Maharashtra News Live Update : नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज बुधवार दिनांक 10 ऑगस्ट 2022 जाणून घेणार आहोत राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याच्या काही भागांमध्ये हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. मुंबईप्रमाणेच नागपुरात देखील रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. अद्यापही पाऊस थांबला नसून पावसाची संततधार सुरूच आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे मंगळवारी राज्याच्या मंत्रिीमंडळाचा विस्तार झाला. याच पार्श्वभूमीवर आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.