Maharashtra News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
Maharashtra News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Big breakingImage Credit source: tv9
आज दिनांक 27 ऑगस्ट 2022 आपण जाणून घेणार आहोत देशातील महत्त्वपूर्ण घडामोडी ,ब्रेकिंग न्यूज. आज देखील काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अद्यापही पाऊस सुरूच आहे. आज शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेनेमध्ये उफाळून आलेल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. ते नागपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.