Maharashtra News Live Update : राज ठाकरेंचं टार्गेट महाविकास आघाडी, शिवसेनेसहीत सर्वांचा खरपूस समाचार
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 2 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, मनसेकडून शिवसेनेला डीवचवण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल 20 फुटाचा बॅनर लावून त्यांना डिवचण्यात आले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live
ज्यांनी काम केलं त्यांना बाजुला सारलं
आणि ज्यानी काम नाही केलं त्यांना सत्तेत बसवलं
नाशिकसारखं काम कुठेही झालं नाही
मात्र तरीही सत्तेतून बाहेर बसवलं
-
Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live
मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांना तीन राज्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं
सगळं ओझं घ्यायला महाराष्ट्र नाही बसला
माझ्या दृष्टीतून हिंदूत्व काय आहे ते मांडणार
आयोध्येला जाणार पण आत्ता तारीख नाही सांगत
-
-
Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live
लोकशाही कशी असावी हे इंग्लंडकडून शिका
विन्सटन चर्चिल युद्ध जिकून देऊन हारले
ही समज समाजाला लागते
आजही आपल्या शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत
-
राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार सांगली दौरा आटोपून आता कोल्हापूर दौऱ्यावर
राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार सांगली दौरा आटोपून आता कोल्हापूर दौऱ्यावर
शिरोळ इथं शरद पवार यांना स्वर्गीय सा.रे.पाटील समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखाना स्थळावर सन्मान सोहळ्याचं आयोजन
शरद पवार,अशोक बंग,श्रीनिवास पाटील,बाळासाहेब थोरात जयंत पाटील,बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित,
-
रातोरात झाडांची कत्तल केली हे मुंबईकरांनी पाहिलं : उद्धव ठाकरे
आपण मास्क सक्तीकडून मास्क मुक्तीकडे निघालो आहोत
मी आणि उपमुख्यमंत्री जोपर्यंत मास्क घालतोय तोपर्यंत मास्क घाला
आजचा हा चौथा कार्यक्रम आहे
पहिला कार्यक्रम ऑनलाईन दुसरा ऑफलाईन केला तिसरा ऑनलाईन आणि चौथा ऑफलाईन केला
लगेचच आमच्यात धुसफूस असल्याच्या बातम्या चालवतील
अथांग सागरासारखी मुंबई वाढतेय
इमारती वाढवता येतात पण रस्ते वाढवता येत नाहीत
गेली साठ वर्ष मी बदलती मुंबई पाहतोय
आज मेट्रोमध्ये बसलो पण बाळासाहेब ठाकरे आणि माँ यांनी ट्राम मध्ये बसवलं
ट्राम गेल्याचं दु: ख होतं, पण बेस्ट आली, रेल्वे आहे, लोकल, रिक्षा आहे
मी देखील कॉलेजमध्ये असताना लोकलमधून प्रवास केला आहे
प्लॅटफॉर्मवर उभ असलं की डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग होतं
गर्दी वाढत चाललीय सुविधा किती द्यायच्या
आता राजकारणात कोरोनानंतर साथ आलेली आहे
त्या रोगाचं काय करायचं
तुम्ही काहीचं केलेलं नाही, आम्हीचं केलंय
नवं केलं तर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो
हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे
आम्ही काम करतोय, रातोरात झाडांची कत्तल केली हे मुंबईकरांनी पाहिलं आहे
पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता विकास करतोय
-
-
प्रभाकर साईल यांच्या पार्थिवावर आजचं अंत्यसंस्कार
प्रभाकर साईल यांचं पार्थिव पोहोचलं त्यांच्या राहत्या निवासस्थानी दाखल…
– हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा डाॅक्टरांचा दावा…
– जे जे रुग्णालयता झालं शवविच्छेदन… सोमवारी मिळणार रिपोर्ट
– आजच केले जाणार अंत्यसंस्कार…
– परिसरात पोलीसांचा ताफा दाखल…
-
बॅनरबाजीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही : अजित पवार
बॅनरबाजीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही
लोकांना चांगली सेवा मिळणार आहे त्याला महत्त्व देऊया
मेट्रोचा प्रकल्प टप्प्यानं सुरु राहील
मुंबईकरांसाठी मुखमंत्र्यांनी दिलेली गुढीपाडव्याची भेट
मुंबई करांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे
आम्हालाही बातम्या कोण पसरवतं याबद्दल आश्चर्च वाटलं
मी रोज कामात असतो त्यामुळं मला तसं जाणवलं नाही
बातम्या देऊन जनतेत संभ्रम केला जातो
-
मुख्यमंत्र्यांचा मेट्रोतून प्रवास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार मेट्रोत बसले
काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं मेट्रोचं पहिलं तिकीट
-
मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला
दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होणार
मुख्यमंत्री सध्या आरे स्थानकात
पहिली मेट्रो आज या स्थानकातून सुटणार आहे
मुख्यमंत्री याच मेट्रोतून प्रवास करतील
-
मुख्यमंत्र्यांनी केलं मेट्रोचं उद्घाटन
अजित पवार आणि एकनाथ शिंदेही मुख्यमंत्र्यांसोबत
आरे ते कुरार मुख्यमंत्री मेट्रोतून प्रवास करणार
दोन्ही मार्गाची माहिती घेतली
मेट्रोचं पहिलं तिकीट मुख्यमंत्र्यांनी घेतलं
-
आजपासून मेट्रोचे दोन्ही मार्ग मुंबईकरांच्या सेवेत
-
मुख्यमंत्र्यांसह अजित पवार मेट्रोनं आरे ते कुरार असा प्रवास करणार
मुख्यमंत्र्यांसह अजित पवार मेट्रोनं आरे ते कुरार असा प्रवास करणार
थोड्याच वेळात मेट्रोचं उद्गाटन
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चं उद्घाटन
-
नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव
नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव
तात्काळ अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी नवाब मलिक कोर्टात
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मलिक कोर्टात
मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक 23 फेब्रुवारीपासून अटकेत
नवाब मलिक सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत
-
अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय
अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय….
शिवसेना आमदाराच्या घरावर बनावट IB अधिकाऱ्याची धाड….
कागदपत्रे दाखवा म्हणाले IB अधिकारी….
हे बनावट अधिकारी असल्याच बाजोरिया यांच्या लक्षात आल…
बाजोरिया कुटुंबीयांनी खदान पोलीस स्टेशन मध्ये बनवट IB अधिकाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली असून….
बनावट IB अधिकारी प्रतीक गावंडे याला पोलिसांनी अटक केली आहे….
-
शरद पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन
शरद पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन
शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह विविध नेते उपस्थित
सांगलीत शरद पवार यांच्या हस्ते उद्गाटन
-
प्रभाकर साईलच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश : दिलीप वळसे पाटील
पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू संशयास्पद
प्रभाकर साईलच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
-
अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी
अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी….
राज्य सरकार, तसेच राज्यातील मंत्र्याविरोधात केली घोषणाबाजी…
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पाडवा काळा पाडवा दिल्या घोषणा…
कपाळावर काळ्या पट्टया बांधून शेतकऱ्यांनी केला काळा गुडीपाडवा..
2013 च्या कायद्यानुसार शेतजमीनीचा वाढीव मोबदला देण्याचे आंदोलक शेतकऱ्यांची मागणी..
एक महिन्यापासून सुरू आहे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन.
राज्य सरकार ने ठोस तोडगा न काढल्याने आंदोलक शेतकरी झाले आक्रमक…
-
वसई-विरार मध्ये गुढीपाढवा निमित्त जागोजागी गुढी उभारली
विरार – वसई विरार मध्ये गुढीपाढवा निमित्त जागोजागी गुढी उभारून मोठ्या उत्साहात नवीन वर्षाच्या स्वागत केले आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरार मनवेलपाडा-कारगील नगर चौकात गुढी उभारून, ढोल ताशाच्या गजरात हिंदू नवं वर्षाचे स्वागत केले, तर शिवसेनेच्या वतीने मोटारसायकल रॅली काडून, वसई विरार नालासोपारा परिसरात नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. पारंपारिक वेशभूषेत, डोक्याला फेटे बांधून महिला पुरुष या उत्साहात सहभागी झाल्या होते. मागच्या दोन वर्षा नंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कोरोना मुक्त, मास्क मुक्त गुढीपाढावा साजरा होत असल्याने नागरिकानी आनंद व्यक्त केला आहे.
-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन
– अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत साहित्य गुढीचे पूजन,
– कलावंत साहित्य गुढीचे पूजन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले,
– अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायिका सावनी रवींद्र यांच्या हस्ते पूजन करण्यात आले,
– यावेळी सावनी रवींद्र यांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून ‘कौसल्येचा राम बाई’ या गीताच्या काही ओळी सादर केल्या.
-
मेट्रो उद्घाटनाच्या वादावर आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं
– मेट्रो उद्घाटनाच्या वादावर आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं,
– आज फक्त आपण या परिषदेवर बोलूया, आज अनेक इंडस्ट्री या पुणे आणि पुणे परिसरात येत आहेत
-
इंग्रजी शाळेमध्ये मराठी घरामध्ये बोलले पाहिजे – उद्धव ठाकरे
इंग्रजी शाळेमध्ये मराठी घरामध्ये बोलले पाहिजे – उद्धव ठाकरे
मराठी भाषा शाळेत शिकवली पाहिजे ही वेळ कोणी आणली
मराठी भाषा बोलली पाहिजे
इंग्रजी शाळेमध्ये मराठी घरामध्ये बोलले पाहिजे
जास्तीत भाषा शिकण हा गुन्हा नाही
इंग्रजी आलीचं पाहिजे
माझी पिढी माझ्या आसपासची पिढी मराठी बोलते
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला त्यावेळी आपली स्वभाषा असायला हवी असं सांगितलं
भाषा ही संस्कृतीची ओळख आहे.
ही सुध्दा मात्रभाषेची लोकं आहेत.
या राज्यात मराठी भाषा शिकली पाहिजे असं काही नाही.
भाषेचा मंदीराचा कौतुक व्हायला हवं असं बांधावं.
-
रत्नागिरी – RGPPL कंपनीतील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प
रत्नागिरी – RGPPL कंपनीतील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प .
खरेदीदारच नसल्यामुळे कंपनीकडून वीजनिर्मिती बंद. कंपनीचे भवितव्य अंधारात.
1950 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या प्रोजेक्टचे तिन्ही प्लान्ट 1 तारखेपासून बंद.
पाचशेहून अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड.
रेल्वे सोबतचाही करार संपल्यामुळे कंपनी समोर मोठं आव्हान.
-
गो एअरचं दिल्लीला जाणारं विमान अचानक रद्द
– गो एअरचं दिल्लीला जाणारं विमान अचानक रद्द.. – १०.५० ला पुणे विमानतळावरुन दिल्लीला जाणार होतं विमान.. – कोणतीही पूर्वकल्पना न देता विमान रद्द केल्यानं प्रवाशी संतापले.. – गो एअरच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रवाशांनी घातला घेराव.. – पुणे विमानतळावर अधिकारी-प्रवाशांमध्ये वादावादी.. – सकाळी १०-५० चे विमान आता संध्याकाळी ६-३० ला जाणार.. – ऐनवेळी विमान रद्द केल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय..
-
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहात शिराळा शिवाय पूर्ण होत नाही – शरद पवार
शिराळा
नव्या वर्षाची आज सुरवात होतेय
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी ला हातभार लावण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच स्वागत आज आपण करतोय
योग्य असेल तर स्वागत करणार नसेल तर पडेल ती किंमत मोजणार असा हा जिल्हा आहे
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहात शिराळा शिवाय पूर्ण होत नाही
शिवाजीराव जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष राहिले आहेत
म्हणून देश पातळीवर पोहचवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या वेळी घेतला होता
आज ते पुन्हा घरी येताहेत,घराची रक्षण करण्याचं सूत्र त्यांनी स्वीकारलय
त्यांचं मी स्वागत करतो
नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य पातळीवर कसा करून घेता येईल याचा विचार झाला पाहिजे
येत्या चार पाच वर्षात या भागात पाण्यासाठी तहानलेल गाव पाहायला मिळणार नाही
उसाच क्षेत्र वाढतंय मला काळजी आहे यांचा गळीत कसा होणार
मी आता माहिती घेतली 90 पेक्षा जास्त कारखाने जून महिन्या पर्यन्त चालू राहतील अशी स्थिती आहे
साखर एके साखर आता चालणार नाही
ब्राझील,अमेरिके मध्ये इथेनॉल वापर वाढतोय
आपल्या पंतप्रधानांनी ही त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलीय
आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला जातंय
राज्य वेगळ्या विचारानं काम करतय
माणस जोडण्याच काम आज पर्यंत झालं
पण आज धर्मच्या नावाने अंधःकार पसरवन्याचा प्रयत्न होतोय
देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात बघायला मिळतंय.त्यामुळे देशात अस्वस्थता आहे
-
महागाईच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाने काढली रैली
महागाईच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंब्र्यातून राष्ट्रवादी पक्षाने काढली रैली
या रॅलीमध्ये बैलगाडी ,घोडे ,सायकल तसेच पायी चालत रैली काढण्यात आलेली आहे
ठाण्यातील भाजप खोपट कार्यालय येथे ही रॅली घेऊन जाणार आहेत मात्र मोठ्या प्रमाणात मुंबईतच पोलिसांनी फौजफाटा वाढवलेल्या आहेत या रॅलीला पोलीस पुढे जाऊन देणार का नाही हे देखील आता पहाणे गरजेचे राहणार आहे
-
पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे – जयंत पाटील
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशी वैयक्तिक कटुता मी येऊ दिली नाही
कोणत्याही घरात गेले तरी ते पुन्हा माझ्या घरात येतील याची खात्री होती
पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे
रोज सकाळी भाजप वल्गना करत असत
दोन मंत्री फुटणार, आमदार फुटणार
पण आम्ही बोलून दाखवत नाही
पक्ष वाढीसाठी आम्ही काम करतोय
पुढच्या काळात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असेल
नाईक यांच्या प्रवाशाने 2024 च्या विजयाची गुढी उभारली जाईल
जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न आम्ही जवळपास संपवले आहेत
नाईक यांच्या प्रवाशाने पक्षाची ताकद पुन्हा वाढली आहे
रोज सकाळी भाजप वल्गना करत असत
दोन मंत्री फुटणार, आमदार फुटणार
पण आम्ही बोलून दाखवत नाही
पक्ष वाढीसाठी आम्ही काम करतोय
पुढच्या काळात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असेल
नाईक यांच्या प्रवाशाने 2024 च्या विजयाची गुढी उभारली जाईल
जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न आम्ही जवळपास संपवले आहेत
नाईक यांच्या प्रवाशाने पक्षाची ताकद पुन्हा वाढली आहे
-
आमचं हिंदूत्व आहे ते कायम आहे – संजय राऊत
आमचं हिंदूत्व आहे ते कायम आहे – संजय राऊत
विरोधकांची गुढी कितीही उंच गेली, तरी आमची गुढी उंच असेल
गिरगावमध्ये मराठी माणसांचं प्रदर्शन आहे
आमचं हिंदूत्व आहे ते कायम आहे
-
महाविकास आघाडीतच प्रकल्प वरूनही श्रेय स्पर्धा
महाविकास आघाडीतच प्रकल्प वरूनही श्रेय स्पर्धा
गुढीपाडवा मुहूर्तावर आज मुंबईतील महत्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्प मेट्रो 7 आणि 2 A चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
श्रेयासाठी मुंबईत शिवसेनेने लावली होर्डिंग्ज
होर्डिंग्जवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्ष
पण, पोस्टर्समध्ये मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला स्थान नाही
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहिरातबाजी
भाजपनेही मुंबईत काल लावली मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयाची पोस्टर्स
देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे मानले आभार
-
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा गुढीपाडवा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा गुढीपाडवा.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या परिवारासोबत मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे आणि आमदार संतोष दानवे देखील उपस्थित होते. दानवे यांनी पारंपरिक रितीरिवाजानुसार गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. व्हिडीओ hotline वर script मेल
-
राज ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार
राज ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आम्हाला गर्दीची चिंता नाही हा गुढीपाडवा उत्साहाचा आणि जल्लोषाचा आहे कारण करोणा चे सगळे निर्बंध उठले आहेत दोन वर्षानंतर मनसैनिकांना भेटणार आहोत
-
रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी जनतेची मनात आहे
रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी जनतेची मनात आहे कोरोना काळात बेरोजगारी वाढली आहे, स्थानिक लोकांना रोजगार व्हावा म्हणुन प्रकल्प व्हावा नववर्षाच्या निमित्ताने रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक आमदार म्हणुन इच्छा रिफायनरी प्रकल्पाच्या बाबातीत शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पाच्या बाबातीत सकारात्मक कोणता प्रकल्प यायचा म्हटलं तर विरोध समर्थक असतात नववर्षाच्या माध्यमातून संकल्प सोडूया जिल्ह्यातील सर्व तरूणांना चांगला रोजगार मिळावा- राजन साळवी
-
मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाला सुरूवात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित
मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाला सुरूवात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित
अनेक मान्यवर उपस्थित
मराठी भाषा भवन उभारण्याची मागणी करण्यात येत होती
सात मजली हे मराठी भवन असणार आहे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजनसोहळा पार पडत आहे
चर्नीरोड येथे हे भवन उभं राहणार आहे
-
मंत्र्यांच्या घरचा गुढीपाडवा
मंत्र्यांच्या घरचा गुढीपाडवा
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत साजरा केला गुढीपाडवा
कारोना चे संकट जरी गेले असले तरी नागरिकांनी काळजी बाळगा -गुलाबराव पाटील
नव्या वर्षात मतभेद विसरून सर्वांनी महाराष्ट्राचे झालेले नुकसान भरून काढा, विरोधकांना काढला चिमटा
-
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा शरद पवार यांच्या हस्ते स्कार्प घालून पक्ष प्रवेश
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा शरद पवार यांच्या हस्ते स्कार्प घालून पक्ष प्रवेश
कार्यकर्त्यांचा ही जयंत पाटील यांच्या हस्ते स्कार्प घालून पक्ष प्रवेश
-
औरंगाबादेत उभारली राजकिय गुढी
औरंगाबादेत उभारली राजकिय गुढी
औरंगाबादच्या गुलमंडी वर उभारली राजकिय गुढी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उभारली गुढी
-
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर निवासस्थानी तीन महिन्याच्या नातवाच्या हाताने ऊभारली गूडी
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर निवासस्थानी तीन महिन्याच्या नातवाच्या हाताने ऊभारली गूडी…
– यंदाची गुडी ही कोरोनामुक्त होवो, सर्व रोगराई दूरी होवो…
– या गूढीने सर्वांच कल्याण होवो, सर्वांच भलं होवो, यंदा मनपात भगवा फडकू दे हा संकल्प…
– आरेबाहात भाजप राजकारण करत आहे, मेट्रोचं श्रेय घेण्याचा धक्कादायक प्रकार भाजप करतंय, हे श्रेय सगळ्याचं आहे…
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली दौर्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सांगली दौर्यावर
शिराळा इथं माजी मंत्री शिवाजीराव नाईक हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत करणार घरवापसी
शिवाजीराव नाईक यांनी 2014 मध्ये केला होता भाजप मध्ये प्रवेश
थोड्याच वेळात शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
शरद पवार यांच कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन
-
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीत ढोलताशांचा गजरात भव्य शोभायात्रा
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीत ढोलताशांचा गजरात भव्य शोभायात्रा…
चैत्र पाडवा अर्थातच गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना भिवंडी शहरात टिळक चौक मित्र मंडळाच्या माध्यमातून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली .
-
बारबाला आणि तिच्या बहिणीवर माजी प्रियकराचा ब्लेड हल्ला
बारबाला आणि तिच्या बहिणीवर माजी प्रियकराचा ब्लेड हल्ला
मुंबईतील चारकोप येथे राहणाऱ्या बारबाला आणि तिच्या बहिणीवर त्यांच्या माजी प्रियकराने ब्लेडने हल्ला केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारबाला शुक्रवारी रात्री बहिणीसोबत चारकोप येथील घरात पोहोचली तेव्हा तिचा प्रियकर इमारतीखाली आधीच उपस्थित होता.
आरोपीने आधी प्रेयसीवर ब्लेडने वार केले आणि नंतर पीडितेला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीवर हल्ला करून तो फरार झाला.
-
वस्तू व सेवा करांच्या इमारतीच भूमिपूजन
वस्तू व सेवा करांच्या इमारतीच भूमिपूजन
प्रत्यक्ष कामात दिसतं नव्हतो
संकल्प चित्र दाखवलं
आजचं भूमिपूजन हे फक्त नारळ फोडण्यापुरतं नाही
काहीजण मनातल्या मनात गुड्या उभारत आहेत
सरकार पाडण्याच्या गुड्या काही लोकांच्या मनात उभ्या राहत आहे
मनातील रूसवा फुगवा काढून सगळ्यांनी काम करावं
अशा प्रसंगी राजकीय बोलू नये
महाराष्ट्रात जे बदनामी करायचं चालू आहे, ते चुकीचं आहे
देशाच्या अर्थकारणाला मोठा फटका बसेल
आज भूमिपूजन केलं आहे
जीएसटीची इमारत सगळ्यात मोठी असायला हवी
अर्थिकदृष्ट्या महराष्ट्र बदनाम होतोय
जे अधिकारी चांगलं काम करत आहेत
समोरचा आल्यानंतर त्याचं हसत मुखाने स्वागत कराव
आज शुभ दिनी त्याचं स्वागत करूया
सगळे एकजुटीने काम करीत आहोत
सगळे मजबूत आहोत
दादा, तुम्ही जिथे आहात तिथे मी पुन्हा येण्याची गरज नाही.
-
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळताय – देवेंद्र फडणवीस
– गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळताय
– मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय, नविन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जाओ
– यावळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे
– येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल.
……
– त्यांनी जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं, माझ्या त्यांना सुभेच्छा आहे. पण जनतेला माहित आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं, अतिशय वेगावे ते सुरु होतं. या सरकारमध्ये मेट्रोचं काम रखडलं होतं
– आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा. मेट्रो ३ चा प्रश्न निकाली काढा. कारण मेट्रो ३ आतापर्यंत सुरु होऊ शकली असती, पण चार वर्षे सुरु होऊ शकणार नाही
– सरकारने श्रेय्य जर्मन घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये . सरकारने मेट्रो तीन चा प्रकल्प सवकर सुरु करावा
– ९ महिन्यात आरे मधील कारशेडचं काम पूर्ण होऊ शकते. आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाची मेट्रो ३ सरकारने सुरु करावी. त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल
– गृह विभागावर नाराजी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कशाला बोलायचं.
…….
– नविन वर्षात आजचा संकल्प देशाकरता आहे.
-
जळगाव येथील युवकाचा वाळू च्या वादातून खून.
सातारा: जळगाव येथील युवकाचा वाळू च्या वादातून खून….
वैभव ढाणे असे खून झालेल्या युवकाचे नाव…
याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी सहा संशयित घेतले ताब्यात
कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील घटना
-
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांचा स्वागतयात्रेतून संदेश
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांचा स्वागतयात्रेतून संदेश
“युद्ध नको, आम्हाला शांतता हवी”
सैन्याच्या वेशभूषेत सहभागी झाले डोंबिवलीकर
-
भुजबळ फार्म वर यंदा पहिल्यांदाच गुढी पाडवा उत्सव
नाशिक – भुजबळ फार्म वर यंदा पहिल्यांदाच गुढी पाडवा उत्सव
भुजबळ आणि त्यांची नात ईश्वरी यांच्या हस्ते उभारली जाणार गुढी
संपूर्ण भुजबळ कुटुंबीय गुढी पाडव्याच्या उत्साहात सहभागी
भुजबळ फार्म वर ढोल पथका सह कार्यकर्त्यांचा जल्लोष
-
‘किसनवीर सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 341 उमेदवारी अर्ज दाखल..
सातारा- ‘किसनवीर सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 341 उमेदवारी अर्ज दाखल….
कोरेगाव भुईंज आणि सातारा या ऊस उत्पादक गटातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल
आ.मकरंद पाटील, माजी आ. मदन भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ,योगेश बाबर,रमेश गायकवाड काही विद्यमान संचालक आदींनी उमेदवारी अर्ज केले दाखल….
कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ…
-
कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह
कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह
गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा होत नव्हत्या .सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर आज ठिकठिकाणी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आले आहेत कल्याण पूर्वेत देखील स्वागत यात्रेला पंधरा वर्षांची परंपरा आहे. आज कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड मनोज राय अनीश संजय मोरे यांचा उपस्थित हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती . गणपती मंदिरापासून ते आई तिसाई मंदिरापर्यंत ही यात्रा आहे या स्वागत यात्रेमध्ये तरुण-तरुणी ,नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते ,ढोल ताशे लेझीम पथक देखील या यात्रेत सहभागी झाली होता. या यात्रेत देवीदेवतांच्या वेशभूषा करून काही तरुण सहभागी झाले होते त्याचप्रमाणे महिला रिक्षाचालक ,सायकल रॅली बाईक रॅली देखील काढण्यात आली होती
-
औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळ मालगाडी रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक ठप्प
रेल्वे मालगाडी रेल्वे मार्गावरून घसरली
औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद जवळ मालगाडी रुळावरून घसरली
मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले
सकाळी सव्वासात वाजता घडली घटना
औरंगाबाद मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प
-
गुढी पाडवा निमित्त नववर्ष स्वागत समितीचे ढोल वादन
नाशिक – गुढी पाडवा निमित्त नववर्ष स्वागत समितीचे ढोल वादन
काळाराम मंदिराच्या समोर गुढी उभारून ढोल वादन
तर लहान मुलींनी सादर केलं लेझीम
-
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव दुष्काळी भागाला या प्रकल्पाला होणार फायदा
सातारा : गुरुवर्य स्व.लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे-कठापूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केंद्रीय प्रकल्प म्हणून समावेश…
247 कोटी रुपये निधी झाला मंजूर…
माढ्याचे भाजप खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी केले प्रयत्न.
सातारा जिल्ह्यातील माण,खटाव दुष्काळी भागाला या प्रकल्पाला होणार फायदा…
जिहे कठापूर योजनेमुळे २७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्यांना लाभ याचा लाभ मिळणार.
-
एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू
मुंबई – कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Mumbai | NCB’s panch witness in Cordelia cruise drug case, Prabhakar Sail died yesterday. As per his lawyer Tushar Khandare, he died of a heart attack at his residence in Mahul area of Chembur yesterday.
(File pic of Prabhakar Sail) pic.twitter.com/CUplYNkuIh
— ANI (@ANI) April 2, 2022
-
पावसाळी नाल्यातून गोदावरीत सांडपाणी
नाशिक – पावसाळी नाल्यातून गोदावरीत सांडपाणी
बेशिस्त नागरिक महापालिका आयुक्तांच्या रडारवर
गोदावरी सोडलेल्या सांडपाण्याच्या जोडण्या शोधण्याचे आदेश
अगोदर समज दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई बरोबर जोडण्या करणार खंडित
-
करोना मुक्तीचा गुढीपाडवा नव वर्षाची सुरुवात दादर इथं शोभायात्रेला सुरूवात
करोना मुक्तीची गुढीपाडवा नव वर्षाची सुरुवात दादर इथं शोभायात्रेने सुरू होत आहे. या शोभायात्रेच्या दिंडीत बाल शिवाजी लोकमान्य टिळक राधा कृष्ण, पांडव , मराठी मातीतील मलखांब दाखवणारे चलचित्र साकार करण्यात आल्या आहेत ढोल ताशा लेझीम पथकासह ही शोभायात्रा दादर पश्चिम रानडे रोड ते अमर हिंद मंडळ अशी निघत आहे
-
गुढी पाडव्यानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये लोकांची तोबा गर्दी
ब्रेक – गुढी पाडव्यानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये लोकांची तोबा गर्दी…
– विविध रंगांच्या फुलांनी , गंधांनी बहरलं दादर फूल मार्केट…
– झेंडू, चमेली, मोगरा बाजारात आज सगळ्यात जास्त भाव खात आहे…
– केळीची पाने, झेंडूची फूले हार आणि आंब्याची डाळं विकत घेण्यासाठी बाजारात लोकांची मोठी गर्दी…
– कोवीडनंतर सर्व निर्बंध ऊठल्याने बाजारात पुन्हा तेजी…
– आढावा चौपाल…
-
नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती तीव्र
नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती तीव्र
विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळल्यास परवाना रद्द
समुपदेशन नंतरही दुचाकी अपघातात 56 मृत्यू : हेल्मेट सक्ती मोहीम अधिक तीव्र
पोलीस आयुक्तांच्या हेल्मेट सक्ती साठी आठ महिन्यांपासून विविध उपाय योजना
-
दोन वर्षानंतर महापालिकेचे अर्थचक्र हळू हळू रुळावर
नाशिक – दोन वर्षानंतर महापालिकेचे अर्थचक्र हळू हळू रुळावर
नाशिक महापालिकेची सार्वधिक वसुली
महापालिकेला घरपट्टी तून 149 कोटींचा महसूल
तर पाणीपट्टी विभागातून 65 कोटींची विक्रमी वसुली
-
गुढीपाडव्यानिमित्त जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची मोठी उलाढाल
गुढीपाडव्यानिमित्त जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची मोठी उलाढाल
गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, याच पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरी मध्ये गुढीपाडव्यानिमित्त सोन्याची मोठी उलाढाल होत गेले दोन वर्ष कोरोना मुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता व त्यामुळे सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प होते. मात्र यावर्षी नियम शिथील झाल्याने आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदी करता येणार असल्याने जळगाव सुवर्णनगरी ताज मोठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. आज सोन्याचे भाव 51 हजार 225 रू प्रती 10 ग्रॅम तर चांदीचे भाव 68 हजार 807 रुपये आहे. भाव जरी काही प्रमाणात अधिक असला तरी गुढीपाडव्याचा मुहूर्त मात्र ग्राहकांसाठी महत्त्वाचा असल्याने या गुढीपाडव्याला मोठी उलाढाल सुवर्णनगरी होण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे.
-
गुडीपाडव्याला राज्यभरातील लाखो भाविक येत असतात सावंगा विठोबाला
गुढीपाडव्याला अमरावतीच्या सावंगा विठोबा येथील धार्मिक कार्यक्रमाला होणार साडे आठ वाजता सुरुवात.
जवळपास 30 फूट उंच खांबावर चढवली जाणार खोड….
गुडीपाडव्याला राज्यभरातील लाखो भाविक येत असतात सावंगा विठोबाला…
भुतांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे यात्रा; लाखो रुपयांचा कापूर गुढीपाडव्याला जातो जाळला….
कोरोना नंतर पहिल्यांदा गुढीपाडव्याला राहणार मंदिर भाविकांसाठी खुले…
-
खेड तालुक्यात चार वर्षाच्या चिमुकल्या मुलावर बिबट्याचा हल्ला.
खेड तालुक्यात चार वर्षाच्या चिमुकल्या मुलावर बिबट्याचा हल्ला……..
साईश दत्तात्रय पवळे असे हल्ला झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव…….
खेड तालुक्यातील रेटवडी जरेवस्ती येथील घटना…….
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी…….
अंगणात खेळत असताना बिबट्याने पाठीमागून येऊन केला हल्ला…….
चिमुकल्या मुलावर खाजगी रुग्णालयात उपाचार सुरु…….
-
तुळजाभवानी मंदिरात गुढी उभारली, नववर्षाचे जोरदार स्वागत
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुढी उभारून मराठी नववर्षाची सुरुवात विधिवत पूजा करून करण्यात कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनी भक्तांना तुळजाभवानीचे पाडव्याला दर्शन झाले.
साडे तीन शक्ती पीठ पैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीला साखरेचा हार घालून पूजा करण्यात आली त्याच बरोबर मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात भक्तांनी गुढी पाडवा साजरा केला त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संतोष जाधव
-
शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
मनसेच्या गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
मनसेकडून शिवसेनेला डीवचवण्याचा प्रयत्न
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे…या आशयाचा बॅनर शिवसेना भवन समोर
हिंदुत्वावरून मनसेने शिवसेनेला डीवचले
२० फुटाचा बॅनर शिवसेना भवन समोर मनसेकडून लावण्यात आलाय
Published On - Apr 02,2022 6:24 AM