Maharashtra News Live Update : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंत शाळा उद्यापासून बंद
Maharashtra News And Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे तिसऱ्या लाटेचे ढग आणखी गडद होत आहेत. तर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम पालू केले आहेत. राज्यात दुसरीकडे मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबई मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुन्हा एकदा भाजपने जिंकली आहे. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तसेच सर्व महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…