Maharashtra News Live Update : मोदींच्या भाषणानंंतर राज्यातले काँग्रेस नेते आक्रमक, मोदींचं वक्तव्य दुर्दैव-थोरात
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
मुंबई : आज सोमवार 7 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या विरोधात भाजप आज आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे पाहणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
देशातील युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न
याबाबत देशासाठी पंतप्रधानांचे मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा होती
मात्र आज निराशा पदरी पडली
डॉक्टर अमोल कोल्हे यांची जोरदार टीका
पंतप्रधानांच्या भाषणातून फक्त पक्ष टीका झाली
-
गोव्यात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
देशात सर्वात जास्ती बेरोजगारी राजस्थानामध्ये
काँग्रेस शासित राज्य असलेल्या राजस्थान मध्ये 30% बेरोजगारी
या गोष्टीकडे न लक्ष देता गोव्याबद्दल असं बोलणं म्हणजे गोवेकरांचा अपमान आहे
त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने त्यांना गोव्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही
प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा राजस्थान वरती बोलावे,- देवेंद्र फडणवीस
-
-
किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण तापलं
किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी भाजप शिष्टमंडळ उद्या घेणार पुणे पोलीस आयुक्तांची भेट,
– शहरातील सर्व भाजप आमदार, महापौर आणि शहराध्यक्ष शिष्टमंडळात सहभागी असणार,
– उद्या दुपारी 3 वाजता घेणार पोलीस आयुक्तांची भेट,
– भेटीत घेणार शिवसैनिकांवरील कारवाईची माहिती
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
मोदींची संसदेत शेरोशायरी
वो जो दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ
नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढेंगे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
तामिळनाडूत तुम्हाला साठ वर्षे संधी मिळाली नाही
तेलंगणा बनवला तुम्ही त्यांनीही तुम्हा मतं दिली नाहीत
काँग्रेसला देश एवढी वर्षे सत्तेत राहूनही का नाकारत आहे
एवढ्यावेळा हार पत्करून विरोधकांचा अहंकार जाईना
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
50 वर्षे तुम्ही देशात सत्तेत होता हे विसरू नका
अनेक राज्यात तीन दशकांपासून काँग्रेसला कुणी उभं केलं नाही
काँग्रेसची हालत खराब आहे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी Live
सरकारने बनवलेली प्रत्येक योजन थेट लोकांपर्यंत
गरिबांची बँक खाली झाली
तुम्ही लोकांमध्ये राहिला असता तर दिसलं असतं
विरोधकांना मोदींचा टोला
अनेकजण अजून मागेच अडकून राहिले आहेत
देशाच्या जनतेने तुम्हाला ओळखलं आहे
-
पंतप्रधान मोदी लाईव्ह
चुलीच्या धुरापासून माता भगिनींची मुक्तता झाली
घराघरात गॅस योजना पोहोचली
-
पंतप्रधान मोदी लाईव्ह
आज गरिबांची घर पण लाखो रुपयांची झाली आहेत
देशाने पायाभूत सुविधेत विकास केला आहे
कोरोना काळानंतर जग वेगळ्या पद्धतीने पुढं जात आहे
ही संधी भारताने सोडली नाही पाहिजेत, भारताने स्वतःला कमी लेखता कामा नये – पंतप्रधान
नव्या संकल्पना घेऊन, देश स्वातंत्र्य ची 75 वर्ष पूर्ण करताना देश पुढं जातोय
गेल्या वर्षात देशाने अनेक क्षेत्रात नाव मिळवले
-
पंतप्रधान मोदी लाईव्ह
काल लता दिदींचा मृत्यू झाला. अनेक वर्ष देशाला मोहीत केलं. प्रेरीत केलं आणि भानेनं भरलं. त्यांनी ३६ भाषेत गाणं गायलं. त्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या देशाची एकता कायम ठेवली. अखंड भारतासाठी त्यांची गाणी प्रेरणादायी होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगात बदल झाला. एक नवा वर्ड ऑर्डर आलं त्यात आपण जगत आहोत. कोरोना काळानंतर जग एका नव्या वर्ड ऑर्डरकडे नव्या व्यवस्थेकडे वेगाने जात आहे.
-
पाहा मोदींचं संपूर्ण भाषण
Speaking in the Lok Sabha. Watch https://t.co/WfOOasml0G
— Narendra Modi (@narendramodi) February 7, 2022
-
गोवा निवडणूक प्रचारावेळील व्हिडिओ
काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट
What a performance!
The grand daughter of former President of @INCGoa, Late Smt. Irene Barros sings a beautiful recital in the presence of Smt. @priyankagandhi.#GoaजैतYatra pic.twitter.com/JvtFw9WtER
— Congress (@INCIndia) February 7, 2022
-
एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री?
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांचं नाव सुरुवातीच्या टप्प्यात चर्चेत होतं खरं. पण आता तर चक्क त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरचं ठाण्यात झळकल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
-
सदाभाऊ खोत गोव्याच्या निवडणूक रिंगणात
भाजपला मदत करण्यासाठी सदाभाऊ खोत निवडणूक प्रचाराच्या मैदानातम्हापसा जाऊन केला घरोघरी प्रचारजनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे-खोत -
कोल्हापूरला जातान नितेश राणेंच्या छातीत वेदना
आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्यानं तळेरे जवळ कोल्हापूरकडे जाणारा ताफा थांबवण्यात आला होता. डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर ताफा कोल्हापूरकडे रवाना झाला आहे.
-
माझ्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार, मी घाबरुन जाणार नाही : उर्मिला मातोंडकर
वैयक्तिक पातळीवर खूप कमी दु:ख होतं
माझ्यावर शिवाजी महाराजांचे संस्कार, मी घाबरुन जाणार नाही
या देशासाठी किती जणांनी रक्त सांडलं
राजकारण्यांच्या वक्तव्याची तोडमोड करता
काही व्यक्तींना तरी सोडा
गलिच्छ, घाण पसरवणं चालू हे थांबायला पाहिजे
-
संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे.
-
किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण, शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर होणार
किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आठ शिवसैनिक मंगळवारी स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होणार
किरीट सोमय्या शनिवारी पुणे महापालिकेत आले असताना झाला शिवसैनिक निवेदन देण्यासाठी पुढे आले असताना झाला होता राडा
-
लतादिदींच्या अस्थी नेण्यासाठी मंगेशकर कुटुंबीय शिवाजी पार्कमध्ये दाखल
लतादिदींच्या अस्थी नेण्यासाठी मंगेशकर कुटुंबीय शिवाजी पार्कमध्ये दाखल
आदिनाथ मंगेशकर शिवाजी पार्कमध्ये उपस्थित
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित
लतादिदींच्या अस्थी प्रभुकुंज निवासस्थानी नेण्यात येणार
-
शाहरुखला ट्रोल केलं जातंय, हा नालायकपणा आहे : संजय राऊत
निवडणुका आहेत, राजकारण आहे, त्यांना येऊद्यात चहा देऊन स्वागत करु
खोट्याचा आधार घेऊन, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत असल्यास, त्यांनाही तुरुंगात जावं लागेल
शाहरुख खानला ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातंय, त्यांनी तिथं दुआ मागितली त्यांच्या परंपरेनं
त्यानंतर एका महान कलाकाराच्या प्रसंगी देखील तुम्ही असं वागता देशाची वाट लावलीय
एका गटाचा आयटी सेल हे करतो, असं संजय राऊत म्हणाले
-
लता मंगेशकर यांचं स्मारक बनवणं सोपं नाही, देशाला विचार करावा लागेल : संजय राऊत
अटल बिहारी वाजपेयी यांचं पुण्यस्मरण होतं, मी त्यादिवशी बोलत होतो. लता मंगेशकर यांनी ते पाहिलं होतं. त्यांनी फोन करुन अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी माझ्याशी संवाद साधला.
अटलबिहारी वाजपेयी हे आमचे दद्दा होते, असं त्या म्हणायच्या
लता मंगेशकर या अमर आहेत, त्या अमर राहतील
लता मंगेशकर यांचं स्मारक बनवणं सोपं नाही, देशाला विचार करावा लागेल
मी काही लिहीलं तर ते बरं असो वाईट असो त्या फोन करुन सांगायच्या
मी सतत लतादीदी यांच्या प्रकृतीची माहिती घेत होतो
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित
राष्ट्रीय दुखवट्या मुळे आज होणारा सोहळा रद्द
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ऑनलाईन राहणार होते हजर
-
राज्यसभेत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
राज्यसभेत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली वाहिल्यानंतर एक तासासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब
अकरा वाजून पाच मिनिटांनी पुन्हा राज्यसभेचे कामकाज सुरू होणार
-
नरेंद्र मोदी यांचं आज लोकसभेत संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत
लोकसभा कामकाज संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार
-
येरवड्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मजुरांची रॅली
येरवड्यातील अपघाताच्या पार्श्वभुमीवर बांधकाम मजुरांची रॅली
श्रमिक हक्क आंदोलनाच्या वतीनं काढण्यात आली बांधकाम मजुरांची रॅली
येरवडा येथील अपघाताने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेततेसाठी जबाबदार असणार्या विविध यंत्रणांच्या अकार्यक्षम, असंवेदनशील व भ्रष्ट कारभाराचा मुद्दा समोर
हे अपघाती मृत्यु नसून एकप्रकारे हत्याच असल्याचं श्रमिक हक्क आंदोलनाचा आरोप
या पार्श्वभुमीवर बांधकाम मजुरांच्या सुरक्षा आणि नोंदणीच्या प्रश्नांसदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम मजुरांची रॅली
-
पिंपरी चिंचवड मधील “थेरगाव क्वीन”चं पोलिसांना आव्हान?
-पिंपरी चिंचवड मधील “थेरगाव क्वीन” नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट चालवणाऱ्या मुलीने अश्लील शिवीगाळ करत व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिला अटक केली होती
-मात्र पोलिसांच्या ताब्यातून सुटतात त्या मुलीनं पुन्हा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर पोस्ट करत थेट पिंपरी चिंचवड पोलिसांना आव्हान दिलय
-वाकड पोलिसांनी त्या मुलीला 30 जानेवारीला अटक केलेला व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत खुल आव्हान पोलिसांना दिल्याचं पाहायला मिळत आहे
-
कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन
कोकणची शान आणि लोककलावंत शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचे निधन.
आज पहाटे 3 :00 वाजता गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान झाले निधन.
वयाच्या 49 व्या वर्षी घेतला अखेर चा श्वास.
दशावतार क्षेत्रातील कलाकार व रसिकांमध्ये हळहळ
सुधिर कलिंगण म्हणजे दशावतार क्षेत्राचा हीरा
सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य, तसेच दशावतार चालक मालक संघाचे सचिव होते.
-
नाशिक महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा
नाशिक – महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा
नियमित भरणा झालेली रक्कम जमा होत नसल्याचा आरोप
महापालिका आयुक्तांनी दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
एलबीटी विभागाच्या प्रत्येक पावती पुस्तकाची सुरू आहे छाननी
संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱयांना कोणाचा वरदहस्त याची मनपा वर्तुळात चर्चा
-
आर्थिक बोजा असलेलं नाशिक महापालिकेचे बजेट उद्या होणार सादर
नाशिक – आर्थिक बोजा असलेलं महापालिकेचे बजेट उद्या होणार सादर
शासकीय दुखवट्या मुळे आज होणारी सभा आता उद्या होणार
महापालिका आयुक्त कैलास जाधव सभागृहात करणार बजेट सादर
करवाढ करण्याची सूचना मान्य होण्याची शक्यता कमीच
आगामी निवडणुकांच्या तोंडावर नाशिककरांना खुश करण्याचा करणार प्रयत्न
1100 कोटींच्या दायित्वात वाढ
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौर्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौर्यावर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचार सभा
कोरोना नियमांचं पालन करून होणार पहिली प्रचारसभा
उत्तर प्रदेशच्या बिजनोर मध्ये होणार जाहीर प्रचार सभा
राजनाथ सिंह, असादुद्दीन ओवेसी यांच्याही आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा
-
के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन
नाशिक – के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन
वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार अंत्यसंस्कार
के के वाघ शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोठं योगदान
-
पुणे शहरात 14 हजार 352 सक्रिय कोरोना रुग्ण
पुणे शहरात आता केवळ 14 हजार 352 सक्रिय कोरोना रुग्ण
तेरा दिवसांपुर्वी म्हणजेच 24 जानेवारीला शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 46 हजार 302 इतकी होती
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा 30 हजारांचा आत
-
महाराष्ट्र राज्य तंत्र मडाळाची परीक्षा 10 फेब्रुवारीला
महाराष्ट्र राज्य तंत्र मडाळाची परीक्षा उद्या (7 फेब्रुवारी) घेण्यात येणार होती. परंतु, लता मंगेशकर यांच्या निधनामुळं महाराष्ट्र शासनानं उद्या राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे, याची सर्व विद्यार्थी व संस्थांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्र मंडळानं दिलीय.
Published On - Feb 07,2022 6:08 AM