Maharashtra News Live Update : मुंबईतल्या भेटीगाठींची दिल्लीपर्यंत चर्चा, भेटीत दडलंय काय?

| Updated on: Feb 20, 2022 | 11:25 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : मुंबईतल्या भेटीगाठींची दिल्लीपर्यंत चर्चा, भेटीत दडलंय काय?

मुंबई : आज रविवार 20 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.  राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.  ते मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील.  उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत.  उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडेल. पंजाबमध्येही आज मतदान होत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2022 09:16 PM (IST)

    एकनाथ खडसे यांचं विकासाच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांच्यावर टीकास्त्र

    मला कोणी काहीही म्हणो डाकू म्हणो चोर म्हणो बदमाश म्हणो

    चाळीस वर्ष लोकांनी माझ्यावर प्रेम केलं तुमच्यावर नाही केले

    असं नका समजू नाथाभाऊ आमदार नाही, आमदारा पेक्षा वजन सरकारमध्ये जास्त

    या जिल्ह्यात 20 हजार कोटी रुपयांच्या वर विकास कामांना मंजुरी नाथाभाऊंनी दिली हा इतिहास आहे

    विकास कामे करायला दम लागतो तुमच्यात दम असेल तर शंभर कोटीचे कामे मंजूर करून दाखवा

    मुक्ताईनगर एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांवर खडसेंचे टीकास्त्र

  • 20 Feb 2022 06:11 PM (IST)

    शरद पवार, केसीआर Live

    आजची मिटिंग वेगळ्या मुद्द्यावर होती-पवार

    देशातल्या बिकट परिस्थिवर चर्चा झाली

    राजकीय चर्चा जास्त केली नाही

    लोकांच्या अडचणींवर जास्त चर्चा

    तेलंगणाने देशाला एक रस्ता दाखवला आहे

    शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे

  • 20 Feb 2022 06:10 PM (IST)

    शरद पवार, केसीआर Live

    पवारांचा राजकारणाचा अनुभव

    पवारांच्या अनुभवांचा फायदा होईल

    पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे

    एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहेच

    इतर पक्षांनाही एकत्र आणणार

    सर्व लोक बारामतीत भेटतील

    सर्वांना सोबत घेऊन काम करणार

    लवकरच देशाच्या समोर नवा अजेंडा ठेवणार

  • 20 Feb 2022 06:07 PM (IST)

    शरद पवार, केसीआर Live

    सर्वांनी एकत्र येत मुकाबला केला पाहिजे

    पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

    मी पवारांचा आभारी आहे-राव

    पवारांनी तेलंगना राज्य बनवण्यास मदत केली ती कधीच विसरू शकत नाही

    पवार आमचे वरिष्ठ नेते आहे

    हा देश नीट चालत नाही

    आम्ही पवारांचा सल्ला घ्यायला आलोय

    देशाचा विकास होत नाहीये

    त्याची कारणं शोधली पाहिजे

  • 20 Feb 2022 05:16 PM (IST)

    विद्यापीठाच्या परीक्षे कॉपी करणाऱ्यांची खैर नाही

    यापुढे कोणी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर त्याला थेट जेलची हवा खावी लागणार

    ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

    परीक्षेत कॉपी केल्यास आयटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल होणार

    ऑनलाईन परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नका, असे आवाहन विद्यापीठाने केल

    गेल्या दोन वर्षात ऑनलाईन परीक्षा देताना अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले.

    या पार्श्वभूमीवर यावर्षी विद्यापीठाने कठोर नियम तयार केलेत

  • 20 Feb 2022 04:48 PM (IST)

    केसीआर सिलव्हर ओकवर

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केसीआर शरद पवारांच्या भेटीला

  • 20 Feb 2022 04:08 PM (IST)

    दादा भुसेंचा विरोधकांना टोला

    काही गोष्टीचे काळ वेळ उत्तरं असते.

    काही पोपट बोलतात ,काही जण बेछूट आरोप करतात….

    काही लोक पहाटेचा शपथविधी विसरले नाही..

    गोड बातमी लवकरच आपल्याला कळेल.

    कधी कधी मुख्यमंत्री काहीच बोलायचे नाही …

    पण चांगले कार्य त्यांनी केले…

    कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे न्यायालयाने कौतुक केलं आहे.

  • 20 Feb 2022 03:19 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची चुरस वाढली

    अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांला चक्क रुग्णवाहीकेतुन मतदानासाठी केले हजर

    कळंब येथील मतदार मधुकर पालकर यांना हृदयवीकर झटक्यानंतर आजारी असून ऑक्सिजनवर असतानाही त्यांना रुग्णवाहिकेत आणले मतदानासाठी

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी आहे लढत

    शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील अशी आहे

    उद्या 21 फेब्रुवारी होणार आहे मतमोजणी

  • 20 Feb 2022 01:51 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थापने वरून धनुर गावात वाद वाढला

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थापने वरून धनुर गावात वाढला वाद

    गावातील नागरिकांनी विना परवानगी छत्रपती ची पुतळ्याची स्थापना प्रकरणी वातावरण चिघळले

    पोलीस प्रशासनाकडून पुतळा काढण्यास सांगितल्यावरून शिवभक्त झाले आक्रमक

    गावकऱ्यांनी पुतळ्याला घेराव घालत पुतळा न काढण्याचा पवित्रा घेत पोलिसांना केला विरोध

    या वादातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात फौज फाटा गावात तैनात

    वाद चिघळण्याची शक्यता गावाला आले छावणीचे स्वरूप

    ग्रामपंचायत ला पोलीस प्रशासन ने दिली नोटीस…

  • 20 Feb 2022 01:01 PM (IST)

    तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव मुंबईत दाखल

    तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव मुंबईत दाखल

    उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेणार

    शरद पवार यांची देखील भेट घेणार

    के.चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेकडे लक्ष

  • 20 Feb 2022 12:20 PM (IST)

    भुजबळांची 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी पाहिल्यानं गुन्हा दाखल केला : किरीट सोमय्या

    उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल

    माझ्यावर छगन भुजबळ यांच्या दबावामुळं गुन्हा दाखल

    एकदाच डिक्शनरी घेऊन काय शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या, संजय राऊत यांना आव्हान

    जो आरोप लावत आहे त्यांनी पुरावे द्यावेत

    कंपनीची कागदपत्र पाहून जे लिहायचं आहे ते लिहा

    भुजबळांची 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी पाहिल्यानं गुन्हा दाखल केला

    सुजित पाटकर विरोधात गुन्हा दाखल करत नाही

    ठाकरे पवार यांच्या कुटुंबीयांची शिव्या द्यायची पद्धत आहे

    उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे बंगले कुठं गेले

  • 20 Feb 2022 11:04 AM (IST)

    केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घरावर काँग्रेस मोर्चा काढणार

    नाशिक – केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घरावर काँग्रेस काढणार मोर्चा

    पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध म्हणून काढणार मोर्चा

    भारती पवार या केंद्रीय आरोग्य मंत्री

    काँग्रेस भवन आणि भारती पवार यांच्या घराबाहेर पोलोस बंदोबस्तात वाढ

  • 20 Feb 2022 10:01 AM (IST)

    महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे ते समजलं पाहिजे : किरीट सोमय्या

    ठाकरे साहेबांमध्ये उत्तर देण्याची क्षमता नाही का?

    संजय राऊतांनी जूनं प्रकरण का उकरुन काढलं

    संजय राऊत घाबरलेत

    अन्वय नाईक कुटुंबाला का मध्ये आणत आहेत

    महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे ते समजलं पाहिजे

    अन्वय नाईक यांनी त्या घरांचा कर भरला होता

    5 कोटी 18 लाखांची संपत्ती गायब झालीय त्याचा शोध घेतला पाहिजे,

  • 20 Feb 2022 09:53 AM (IST)

    2024 नंतर देशाच्या राजकारणात बदल होणार : संजय राऊत

    तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेतील

    देशाच्या राजकारणात अनेक बदल होणार आहेत

    ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केसीआर, उद्धव ठाकरे यांची गैरभाजपशासित सरकार देशाच्या आगामी राजकारणाबाबत चर्चा करत आहेत

    शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा होईल

    नव्या राजकारणाच्या स्थितीवर देश जात आहे

    किरीट सोमय्या कोण आहेत,

    देशाचं राजकारण 2024 पासून बदलणार आहे.

    काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची आहे.

  • 20 Feb 2022 09:45 AM (IST)

    औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरून भागवत कराड आक्रमक

    औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेवरून भागवत कराड आक्रमक

    पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्यावर उतरण्याचा भागवत कराड यांचा इशारा

    औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजना संथ गतीने सुरू असल्याचा केला आरोप

    पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात थेट केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा इशारा

    1680 कोटी रुपये खर्च करून औरंगाबाद शहरासाठी राबवली जातेय पाणी पुरवठा योजना

    पैठणच्या जायकवाडी धरणावरून औरंगाबाद शहरासाठी सुरू आहे पाणीपुरवठा योजना

    पाणी पुरवठा योजनेसाठी थेट केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे खळबळ

  • 20 Feb 2022 08:25 AM (IST)

    नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचा 133 जागांसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय

    नाशिक – आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचा 133 जागांसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय

    शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपकडून शंभर प्लसचा नारा

    प्रारुप प्रभाग रचना झाल्यानंतर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात

    सोमवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असून आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

  • 20 Feb 2022 08:24 AM (IST)

    कोरोनाने अनाथ झालेल्या 56 बालकांना 40 महसूल अधिकाऱ्यांनी घेतले दत्तक

    कोरोनाने अनाथ झालेल्या 56 बालकांना 40 महसूल अधिकाऱ्यांनी घेतले दत्तक

    तर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतल्या दोन जुळ्या मुली दत्तक

    जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार नायब तहसीलदारांनी मित्र रुपी शास्वत पालक होण्याचा घेतला निर्णय

    जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्णयाचे राज्यभर कौतुक

  • 20 Feb 2022 07:24 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक साठी आज मतदान

    उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक साठी आज मतदान

    जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत

    आज रविवारी 10 जागासाठी 8 मतदान केंद्रावर होणार मतदान होणार आहे

    5 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या

    जिल्ह्यातील 808 मतदार बजावणार सकाळी 8 ते संयकाळी 4 या वेळेत मतदानाचा हक्क

  • 20 Feb 2022 06:51 AM (IST)

    नागपुरात वेळेचे निर्बंध हटविले , संख्येचे मात्र कायम

    नागपुरात वेळेचे निर्बंध हटविले , संख्येचे मात्र कायम

    नागपुरात लसीकरणाचा पहिला डोस 99 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 71टक्के च्या वर गेली

    त्यामुळे काही निर्बंध शिथिल करण्यात आले ,

    चित्रपट गृह, उद्यान, पर्यटन स्थळ, जलतरण तलाव व इतर मनोरंजन स्थळावर नियमित वेळेनुसार 50 %टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा..

  • 20 Feb 2022 06:16 AM (IST)

    शिवसेना नेते,कृषी मंत्री दादा भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    शिवसेना नेते,कृषी मंत्री दादा भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

    अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात पार पडणार शिवसेनेचा पश्चिम विदर्भ पक्ष मेळावा….

    आगामी मनपा निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सेनेचा पक्ष मेळावा..

    दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची विभागीय आढावा बैठक..

Published On - Feb 20,2022 6:10 AM

Follow us
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.