मुंबई: ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात (OBC Political Reservation) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मदत व पुनर्वसन, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…