Maharashtra News Live Update : नितेश राणेंना न्यायलयीन कोठडी, राणेंना कोर्टाचा काहीसा दिलासा
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
मुंबई : आज शुक्रवार 4 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच मजुरांना प्राण गमवावे लागले, तर तब्बल दहा जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे पाहणार आहोत.