Maharashtra News Live Update : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, सरकारला काय इशारा दिला?

| Updated on: Feb 26, 2022 | 11:31 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, सरकारला काय इशारा दिला?
breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज शनिवार 26 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून महाविकास विरुद्ध भाजप (bjp)असा सामना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अजून चौकशी सुरू असल्याचे समजते. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे, या सर्व घटनांना आढावा आपण दिवसभरात घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Feb 2022 10:11 PM (IST)

    राष्ट्रवादीतलं इनकमिंग वाढलं

    मावळ, लोणावळा भाजप युवा मोर्चा माजी अध्यक्ष मुकेश परमार यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्याचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  • 26 Feb 2022 07:37 PM (IST)

    टेबलवर साप सोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    महावितरणच्या अधिकारी प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिवसा लाईट मिळावी यासाठी केले होते आंदोलन

    तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे


  • 26 Feb 2022 07:01 PM (IST)

    मराठा आरक्षण आंदोलन पेटणार

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण आंदोलनाला वाढता पाठिंबा

    भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील उद्या सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे करणार लक्षणिक उपोषण आंदोलन

    मराठा समाजाचा अंत पाहू नका , सगळं चूकचे सुरु आहे

    उद्रेक होण्याअगोदर सावरून मराठा समाजाला आरक्षण द्या

    आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा सरकारला इशारा

  • 26 Feb 2022 05:09 PM (IST)

    मराठा समन्वयकांची प्रतिक्रिया

    आज राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने आंदोलनं होतील, रस्त्यावर उद्रेक पाहायला मिळेल,

    याची सगळी जबाबदारी ही सरकारची आहे

    राज्य सरकारने आज येऊन विचारायला हवं होतं, मात्र इथपर्यंत कोणी आलं नाही

    सरळ आणि साध्या मागण्या आहेत,

    आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार होतो, मात्र संभाजीराजे नको म्हटले,

    रस्त्यावर उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे..

     

  • 26 Feb 2022 05:05 PM (IST)

    नरेंद्र मोदी आणि किरीट सोमय्यांविरोधात नारेबाजी

    नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत त्यांच्या मतदार संघात कार्यकर्त्याचं मुंडन आंदोलन सुरू

    इडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केलं मुंडन आंदोलन

    पाच कार्यकर्त्यांनी केलं मुंडन

    वाशीनाका भाजी मार्केट परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी

  • 26 Feb 2022 05:02 PM (IST)

    सभाजी राजे यांच्या पत्नी झाल्या भाऊक

    संभाजीराजे यांच्या भाषणानंतर त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू

    संभाजीराजे म्हणले मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे

    त्यानंतर पत्नी संयोगीता राजे यांच्या डोळ्यात पाणी

  • 26 Feb 2022 04:40 PM (IST)

    अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांची परवानगी

    अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी दिले आदेश….

    बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी केली होती वंचित बहुजन आघाडीने तक्रार….

    राज्यपालांनी दिले पोलीस अधीक्षक यांना कारवाई करण्याचे आदेश….

    बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ़….

  • 26 Feb 2022 03:59 PM (IST)

    कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्चमध्ये पूर्ण होणार

    गेली काही वर्षे सुरू असलेले कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम येत्या मार्च महिन्यापर्यंत संपणार असून चाकरमान्यांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

    कोकण रेल्वेचा मार्ग रोहा ते ठोकूरपर्यंत असून या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नुकतीच या मार्गावर विजेच्या इंजिनाच्या सहाय्याने दिवा-रत्नागिरी एक्सप्रेस धावली होती.

    विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास वर्षाला इंधनावरचे 150 कोटी रुपये वाचणार आहेत.

  • 26 Feb 2022 02:43 PM (IST)

    आयुष्यमान भारत डिजिटल मिशन साठी 1600 कोटी मंजूर

    केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय

    # आयुष्यमान भारत डिजिटल मिशन साठी 1600 कोटी

    5 वर्षांसाठी 1,600 कोटी मंजूर

    आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजुरी

    नागरिकाना आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करता येणार

    नागरिकांचे डिजिटल आरोग्य रेकॉर्ड लिंक केले जाणार

  • 26 Feb 2022 02:14 PM (IST)

    आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

    बीड: आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

    धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न

    पैशाची बॅगही पळविली

    प्रतिभा क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल

    आमदार संदिप क्षीरसागरांचे बंधू हेमंत आणि अर्जुन यांचा आरोपीत समावेश

    छावाचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांच्यावर गुन्हा दाखल

  • 26 Feb 2022 02:02 PM (IST)

    3 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, त्यात आम्ही भूमिका माडू – प्रवीण दरेकर

    सयोजक सांगत आहेत की राजकारण इथे नको आपण राजकीय चश्मा बाजुला काढा

    एकमुखान आदोलन करू

    राजेंना आमचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत

    एसटी संपाला आम्हीं पाठिंबा दिला होता

    त्यात राजकारण घुसलं

    मराठा आरक्षणावर आदोलनात राजकारण नको

    3 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, त्यात आम्ही भूमिका माडू

    राजेंना आमचा पाठिंबा

  • 26 Feb 2022 02:00 PM (IST)

    मराठ्यांच्या रक्तातच राजकीय भूमिका आहे

    कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक संघटनांच्या बैठका घेऊन तिकडे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि मला मला संपूर्णपणे याची खात्री आहे की काही ठिकाणी मुद्दामून डोळे बंद करण्याचे काम केलं गेलं याचा आणि या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही निषेध फक्त करतो. मराठा समाजाच्या मागण्या माडत आहोत भिक मागत नाही आहोत

  • 26 Feb 2022 01:58 PM (IST)

    प्रवीण दरेकर, प्रसाद लाड उपोषणस्थळी दाखल

    संभाजी राजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड मंचावर उपस्थित

  • 26 Feb 2022 01:57 PM (IST)

    युक्रेनमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांला परत आणण्याची पालकांची मागणी

    युक्रेनमध्ये डॉक्टरांचे शिक्षण घेणाऱ्या राहुल यादवच्या पालकांनी त्याला भारतात सुखरूप परत आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

    मुंबईतील कांदिवली येथे राहणारे अजंता यादव आणि राजपत यादव यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुल यादव हा 22 वर्षांचा असून तो गेल्या 4 वर्षांपासून युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे, सध्या राहुल तेथे सुरक्षित आहे पण त्याच्या पालकांची चिंता वाढली आहे.

  • 26 Feb 2022 01:54 PM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी बसमधून रोमानियाकडे निघाले

    पालघर जिल्ह्यातील युक्रेन मधील अडकलेले विद्यार्थिनी बस मधून रोमानियाकडे निघाले आहेत. बसच्या बाहेर उभे असलेल्या विद्यार्थी यांनी हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या पालकांना पाठविला आहे. तसेच बसमध्ये बसल्यानंतर वाडा येथील मेडिकल विद्यार्थिनी झोहा शेख व शेजल वेखंडे यांनी आपली प्रतिक्रिया पालकांना पाठवली आहे.

  • 26 Feb 2022 01:46 PM (IST)

    केंद्र सरकार आणि ईडी विरोधात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचे आंदोलन

    मुंबईतील कांदिवली येथे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीविरोधात आंदोलन केले.

    आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार ईडीने महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना 20 वर्षे जुन्या प्रकरणात अटक केली आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे.

    या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली.

  • 26 Feb 2022 01:42 PM (IST)

    ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

    – गरवारे कॉलेजजवळील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या,

    -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी,

    – मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे केली मागणी,

    – ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

  • 26 Feb 2022 01:20 PM (IST)

    गोव्याचे मुख्यमंत्री शनिदेवाच्या चरणी…

    मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले शनी देवाचे दर्शन…
    शनी मूर्तीला केला तेलाभिषेक….
    शिर्डी पाठोपाठ शनी देवाचे घेतले दर्शन…
    विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सावंताचे देवदर्शन….

  • 26 Feb 2022 01:20 PM (IST)

    – नागपूरात रेशनवरील गरिबांचे धान्य वितरण आजपासून बंद

    – नागपूरात रेशनवरील गरिबांचे धान्य वितरण आजपासून बंद

    – ‘पॅाश’ मशीनचं सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने रेशन वितरण बंद

    – नागपूरातील ६८३ रेशन दुकानं आजपासून बंद

    – १४ लाख लाभार्थ्यांना आजपासून धान्य मिळणार नाही

    – अन्न वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुकानं बंद

    – नागपूर रेशन दुकानदार संघाचा निर्णय

  • 26 Feb 2022 01:19 PM (IST)

    अंबाजोगाईमध्ये विषबाधेमुळे तीन बालकांचा मृत्यू

    विषबाधेमुळे तीन बालकांचा मृत्यू

    दोन बहिणी एक भाऊ असा समावेश आहे अंबाजोगाई तालुक्यातील

    बागझरी येथील घटना त्यांना अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय

    येथे दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान तीन बालकांचा मृत्यू डॉक्टरकडून घोषित करण्यात आला आहे

  • 26 Feb 2022 01:10 PM (IST)

    थेट हेलिकॉप्टर मधून घेतली नवरा नवरीची मुलाखत

    औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड गावांमध्ये एका नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॅप्टर आणलं होतं मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावावरून हेलिकॉप्टर फिरवत नवरदेव नवरीला सासरी घेऊन गेलाय, राम लांडे असं नवरदेवाचं नाव आहे तर चित्रा कोरडे असं नवविवाहित नवरीचं नाव आहे. हॅलिकॉप्टरमध्ये बसून सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्ख गाव हेलिपॅडवर लोटलं होतं

  • 26 Feb 2022 01:06 PM (IST)

    गोळीबार प्रकरणात क्षीरसागर कुटुंब आमनेसामने

    गोळीबार प्रकरणात क्षीरसागर कुटुंब आमनेसामने

    नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि मुलगा योगेश क्षीरसागरांवर गुन्हा दाखल झाल्याने क्षीरसागर कुटुंब आक्रमक

    योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉ सारिका क्षीरसागर रस्त्यावर

    जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची घेतली भेट

    शिवाजी नगर पोलिसात परस्परविरोधी तक्रार दाखल

    गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू

    नगरपरिषद निवडणूक तोंडावर पाहून आमच्यावर गुन्हे दाखल

    आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर भावजय सारिका यांचा गंभीर आरोप

    आमदार संदीप हे पदाचा दुरुपयोग करतायेत

    डॉ सारिका क्षीरसागर यांचा आरोप

    गोळीबाराच्या दिवशी इथं कोणीही उपस्थित नव्हते

    तरीही खोटे गुन्हे दाखल केल्याचा डॉ. सारिका यांचा आरोप

  • 26 Feb 2022 01:03 PM (IST)

    माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

    बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

    शुक्ला ह्या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत

    याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

    या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

    शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 26 Feb 2022 01:01 PM (IST)

    शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम, अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले साप

    इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले साप

    महावितरण कडून दिवसा लाईट मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे करताहत आंदोलन

    महावितरणच्या अधिकार्‍यांच्या टेबलवर साफ सोडल्यामुळे महावितरण मध्ये तणावाची वातावरण

    शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खाणार नाही घेतला पवित्रा

  • 26 Feb 2022 12:56 PM (IST)

    वसईत कपड्याच्या कंपनीला भीषण आग

    वसई:- वसईत कपड्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

    स्थानिक नगरसेविका किरण चेंदवनकर यांनी तात्काळ वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून, आग विझविण्यात यश आले असून सध्या कुलिंग चे काम सुरू आहे.

    वसई पूर्व नवघर येथील व्हीक्ट्री कंपनी मधील दुक्का इंटरप्राइजेश च्या कपड्याच्या कंपनीला आज सकाळी 10 च्या सुमारास ही आग लागली होती.

    बाजूलाच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सबस्टेशन असल्याने आग तात्काळ आग विझविण्यात यश आले आहे.

  • 26 Feb 2022 12:18 PM (IST)

    अजित पवार, जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम

    अजित पवार, जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम

    2 तारखेपासून नर्सरी, kg, lkg चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीये

    जम्बो कोविड सेंटर बंद केले जाणार आहे

    प्रत्यक्ष शिक्षणा प्रमाणे ऑनलाइन शिकवता येत नाही, त्यासाठी मर्यादा येतात

    लसीकरणाला पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही,

    विद्यार्थी शाळा विसरले असून, त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावावी लागेल

    शनिवार आणि रविवारी ही शिक्षकांनी वर्ग घ्यावे,

    लातूर पॅटर्न राबवाव लागणार

    तुम्हांला घरी बसवून पगार देत होतो, काही जण काम करत होते

    शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे

    माझ्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला असता तर चांगलं झालं असत

    मुलांचाही सत्कार केला जाणार असे, सांगितलं गेलं, मी आलो तेंव्हापासून पाहतो, येथे केवळ शिक्षक आहेत,

    नंतर कधी सत्कार करणार तुमचा कार्यकाळ 21 मार्चला संपणार आहे,

    जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, अधिकारी आणि।पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे

    जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांचे मुले zp शाळेत नाहीत, जो पर्यत आम्ही गुणवत्ता सुधारणार नाही, तोपर्यत आम्ही पालकांना कसं सांगणार , तुमचे मुले पाठवा म्हणून

    अजित पवारांनी गणिताचे सूत्र उलगडून सांगितलं

    विज्ञानाची कास धरली पाहिजे

    कुठलेही पुरस्कार हे गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे, मी बारामतीचा आहे म्हणून तेथील शिक्षकांना गुणवत्ता नसेल तर द्यायचं नाही

    महिला व बाल भवन केले जाणार आहे

    विश्वास हर्ता संपली की माणूस बिनकामाचा होतो

    ऑन बदली

    शहराजवळ बदली पाहिजे, यासाठी आग्रही राहू नका, शाळेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा वाढविण्यासाठी आग्रही

    Zp सदस्य आले।नाहीत, आले त्यांना तरी बसवा,

    गॅलरीमध्ये शिक्षकासोबत आलेले नातेवाईक बसण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे ते उभे होते, तर जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या, ये पाहून

    अजित पवारांनी विचारला जाब

  • 26 Feb 2022 12:16 PM (IST)

    नियुक्त आयोगाला मराठा समाजातील लोकांना प्रतिनिधित्व द्यावं

    – मी महाराजांचा वंशज

    – हा लढा मी लढायलाच हवा

    – हा माझा निर्णय

    – एक मागासवर्गीय आयोग असतांना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात,घटनेत तरतूद नाही

    – उगाच समाजाला दिशाभूल करू नये

    – मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोन आले होते

    – मी प्रवासात होतो,बोलणं मात्र झालं नाही

    – एसटी कर्मचाऱ्यांना अनेक प्रश्न,तिथे नौकरी देण्यात काय अर्थ ?

    – नियुक्त आयोगाला मराठा समाजातील लोकांना प्रतिनिधित्व द्यावं

    – मला,छत्रपतींना धमक्या ? जर आम्हाला धमकी आली तर मला काहीच करायची गरज नाही,माझा फक्त या घराण्यात जन्म झालाय,कोट्यावधी पाईक आहेत की

  • 26 Feb 2022 12:13 PM (IST)

    संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला शिवसंग्रामचा पाठींबा

    मराठा समाजासाठी विशेष मागास आयोग नेमणे म्हणजे मूर्खपणा

    शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा राज्य सरकारवर निशाणा

    मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकून रहावं हा यामागचा उद्देश

    एक मागास आयोग असताना दुसऱ्या मागास आयोगाची गरज काय?

    सरकार मराठा आणि ओबीसींची फसवणूक करत आहे

    विशेष मागास आयोग नेमण्याचा विरोधात रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार

    मराठा समाजाच्या न्यायासाठी जे जे लढा देतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहू

     

  • 26 Feb 2022 12:11 PM (IST)

    मागण्या फार छोट्या आहेत – खासदार संभाजीराजे छत्रपती

    – मागण्या फार छोट्या आहे

    – राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या

    – आर्थिक महामंडळ मदत वाढवा, आर्थिक तरतूद करा

    – सारथी संस्था सबलीकरण,सक्षमीकरण करा

    – 500 कोटी मागणी केली,अजित पवार म्हणाले जास्तीतजास्त देऊ

    – बजेटमध्ये तरतूद करू

    – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह मागणी

    – फक्त ठाण्यात सुरू झालं

    – आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही

    – सिलेक्शन झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती द्या हे सुप्रीम कोर्टानं सांगूनही नियुक्ती देत नाही

    – कोविड कारण सांगून नियुक्ती देत नाही

    – ते म्हाकुंभ कुंभकोणी काही भलतंच सांगतात

    – सुपर न्यूमरी पध्दतीने मार्ग काढा

    – कोपर्डी मुळं मोर्चे निघाले, आरोपींना फाशी सजा झाली,आरोपी अपिलात गेले,सरकार काही करत नाही

    – या मागण्यांवर समाजाला दिलासा मिळाला नाही म्हणून माझं आमरण उपोषण

  • 26 Feb 2022 12:08 PM (IST)

    17 जूनला सरकारने चर्चेसाठी बोलावलं, 15 दिवसात 7 मागण्या मार्गी लावतो हे सरकारने आश्वासन दिलं

    – राज्याची जबाबदारी रिव्ह्यू पिटीशन दाखल करणं

    – तोपर्यंत समाजाला दिलासा कसा मिळणार ?

    – कोल्हापूरला 16 जूनला मूक आंदोलन झालं

    – 17 जूनला सरकारने चर्चेसाठी बोलावलं, 15 दिवसात 7 मागण्या मार्गी लावतो हे सरकारने आश्वासन दिलं

    – सरकारने दिलेला शब्द पाळला नाही

    – म्हणून मला कोणता पर्याय राहिला नाही

    – अखेर आमरण उपोषण निर्णयावर मला यावं लागलं

  • 26 Feb 2022 12:07 PM (IST)

    शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं – खासदार संभाजीराजे छत्रपती

    – समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्यानं आंदोलन करायचा निर्णय घेतला

    – गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदललं

    – मला सपोर्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा

    – शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं

    – मी अठरा पगड जात,12 बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

    – गरीब मराठ्यांसाठी माझा लढा

    – 2007 पासून महाराष्ट्रात फिरतोय

    – प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवं याबाबत जनजागृती केली

    – समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभं राहिलं

    – 2013 ला सर्व मराठा संघटना एकत्र आल्या

    – मला नेतृत्व करण्याची विनंती केली

    – राणे समिती गठीत झाली,sebc आरक्षण मिळालं

    – दुर्दैवाने ते टिकलं नाही

    – प्रक्षुब्ध समाजासमोर मी भूमिका मांडली

    – छत्रपतींच्या या वंशजाला समाजाने आशीर्वाद दिला

  • 26 Feb 2022 11:52 AM (IST)

    अमरावतीच्या इर्विन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मौन आंदोलन सुरू

    राष्ट्रवादी नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीचे कारवाई प्रकरण….

    अमरावतीच्या इर्विन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मौन आंदोलन सुरू…

    केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचा गैरवापर करत असल्याचे लावले फलक..

    मौन आंदोलनात माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या सह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची उपस्थिती..

    साडेबारा वाजता घेनार पत्रकार परिषद…

  • 26 Feb 2022 11:51 AM (IST)

    रावसाहेब दानवे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर उपोषणाला देणार भेट

    खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या मुंबई येथील उपोषणाच्या समर्थनार्थ, अखिल भारतीय महासंघाच्या वतीने जालन्यातील महात्मा गांधी चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या वेळी मराठा महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मराठा समाजातील जिल्ह्यातील नेते रावसाहेब दानवे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला भेट देणार आहेत.

  • 26 Feb 2022 11:44 AM (IST)

    संभाजी राजेंना उपोषणाला बसू नये – छगन भूजबळ

    – संभाजी राजेंना उपोषणाला बसू नये

    – सरकार तुमच्या बाजूने आहे याचा विसर पडू देऊ नका

    – यंत्रणांचा दबाव राज्यात वाढतो आहे हे तुम्हीच सांगता आहात

    – नाशिकच्या अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत

  • 26 Feb 2022 11:42 AM (IST)

    दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

    दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी,

    इंटरमिजीएट आणि एलीमेंटरी ड्रॉविंग ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार कला आणि क्रीडा प्रकाराचे अतिरिक्त गुण मिळणार,

    माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढलं परिपत्रक,

    यावर्षी कोरोनामुळं इंलिमेंटरी ग्रेड परीक्षा झाली नाही

    त्यामुळे एंटरमिजीएट परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या श्रेणीच्या आधारावर गुण मिळणार बोर्डाचे आदेश

  • 26 Feb 2022 11:42 AM (IST)

    आदिवासी बांधवांना आपल्या हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी मार्ग मोकळा

    वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, महापालिका हद्दीतील वन जमिनी कसणा-या आदिवासी बांधवाचे वनहक्क दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी, वसई विरार महापालिकेने आता प्रभाग समिती स्थरावर वनहक्क समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे गेल्या 38 वर्षापासूनचा वनहक्क जमिनीचा लढा आता मार्गी लागणार असून, अधिवासीना आपल्या हक्काच्या जमिनी मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

  • 26 Feb 2022 11:22 AM (IST)

    युक्रेनने पहिली महिला पायलट गमावली

    पहिल्या महिला युक्रेनियन पायलटचा मृत्यू

    फायटर जेट पायलट नताशा पेराकोव्हचा मृत्यू

    हवाई हल्ल्यात गंभीर जखमी होऊन नताशाचा मृत्यू

  • 26 Feb 2022 11:22 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं चक्का जाम आंदोलन

    मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं चक्का जाम आंदोलन

    कोल्हापुरातील शिवाजी पुलावर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन

    जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवला

    वाहनांच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा

    आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल

  • 26 Feb 2022 11:19 AM (IST)

    ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर निवडणुक घ्या – अजित पवार

    ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर निवडणुक घ्या, असं आम्ही सर्वांनी निवडणुक आयोगाला सांगितले आहे. कारण त्या समाजाला नेतृत्व मिळाला पाहिजे. त्यामुळे ओबीसी आरक्षण निकाल लवकरचं त्याचा निकाल लागेल मग निवडणुका घेतील.

  • 26 Feb 2022 10:59 AM (IST)

    मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जोरदार निर्दशने

    मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जोरदार निर्दशने करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली.मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.महिलांची संख्याही लक्षणीय होती.मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा पुढे निवडणुकांवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र करण्याची इशारा आंदोलकांनी दिला.

  • 26 Feb 2022 10:58 AM (IST)

    पालघर मधील युक्रेनमध्ये 12 विद्यार्थी अडकले

    पालघर मधील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थ्यांचा आकड़ा वाढून 12 झाला आहे . सर्व डॉक्टरकीच्या एमबीबीएस चे विद्यार्थी . जिल्हा प्रशासनाची माहिती . वाडा , पालघर , वसई , विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थी . सर्व विद्यार्थी कुटुंबाच्या संपर्कात . मात्र भीतीच्या वातावरणात असल्याची विद्यार्थ्यांच्या पालकांची माहिती

  • 26 Feb 2022 10:51 AM (IST)

    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साईदर्शनाला

    निकाला अगोदर देवदर्शनासाठी सावंत यांचा महाराष्ट्र दौरा….

    साई दर्शनानंतर शनि शिंगणापुर येथे शनिदेवाचे तर पुणे येथील दगडूशेट हलवाई गणपतीचे घेणार

    साईबाबांनी सगळं काही दिलं आहे आहे..

    पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी…

    साईबाबांच्या चरणी हीच प्रार्थना करण्यासाठी आलोय..

  • 26 Feb 2022 10:49 AM (IST)

    पुण्यातून मराठा समन्वयक मुंबईकडे निघाले

    छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समन्वयक मुंबईकडे,

    आज राज्यभरातून समन्वयक येणार आझाद मैदानावर,

    मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संभाजीराजे बसणार उपोषणाला

    पुण्यातून कार्यकर्ते रवाना…

  • 26 Feb 2022 10:48 AM (IST)

    रशियन दूतावसासमोर मोठा पोलीस बंदोबस्त

    नवी दिल्ली – रशियन दूतावसासमोर मोठा पोलीस बंदोबस्त

    नवी दिल्लीत शांतीपथवर आहे रशियन दूतावास

    युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी आंदोलन करू नये

    यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    दूतावासाजवळ शस्त्रधारी पोलिस तैनात

  • 26 Feb 2022 10:47 AM (IST)

    युक्रेनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सहा विद्यार्थी अडकले ; मुलांना सुखरूप परत आणण्याची पालकांची मागणी

    यवतमाळ: एमबीबीएस शिक्षण घेणारे यवतमाळ जिल्ह्यातील सहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे. त्यांना भारतात सुखरूप परत आणावे अशी मागणी पालकांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. संकेत राजेश चव्हाण , दारव्हा- 9022794262, गौरव नागोराव राठोड ,महागाव- 80687129413, अभिनयन राम काळे, वणी 8421552866, हृषीकेश सुधाकर राठोड पुसद ,7588723165 ,हिमांशू मोतीराम पवार, दिग्रस 9405526726, मोहमद सोहेब म सलीम , दिग्रस 80500481450, अशी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचे नाव व फोन नंबर आहेत.

  • 26 Feb 2022 10:46 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन उपोषणास सुरूवात

    मुंबई – संभाजीराजे छत्रपती यांचे आझाद मैदानावर उपोषण

    मरीन ड्राईव्ह इथून सर्व समन्वयकांसह हुतात्मा चौक इथ प्रस्थान होणार

    ११ वाजता हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात येणार

    यानंतर आझाद मैदान इथ उपोषणस्थळी आगमन व पत्रकार संबोधन

    स. ११:३० वा. उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन उपोषणास सुरूवात

  • 26 Feb 2022 10:30 AM (IST)

    संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करतंय

    – संभाजी राजे आज उपोषणाला बसतायत, त्यांना आम्ही विनंती केली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे

    – संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करतंय

    – मुख्यमंत्री आणि आमची परवा बैठक झाली. जे निर्णय घेतले. बरंच काम झालंय. पण खासदार मोहदयांना ते सांगण्यात आम्ही अपयशी पडलोय

    – त्यांचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करु

  • 26 Feb 2022 09:59 AM (IST)

    हिंगोली मार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग

    हिंगोली- सेनगाव /हिंगोली मार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग

    परळीवरून रिसोड कडे विटी घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

    सेनगाव शहरानजीक भीषण आग सुदैवाने जीवित हानी नाही

  • 26 Feb 2022 09:58 AM (IST)

    महाराष्ट्रातील १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेय

    – महाराष्ट्रातील १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेय

    – त्यातले काही विद्यार्थी आज मुंबईत पोहोचणार

    – मुंबईत पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरांपर्यंत राज्य सरकार पोहोचवणार

    – आपले विद्यार्थी सुरक्षित आहेत. पण त्यांना पाणी आणि जेवनाची समस्या जानवतेय

    – राज्य सरकार आपल्या दुतावासाशी संपर्कात आहेत

    – विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याबाबत आज सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल

  • 26 Feb 2022 09:25 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस

    – पुणेकरांनी नाराजी व्यक्त करत तब्बल साडे तीन हजारापेक्षा जास्त हरकती नोंदविल्या,

    – मात्र प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी दोन्ही दिवस मिळून फक्त ७७३ जणच उपस्थित,

    – आयोगाकडे शिफारशी पाठवल्यानंतर अंतीम प्रभागरचना जाहीर होणार.

  • 26 Feb 2022 09:24 AM (IST)

    बुलढाण्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यावर शिक्षण विभागाचा भर

    कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यावर शिक्षण विभागाचा भर,

    परीक्षा केंद्रावर राहणार बैठे पथक तैनात,

    तर पाच भरारी पथकाची सुद्धा नियुक्ती,

    4 मार्चपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार ,

    शिवाय परीक्षा केंद्रावर कोव्हिडं नियमांचे पालन ही कारव लागणार

  • 26 Feb 2022 09:21 AM (IST)

    आरोग्य विभागाचा पेपर फोडणारा पोलिसांच्या ताब्यात

    दोन महिने फरार असलेला आरोग्य विभाग गट क पेपर फोडणारा मुख्य एजंट सायबर पोलिसांनी केला अटक

    पेपर फोडणारा मुख्य एजंट गोपीचंद सानप अटकेत

    बुलढाणायातून केली सानपला अटक

    जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा झाला होता फरार

    पेपर फोडणाऱ्या टोळीतील जीवन सानप व गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते

    आज दुपारी गोपीचंद सानपला केले जाणार कोर्टात हजर

  • 26 Feb 2022 09:19 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी युकेमध्ये अडकल्या

    गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी युकेमध्ये अडकल्या

    दिवांगी सुरेश बांबोळकर एमबीबीएस तुतीय वर्षात शिकत असून स्मृती रमेश सोनटक्के प्रथम वर्षात एमबीबीएस शिक्षण घेत आहे

    युकेन शहराची राजधानी किव्ह शहरापासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर व्हिनित्सिया शहरात शिक्षण घेत आहेत

    एका भाड्याच्या खोलीत राहत असून सुखरूप असल्याची माहिती एक खाजगी कंत्राटदाराकडून भारतीय दूत वासना देण्यात आली

  • 26 Feb 2022 09:18 AM (IST)

    एसटी कर्मचा-याची आत्महत्या

    एसटी कर्मचा-याने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह उस्मानाबाद येथील बस आगरात उपोषणस्थळी आणल्याने तणावाचे व भावुक वातावरण निर्माण झाले आहे.

    कोर्टात एसटी विलनीकरनाचा कोणताही निर्णय न झाल्याने एका कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. सरकार अजून किती कर्मचारी यांचे बळी घेणार ? सरकारला जाग कधी येणार ? हा संतप्त प्रश्न आता कर्मचारी विचारत आहेत.

  • 26 Feb 2022 09:16 AM (IST)

    आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

    – आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर,

    – राज यांच्या हस्ते होणार मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन,

    – शिवाय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक,

    – ५ वाजता राज यांच्या हस्ते पुण्यश्लोक दिवाळी अंकाचे प्रकाशन

  • 26 Feb 2022 09:03 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळाचा रखडला विकास

    सिरोंचा सोमनुर भामरागड बिनागुंडा कमलापूर चपराळा मार्कंडा टिपागड हे खूप जुने पर्यटन स्थळे असून निधीअभावी विकास काम रखडलेला आहे

    या पाच वर्षात या पर्यटनस्थळाला शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध नाही

    टिपागड आदिवासी समाजाच्या सर्वात मोठा पर्यटनस्थळ ओळखला जातो

  • 26 Feb 2022 09:02 AM (IST)

    ग्रामदैवत सिद्धेश्वर- रत्नेश्वर देवस्थानची चार दिवसच भरणार यात्रा

    लातुर- ग्रामदैवत सिद्धेश्वर- रत्नेश्वर देवस्थानची चार दिवसच भरणार यात्रा, सोमवार पासून होईल यात्रेला सुरुवात. दोन वर्षां नंतर यावर्षी भरणार यात्रा,अनेक उपक्रमांच आयोजन.

  • 26 Feb 2022 08:43 AM (IST)

    हडपसरच्या वाहतूक कोंडीचा मंत्री दत्तात्रेय भरणे यांना फटका

    – हडपसरच्या वाहतूक कोंडीचा मंत्री दत्तात्रेय भरणे यांना फटका,

    – बेंरिग दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 15 दिवसांपासून हडपसरचा उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद,

    – वाहतूककोंडीत भरणे अडकले तब्बल 30 मिनिटं,

    – इंदापूरहून पुण्याला येत होते भरणे.

  • 26 Feb 2022 08:35 AM (IST)

    पुण्यात लोक खूपच हुशार आहेत – अजित पवार

    तळजाई वर प्रतिदिन 1 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध झाला. आपण 100 रुपयांचे पेट्रोल घालून इथपर्यंत येतो. पण 1 रुपया देणार नाही.
    पुण्यात लोक खूपच हुशार आहेत
    लोक लगेच कोर्टात जातात.
    मला पिंपरी चिंचवड मध्ये ही अडचण जाणवली नाही.
    कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे.

  • 26 Feb 2022 08:25 AM (IST)

    साडेपाच एकर उसाला आग

    साक्री तालुक्यातील सुकापुर शिवारात जवळपास साडेपाच एकर उसाला आग पंचनामे करून प्रशासकीय मदतीची अपेक्षा…

    आगीचे करण अद्याप स्पष्ट नाही

  • 26 Feb 2022 08:24 AM (IST)

    प्रदूषण कमी करण्यासाठी धोरण राबवतोय – अजित पवार

    कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली, विमानाने ऑक्सिजन आणायची तयारी केली होती

    पण त्याऐवजी जास्तीत जास्त झाड लावली पाहिजे

    निर्सगाला सूट होतील असेच रंग इथं काम करताना वापरले पाहिजेत

    काही चुकीची बांधकाम झालीत ती काढायला हवीत

    प्राण्यांसाठी अनाथालय सुरु करतोय, त्यासाठी 22 कोटी मंजूर केलेत

    प्रदूषण कमी करण्यासाठी धोरण राबवतोय

  • 26 Feb 2022 08:22 AM (IST)

    तळजाईवर भटक्या कुत्र्याचा त्रास वाढल्याच्या तक्रारी – अजित पवार

    लोक कोठेही कचरा टाकतात, हे योग्य नाही, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे

    तळजाईवर भटक्या कुत्र्याचा त्रास वाढल्याच्या तक्रारी लोकांनी केल्यात

    इथं पूर्वी ससे खुप होते, पण कुत्र्यांमुळे ससे राहिले नाहीत

    मोर कमी झालेत

    इथं आता कुत्री आणायला बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

    आधीच्या सरकार मधल्या वनमंत्र्यांनी इथं सु बाभळीची झाड लावली, जी लावायला नको होती, आता ती झाड काढून दुसरी झाड लावणार

    देशी आणि स्थानिक झाड लावली पाहिजेत

     

  • 26 Feb 2022 08:19 AM (IST)

    पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेट जंगल तयार व्हायला लागलं आहे – अजित पवार

    पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रेट जंगल तयार व्हायला लागलं आहे

    तर सुदैवाने पुण्यात वन विभाग, सरंक्षण खात यांच्या मोठया जागा आहेत

    तिथं हिरवाई राहिली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत

    पण दुर्दैवाने काही लोक राजकिय फायद्यासाठी झोपडपट्टी वाढवण्यास प्रोत्साहन देतात

    गरिबांना हक्काची घर मिळाली पाहिजे,पण झोपडपट्टी वाढायला नको

    त्यासाठी एसआरए सारखे प्रोजेक्ट राबतोय

  • 26 Feb 2022 08:16 AM (IST)

    छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

    नाशिक – छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

    नाशिक जिल्ह्यातून अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना

    संभाजी राजे यांचे आजपासून मुंबईत आंदोलन

    जिल्हयातील अनेक कार्यकर्त्याना पोलिसांच्या नोटीस

  • 26 Feb 2022 08:13 AM (IST)

    अमरावतीमध्ये पतीने जबरदस्तीने टाकले पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध

    धक्कादायक; पतीने जबरदस्तीने टाकले पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध….

    दारुड्या पतीचा प्रताप;खोलपुरी गेट पोलिसांत गुन्हा दाखल.

    शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी केली मारहान..

    अमरावती जिल्ह्यातील लोणटेक गावातील घटना…

    पती कडून शारिरीक व मानसिक छळ होत असल्याची पत्नीची तक्रार…

  • 26 Feb 2022 08:12 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत इतके डोस देण्यात आले

    जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ३८ हजार ११९ नागरिकांना तर ५७ लाख ९४ हजार २२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८२४ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

  • 26 Feb 2022 08:10 AM (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक

    केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची देखील होणार बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक.

  • 26 Feb 2022 08:10 AM (IST)

    छत्तीसगडी अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात करून घेतला जात होता वेश्या व्यवसाय

    -या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली

    -दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई ताथवडे येथील साई लॉजवर करण्यात आलीय

  • 26 Feb 2022 08:09 AM (IST)

    भाजपची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यावर

    आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यावर

    मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

    महाडिक यांच्यावर जबाबदारी दिल्यानं भाजपला मिळणार बळ

    महानगरपालिके सह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक देखील चुरशीने होणार

  • 26 Feb 2022 07:35 AM (IST)

    औरंगाबादमध्ये मुस्लिम व्यक्तीला भाजीपाला विकण्यास केला मज्जाव

    मुस्लिम व्यक्तीला भाजीपाला विकण्यास केला मज्जाव

    औरंगाबाद जिल्ह्यातील अपेगाव या गावातली घटना

    गावात आलेल्या मुस्लिम विक्रेत्यांची दमदाटी करून केली हकालपट्टी

    दोन ते तीन मुस्लिम विक्रेत्यांची केली हकालपट्टी

    हकालपट्टी करतानाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल

    योगेश जाधव असं मुस्लिम विक्रेत्यांची हकालपट्टी करणाऱ्या आरोपीचे नाव

    मुस्लिम विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करणाऱ्या आरोपीविरुद्ध तक्रार दाखल

    ख्वाजा शबीर पठाण असं तक्रारदार मुस्लिम व्यवसायिकाचे नाव

  • 26 Feb 2022 07:29 AM (IST)

    ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांवर नाशिक महापालिकेची जवाबदारी

    पक्षातील मोठी फुट टाळण्याची महाजनांवर जवाबदारी

    मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत निर्णय

    आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुका महाजनांच्या नेतृत्वात होणार

    प्रभारी असलेल्या जयकुमार रावल यांच्याबाबद्दल पक्षात होती नाराजी

    महाजनांवर जवाबदारी आल्याने नाशिकमध्ये पुन्हा सेना-भाजप आखाडा रंगणार

    नाशिकमध्ये संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठा पणाला

  • 26 Feb 2022 07:12 AM (IST)

    तिसरी लाट ओसरल्याने प्रशासनाला मोठा दिलासा

    – ५८ दिवसानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोना पॅाझीटीव्ह रुग्णांची संख्या ५० च्या आत

    – जिल्ह्यातील पॅाझीटीव्हीटी दर आला १ टक्क्यांच्या खाली

    – ५,०७२ चाचण्यांमधून ५० रुग्ण पॅाझीटीव्ह

    – तिसरी लाट ओसरल्याने प्रशासनाला मोठा दिलासा

  • 26 Feb 2022 07:11 AM (IST)

    बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी लवकर जावे लागणार

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता थर्मल स्कॅनिंगसाठी हजर राहावे लागणार

    परिणामी नाष्टा करून विद्यार्थ्यांना घराबाहेर सकाळी लवकर पडावे

    विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे मुख्याध्यापक संघाचे आवाहन

  • 26 Feb 2022 07:09 AM (IST)

    देशात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

    राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरा पावसाने जोरदार हजेरी लावली, मध्य दिल्लीसह एनसीआर मध्ये गारपीट सह पाऊस झाला. तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्येही पावसान हजेरी लावल्यान पिकांच नुकसान झालय, तर या पावसामुळे थंडीची तीव्रता वाढणार नसल्याच हवामान खात्यान स्पष्ट केल असून आज दिवसभरही काही भागात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान उत्तरेकड हिमाचल प्रदेशात आणि जम्मू-काश्मीरमधल्या अनेक भागात अजूनही जोरदार बर्फवृष्टी सुरूच आहे

  • 26 Feb 2022 07:08 AM (IST)

    हिजाब घालायला परवानगी मिळणार की नाही ?

    शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याच्या वादावरच्या सगळ्या याचिकांवरची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे पण याबाबतचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राखून ठेवला आहे पुढील आठवड्यात या बाबतचा अंतिम निर्णय न्यायालय देणार आहे मात्र आता शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये हिजाब घालायला परवानगी मिळणार की नाही हे न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल त्यामुळ संपूर्ण देशाच लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकड असणार आहे

  • 26 Feb 2022 07:07 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट

    पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आणि सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट तयार करण्यास स्थायी समितीने दिली मान्यता

    इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

    स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

  • 26 Feb 2022 07:06 AM (IST)

    युक्रेन मध्ये अडकलेल्या विनोद ठवकर या शेतकऱ्या पुत्राची सरकारला विनंती.

    जिल्हातील खापा येथील विनोद ठवकर हा शेतकऱ्याचा मुलगा आई-वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्याकरिता विनोद युक्रेनला वैद्यकीय शिक्षण घेण्या करिता 3 महिन्यापूर्वी गेला आहे.

  • 26 Feb 2022 06:27 AM (IST)

    यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच

    गेल्या 24 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे…

    आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत..मध्यरात्रीच्या वेळीत यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढण्याचा समझल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले…

    शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केले. स्थानिक पोलिसांनी त्यांना समझावून शांत केले तरी रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घरा बाहेर बसून राहिले

    मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची शुक्रवारी सकाळपासून छापेमारी सुरूच आहे..

    छापेमारी मध्ये यशवंत जाधव यांच्या घरात आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या हाती काय काय लागलं हे अजून ही गुलदस्त्यातच आहे..

  • 26 Feb 2022 06:24 AM (IST)

    केंद्र सरकार स्वखर्चाने नागरिकांना मायदेशी आणणार

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आता युक्रेनमध्ये जवळपास 16 हजार भारतीय नागरिक अडकून पडले आहेत या सगळ्यांना केंद्र सरकार स्वखर्चाने मायदेशी आणणार असून आज पहाटे एअर इंडियाची दोन विमान एअर लिफ्ट करण्यासाठी रवाना झाली आहेत हंगेरी, पोलंड , रोमानिया मार्गे भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट केल जाणार आहे युक्रेन मधील विमानसेवा सध्या बंद आहे त्यातच अनेक विद्यार्थी ही तिथं अडकून पडल्याने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे