Maharashtra News Live Update : नितेश राणे कोठडी मुक्कामी, राणेंपुढे पुढचा पर्याय काय?

| Updated on: Feb 02, 2022 | 11:53 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : नितेश राणे कोठडी मुक्कामी, राणेंपुढे पुढचा पर्याय काय?

मुंबई : आज मंगळवार 2 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे (Elections) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व घडामोडी येथे पाहणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Feb 2022 10:54 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

    हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • 02 Feb 2022 10:29 PM (IST)

    अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत देव यांना श्रध्दांजली वाहिली

    “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.

  • 02 Feb 2022 10:28 PM (IST)

    जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन…

    वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला…

    हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

  • 02 Feb 2022 08:58 PM (IST)

    एसटी विलीनीकरणाच्या मागणीचा अहवाल उद्या सादर होण्याची शक्यता

    एसटी विलीकरणाचा अहवाल राज्यसरकार उद्या हायकोर्टात सादर करण्याच्या तयारीत…

    एसटी विलीकरण अहवाल सादर करण्याचा 12 आठवड्यांचा कालावधी उद्या संपणार…

    मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय कमिटीने राज्य सरकारला सादर केला होता अहवाल..

    28 कामगार संघटनांचा समितीने अभिप्राय मागविला होता…

  • 02 Feb 2022 08:56 PM (IST)

    राज्यपाल उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

    उद्या सायंकाळी भगतसिंग कोशारी औरंगाबाद दौऱ्यावर

    5 वाजता येऊन अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, औरंगाबादेत मुक्काम करून परवा सकाळी सिंदखेडराजा इथे रवाना होणार

  • 02 Feb 2022 06:43 PM (IST)

    नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

    भाजप आमदार नितेश राणेंना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राणेंना आजही दिलासा मिळाला नाही, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • 02 Feb 2022 04:36 PM (IST)

    शिवसेनेचे मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

    पिंपरी चिचंवडमध्ये ज्युपिटर रूग्णालयात 80 वर्षीय बाबर यांच्यावर सुरू होते उपचार

    काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यातच दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

    यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली.

  • 02 Feb 2022 03:57 PM (IST)

    गोव्यात आम आदमी पार्टीचे काँग्रेसच्या पावलावर पाऊल

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षाच्या उमेदवारांना पक्षाशी प्रामाणिक राहण्याची शपथ

    कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर घेतल्या आज सह्या

    याआधी काँग्रेस उमेदवारांनीही घेतली होती पक्षाशी प्रामाणिक राहण्याची शपथ

    महालक्ष्मी मंदिर आणि बांबोळीम क्रॉस येथे जाऊन घेतली होती शपथ

    निकालानंतर उमेदवार फुटण्याची विरोधी पक्षांना धास्ती

  • 02 Feb 2022 03:53 PM (IST)

    राणेंच्या शरणागतीवर विनायक राऊत काय म्हणाले?

    जे झालं ते न्यायालयाच्या आदेशाने झाले,

    आम्हाला त्यात हस्तक्षेप करायची गरज नाही

  • 02 Feb 2022 01:49 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात, आर्थिक मदतीची अपेक्षा

    भंडारा- जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात.

    – रब्बी हंगामातील धान पीक सततच्या थंडीमुळे पडले पिवळे .

    – शेतकऱ्यांनी औषधी फवारणी केली तरी उपयोग नाही.

    – जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात.

    – आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा.

  • 02 Feb 2022 01:48 PM (IST)

    दौंड तालुक्यातील पारगावातील दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय 

    पुणे – दौंड तालुक्यातल्या पारगावातील किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय

    – ग्रामपंचायतीने घेतलेल्या ऑनलाईन ग्रामसभेमध्ये एकमताने झाला निर्णय

    – विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघरातील हे गाव आहे

    – ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाहीय

  • 02 Feb 2022 01:00 PM (IST)

    एमएसपी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली- देवेंद्र फडणवीस

    शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून नव्या नोकऱ्यांची संधी भेटत आहे. हा अर्थसंकल्प न वाचता टीका करणाऱ्यांची तोंडे गायब होतील.

  • 02 Feb 2022 12:26 PM (IST)

    आम्ही पोलिसांचा सन्मान करतो, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ- प्रसाद लाड

    आम्ही पोलिसांचा सन्मान करतो

    भाजपच्या आड आले तर आम्ही सोडणार नाही.

    आम्ही जशास तसे उत्तर देऊ

    हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच दिले जाईल.

    काँग्रेसचे कार्यकर्ते वसंतस्मृतीकडे गेले तर आम्ही बंदोबस्त तोडून तिकडे जाऊ

    भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा पवित्रा

  • 02 Feb 2022 12:23 PM (IST)

    मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन; भाजपच्या अंगावार आले तर सोडणार नाही- प्रसाद लाड 

    मुंबई : मुंबईत काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन

    भाजप आमदार प्रसाद लाड आंदोलनात सहभागी

    भाजपच्या अंगावार आले तर सोडणार नाही- प्रसाद लाड

  • 02 Feb 2022 12:06 PM (IST)

    पुणे महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात अजित दादांनी थोपटले दंड, पक्षाची बैठक घेण्याची शक्यता 

    पुणे : महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात अजित दादांनी थोपटले दंड

    शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यात पक्षाची बैठक घेण्याची शक्यता

    पुणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू,

    बैठकीत अजित पवार स्वबळाचा नारा देणार की पुण्यात युती होणार ?

    शहर नेतृत्वान स्वबळाची तयारी केली सुरू,

    अजित पवार पक्षाची बैठक घेणार सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती ….

  • 02 Feb 2022 11:27 AM (IST)

    अर्थसंकल्पात चार कोटी ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणी दिले जाणार- नरेंद्र मोदी

    देशात पाच कोटींपेक्षा जास्त नळजोडणी मागील दोन वर्षात देण्यात आले आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात चार करोड ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लोक शेतीशी जोडलेले असतात. यावेळी साठ हजार कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केले जातील.

  • 02 Feb 2022 11:22 AM (IST)

    भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे- नरेंद्र मोदी

    भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे. आठ वर्षापूर्वी भारताचा जीडीपी एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा होता. आज भारताची अर्थव्यवस्था दोन लाख तीस हजार कोटीच्या आसपास आहे. 2013-14 मध्ये भरताची निर्यात दोन लाख 85 हजार कोटी रुपये होती. आज भारताची निर्यात 4 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

  • 02 Feb 2022 11:18 AM (IST)

    यावेळच्या अर्थसंकल्पाचे सर्वांनी स्वागत केले- मोदी

    भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. जागातील लोक भारताला एक मजबूत देश म्हणून पाहू  इच्छित आहे. त्यामुळे आपण आपल्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे. नव्या संधीचा हा काळ आहे. भारत आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून आधूनिक भारताचे निर्माण होण्याची गरज आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचे सर्वांनी स्वागत केले. या बजेटमध्ये देशाला आधुनिकतेकडे नेण्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

  • 02 Feb 2022 11:15 AM (IST)

    कोरोनानंतर जगात मोठे बदल होण्याची शक्यता आहे- नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. अर्थसंकल्प सादर करताना खूप बारीक अशा गोष्टी असतात. एका तासाच्या भाषणात या सर्व गोष्टी सांगणे अशक्य असते. मित्रांनो आज देश स्वतंत्र्यांच्या 75 वर्षात आहेत. मागील शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश लढत आहे. कोरोना महामारीच्या विरोधात आपण लढत आहोत. यानंतरचं जग कोरोनाच्या अगोदरसारखं नसणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात मोठे बदल झाले. तशाच प्रकार कोरोनानंतर जगात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

  • 02 Feb 2022 11:02 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात भाजप, मनसे कायदेशीर लढाई लढणार 

    पुणे – पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात भाजप, मनसे कायदेशीर लढाई लढणार

    – नव्या प्रभाग रचनेवर भाजप आणि मनसेने घेतला आक्षेप

    – प्रभाग रचनेत राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्याचा दोन्ही पक्षांकडून आरोप

    – नव्या प्रभाग रचनेसंदर्भात मनसे पदाधिकारी आज राज ठाकरेंशी चर्चा करणार.

  • 02 Feb 2022 10:18 AM (IST)

    राज्य मागासवर्गीय आयोगाची 4 तारखेला पुण्यात महत्वपूर्ण बैठक 

    राज्य मागासवर्गीय आयोगाची 4 तारखेला पुण्यात महत्वपूर्ण बैठक

    – या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला अहवाल देण्यावर होणार चर्चा

    – 8 तारखेला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बैठकीचे आयोजन

    – बैठकीच्या दोन दिवसानंतर अहवाल राज्य सरकारला देणार असल्याची माहिती.

  • 02 Feb 2022 10:09 AM (IST)

    नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील निलराज इंडस्ट्री कारखान्याला आग

    नाशिक : नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधील निलराज इंडस्ट्री नावाच्या कारखान्यात भीषण आगडोंब

    – पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती

    – आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते

    – घटनास्थळी दाखल 9 अग्निशामक बंबाना आग विझविण्यात यश

  • 02 Feb 2022 10:03 AM (IST)

    महाडीबीटी पोर्टलवरील एकूण 14 प्रकारच्या शिष्यवृत्तींचा अर्ज भरण्याला दिली मुदतवाढ

    महाडीबीटी पोर्टलवरील एकूण 14 प्रकारच्या शिष्यवृत्तींचा अर्ज भरण्याला दिली मुदतवाढ

    विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आपला शिष्यवृत्ती अर्ज

    तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत होत्या अडचणी

    अखेर राज्याचे उच्च शिक्षण सहसंचालक प्रकाश बच्छाव यांनी काढले आदेश

    विद्यार्थ्यांना आता करता येणार उशीरापर्यंत अर्ज

  • 02 Feb 2022 09:10 AM (IST)

    राज्यातील 25 जिल्हापरिषदेच्या निवडणुका वेळेत घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार

    मुंबई : राज्यातील 25 जिल्हापरिषदेच्या निवडणुका वेळेत घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार

    पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रीया सुरु,

    जिल्ह्यात 82 गट व 164 गण निश्चित

    काल राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी एस मदान यांनी घेतली ऑनलाईन बैठक

    निवडणुका वेळेतच घेण्याचा व्यक्त केला मानस

    कमी कमी वेळात निवडणुका घेण्याचा विचार

    ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडणार?

  • 02 Feb 2022 08:12 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील 10 टक्के शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

    बुलडाणा जिल्ह्यातील 10 टक्के शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह,

    मात्र कोरोनाबधित शिक्षकांची प्रकृती चांगली,

    जिल्हा परिषदेच्या 16 हजार 512 शिक्षकांपैकी 1 हजार 687 शिक्षक पॉझिटिव्ह ,

    तर कोरोनाबधित शिक्षक घेत आहेत घरूनच ऑनलाईन वर्ग

  • 02 Feb 2022 07:39 AM (IST)

    नागपूर महापालिकेचा प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर

    कोल्हापूर : महानगरपालिकेचा प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर

    नव्या प्रभाग रचनेत अनेक प्रस्थापितांना धक्का, हक्काचे प्रभाग फुटले

    तर बहुसदस्यीय रचनेमुळे जुन्या प्रभागांचा झाला विस्तार

    नव्या 31 प्रभागांमुळे निवडणुकीतील चुरस वाढणार

    14 फेब्रुवारी पर्यंत नोंदवता येणार प्रभाग रचनेवर हरकती

  • 02 Feb 2022 07:38 AM (IST)

    नागपुरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या परिसरात ड्रोन वापरावर बंदी

    नागपूर – नागपुरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या परिसरात ड्रोन वापरावर बंदी

    – संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, विमानतळ, वायुसेना मेन्टेनन्स कमांड मुख्यालय परिसरात ड्रोन वापरावर बंदी

    – महत्त्वाच्या ठिकाणांच्या 2 किमी अंतरावर ड्रोन वापरावर बंदीचे पोलीसांचे आदेश

    – नागपुरातील महत्त्वाची ठिकाणं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची गुप्त माहिती

    – 31 मार्चपर्यंत बंदी कायम राहणार

  • 02 Feb 2022 07:17 AM (IST)

    हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास फाटकला नागपूर पोलीस अटक करणार

    नागपूर – ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास फाटकला नागपूर पोलीस अटक करून नागपुरात आणणार

    – ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या चिथावणीमुळेच विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन

    – नागपुरातील आंदोलनाची परवानगी घेण्यात आली नव्हती

    – विद्यार्थ्यांनी बसची तोडफोड करून आंदोलनाला हिंसक वळण दिले

    – ‘हिंदुस्थानी भाऊ’वर अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, अटकही करणार

    – आंदोलनात सहभागी युवकांविरुद्ध पोलीस कारवाई करणार

    – सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस युवकांकडून शोध सुरु

Published On - Feb 02,2022 6:18 AM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.