Maharashtra News Live Update : मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे, कुणाच्या बंगल्याचे नाव काय? वाचा अपडेट

| Updated on: Jan 13, 2022 | 10:30 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे, कुणाच्या बंगल्याचे नाव काय? वाचा अपडेट
सांकेतिक फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तसेच राज्यात सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.  या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jan 2022 10:08 PM (IST)

    मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलली, मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

    अ 3 – शिवगड, जितेंद्र आव्हाड

    अ 4 – राजगड, दादा भुसे

    अ 5 – प्रतापगड, केसी पाडवी

    अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे

    बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार

    बी 2 – रत्नसिंधू, –  उदय सामंत

    बी 3 – जंजिरा, अमित देशमुख

    बी 4 – पावनगड – वर्ष गायकवाड

    बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ

    बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर

    बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार

    क 1 – सुवर्णगड, गुलाबराव पाटील

    क 2 – ब्रह्मगिरी, संदीपान भुमरे

    क 3 – पुरंदर

    क 4 – शिवालय

    क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब

    क 6 – प्रचितगड, बाळासाहेब पाटील

    क 7 – जयगड

    क 8 – विशाळगड

  • 13 Jan 2022 09:37 PM (IST)

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सायबर पोलिसांत तक्रार दाखल

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सायबर पोलिसांत तक्रार दाखल,

    पुणे मनपाची खोट्या प्रभाग रचनेचा ड्राफ्ट व्हायरल केला जातोय,

    यामुळे शहरातील वातावरण गढूळ झालंय निवडणूक आयोग किंवा मनपाकडून अशी प्रभाग रचना प्रसिद्ध झालं नसल्याचं सांगण्यात आलंय..

    त्यामुळे ही प्रभाग रचना व्हायरल होतीये ती खोटी असल्याचं स्पष्ट होतंय..

    कोणी पसरवली त्याविरोधात राष्ट्रवादीनं केली कारवाईची मागणी,

    शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी दाखल केली तक्रार !

  • 13 Jan 2022 08:03 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्याचे फोटो गायब

    जिल्हा बँकेतून भाजपची सत्ता येताच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येताच अध्यक्ष दालनातील बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे,सोनिया गांधी व शरद पवार यांचे फोटो काढून टाकण्यात आले.  अध्यक्षपदाच्या खुर्ची मागील भिंतीवर गेल्या कित्येक दिवसांपासून गणपतीच्या फोटो बरोबर हे तीन फोटो होते,मात्र कालपासून हे फोटो या भिंतीवरून गायब झाल्याची चर्चा होती.आता फक्त गणपती आणि नारायण राणे असे दोनच फोटो आहेत.जिल्ह्यात आज दिवसभर या फोटोंचीच चर्चा रंगली होती.
  • 13 Jan 2022 07:58 PM (IST)

    करुणा शर्मा परळीतून निवडणूक लढवणार

    काय म्हणाल्या करूणा शर्मा?

    लवकरच मी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे प्रकरणं बाहेर काढणार,

    माझी उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे व्यापाऱ्यांवर कृपा करा,व्यापारी कोरोनाने नव्हे तर निर्बंधानी मरणार,

    माझी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांना हात जोडून विनंती आहे शक्ती कायद्यापेक्षा आधी पूजा चव्हाण, ईशा सानियाल आणि मला न्याय द्या

    मी परळीतून विधानसभा निवडणूक लढवणार

  • 13 Jan 2022 06:49 PM (IST)

    आगोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

    मोदींनी पुढील उपयायोजनांबाबत सूचना केल्या

    लसीकरण वाढवणे हा एकमेव उपाय आहे

    राज्यांनी लसीकरणावर भर द्यावा

    लसीकरण बंधनकारक करण्याबाबत विचार सुरू

  • 13 Jan 2022 06:22 PM (IST)

    नागपूर आगारातून एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न

    नागपूर आगारातून एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न

    नागपूर विभागाने मुख्य मार्गावरील वेळापत्रक ठरविले

    आता पर्यंत जवळपास 60 कर्मचारी रुजू झाले

    शासनाने ठरविलेल्या एजन्सी चे 50 कर्मचारी रुजू होणार ,22 रुजू झाले

    या कर्मचाऱ्यांच्या साह्याने 70 ते 80 बस रस्त्यावर उतरविल्या जाणार

    सध्या 50 बस सुरू आहेत

    विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांची माहिती

  • 13 Jan 2022 05:06 PM (IST)

    मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व

    मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांना मोठा धक्का

    राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुंबई बँकेचे नवे अध्यक्ष

    प्रसाद लाड यांचा २ मतांनी पराभव

  • 13 Jan 2022 05:04 PM (IST)

    मराठी पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांचा औरंगाबादेत मनसेकडून सत्कार

    मराठी पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांचा औरंगाबाद मनसे कडून सत्कार

    व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन शाल, फुल आणि गौरव पत्र देऊन सन्मान

    मराठी पाट्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औरंगाबादेत स्तुत्य उपक्रम सुरू

    मराठी पाट्या लावल्या नाहीत खळळ खट्याक करण्याचा इशारा

  • 13 Jan 2022 04:34 PM (IST)

    आज्ञातवासानंतर नितेश राणे पहिल्यांदा कॅमेरॅसमोर

    भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. आज नितेश राणे दाखल होताच भाजपच्या (Bjp) स्थानिक कार्यकर्तांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यांनंतर दमदार अंदाजात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला.

  • 13 Jan 2022 03:26 PM (IST)

    नितेश राणे यांना बेल की जेल?

    नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे, त्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टत हे प्रकरण पोहोचले आहे, राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता हायकोर्टात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • 13 Jan 2022 02:52 PM (IST)

    संजय राऊतांसोबतच्या भेटीनंतर टिकेत काय म्हणाले?

    आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही

    उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्रामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे

    शेतकरी नेते राकेश टिकेत यांची टीव्ही नाईन मराठीला माहिती

    आम्ही निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही

  • 13 Jan 2022 01:18 PM (IST)

    मनपाच्या ऑनलाईन महासभेत पुन्हा गोंधळ

    नाशिक : मनपाच्या ऑनलाईन महासभेत पुन्हा गोंधळ

    ऑनलाइन सभा असूनही  गटनेत्याच्या कार्यालयातील संगणक काढून नेल्याने शिवसेना आक्रमक

    महापौर सतीश कुलकर्णी यांना विचारला जाब

    कार्यलयातील संगणक का काढले महापौर यांना संतप्त सवाल

    संबंधीत लोकांवर कारवाई करण्याची मागणी

    कारवाई करण्याचे महापौर यांनी दिले आदेश

  • 13 Jan 2022 12:44 PM (IST)

    खासदार संजय राऊत मुजफ्फरपूरमध्ये दाखल, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची घेणार भेट

    उत्तर प्रदेश : खासदार संजय राऊत मुजफ्फरपूरमध्ये दाखल

    उत्तर प्रदेशमधील शिवसैनिकांकडून राऊत यांचे जोरदार स्वागत

    काही वेळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची घेणार भेट

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत आणि टिकैत यांच्या भेटीला महत्त्व

  • 13 Jan 2022 12:12 PM (IST)

    उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक, काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसकडून तिकीट

    उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक

    काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसकडून तिकीट

    काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनाही तिकीट

    125 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी प्रियांका गांधी यांच्याकडून जाहीर

  • 13 Jan 2022 11:54 AM (IST)

    विनापरवानगी बैलगाडा शर्यत घेणं पडलं महागात, 15 जणांविरोधात पुण्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

    पुणे : विनापरवानगी बैलगाडा शर्यत घेणं पडलं महागात,

    – वाघळवाडीत 15 जणांविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    – बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील वाघळवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन

    – अजय तात्याबा सावंत,जालिंदर शंकर अनपट,शुभम उर्फ बाबू जाधव, रुत्विक उर्फ बापू सावंत, महादेव सकुंडे विकी सावंत,सुहास गोरख जाधव,प्रणव उर्फ मोन्या बापूराव सावंत यांच्यावर गुन्हे दाखल.

  • 13 Jan 2022 10:59 AM (IST)

    महाज्योतीचा निधी संस्थेच्या अध्यक्षांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर खर्च करण्याचा घाट 

    पुणे  : महाज्योतीचा निधी संस्थेच्या अध्यक्षांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर खर्च करण्याचा घाट

    – शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी सरसकट त्यांच्या खात्यावर 2200 रुपये सबसिडी जमा केली जात असल्याचा आरोप

    – हा प्रकार तत्काळ थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे ओबीसी अधिकार मंचाची मागणी

    – मंत्रिमंडळाची परवानगी नसतानाही महाज्योतीच्या खात्यातून पैसे परस्पर का वळवले जातात? ओबीसी मंचाचा सवाल

  • 13 Jan 2022 09:10 AM (IST)

    बुलडाण्यात रेती माफियांनी युवकाला विष पाजल्याचा आरोप 

    बुलडाणा : रेती माफियांनी युवकाला विष पाजल्याचा आरोप

    घरासमोरून जाणाऱ्या रेतीच्या वाहनांनी धूळ उडते म्हणून केला होता विरोध

    जळगांव जामोद तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथील प्रकार

    24 वर्षीय सूरज पांडे वर शासकीय रुग्णलयात उपचार सुरू

    तर पोलिसांनी केला तिघांविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल

  • 13 Jan 2022 08:39 AM (IST)

    खासदार संजय राऊत आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची घेणार भेट

    नवी दिल्ली : खासदार संजय राऊत आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर

    शेतकरी नेते राकेश टिकैत यांची घेणार भेट

    दुपारी बारा वाजता मुजफ्फरनगरमध्ये राऊत टिकैत यांची भेट होणार

    थोड्याच वेळात संजय राऊत नवी दिल्लीतील निवासस्थानामधून रवाना होणार

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत टिकैत यांच्या भेटीला महत्त्व

  • 13 Jan 2022 08:12 AM (IST)

    औरंगाबादेत तडीपार गुंडाचा खून, कुऱ्हाडीचे घाव घालून खून

    औरंगाबाद : जिल्ह्यातील बालानगर गावात तडीपार गुंडाचा खून

    कुऱ्हाडीचे घाव घालून तडीपार गुंडाचा खून

    खून करून आरोपी स्वतः एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात हजर

    संतोष गलाटे असं खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव

    तर दिनेश गलाटे असं खून करुन आत्मसमर्पण केलेल्या आरोपीचे नाव

    जुन्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची माहिती

  • 13 Jan 2022 08:10 AM (IST)

    गोव्यात कॉंग्रेस स्वबळावर लढणार, टीव्ही नाईन मराठीला सूत्रांची माहिती

    पणजी : गोव्यात कॉंग्रेस स्वबळावर लढणार

    टीव्ही नाईन मराठीला सूत्रांची माहिती

    महाविकास आघाडीचा प्रयत्न गोव्यात फसणार ?

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

  • 13 Jan 2022 08:05 AM (IST)

    औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली सुरू

    औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली सुरू

    केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यामार्फत मेट्रोसाठी हालचाली सुरू

    भागवत कराड यांच्या उपस्थितीत मेट्रो प्लॅनसंबंधी महत्वाची बैठक संपन्न

    महानगरपालिका आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी होते बैठकीला उपस्थित

    शहरात मेट्रोसाठी डबल डेकर पूल बनवण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग यांची कराड दिल्लीत घेणार भेट

    शहराचा अभ्यास करून ठरवला जाणार मेट्रोचा मार्ग

    डीपीआर तयार करण्यासाठी लागेल 8 ते 9 महिन्यांचा कालावधी

  • 13 Jan 2022 08:04 AM (IST)

    डॉक्टरांसह 3 जणांचा नर्सवर वारंवार अत्याचार करुन गर्भपात 

    औरंगाबाद : डॉक्टरांसह 3 जणांनी नर्सवर वारंवार अत्याचार करून केला गर्भपात

    औरंगाबाद येथील गारखेडा परिसरात प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सवर केला अत्याचार

    अत्याचार करून गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून केला गर्भपात

    डॉक्टरासह डॉक्टरांच्या 3 मित्रांनीही केला नर्सवर अत्याचार

    गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात केल्याने तीव्र वेदना होत असतानाही डॉक्टराने केला नर्सवर अत्याचार

    बसस्थानक परिसरात वेदनादायी परिस्थितीत बसलेल्या नर्सला पाहता सुरक्षा रक्षकाने दामिनी पथकाला दिली माहिती

    सदरील प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 13 Jan 2022 07:28 AM (IST)

    अकोला जिल्ह्यात तापमान 16 अंश सेल्सिअस, 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण 

    अकोला जिल्ह्यात तापमान 16 अंश सेल्सिअस

    जिल्हात गारवा कायम

    गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्हात ढगाळ वातावरण

    या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊन सर्दी,खोकला याने नागरिक त्रस्त

  • 13 Jan 2022 07:14 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषदेतील एफडी घोटाळ्यात 12 कर्मचाऱ्यांवर कारवाई

    नागपूर – नागपूर जिल्हा परिषदेतील एफडी घोटाळ्यात 12 कर्मचाऱ्यांवर कारवाई

    – एक कर्मचारी निलंबीत, 11 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी

    – कारवाई केलेल्या 12 कर्मचाऱ्यांकडून 25 लाखांची वसूली होणार

    – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई

    – नानक कंस्ट्रक्शन कंत्राटदाराकडून एफडीच्या गैरवापराच्या प्रकरणात कारवाई

  • 13 Jan 2022 07:13 AM (IST)

    वृद्ध महिलेला रेशन देण्याचं आमिष देत नाशिकमध्ये चोरट्यानी मंगळसूत्र लांबवले

    नाशिक – वृद्ध महिलेला रेशन देण्याचं आमिष देत चोरट्यानी मंगळसूत्र लांबवले

    – नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

    – कोणावरही विश्वास न ठेवता अगोदर खात्री करा, पोलिसांच नागरिकांना आवाहन

    – चोरटे याचाच फायदा घेत करतायत चोऱ्या

Published On - Jan 13,2022 6:10 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.