एकोपा टिकवला पाहिजे.. जातीधर्मात तेढ निर्माण होणार नाही, सर्व गुण्यागोविंदाने नांदतील यावर लक्ष दिलं पाहिजे..हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिकवलं आहे.. म्हणून आपला देश एकसंघ पहायला मिळतो.. – आता आपण बघतोय श्रीलंका आणि पाकिस्तानची काय अवस्था आहे.. असं असताना भारतासारख्या खंडप्राय देशात एकोपा टिकलाय तो केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे, संविधानामुळे.. त्याचा आदर केला पाहिजे.. ऑन चंद्रकांत पाटील सन्यास – ते बोलले होते त्यांना विचारा ना.. माझा काय संबंध.. ऑन जेम्स लेन – मी त्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.. तुम्ही कारण नसताना माझ्या नावावर पावत्या फाडू नका.. – अरे बाबांनो आता आपल्या राज्यात देशात काय महत्वाचे प्रश्न आहेत त्याला महत्व देवू.. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करु.. – जुन्या विषयामध्ये जावून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम नकोय.. मीडियानेही अशा बातम्या दाखवू नयेत. त्यापेक्षा विकासाला महत्व द्यावं..
-
आमदार रवी राणांच्या घरावर धडकणार शिवसैनिक
आमदार रवी राणांच्या घरावर धडकणार शिवसैनिक…..
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला प्रतिउत्तर देण्यासाठी शेकडो शिवसैनिक दाखल..
राजापेठ चौका मधील शिवसेना कार्यालया जवळ शिवसैनिक झाले जमा…
पोलिसांचा बंदोबस्त…
-
लपरी सुरू होताच प्रवाश्यांची उडाली झुंबड
लालपरी सुरू होताच प्रवाश्यांची उडाली झुंबड
बस मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाश्यांची तुफान गर्दी
काही जणांची बसच्या दारात गर्दी तर काही जणांनी थेट खिडकीतून मिळवला बस मध्ये प्रवेश
औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात जमलेल्या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल
लालपरीचे महत्व आणि गरज पुन्हा एकदा अधोरेखित
औरंगाबाद ते पैठण बस गाडीत बसण्यासाठी झाली तूफान गर्दी
थेट खिडकीतून चढत बस मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाश्यांची कसरत
Published On - Apr 17,2022 6:28 AM